"Harassment At Workplace"
साक्षेपी संपादक व लेखक अरुण टिकेकर यांचे निधन झाले आहे. 'ऐसी'तर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे.
सोशल मिडियावर नेहमीच्या श्रद्धांजलीवजा प्रतिक्रियांबरोबर काही धक्कादायक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. त्यात प्रवीण बर्दापूरकर आणि धनंजय कर्णिक या दोन पूर्वाश्रमीच्या सहकार्यांच्या प्रतिक्रिया आहेत. सोशल मिडियावर जे नाहीत किंवा ज्यांनी हे वाचलं नाही त्यांच्याकरता दोन्ही प्रतिक्रिया इथे कॉपीपेस्ट करतो आहे.
--------------------------------------------------------
Dhananjay Vinayak Karnik :
गळे काढून झाले. उदोउदो करून झाला. डोळ्यात पाणी येत नसले तरी बळेबळे अश्रूही ढाळून झाले. त्यांनी पाडलेल्या पुस्तकांना अचानक साहित्यमूल्य प्राप्त करून देणारे लेखही लिहून झाले. परंतु जे लिहिले गेले नाही, बोलले गेले नाही ते म्हणजे तो एक अत्यंत हीन प्रवृत्तीचा, शिवाय चारित्र्यहीन माणूस होता. प्रथेनुसार मेलेल्या माणसाबद्दल वाईट लिहिता येत नाही. तो एक संकेत आहे. परंतु ज्या माणसाने पत्रकारितेतील अनेक संकेत पायदळी तुडवले,अनेकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केला त्याच्याबद्दल हा संकेत पाळण्यात औचित्य नाही. दिलेल्या बातमीचा सोर्स विचारून रिपोर्टरने ते सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांना तुम्ही ही बातमी कशी दिलीत असे विचारण्याचा थोर मूर्खपणा अंगी असणारा अरूण टिकेकर याच्यासारख्या संपादक पदासाठी लायक नसलेल्या माणसाबरोबर मी सात वर्षे काम केले. शेवटी संयमाच्या मर्यादा संपल्यामुळे मी राजीनामा दिला. त्याला माझ्याबद्दल वाईटसाइट बोलता आले नाही कारण माझ्या अंगावर लोकसत्तात काम करताना चिखलाचा एक शिंतोडाही मी उडू दिलेला नव्हता. परंतु कार्यालयात काम करणाऱ्या कारकून मुलीकडेही वाईट नजरेने पाहणाऱ्या या गलिच्छ माणसाच्या तावडीतून इतर कोणी सुटणे शक्यच नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात निरलसपणे किंवा मनात कोणताही हेतू न ठेवता एकही काम केले नाही. मी एका विद्वान माणसाच्या विरोधात बातम्या देत असे. त्या प्रशासकीय स्वरुपाच्या असत. मला त्या द्यायला टिकेकराने हरकत घेतली. मी विरुध्द बातम्या देणे बंद केले. त्या विद्वान माणसाचा विरोधक हा दलित होता. त्या विद्वान माणसाच्या विद्वत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. परंतु प्रकरण संपल्यानंतर टिकेकराने त्या विद्वान माणसाला त्यांचे पुस्तक आपल्याला अर्पण करण्यास सांगितले हे मला कळल्यानंतर टिकेकराच्या दळभद्रीपणाचा राग येण्याऐवजी मला किळस आली.
