इतर

कोपनहेगन-पॅरीस भटकंती-५

सकाळी मी आणि विकास दहा वाजता उठलो. थंडी होती त्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती, खिडकीतून बाहेर पाहिलं आयफेल टावर दिसत नव्हता धुक्यात हरवला होता. आम्ही आंघोळी आटोपून अकरा वाजेपर्यंत तयार झालो. आयफेल टॉवर धुक्यातून अर्धा बाहेर आला होता.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

सॉफ्ट पॉर्न? ओके प्लिज.

"सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.

ललित लेखनाचा प्रकार: 

हार्ट शेप्ड तिळाच्या वड्या

सोसायटीमधल्या तरुणांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नये असं काल आम्ही सोसायटीच्या मीटिंग मध्ये ठरवलं. एक तर व्हॅलेंटाईन हा तमाशा आपला नाही. ती परक्यांची थेरे. आपली प्रभुरामाची भूमी. सीतामाईने नाही म्हंटले प्रभूंना 'व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करूया.' इथे या असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. समाजाचे पावित्र्य आपणच जपायला हवे. आपल्या परीने आपण समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावावा, हाच आमचा विचार. पाचव्या मजल्यावरील ठाकरे सेक्रेटरी आहेत. त्यांना म्हंटलं, सरळ एक पत्रक छापूया. आणि डकवूया लिफ्ट जवळ. वाटलं तर लिफ्ट मध्ये, एवढंच काय प्रत्येकाच्या घरी जाऊन देऊया.

ललित लेखनाचा प्रकार: 

श्रीरामा, वाचव रे!

आज सकाळपासूनच टीव्ही लावला. इतकं पवित्र वाटत होते. लवकर उठलो. हिने १५ दिवसापूर्वीच उटणे आणले होते. ते काय आहे, कोपऱ्यावरच्या जोश्याकडे श्रीराम प्रतिष्ठापनादिनानिमित्त सुवासिक उटणे, गंध, उदबत्या आल्या आहेत. पेढे पण ठेवले आहेत. सातारी कंदी पेढे आण म्हंटले हिला. तर म्हणे शुगर सांभाळा आधी. अरे श्रीराम आहे माझा .. बघेल तोच. तोच काळजीवाहू, तोच जीवनदायी. या दिवशी पेढे नाही खायचे तर कधी? बायकोशी वाद घालण्याइतका वेळ नाही माझ्याकडे. मग मीच आणले जाऊन पेढे. शुगर काय शिंची.

ललित लेखनाचा प्रकार: 

कीचक

"...तो बघा किचक. जुलमी आहे."

"अरे! पण लोक त्याच्या पाठीशी आहेत. तो करतोय ते बरोबरच आहे."

"किचक असता तर भीमानं मारला असता"

"बरोब्बर. मेला नाही, त्या अर्थी हा किचक नाहीच. सद्गुणांचा पुतळा आहे. सत्याचा विजय होतो हे खरं असेल तर ज्याचा विजय झालाय ते सत्यच असलं पायजे"

"तो सत्य आहे, म्हणजे रडणाऱ्या दासी, सेविका ह्या खोटरड्या स्वार्थी हलकट नीच आहेत. त्या मेलेल्या बऱ्या. त्यांना टांगता आलं नाही तरी निदान त्यांनी बूट टांगले हे उत्तमच केलं."

खदाखदा हसण्याचा आवाज.

ललित लेखनाचा प्रकार: 

मेथांबा

"डाॅन एल पावो रेआलसाठी काम करणार का?"

"मी? काहीतरी काय? मी साधा माणूस आहे हो. डाॅन लोकांशी माझा काय संबंध?"

"मी काय एल पासोवरून आलेला वाटलो काय? तुमच्या बॅगेतली बरणी बघितलीय मी!"

"मग? घरून येताना खाऊ आणलाय फक्त!"

"ती हिरव्या झाकणाची बरणी पाहिली मी. आणि मेथांबा असा स्टिकरसुद्धा!"

"अहो मेथीचे दाणे आणि कैरी यांचं लोणचं असतं ते. त्यात डाॅन एल पावो रेआलला काय स्वारस्य असणार?"

"खामोष! माझे आजोबा नूमवित होते. संधी-समास मीसुद्धा कोळून प्यायलोय."

"अहो काय बोलताय तुम्ही?"

