.
स्पर्धा का इतर?
मांजर ब्रिगेडला
आमच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर, लिफ्टमधून बाहेर येताक्षणी एक मांजर व तिची दोन लेटेस्ट पिल्ले पायांत येतात. सोसायटीत रहाणार्या एका मांजरब्रिगेडी बाईनेच त्यांना खायला घालायची संवय लावली आहे. त्या आधीची पिल्ले, आमच्या कार्सच्या खाली लपाछपी खेळत असतात. त्या आधीची पिल्ले गच्चीवर जाऊन, टाकलेले धान्य खाण्यासाठी जमलेल्या कबुतरांचा फडशा पाडत असतात. अर्थात, अर्धवट खाल्लेले कबुतर धान्य टाकणार्यांच्या जिन्यांत टाकल्यामुळे, एकतरी परस्पर सूड निघतो. अशी आमची सोसायटी मांजरग्रस्त झाली आहे. म्हणून खरी मांजरे आवडत नाहीत.
दुर्लक्ष हाच खरा धंदा.
मांजराची चित्रं दिसल्यावर प्रतिक्रिया न देणं अशक्य आहे. मला चित्रकलेतलं काहीही समजत नसलं तरीही.
मांजर ब्रिगेड वगैरे स्थापन करणाऱ्यांनी जरूर करावी. मांजर फारतर त्या ब्रिगेडकडे एकदा बघेल आणि तंगड्या ताणून झोपून जाईल. निंदा वा वंदा, दुर्लक्ष हाच खरा धंदा.
शेम!
एक धागा काढा म्हणजे त्यात सगळेच चित्र टाकू असं म्हणत होतो.
आपली हौशी चित्रे डकविण्यासाठी तुम्हाला (१) इतरांनी धागा काढण्याची वाट पाहावी लागते, नि प्रसंगी (२) त्याकरिता इतरांची विनवणी करावी लागते? काय हे आबा! मग इतके दिवस इथे 'ऐसी'वर आमच्या संगतीत राहून नेमके काय शिकलात?
(गुरुदक्षिणा म्हणून तुमचा आंगठा कधी मागून घेतला नाही म्हणून, नाहीतर तात्काळ परत केला असता, नि वर त्याबरोबर फेविकॉलची एक ट्यूबही स्वखर्चाने देऊ केली असती! काय समजलेत?)
आम्हाला जर आमची हौशी चित्रे इथे डकवायचीच असली, तर संधी साधून आम्ही ती वाटेल तिथे डकवून देतो; त्याकरिता आमंत्रणाची वाट आम्हाला आजतागायत कधी पाहावी लागलेली नाही. उलट क्वचित्प्रसंगी संपादकच आपण होऊन आम्ही वाटेल तिथे डकविलेल्या एखाद्या हौशी चित्राचा वेगळा धागा बनवून देतात, इतकेच नव्हे, तर आपला वेळ आणि ऊर्जा व्यतित करून त्याचे रसग्रहणही करून देतात, ही उज्ज्वल परंपरा, हा जाज्ज्वल्य इतिहास इतक्यातच विसरलात काय?
छे आबा!आज तुम्ही आम्हाला शरमेने मान खाली घालायला लावलीत. आज येथे तुमचा निषेध व्यक्त करायला आमची आख्खी शब्दसंपदा तर सोडाच, परंतु मराठी, इंग्रजी, झालेच तर जगातल्या असतील नसतील तेवढ्या समस्त भाषांतील समग्र शब्दभंडार जरी आणून इथे रिते केले, तरी ते अपुरे पडेल. धिक्!

चित्रातील मांजरीची पाठ जास्त
चित्रातील मांजरीची पाठ जास्त गब्दुल झालेय.
पण छान.