खोमनेईची कृपा: चुलीवरचे जेवण, गोवर्यांचे राशन
इराण युद्ध असेच सुरू राहिले तर:
चुलीवरच्या जेवणासाठी
गरज नाही गावाला जायची.
खोमनईच्या कृपेने आज
घरातच पेटली चुल.
मर्सडीज गाडीला पहा
बैल कसे ओढतात.
रुणझुण घंटा नाद
आता पुन्हा साद देतो.
गाय आणि गोबरचे
राज्य पुन्हा आले.
दुधापेक्षा गोबरला आज
भाव जास्त मिळाले.
गोबराच्या गोवऱ्यांसाठी
सरकारी राशनचे दुकान.
लाकूडतोड्याला सापडली .
आज सोन्याची कुऱ्हाड.
एक गमतीदार कवितेवरती अति…
एक गमतीदार कवितेवरती अति विद्वत्तापूर्ण टिप्पणी. प्रत्येक ठिकाणी मोदी द्वेष तोही फक्त स्वतःचे अज्ञान दाखविण्यासाठी. 2014 पूर्वी देशात किती दिवसाचा तेलाचा साठा होता. आज 70 दिवसाच्या साठा युद्धापूर्वी देशात होता. मोदींचा दूरदर्शी धोरणाचा परिणाम आहे. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणावर तेल साठा साठविण्याची मोहिम हाती घेतलेली आहे. आज युरोपमध्ये दोनशे रुपयांच्या जवळपास तेल आहे. भारतात आज ही शंभर रुपये च्या खाली आहे. युद्ध वर्षभर चालले तरी सुद्धा भाव दीडशेच्या खालीच राहणार. सरकारची दूरदर्शी नीती जिथे 14 मध्ये 42% रेल्वे विद्युत पर होती आज ९९ टक्के पेक्षा जास्त. फक्त काही हेरिटेज ड्रेन सोडून. याशिवाय दोन्ही डी एफ सी पूर्ण झाल्याने रोज तिथे ३५० हून जास्त मालगाड्या चालतात कोट्यावधी लिटरपेक्षा जास्त तेल वाचते. विजेचे उत्पादन वाढल्याने आज देशात पूर्वी ११.५ जागी २२ तास वीज उपलब्ध आहे. बाकी आज भारताचे जे स्थान जगात आहे ते पूर्वी कधीच नव्हते.
त्यांचे आभार मानायला हवेत!
किती दिवस आम्ही ऐकतोय की जुनं सगळं कसं चांगलं होतं. त्यामुळे चुलीवरची भाकरी, पिठलं, चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचा बर्फाचा गोळा वगैरे किती प्रयोग केले आहेत भारतीयांनी.
पुण्याहून महाबळेश्वरला जाताना पूर्वी भलेही साहेबांचे बंगले दिसत असतील..पण आता सगळीकडे इको टुरिझमचे बोर्ड दिसतात. तिथे पुण्यातली लहान मुलं क्रेटागाडीतून उतरून बैलगाडीत बसायचा पैसे देऊन एक्स्पिरियन्स घेतात.
मी तर म्हणते की पाणी आणि कोळसाही संपू दे. म्हणजे बायकांना जात्यावर दळताना ओव्या म्हणता येतील, मसाले उखळात घालून कुटता येतील. आणि त्याचे काही पैसे द्यावे नाही लागणार.
शेवटी एका मुसलमानाने भारतीय परंपरा परत आणून दिल्या.
...
तिथे पुण्यातली लहान मुलं क्रेटागाडीतून उतरून बैलगाडीत बसायचा पैसे देऊन एक्स्पिरियन्स घेतात.
बैलगाडीचे वर्ष, मेक, आणि मॉडेल कोणते? (चारामायलेज किती, हा प्रश्न नंतर विचारू.)
(विदेशी कंपनीच्या क्रेटागाडीबद्दल सांगितलेत. तिची बोळवण नुसते 'मोटारगाडी' म्हणून केली नाहीत. भारतीय बनावटीच्या बैलगाडीलाच हा सापत्नभाव काय म्हणून? तिचेही तपशील पुरवा ना!)
