सिरीज दुसरी: कॅलिफॉर्निकेशन

Californication

कॅलिफॉर्निकेशन माझ्या आयुष्यात आली तेव्हा कायतरीच विचित्र स्टेजमध्ये होतो मी.
पुरुष ज्या ज्या चुका करतो त्या सगळ्या करून झालेल्या आणि त्यांची किंमत चुकवायचा 'शीटी' दौर चालू होता.
आपल्याला हे हवंय की ते हवंय (इकडे मात्रा वेलांटीने रिप्लेस करता यावी) की नुसतंच उंडारायचंय अशी सगळी घालमेल घालमेल चालू होती.
आणि रप्पकन आयुष्यात हँक मूडी आला.
त्याचं पुरुषसूक्त घेऊन.

मला ना लहानपणी आठवतंय,
काही चांगलं प्रोफाउंड नाटक-पिक्चर असलं ना की बहुतेकवेळा माझे बाबा खूर्चीवरून उसळून ओरडायचे, "ही साली माझी स्टोरी आहे माझी."
आणि आई मंदमंद हसत रहायची समजूतदारपणे.
कॅलिफॉर्निकेशन बघताना असे प्रसंग कैक वेळा आले.
हो म्हणजे 'आय ॲम माय फादर्स सन' वगैरे.

तर...
हँक मूडी (अप्रतिम डेव्हिड डुकॉव्हनी) हा कॅलिफॉर्निकेशनचा नायक:
लेखक असून लिहायचा प्रचंड कंटाळा असलेला...(इकडेच पहिली उडी मारलेली मी खुर्चीवरून)
बरीच वर्षं काहीच नवीन न सुचलेला, आटलेला हॅज बीन.
बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेल्या ब्रिलियंट कादंबरीच्या पुण्याईवर हँक जगतोय.
दारू... बायका... (ऑकेजनल) ड्रग्ज... हे आलटून पालटून किंवा एकत्रही चालू आहे.
इन जनरलच टेम्प्टेशनला कंट्रोल करण्यात हे बुवा काही फारसे प्रवीण नाहीत. पण ते कुठलाच पुरुष माणूस नसतो खरं तर.
पण त्याचवेळी त्याचं आपली ऑन-ऑफ गर्लफ्रेंड कॅरन आणि तिच्यापासून झालेली मुलगी बेका, दोघींवरही जीवापाड प्रेम आहेच.
आणि त्या सगळ्या घोळाचीच कथा आहे ही.

खरंतर आन्तूराशसारखीच कॅलिफॉर्निकेशनसुद्धा बॉयजची फँटसी वाटू शकते.
म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये हँकच्या प्रेमात धाडकन पडणाऱ्या, स्वतःहून आपलं लुसलुशीत शरीर देऊ करणाऱ्या सुंदर यशस्वी हुशार स्त्रिया...
पी पी पिऊनही हँडसम राहणाऱ्या हँकचं न सुटणारं पोट...
कुठूनतरी अवचित येणारी संधी आणि पैसा...
हे सगळं आहेच.

पण इथेही तो पॉईंट नाहीच आहे.
नीट बघितल्यावर कळतं की माणसं मोहात पडतातच.
पुरुषांना माणसांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक माणसं रसरसून आवडू शकतात, आवडतात.
कधी एकाबरोबर असताना दुसऱ्याची हमसून हमसून आठवण येत रहाते...
कधी फक्त शरीराचे कढ येत रहातात...
चूक बरोबर ते अलाहिदा.

त्या मातीच्या माणसांचीच तर समजूतदार गोष्ट आहे ही.
हँकला स्त्रिया आवडतात... प्रचंड!
पण त्याचं हे आकर्षण शरीराला धरून मग ओलांडून पलीकडे जात रहातं.
तो म्हणतोच,
You know, there's always something about every damn one of you. There's a smile, a curve, a secret. You ladies really are the most amazing creatures. My life's work.

(या वरूनच मला 'डोळे भरून' सुचलेली तेव्हा थॅंक्सच हँक बुवांना.)
एक वेगळीच ओढ आहे त्याला स्त्रियांची... एकाच वेळी खूप आदिम आणि आधुनिक...
त्यांच्यासाठी तो भांडतो, फटके खातो,
होता होईल तो त्यांना दुखवत नाही पण ते सगळं गोग्गोड अर्थातच नाहीये.
गुंताडा आहेच.
हेडॉनिस्ट असला तरी खूप खरा आहे तो, वरिजनल!
स्वतःशी प्रचन्ड प्रामाणिक... कुठेही झोपणारा, काहीही खाणारा...`हंटर-गॅदरर!
(उदाहरणार्थ पहा तो हॉटेलरूम बाहेर ठेवलेला उरला सुरला बर्गर खाऊन टाकतो तो सीन)
त्या त्या क्षणाशी इमान ठेवण्याच्या किंमती अर्थातच असतात आणि त्या तो चुकवतोच.

भलतीच जीवघेणी रिलेट होणारी गोष्ट म्हणजे हँकला पडणारी स्वप्नं:
कॅरनची, इतर मुलींची... स्वप्नं... सरीअल... आनंदी... खूप सुंदर... इतकी सुंदर की...
डोळे उघडल्यावर प्रचन्ड खिन्न वाटत रहावं.
ही अशी आपल्याला अप्राप्य झालेल्या माणसाविषयी सुंदर स्वप्नं पडावीत आणि बेडवरून उठायचंही त्राण उरू नये... हा फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच बहुधा.

