Skip to main content

शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य- भाग दुसरा

आता आपण आरोग्यकारक घटकांचे काही तपशील पाहू.
शाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की बी१२ हे जीवनसत्व शाकाहारी आहारातून मिळू शकते. काही शैवाले, सोयाबीन्स आंबवून मिळणारे टेंपी, यीस्ट नावाचे कवक यातून बी१२ हे जीवनसत्व लाभते हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हे जीवनसत्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाहीत, हे मात्र सांगितले जात नाही- किंवा ते त्यांनाच माहीत नसावे. स्पिरुलिना, टेंपी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिध्द झाले आहे. यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरुपातील बी१२ नसतेच. ते केवळ बाहेरील घटकांबरोबर संयोग पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेल्या सोयाबीनची तिसरीच कथा आहे. सोयाबीनची उत्पादने करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती काहीही असोल, सोयाबीन हे काही फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या सेवनामुळे विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना थायरॉइड ग्रंथींचे विकार सुरू होतात हे सिध्द झालेले आहे.
काही प्रचारक तज्ज्ञ सांगतात आतड्यांतील बॅक्टेरियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहेच पण तेथे तयार झालेले बी१२ शरीराला नीटसे लाभत नाही त्याचे काय... बी१२ मिळवण्यासाठी ते जठरातील पचनप्रक्रियेत यावे लागते. देशाच्या काही प्रदेशातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित् असा निष्कर्ष काढला गेला. पण याच प्रदेशात कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात, ज्यातून त्यांची प्रथिनांची गरज काही प्रमाणांत भागत असावी, कीटक आणि त्यांची अंडी ही भविष्यातील प्रथिनांचा पुरवठा असू शकतात अशा एका वैज्ञानिक निष्कर्षाची आठवण इथे स्वाभाविकपणे होते. शरीराला सहजपणे शोषून घेता येईळ असे बी१२ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतूनच मिळू शकते हे सत्य आहे. लिवर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दुग्धजन्य पदार्थांतून थोड्या कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दूध आणि अंडीही आहारातून वगळतात. अंडी खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करून ठेवला आहे त्यामुळे अनेकजण अंडीही खात नाहीत. परिणामी बी१२ची कमतरता आणि त्यातून पुढे अॅनिमिया जडणे ठरलेलेच.
आजकाल आधुनिक वैद्यकामुळे बी१२च्या पूरक गोळ्या उपलब्ध आहेत म्हणून ठीक, न पेक्षा हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती. खरे म्हणजे बी१२च्या कमतरतेचा एकच मुद्दा शाकाहाराच्या आरोग्यप्रदतेच्या मुद्द्याचा खात्मा करू शकतो. पण मुद्दे तरीही संपत नाहीत.
ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अॅसिड्स म्हणजे लिनोलिनिक आणि लिनोलेइक ही पॉली अनसॅच्युरेटेड मेदाम्ले आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वतः ती तयार करू शकत नाही. ओमेगा३ अत्यल्प प्रमाणात पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा पुरवठा मासे आणि अंडी यातूनच होतो. ओमेगा६ हे बव्हंशी भाज्यांमधून मिळते आणि अल्प प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतून मिळते. शाकाहारी लोकांची समजूत पटवण्यासाठी शाकाहाराचे प्रचारक सांगतात की आपले शरीर ओमेगा ६पासून ओमेगा ३ गरज पडेल तसे रुपांतरित करू शकते. असे होऊ शकत नाही असे मेरिलँड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग सिध्द केले आहे. ओमेगा६ मेदाम्ले थोड्या वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा ३चेही आहे. पण ओमेगा ६ चे ओमेगा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी म्हणून ओमेगा३ प्रकारातील मेदाम्ले अत्यावश्यक असतात.
भाज्यांतून मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने नुकसानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा३ वापरणे शरीराला कठीण होऊन बसते. ओमेगा ३ कमी पडल्यास कर्करोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारकशक्तीही खालावते.
मेदाम्ले, बी१२ जीवनसत्व यांबाबत जशी अर्धसत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्वाबद्दलही सांगितली जातात. अ जीवनसत्व हे शाकाहारातून भरपूर मिळते असा लोकप्रिय समज आहे. प्रचारकांकडूनच तो अधोरेखित होत आला आहे. वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा-कॅरोटिनचे रुपांतर करून शरीर अ जीवनसत्व मिळवून शकते हे सत्य आहे. पण ते रुपांतर करण्यासाठी साथीला चरबी किंवा तैलद्रव्ये खावी लागतात. शिवाय हे रुपांतर काही तेवढेसे सोपे नाही. जे काही बिटा-कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले, वृध्द माणसे, थायरॉइड, गॉलब्लॅडरच्या विकारांनी ग्रस्त लोकांना तितक्याही चांगल्या प्रमाणात हे रुपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळेल असे अ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतून मिळते. ताजे लोणी, तूप किंवा इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बिटा-कॅरोटिनपासून अ जीवनसत्व मिळवता येते. अ जीवनसत्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात आलेली प्रथिने किंवा खनिजद्रव्ये यांचा फायदा शरीराला घेता येतो.
मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा सतरा रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणात असतो असे छातीठोकपणे सांगितले जाते.
गंमत अशी आहे की यातील बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव विसाव्या शतकात अधिक होऊ लागला. त्यापूर्वीचा इतिहास, मानववंशाचा इतिहास साऱ्याकडे डोळेझाक करून हा प्रचार केला जातो. जगभरातील अनेक जुने वंश भरपूर मांसाशन करणारे आहेत हे लक्षात घेतले जात नाही.
मांसाहार त्याज्य आहे हे सिध्द करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले. हा प्रकल्प शाकाहारवादाकडे झुकणाऱ्या शास्त्रज्ञांकडे असूनही त्यांच्या निरीक्षणांचे निष्कर्ष अपेक्षेच्या उलट निघाले. डॉ. एच्. ए. कान, डॉ. डी ए स्नोडेन यांच्या अभ्यासांतून शाकाहारी लोकांना दीर्घायुष्य असल्याचा मुद्दा निकाली निघाला. अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या या शास्त्रज्ञांनी तसे मोकळेपणाने मान्य केले. पण तरीही शेवटी शक्य तो मांसाहार करू नये असेच सांगून तर्कनिष्ठेशी प्रतारणा केली.
शाकाहार घेणे महत्त्वाचे आहेच. आपण सारेच प्रायः शाकाहार घेतो. कर्बोदके मिळवण्यासाठी धान्ये, पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच. परंतु तेवढ्याने पुरत नाही हेही मान्य करावे लागते.
प्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होते हा दावा तर फारच फसवा आहे. आदिमानवांच्या आहारात फळेमुळे होती असे आग्रहाने सांगितले जाते. त्यांच्या आहारात अगदी कमी चरबीचे मांस थोडेफार होते, पण तो मुख्यत्वे शाकाहारीच होता म्हणून तो इतका निरोगी होता असे सांगितले जाते. हे दावे मनगढन्त म्हणावेत इतक्या कमी माहितीच्या आधारावर आधारित आहेत. अजूनही शिल्लक असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही त्यातील तथ्यांशाचा अभाव समजतो. काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळेनासे झाले, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाले... एकूणच अन्न न परवडल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्राण्यांची प्रचंड प्रमाणात शिकार झाल्यामुळे काही प्राणी नामशेष झालेले असताना प्राचीन मानव शाकाहारी होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.
आणखी एक गैरलागू मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे मांसाहारामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स, घातक कीटकनाशके, घातक रसायने जातात. प्राणी मारले जाताना त्यांच्यात जी स्ट्रेस हार्मोन्स जातात ती शरीराला चांगली नसतात असेही सांगितले जाते. यात तथ्य असेलही. नेमके हेच शाकाहार, धान्याहाराच्या बाबतीतही होते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी, अधिक अन्न उत्पादनासाठी जे आधुनिक मार्ग स्वीकारणे आपल्याला भाग पडले आहे, त्याचीच ही परिणति आहे. परिस्थितीशरण माणसाला या गोष्टींचा सामना सध्याच्या कालखंडात करणं भाग आहे. नंतर त्यात बदल होईलही. उदाहरणार्थ जेनेटिकली मोडिफाईड अन्नामुळे कीटकनाशकांचा वापर तर नक्कीच कमी होईल. माणूस नवे प्रश्न निर्माण करतो आणि नवी उत्तरे शोधतो हे तर वैशिष्ट्य आहे.
आहाराच्या पोषक मूल्यांसंबंधी सर्व मुद्दे मांडून झाले की शाकाहारवादी आजकालचे अव्वल नंबरचे चलनी नाणे वाजवू लागतात. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजसाठी मांसाहार जबाबदार आहेत असे सांगितले जाऊ लागले आहे. भावनिकतेच्या आहारी जाऊन पर्यावरणासाठी काम करणारे काही किशोरबुध्दी कार्यकर्ते अनेकदा असल्या प्रचारातील सत्याची पडताळणी करायला तयार नसतात.
पण यासंबंधातील नेमका मुद्दा काय आहे तो पहावाच लागेल. खरे म्हणजे या मुद्द्यात नेमकेपणा नाहीच. जगातील गरीबी, मिथेनचे उत्सर्जन अशा दोन मुद्द्यांचा घोळ घालून तयार केलेला हा मुद्दा आहे. खाण्यासाठी जनावरे जगवायचे तर त्यांच्यासाठी जे काही धान्य, गवत तयार करावे लागते ते उगवण्याच्या जागेत जगभरातील अर्धपोटी, उपाशीपोटी जनतेसाठी धान्य उगवता येईल असा एक मुद्दा असतो. त्याच्या जोडीला गुरांच्या वाढत्या संख्येमुळे तयार होणारा मिथेन हा वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे असेही सांगितले जाते.
या वरवर छानछान वाटणाऱ्या युक्तीवादाच्या अंतरंगात जरा डोकावून पहा. गवतांमधले वैविध्य किंवा गुरांसाठी वाढवली जाणारी विशिष्ट धान्ये न वाढवता केवळ काही विशिष्ट धान्येच वाढू दिली तर जीववैविध्याची हानी होते याचा यात विचार आहे का? गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरेच नष्ट करायची आहेत का? गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको? आपण त्यांच्या दुधाचा, मांसाचा वापर करतो म्हणून त्यांना जगवतो हे सत्य आहे. (आज पुरेसा उपयोग करून घेता येणार नाही म्हणून भारतातील अक शेतकऱ्यांनी नव्या गायींची, बैलांची वीण वाढवणे बंद केले आहे. भारतीय गोमाता नि गोपित्यांची संख्या कमी होत जाऊन प्राणिसंग्रहालयांमध्येच ते पहायला मिळतील अशी स्थिती ओढवेलही लवकरच.)
नेमके काय करायचे अशी या पृथ्वीच्या शाकाहारवादी रक्षणकर्त्यांची सूचना आहे? गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हा बागुलबुवा पूर्णतः अशास्त्रीय पायावर उभा करण्यात आला आहे. खरे म्हणजे हा मुद्दा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि अनेक अभ्यासकांनी त्याचा यथास्थित समाचार घेतलेला आहे. काही सत्ये प्रचारातून वगळली जातातच.
सत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आऱोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणीही कुणावरही काही खाण्याची सक्ती करू नये. तशीच आपल्याला आवडत नाही म्हणून दुसऱ्याने खाऊ नये अशी सक्तीही करू नये. आपल्या आडीनिवडीला तात्विक रंग चढवू नयेत. गेंड्याच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत. दूध हे गायीचे रक्तच आहे वगैरे फालतू दाव्यांचे फालतूपण अनेकजण ओळखतात. मांसाहाराला हीन, क्रूर लेखण्याचा प्रकार याच फालतूपणाचे भावंड आहे.
अन्नविषयक आवडनिवड ही पूर्णतः व्यक्तिसापेक्ष आहे हे शाकाहारवादी कट्टरांनी लक्षात घ्यायला हवे.
स्वतःची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्वे आहेत ती आपल्यापुरती जपावीत. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. शाकाहारी जैन धर्मीय स्वतंत्र गृहसंस्था करून रहाण्याचा प्रयत्न करतात तोवर ठीक आहे. पण मिश्र गृहसंस्थांत जागा घेऊन ते इतरांना हाकलून काढू पाहातात तेव्हा तो दुराचार ठरतो. आपल्या पर्युषणपर्वात इतरांनीही शाकाहार करावा- म्हणजे केवळ वनस्पतीजीवांची हत्या करावी- म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे हाही दुराचारच.
आरोग्यरक्षणासाठी मितभुक्, हितभुक् आणि अशाकभुक् रहावे असा आयुर्वेदानेच उपदेश दिला आहे हे भारतीय संस्कृती मूळ शाकाहारी आहे असा खोटा दावा करणाऱ्या भुक्कड लोकांनी लक्षात घ्यावे.
मितभुक् म्हणजे आहार कमी असावा. खादाडपणा करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. खाण्याच्या दोन वेळांतही किती कालांतर असावे तेही आयुर्वेदाने सांगितले आहे. दोन तासांच्या आत पुन्हा खाऊ नये आणि सहातासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये. आधुनिक वैद्यकाने, पोषणाहारशास्त्रानेही हाच सल्ला दिला आहे.
हितभुक् म्हणजे आवडणारे अन्नपदार्थ खावेत, कारण जे आवडतात ते घटक सहसा तुमच्या पचनसंस्थेला सहन होणारे असतात. ज्या घटकांमुळे किळस किंवा घृणा वाटेल, वास नकोसा वाटेल ते जबरदस्तीने खाऊ नयेत, खायला लावू नये.
आणि या लेखासाठी सुसंदर्भित म्हणजे- अशाकभुक्- आहारात अशाक म्हणजे प्राणिज, प्राणिजन्य पदार्थ असावेत. फार जास्त प्रमाणात शाका खाऊ नयेत.
शाकाहार म्हणजे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार हा पोषणाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहार आहे असे सांगणे हा सत्यापलाप आहे. आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे.
....

Taxonomy upgrade extras

राही Sun, 31/01/2016 - 16:35

"गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हा बागुलबुवा पूर्णतः अशास्त्रीय पायावर उभा करण्यात आला आहे. "
सुमारे दोनतीन दशकांपूर्वी गोबरगॅस योजनेचा खूप बोलबाला होता. अजूनही बायोगॅसच्या सयंत्रांचा प्रचार केला जातो. यात शेतीसाठी आणि दुग्ध पदार्थांसाठी गुरे पाळणे आणि त्यांच्या शेणातून इंधनवायू निर्माण करणे असे जोड-उद्योग सुचवले जाऊन गुरे पाळणे कसे किफायतशीर आहे ते पटवून दिले जाई. पणसूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे (आणि प्रियदर्शिनी कर्वे) यांच्या संशोधनातून स्पष्ट दिसून आले की गोबर हे बायोगॅससाठी योग्य इंधन होऊच शकत नाही. ते वायु-इंधननिर्मितीला पोषक तर नाहीच, उलट मारक आहे.

राजेश कुलकर्णी Sun, 31/01/2016 - 22:04

In reply to by राही

गायी-म्हशींचे शेण वायुनिर्मितीला मारक नाही, तर त्यातून फार गॅस निर्माण होत नाही एवढेच. त्याचप्रमाणे गोबरगॅस योजना चांगलीच आहे, सरकारी योजना असल्यामुळे त्याचा बोजवारा उडाला एवढेच. प्रथमपासूनच त्यात शेणाबरोबर इतर उपयुक्त बायोमास वापरण्याची कल्पना होती.

राही Mon, 01/02/2016 - 09:33

In reply to by राजेश कुलकर्णी

त्या योजनेचे नावच गोबर गॅस असे होते आणि त्यात मुख्यत्वेकरून शेण वापरणे अभिप्रेत होते. डॉ. आनंद कर्वे आणि डॉ प्रियदर्शिनी कर्वे याच्या Appropriate Rural Technology Institute (आरति) या संस्थेने नैसर्गिकइंधन-ऊर्जेच्या क्षेत्रात बरेच काम केले आहे. प्रियदर्शिनी यांचे 'ऊर्जेच्या शोधात' हे आत्मवृत्तपर पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यात हे कार्य आणि त्याविषयींच्या प्रयोगांची तपशिलवार माहिती आहे. या पुस्तकातून वरील संदर्भ घेतला आहे. इतर बायोमास हाच चांगल्या प्रतीचा कच्चा माल होऊ शकतो' या उच्च दर्जाच्या मालात इंधनवायुनिर्मितीमध्ये अतिनिम्न दर्जा असलेले शेण मोठ्या प्रमाणात मिसळले तर चांगल्या कच्च्या मालाची घनता कमी होऊन जैववायुसयंत्राची कार्यक्षमता अतिशय कमी होऊन प्रसंगी ते बंद पडते असा त्यांचा निष्कर्ष आहे. शेणाची भर घातल्याने इतर बायोमासच्या विघटनाला अडथळा येतो असेही त्यात म्हटले आहे. शेणाच्या विघटनातून वायुनिर्मितीप्रक्रियेची फोड त्यात सामान्य माणसास समजेल अशा भाषेत दिली आहे.
अवांतर : हे आनंद कर्वे म्हणजे अर्थात इरावतीबाई आणि दिनेश कर्वे यांचे सुपुत्र आणि प्रियदर्शिनी ही त्यांची नात (आनंद यांची मुलगी) हे सर्वांना ठाऊक आहेच.