त्यांनी ज्या प्रकारे तानाजी कोलतेची ससेहोलपट केली, नागेश केसरीला, अरुण खोरेला किंवा मोरेंसह इतर अनेकांना अगतिक व्हायला भाग पाडले हे कुणीही लिहिणार नाही. गंमत अशी की प्रकाश कुळकर्णीसारख्या कष्ट करणाऱ्या संपादकाला त्यांनी ज्या प्रकारे हीन पातळीवर नेऊन लोकसत्तातून बाहेर पडायला भाग पाडले तेच त्यांच्या प्रेतावर अश्रु ढाळायला गेले. चार लोकांत दाखवण्यासाठी हे सारे करीत रहातात काही लोक. सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्याचे तंत्र टिकेकराने एवढे विकसित केलेले होते की पत्रकारितेत करियर करण्याच्या हेतूने कष्ट करणाऱ्या एखाद्याला ते जेव्हा, काय रे, नागपूरला जायचे आहे का- असे विचारत तेव्हा तो बापडा भांबावून जात असे. बदलीचे शस्त्र वापरून अनेकांचे कणे मोडायचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. ते मेल्यामुळे अनेकांना दुःखही वाटले नाही, नसेल. सहसा कुणाच्या बाबतीत असे होत नाही. त्यांच्या कुटुंबियांना दुःख झाले असेल. परंतु त्यांच्या जवळ किंवा बरोबर काम करणारे अनेकजण आपल्याला हळहळ वाटली असे खोटे खोटेच दाखवत होते हे निश्चित.
लिहिण्यासारखे बरेच आहे. सध्या एवढेच.
--------------------------------------------------------
Praveen Bardapurkar:
यांच्या या पोस्टवर माझी प्रतिक्रिया- धनंजय , बरोब्बर लिहिलंयस तू . एकिकडे प्रयोगशील , विद्वान संपादक मात्र दुसरीकडे खुज्या उंचीचा आणि किरट्या वृत्तीचा असं त्यांचं दुहेरी-दुभंग व्यक्तिमत्व होतं...स्तुतीप्रियता ही देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाची आणखी बाजू होती आणि ती तशी स्तुती करणारांना त्यांनी कायम उत्तेजन दिलं . ते स्वत:ला स्पष्टवक्ता म्हणवून घेत पण, समोरच्याचा स्पष्टवक्तेपणा पूर्णपणे अमान्य असाणारा हा बॉस होता . त्यांच्या दुसऱ्या दुखऱ्या व्यक्तिमत्वाचे अनेक बळी आहेत हेही खरं आहेच . अरुण खोरेचा तू उल्लेख केलास म्हणून; त्याची कशी फरपट केली टिकेकरांनी आणि अखेर त्याला मी माझ्या मनोरातील रुममध्ये कसा राहण्यासाठी घेऊन गेलो हे तुला तर चांगलंंच ठाऊक आहे! संपादक म्हणून मला अनुभवायला मिळालेले माधव गडकरी , कुमार केतकर , सुरेश द्वादशीवार आणि अरुण टिकेकर ही मी लिहिलेली या चार संपादकांची वर्किंग पोर्ट्रेट प्रकाशित झाली तेव्हा टिकेकर यांनी व्यक्त केलेला संताप त्यांचं बुटकेपण दाखवून देणारा होता आणि तेव्हापासून त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलेलं होतं . काल फक्त चांगलच बोलणं मला तरी शक्य नव्हतं आणि वाईट बोलणं शिष्टाचाराला धरून झालं नसतं म्हणून मी कोठेही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही...असो !
-------------------------------------------------
यावर प्रस्तुत धागाकर्त्याला सुचलेले विचार :
अरुण टिकेकर गेल्यानंतर त्यांचं एका विशिष्ट संदर्भातलं पडद्यामागचं रूप बाहेर आल्यानंतर काही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या. थोड्या नव्याने कळल्या.
- विद्वत्ता/व्यासंग आणि व्यक्तिगत स्वार्थ, शोषण करण्याची वृत्ती, सूडबुद्धीने, क्रौर्याने वागणं या गोष्टी एकाच वेळी अस्तित्त्वात असू शकतात. पहिली गोष्ट आहे म्हणून दुसर्या प्रकारचा भीषण गोष्टी नसतील हे मानणं चुकीचं.