"मेथी अधिक आंबा यांचा संधी मेथ्यांबा होईल."

"क्काय?"

ललित लेखनाचा प्रकार: 

एल पावो रेआल

गॅब्रिएल गार्सिया मार्केझच्या वाङ्मयावर पीएचडी करणारा अभ्यासक म्हणून महिनाभर बोगोटाला येणं ही माझ्यासाठी मोठी संधी होती, आणि साहसदेखील. मी पहिल्यांदाच परदेशप्रवास केला होता, आणि सेमिनार आणि वर्कशॉप्सबाहेरचं बोगोटा बघायची संधीही बिलकुल सोडली नव्हती.

ट्रिप संपण्यापूर्वीचा शेवटचा वीकेंड म्हणून शुक्रवारी रात्री हॉटेलच्या बारमध्ये पीत बसलो होतो तिथे एकाशी ओळख झाली. गप्पा मार्केझवरून सुरु झाल्या आणि पितापिता नार्कोजवर आल्या.

"नार्कोजमधे दाखवलं तो जुना इतिहास. आता बदललंय सगळं. पण बिझनेस चालूच आहे."

"काहीचरीत काय?" मी कसंबसं विचारलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

जुन्या खाटिकखान्यात शेक्सपीयर, हाईनर म्युलर, हॅम्लेट आणि कंपनी (मुक्तशब्द मासिकात पूर्वप्रकाशित !)

हॅम्लेट हे एक निमित्त! हॅम्लेटच्या निमित्ताने मला पुण्यातल्या,भारतातल्या आणि गेली काही वर्षे माझ्या नाट्यानुभवविश्वात असलेल्या युरोपियन, पोलिश नाटकाकडे पाहता येईल;त्यातल्या काही गोष्टी सांगता येतील आणि नाटकाच्या आजूबाजूने काही बोलता येईल असं वाटल्याने हा लेखप्रपंच!

ललित लेखनाचा प्रकार: 

सिंधुआज्जी आणि नीरव कोलाहल

सिंधुआज्जींनी तरस बल्बाकडे अंमळ रागानेच पाहिले. तो कितीही लाडका असला तरी काय, पाहुण्यांसाठी आणलेला खिमा फस्त करणं ही त्याची चूकच होती. त्यात भर म्हणजे, सेरेंगेतीमध्ये झेब्र्याच्या कवट्या कच्च्याच चघळणाऱ्या तरसांचा पाईक असलेल्या तरस बल्बाने खिमा मात्र सिंधुआज्जींनी साग्रसंगीत बनवल्यावर खाल्ला होता. सबब, सिंधुआज्जींचे श्रमदेखील व्यर्थ गेले होते.

तरस बल्बाला समज द्यावी म्हणून घसा खाकरणार एवढ्यात सिंधुआज्जींना आठवलं - आज त्यांचं मौनव्रत होतं!

एवढ्याशा अडचणीला शरण जातील एवढ्या लेच्यापेच्या नाहीत सिंधुआज्जी! त्यांनी ब्रिटिश साईन लँग्वेजमध्ये तरस बल्बाची खरडपट्टी सुरू केली.

ललित लेखनाचा प्रकार: 

हॉटेल, पदार्थ, नावे इत्यादी

कॉलेजला जायला लागल्यापासून हॉटेल नावच्या मित्रमैत्रिणींसोबत बसण्याच्या तीर्थक्षेत्रांला जाणे सुरु झाले. पॉकेटमनी जेमतेम पॉकेटमध्ये मावेल एवढाच. त्यात कटिंग चहा नक्की येई. आई नावाचा ग्रह उच्चीचा असेल तर एखादा वडासांबार बसे. टीटी एम एम पध्दत काय असते, ते कॉलेजमध्ये गेल्यावर कळले. सर्वांना तेच परवडे. दर आठवड्याला कुणीतरी खायला घालायचं, हे फार नव्हतं. (आमच्यावेळी असं नव्हतं, च्या चालीवर आधीचे वाक्य म्हणावे.). एखादा जास्त फिरस्ता मुलगा म्हणे, रोज काय तेच तेच हॉटेल. अमक्या तमक्या ठिकाणी जाऊ पुढच्या वेळेस. त्याचे हे बोलणे ऐकून अनुभवाची क्षितिजे हळुहळू रुंदावतायत, असे वाटे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - इतर