त्यामुळे चुलीवरची भाकरी, पिठलं, चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचा बर्फाचा गोळा वगैरे किती प्रयोग केले आहेत भारतीयांनी.
टॉकिंग ऑफ बैलगाड्या आणि चुलीवरचे अमूकतमूक, चुलीवरचे बैल भारतवर्षात कधी येणार?
(आणि, हो! चुलीवरचे बैल हे भारतीय/हिंदू परंपरेस साजेसेच आहेत. पूर्वीच्या काळी यज्ञात गायी/बैल यांचा सर्रास बळी देत असत, म्हणतात. (आणि, त्यातला choicest piece अर्थात यज्ञकर्त्या पुरोहिताला जायचा, म्हणे.) पण लक्षात कोण घेतो?
बहुधा याही पुरातन भारतीय/हिंदू परंपरेचे पुनरुज्जीवन एखाद्या मुसलमानाच्याच हातून व्हावे लागेल की काय, नकळे.)
शेवटी एका मुसलमानाने भारतीय परंपरा परत आणून दिल्या.
हो ना! मुसलमान हे प्राचीन भारतीय/हिंदू परंपरांकरिता, त्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता केवढे मोठे आधारस्तंभ आहेत!
(किंबहुना, मी तर म्हणतो, की मुसलमान आहेत, म्हणून हिंदुत्व आहे. मुसलमानच जर नसते, तर भारतवर्षात 'हिंदुत्वा'ला कोण कुत्रे विचारते? परंतु, चालायचेच!)
(विचार करा. बाबराने जर सोळाव्या शतकात (supposedly एक मंदिर तोडून) मशीद बांधली नसती, तर,
- पाकिस्तानातून आलेल्या कोण्या रँडम मनुष्यास 'रथयात्रा' काढून मिरवायला काय प्रयोजन सापडले असते? (त्याला बहुधा सॅटिनचे पोपटी रंगाचे चमकदार शर्ट घालून 'मेड इन यूएसए'-छाप नकली मालाचा सेल्समन म्हणून आयुष्य कंठण्यात समाधान मानावे लागले असते, हँय, साईं? (चूभूद्याघ्या.))
- डोक्याचा चकोट करून, भगवे कपडे घालून हिंडणार्या कोण्या अनामिक मनुष्यास 'आणखी एक रँडम भय्या' याहून अधिक किंमत ती काय मिळाली असती?
- फार कशाला, 'देश को देवालय की नहीं, शौचालय की ज़रूरत है' अशी जाहीर घोषणा करून, त्यानंतर मग (शौचालयाला फाट्यावर मारून) राजरोसपणे त्याच 'देवालया'च्या उद्घाटनास उपस्थित राहणार्या कोण्या रँडम नेत्याला ती संधी कशी काय मिळाली असती?
पाहा, 'हिंदुत्वा'ची केवढी मोठी ईकोशिष्टम उभारून ठेवली 'बाबर' ही उपाधि धारण करणार्या एका मुसलमानाने! (आणि, तीही सोळाव्या शतकात! केवढा दूरदर्शीपणा हा!) 'हिंदुत्वा'वर केवढे थोर उपकार आहेत त्याचे!
एक शहेनशाह ने तुड़वा के हंसीं देवालय,
कितने सियासतदानों की चपाती पे घी डाला है।
पण लक्षात कोण घेतो? चालायचेच! (किंवा, चलता है, हिंदुस्तान है।))
काही पण
भारत स्वयंभु नाही आत्म निर्भर नाही ह्या मध्ये खोमेनी च काय द्वेष. दूर दृष्टी नसणारे नेते, पुढील 100 वर्ष ची उद्धीष्ट समोर ठेवून योजना आखण्यास पूर्ण नाकाम सरकार, सरकारी यंत्रणा,.
जगाचे पोलीस बनायची काही देशाची खाज.
त्या मुळे hi स्थिती निर्माण झाली त्याला भारतीय जबाबदार आहेत खोमोनी नाही