- गेल्या पंधराएक वर्षांत मी परदेशात जेव्हढ्या नोकर्या केल्या त्यातल्या बहुतेक ठिकाणी "Sexual Harassment At Workplace" या विषयावरचं ट्रेनिंग हे पहिल्या महिन्यात पूर्ण करायलाच हवं अशी अट होती. यात Sexual Harassment म्हणजे काय, त्यात काय काय येतं, ते कसं थांबवायचं, ते झालं तर उपाययोजना काय , ह्युमन रीसोर्स खात्याकडे ते रीपोर्ट कसं करायचं याची इत्थंभूत माहिती होती. भारतातल्या किती कॉर्पोरेट कंपन्या/संस्थांमधे हे होतं ते माहिती नाही. माझ्या अल्प समजुतीप्रमाणे, प्रगत देशातल्या कारखान्यांमधेही हे ट्रेनिंग होतं. (म्हणजे केवळ कॉर्पोरेट ऑफिसेसमधेच होतं असं नाही. )
- एकंदर भारतीय उपखंडामधे आर्थिक प्रगती नेत्रदीपक वेगाने होत असली तरी सामाजिक बदलांचा वेग त्याहून बर्यापैकी कमी असल्यामुळे एकाच वेळी अद्ययावत स्वरूपाचं काम परंतु कामाच्या ठिकाणी जुन्या पद्धतीत अस्तित्त्वात असलेले काही धोके अजूनही असणं अशी स्थिती दिसते.
- ज्यांनी टिकेकरांबद्दलचं हे सत्य उघडकीस आणलं त्यांनी त्याबद्दल आधीही लिहिलं होतं. मात्र सोशल मिडियाच्या अभूतपूर्व प्रसारामुळे ते आता कितीतरी अधिक लोकांना जवळजवळ एकसमयावच्छेदेकरून कळलं.
- टिकेकरांबद्दल माझं नक्कीच प्रबोधन यातून झालं. अशा "एक्स्पोझे" स्वरूपी लिखाणामुळे इतरही भूमीगत असलेली, कार्पेटखाले ढकलली गेलेली घाण बाहेर येवो. मात्र ती बाहेर येण्याकरता संबंधित व्यक्ती मरण्याची वाट बघायला न लागो.
Taxonomy upgrade extras
अरुण टीकेकरांविषयी केलेलं
अरुण टीकेकरांविषयी केलेलं लेखन तत्कालिक असलं तरीही नोकरीच्या वातावरणात होणारं लैंगिक शोषण, किंवा किमान पातळीवर लैंगिक भानाचा अभाव हा कायमचाच विषय आहे. मात्र गेल्या काही दशकांत सुसंस्कृत स्त्रिया पांढरपेशी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भाग घ्यायला लागल्यापासून त्याविषयी काही पावलं उचलण्याचा प्रयत्न जगभर चालू आहे. अगदी ऐशीच्या दशकापर्यंत अमेरिकेतलं सामान्य कंपन्यांमधलं वातावरण हे चांगलंच पुरुषप्रधान होतं. एखाद्या कंपनीच्या मोठ्या वार्षिक पार्टीला स्ट्रीपर्स बोलवून नाचवणं हे सर्रास व्हायचं. त्याआधी तीसेक वर्षं स्त्रियांचं प्रमाण वाढत होतं, तरीही त्या काळी निर्णय घेण्याच्या जागी फारच थोड्या स्त्रिया होत्या. हे प्रमाण जसजसं वाढलं तसतसं 'हा थिल्लरपणा थांबवला पाहिजे' असं लोकमत होऊन काही कायदे झाले. त्यांमुळे सर्व कंपन्यांत अशा प्रकारचं ट्रेनिंग, कोणी मर्यादा उल्लंघन करत असेल तर त्याबद्दल तक्रार करण्याची सोय वगैरे गोष्टी आल्या.
भारतात असे कायदे कितपत आहेत, ते किती प्रमाणावर पाळले जातात याबाबत मला कल्पना नाही.
