Skip to main content

इतर

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक.

ललित लेखनाचा प्रकार

भुलभुलैय्या

आशुतोष रामाणीला मी ऑफिसमध्ये पहील्यांदा भेटले. त्याचे झाले असे - मला एका MNC मध्ये Computer Programmer ची पहीलीवहीली नोकरी मिळाली. अन join होण्याच्या दिवशी एक तास आधीच म्हणजे ८ वाजता, मी किंचीत बिचकत आमच्या ऑफिसच्या भव्य इमारतीत प्रवेश केला. इमारत जितकी impressive होती तितकीच जंतर्मंतर भुलभुलैय्याही होती. (स्माईल) पहीलं प्रेमही तसच असतं नाही?
.

ललित लेखनाचा प्रकार

मृगया

मला ही कथा जमली आहे की नाही हे माहीत नाही. पण या कथेतून कोणत्याही श्रद्धा-विश्वासाचे-नात्याचे मुखवटे न घेतलेल्या नर-मादी या नात्यातल्या primal (आदिम) आकर्षणाचे, आणि सुप्त मनातून, वरती येणारे, तर्क अन बुद्धीच्या कसोटीवर घासून पहाता येणारे, आसक्तीचे कंगोरे मला दाखवायचे होते. अनेक अनामिक भावनां अचानक जाणवल्याने, उडालेली गोंधळाची स्थिती मला खरं तर शब्दांतून explore करायची होती. या rawness करता रानटी लोकांची पार्श्वभूमीच योग्य वाटली. अर्थात तुम्हा सर्वांना Read between the lines करावे लागेल.

ललित लेखनाचा प्रकार

स्वतंत्र पुस्तकचाचे

आज सकाळचीच गोष्ट.

एमेच एसेच ५५च्या एका निर्मनुष्य पट्ट्यात मी ड्राईव्ह करत होतो. सकाळचं कोवळं ऊन आणि नोव्हेंबरची गुलाबी थंडी असं आल्हाददायक वातावरण होतं. ट्रकमध्ये ज्वालाग्राही माल होता, पण लोडिंग करताना आम्ही सुयोग्य काळजी घेतली होती. एकूण, मी आणि क्लीनर प्रत्युत्पन्नमती (त्याच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला पंचतंत्र वाचायचे डोहाळे लागले होते म्हणे) दोघेही रिलॅक्स्ड होतो.

अचानक आम्हांला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवरून एक वॅगनआर भरधाव येऊ लागली. खरंतर सर्व्हिस रोड खरोखर समांतर असता तर ती आमच्यापर्यंत कधीच पोचली नसती; पण तो हायवेला छेद देत होता.

ललित लेखनाचा प्रकार

डॉ. शंतनू अभ्यंकर - सत्य असत्याशी मन केले ग्वाही

विज्ञानविषयक लिखाण करणारे वाई येथील बहुआयामी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे नुकतेच दुर्धर आजाराशी सामना करत निधन झाले. त्यांच्या एका सुहृदाने त्यांना वाहिलेली आदरांजली.

ललित लेखनाचा प्रकार

'धुक्यात हरवलेले लाल तारे'च्या निमित्ताने

जवळपास नऊ वर्षांपूर्वी प्रसाद, निखिल आणि मी गप्पा मारत बसलो होतो. सोविएत रशियन पुस्तकांबद्दल काहीतरी केलं पाहिजे असं तिघांनाही वाटत होतं, पण नेमकं काय ते सुचत नव्हतं. अचानक प्रसाद म्हणाला "तुमच्या बोलण्यात सर्वात जास्त उल्लेख येतात ते लहानपणी वाचलेल्या रशियन पुस्तकांचे. त्या पुस्तकांचाच मागोवा घेतला तर?" ती कल्पना ताबडतोब क्लिक झाली, आणि आम्ही रिसर्चला सुरुवात केली.

ललित लेखनाचा प्रकार

पाकिस्तान -१०

.
चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”

ललित लेखनाचा प्रकार

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.
.

ललित लेखनाचा प्रकार

सॉफ्ट पॉर्न? ओके प्लिज.

"सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.

ललित लेखनाचा प्रकार