प्रियदर्शिनी कर्वे Mon, 01/02/2016 - 16:15

In reply to by राही

शाकाहार विरुध्द मांसाहार अशा अलिकडे फारच चेवाने चघळल्या जात असलेल्या विषयावर सहसा मांसाहाराच्या बाजूने फार कमी लिहिलेले दिसते, म्हणून उत्सुकतेने भाग १ आणि २ वाचले, आणि त्यातले बरेचसे मुद्दे पटले. प्रतिक्रियेत विषय बायोगॅसकडे वळून तिथे माझाच संदर्भ दिसणे अनपेक्षित होते. पण थोड्या स्पष्टीकरणाची गरज वाटल्याने ही प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देत आहे.

शेणापासून बायोगॅस ही संकल्पना भारतात उदयाला आली. पण शेणापासून फारच कमी गॅस मिळत असल्याने व्यावहारिक पातळीवर ती अयशस्वी ठरली आहे. कोणताही प्राणी (माणूस धरून) जे जे खाऊ शकतो, त्या सर्वांपासून बायोगॅस बनू शकतो, हे माहीत असूनही, शेणाच्या जोडीला हे पदार्थ घातले तरच बायोगॅस मिळतो, असा एक समज पसरलेला होता. शेणाची गरजच नाही केवळ खाद्यपदार्थांपासून बायोगॅस मिळू शकतो, हे माझे वडील डॉ आनंद कर्वे यांनी दाखवून दिले, व केवळ अशा पदार्थांपासूनच अतिशय कार्यक्षमतेने बायोगॅस बनवणारे संयंत्र बनवले. हे संयंत्र वापरताना, त्यात रोज शेण घातले तर ते बंद पडते, पण एरवी शेण आणि खाद्यपदार्थांचा कचरा यापासून बायोगॅस बनू शकत नाही असे मात्र नाही.

राही Mon, 01/02/2016 - 16:40

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

अतिशय धन्यवाद
आपण इथे प्रतिसाद दिल्यामुळे लेखाला आणि मूळ प्रतिसादाला चार चाँद लागले आहेत.
माफ करा पण आता आपण इथे आलाच आहात तर आणखी एका अवांतर अशा वेगळ्या मुद्द्याचा खुलासा कराल का? सेंद्रीय खतनिर्मितीमध्ये आजकाल 'अमृतजल' या किंवा यासम नावाने शेण, मूत्र आणि इतर पदार्थ, जसे बेसन, गूळ, लोणकढे तूप वगैरे यांच्या मिश्रणाचा फार बोलबाला आहे. तर हे मिश्रण नक्की कसे कार्य करते वा जमिनीचा कस वाढवण्यात नुसत्या शेणापेक्षा त्याची उपयुक्तता कशी आणि किती अधिक आहे?

मेघना भुस्कुटे Mon, 01/02/2016 - 18:54

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

आईशप्पथ! कसलं भारी वाटतं आहे खुद्द तुमच्याकडूनच उत्तर वाचून! इथे अतिशय मनापासून स्वागत. अधूनमधून नक्की येत जा. तुमची मतं वाचायला फार आवडेल.

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 19:28

In reply to by मेघना भुस्कुटे

+१
तेही इथे अशी चर्चा ऐन भरात असताना या विषयात भरपूर काम केलेल्या व्यक्तीने लिहिल्याने खूपच छान वाटतंय.

वेळ होईल तेव्हा या किंवा अशाच विषयांवरचे दीर्घ लेखनही इथे वाचायला आवडेल.

माहितगारमराठी Tue, 02/02/2016 - 12:11

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

गावी शेती असलेल्या एका परिचीतांची परवाच भेट झाली, ज्या काळात शेणाद्वारे बायोगॅस नवीन होता त्याच काळात त्यांनी तो वापरणे चालू केला ८-१० माणसांच्या एकत्रित कुटूंबाचा स्वैपाकही व्यवस्थीत होत असावा. पण गेल्या काही वर्षात कुटूंबातील जुन्यापिढीतील काही लोक काळाच्या आड गेले, नवी पिढी शिकुन बाहेर गेली, (उरलेले कुटूंबातील नवीन पिढीतील लोक शेणास हात लावत नसावेत का हा प्रश्न परिचीतांना मी विचारु शकलो नाही?) शिवाय आधी मजुरवर्गही परवडत असे आता मजूरीचे दर गावात खूप वर गेले आहेत बायोगॅस मेंटेन करावयाचा तर मजूरीतच किमान तीन चार हजार जातील त्यापेक्षा आता सरकारी अनुदानाने एलपिजी गावात उपलब्ध झाला आहे तोच परवडू शकतो म्हणून त्यांनी बायोगॅस बंद करून एल पिजी वापरावयास सुरवात केली.

मुग्धा कर्णिक Tue, 02/02/2016 - 12:44

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

मी तुमच्या वडिलांचे हे सांगणे प्रत्यक्ष ऐकलेले आहे. त्यांची बायोगॅस तयार करण्यासाठीच्या विरजणाची कल्पना एकदम बेहद्द आवडलेली. तुमच्या प्रतिसादाने खूप बरं वाटलं.
डॉ. आनंद कर्वेंना नमस्कार.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 12:33

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

शहरी शाकाहारी व्यक्तीपेक्षा खेड्यातील मधूनमधून (क्वचित) मांसाहार करणा-या व्यक्तीची कार्बन फुटप्रिंट कमीच भरेल अशी तुमची कमेंट पाहिली, पण ती सापडत नाही, म्हणून येथे त्याबद्दल विचारतो.
शहरी लोकांच्या उधळपट्टीवरून म्हणजे होणा-या अन्नाच्या नासाडीमुळे तुम्ही असे म्हणत आहात का?

अबापट Fri, 05/07/2024 - 17:54

In reply to by राही

राही यांच्या प्रतिसादातील विधाने कुठल्या तांत्रिक/शास्त्रीय आधारावर केली गेली आहेत ?
" पणसूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. आनंद कर्वे (आणि प्रियदर्शिनी कर्वे) यांच्या संशोधनातून स्पष्ट दिसून आले की गोबर हे बायोगॅससाठी योग्य इंधन होऊच शकत नाही."
कुठले हे संशोधन ? योग्य इंधन होऊ शकत नाही म्हणजे काय ?
" ते वायु-इंधननिर्मितीला पोषक तर नाहीच, उलट मारक आहे."
अत्यंत चुकीची विधाने आहेत.
याविषयी सवडीने जास्त लिहीन .
पण एवढेच सांगतो ( भारतात किती लाख गोबर गॅस प्लांट्स आहेत हे आत्ता बाजूला ठेवले तरी ) अमेरिकेत ( म्हणजे United states of America ) जिथे एकेका डेरी फार्म वर गुरांची संख्या शेकड्यात आणि काही ठिकाणी तर हजारात आहे , तिथे किमान दोनशेपेक्षा मोठे शेणावर ( म्हणजे cow dung as a substrate)चालणारे बायोगॅस प्लांट्स चालू अवस्थेत आहेत ( तिकडचे nomenclature " Farm Digesters " )

सवडीने जास्त लिहिणार

साती Sun, 31/01/2016 - 17:06

लेख आवडला!
विशेषत: बी १२ बाबतचा.
कुठल्यातरी आरोग्यविषयक वेबसाईटचा किंवा व्हेगान लाईफस्टाईलचा प्रपोगंडा करणार्‍या भरवसा देत अमुक शाकाहारी पदार्थात बी १२ असतं असं काही शाकाहारवादी डॉक्टर्सही छातीठोकपणे सांगतात.
पण त्या बी १२ चा शरीरासाठी काहिही उपयोग नसतो हे सांगायला विसरतात.

'बी १२ अभावी होणारे आजार थांबवू शकण्याची क्षमता' ही या पदार्थांच्या नियमित वापराने दाखविता आली तरच तो आहार बी १२ ने परिपूर्ण आहे असे म्हणता येते.
कुठल्याही शाकाहारी पदार्थातून ते शक्य नाही.

राजेश घासकडवी Sun, 31/01/2016 - 21:15

दोन्ही लेख वाचले, आवडले.

आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे.

हे खरं सगळ्यात महत्त्वाचं. सत्याधिष्ठित वर्तनाऐवजी तत्त्वाधिष्ठित वर्तन व्हायला लागणं योग्य नाही. आणि जोपर्यंत इतरांना त्रास पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक जण ते वर्तन करायला स्वतंत्र आहे. मात्र आपलंच वर्तन सर्वोत्तम म्हणून ते दुसऱ्यांनीही पाळलं पाहिजे हे म्हणणं हा दुराग्रह आहे. त्या तत्त्वाचा धर्माशी संबंध आला की दुराग्रही लोकांच्या भावना इतरांच्या वर्तनाने दुखावतात. निदान हा दुराग्रह थांबला तरी बरं. जगा आणि जगू द्या हेच सर्वसामायिक तत्त्व उपयुक्त आहे.

चिमणराव Sun, 31/01/2016 - 21:34

शाकाहार मासाहार असा वादविवाद करून ते खाणारे /टाळणारे लोक फारच थोडे असतात.इतर तसे खातात कारण लहानपणापासून त्यांना तेच भरवले गेले असते.

ठीक आहे ही जीवनसत्तवे तेलातुपातून विरघळूनच शरीरास पोहोचतात.शेंगदाणे,तीळ,कारळे,जवस इत्यादींच्या सुक्या चटण्यांत बी १२ असते का?पूर्वी एक तोडगा सांगितला जायचा अशक्तपणावर-उडदाचे वडे तुपात तळून खा.याचं रहस्य काय?टिबिसाठी लोण्याची विरघळ ( लोणी थोडेसे वितळवून)खडीसाखर घालून खाणे..हाच उद्देश असावा काय

जयदीप चिपलकट्टी Mon, 01/02/2016 - 04:45

> आणि जोपर्यंत इतरांना त्रास पोहोचत नाही तोपर्यंत प्रत्येक जण ते वर्तन करायला स्वतंत्र आहे.

ठीक आहे, पण मांसाहारामुळे प्राण्यांना त्रास होतो ही अडचण नाही का? ‘प्राण्यांना होणारा त्रास हिशेबात धरला जाणार नाही’ असं एक छुपं गृहीतक यामध्ये आहेसं दिसतं. पण समजा एखादा म्हणाला की ‘मीसुद्धा इतरांना त्रास होणार नाही असाच वागेन, पण यामध्ये समलिंगी किंवा चिनी किंवा देशस्थ ब्राह्मणांना होणारा त्रास मी हिशेबात धरणार नाही’ तर ते चालेल का?

> जगा आणि जगू द्या हेच सर्वसामायिक तत्त्व उपयुक्त आहे.

तोच मुद्दा. मांसाहारामुळे प्राण्यांच्या जगण्यावर गदा येते ही अडचण आहेच. तुमचं तत्त्व ‘सर्व’सामायिक आहे, पण या ‘सर्वां’ मध्ये प्राण्यांचा समावेश नाही असं एक छुपं गृहीतक यामध्ये आहे. कुणाचा समावेश करावा आणि कुणाचा नाही याची निश्चित सीमारेषा आखणं अवघड आहे हे मला मान्य. ‘ही सीमारेषा मला हवी तशी मी ठरवेन, तुम्ही मला काही सांगू नका’ असं तुम्ही म्हणत असाल तरीही मान्य. पण मग इतर कुणी आखलेल्या सीमारेषेच्या तुम्ही बाहेर राहिलात तर तक्रार करता येणार नाही.

> निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे, तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहेत. खरे तर तो एक अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते.

हा युक्तिवाद पटत नाही. माझ्या समजुतीप्रमाणे ‘माझ्या गुणसूत्रांमुळे मी असा वागलो, किंवा इतर प्राणी असे वागतात म्हणून असा वागलो’ हा बचाव माणसांच्या जगात तसाच्या तसा स्वीकारला जात नाही. बबून माकडं चोऱ्या करतात म्हणून माणसांनी ती केलेली चालेल असं कोणी म्हणत नाही. मलार्ड जातीची नर बदकं समागम करताना मादीची इच्छा आहे की नाही याचा फारसा विचार करत नाहीत, आणि त्यांच्या गुणसूत्रांची शिकवण तशी असेलही. पण म्हणून माणसाच्या नरानेही गुणसूत्रांची हाक ऐकून तसं वागल्यास आपण त्याला माफ करत नाही.

माणसांच्या सगळ्याच व्यवहारांत नैतिकतेचे प्रश्न उद्भवतात. ते कसे सोडवायचे आणि मतभेद झाल्यास काय करायचं हा गहन विषय आहे. पण नैतिकतेचा अमुक एक प्रश्न गैरसोयीचा वाटतो म्हणून तो अस्तित्वातच नाही असं म्हणणं सुज्ञपणाचं नाही. ‘जगणे’ अशी काही नैतिकता नसते. नीतीने जगणे आणि अनीतीने जगणे यात फरक आहे. हा फरक कसा करायचा ते ठरवणं सोपं नाही, हे अर्थात मला मान्य आहे.

नगरीनिरंजन Mon, 01/02/2016 - 11:16

In reply to by जयदीप चिपलकट्टी

वनस्पतींनाही त्रास होतोच. वनस्पतींचा त्रास लक्षात घेतला जाणार नाही या शाकाहारी लोकांच्या वृत्तीवर बोट ठेवायचे सोडून हा उलटाच जाब विचारणे झाले.

बाकी, माणसांच्या जगात नैसर्गिक वृत्तीचे युक्तिवाद स्वीकारले जात नाही हे खरे पण तेही एका मर्यादेपर्यंत. मोठ्या स्केलवर "सम्यक निसर्ग एक भंकस असून माणसाने आपल्या नैसर्गिक वृत्तीप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी हवे ते केले पाहिजे" असे तत्त्वज्ञान सांगितले जातेच.

मन१ Mon, 01/02/2016 - 15:32

In reply to by नगरीनिरंजन

अहो वनस्पती कापत असताना वनस्पतींना त्रास होतो; दोन घटका मान्य केलं तरी एक मुद्दा राहतोच. --

शाकाहार्‍यांना झाडे कापून खाताना वाटत नाही. फळे तोडून ते खाउ शकतात.
मांसाहार्‍यांतील काहिंना कोकरु,कोंबडी,माकड वगैरे कापताना "कसेसेच" का होते ?
(ज्यांना अशी कापाकापी करताना अजिबात काही वाटत नै, ते कन्सिस्टंट आहेत; त्यांच्याबद्दल सवाल नाही.
ज्यांना खायला कै वाटत नै पण कापायला वैट वाट्टे त्यांच्याबद्दल सवाल आहे. )
शंकेलाच वायझेड म्हणून डिस्क्रेडिट करणे उचित नव्हे.

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 15:38

In reply to by मन१

शाकाहार्‍यांना झाडे कापून खाताना वाटत नाही. फळे तोडून ते खाउ शकतात.

यात त्यांना "कसेसेच" होत नाही हा दोष (निगरगट्टपणा, पाषाणहृहयीपणा) कोणाचा?
मला तर नुसता कांदा सोलु लागले तर डोळ्यात पाणी येते, त्याला चिरणे दूरच राहिले!

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 16:47

In reply to by मन१

दुसरे वाक्य गमतीपुरतेच होते!

बाकी खालच्या ननिंच्या स्पष्टिकरणानंतर याहून अधिक काही लिहायची गरजच संपलेली आहे.
ननि जियो!

नगरीनिरंजन Mon, 01/02/2016 - 16:19

In reply to by मन१

लेखात आलंय की ते. माणूस स्वानुभवावरुन जग ओळखतो. आपल्या रक्तासारखे प्राण्यांचे रक्त दिसते; आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात प्राणी ओरडतात, आपल्यासारखे डोळे-कान वगैरे अवयव दिसतात म्हणून त्यांना मारताना कसेसे होते. हा एक प्रकारचा ॲन्थ्रोपोसेन्ट्रीजम किंवा नार्सिसिजम म्हणता येईल. सबकॉन्शस मनात कुठेतरी स्वतःची तुलना प्राण्याशी होते आणि शिवाय अहिंसेचे खूप जास्त सोशल कंडिशनिंग.
किडे-मुंग्या मारताना कोणालाही काहीही वाटत नाही. प्राण्यांचे रुधिर पारदर्शक असते आणि त्यांची कातडी हिरवी असती व त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकू येत नसतं, त्यांचे डोळे कोणते, कान कोणते हे कळत नसतं तर प्राणी मारायला शाकाहारी लोकांनाही काहीच वाटलं नसतं.
मुळात अहिंसा हा प्रकारच जगात नाहीय. अनावश्यक हिंसा नको इतकेच म्हणू शकतो आपण. त्यामुळे करमणुकीसाठी प्राण्यांना त्रास देणे वाईट आणि खाण्यासाठी प्राणी मारणे वाईट नाही.

