सुप्त मन

.
अबौद्धिक व चाकोरीबद्ध, वारंवारता अति असलेलं काम करणार्‍या व्यक्तीची इच्छा असू शकते की आपल्याला बौद्धिक किंवा निर्णयक्षमतेची कसोटी पहाणारे काम मिळावे. आपण महत्त्वाचे निर्णय घावेत. आपल्यात तो करीष्मा असावा लोकांची मते बदलण्यात आपण महत्त्वाचे प्यादे ठरु. "ऑल्सो रॅन" च्याहूनही काहीतरी आहे अन ते यश आपले व्हावे. अनेकांनी आपली वाहवा करावी.
.
किंवा एखाद्या व्यक्तीस कुटुंबियांनी परीपूर्ण , उबदार घर, मऊसूत पोळी-भाजी आयतीच ताटात कोणी वाढणारी, निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ती आदि गोष्टी हव्याशा वाटत असतील. मग वरुन ती व्यक्ती कितीही रुक्ष वाटेना. त्याच्या मनात एक हळवा कोपरा असू शकतो जो की समस्त जगापासून दडलेला व त्याच्या मर्मबंधातील मनिषा आहे असा.
.
एखादी पौगंडावस्थेतील अतिअभ्यासू व शाळेखेरीज अन्य विश्व नसणार्‍या मुलास वारंवार मनातून असेही वाटू शकते की तो एखाद्या खेळात प्रवीण असावा, त्याने रोब झाडावा, एक प्रकारचा बेदरकार अन बेफिकीर पर्सोना / मुखवटा त्याचा असावा. अनेक मुलींना तो आवडावा अन त्यालादेखील ही पॉप्युलॅरिटी अ‍ॅट इझ घेता यावी.
.
एखादी नाकासमोर चालणार्‍या, सपक आयुष्य जगणार्‍या स्त्रीच्यादेखील काही वाइल्ड फॅन्टसी असू शकतात.
.
पण या सर्व गोष्टी साध्या डोळ्यांना दिसतात कोठे? अगदी अनेक वर्षे आपले एखाद्या व्यक्तीशी जीवाभावाचे मैत्र असू असते, अन तरीही त्या व्यक्तीच्या अंतर्मनात दडलेल्या त्या व्यक्तीच्या आकांक्षांबद्दल, स्वप्नांबद्दल, फॅन्टसीबद्दल अर्थात कल्पनाराज्याबद्दल आपण पूर्णतः अनभिज्ञ असू शकतो नव्हे असतोच.
.
यासंदर्भात एक दोन मार्मिक उदाहरणे आठवतात. एका लेखकाचे बहुधा थॉमस मूर यांचे मध्यमवय या विषयावरचे पुस्तक वाचनात आले होते ज्यात त्यांनी या सुप्त इछा-आकांक्षा-फॅन्टसी चा उल्लेख केलेला होता व त्यांनी मिडलाइफ पॅसेजबद्दल हे विश्लेषण केले होते की आयुष्यभर दबलेल्या या इच्छा या काळात तीव्रतेने डोके वर काढतात कारण माणसाला कळते की "नाऊ ऑर नेव्हर". आता आपल्या व्हायटॅलिटीची, आरोग्य तसेच संपूर्ण आयुष्याचीच उतरंड सुरु होणार आहे तेव्हा जे काही साध्य करायचे ते आत्ता नाही केले तर जन्मभराची अतृप्तता सहन करावी लागणार. या लेखकाच्या म्हणण्यानुसार, जिथे प्रकाश असतो तिथे सावली ही असतेच. या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची एक "शॅडो पर्सनॅलिटी" असते. शॅडो कारण ती सोशली अ‍ॅक्सेप्टेबल असेलच असे नाही किंबहुना नसतेच. जितक्या वेळा आपण एखादी गोष्ट इच्छाशक्तीने बलपूर्वक नाकारतो, तितकी ती गोष्ट या शॅडोमध्ये ढकलली जाते अन तेव्हढी ती पर्सनॅलिटी मजबूत बनत असते, तिला आकार येत असतो. मध्यमवयात व्यक्तीचे असे छुपे व्यक्तीमत्व अत्यंत जोरात, तीव्रतेने डोके वर काढते. व्यक्तीच्या बाह्य मुखवट्याशी विसंगत असे हे व्यक्तीमत्व उफाळून येते. शक्य आहे.
.
शकोला (Chocolat) या सिनेमातही या सुप्त इच्छांच्या रेट्याचे मार्मिक चित्रण केलेले आहे. फ्रेन्च खेड्यामध्ये एक जिप्सी स्त्री जाते व चॉकलेट चे दुकान थाटते. त्याबद्दल खूप विरोध ती सहन करते. पण हळूहळू तिचा क्लायंट बेस बनत जातो व तिला त्या त्या व्यक्तीच्या मनात डोकावता येते. त्यांच्या सुप्त इच्छा जाणून घेता येतात. तिचे चॉकलेटस जादूने त्या व्यक्तीच्या सुप्त इच्छाच जणू वरती काठावरती आणतात.
.
ख्रिश्चिअ‍ॅनिटीमधील कन्फेशन्स चा संबंध मला छुप्या व्यक्तीमत्वाशी लावावासा वाटतो कारण त्यात इतकी अपराधीपणाची भावना असते की नक्की तत्सम कृती शॅडो पर्सनॅलिटीमध्ये अर्थात छुप्या व्यक्तीमत्वामध्ये लोटली जातात.
.
लहानपणी एखादी गोष्ट करु नको सांगीतली की तीच कराविशी वाटते की नाही? जन-गण-मन/ वंदे मातरम ला स्तब्ध उभे रहायचे असते तेव्हा किती मुलांच्या नाकाला, गालाला खाज सुटल्यासारखे होते? जितका टॅबू जास्त तितकी ती करण्याची इच्छा जास्त होते.
.
ज्योतिषाबद्दलच सांगायचे झाले तर, १२ वे घर हे सुप्तमन, वेड्यांचे इस्पितळ, तुरुंग व दवाखाने, धार्मिक स्थळे यांचे घर आहे. अन तुम्ही पहाल तर यातील प्रत्येक गोष्ट ही जगापासून लपलेली आहे. १२ वे मीन या जलराशीचे घर हे अशा छुप्या गोष्टींचेच घर आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मध्यमवयात व्यक्तीचे असे छुपे व्यक्तीमत्व अत्यंत जोरात, तीव्रतेने डोके वर काढते

