Skip to main content

मराठीपणा : एक समस्या

भय्याजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं : मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. राहुल सरवटे यांनी या पार्श्वभूमीवर मराठीपणा म्हणजे काय याचा घेतलेला हा एक धांडोळा.

एक शांतिप्रिय अवलिया... नितीन सोनवणे!

MMBA च्या संक्रांतीच्या कार्यक्रमात त्यांनी एका तरुणाला स्टेज वर बोलावलं. नितीन सोनावणे, शिक्षणाने इंजिनिअर आणि काय करतात - चालतात.. पडलात ना बुचकळ्यात!

हा माणूस गेली सात-आठ वर्ष चालतोय, म्हणजे त्याने अनेक देशा-विदेशात हजारो मैल पदभ्रमंती केली आहे. आणि आता तो सॅन फ्रान्सिसको ते वॉशिंग्टन डीसी, तीन ते साडेतीन हजार मैल, ही यात्रा पायी करणार आहे. 

स्टेजवरून ते सांगत होते आणि मला इतकं आश्चर्य वाटायला लागलं..

सिंधुआज्जी आणि वाघाची शिकार

सिंधुआज्जींनी आपल्या हातातलं पुस्तक आरामखुर्चीलगतच्या टेबलवर ठेवलं, आणि समाधानाचा सुस्कारा सोडला.

 

"किती छान लिहिलंय कॉर्बेटनं! आणि अनुवादही फक्कड जमलाय," आरामखुर्चीवर डोलत त्या म्हणाल्या.

guinea pig (शतशब्दकथा)

" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी
" पक्या, बिंधास लिही. जिंकशील"
" प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय"

सरडा आणि रंग बदलणारा नेता

सरडा  त्याला म्हणाला आजगायत मी कोणत्या ही माणसाला रंग बदलताना पाहिले नाही. आपण खरोखर कोण आहात? तो माणूस म्हणाला ......

हरपले श्रेय

अनिलने झोपेतच कूस वळवली आणि त्याला जाग आली. आपण कुठे आहोत ते आठवायला त्याला क्षणभर वेळ लागला. त्याने साईडटेबलवरचा नाईटलॅम्प लावला, तिथे ठेवलेला चष्मा लावला, आणि फोनच्या डिस्प्लेत वेळ बघितली. पहाटेचे तीन वाजले होते. "विचिंग अवर" अनिल स्वतःशीच पुटपुटला.

ट्रम्पचा हैदोसधुल्ला

ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. त्याचा काही प्रमाणात अर्थ लावण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे.

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

षड्रिपुंवरच्या माझ्या पाच  शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.

काय नाहीये माझ्या पाच शशकांत?

माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील.

पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना.

शब्दधसका

तुम्ही एखाद्या विशिष्ट नावाचा किंवा शब्दाचा धसका घेतला आहे का? ओनोमाटोफोबिया (Onomatophobia)म्हणजे विशिष्ट शब्दांची किंवा नावांची त्यांच्या कथित महत्त्वामुळे होणारी असामान्य वा असाधारण भीती . ही विशिष्ट नावे वा शब्द ऐकण्याची उच्चारण्याची  दुर्भिती  आहे. ओनोमाटो (म्हणजे शब्द) आणि फोबिया (म्हणजे भीती) या शब्दांचे मूळ ग्रीक आहे.
फोबिया लिस्ट वेबसाइटवर ५०० हून अधिक नामांकित फोबिया आहेत, त्यांची ग्रीकाळलेली नावे व वैशिष्ट्ये पाहिले तर चक्क हास्यास्पद वाटावीत असे ते फोबिया आहेत.

सिंधुआज्जी, ल्यूसी, आणि सहृदय पाणीचोर

"वरिष्ठ नागरिक महिलेला एका महिन्याच्या परदेश प्रवासासाठी सोबती हवा आहे. सर्व खर्च केला जाईल व योग्यतेनुसार मानधन दिले जाईल. साहसाची आवड असलेल्या तरुण-तरुणींना प्राधान्य दिले जाईल. पासपोर्ट आवश्यक. अर्ज करण्यासाठी आमच्या वकीलांशी संपर्क साधा: महापात्रा, महापात्रा, आणि महापात्रा. पोस्ट बॉक्स क्रमांक ..."