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 09:55

In reply to by जयदीप चिपलकट्टी

ठीक आहे, पण मांसाहारामुळे प्राण्यांना त्रास होतो ही अडचण नाही का?

अर्थातच आणि शाकाहारामुळे तसेच फलाहारामुळे वनस्पतींना, दुग्धाहारामुळे प्राण्यांना त्रास होतोच. आपण काहीही खाल्लं तरी कोण्त्या तरी सजीवांना त्रस होतो.. मग माणसाने खावे काय? जचिंकडे याचे उत्तर नक्की असेल म्हणून विचारत आहे :)

'न'वी बाजू Fri, 05/02/2016 - 08:54

In reply to by धिरज

इंग्रजी भाषेची हत्या केल्यास तीस (पक्षी: इंग्रजी भाषेस) त्रास होतो, किंवा कसे, यासंबंधी काही खात्रीलायक माहिती देऊ शकेल, असा एखादा दुवा आपल्याकडे उपलब्ध आहे काय?

नगरीनिरंजन Fri, 05/02/2016 - 10:34

In reply to by धिरज

This is because plants have to be fed to the livestock, and meat production is extremely inefficient. Only a small fraction of the food which is eaten by animals is converted into meat for human consumption. Therefore, by eating meat, not only do we cause animal death and suffering, we also end up killing many more plants than we would if we ate a vegetarian diet.

=)) हास्यास्पद लॉजिक आहे हे. जर प्राणी वनस्पती खातात तर त्या प्राण्यांना खाऊन वनस्पतींचे रक्षण होणार. जर मांसाहारी प्राण्यांनी शाकाहारी प्राणि खाल्ले नाहीत तर वनस्पती नष्ट होतील.
शिवाय दुधासाठी प्राणी पाळायचे आणि त्यांना वनस्पती खाऊ घालायच्या हे शाकाहार्‍यांना चालते. तेव्हा हे लॉजिक कुठे जाते?
जगातली सगळी माणसे शाकाहारी झाली तर सध्या अस्तित्वात असलेल्या गाई-बैल-डुक्कर-म्हशींना वनस्पती खाण्यापासून कोण अडवणार आहे? म्हणजे हे प्राणीही वनस्पती खाणार आणि माणसेही वनस्पती खाणार तरी म्हणायचं की शाकाहारामुळे वनस्पती कमी प्रमाणात मारल्या जातील. काय पण लॉजिक!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/02/2016 - 20:26

In reply to by नगरीनिरंजन

प्राणी हे परपेच्युअल मशीन नाही. प्राण्यांनी वनस्पती खाल्ल्या तर त्यांच्या चलनवलनात बरीच ऊर्जा खर्च होणार आणि काही ऊर्जा स्नायू, मेद या रूपात साठणार. उदाहरणार्थ, माणसांचा बीएमआर साधारण १२००-१४०० कॅलरी असतो; शरीरातले अतिशय महत्त्वाचे अवयव - हृदय, त्वचा, यकृत इ. - चालवण्यासाठी एवढ्या कॅलऱ्या दिवसाला जाळाव्या लागतात. त्याशिवाय आपण करतो ते काम करण्यासाठी, टायपिंग, घरात चालणं इ. यांसाठी निराळी ऊर्जा लागते. प्राण्यांचा जो बीएमआर असेल ती ऊर्जा आपल्याला खाता येत नाही, ती 'फुकट' जाते.

सध्या खाण्यासाठी वापरले जाणारे प्राणी बहुतांशी शेती करून, पैदास करून वाढवले जातात. जर कोणी मांसाहार करणारच नसेल तर हे प्राणी निर्माणच होणार नाहीत. (उदा. कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी पाळणारे बरेच लोक या प्राण्यांची पुनरुत्पादन संस्था काढून टाकतात. कारण त्या पिल्लांचं पुढे काय करायचं असा प्रश्न असतो आणि इतर काही, या इथे असंबद्ध ठरतील असे मुद्दे आहेत.)

डिस्क्लेमर - या प्रतिसादातलं स्पष्टीकरण म्हणजे शाकाहाराचं समर्थन किंवा मांसाहारावर टीका नाही. ज्यांना जे खायचंय ते खाऊ दे, ज्यांना भाज्या-फळं टाळायचीच आहेत त्यांना ते टाळू दे; मला जोपर्यंत हवं ते, हवं तसं खाता येतंय तोवर माझा कोणाच्याच आहारावर फारसा काहीही आक्षेप नाही. शाकाहारातून पुरेशी प्रथिनं मिळत नाहीत असं लोक म्हणतात. माझ्या आहारात दिवसाला कमीतकमी ८०-८५ ग्रॅम प्रथिनं असतात. माझं वय-वजन-आरोग्य पाहता हे जरा जास्तच आहे. मी आजारी पडत नाही आणि चाचण्यांमध्ये सगळं नॉर्मल दिसतंय तोवर 'शाकाहारातून पुरेसं पोषण मिळत नाही', हे मिथक मी माझ्या माथी मारून घेत नाही.

राजेश घासकडवी Mon, 01/02/2016 - 17:12

In reply to by जयदीप चिपलकट्टी

तुमचं तत्त्व ‘सर्व’सामायिक आहे, पण या ‘सर्वां’ मध्ये प्राण्यांचा समावेश नाही असं एक छुपं गृहीतक यामध्ये आहे.

छुपं नाही, उघड गृहितक आहे. जी चर्चा चालू आहे त्यात 'प्राण्यांना मारणं योग्य आहे की नाही' अशी नसून 'माझा आहार योग्य की तुझा' अशी चालू आहे. त्यामुळे मानवी समाजाचे उपघटक एकमेकांना काय सांगतात, किंवा तिथेच न थांबता कुठच्या प्रकारची जबरदस्ती एकमेकांवर करतात याबाबतच चर्चेची मर्यादा आहे. प्राण्यांचे हक्क काय, त्यांना मारावं की नाही हे मुद्दे तसे गौण आहेत. जैन संप्रदायी म्हणतात की 'आमचा विश्वास आहे की प्राण्यांना मारणं योग्य नाही, आणि त्या विश्वासापोटी इतरांनी - ज्यांचा या तत्त्वावर विश्वास नाही त्यांनीही - हे तत्त्व पाळलं पाहिजे'. हे अयोग्य आहे. त्यात मुळातलं तत्त्व अयोग्य आहे की नाही हा मुद्दा गौण आहे.

अनुप ढेरे Mon, 01/02/2016 - 10:22

लेदर वस्तू, प्राण्यांच्या स्पर्धा (बैलगाडी शर्यत/ आत्ता आलेला जल्लीकट्टू) याला 'क्रौर्य' यासाठी विरोध करणारे लोक अनेकदा मांसाहाराचं हिरीरीने समर्थन करताना दिसतात हा विरोधाभास नाहिये का? का खायला प्राणी मारला तर ते क्रौर्य ठरत नाही आणि मजेसाठी मारला तर ठरतं अस? मग 'हलाल' हे क्रौर्य ठरतं का?

चिंतातुर जंतू Mon, 01/02/2016 - 15:29

In reply to by अनुप ढेरे

>> लेदर वस्तू, प्राण्यांच्या स्पर्धा (बैलगाडी शर्यत/ आत्ता आलेला जल्लीकट्टू) याला 'क्रौर्य' यासाठी विरोध करणारे लोक अनेकदा मांसाहाराचं हिरीरीने समर्थन करताना दिसतात हा विरोधाभास नाहिये का? का खायला प्राणी मारला तर ते क्रौर्य ठरत नाही आणि मजेसाठी मारला तर ठरतं अस? मग 'हलाल' हे क्रौर्य ठरतं का?

सुसंगत वाटू शकेल अशी एक मांडणी -

आपल्या वापरासाठी प्राणी पाळण्याचा आणि योग्य वेळ येताच त्यांना मारण्याचा मनुष्याला हक्क आहे. मात्र, ते हाल न करता मारले जावेत. मारण्यासाठीच ज्यांची पैदास केली जाते अशा प्राण्यांनाही जिवंतपणी शक्य तितक्या सुखात ठेवावं आणि मारताना त्यांची कमीत कमी तडफड होईल ह्याची काळजी घ्यावी. ह्या मांडणीनुसार मांसाहार मूलतः गैर ठरत नाही, पण बैलगाडी शर्यतीसारखे खेळ मात्र गैर ठरतात.

अनुप ढेरे Mon, 01/02/2016 - 15:56

In reply to by चिंतातुर जंतू

यात एक मुद्दा असाय की बैलगाड्या शर्यतीत बैल मरतीलच असं नाही. काही बैल मरतील. बरेच बैल जिवंत राहतील. जल्लिकट्टूसाठीतर वेगळ्या बैलांची पैदास केली जाते. (संदर्भ - विकी). सो मारण्यासाठीच पैदास या क्याटेगरीमध्ये तेही येऊ शकतात.

'मांसाहारात निश्चित मिळणारा मृत्यू' विरुद्ध 'शर्यतीमध्ये मिळणार्‍या वेदना पण जगण्याची संधी' यामध्ये काय निवडावं?

याशिवाय लेदरसाठी पैदास ही कशी गैर ठरेल? तेही मांसाहारासारख्या वापरामध्येच येईल.

चिंतातुर जंतू Mon, 01/02/2016 - 16:38

In reply to by अनुप ढेरे

>> यात एक मुद्दा असाय की बैलगाड्या शर्यतीत बैल मरतीलच असं नाही. काही बैल मरतील. बरेच बैल जिवंत राहतील.

त्यामुळेच अडचण येते. 'मारायचं तर खुशाल मारा, पण जिवंतपणी हाल करू नका' ह्या तत्त्वाच्या ते विरोधात जातं.

>> याशिवाय लेदरसाठी पैदास ही कशी गैर ठरेल? तेही मांसाहारासारख्या वापरामध्येच येईल.

बरोबर. ह्या युक्तिवादानुसार चामड्यासाठी पैदास आणि हत्या गैर ठरतच नाही.

जयदीप चिपलकट्टी Mon, 01/02/2016 - 10:28

> शाकाहारामुळे तसेच फलाहारामुळे वनस्पतींना… त्रास होतोच.

एखाद्या जिवंत वस्तूला ‘त्रास होणं’ म्हणजे काय हा काही प्रमाणात judgment call आहे. त्यामुळे तो बिनचूक मोजण्याची काही हातखंडा पद्धत नाही हे मान्य. पण झाडावरचा आंबा तोडल्यामुळे झाडाला होणारा त्रास आणि बकऱ्याची मान कापल्यामुळे बकऱ्याला होणारा त्रास हे अगदी आवळेजावळे असून त्यात काहीही फरक करणं केवळ अशक्य आहे हे मत मला तरी पचनी पडत नाही. ‘त्रास’ ही कल्पना पुरती आखीवरेखीव नाही हे खरं, पण ती इतकी कमालीची लवचीकही नाही.

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 10:33

In reply to by जयदीप चिपलकट्टी

पण झाडावरचा आंबा तोडल्यामुळे झाडाला होणारा त्रास आणि बकऱ्याची मान कापल्यामुळे बकऱ्याला होणारा त्रास

खरे आहे, आंबा तोडल्यावर होणारा त्रास प्राण्यांची बिजांडे तोडल्यावर होणार्‍या त्रासाशी करायला हवा.

हे मत मला तरी पचनी पडत नाही.

आता गोष्टी पचनी पडत नाहीत म्हणून त्या नाहीतच असं थोडंच असतं

.शुचि. Mon, 01/02/2016 - 22:59

In reply to by ऋषिकेश

बीजांडे तोडली तर परत येतात का? आंबे तोडले तर परत येत रहातात. ट्री गेट्स ओव्हर इट फेअरली क्विकली.

ऋषिकेश Tue, 02/02/2016 - 09:02

In reply to by .शुचि.

आंब्या ऐवजी एकदाच फळ येणारे एखादे झाड घ्या.
किंवा मग खेकड्याचे पाय तोडून खाण्याशी पडताळून पहा.. बोथ आर सेम

हे निव्वळ उदाहरण आहे इतके लक्षात घ्या. मथितार्थ सजीवांना वेदना होते म्हणून मी उपाशी रहायला तयार नाही.

Dr DT Ingole Mon, 01/02/2016 - 15:40

लेख आवडला.
वैज्ञानिक दृष्ट्या मानवी शरीराला जे जे जीवनसत्वे आवश्यक आहेत ते आहारातून पुरविणे हा शरीर धर्म आहे.
आजारी असतांना आपण औषध घेतो म्हणजे थोडक्यात शरीराला आवश्यक असलेले सत्वे आपण पुरवतो असे नाही काय? अशी सत्वे झाडांतून मिळविली कि प्राण्यातून मिळविली असा भेदभाव आपण करणार काय ?

विवेक पटाईत Mon, 01/02/2016 - 20:05

भारतातले सर्वात उंचपुरे सेहत मंद व्यक्ती -हरियाणा, प. उत्तर प्रदेश, द. राजस्थान, आणि पंजाबचे जाट-गुजर (९० टक्के लोक - शहरीकरण मुळे काही मांसाहारी झाले असतील) शाकाहारीच असतात. याचे कारण काय लेखिकाने स्पष्ट करावे. ...

ऋषिकेश Mon, 01/02/2016 - 21:07

In reply to by विवेक पटाईत

याचं खंडन अनेक पातळ्यांवर होऊ शकतं. तुर्तास दोन बघुयातः
-===
उंचीचं माहित नाही पण या भागातील व्यक्ती सर्वात सेहतमंद असतात ही माहिती पटाईत काकांनी कुठून मिळवली तेच जाणो. मात्र विदा काही वेगळेच सांगतो
इथे बघा

We find that across health, education and infrastructure, Kerala, Goa and Himachal Pradesh are among the best performers and the so-called BIMARU states—Bihar, Madhya Pradesh (MP), Rajasthan and Uttar Pradesh (UP)—are laggards.

त्याहून गंमत बघा:

While Punjab fares decently on infrastructure, it slips from being a top-tier state in health and education to a medium-ranging one. This is surprising, given the common perception of healthy Punjabis being uncompromising with their food habits. In contrast, the more subdued Tamils seem to be a healthier lot.

तेव्हा पंजाबी वगैरे इतरांच्या तुलनेत अधिक सेहतमंद असतात हा दावा सत्यावर टिकत नाही.
===

दुसरं पंजाबी मांसाहार करत नाहीत हे ही खोडणं सोपं आहे.

इथे बघा: पारांपरीक पंजाबी आहारात अनेक मांसाहारी पदार्थांचा सहभाग दिसतो

धार्मिक दृष्टीने बघुयात. इथे शीख कायदा आणि धर्म काय म्हणतो:
According to the Sikh code of conduct or Rehat Maryada, Sikhs are not bound to be meat-free.[1] The general consensus is that Sikhs are free to choose whether or not to include meat in their diet.[1]

In the Rehat Maryada, Article XXIV - Ceremony of Baptism or Initiation (page 20),[25] it states:

The undermentioned four transgressions (tabooed practices) must be avoided:

Dishonouring the hair
Eating the meat of an animal slaughtered the Muslim way (Kutha)
Cohabiting with a person other than one's spouse
Using tobacco.
— Sikh Rehat Maryada
The Rehat Maryada states that Sikhs are bound to avoid meat that is killed in a ritualistic manner[13] such as Halal (Muslim) or Kosher (Jewish).[26][27]

===

सो पंजाबी मांसाहारी नसतात किंवा इतरांपेक्षा अधिक सेहतमंद असतात हे दोन्ही दावे डेटाच्या कसोटीवर उतरणारे नाहीत

मुग्धा कर्णिक Tue, 02/02/2016 - 12:40

In reply to by विवेक पटाईत

शाकाहार म्हणजे जे प्राणिज नसते ते अन्न. आपले सेहतमंद लोक (मांस तर खातातच- त्यांचं क्विझिन पाहून घ्या एकदा) भरपूर दूध-दही- लस्सी-लोणी-तूप-पनीर-खवा या प्राणीज गोष्टी खातात. ये हय हरयाणा यहाँ दहींदूध का खाणा असे बॅनर्स स्वागतासाठी लावलेले पाहिलेत हरयाणात.
तंदूरचा शोध तिथलाच. आणि तंदूरमध्ये काय काय भाजलं जातं- रोटीशिवाय??