पण कधी-कधी उलट चित्रही दिसतं! विशेषतः जिथे व्यक्तीचा सोशल दायरा फिक्स झालेला असतो; त्याची विशिष्ट 'सोशल इमेज' बनून गेलेली असते, त्यावेळी माणसं सहसा रिस्क घेत नाहीत. मग त्याची स्युडो पर्सोनॅलिटी आतल्या आत गडद होऊन त्याचे आणखी कांही परीणाम होत राहीले तरीही!

एखादी नाकासमोर चालणार्‍या, सपक आयुष्य जगणार्‍या स्त्रीच्यादेखील काही वाइल्ड फॅन्टसी असू शकतात

एक्सपोझर असेल तर..किंवा काय अव्हेलेबल असू शकतं ह्याविषयी कांहीतरी कल्पना असेल तर.बर्‍याच वेळा असं कुठलं एक्सपोझरच मिळू दिलं गेलं नसू शकतं (भारतीय, ग्रामीण महीला इ)?

जितका टॅबू जास्त तितकी ती करण्याची इच्छा जास्त होते.

१०० टक्के खरंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

प्रतिसादाकरता आभार प्रसन्न.

त्याची विशिष्ट 'सोशल इमेज' बनून गेलेली असते, त्यावेळी माणसं सहसा रिस्क घेत नाहीत. मग त्याची स्युडो पर्सोनॅलिटी आतल्या आत गडद होऊन त्याचे आणखी कांही परीणाम होत राहीले तरीही!blockquote> असू शकतं. डिप्रेशन वगैरे मानसिक व्याधी उद्भवु शकत असाव्यात. डिप्रेशन हा जरी केमिकल लोचा मानला तरी. तो ट्रिगर व्हायला काही विचार, घुसमट आदि असेलच की.
____

एक्सपोझर असेल तर..किंवा काय अव्हेलेबल असू शकतं ह्याविषयी कांहीतरी कल्पना असेल तर.बर्‍याच वेळा असं कुठलं एक्सपोझरच मिळू दिलं गेलं नसू शकतं (भारतीय, ग्रामीण महीला इ)?

हे बाकी खरं आहे. अगदी अमेरीकेतील इमिग्रन्टसदेखील त्यांच्या वाइल्डेस्ट फँटसी मध्ये अमेरीकेचे पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगत नसतील बहुतेक Biggrin
___

१०० टक्के खरंय!blockquote> Smile ख्रिस्चिअ‍ॅनिटी तर म्हणते संपूर्ण मानवजातच या टॅबूच्या आकर्षणातून निर्माण झाली ... अ‍ॅडॅम-इव्ह

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अमेरीकेतील इमिग्रन्टसदेखील त्यांच्या वाइल्डेस्ट फँटसी मध्ये अमेरीकेचे पंतप्रधान होण्याची इच्छा बाळगत नसतील बहुतेक

आँ? अमेरिकेचा पंतप्रधान?
हां हां राष्ट्राध्यक्ष म्हणायचंय तुम्हाला...
नाय बॉ, अमेरिकेतले इमिग्रंन्टस त्यांच्या वाइल्डेस्ट फँटसी मध्येही अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायची इच्छा नाय बाळगत.
कारण फक्त अमेरिकेत जन्मलेली व्यक्तीच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकते असं त्यांच्या कायद्यात आहे. इमिग्रंन्ट्स बाय डेफिनेशन ही अट कशी पुरी करणार?

