एकरूपएकजीव
प्रणव सखदेव
ये डोळ्यांत
रहायला
खुशाल
स्वप्नं होऊन
त्वचेला बिलग
कर सलग
रक्तात
हो व्हायरस
कर
इन्फेक्शन
बिनऔषधी
मेंदूवरच्या
आठ्या
होऊन वाढ
नाकगुहेत
कर वास
जिभेच्या
पेशींमध्ये
विर्घळ
होऊ दे
इंद्रियमर्यादांचा
ठणाणा
आकार कर
आकारहीन
फास तोंडाला
रंग
दे विशाल रंगमंच
दे भूमिका
डायरेक्टरा
करेन सगळ्या
होऊन एकरूपएकजीव
- प्रणव
वेगळी कविता..
All the world's a stage,
And all the men and women merely players
ही उक्ती सत्य असेल तर मेकप करण्याची प्रक्रिया काय असेल याचा आढावा. आपली इंद्रियं कुठे संपतात आणि भूमिका कुठे सुरू होते हा प्रश्न विचारणारी.
अजून असंच लिहीत रहा.