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 01/02/2016 - 22:57

मांसाहारामुळे, गुरांच्या विष्ठेतून निघणाऱ्या मिथेनमुळे होणारं प्रदूषण हा मुद्दा भारतीय खाण्याबद्दल फारसा ग्राह्य नाही. आठवड्यातल्या चौदा जेवणांमध्ये मांसच खाणाऱ्या आणि स्थ‌ानिक भाज्यांची नावंही धड माहीत नसणाऱ्या समाजांसाठी मांसाहारामुळे होणारं प्रदूषण हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो.

अतिशहाणा Tue, 02/02/2016 - 03:34

दोन्ही लेख (भाग १ व २) खूप आवडले. अतिशय प्रभावी मांडणी व विचारप्रवर्तक मुद्दे. मी मांसाहारापासून शाकाहाराकडे भूतदया वगैरे कारणांमुळे वळलो होतो. मात्र लेख व प्रतिसादांतील मतांमधून तो दांभिकपणा आहे याची खात्री पटली आहे.

मुग्धा कर्णिक Tue, 02/02/2016 - 12:49

छानच चर्चा चालू आहे. ऋषिकेश, ननिं आणि ज्यांनी लेखातल्या मुद्द्यांना पूरक असे नवीन मुद्दे सुचवले त्यांचे आभार.
याला विरोध करणारांनी एकाच मुद्द्याकडे लक्ष द्यावे. जे आवडत नाही, ज्याने घृणा वाटते ते आपण कदापि खाऊ नये. फक्त त्याचे तत्वज्ञान किंवा धर्म बनवू नये इतकंच.
मला गवारीच्या भाजीच्या वासानेही नकोसं होतं. शेपूच्याही. मग मी ते खाणं कसं अयोग्य आहे याची मोहीम वगैरे उघडली तर मी केवळ हास्यास्पद ठरेन.

प्रियदर्शिनी कर्वे Tue, 02/02/2016 - 17:09

प्रतिसादावरील प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

मूळ लेखाच्या विषयासंदर्भात एक-दोन गोष्टी नमूद करणे आवश्यक वाटते.

१. मासांहाराच्या विरोधात केले जाणारे बहुतेक आक्षेप हे केवळ युरोपीय संस्कृतीप्रमाणेच्या मासांहारालाच लागू आहेत. भारतीय तथाकथित मासांहारी माणूस काही रोज किलो-किलो मांस खात नाही. तथाकथित मांसाहारी जेवणाच्या थाळीतही मांसापेक्षा वनस्पतीजन्य पदार्थांचे प्रमाण जास्त असते. दुसरे म्हणजे आपल्याकडे मांसाच्या पैदाशीसाठी ठेवलेली जनावरेही बऱ्याच अंशी नैसर्गिक पध्दतीनेच वाढवलेली असतात. त्यामुळे बरेचसे आक्षेप या मुद्द्यावरच फेटाळता येतात.

२. मासांहारी पदार्थांची कार्बन फूटप्रिंट ही शाकाहारी पदार्थांच्या तुलनेत जास्त आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही भारतीय मासांहारीची खाद्याशी संबंधित कार्बन फूटप्रिंट भारतीय शाकाहारीच्या तुलनेने फार जास्त असत नाही. पण मुळात हा मुद्दाच गैरलागू आहे. कारण आपल्याला खरोखर जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण आणायचे असेल, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीच्या एकत्रित परिणामाचा विचार करायला हवा. माझी खात्री आहे की पूर्ण शाकाहारी उच्च मध्यमवर्गीय व्यक्तीच्या तुलनेत, भारतीय पध्दतीच्या मांसाहारी असलेल्या गरीब मजूराची कार्बन फूटप्रिंट कितीतरी कमी असणार आहे.

आता मला विचारलेल्या प्रश्नाबददल -

सेंद्रिय शेतीतल्या अमृतपाणी (व तत्सम इतर मिश्रणे) या संकल्पनेबद्दलच्या प्रश्नाचा तसा मूळ लेखाशी संबंध नाही, पण म्हटले तर आहेही. कारण या प्रकारच्या मिश्रणांच्या शेतीतील वापराचेही शाकाहाराप्रमाणेच विज्ञानाचा आव आणून अशास्त्रीय पध्दतीने समर्थन केले जाते.

अमृतपाणी किंवा इतर सर्व तत्सम मिश्रणांमधील बाकी कोणतेही घटक न घालता फक्त शर्करा असलेले घटकच जमिनीत घातले तरीही शेतीला फायदा होतो. यामागेही बायोगॅसचेच तत्व आहे, कारण इथे आपण जमिनीतील जीवाणूंना खाऊ घालतो आहोत. बायोगॅसमध्ये जसे शेणापासून फारसा गॅस मिळत नाही, त्याच प्रमाणे इतर प्राण्यांनी पचवून उरलेले (शेण, गोमूत्र, इ.) पदार्थ जमिनीत घातले, तर फार फायदा होत नाही. म्हणून दरएकरी असे पदार्थ टनावारी घालावे लागतात, कारण जीवाणूंना त्यातून फारसे काही खाद्य मिळत नाही. पण तूप,गूळ,इ. पदार्थ जमिनीत कमी प्रमाणात जरी घातले, तरी ते जीवाणूंना पोषण देण्याचे काम करतात. जमिनीत खाद्य उपलब्ध झाले, की जीवाणूंची संख्या वाढते. हे जीवाणू त्यांच्या जीवनव्यवहारासाठी लागणारी इतर पोषणद्रव्येे (फॉस्फरस, पोटॅशिअम, व इतर सूक्ष्मद्रव्येही) मातीतून मिळवतात, आणि नायट्रोजन हवेतून मिळवतात. या जीवाणूंवर मातीतील गांडूळे, इतर कीटक, इ. जगतात. मातीत असणारे हे सजीव जेव्हा मरतात, तेव्हा त्यांच्या पेशीतून ही पोषणद्रव्ये पाण्यात विद्राव्य स्वरूपात मातीत मिसळतात. जमिनीतल्या पाण्यात विरघळून ही पोषणद्रव्ये शेतात लावलेल्या वनस्पतींना उपलब्ध होतात. अशा पध्दतीने मातीत असणारे सजीव आणि वनस्पती यांच्यातील सहजीवनाला आपण मातीत शर्करा मिसळून हातभार लावतो. त्यामुळे वनस्पतींना पुरेसे पोषण मिळते, आणि इतर खते (रासायनिक किंवा सेंद्रिय) घालायची गरज पडत नाही.

थोडक्यात म्हणजे, या मिश्रणांसाठी शेण, गोमूत्र (तेही देशीच गायीचे) यांची गरज नाही. मिश्रण अमुकवेळाच आणि अमुकवेळीच ढवळणे वगैरे अशा गोष्टींचीही गरज नाही. खरेतर साजूक तूप, गूळ, इ.च पाहिजे असेही नाही, एखाद्या हॉटेलचा ओला कचरा आणून तो न कुजवता घातला तरी काम भागेल. आणि हो, मांसाहारी हॉटेलचा कचराही चालेल. ओला कचरा न कुजवता (म्हणजे त्यात पोषणमूल्य भरपूर असतानाच) घातला जाणे महत्वाचे आहे.

अनु राव Tue, 02/02/2016 - 18:08

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

कुठलाही ओला कचरा मिक्सर मधे बारीक करुन घ्यायचा. त्यात पाणी आणि साखर टाकायची. १०-१५ दिवस चांगला आंबवायचा. नंतर ते आंबलेले मिश्रण झाडांना खत म्हणुन घालायचे.
ज्या झाडाला खत म्हणुन घालायचे त्याच झाडाचा ओला कचरा वापरला तर फार उत्तम.
फुलांच्या झाडांना जास्त फुले घ्यायची ओला कचरा म्हणुन, त्याने पण जास्त फायदा दिसतो.

---------

ह्या माहीतीत विनोदी काय आहे? गुगलुन बघितले तर जास्तीची माहीती मिळेल. मी स्वता पण हे केलेले आहे आणि अतिशय फायदेशीर असते.

कर्वेताईंनी सांगितले तेच आहे पण जमिनीत बॅक्टेरीया वगैरे कडुन डीकंपोझिशन करुन घेण्यापेक्षा हे खूप लवकर आणि एफिशियंटली होते.

नक्कीच हे शेती च्या सारख्या मोठ्या प्रमाणात वापरणे महाग पडेल पण घरगुती बागेला उत्तम आहे.

मुग्धा कर्णिक Wed, 03/02/2016 - 00:30

In reply to by अनु राव

अगदी बरोबर. माझ्या गच्चीत मी साधारण १४० प्रकारची झाडे लावली आहेत. आणि माझा भाजीचा कचरा मिक्सरला नाही पण हातानेच बारीक तोडून मल्चिंगसारखा पसरून देते.

प्रियदर्शिनी कर्वे Wed, 03/02/2016 - 06:29

In reply to by मुग्धा कर्णिक

मुग्धा कर्णिक - तुम्ही जे करता आहात ती पध्दत योग्य आहे. कचरा जितका बारीक केला जाईल, तेवढे त्याचे विघटन लवकर होईल. मिक्सरमध्ये बारीक करण्याचा हा फायदा आहे. यात मांसाहाराचाही कचरा घालायला हरकत नाही. फक्त हाडांची पूड करता येणार नसेल, तर ती घालू नयेत.

अनु राव - ओला कचरा आंबवणे किंवा कुजवणे या प्रक्रियाही जीवाणूंमुळेच होतात, पण आपल्या शेतीबाहेरच्या जीवाणूंना खायला घातल्याने आपल्याला त्याचा फायदा मिळत नाही. त्यापेक्षा उपलब्ध सगळाच जैवभार जमिनीत घातला, तर जमिनीतील बॅक्टिरियांना त्याचा पूर्ण फायदा मिळेल, आणि पर्यायाने आपल्याला घालत असलेल्या जैवभाराचा पूर्ण फायदा जमिनीतील उत्पन्नाद्वारे मिळेल. आपण आंबवण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणून साखर घालता आहात. साखरेमुळे जीवाणूंची संख्या वाढते आहे आणि ते कचरा आंबवत आहेत. शिवाय आपण आंबवलेला कचरा व साखरेचे मिश्रण खत म्हणून वापरता तेव्हा त्यातील जीवाणू आणि उरलेली साखर यांचा फायदा मिळत असण्याची शक्यता आहे. एक प्रयोग म्हणून काही कुंड्यांना नुसता कचरा (न आंबवता) आणि काही कुंड्याना नुसती साखर (जितकी तुम्ही आंबवण्यासाठी वापरता तितकी) घालून पहावी.

आपण स्वयंपाकघरातला कचरा म्हणत असलो, तरी कुठेतरी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि पाणी वापरून हा जैवभार वाढवला गेला आहे. संसाधनांच्या कमतरतेचे युग आता येत आहे, तेव्हा आपण उपलब्ध संसाधनांतून जास्तीत जास्त फायदा मिळवला पाहिजे. त्यादृष्टीने रासायनिक शेती सर्वात जास्त खर्चिक, पारंपरिक सेंदिय शेती काहीशी कमी खर्चिक, आणि जमिनीतील जीवाणूंच्या मातीतली इतर सजीवसृष्टीबरोबरच्या सहजीवनाचा वापर करून केलेली शेती ही सर्वात कार्यक्षम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, पध्दत कोणतीही वापरा, पण त्यामागची शास्त्रीय कारणमीमांसा समजून आणि फायद्यातोट्यांचा पूर्ण विचार करून वापरा.

अनु राव Wed, 03/02/2016 - 10:14

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

कर्वे ताई तुम्ही सांगताय तसे पण करुन बघते.

सध्या पण माझ्या कडच्या कुंडीतल्या झाडांचे एक पान, एखादी फांदी सुद्धा कचर्‍यात जात नाही. प्रत्येक गोष्टीचे बारीक तुकडे करुन त्याच कुंडीत पुन्हा टाकते. आता त्यात साखर टाकुन बघते.

राही Wed, 03/02/2016 - 10:35

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

जैवकचरा (उष्टे-खरकटे असलेला) न आंबवता टाकला तर मुंग्या येतात आणि सर्व अन्नकण फस्त करतात. किंवा पक्षी त्यातले अन्नकण टिपून खातात. झाडांना घातलेल्या पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी आणि अन्नकण लपवण्यासाठी वरून पातेरा टाकला तरी तो विसकटतात. दरवेळी मुळाभोवतीची माती उकरून जैवकचरा पसरून पुन्हा ती माती पसरणे आवश्यक आहे काय? मुंग्या येऊ नयेत म्हणून आम्ही चहाचा उकळलेला पर्णचुरासुद्धा तीनवेळा धुवून त्यातली साखर साफ काढून टाकून मगच झाडांना घालतो. एरवी पालेभाज्यांचे देठ वगैरे प्रोसेसरमध्ये घालून मुळांशी टाकतो. पण तो मातीशी एकरूप होत नाही. कित्येक महिने तसाच वेगळा राहातो. त्यावरच अशा कचराचूर्णाचे थर चढत राहातात.
संपादक,
इथे खूप अवांतर होत असेल तर हे सर्व प्रतिसाद बागकामाच्या धाग्यावर हलवावेत म्हणजे पुढे एकत्र वाचता येतील.

'न'वी बाजू Wed, 03/02/2016 - 18:30

In reply to by राही

इथे खूप अवांतर होत असेल तर हे सर्व प्रतिसाद बागकामाच्या धाग्यावर हलवावेत

असू द्या हो! एका कचरा विषयातून दुसर्‍या कचरा विषयात ट्रांझिशन... चालते.

(उलट मी तर म्हणतो की मूळ लेख आणि त्यासंबंधीचे प्रतिसाद काढून टाकावेत आणि हे ठेवावेत. निदान कोणाला तरी उपयुक्त असतील.)

Nile Thu, 04/02/2016 - 03:04

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

तुम्ही जे करता आहात ती पध्दत योग्य आहे. कचरा जितका बारीक केला जाईल, तेवढे त्याचे विघटन लवकर होईल. मिक्सरमध्ये बारीक करण्याचा हा फायदा आहे

निसर्गाचा विचार करताना, इनपुट आणि आऊटपूट दोन्हीचा विचार नीट केला पाहिजे. (इथे फक्त उदाहरण म्हणून) सेंद्रिय खताची निर्मिती करणे चांगले, कचर्‍यात जाण्यापेक्षा. पण ते करताना अधिकची किती उर्जा खर्च केल्यास (वीज-मिक्सर साठी) एकूण परिणाम उर्जाबचत-निसर्गास उपायकारक ('ग्रीन' वगैरे) याचाही विचार व्हावा. असो.

.शुचि. Thu, 04/02/2016 - 03:20

In reply to by Nile

प्रतिसाद खूप आवडला. हे लक्षात आले नव्हते.
___
नाहीतर हे तसे व्हायचे. की दूधाचे कार्टन्स रिसायकल तर करा अगदी झपाटून करा. पण हे लक्षातच येत नाही की तो कार्टन विसळून रिसायकल करावा लागतो अन त्या विसळण्यात बरच बरच पाणी उगाचच वाया जातं.

ऋषिकेश Tue, 02/02/2016 - 18:59

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

आभार! माहितीपूर्ण प्रतिसाद आहे.
खाली अनु राव यांचा प्रतिसादही महत्त्वाचा वाटला. (लोकांनी त्याला विनोदी का म्हटलंय कोणास ठाऊक)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 02/02/2016 - 19:51

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

शाकाहार- मांसाहाराबाबतच्या दोन्ही मुद्द्यांबद्दल सहमती.

---

सेंद्रिय शेतीतल्या अमृतपाणी इत्यादी संकल्पनांबद्दल माहिती तुमच्या पुस्तकांमध्ये आहे का? (ऑनलाईन उपलब्ध नसतील तर मागवली पाहिजेत ही पुस्तकं.)

प्रियदर्शिनी कर्वे Wed, 03/02/2016 - 06:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पुस्तक एकच लिहिले आहे - ऊर्जेच्या शोधात, आणि ते फक्त २००५ पर्यंतच्या माझ्या कामाबद्दलच आहे. सेंद्रिय शेतीमागचाही अशास्रीयपणा उलगडून दाखवण्याचे काम हा माझ्या वडिलांच्या बायोगॅसवरील कामाचा पुढचा टप्पा आहे. त्यांनी आणि मीही या विषयावर वेळोवेळी लेख लिहिले आहेत, व्याख्यानांमध्ये उल्लेख केले आहेत. काही अलिकडचे संदर्भ शोधून कळवेन, किंवा वाचकांना रस असेल, तर या व्यासपीठावर ते आणि मी मिळून सविस्तर स्वतंत्र लेख लिहू.

प्रियदर्शिनी कर्वे Wed, 03/02/2016 - 18:03

In reply to by मन१

पुन्हा एकदा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. विचारी आणि प्रगल्भ प्रतिसाद देणारी सर्व मंडळी भेटल्यामुळे लेख लिहिण्याचा उत्साह आला आहे खरा, बघू कसे जमते ते. कदाचित छोट्या छोट्या भागांतून लिहीन.

