मुंबई ते बनारस ते मुंबई - काही नोंदी - २ - ट्रेन प्रवास
एकदा तरी यूपी बिहार ला जाणाऱ्या ट्रेन ने किंवा मुंबईहून यूपी बिहार ला येणाऱ्या ट्रेन ने छत्तीस तास प्रवास करावा माणसाने . काय काय अनुभव येतील तुम्हाला सांगतो, फक्त निरीक्षण करत रहावं.
भांगेत सिंदूर आणि ओठांना लिपस्टिक लावून डोक्यावर पदर घेतलेल्या बायका
दिवसभर तोंडात पान किंवा जर्दा किंवा तमाखु किंवा नुसती सुपारी चघळत राहणारे त्यांचे “ए जीऽऽ”
पहिली दीदी , मग दुसरी बेबी झाल्या नंतर फार नवसाने झालेल्या “छोटे सरकार “ ला सांभाळत बसणाऱ्या बायका
ए बाबू , ए लड्डूगोपाल म्हणत त्या छोटे सरकार ला सांभाळणारी दीदी तर ए लडके, ए छुटकू म्हणत त्याचे गाल ओढणारी बेबी
करड्या रंगाच्या ५० छ्टा- भाग-१
प्रास्ताविक
सर्वप्रथम मी या विषयाचा तज्ञ नाही तसेच यामध्ये सक्रीय सहभाग नाही. माझे विवेचन हे माझ्या या विषयाच्या मर्यादीत वाचना चिंतना इत्यादी, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील काही अनुभवी कार्यकर्त्यांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतुन, व काही खासगी समारंभांना उपस्थित राहता आल्याने मिळालेल्या माफक अनुभवांतुन आलेले तोकडे असे आहे. तसेच स्वअनुभव नसल्याने हे एका काठावरुन बघत असलेल्या व्यक्तीचे विवेचन आहे हे कृपया ध्यानी घ्यावे तसेच या विषया संदर्भात आपल्याकडे काही नविन दृष्टीकोण वा माहीती असल्यास जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल.
- Read more about करड्या रंगाच्या ५० छ्टा- भाग-१
- 3 comments
- Log in or register to post comments
जर्द पिवळी दुपार
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
पुन्हा पुन्हा बोलाविते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
- Read more about जर्द पिवळी दुपार
- Log in or register to post comments
फ्रेंच लेफ्टनंटस् वुमन
तेही नो दिवसा गतः म्हणून उसासे टाकणारे बरेच असतात. भूतकाळ व. इतिहास त्यांना इतका प्रिय असतो की वर्तमानकाळात जिवंत राहणे कठिण होऊन जाते. भविष्य तर आणखी अंधार. खरेतर भूतकाळाची माहिती ऐकून किंवा कुठे तरी पुस्तके वाचूनच झालेली असते. मुद्रित झालेली प्रत्येक ओळ खरी मानायला हवी असे काही नाही. आपल्या येथील राजेमहाराजांच्याबद्दल लिहून ठेवलेले वाचले तर असे वाटेल की प्रत्येक जण कर्ण किंवा हरिश्चंद्राचेच अवतार आहेत. इंग्रजांच्या थडग्यावरील लिहिलेले वाचले तर सगळे इंग्रज म्हणजे जणू काय आकाशातील बापांचेच चेले. थडग्यावर-सुध्दा बहुतेक फार दयाळू असे कोरलेले असेल.
- Read more about फ्रेंच लेफ्टनंटस् वुमन
- 11 comments
- Log in or register to post comments
स्वप्निल टीम: दोन लघु कथा
फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले.
- Read more about स्वप्निल टीम: दोन लघु कथा
- 2 comments
- Log in or register to post comments
कथा-कविता
घडलेल्या घटनांच्या कथा झाल्या
उरलेल्या शक्यतांच्या कविता झाल्या.
कपाळावरची बट मागे सारायची होती
कपाळावरच्या बटांच्या गझला झाल्या.
हातघाईची लढाई अनिर्णित राखली पण
माझ्याच पराभवाच्या बखरा झाल्या.
नाती गोती आप्त इष्ट मित्र वगैरे
पेपरातल्या जुन्या बातम्या झाल्या.
मी किनारी आहे तसाच अजून बसूनी
तुझ्या आठवणींच्या नद्या झाल्या.
- Read more about कथा-कविता
- Log in or register to post comments
थॉमस जेफरसन – अमेरिकेच्या लोकशाहीचा शिल्पकार
परिचय
थॉमस जेफरसन हे नाव भारतात अनेकांना परिचित नसले तरी अमेरिकेच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. १३ एप्रिल १७४३ रोजी व्हर्जिनिया या ब्रिटिश वसाहतीत जन्मलेल्या जेफरसन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते (१८०१–१८०९) आणि स्वातंत्र्यघोषणापत्राचे मुख्य लेखक होते. लोकशाही, स्वातंत्र्य, शिक्षण आणि विज्ञान या मूल्यांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला.
- Read more about थॉमस जेफरसन – अमेरिकेच्या लोकशाहीचा शिल्पकार
- 2 comments
- Log in or register to post comments
निमित्त : ‘तर... अशी सारी गंमत’ - चित्रा पालेकर
सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन
(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार)
काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी ....
मी: वडिलांना दुकान टाकून दिले...
ती: नाही हो,
मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल.
ती: नाही हो, हा जो दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली.
- Read more about सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन
- Log in or register to post comments
थायलंडमधील "चक्री दिन" – एक राजवंशाचा गौरवशाली वारसा
दरवर्षी ६ एप्रिल रोजी थायलंडमध्ये एक विशेष राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो – चक्री दिन. हा दिवस थायलंडच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण दर्शवतो. अनेक भारतीय वाचकांना याची माहिती नसते, म्हणून हा लेख त्यांच्यासाठीच – जे थायलंडच्या इतिहासाशी फारसे परिचित नाहीत, पण जागतिक परंपरांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता ठेवतात.
चक्री दिन म्हणजे काय?
- Read more about थायलंडमधील "चक्री दिन" – एक राजवंशाचा गौरवशाली वारसा
- Log in or register to post comments