स्वगतः शुचि सिटिझनशिपची टेस्ट फेल होणार बहुतेक!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा अगदी मला वाटलेलच काहीतरी चुकतय. Smile
खरच फेल होणारे मी Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्या क्लासेस, किंवा श्रीनूज अकॅडेमी सापडेल जवळपास. गेल्या पाचवर्षातील प्रश्नपत्रिका (उत्तरांसहित) शिवाय पाच मॉडेल टेस्ट सहित असं एखादं पॅकेज असेल. महिनाभर अगोदर लावा, काम खलास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हे सर्व अमेरिकेतही असतं की जोक वगैरे आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंग्लंडात बघ बॅट्या. भारतीयांमधे भारता सारखे क्लासेस चे फॅड बोकाळले आहे. ग्रामर स्कूल ला प्रवेशाची हमी वगैरे.
वाट लावून टाकतायत तिथल्या शिक्षणपद्धतीची. थोड्या दिवसांनी इंग्रजांना वेगळ्या शाळा काढायला लागणार आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दीडशे वर्षांचा सूड थोडा जरी घेतला जात असेल तर चांगलंच आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या ह्या ह्या..
एंग्रज लै खमके आहेत असे निरिक्षण नोंदवतो. अगदी मदरसेवाल्यांपासून सगळ्यांना सुमडीत गुंडाळतेत.
एक छोटंसं उदाहरण, दर वर्षी शिकारीचा हंगाम असतोय. फेजंट पक्षी, हरणं, बँजर सारखे प्राणी यांच्या शिकारीला सरकार खुली परवानगी देतंय (त्यांची लोकसंख्या कंट्रोल करायला) आणि दर वर्षी "पेटा"सारखे पब्लिक दंगा करतंय तरी कुठे कसला आवाज नाही की बातमी नाही. सुमडीत त्यांना गुंडाळून जे करायचंय ते करतातच.. Smile

(उदाहरण हय. भावार्थ समजून घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

हाहा, ते खरंय. पण मदरसावाल्यांना सुमडीत ठेवणं त्यांना कितपत जमतंय काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो निळ्या एक खेचतो आणि हा वहावत जातो!!! Smile
असले काहीही क्लासेस वगैरे नसतात आणि त्याची जरूरही नसते.
सिटिझशिपचा फॉर्म भरला की ते एक बुकलेट आणि सीडी पाठवतात. त्यात सगळी देशाची फेडरल लेव्हलवरची आवश्यक ती माहिती दिलेली असते. आमचे कॅलिफोर्नियावाले आणखी काही राज्याची अ‍ॅडिशनल माहिती पाठवतात. पन्नासएक सॅम्पल प्रश्नही दिलेले असतात परिक्षेचा अंदाज यावा म्हणून. ते वाचायचं, लक्षात ठेवायचं आणि परिक्षा द्यायची. साधं सरळ सोपं आणि पारदर्शक प्रकरण आहे ते!
उगाच काहीतरी सरप्राईज वगैरे देत नाहीत परिक्षेमध्ये. त्यांच्या दृष्टीने कुणाला जर नागरीक व्हायचं असेल तर त्याला एक सर्टन माहिती असली पाहिजे. आणि ती आहे का नाही एव्हढंच ते बघतात...
प्रश्न तयार करतांनाही ते समाजाचा एक बौद्धिक लघुतम साधरण विभाज्य लक्षात घेऊन बनवलेले असतात त्यामुळे उच्चशिक्षित लोकांसाठी ते अगदी सोपे असतात...
अर्थात, पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष इतकं मात्र ते बारकाईने बघतात!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात, पंतप्रधान की राष्ट्राध्यक्ष इतकं मात्र ते बारकाईने बघतात!! (डोळा मारत)

ROFL ROFL
मी काल नवर्‍याला विचारत बसले नक्की किती अटेम्ट्स असतात अन ते सगळे फेल झाले तर काय होतं वगैरे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंतप्रधान, राणी, गरम चहा आणि क्रिकेट यावर बोलायला सुरवात केली की जाज्वल्य अमेरिकनाची सॉल्लिड सटकते!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो शंका विचारली आपली. अमेरिकेत काय आपण कधी राहिलेलो नाही, मग तत्रस्थांना माहिती विचारणे हीच बेष्ट पॉलिसी नाय का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शंकेबद्दल धन्यवाद मलाही हीच शंका आली होती अन मी सर्चही केली ती नावं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0