टंकनाचा काही प्रश्न नाही, गेली वीसेक वर्षे कागदाऐवजी संगणकावरच मराठी - इंग्रजी लेखन करत आहे.

या धाग्यामध्ये आणखी विषयांतर होऊ नये म्हणून आता इथे हा विषय थांबवते. अजून काही शंकांना उत्तरे द्यायचे उरले आहे, पण ती उत्तरे लेखातूनच देईन.

मन१ Wed, 03/02/2016 - 18:17

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

नुकतच पद्मश्री सुभाष पाळेकरांच्या शेतीप्रयोगाबद्दल वाचण्यात आलं.
http://www.misalpav.com/node/34688
.
.
आता त्यांचं आणि तुमचं लागोपाठ वाचून थोडा गोंधळ होतो आहे.
जमल्यास तुलनात्मक तपशील दिलेत तर बरं होइल.
किम्वा त्यांचय पद्धतीचा आणी आपण उल्लेख केलेल्या पद्धतीचा आपसात संबंध आहे का ?
संबंध असल्यास एकमेकांस पूरक असे काही आहे की, एकमेकांहून वेगळे असे काही निष्कर्ष/ निरीक्षणे आहेत.
की मुळातच दोघेही भिन्न गोश्टींबद्दल बोलत आहात ?
( म्हंजे संबंध नैय्ये पण माझाच गोंधळ होतो आहे, असे काही. )

प्रियदर्शिनी कर्वे Thu, 04/02/2016 - 21:31

In reply to by मन१

संबंध आहे निश्चितच. पण त्याबद्दल आता इथे अधिक चर्चा नको. सविस्तर वेगळे लिहीन तेव्हा हा मुद्दाही त्यात घेईन.

प्रटुल्याची वीणु Wed, 03/02/2016 - 23:32

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

पुन्हा एकदा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. विचारी आणि प्रगल्भ प्रतिसाद देणारी सर्व मंडळी भेटल्यामुळे लेख लिहिण्याचा उत्साह आला आहे खरा, बघू कसे जमते ते. कदाचित छोट्या छोट्या भागांतून लिहीन.

इर्शाद!!

.शुचि. Thu, 04/02/2016 - 03:06

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

या धाग्यामध्ये आणखी विषयांतर होऊ नये म्हणून आता इथे हा विषय थांबवते. अजून काही शंकांना उत्तरे द्यायचे उरले आहे, पण ती उत्तरे लेखातूनच देईन.

नक्की लिहा.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 03/02/2016 - 08:30

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

मेघनाप्रमाणेच... प्रचंड रस आहे. टंकायला मदत हवी असेल तर तीही करायची तयारी आहे. पण प्लीज लिहा.

मी दीड वर्षांपूर्वी इथल्याच काही सदस्यांंमुळे घरी टोमॅटो, वांगी, भोपळी मिरची अशी मोजकी झाडं लावली. दोघांपुरतं निघत नाही, पण तुका म्हणे त्यातल्यात्यात. घरी कंपोस्टही करत्ये. त्यात काही बदल, सुधारणा, सूचना नक्कीच आवडतील. इथे ऐसीवर भारतातले काही आणि उत्तर अमेरिका खंडातले काही बागकामप्रेमी असतात.

मन१ Wed, 03/02/2016 - 08:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टायपिंगबाबत साह्य करु शकतो. तुमची मुलाकह्त्/भाषण ,संवाद जे काही असेल ते ऑदिओ रुपात उअपलब्ध असेल तर टंकन करुन देउ शकतो.

मुग्धा कर्णिक Wed, 03/02/2016 - 12:15

In reply to by प्रियदर्शिनी कर्वे

सेंद्रिय शेती आणि त्यातील उत्पादने यावर विस्तृत आणि पक्के वैज्ञानिक लेखन यायला हवेच आहे.
तीन वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आणि इ-कोलाय एपिडेमिकचा संबंध प्रस्थापित झाला होता. तरीही हे फॅड कमी झाले नाही. या तथाकथित सेंद्रिय पिकांबाबत उत्कृष्ठतेचे कोणतेही निकष लावले जात नाहीत. ते तपासून पाहाण्याची कोणतीही यंत्रणाच नाही. आणि ज्वर चढल्यासारखे लोक सेंद्रियपणाचा धावा करताना दिसतात.
येऊ द्या लवकर लेख.

फूलनामशिरोमणी Wed, 03/02/2016 - 03:39

लेखमाला खूपच विचारपूर्वक लिहिलिये, आणि त्यात अनेक पटण्याजोगे मुद्दे आहेत.
एकच वाटतं, की "खाण्याच्या" प्राण्यांची पैदास आणि त्यांचं आपण खाईपर्यंतचं जीवन हे मरणापेक्षाही वाईट म्हणता येईल. त्याबद्दल नुसता विचार करूनही मांसाहार करावासा वाटत नाही. त्यामानाने मासे खाणे बरेच अहिंसक वाटते. ह्याबद्द्ल तुमचं काय मत आहे?
अर्थात, शाकाहारी लोकांनी वेगवेगळया पात़ळ्यांवर चुकीचा प्रचार केला, तरी त्याचा अर्थ मांसाहारात काहीच दोष (सामाजिक घटकांमुळे, उत्पादन प्रक्रीयेमुळे) नाहीत असा होत नाही ना?

मधे ऐकलं की दूध वाचवण्याकरिता गाईंना वासरांपासून तोडणे, किंवा वासरांचे ओठ कापणे (जेणेकरून दूध पितांना त्यांना त्रास होऊन ते परावृत्त होतील) असले प्रकार केले जातात. म्हणजे कुठल्याही अन्नग्रहणात आपल्याला पूर्णपणे अहिंसक राहताच येणार नाही.
त्यामुळे खरं म्हणजे, नैसर्गिक जीवनशैलीचा प्रचार, हाच सगळ्यात उत्तम उपाय वाटतो.

उदा: स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करणे. प्रत्येक घरटी एखादे छोटे शेत, त्यावर २-४ प्राणी असे.

अनु राव Wed, 03/02/2016 - 10:12

In reply to by फूलनामशिरोमणी

उदा: स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करणे. प्रत्येक घरटी एखादे छोटे शेत, त्यावर २-४ प्राणी असे.

ही कल्पना रोमँटीक जास्त आणि प्रॅक्टीकल कमी आहे. प्रॅक्टीकल नसण्यापेक्षा पेक्षा अकार्यक्षम आहे. त्यापेक्षा अन्न तयार करण्याचे काम एका मानवसमुहा कडे ( शेतकरी ) तर ते जास्त एफीशियंट आणि कमी इनपुट लागणारे असेल.
आपल्या आवडी साठी घरी छोटी बाग करणे वेगळे आणि स्वताचे अन्न स्वताच तयार करणे वेगळे.

फूलनामशिरोमणी Thu, 04/02/2016 - 03:06

In reply to by अनु राव

रोमॅन्टिक खरंच, पण थोरो वगैरे विचारवंतांनी असा प्रयत्न नक्कीच केला होता (निसर्गामधे राहण्याचा) आणि त्यातून आपल्याला बरेच शिकायला मिळू शकेल.

हेमिंग्वे च्या "ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी" मधे दाखवल्याप्रमाणे, स्वत: शिकार करतांना आदीम संघर्षामधे प्राणी आणि माणूस एकाच पातळीवर असतात, तसे मांस-उत्पादनात होत नाही.

मांस आणि शेतकी अति-उत्पादनाचे अतिरिक्त परिणाम: http://harpers.org/archive/2016/02/the-trouble-with-iowa/2/ मधील हा परिच्छेदः

These days a fair amount of the nitrates are derived not so much directly from chemical fertilizers as from hog manure. There are about 21 million hogs in Iowa, and almost all of them live in hog factories. Each hog produces the waste of about 2.5 people, meaning Iowa bears the shit equivalent, from hogs alone, of about 45 million people, some fifteen times its human population. But Iowa also has 52 million laying chickens, 50 million of which are in concentrated animal-feeding operations (CAFOs) that hold more than 100,000 birds. These birds likewise produce more manure than all the people in the state. Almost none of it passes through a sewage-treatment plant or even a septic tank before making its way through drainage pipes to the public waterways and drinking water.

.शुचि. Thu, 04/02/2016 - 03:12

In reply to by फूलनामशिरोमणी

थोरो वगैरे विचारवंतांनी असा प्रयत्न नक्कीच केला होता (निसर्गामधे राहण्याचा)

+१ थोरो चे वॉल्डन वाचायचा क्षीण प्रयत्न केलेला. जमलं नाही. पण येस त्यांनी निसर्गसन्नीध रहाण्याचा प्रयत्न केलेला.

फूलनामशिरोमणी Thu, 04/02/2016 - 03:42

In reply to by .शुचि.

:) :) :)

मी पण क्षीण प्रयत्न केला होता. बागेत झुकीनी लावण्याचा. जमला नाही, कारण अमेरिकेत मातीत भूसा का काय घालून इथे-तिथे झाडे उगवू देत नाहीत. त्यासाठी बाजारातून माती विकत आणणे, वगैरे सोपस्कार मागच्या उन्हाळ्यात झाले नाहीत. एका जवळच्या शेतात एखादा चौकोन भाड्याने घेणार होते, तर ते चौकोन आताच आधीच संपून गेलेत, त्यावरून, इथे स्वतःचे अन्न स्वतः उगवणे (अंशतः तरी) हे इतके रोमॅन्टिक नसून सत्यातही आले आहे असे वाटते.

अर्थात, आपल्याला जमत असो वा नसो, काहीही करण्याची एक चांगली पद्धत आहे, हे माहिती असणं महत्वाचं आहे.

बरेच प्रत्येक शाकाहारी/मांसाहारी (वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे) सवयीने तसे झालेले असतात.

त्याचप्रमाणे, उत्पादनप्रक्रीया फारशी चांगली नाही, ह्या मुद्द्यावरून मी शाकाहारी आहे- इतर कुठल्याही भोळसट कल्पनांमुळे नाही, हे ही नोंदवावेसे वाटले. अनु राव यांच्या मते भारतात सगळेच मांस फ्री रेंज, ऑर्गॅनिक असते, हा मुद्दा पटत नाही, कारण मागणीसाठी पुरवठा वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे, औद्योगिक उत्पादन करणे- केवळ मांसाचेच नव्हे, तर भाज्यांचेही.

अनु राव Thu, 04/02/2016 - 09:20

In reply to by फूलनामशिरोमणी

अनु राव यांच्या मते भारतात सगळेच मांस फ्री रेंज, ऑर्गॅनिक असते, हा मुद्दा पटत नाही, कारण मागणीसाठी पुरवठा वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे

नाही फुशि. मी कुठेही असे म्हणले नाही. कोंबड्यां चे तरी नसतेच. वर बाकीच्या जनावरांचे सुद्धा पालनपोषण कीती स्वच्छ जागेत होते ह्याबद्दल शंकाच आहे.

------------------------------------
मी जे बोलते त्या वर लोक गहजब करतातच पण मी जे बोलत नाही ते पण माझ्या नावावर येतय ( जेंव्हा ते चुकीचे असेल तेंव्हा )

फूलनामशिरोमणी Thu, 04/02/2016 - 19:11

In reply to by अनु राव

तो प्रतिसाद तुमचा नव्हता होय? मी नीट खात्री करून घ्यायला हवी होती. (गहजब झाला ते मात्र बरंच नाही का झालं? :) :) आजकाल चांगल्या कारणाने असो वा वाईट, नाव सतत झळकत राहिलं पाहिजे अशी प्रथा आहे ना? )

प्रियदर्शिनी कर्वे: ठीकाय. भारतातली परिस्थिती मला माहीत नाही. फ्री रेंज (इथे) इतकं अवास्तव महाग असतं की विचार करता येत नाही.

राजेश: तुम्ही म्हणता ते ही पटलं, पण अन्नग्रहणावर औद्योगिक उत्पादनाचा जास्त वाईट परिणाम होतो, असं सगळीकडे दिसतंय. उदा. पोळीसदृश काही पदार्थांचे औद्योगिक उत्पादन केले तरी ती घरच्या पोळीपेक्षा निकृष्टच लागते.त्यातल्या त्यात, मांसापेक्षाअ भाज्यांवर औद्योगिकरणाचा परिणाम कमी वाईट असेल, असं मला वाटतं. (बाकी शाकाहाराबद्दल मात्र बोलणार नाही, कारण, पदार्थ टिकाऊ करण्यासाठी किंवा चवीसाठी घातलेले कॉर्न सिरप वगैरे).

यंत्रांच्या उत्पादनात औद्योगिकरणामुळे जास्त नेमकेपणा येतो (सिलोकोन चिप्स हाताने बनवणे केवळ अशक्य) आणि घड्याळ मागे फिरवता येणार नाही, पण, एकूणच आहाराबाबत ह्या मुद्द्याचा विचार वेगळेपणाने करायला हवा. वर दिलेल्या एका उदाहरणात, आजोबा ९० पर्यंत खुटखुटीत होते असे लिहिले आहे, त्यात केवळ शाकाहाराचा वाटा नसून, तो शाकाहार किती उत्तम प्रतीचा होता, हे ही बघितले पाहिजे.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 19:14

In reply to by फूलनामशिरोमणी

भाज्यांनाही औद्योगिक उत्पादनासाठी षंढ केले जाते (बीटी वा जीएम बियाणांपासून जी झाडे येतात ती पुनरुत्पादन करू शकत नाहीत)

प्रियदर्शिनी कर्वे Thu, 04/02/2016 - 10:43

In reply to by फूलनामशिरोमणी

सर्व प्राणी उत्पादन फ्री रेंज असते, असे जरी नाही तरी बऱ्याच अंशी नैसर्गिक असते, असे विधान मी केले होते, आणि ते लिहिताना मीही जरा थबकले होते. पण मला जो मुद्दा मांडायचा होता, त्यात आणखी विषयांतर नको, म्हणून मी हे तिथेच सोडून दिले - प्रतिक्रिया येईल ही अपेक्षा होतीच. :)

कुक्कुटपालनाचा व्यवसाय भारतीयांना अमेरिकन पीस कोअरवाल्यांनी शिकवला असल्यामुळे तो बराचसा प्राणी उत्पादनाच्या अमेरिकन पध्दतीकडे जातो. यात कमी जागेत अनेक कोंंबड्या डांबून ठेवणे, दिवे लावून रात्रीचा दिवस करणे (यामुळे कोंबड्या सतत अंडी घालत रहातात), कोंबड्यांना वेगवेगळी रसायने देऊन उत्पादन वाढवणे, इ. अनेक गोष्टी अनैसर्गिक आहेत. त्यामुळे प्लास्टिक पिशवीबंद ब्रॅंडेड चिकन हे या पध्दतीचेच असते. मात्र मोठ्या प्रमाणावर फ्री रेंज चिकनही भारतात उपलब्ध आहे, आणि कदाचित पारंपरिक मांसाहारी तेच खातात (कदाचित अशासाठी की हे विधान केवळ निरीक्षणावरून केले आहे, आकडेवारीचा आधार नाही, त्यामुळे हे पूर्णतः चुकीचेही असू शकते).

भारतात मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्यांचे मांस खाल्ले जाते, आणि माझ्या माहितीनुसार अजूनतरी शेळी-मेंढी पालन फ्री रेंज आहे. त्यात चांगली वाणे आणण्याच्या दृष्टीने काही काम झालेले आहे, शेळ्या-मेंढ्या चरायला मोकाट सोडून त्यांनी प्लास्टिक किंवा काही रसायने वगैरे खाण्याचा धोका पत्करण्याऐवजी त्यांना बंदिस्त कुंपणात ठेऊन चारा आणून घालावा, इ. चा प्रचारही होतो आहे, आणि काही ठिकाणी अशी सुरूवातही झाली असेल. पण अजूनही मोठ्या प्रमाणावर शेळी-मेंढी पालन धनगर पारंपरिक पध्दतीनेच करताना दिसतात.

मासेमारीच्याही बाबतीत तेच आहे - मत्स्यशेतीचा प्रचार होत असला, तरी बाजारात येणारी बहुतेक सर्व मच्छी मोकळ्या समुद्रात, नद्या-तलावांमध्ये पकडलेलीच आहे.

जनावराला हालताही येणार नाही अशा बंदिस्त पिंजऱ्यात ठेवणे (स्नायू न वाढता केवळ लुसलुशीत मांस वाढावे म्हणून) किंवा वाढ झपाट्याने व्हावी म्हणून वेगवेगळ्या हार्मोन्सचा मारा करणे, इ. अघोरी प्रकार कोठे केले जात आहेत, असे अजूनतरी माझ्या पहाण्यात नाही. त्या अर्थाने मी बहुतांशी नैसर्गिक पध्दतीने पशुपालन होते असे म्हटले होते.