नव्या कंपन्यांमध्ये आहेत
इन्फोसिसचे फणीश मूर्ती प्रकरण घडल्यापासून बहुतेक सगळ्या आयटी, फार्मा, बीपीओ कंपन्यांमध्ये हा प्रकार खूपच गांभीर्याने घेतला जातो. वारंवार आठवण करुन दिली जाते. अगदी कामाचा खोळंबा झाला तरी चालेल पण त्यात हलगर्जी खपवून घेतली जात नाही. प्रसूतीपूर्व रजा या धाग्यावर मी त्याबाबत लिहिले होते. म्यानुफॅक्चरिंग वगैरेंमध्ये तसाही स्त्रीकर्मचारीवर्ग कमीच आहे. इतर क्षेत्रांत (शिक्षण, ब्यांका वगैरे) मात्र कल्पना नाही.
ह्या लेखाचा हेतु काय?
ह्या लेखामागचा नक्की हेतु काय आहे हे मला आणि अन्य वाचकांना कळल्यास बरे होईल.
शीर्षकावरून तर्क बांधला तर 'कार्यालयांमधील वा अन्य कार्यस्थळांमधील लैंगिक शोषण' हा विषय असावा असे वाटते. पूर्ण लेखामध्ये मात्र अरुण टिकेकर ह्या व्यक्तीविषय दोन जणांची - त्यांच्या अनुभवांवरून बनलेली - प्रतिकूल मते हीच दिसतात आणि त्यांमध्ये एका ठिकाणी अरुण टिकेकरांची कार्यालयातील मुलींकडे बघण्याची दृष्टि चांगली नव्हती असे चार शब्दांमध्ये सूचित केले आहे. तेवढेच निमित्त वापरून "Harassment At Workplace" असे शीर्षक देण्यात आले आहे.
"Harassment At Workplace" हा विषय चर्चायोग्य नक्की आहे पण त्यासाठी अरुण टिकेकरांविषयीचे दोन व्यक्तींनी लिहिलेले post mortem मतप्रदर्शन हे कारण करायची आवश्यकता दिसत नाही. "Harassment At Workplace" हा विषय स्वतःच्या पायावर उभा राहण्याइतपत सकस निश्चित आहे.
ह्या दोन व्यक्तींचे टिकेकरांबद्दलचे मत कलुषित आहे हे दिसतेच आहे. टिकेकरांविषयी अकलुषित मते असणारेहि कोणी असू शकतील. सर्वासाधारणपणे कोणाहि - विशेषतः सार्वजनिक चेहरा असलेल्या कोणाहि - व्यक्तीबद्दल 'बाजूने आणि विरुद्ध' अशी दोन्ही मते असू शकतात. टिकेकरांबद्दल त्यांपैकी दोन 'विरुद्ध' मते उचलून टिकेकरांच्या निधनाबद्दल लगेच प्रकाशित करणे आणि तेहि Harassment At Workplace ह्या अवगुंठनाखाली हे अनौचित्यपूर्ण आहे असे माझे मत नमूद करतो.
(वैयक्तिक खुलासा - माझा अरुण टिकेकरांशी वैयक्तिक परिचय अजिबात नव्हता आणि त्यांच्या प्रकाशित लिखाणापलीकडे त्यांची मला काहीहि माहिती नाही. श्री.रा. टिकेकरांचे ते कोण ही उत्सुकता मात्र आहे.)
प्रस्तुत संदर्भातल्या गोष्टी
प्रस्तुत संदर्भातल्या गोष्टी वाचताना "टेहेलका"ची आठवण येणं अपरिहार्य होतं. शोधपत्रकारिता आणि नावातच "टेहेलका" मचवण्याचं काम करणार्या, आदरास पात्र बनलेल्या नियतकालिकाच्या सर्वोच्चपदावरच्या व्यक्तीनेच Sexual Harassment करावी. यातली विसंगती आणि ते वाचताना आलेलं नैराश्य याची आठवण आली.