शिवाय हँकचं पात्र लेखक असल्याने फार फार सुंदर भाषा आहे अख्ख्या सिरीजमध्ये,
कॅज्युअल स्टायलिश एल. ए. चं हॉलीवूडी इंग्रजी आणि नितांतसुंदर क्लासिक इंग्रजी अशा दोन्हीची छान मिसळण आहे.
उदाहरणार्थ हँक आणि त्याची गॅंग 'आमेन' ऐवजी 'चर्च' बोलते,
त्याची इंग्लिश छावी टाटा करताना 'टू-ड-लू' बोलते...
हेमिंग्वे, बुकोवस्की, नाबोकोव्ह आणि अनेक साक्षेपी लेखकांचे उल्लेख होत रहातात,
रादर नाबोकोव्हच्या 'लोलिता'सारखा एक ट्रॅकही आहे इथे.

एकंदरीतच सेक्शुऍलिटी ही या सिरीजची महत्त्वाची थीम आहे.
सेक्स, प्रेम, ब्रेकअप्स, अफेयर्स, लग्नं या सगळ्या गोष्टी आयुष्याच्या एकाच वाय झेड माणकाचे पैलू आहेत.
हे आपल्याला इथे कळतं...
ते सुद्धा प्रचंड विनोदी आणि ऍब्सर्ड रीतीने.
विनोदी असली तरी सगळ्या सिरीजला एक खिन्नतेची किनार आहेच...

ते आदिम दु:ख बरेचदा बेकाच्या ड्रूपी डोळ्यांतून सांडतंच.
माझ्या निवांत अंधाऱ्या बेडवर, त्या लॅपटॉपच्या उजळलेल्या स्क्रीनवर बेकानं फाडकन काहीतरी एपिफनी द्यावी...
आणि माझी तगमग अलवार उलगडल्यागत व्हावी...
नपेक्षा...
त्या तगमगीबद्दल, भांडभांड भांडलेल्या माणसांबद्दल एक शांत समजूत दाटून यावी.
हे थोर थोर उपकारच बेकाचे आणि या सगळ्यांचे.

बेका आणि यातल्या सगळ्या स्त्रिया खासच...
स्त्रियांनी जास्त नीतिमान रहावं, मोह टाळावेत, चूका करू नयेत...
असं सगळं आपल्याला नाही म्हटलं तरी वाटत राहतं...
जे अजिबातच फेअर नाहीये...
आणि यातल्या स्त्रिया त्या सगळ्याला झडझडून फिंगर देतातच.
बेका, कॅरन, मिया, मार्सी...

मार्सी आणि चार्ली रंकल हे जोडपं हँक आणि कॅरनचे जिवाभावाचे दोस्त.
आणि हो दोस्तीची थीम आन्तूराशसारखी इथेही आहेच.
'चार्ली रंकल' हे अजून एक भारी लाईकेबल कॅरेक्टर:
हँकचा खास दोस्त आणि एजंट.
दोघांची भांडणं, दिलजमाई,
ही सगळी मजा इथेही आहेच.
(पहा चार्ली बंदुकीची गोळी खातो तो सीन Smile )

चार्ली आणि मार्सीचे अजून वेगळे घोटाळे.
त्यांची अफेअर्स, आकर्षणं...
आणि त्याच्या लाटा ओसरल्यावर जीवाभावाचं माणूस परत आठवणं असं काय काय.

एकंदरीत सेक्शुऍलिटी ही सगळ्यांनाच असते... तितकीच अनावर... पुरुष कायनं स्त्री काय.
म्हणजे हे इन थिअरी मान्य होतंच...
पण ते धाडकन खरंखुरं होऊन समोर ठाकतं...
तेव्हा आपण ते वर्षानुवर्षं कंडिशन झालेला पुरुष म्हणून स्वीकारणार आहोत की एक निर्लेप स्वच्छ माणूस म्हणून याचा नीरक्षीर विवेक मला इथे मिळाला.

सगळे प्रश्न अर्थातच सुटले नाहीत.
पण ते सुटत नाहीत याची वाटणारी तडफड कमी झाली.
माणसांबद्दलची, 'एक्सेस'बद्दलची एक शांत मायाळू समजूत आली.
हे श्रेय 'हँक'बुवांचंच.

आन्तूराशनं 'लंड बाय संड' ऍटीट्युड दिला तर...
कॅलिफॉर्निकेशननं या ऍटीट्युडनी कुणाला आपण दुखावत तर नाहीना हे चेक करायची एम्पथी!

थँक्स!

लेखनसीमेआधी आधी एकच प्रार्थना:
जगात सगळ्यांना भरभरून प्रेम, माया आणि सेक्स मिळो...
कुठून ते ज्याचं त्याने शोधावं... षडयंत्र न करता... निखळपणे.

--------------------------- चर्च!!! ---------------------------
http://nilesharte.blogspot.in/2018/04/blog-post_94.html#more

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आता ही सिरीज सलग बघायल इण्टरेस्ट आला आहे. आधी काही भाग तुकड्यातुकड्यांत पाहिले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज बघ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा लेख वाचून ही मालिका बघावी वाटत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरूर बघा... छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेल्या ब्रिलियंट कादंबरीच्या पुण्याईवर हँक जगतोय.

तुम्ही हे पाहिलं आहे का?

God Hates Us All Kindle Edition
by Hank Moody (Author)

https://www.amazon.co.uk/dp/B00BORYUZY/ref=dp-kindle-redirect?_encoding=...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो ऐकलय मी याच्याविषयी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0