फूलनामशिरोमणी Thu, 04/02/2016 - 02:54

In reply to by अनु राव

शेतकी संस्कृती आणि औद्योगिक संस्कृतीमधला हाच फरक मार्क्सने सांगितला आहे,की औद्योगिकतेत एका कामगाराला कधीही "मी ही वस्तू अथपासून इतिपर्यंत बनवली" असे समाधान लाभत नाही. निर्मितीप्रक्रीयेचे विभाजन केल्यामुळे त्यातील ओलावा/ आपलेपणाची भावना नष्ट होते, आणि केवळ कामगार, आणि ग्राहक (कन्स्यूमर), इतकेच नाते उरते.

एक उपभोक्ता म्हणून प्रत्येक वस्तूकडे (मांस असो वा भाजी, आता फक्त वस्तू झाल्या आहेत) बघतांना तिच्याबद्द्ल कुठलाही आदर आणि विधिनिषेध उरत नाही. या उलट, जे प्राणी वा अन्न आपण स्वतः पोसलेले, वाढवलेले असेल, ते खातांना निसर्गाचा एक घटक म्हणून जगायला माणूस शिकतो. हे निसर्गाबरोबरचे आपले नाते लुप्त न होवो, म्हणून इथे अमेरिकेत "फार्म टू टेबल", "कम्यूनिटी फार्मिंग" असले अनेक उद्योग राबवले जात आहेत. शेती करणं सगळ्यांना जमणार नसेल, तरी इतपत जवळीक साधल्याने शेतकर्‍यांचेही कल्याणच होईल असे मला वाटते.

अन्न निर्माण करण्याची किचकट, कष्टदायक प्रक्रीया समजून घेतली, तर चांगल्या पद्धतीने उगवलेले अन्न/मांसाचे महत्त्व कळून कदाचित आपण त्यासाठी जास्त किंमत मोजायलाही तयार होवू, आणि अन्न निर्मितीतिल सध्याचे (औद्योगिकरणाद्वारे आलेले) दोष त्यामुळे कमी होऊ शकतील अशी आशा आहे.

एक वेगळा मुद्दा: खालिल लेखात सांगितल्याप्रमाणे, आजकाल, काही विशिष्ट भाज्या/फळांना जास्त मागणीमुळे, त्यांचे अति-उत्पादन केल्यामुळे, मातीतिल गुणधर्म कमी होतात. असल्या अनेक गोष्टी मला (आजवर केवळ उपभोक्ता म्हणून भाज्या खाल्ल्यामुळे) माहिती नाहीत. शेती-उत्पादनामधे रस घेतला, मुलांना त्यातून काही शिकवता आले, तर किती चांगले होईल?
http://nyti.ms/1jGQrMy

राजेश घासकडवी Thu, 04/02/2016 - 07:50

In reply to by फूलनामशिरोमणी

औद्योगिकतेत एका कामगाराला कधीही "मी ही वस्तू अथपासून इतिपर्यंत बनवली" असे समाधान लाभत नाही. निर्मितीप्रक्रीयेचे विभाजन केल्यामुळे त्यातील ओलावा/ आपलेपणाची भावना नष्ट होते,

आजच्या जगात नक्की कुठच्या बाबतीत हे जमत असेल याबद्दल साशंक आहे. शेतीच्या बाबतीतही, जर लहानसं शेत असेल तर तसं म्हणता येईल कदाचित. पण त्यासाठीही लागणारं खत मी कुठूनतरी दुसरीकडून आणलं (मी बनवलं नाही) लागणारी अवजारं दुसऱ्या कोणीतरी बनवली) शेतातली कामं करण्यासाठी लागणारे कपडे मी बनवले नाहीत.... वगैरे वगैरे.

अथपासून इतिपर्यंत करण्याचं समाधान हे तसं ओव्हररेटेडच आहे. आता मला समजा लेखन करायचं आहे. एक कादंबरी लिहायची आहे. तर त्यासाठी मी कुठचातरी पदार्थ कोळून उकळून शाई तयार करणं, स्वतः झाडांपासून भूर्जपत्रं तयार करणं, टाक स्वतः तयार करणं, इतकं सगळं केल्यानंतरच त्यांवर शब्द उमटवून कादंबरी लिहिली तर मला खरा आनंद मिळेल का? किंवा असं म्हटलं की मी वही, पेन, शाई विकत आणून त्यावर लेखन केलं तर मला त्या कादंबरीच्या निर्मितीबद्दल कमी आपलेपणा वाटेल? किंवा हे सगळं टाळूनच जर मी कॉंप्युटरवरच टाइप केली आणि वेबसाइटवरच पब्लिश केली तर त्यातून फारच कमी आनंद मिळेल, किंवा लेखनाविषयी कमी आपलेपणा वाटेल?

मार्क्स माझ्या मते इथे चुकीचे आदर्श वापरतो आहे. स्वतः वस्तू तयार करणारा कारागीरही अनेकांकडून कच्चा माल आणि आयुधं विकत आणायचा. तोही थोडं बस्तान बसलं की आपल्या हाताखालच्या लोकांकडून सोप्या गोष्टी करवून घ्यायचा आणि आपलं ज्ञान शक्य तितक्या तुकड्यांत वाटून त्यातून एफिशियन्सी वाढवण्याचा प्रयत्न करायचा. कारागीर कशाला, अनेक मोठे चित्रकारही आपल्याकडे शिकणारांकडून चित्रातल्या काही गोष्टी बनवून घ्यायचे. संगीतकारही हेच करतात. निर्मितीप्रक्रियेचं विभाजन कायमच होत आलेलं आहे. त्यामुळे औद्योगिक पातळीवर 'निर्मिती' आणि 'उत्पादन' या तशा फार वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. एक निर्माता ही प्रत्यक्षापेक्षा स्वप्निल विचारसरणीला जवळची कल्पना आहे.

अन्नाच्या बाबतीतही तेच. अन्न कसं निर्माण होतं याविषयी जाणून घेणं ठीकच. पण त्याबाबतीत पूर्णपणे अज्ञानी राहून केवळ प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये चाललेल्या घडामोडींमध्ये लक्ष घालून त्याबाबतचं ज्ञान वाढवण्यापेक्षा ते सरस का आहे? त्यातून या सगळ्या जीवनसाखळीपासून तुटणं वगैरे कसं काय होतं?

नितिन थत्ते Thu, 04/02/2016 - 09:28

In reply to by राजेश घासकडवी

ही कल्पना उलट ताणली तर शेतकर्‍याला समाधान मिळेल की नाही हे ठाऊक नाही पण उत्पन्न निश्चित अधिक मिळेल.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 12:09

मांसाहारी लोकांच्या भावनिकतेचा मुद्दा – हा मुद्दा आहे व असायलाच हवा. त्यात काही वावगे नाही हे सांगून त्यांना अधिकच मुर्दाड बनायला सांगितले जात आहे. रेस्टॉरंटमध्ये चिकन किंवा इतर मांसाहारी पदार्थ मिटक्या मारत खाणे, मांस विकत आणून स्वत:च्या घरात त्यावर पुढील प्रक्रिया करणे वेगळे आणि प्राणी पकडून – मारून – त्याचे सगळे बाकीचे करणे या पूर्णपणे वेगळे. यात आम्ही शहरात राहतो, प्राणी मारुन बाकी सगळे करणे, आम्हाला कोठे शक्य आहे, तुम्ही नाही का शहरात दळणदेखील स्वत: न करता तयार पीठ विकत घेता, ही लटके कारण नको. मी म्हटले तसे पडद्याच्या आड मारलेला प्राणी, त्याची तडफड, त्याचे रक्त वगैरे न दिसणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ज्याला सोपे वा शक्य असेल त्याने ते करावे.

वनस्पतींमध्येही जीव असण्यावरून मांसाहारामध्ये काही वावगे नाही हेही भासवले जाते. माणसाला जगण्यासाठी काहीतरी हवेच. म्हटले तर मांसाहारी असलेले जंगली प्राणीदेखील शाकाहारावर जगू शकतील, पण मुद्दा तो नाही. डोके म्हणजे स्वत:ची बुद्धी असलेला माणूस, स्वत: विचार करू सकत सलेला माणूस काय करतो हा मुद्दा आहे. शिवाय ताज्या वनस्पती वा ताजी फ़ळे तोडून खाऊच नये असे कोणाचे म्हणणे असेल तर ते एकवेळ करताही येऊ शकेल. उदा. फळ झाडावरुन गळून पडल्यावरच खाणे, ज्वारी-गहू तयार झाल्यावरच, म्हणजे पूर्ण वाढ झाल्यावर पक्ष्यांनी काही दाणे ठेवलेच, तर अगदी ते जमिनीवर गळून पडल्यावरदेखील, वगैरे. प्राण्याचे तसे करता येईल का? अगदी धान्य खाण्यालाही लेखात भ्रुणहत्या म्हटले आहे, त्याबद्दलही असे म्हणता येईल की धान्याची बीज म्हणून उपयुक्ततादेखील काही काळानंतर संपते, तेव्हा म्हटले तर त्यानंतरही खाता येईल. त्यामुळे धान्य खाणे म्हणजे भ्रुणहत्या हे म्हणणे दिशाभूल करणारे आहे.

एखाद्या वनस्पतीबद्दल तिचे थोडेथोडे शेंडे तोडूनदेखील काम भागवता येते, तिला पुन्हा फुटून आधी काही तोडले होते की नाही हीदेखील शंका वाटावी अशी स्थिती पुन्हा काही दिवसात येऊ शकते. प्राण्यांचे तसे आहे का? आज एक पाय कापून खाल्ला, उद्या दुसरा, आज पोटाचा थोडा भाग काढून खाल्ला, वगैरे. काही दिवसांनी ते पुन्हा उगवणार आहेत का?

वनस्पती तोडताना त्यातून निघणारा रस व प्राणी चिरतानाचा येणारे रक्त या तुलनेबाबत एवढेच म्हणेन की कोणाची नजर किती मेली आहे, त्यावर ते अवलंबून आहे. शिवाय वर म्हटले तसे एकच वनस्पती पूर्णपणे उखडून न काढता म्हटले तर पुन्हा वाढ करू शकते. व बहुसंख्य ‘शहरी’ मांसाहारी लोकांना तर मारलेल्या प्राण्याचे रक्त पहावेही लागत नाही ही वस्तुस्थिती आहे.

कायदे वगैरे बाजुला ठेवा, माणसाने माणसाला तरी का मारून खाऊ नये मग. जो अधिक शक्तिशाली, शारीरिक ताकद किंवा शस्त्रास्त्रांच्या सामर्थ्यावर जो दुर्बळ असेल त्याला खाता येईलच की. तेव्हा आपण ‘जंगली’ प्राण्यांपेक्षा आपण बुद्धीने उत्क्रांत झालो म्हणजे काय झालो? की त्याच बुद्धीचा वापर करुन मांसाहाराचे समर्थन व तेही शाकाहाराबद्दल समाधान व्यक्त करणा-यांना व मांसाहाराबद्दल काही मत असणा-यांना ती त्यांची अंधश्रद्धा आहे असे म्हणण्यापर्यत आपली मजल जाते?

दुधासारखे पदार्थ प्राणीज असतानाही ते शाकाहारी असणा-यांना कसे चालतात यात नक्की आक्षेप काय आहे कळले नाही. ते मिळवण्यासाठी प्राण्यांना मारण्याची तरी गरज नाही ना? फार तर त्याला आपल्या स्वार्थासाठी ते करतो असे समजू. शिवाय ते घेतले नाही तरी फार अडायला नको. पण मांसाहाराचे समर्थन करताना ते शाकाहारी लोकांना कसे चालते हा उलटा प्रश्न कशासाठी?

शाकाहाराचे पोषण मूल्य, शरीराची गरज, जबड्याची रचना (सुळे) यात मी फार जात नाही. पण कुठल्याही आजारावर मांसाहार करायलाच हवा हे कोणी डॉक्टर सांगत नाही हे लक्षात घ्यावे. कोणी चिकनसुपचा आहार सांगत असतील तर त्यालाही शाकाहारी पर्याय असतातच.

यात धर्माचा प्रश्न नाही. मी म्हटले तसे इतर अनेक गोष्टींमध्ये धर्माने काहीही सांगितले असले, वा कोणत्याही चालीरिती असल्या तरी आपण आजच्या संदर्भात, नैतिकतेच्या पातळीवर विचार करतो. तर मग मांसाहाराच्या बाबतीत मात्र कोणत्याच धर्माने मांसाहार नको असे सांगितलेले नाही याचा उल्लेख का? तेव्हा शाकाहा-यांच्या अंधश्रद्धा म्हणून जे उल्लेख केले आहेत, त्याविरूद्ध लिहिताना मांसाहाराचे समर्थन करण्याच्या ओघात त्याबद्दलच्या अंधश्रद्धाही लेखात कळतनकळत आलेल्या दिसतात.

मांसाहाराचे समर्थन करण्याच्या नादात दुसरे टोक असे गाठले गेले आहे की “ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली तिसरी पिढी तरी भारतात आहेच” असे म्हटलेले आहे. मित्रांच्या संगतीत असताना लहानपणापासून या सवयी बदलल्या जातात, तेव्हा यात तर्कसंगत विचार कोठून आला? कोणी मांसाहाराबरोबरच मद्यपानही सुरू केले असेल, तेही तर्कसंगतच म्हणायचे काय?

उलट हालचाल करणारे काहीही खाऊ शकणारे असा लौकिक असलेल्या चीनमध्ये आजही पूर्णपणे शाकाहारी लोक आहेत, जे बौद्धही नाहीत हे विशेष मानायचे? की आपल्या जगण्यासाठी प्राण्यांना मारून मांसाहार करण्याची गरज नाही हे तत्व म्हणून शाकाहा-यांच्या कुठल्याही ‘प्रचाराला’ बळी न पडता मांसाहारी लोक शाकाहारी बनणारे लोकांमधला बदल विशेष समजायचा? ते संख्येने कितीतरी कमी असले तरी.

एस्किमो राहतात त्या प्रदेशात किंवा भर जंगलात जेथे नावालाही शेती होत नाही असा प्रदेशात त्यांना शाकाहाराचे धडे देणेही गैर आहे. पण आपल्यासारख्या शहरी भागात जेथे त्याविषयी कसलीही अडचण नसताना केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी मांसाहाराचे समर्थन करणे हे दुसरे टोक आहे. भारतातले बहुसंख्य मांसाहारी म्हणजे मांसाहाराशिवाय चालणारच नाही अशा प्रकारातले नसतात. तेव्हा ते जर जवळजवळ ९०-९९% शाकाहार घेत असतील तर त्यांनी शाकाहारावर टीका करणे हीच गंमत आहे.

मांसाहारी (जलचरांवर उदरनिर्वाह करणा-यांशिवाय) नसतील, तर पृथ्वीवरील लोकसंख्येचे पोट भरणे शक्य होणार नाही हाही एक नेहमी ऐकू येणारा प्रतिवाद आहे. मात्र त्यांच्या हे लक्षात येत नाही की एक किलो खाण्याजोगे मांस निर्माण व्हायला कितीतरी पट धान्य किंवा शाकाहारी पदार्थ लागतात.

लेखाच्या शेवटचे वाक्य: ‘शाकाहार म्हणजे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार हा पोषणाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहार आहे असे सांगणे हा सत्यापलाप आहे. आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे’

सर्वश्रेष्ठतेच्या दाव्यात मी जात नाही, मात्र कोणाला पटो वा न पटो, शाकाहार म्हणजे नैतिक आचरणाचा प्रकार आहेच. उलट एकीकडे सोयीस्करपणे धर्म, इतिहास व परंपरांचा आधार घेऊन व दुसरीकडे सोयीस्करपणे बौद्धिक उत्क्रांतीचा विसर पाडून मांसाहार ही आजच्या युगातही नैसर्गिक गोष्ट आहे हे सांगणे हाच सत्यापलाप आहे.

कोणी काय खावे किंवा खाऊ नये हे कोणी ठरवू नयेच, पण केवळ शाकाहारी त्यांच्या आहाराचा प्रचार करतात म्हणून ठरवून मांसाहाराचे समर्थन करायचे हे अतिशय अयोग्य आहे.

मांसाहाराचे समर्थन करणा-यांनी माणसाने माणसाला का खाऊ नये एवढे सांगावे. वर म्हटले तसे कायद्याची अडचण न सांगता.

नगरीनिरंजन Thu, 04/02/2016 - 12:21

In reply to by राजेश कुलकर्णी

माणसाने माणसाला का खाऊ नये

कोण म्हणतं खाऊ नये? कायद्याचं बंधन नसल्यास वैयक्तिक आवड सोडल्यास इतर काहीही माणसाने माणसाला खाण्यापासून अडवू शकत नाही. पण बहुतेक प्राणी स्वतःच्या प्रजातीचा प्राणी खात नाहीत. शाकाहारी लोक मात्र असे मूर्ख प्रश्न घेऊन दुसर्‍यांना पीडतात; त्यामुळे आयुष्यात संधी मिळाल्यास एखाद्या आगाऊ शाकाहार्‍याला गट्टम करण्याची इच्छा आहे.