असांज
ज्युलियन असांजही:
http://www.bbc.com/news/world-europe-11949341
- गेल्या पंधराएक वर्षांत मी
- गेल्या पंधराएक वर्षांत मी परदेशात जेव्हढ्या नोकर्या केल्या त्यातल्या बहुतेक ठिकाणी "Sexual Harassment At Workplace" या विषयावरचं ट्रेनिंग हे पहिल्या महिन्यात पूर्ण करायलाच हवं अशी अट होती. यात Sexual Harassment म्हणजे काय, त्यात काय काय येतं, ते कसं थांबवायचं, ते झालं तर उपाययोजना काय , ह्युमन रीसोर्स खात्याकडे ते रीपोर्ट कसं करायचं याची इत्थंभूत माहिती होती. भारतातल्या किती कॉर्पोरेट कंपन्या/संस्थांमधे हे होतं ते माहिती नाही. माझ्या अल्प समजुतीप्रमाणे, प्रगत देशातल्या कारखान्यांमधेही हे ट्रेनिंग होतं. (म्हणजे केवळ कॉर्पोरेट ऑफिसेसमधेच होतं असं नाही. )
मुद्दा ठीक आहे.
Sexual Harassment चे ट्रेनिंग प्रत्येक व्यक्तीस १८ वर्षाची होताना घ्यायला लावावे. एम्प्लॉयर चा Sexual Harassment मधे सहभाग नसेल तर एम्प्लॉयर ला नुकसानभरपाई द्यायला लावणे चूक आहे. तेव्हा Sexual Harassment At Workplace साठी एम्प्लॉयर ला प्रत्येकवेळी जबाबदार धरले जाऊ नये. मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना. तसेच एम्प्लॉयर नही सिखाता Sexual Harassment करना. Sexual Harassment घरात सुद्धा होऊ शकते. मग काय कुटुंबाला जबाबदार धरणार ? कुटुंब हे सुद्धा ऑर्गनायझेशनच आहे की. कॉर्पोरेट कंपनी म्हंटलं की लादा त्यांच्यावर जबाबदार्या असं का ?? राजकीय पक्षांच्या** कार्यकर्त्यांचे काय ?? द्रौपदी काय अन कल्पना फुलबांधे काय !!! Sexual Harassment करणार्या व्यक्तीस (मग ती भाऊ असो वा पिता, बॉस असो, कंपनी मालक असो, सहकर्मचारी असो वा हाताखालची असो वा आमदार, खासदार, पक्षाध्यक्ष, पक्षप्रतोद ) जबाबदार धरले जावे.
** मनसे च्या दोन तिन कार्यकर्त्यांवर बलात्काराचे आरोप झालेले होते तेव्हा राज ठाकरेंनी "बलात्कार करा असा पक्षादेश काढलेला नाही" असे उत्तर दिलेले होते. (बलात्कार व Sexual Harassment या भिन्न गोष्टी आहेत हे बहुतेकांना माहीती आहे.)
( गब्बर ने बसंती चे केले होते ते Harassment नव्हते तर काय होते ? )
गब्बरची बदनामी थांबवा !!!!
कुणाला कशाचं अन् गब्बरला भांडवलदारांचं !!!
-------------------------
अवांतर: गब्बरसिंग याने बसंतीची सेक्शुअल हॅरॅसमेंट केली नव्हती. केवळ तिच्या नृत्यकलेचा आविष्कार करण्यास सांगितले होते. शिवाय त्याचा मोबदला म्हणून तिच्या प्रियकराला तो जिवंतसुद्धा ठेवणार होता.
"नको ठेवू वीरूला जिवंत पण मी मुळीच नाचणार नाही" असे बाणेदारपणे सांगू शकली असती !!!
