दखल
Surprise! अजून बारीकसारीक काम सुरूच आहे. १६-२३ जुलै या दिवसांतलं लेखन नष्ट झाल्याबद्दल दिलगिरी.
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
२०२२ दिवाळी अंकाविषयी
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१२ ऑगस्ट
जन्मदिवस : चरित्रकार व वाङ्मय विवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे (१८८०), मूकपट आणि बोलक्या चित्रपटांचा निर्माता, दिग्दर्शक सेसील बी. डेमील (१८८१), चित्रकार, लिथोग्राफर जॉर्ज बेलोज (१८८२), क्वांटम सिद्धांताचा पाया रचणारा अर्विन श्रोडींजर (१८८७), चित्रकार ना. श्री. बेंद्रे (१९१०), भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अंतराळकार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई (१९१९), शिल्पकार बी. आर. उर्फ अप्पासाहेब खेडकर (१९२६), मराठी कवी व लेखक फ. मु. शिंदे (१९४८), गिटारवादक व गायक मार्क नाॅफलर (१९४९), बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (१९५९), माजी टेनिसपटू पीट सांप्रास (१९७१)
मृत्युदिवस : कवी आणि चित्रकार विल्यम ब्लेक (१८२७), रेल्वेचे जनक जॉर्ज स्टीफन्सन (१८४८), दानशूर उद्योजक सर विठ्ठलदास ठाकरसी (१९२२), लेखक इयान फ्लेमिंग (१९६४), मेंदूच्या भागांचे कार्य शोधून काढणारा नोबेलविजेता वॉल्टर रुडॉल्फ हेस (१९७३), पेनिसिलिनवर संशोधन करणारा नोबेलविजेता अर्न्स्ट बोरीस चेन (१९७९), चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक, अभिनेता हेन्री फोंडा (१९८२), वर्गभेद, वसाहतवादावर टीका करणारा कलाकार जॉं-मिशेल बास्किआ (१९८८), ट्रान्झिस्टर शोधणाऱ्यांपैकी एक नोबेलविजेता विल्यम शॉकली (१९८९), छायाचित्रकार प्रबुद्ध दासगुप्ता (२०१२), अभिनेत्री लॉरेन बॅकॉल (२०१४)
---
जागतिक युवा दिन
१८५१ : आयझॅक सिंगरला शिलाई यंत्राचे पेटंट मिळाले.
१८७७ : असॅफ हॉल याला मंगळाचा दुसरा उपग्रह डीमॉस याचा शोध लागला.
१९०८ : पहिली 'मॉडेल-टी' गाडी तयार झाली.
१९४२ : 'चले जाव' चळवळीत आप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार; दोन ठार, १६ जखमी .
१९४६ : काँग्रेसचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांना सरकार स्थापन करण्यासाठी व्हाईसरॉयने बोलावले.
१९४८ : लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळवले.
१९५३ : सोव्हिएत संघाने पहिल्या अणुबॉंबची चाचणी केली.
१९६१ : शीतयुद्धाचे प्रतीक असलेल्या बर्लिन भिंतीचे बांधकाम पूर्व जर्मनीने सुरू केले.
१९६६ : "बीटल्स येशूपेक्षा अधिक प्रसिद्ध आहेत" या उद्गाराबद्दल जॉन लेननने पत्रकार परिषदेत माफी मागितली.
१९७८ : चीन आणि जपान यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९८१ : आय.बी.एम.चा पहिला वैयक्तिक संगणक (मॉडेल ५१५०) बाजारात आला.
१९९० : सू हेंड्रिक्सनला टिरॅनोसोरस रेक्सचा सगळ्यात मोठा सांगाडा सापडला.
१९९८ : स्विस बँकांनी नाझी वंशविच्छेदामधून वाचलेल्यांना सव्वाशे कोटी डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.
२००४ : अमेरिकेत न्यू जर्सी राज्याच्या राज्यपाल, जेम्स इ. मकग्रीव्हीने राजीनामा देऊन आपण 'गे अमेरिकन' असल्याचा उच्चार केला.
२०१० : रिक्षाचालकांच्या मग्रूरीविरोधात मुंबईत प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले.
२०१२ : लंडन ऑलिंपिकमध्ये पैलवान सुशील कुमार कुस्तीत दोन रौप्य पदके जिंकून दोन वैयक्तिक पदके जिंकणारा पहिला भारतीय ठरला.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- भाऊ