नगरीनिरंजन Thu, 04/02/2016 - 12:41

In reply to by राजेश कुलकर्णी

यात हलकटपणा काय? मांसाहार वाईट आहे हे मला मान्य नाही आणि त्यासाठी "माणसाने माणसाला का खाऊ नये" या प्रश्नाचं उत्तर कोणी मागत असेल तर तो हलकटपणा आहे.

अनु राव Thu, 04/02/2016 - 13:30

In reply to by नगरीनिरंजन

ननि - तुम्ही पहिला प्रतिसाद देऊन जे केलेत ते सांगायला मराठीत "हात दाखवुन अवलक्षण" अशी एक म्हण आहे.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 15:14

In reply to by अनु राव

अशा कुचाळक्या करण्यापेक्षा काही सकारात्मक कमेंट करता आली तर पहा. इथले काही सदस्य या पोर्टलच्या बॅंडविड्थच्या की जागेच्या वापराबद्दल काळजीत आहेत. अशा कमेंट्स टाळल्यात तर त्याबरोबर येणारी कंपुगिरी व त्यामुळे होणारा कचराही कमी व्हायला थोडीफार मदत होईल.

आडकित्ता Fri, 05/02/2016 - 11:41

In reply to by राजेश कुलकर्णी

मी तुमच्या धाग्यावर फिरकत नाही, तुम्ही माझ्याकडे फिरकू नका असल्या वल्गना करणारे इकडं कुठं?

अतिशहाणा Thu, 04/02/2016 - 20:17

In reply to by नगरीनिरंजन

राकु, माणूस काहीही करु शकतो.

https://en.wikipedia.org/wiki/Alive_%281993_film%29

कुठल्यातरी आदिवासी जमातीत म्हणे अंत्यसंस्कारासाठी दहन-दफन करण्याऐवजी मृत व्यक्तीला खातात. इतक्या प्रिय व्यक्तीला तुम्ही जाळू/गाडू कसं काय शकता? (ऐकीव माहिती आहे!) पण वरील दुव्यातील घटना सत्य आहे.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 20:24

In reply to by अतिशहाणा

आफ्रिकेतल्या रेबेल्सकडून काही सरकारी लष्करी अधिकारी किंवा जवान सापदले, तर त्याचा मेंदू टोळक्याच्या मो-रक्याला, व इतर भाग इतरांना अशी विभागणी होते असे ऐकले आहे. त्यासाठी माणूस मरायचीही गरज नाही.

अतिशहाणा Thu, 04/02/2016 - 20:38

In reply to by राजेश कुलकर्णी

मग प्रॉब्लेम काय आहे? आपल्या संस्कृतीत तर चिलया बाळाची पण ष्टोरी आहे. आणि त्या मांसाची मागणी करणारे देव, ऋषी पदावरील आदरणीय व्यक्ती होती. फार तर देशातील मनुष्यबळाची संख्या कमी होऊ नये ;) यासाठी ते बेकायदेशीर असेल पण नैतिकतेचा मुद्दा कशासाठी?

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 14:14

In reply to by नितिन थत्ते

हायपोथेटिकल का बोलावे? शिवाय सोय नसण्याचा प्रश्न असता तर तो मांसाहार न पचवता (शाकाहारापेक्षा पचवायला कठीण म्हणून) येण्याचा असता असे वाटते.
मुळात शरीराला हव्या त्या उर्जेसाठी असे अन्न का हवे, दुस-या स्वरूपात का नाही, हेही विचारता येईल, तेव्हा तो मुद्दा नाही.
बाकी तुम्ही भूतदयेचा उल्लेख केलात म्हणून, मांसाहारी लोकही खाणे संपल्यावर इतर व्यवहारात भूतदया करतो असा दावा करू शकतात.

गवि Thu, 04/02/2016 - 14:44

In reply to by राजेश कुलकर्णी

हायपोथेटिकल का बोलावे?

हो. मान्य.

शिवाय ताज्या वनस्पती वा ताजी फ़ळे तोडून खाऊच नये असे कोणाचे म्हणणे असेल तर ते एकवेळ करताही येऊ शकेल. उदा. फळ झाडावरुन गळून पडल्यावरच खाणे, ज्वारी-गहू तयार झाल्यावरच, म्हणजे पूर्ण वाढ झाल्यावर पक्ष्यांनी काही दाणे ठेवलेच, तर अगदी ते जमिनीवर गळून पडल्यावरदेखील, वगैरे. प्राण्याचे तसे करता येईल का? अगदी धान्य खाण्यालाही लेखात भ्रुणहत्या म्हटले आहे, त्याबद्दलही असे म्हणता येईल की धान्याची बीज म्हणून उपयुक्ततादेखील काही काळानंतर संपते, तेव्हा म्हटले तर त्यानंतरही खाता येईल.

(म्हटलं तर)सर्व फळं झाडावरुन नैसर्गिकपणे गळल्यावरच खाणे, (म्हटलं तर) कणसांतले सर्व दाणे आपोआप जमिनीवर गळून पडल्यानंतरच खाणे, (म्हटलं तर) धान्याची बीज म्हणून उपयुक्तता काही दशकांनी, शतकांनी (डिपेन्डिंग ऑन प्लँट स्पेसीज) संपल्यावरच* त्याचे पीठ आणि पोळीभाकरीब्रेड करणे हे सर्व हायपोथेटिकल नसून प्रॅक्टिकली शक्य असेल, तर (म्हटलं तर) पोल्ट्रीतली प्रत्येक कोंबडी नैसर्गिक वार्धक्याने, प्रत्येक बोकड वय झाल्याने किंवा नैसर्गिक आजाराने मेल्यावर मगच कापून खाणंही तितकंच (की तितपतच) शक्य आहे.

* पण अशी बीज म्हणून उपयुक्तता संपण्यासाठी ती बीजे मातीत पडू न देता कुठेतरी कोरड्या जागी बराच काळ साठवून ठेवावी लागतील. म्हणजे रुजण्याची नैसर्गिक संधी न देता ठेवावी लागतील. जर मातीत पडू दिली तर कुजून जातील किंव बरीचशी फळतील. ही बाब म्हणजे एकप्रकारची हत्याच किंवा कसे?

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 15:08

In reply to by गवि

म्हटले तर शाकाहार करता येण्यासारखा आहे हे तु्ही मान्य करतच आहात. त्याप्रमाणे प्राणी नैसर्गिकपणे मेल्यावर कोणी त्याला खाऊ इच्छित असेल तर माझे काही म्हणणे नाही. पण त्यावरून लेखात म्हणल्याप्रमाणे शाकाहारी लोकांना दोष द्यायला नको.
शिवाय मी मूळ कमेंटमध्ये म्हटले नाही तरी बीमध्ये जीवाला जन्माला घालण्याचे पोटेंशियल असले, तरी त्यात जीव भरतो तो विशिष्ठ परिस्थितीत. ज्याला आपण भ्रुणहत्या म्हणतो, तो पोटात जीव जिवंत असतो. बीचे तसे नसते. तेव्हा भ्रुणहत्येचा तर्क किती ताणायचा हे तुम्ही ठरवा.

गवि Thu, 04/02/2016 - 15:21

In reply to by राजेश कुलकर्णी

होय. ते फक्त हायपोथेटिकलच्या मुद्द्याबद्दल होतं हो.!! :) शाकाहारी लोकांना शाकाहारी असल्याबद्दल कोणताच दोष द्यायला नको हे बिनशर्त मान्यच आहे सर.

बाकी

बीज म्हणून उपयुक्तता संपेपर्यंत ती ठेवून देणे, किंवा (उलट अर्थातच) बीज म्हणून उपयुक्तता असलेली सर्व बीजे रुजू देणे आणि त्यांची जिवंत झाडे आणि आणखी जिवंत बीजे बनू देणे (अतएव हे सर्व जीवनसक्षम असल्याने ते न खाणे), आणि जी काही मृत निर्बिजीकरण झालेली बीजे मिळतील ती खाऊन टाकणे (कारण साठवणी करुन पुन्हा रुजवणं शक्य नसल्याने)..

- या मार्गाने शेवटी काळाच्या प्रवाहात "खाण्यास योग्य" असे क्वालिफिकेशन असणारी मृत बीजसंख्या चक्रवाढ वाढीने केवळ घटतच जाईल किंवा कसं?

सो.. वन डे (व्हेरी सून) वुई विल हॅव टु ईट अ लाईव्ह बीज.. आय रेस्ट माय केस.

अनु राव Thu, 04/02/2016 - 15:22

In reply to by गवि

या मार्गाने शेवटी काळाच्या प्रवाहात "खाण्यास योग्य" असे क्वालिफिकेशन असणारी मृत बीजसंख्या चक्रवाढ वाढीने केवळ घटतच जाईल किंवा कसं?

गवि - आता तुम्ही हा मुद्दा लाउन च धरता आहात तर मी पण हात दाखवुन घेते, तेव्हडीच मजा.

तुम्ही म्हणता तसे कसे होइल? समजा गव्हाच्या १ दाण्यापासुन ४०० दाणे तयार होत असतील तर त्यातले ३९८ दाण्यांची भ्रुण हत्या करुन ते खावेत, आणि उरलेले २ दाणे पेरावेत. पुढच्या वेळेस, भ्रुणहत्या करायला ७९६ दाणे मिळतील.

गवि Thu, 04/02/2016 - 15:25

In reply to by अनु राव

तुम्ही म्हणता तसे कसे होइल? समजा गव्हाच्या १ दाण्यापासुन ४०० दाणे तयार होत असतील तर त्यातले ३९८ दाण्यांची भ्रुण हत्या करुन ते खावेत, आणि उरलेले २ दाणे पेरावेत. पुढच्या वेळेस, भ्रुणहत्या करायला ७९६ दाणे मिळतील.

म्हणजे सगळं आत्तासारखंच ना? बरोबर..मान्यच.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 15:44

In reply to by गवि

आपण ज्याला भ्रुण म्हणतो, तो जीव निर्माण झालेला असतो. बीच्या बाबतीत तसे नसते. तेव्हा कोंब फुटलेले व न फुटलेले कोरडे बी यात काही फरक करता का तुम्ही? त्यावर हे अवलंबून आहे.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 15:53

In reply to by राजेश कुलकर्णी

अर्र्र
म्हणजे आता उसळी, मोड आलेली धान्ये शाकाहार्‍यांनी कुठल्या तोंडाने (तोंडाची जागा नव्हे ही केवळ म्हण आहे ) खावीत असं म्हणयचंय का? माझी तर तुफ्फान करमणूक होतेय

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 16:02

In reply to by ऋषिकेश

मूळ पोस्टमध्ये भ्रूणहत्येचा मुद्दा मांडला आहे, त्यावर पूर्ण शाकाहारी रहायचे म्हटले तर (प्राणी मारणे तर दूरच, वनस्पतींच्या बाबतीतही तसे न करावे लागता रहावे लागले तर) राहता येते हा मुद्दा चालला आहे. तेव्हा मूळ मुद्दा समजून न घेता उठसुट करमणूक करून घेत जाऊ नका.
एखादी गोष्ट पटली नाही तरी तुम्ही व तुमचा कंपू ज्या प्रकारच्या कमेंट करता ती पद्धत बदलता येते का ते पहा. म्हणजे उठसूट करमणूक वगैरे होणार नाही.

नितिन थत्ते Thu, 04/02/2016 - 16:44

In reply to by राजेश कुलकर्णी

>>तेव्हा कोंब फुटलेले व न फुटलेले कोरडे बी यात काही फरक करता का तुम्ही? त्यावर हे अवलंबून आहे.

अगायायाया.....
कुठे फेडणार हे पाप आता?

सकाळी तीन चारशे मोड आलेले मूगाचे दाणे खाल्ले मी !!

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 15:58

In reply to by गवि

आपल्या कमेंटवर दुस-याची कमेंट आली की आपल्या कमेंटमध्ये येथे बदल करता येत नाही. त्यामुळे आधीची कमेंट सुधारित स्वरूपात खाली देत आहे.
आपण ज्याला भ्रुण म्हणतो, तो जीव निर्माण झालेला असतो. बीच्या बाबतीत तसे नसते. काही विशिष्ठ परिस्थितीतच ते रूजू शकते. आपण प्राण्यामधली फलधारणा होणे (भ्रूण) व जीव प्रत्यक्ष जन्माला येणे या दोन पाय-यांची येथे गल्लत करत आहोत असे वाटते. कोरडी बी ही फलधारणा होण्याच्याही आधीची म्हणजे निर्जीव स्थिती आहे. म्हणजे भ्रूण नाही. तेव्हा कोंब फुटलेले व न फुटलेले कोरडे बी यात काही फरक करता का तुम्ही? त्यावर हे अवलंबून आहे.

याला जोडून इतरही मुद्दे मांडलेले आहेत. तेदेखील विचारात घ्या.

अनु राव Thu, 04/02/2016 - 16:12

In reply to by राजेश कुलकर्णी

कोरडी बी ही फलधारणा होण्याच्याही आधीची म्हणजे निर्जीव स्थिती आहे. म्हणजे भ्रूण नाही.

मला तरी शाळेत बी, फुल, फळ वगैरे सजीव आणि दगड, पाणी वगैरे निर्जीव असे शिकवले होते.

राही Thu, 04/02/2016 - 16:45

In reply to by अनु राव

कोरडी बी हेच मुळी एक भ्रूण (एम्ब्रियो) असताना भ्रूणाच्या कोरड्या चर्चा कशाला? आठवतंय का परागीभवन, स्वपरागीभवन वगैरे? आता गुमान पॉपकॉर्न खाल्ले तरी भ्रूण हत्या. आली ना पंचायत?

गवि Thu, 04/02/2016 - 16:17

In reply to by राजेश कुलकर्णी

हे ऋषिकेष वगैरे बदमाश आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुया.

मी कोणत्याही प्रकारे अविचारी कॉमेंट्स करु इच्छित नाही. तुम्ही उत्तम चर्चा करता आहात. मी फक्त काही मुद्द्यांना चॅलेंज करुन पाहतोय.

तस्मात.

आपण ज्याला भ्रुण म्हणतो, तो जीव निर्माण झालेला असतो. बीच्या बाबतीत तसे नसते. काही विशिष्ठ परिस्थितीतच ते रूजू शकते. आपण प्राण्यामधली फलधारणा होणे (भ्रूण) व जीव प्रत्यक्ष जन्माला येणे या दोन पाय-यांची येथे गल्लत करत आहोत असे वाटते. कोरडी बी ही फलधारणा होण्याच्याही आधीची म्हणजे निर्जीव स्थिती आहे. म्हणजे भ्रूण नाही. तेव्हा कोंब फुटलेले व न फुटलेले कोरडे बी यात काही फरक करता का तुम्ही? त्यावर हे अवलंबून आहे.

हे असं अजिबात नाही असं म्हणू इच्छितो. अंतर्गत फलन आणि बाह्य फलन या फरकामुळे थेट कोरडी बी ही निर्जीव स्थिती असं म्हणणं योग्य वाटत नाही. नवीन जीव बनण्यासाठी पूर्ण सक्षम असं युनिट ऊर्फ बीज झाडाने बनवलेलं असतं. त्या अवस्थेत ते ठेवून देऊन (स्वतःचे हातपाय त्याला किंवा जनक झाडाला नसल्याने) त्याला पुढची अवस्था प्राप्त होऊ न देणं आणि तोपर्यंत त्याला निर्जीव मानून खाऊनच टाकणं हा अन्याय आहे (इन द फ्रेम ऑफ जस्टिस दॅट वुई आर डिस्कसिंग नाऊ)

पण मुळात मुद्दा तो नाहीच आहे. साखरेची साल काढण्यातला निरर्थकपणा आपण जाणतोच. त्यामुळे तांत्रिक मुद्दे न काढता इतकंच म्हणूया की एकूण आपण पूर्ण जिवंत जीवाची हत्या करुन मारुन खाणं अटळ आहे. जीवो जीवस्य जीवनम् याला पर्याय शाकाहारातही नाही आणि मांसाहारातही नाही. त्यातल्या कोणी एकाने कसलंही समर्थन किंवा तुलना देऊन पलीकडल्या पक्षाला कमी दाखवून नामोहरम करण्यात अर्थ नाही हा मुद्दा आहे. आणि शाकाहारी लोकांमधे अनेक "शाकाहारसमर्थक / प्रचारक" असतात तसे मांसाहारींमधे तुलनेत "मांसाहारसमर्थक/ प्रचारक" कमी असतात हा मुद्दा आहे.

मन१ Thu, 04/02/2016 - 16:27

In reply to by गवि

शाकाहारी लोकांमधे अनेक "शाकाहारसमर्थक / प्रचारक" असतात तसे मांसाहारींमधे तुलनेत "मांसाहारसमर्थक/ प्रचारक" कमी असतात हा मुद्दा आहे.