-'थ'वी बाजू
आमच्याकडे दरवर्षी हे ट्रेनिंग
आमच्याकडे (भारतीय कंपनीत) दरवर्षी हे ट्रेनिंग आवश्यक असते. याबाब्त तक्रार करण्यासाठी स्वतंत्र सोयही आहे.
युपीएच्या शेवटाल्या काळात झालेल्या कायद्यानुसार प्रत्येक खाजगीकंपनीला आता अशी (अश्या तक्रारींची त्वरीत दखल घेणारी) समिती असणं बंधनकारक आहे.
सद्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केल्याच्याही बातम्या दरम्यान वाचनात आल्या.
अमेरिका व पाश्चात्यांपेक्षा सदर भारतीय कायदा अधिक मानवी (ह्युमन) आणि 'शहाणा' आहे असे अनेकांचे मत आहे. (यातही खाली राहि यांनी दिलेल्या तृटी आहेत हे मान्यच!)
(मला व्यक्तिशः अनेक अमेरिकन कायदे क्रूर (आणि इन्ह्युमन) वाटतात. पण तो सांस्कृतिक जडणघडणीचा फरक असावा. तेथील लोकांना अर्थातच तसे वाटणार नाही.)
विद्वत्ता/व्यासंग आणि
विद्वत्ता/व्यासंग आणि व्यक्तिगत स्वार्थ, शोषण करण्याची वृत्ती, सूडबुद्धीने, क्रौर्याने वागणं या गोष्टी एकाच वेळी अस्तित्त्वात असू शकतात. पहिली गोष्ट आहे म्हणून दुसर्या प्रकारचा भीषण गोष्टी नसतील हे मानणं चुकीचं.
सहमत
... आणि लैंगीक शोषणाचा प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण देता येते , तसेच त्या संदर्भात नियम कायदे आहेत.
लेखात एक उल्लेख आला आहे -- की त्यांनी अपमान करण्याची एक पद्धत विकसित केली होती . असे शोषण जास्तं जहरी आणि मानसिक खच्चीकरण करणारे असते असे वाटते.
कामाच्या ठिकाणी आणि इतरही काही प्रसंगात अनेक प्रकारे शोषण होते, ज्याचे दुरागामी परिणाम होऊ शकतात.
जसे ---
१) लहानसहान चुकांची सतत जाहीर वाच्यता करणे .
२) एखाद्याच्या लकबीची, रहाणीमानाची, पद्धतींची अथवा सवईंची सतत टिंगल टवाळी करणे.
३) कुणाच्या खाजगी आयुष्यातील खर्याखोट्या आणि बर्याच वेळा ऐकीव बाबींचा सतत उल्लेख करणे.
४) प्रत्येक कामात चुका काढुन तुला सुधारायला पुष्कळ प्रयत्न करावे लागतील असे सतत बोलणे.
५) एखाद्या चुकलेल्या, फसलेल्या कामाची सतत वेळोवेळी आठवण करून देणे .
६) " मी सांगतो/ सांगते त्याच पद्धतीने " काम व्हायला पाहिजे असा आग्रह धरणे.
७) मर्जी विरूद्ध वागणार्याची इतरांकडे तक्रार करणे, खरे खोटे अनुभव ऐकवून बदनामी करणे.
८) आपले काम/ जबाबदारी दुसर्यावर ढकलून त्याचे श्रेय, मोबदला स्वतः लाटणे.
९) मर्जीत असलेल्यांच्या चूकांकडे सपशेल काणाडोळा करून , गैरमर्जीतील लोकांवर टीकेची झोड उठवणे.
अशा अनंत प्रकाराने शोषण केले जाते, जे नियम, कायद्याच्या चौकटीत सिद्ध करता येत नाही.
आणि अशा शोषणाचा प्रतिकार करण्याचा मार्ग शोषितालाच शोधावा लागतो, अन्यथा शोषणाचा बळी व्हायला लागतं .
