काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||

अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||

तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||

नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गवर्‍या वेचा ||३||

बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा
चुगलखोर कळलावी मेली घेतेय माझ्याशी पंगा
बोलणं आपलं दोघींचं काय झालं सांगू नका वचावचा ||४||

- पाषाणभेद

field_vote: 
0
No votes yet