खुद्द हा लेखच मांसाहारसमर्थक्/प्रचारक लिहिल्याची हल्किशी, कळत नकळत जाणीव होते आहे.
लेखात तर्क आणि तथ्ये उत्तम आहेत; पण एक हल्कासा आवेश जाणवला.
.
.
शाकाहारातून पुरेसे पोषण मिळणे ऑल्मोस्ट अशक्य वआटावे असे लिहिले आहे.
आणी त्या चाचण्या, त्या मोट्घमोठ्या लोकांचे रिसर्च, उदाहरणे हे विशेष उपयुक्त वाटत नाही.
.
.
हे आहारतज्ञ , डॉक्टर , संशोधक इकडून लिहिणारे आहेत; तसे तिकडून लिहिणारेही आहेत.
.
.
होय, शाकाहारात पुरेसे पोषण मिळणे कठीण आहे; मान्य.
पण अशक्य आहे का ???
.
.
भारतात खूपसे शाकाहारी विविध बाबतीत कमी पातळी दाकह्वतात पोषण मूल्यांची.
पण सगळेच दाकह्वत नाहित हो.
.
.
माझ्या पत्नीचे चुलत आजोबा गेले मागच्या आतह्वड्यात.
गडी पैलवानी होता. चौर्‍याण्णवव्या वर्षीही कसली कमतरता नाही.
लोह, कॅल्शिअम, सगळच धडधाकट.
ना बीपी ना शुगर.
असे लोकही असतात.
तुम्ही अमक्यांच्या संशोधनाचे रेफरन्स द्याल तर लोक तमक्यांचे देतील.
अर्थ नाही. हा सगलाच फेनामेना खूप नवीन आहे.
वेळ नाहिये. घरी जाउन लिहितो अधिक
.
.
अर्थात ह्यासर्वांत दूध , दुगध जन्य अशा प्राणिज पदार्थांना शाकाहारात गणतो आहे; हे मान्य.

राही Thu, 04/02/2016 - 16:33

In reply to by मन१

छे हो. असलाच तर 'मांसाहार हा निम्न दर्जाचा आहार आहे' या (कदाचित) संस्थळबाह्य केल्या जाणार्‍या आरोपाचे हलकेसे आवेशयुक्त खंडन आहे.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 16:37

In reply to by मन१

मनोबा शाकाहार स्वेच्छेने करणे वैट्ट असे म्हण्णे कोणाचेच नाही. मात्र शाकाहार करणेच फक्त थोर आहे (नि मांसाहार निम्न दर्जाचा) असा बालिश नि हास्यास्पद दावा आला की लेखातील हल्कासा आवेश येणे क्रमप्राप्त ठरते.

'न'वी बाजू Thu, 04/02/2016 - 17:55

In reply to by मन१

खुद्द हा लेखच मांसाहारसमर्थक्/प्रचारक लिहिल्याची हल्किशी, कळत नकळत जाणीव होते आहे.

शाकाहारातून पुरेसे पोषण मिळणे ऑल्मोस्ट अशक्य वआटावे असे लिहिले आहे.

भारतात खूपसे शाकाहारी विविध बाबतीत कमी पातळी दाकह्वतात पोषण मूल्यांची.
पण सगळेच दाकह्वत नाहित हो.

नेमके.

तमाम शाकाहारी हे आहारात काहीतरी कमी पडल्याने काही ना काही आजाराने ग्रस्त असे कुपोषित आहेत (किंवा, गोइंग बाय द प्रिन्सिपल्स, असायला पाहिजेत) असे जे चित्र उभे राहत आहे, ते कितपत तथ्यास धरून आहे, याबाबत साशंक आहे.

अर्थात ह्यासर्वांत दूध , दुगध जन्य अशा प्राणिज पदार्थांना शाकाहारात गणतो आहे; हे मान्य.

अर्थात.

तसेही, भारतात कितीसे व्हेगन सापडतील, याबाबत साशंक आहे.

(व्हेगन लोक कुपोषित असतात, किंवा कसे, याबाबत वैयक्तिक माहितीअभावी कोणतेही विधान करू इच्छीत नाही. तसेही, ते त्यांचे त्यांचे पाहून घ्यावयास समर्थ असावेत, असे वाटते. असो.)

'न'वी बाजू Thu, 04/02/2016 - 17:36

In reply to by गवि

शाकाहारी लोकांमधे अनेक "शाकाहारसमर्थक / प्रचारक" असतात तसे मांसाहारींमधे तुलनेत "मांसाहारसमर्थक/ प्रचारक" कमी असतात हा मुद्दा आहे.

कमी?

कमी असतात, की अधिक सटल असतात, इतकाच मुद्दा आहे.

(बाकीची उदाहरणे मरू द्यात. खुद्द हाच लेख घ्या. निव्वळ प्रतिवादात्मक असता, तर 'शाकाहारवाद्यांची असत्ये' इथवर पुरला असता. त्यापुढे 'मांसाहाराचे सत्य' हे शेपूट (हळूच?) लागलेच आहे ना?

किंबहुना, यातील शेपूट कोठले, आणि कुत्रा कोठला, असा प्रश्न पडावा.)

----------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ: 'टेल व्यागिंग द डॉग'.

राजेश कुलकर्णी Thu, 04/02/2016 - 18:37

In reply to by गवि

बी वापरल्यामुळे त्या झाडावर अन्याय होतो हे जरूर म्हणू शकतो. तुम्ही म्हणता तसा इनजस्टिस. पण बी ही निर्जीव समजायला हवी. मी येथे वाद घालण्यापुरते म्हणत नाही. तेव्हा धान्य खाणे ही निश्चित हत्या नाही. प्राणीहत्येच्याबाबतीत आपण त्या इनजस्टिसच्या कितीतरी पुढे जातो.

जीवो जीवस्य जीवनं हे आताच्या जीवनपद्धतीसाठी पूर्णत: लागू नाही. म्हणजे जो बलवान तो ... या अर्थाने किंवा अलास्का वगैरेचा जो उल्लेख केला आहे त्याअंगाने.

ज्याला मांसाहार म्हणतो, त्याच्या स्वरूपाचाही उल्लेख मी केला आहे. किती मांसाहारी स्वत: एखाद्या प्राण्याला मारून त्याचे भक्षण करू शकतील, वगैरे अनेक मुद्दे मांडले आहेत.

स्वत: बहुतेक मांसाहारी लोकांची नजर (व बुद्धीही) तयार पदार्थ खाण्यापुरतीच मेलेली असते. यात मी नियमित मांसाहार करणा-यांबद्दल बोलत नाही. सगळेच न्याय्य (जस्टिफायेबल) असते तर कोणाला त्याबाबतीत अपराधीपणा वाटण्याचे कारण काय? तो तसा वाटतो, म्हणजेच कुठेतरी आपण चुकत आहोत याची जाणीव असते. (अर्थात यात कोणी कुठला कायदा मोडतो किंवा तत्सम असा काही भाग नाही.). अपराधीपणा जाऊ दे, पण या पोस्टचा रोख यात काही शाकाहारासंबंधीच्या दाव्याबद्दलही आहे हा आक्षेप आहे. हा दावा असा आहे की जणु जगायला शाकाहार पुरेसा नाही (शाकाहाराच्या मर्यादा) असे वाटावे. म्हणून मी सुळयांची रचना, पोषणमूल्य, वगैरेत पडलोही नाही.

माझ्या बहुतेक मांसाहारी मित्रांमध्ये ते केवळ अल्पमांसाहारी असल्यामुळे असेल किंवा काय, वर उल्लेख केलेली अपराधीपणाची भावना दिसते. कदाचित मी म्हटल्याप्रमाणे स्वत: कधी एखादा प्राणी मारून न शिजवल्यामुळे असेल. अर्थात त्यांनी त्यांची क्वचित का होईना पण मांसाहार करण्याची सवय त्यांनी पूर्णपणे बंद करावी असा माझाही आग्रह नसतो.

मीदेखील कोणाच्या खाण्याच्या सवयींमध्ये पडत नाही. पण शाकाहारी पर्याय असताना इतर कोणतीही अडचण नसताना आपण काय करत आहोत याची जाणीव हवी. कमीत कमी तुम्ही शाकाहारीही (भ्रूणहत्या, वगैरे) तसे शाकाहारी नाहीतच असा दावा तरी करू नये.

यातली गंमत म्हणजे मुळात शाकाहारीचा शब्दच शाक वर आधारीत आहे. तेव्हा वनस्पतींच्या संवेदना, वगैरे विषय त्यात येतच नाही. तो काही अहिंसाहारी असा शब्द नाही. मी त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न केला एवढेच. माझ्या मूळ कमेंटमध्ये व वर कोणाची 'नजर कितपत मेली आहे' याबद्दला जो उल्लेख केला आहे तो यासाठी. भाज्यांना वा फळांना आपण शाकाहारी मांस म्हणत नाही. तेव्हा भाज्यांचा रस म्हणजे त्यांचे ‘लाल नसलेले रक्त’ हा उल्लेख अयोग्य आहे.

मांसाहारींना प्रचाराची गरजच पडत नाही असे वाटते. ते केवळ मांसाहारींच्या संगतीने होणारे काम आहे असे आपण नेहमी पाहतो. म्हणून गरज पडलीच तर ती पडते शाकाहाराच्या प्रचाराची.

शेवटी: 'कोंबडी गेली जीवानिशी, खाणारा म्हणतो वात्तड' ही म्हणदेखील कोण्या शाकाहा-याने बनवली असेल काय?

अनु राव Thu, 04/02/2016 - 18:57

In reply to by राजेश कुलकर्णी

माझ्या बहुतेक मांसाहारी मित्रांमध्ये ते केवळ अल्पमांसाहारी असल्यामुळे असेल किंवा काय, वर उल्लेख केलेली अपराधीपणाची भावना दिसते.

तुमच्या मित्रांच्या जरा गंडलेल्या केसेस दिसतायत राकु. अपराधी वाटत असेल तर मांसाहार करतात कशाला? आणि करत असतील तर अपराधी का वाटते?
वाईट वाटुन घेऊ नका पण चांगलेच चालू आहेत तुमचे मित्र. त्यांना काही अपराधी वगैरे वाटत नसणार. किंवा आपण काहीतरी वाईट करतो आहोत असे वाटत असुन ती गोष्ट करणे म्हणजे गडबड केस आहेत.
जपुन रहा, तुमच्या कडुन १० लाख रुपये घेतील आणि नंतर म्हणतील की मला अपराधी वाटतय पण पैसे परत देणार नाही.

.शुचि. Thu, 04/02/2016 - 19:00

In reply to by अनु राव

जपुन रहा, तुमच्या कडुन १० लाख रुपये घेतील आणि नंतर म्हणतील की मला अपराधी वाटतय पण पैसे परत देणार नाही.

=))

गवि Thu, 04/02/2016 - 15:20

In reply to by अनु राव

"पुढच्यास ठेच"

तुम्ही कितीही भरीस घातलंत तरी पुढच्यास, मागच्यास किंवा कोणासच ठेचण्याचा माझा मुळातच स्वभाव नाहीये हो. ;)

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 15:26

In reply to by अनु राव

अगं अनु, गवि बरेच दिवसांनी दिसताहेत. ताज्य दमाचे आहेत. ;)
लिहा हो तुम्ही गवि (तेव्हढीच तुमच्या प्रतिसादाला येणार्‍या विवक्षित उपप्रतिसादामुळे कर्मणूक :प)

नितिन थत्ते Fri, 05/02/2016 - 09:58

In reply to by राजेश कुलकर्णी

>>शिवाय सोय नसण्याचा प्रश्न असता तर तो मांसाहार न पचवता (शाकाहारापेक्षा पचवायला कठीण म्हणून) येण्याचा असता असे वाटते.

मांसाहार हा शाकाहारापेक्षा पचायला कठीण असतो ही नवीन माहिती कळली. ;)
धन्यवाद.

मी तर मांस पचण्यास सोपे असल्याने लवकर पचल्यावरसुद्धा लहान आतड्याच्या लांबीमुळे अनावश्यक पोटात राहते आणि ते वैट असते असा मांसाहारविरोधी मुद्दा ऐकला होता बुवा.

ऋषिकेश Thu, 04/02/2016 - 14:24

In reply to by नितिन थत्ते

हो ना! तसंही शाकाहार काय, मांसाहार काय काही लिमिटेड गोष्टी सोडल्या तर माणसाला दोन्ही आहार "शिजवून" खावे लागतात.

हारुन शेख Fri, 05/02/2016 - 15:27

@ नानिंचा प्रतिसाद

नरमांसभक्षणाचे एकवेळ राहूद्या. मागे अशाच कुठल्याश्या धाग्यावर शाकाहार चालतो म्हणून 'ब्रेस्टमिल्क' पिणार का अशी चर्चा झालेली ? मला वाटतं बॅटमॅनने काढली होती शंका ? ती चर्चापण रोचक होती.
त्यानंतर काही दिवसांपूर्वी ' MAD MAX : Fury Road ' पाहीला तेंव्हा 'ब्रेस्टमिल्क' हे Citadel मधले लोकं पितात वर त्याचा व्यापार करून 'guzzoline' म्हणजे पेट्रोल खरेदी करतात हे पाहून गंमत वाटली होती. पण तो चित्रपटच शेवटी :)

अनुप ढेरे Fri, 05/02/2016 - 15:54

In reply to by हारुन शेख

ब्रेस्टमिल्कचं आइस्क्रीम विकणार्‍या दुकानाबद्दल वाचलं होत नेटवर. बहुधा इंग्लंडमध्ये आहे.

नगरीनिरंजन Fri, 05/02/2016 - 16:07

In reply to by अनुप ढेरे

धारोष्ण वगैरे मिळायला लागेल बहुतेक मागणी वाढेल तसे.
"तेरी माँ का दूध" वगैरे अपलापशब्दही निर्माण होतील का हळूहळू? बायको डेअरीत काम करते असं लोक सांगतील तेव्हा ऐकणार्‍याची प्रतिक्रिया काय असेल?
"खरवस" विकतील का? पंप तर नक्कीच येतील बाजारात आणि पंप जोडलेल्या ब्रा? मग मुलांना क्वालिटी टाईम कसा द्यावा या चर्चा मागे पडून क्वालिटी दूध कसे द्यावे अशा चर्चा घडतील का?

असे अनेक शाकाहारी प्रश्न मनात येऊन गेले.

अतिशहाणा Fri, 05/02/2016 - 19:51

In reply to by नगरीनिरंजन

काही आठवलेले. (फुसके बार?)
एनपीआरवर पैशासाठी ब्रेस्ट मिल्क विकणाऱ्या आयांच्या मुलाखती व अशा दुधाची सुरक्षित वाहतूक कशी करावी यासंबंधीची चर्चा ऐकली होती. अशा दुधाला बरीच मागणी आहे आणि पैसेही चांगले मिळतात असे विकणाऱ्यांचे मत पडले.

'पिंक' या गायिकेच्या एका गाण्यात (व्हॉट्स द डीलिओ?) असे मानवी स्त्रियांना पंप वगैरे लावून त्यांचे दूध वासरांना प्यायला देतात असं एक दृश्य पाहिलंय

मंदार कात्रे Fri, 05/02/2016 - 22:55

https://www.youtube.com/watch?v=jqxENMKaeCU

नुसता मान्साहार नव्हे तर बीफ आणि पोर्क च्या अति वापराचा जगाच्या पर्यावरणावर अन निसर्गावर किती भयानक परिणाम होत आहे , ते जरा महा कर्णिक मॅडम

Rajesh188 Fri, 05/07/2024 - 19:24

निसर्ग स्वतः स्वतःला वाचविण्यात, सक्षम आहे.
निसर्ग स्वतः स्वतःला बलवान बनविण्यास सक्षम आहे.
मानवाने फक्त स्वतःचे अस्तित्व टिकेल का फक्त ह्याचीच काळजी करावी

माणसाने निसर्ग वाचविण्यासाठी काही ही करू नये .

तेवढी कुवत माणसात बिलकुल नाही.
माणसाने फक्त स्वतः स्वतःला सुधारावे निसर्गात ढवळा ढवळ करू नये .
बाकी माणसाला काही ही करण्याची गरज नाही.

सजीव प्रण्या न च्या अस्तित्व मुळे पर्यावरण बिघडत असेल तसे पाहिले मानव प्राण्याची संख्या कमी करावी लागेल नंतर.
गाय,म्हैस आणि बाकी प्राण्यांची

दोन गुलाबजाम Tue, 16/07/2024 - 19:18

हसू आले वाचून!

आहारात अशाक म्हणजे प्राणिज, प्राणिजन्य पदार्थ असावेत. फार जास्त प्रमाणात शाका खाऊ नयेत.

हे वाचून तर हसूही आले आणि लेखकाची कीवही आली.