लैंगिक छळाविरोधीचा कायदा
या धाग्यावर लैंगिक छळाविरोधी कायद्याची चर्चा करणं कितपत उचित आहे, ठाऊक नाही, तरी मुद्दा आलाच आहे चर्चेत म्हणून लिहिते. मी जिथे काम करते, तिथल्या 'लैंगिक छळ-विरोधी तक्रार समिती'त काही काळ मी काम केलं असल्याने या विषयाची थोडीफार माहिती झाली:
* विशाखा केस म्हणून जी प्रसिद्ध आहे, तिचा निकाल देताना (१९९७) सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या जागी होणार्या लैंगिक छळाविरोधी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यांना 'विशाखा गाइडलाइन्स' म्हणतात. २०१३ झाली The Sexual Harassment of Women at Workplace (Prevention, Prohibition and Redresssal) Act पास झाला.
* या कायद्यात फक्त पुरुष फक्त स्त्रियांचा लैंगिक छळ करत असतील असे गृहीत धरलेले दिसते. (आमच्या संस्थेत पुरुषाने पुरुषाचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आली होती. या कायद्याच्या चौकटीत ती केस बसवताना पंचाईत झाली.)
* या कायद्यानुसार 'कामाची जागा' म्हणजे कुठल्याही सरकारी, खाजगी संस्थेचा परिसर, अगदी हॉस्पिटले, खेळण्याच्या जागा, संस्थेचे काम करण्यासाठी कर्मचार्याला जिथे म्हणून जावे लागेल ती जागा. दुसर्यांच्या घरी काम करणार्या बायकांसंदर्भात घर हीसुद्धा 'कामाची जागा' मानली जाते.
* 'कामाच्या जागी झालेला कोणत्याही स्त्रीचा लैंगिक छळ' या कायद्याच्या अंतर्गत येतो. ती स्त्री तिथली कर्मचारीच असली पाहिजे असं काही नाही. (याचा आमच्या संस्थेला - म्हणजे शैक्षणिक संस्थेला जाणवलेला एक फायदा म्हणजे विद्यार्थिनींनाही या कायद्याने संरक्षण (हे लाक्षणिक अर्थाने घ्यावे) मिळते.)
* या कायद्यानुसार प्रत्येक एम्प्लॉयरला अंतर्गत/स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन करावी लागते (हे खाजगी-सरकारी दोन्ही क्षेत्रातल्या अनेकांना फार कटकटीचं वाटतं. कारण पूर्ण संस्थेची एक समिती असून चालत नाही. जिथे जिथे म्हणून त्यांच्या शाखा वगैरे असतील तिथे प्रत्येकी एक समिती.)
* एम्प्लॉयरची जाबाबदारी नुसती समिती स्थापून संपत नाही. त्यांनी आपल्या कर्मचार्यांना या बाबतीत संवेदनशील बनवण्यासाठी नियमित अंतराने वेगवेगळे कार्यक्रम, कार्यशाळा आयोजित करणेही, शिवाय लैंगिक छळ म्हणजे काय, तो केल्यास काय (शिक्षा) होईल वगैरे गोष्टी प्रदर्शित करणे अपेक्षित आहे. (आमच्यासारख्या शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं असतं. मी जिथे शिकत होते, तिथली समिती 'छळाची तक्रार झाल्यावर ती निवारण करणारी समिती' असं आपलं मुख्य स्वरूप नसून मुळात छळच होऊ नये अशी मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न करायला हवेत असं मानणारी होती. स्त्रियांना काम करायला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्यात ही समिती अनेक अंशांनी यशस्वी झाली होती. आणि या कायद्याचा मुख्य उद्देश तोच आहे.)
* आता सगळ्यात महत्त्वाचं: लैंगिक छळ म्हणजे काय? शारीरिक लगट करणे, लैंगिक संबंधांची मागणी किंवा विनंती करणे, लैंगिक शेरेबाजी करणे, पोर्नोग्राफी दाखवणे, इतर कुठलेही नकोसे (अनवेलकम) वाटणारे - शारीरिक, शाब्दिक किंवा सांकेतिक (नॉन-व्हर्बल) लैंगिक वर्तन, यापैकी कुठल्याही प्रकारचे 'अनवेलकम बिहेविअर'. (अवांछनीय वर्तन असं लिहिणार होते, पण ते वाचून मीच घाबरले.)
* लैंगिक संबंधांच्या बदल्यात खास (चांगली) वागणूक देण्याचे वचन देणे, किंवा संबंध न ठेवल्यास वईट वागणूक मिळेल/ सध्याच्या किंवा भविष्यातल्या नोकरीवर परिणाम होतील अशी धमकी देणे; कामात लुडबूड करून भीतिदायक, त्रासदायक, कामाला प्रतिकूल असे वातावरण निर्माण करणे; स्त्रीच्या आरोग्यावर/ सुरक्षिततेवर विपरित परिणाम होईल अशा प्रकारे पाणउतारा करणे याचाही समावेश 'लैंगिक छळात’ होतो.
"डिस्क्लोजर" सिनेमा
>> या कायद्यात फक्त पुरुष फक्त स्त्रियांचा लैंगिक छळ करत असतील असे गृहीत धरलेले दिसते. (आमच्या संस्थेत पुरुषाने पुरुषाचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आली होती. या कायद्याच्या चौकटीत ती केस बसवताना पंचाईत झाली.)
या संदर्भात १९९४ साली आलेला "डिस्क्लोजर" नावाचा सिनेमा आठवला. मायकेल डग्लसच्या पात्राचं लैंगिक शोषण त्याच्या बॉसच्या भूमिकेतलं डेमी मूरचं पात्र करतं याबद्दलचं नाट्य.
डिस्क्लोजर सिनेमाचं ट्रेलर : https://www.youtube.com/watch?v=RwvzXAKyQcs
अनौचित्यपूर्ण आणि भ्याड गरळ
विषय जर हरासमेंट असेल तर टिकेकरांवरीन उसनी टिका (ते गेल्यानंतर) इथे देण्याचं औचित्य समजलं नाही.
---
धाग्यातील दोन तथाकथित पत्रकारांच्या प्रतिक्रियांबद्दलः
जर इतकंच होतं तर ते असताना लिहिलं असतं तर काही अर्थ होता. आता काय कोणी काहीही लिहेल! समोरच्याला (टिकेकरांना) प्रतिवादाची संधीच नाही.
याला अनौचित्यपूर्ण आणि भ्याड गरळ म्हणावे लागेल
तो गुन्हेगार असल्याचा आरोप
तो गुन्हेगार असल्याचा आरोप (नि काही वेळा सिद्धताही) तो जिवंत असताना केली जाते. (फुलनदेवीवर खटलाही ती जिवंत असताना चाला. आरोप तर नक्कीच तेव्हा केला गेला) ती व्यक्ती हयात असताना मुग गिळून गप्प बसायचं नि मेल्यावर गावभर बोंबलत फिरायचं याला आत्मप्रसिद्धी करणे/बोभाटा इतकेच म्हणतात. जर हे सत्य होते तर ते हयात असतानाच बोलला असतात तर ते 'फेअर' ठरलं असतं. त्यामुळे ही "भ्याड" गरळ आहे असे माझे म्हणणे आहे.
बापरे
हे जबरा आहे. भीडभाड न बाळगता या पत्रकारांनी लिहिले हे खूपच छान. स्टीव जॉब्स गेल्यावर तो किती पिळवणूक करणारा माणूस होता याबाबतची (त्याच्या) काही सहकाऱ्यांची मते वाचली होती. ती आठवली. इथे तर सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे फारच हीन प्रवृत्ती. अरारारा... हे वाचून टिकेकरांबाबतचा आदर अगदी रसाताळाला गेला.