बागकामप्रेमी ऐसीकर २०१५: धागा ८

आमच्या भेंडीला पहिलं अपत्य झालं Smile
(फोटो लवकरच)

फायनली एकतरी फळभाजी कुंडीत फळली म्हणायची! नैतर आजवर मिरची, टोमॅटो, पावटे वगैरे फुलांपर्यंत पोचले नी मग पुढे सरकलेच नाहीत Sad

पालेभाज्या मात्र झ्याक येतात ट्रेमध्ये

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पार्टी!!! कधी नि कुठे येऊ? हवं तर बाळंतविडा घेऊन येते! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कलकत्ता जातीचा विडाच लागतो हो आम्हाला! Tongue

कोणाकडून कलकत्ता विड्याच्या पानांचं झाड मिळेल काय? १-२ नर्सरीत चवकशी केली तर त्यांना असं काही असतं हेच माहित नव्हतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चंदन नावाच्या ब्रँडखाली कलकत्ता पानाचे कुटलेले विडे तयार, व्यवस्थित पॅकिंगचे मिळतात. सर्वत्र मिळत असावेत. १८० रुपयांत १५ पॅक असतात. गोडाच्या बरोबरीने किंचित तिखट, मिरमिरीत चव असते. चुना असणार. बाकी गोडपणासाठी बडीशेप, थंडक, गुलकंद वगैरे किंवा यासमान नेहमीचे जिन्नस असतात. विड्याची तलफ कुटलेल्या पानावर भागायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋ, मलाही माझी झाडं तितकीशी लाभताहेत असं काही वाटत नाही. फुलं दोन-तीन महिन्यातून एकदाच येतात आणि बाकी वेळ मी त्यांचा फक्त पाणक्या झालेय . माझ्याकडे शेवंती, जुई, बटन गुलाब आणि चार पाकळ्यांच्या फुलाच्या गुच्छाचे , अशी एकूण चार झाडं आहेत. जुई आणि त्या चार पाकळ्याच्या झाडाला दोन महिन्यांपासून साधी एक कळीही दिसत नाहीय. रोपटी हिरवीगार आहेत हेच काय ते सुख. शेवंतीच्या कळ्यांची फुलं होण्याची गेले दोन आठवडे वाट पाहातेय, आणि गुलाबाला एकदाच्या कळ्या आल्या आहेत.

बादवे, मी दिवाळीत चार दिवस घरी नसताना एक प्रयोग केला. कुंडीत बाटली उलटी खूपसून त्यातलं पाणी आपण घरी नसताना झाडाला मिळावं, हे काही नीट साधलं नव्हतं. मग कुठेतरी केशाकर्षक पद्धतीने असं पाणी देण्याच्या सोयीबद्दल वाचलं होतं. त्यानुसार एका बादलीत पाणी घेऊन , कापडाच्या हलक्याशा ओल्या पट्ट्यांचे एक टोक बादलीच्या तळाशी आणि एक टोक कुंडीत झाडाच्या बुडाशी येईल असं ठेवून गेले होते. बादली कुंड्यांपेक्षा खालच्या पातळीवर होती. शेवंतीला जरा पाणी कमी पडलं की लगेच कोमेजते म्हणून शेजारणीकडे दिली होती. राहिलेल्या तीन झाडांनी मिळून एक लहानशी बादली पाणी बुधवार ते रविवार सकाळपर्यंत संपवलं होतं. आल्यानंतर पाहिलं तर माती हलकीशी ओलसर होती. आता कुठेही गेले तर झाडांची चिंता नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

#कोणाकडून कलकत्ता विड्याच्या पानांचं झाड मिळेल काय?--बनारसी पान. ते कोणाकडे नसतं.खरं म्हणजे बिहारमधून येतात. गाळाच्या जमीनीत वाढते. इकडे एक मघइ प्रकार आहे तो फारच कॅामन आहे.तो नाही।. # फुलं नाहीत/मस्त कलंदर.- -
झाडाची पिशवी मातीच्या गादीवर ठेवा. कुंडी प्लास्टीकची आहे/ असेल तर ती मातीवर बसवा.खाली बाहेर मुळं वाढतील.पांढरी केशमुळं आली की फुलं येतात. सदाफुलीवर प्रयोग करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार!
हल्ली पानपट्टीवर अतिशय गचाळ पणे बांधलेली नी कसल्याशा रसात बुडबून देणारी तयार पानेच मिळातात. नवे/ताजे पान बांधायला फार कमी पानवाले उत्सुक असतात. त्यातल्या अर्ध्यांहून अधिकांना ते छानसे बांधताही येत नाही.

==

गाळाच्या जमिनीतील ही नागवेल इथे उगवण्यासाठी काय करावे लागेल. मुंबईत कलकत्ता/बनारसी पान हमखास मिळणारे काही पानवाले माहित होते.
इथे पुण्यात सगळाच नशीबाचा मामला Sad मासे असोत नाहितर पान.. चांगल्या गोष्टींचं वाकडं दिसतंय इथे Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

#गाळाच्या जमिनीतील ही नागवेल इथे उगवण्यासाठी काय करावे लागेल?--
फार सहज वाढते नागवेल कारण याच्या प्रत्येक पानाच्या बेचक्यात मुळं फुटतात.त्या मुळांनी पसरत जाते शिवाय खडबडीत भिंतीवरही चढते.ओलावा कायम हवा परंतू मुळांशी पाणी तुंबायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

औषधी रोपं असावीत म्हणून २-३ दिवस झाले शूर्पणखा, सर्पगंधा, पांढरी व निळी गोकर्ण, मेंदी, राम-कृष्ण-रुक्मिणी तुळस यांच्या बिया टाकल्या आहेत. पांढरी,जांभळी व लाल सदाफुली, ओवा, पानफुटी यांची रोपं आणून लावली आहेत. हे सर्व ओळखींच्याकडून मागून आणलेलं आहे.. विकत काहीच आणावं लागलं नाही.

कडीपत्त्याचं झाड खूपच उंच वाढत चाललं होतं आणि त्याच्या फांद्या हुकाच्या काठीने खेचूनही हाताशी येईना झाल्या होत्या म्हणून मग एक-दोन फांद्या ठेवून बाकी सर्व फांद्या उतरवून घेतल्या. आता हाताशी येईल अशा बेताने डवरेल असं करणार आहोत. कटाई केल्यावर इतके दिवस डवरलेल्या झाडाच्या ठिकाणी ओकाबोका बुंधा बघून रडूच कोसळलं मला. कुर्‍हाडीचे घाव घालून कटाई करून घेतल्याबद्दल कडीपत्त्याच्या झाडाची माफी मागितली मी आणि 'तू पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक सुरेख डवरणार आहेस अशी मला पक्की खात्री आहे. आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तू अजिबात काळजी करू नकोस. तू आम्हाला सर्वांना खूपखूप हवा आहेस.' असं खूप काही बोलत असते अधनंमधनं मी त्याच्याशी. आता खूप सारे नवे कोवळे धुमार आलेत त्याला त्यामुळे खूप बरं वाटतंय. Smile घरातल्या-बाहेरच्या सर्वांना देऊनही भरपूर कडीपत्ता शिल्लक राहिला आहे, जो नीट धुवून, निवडून लायब्ररीच्या खोलीत पसरून ठेवला आहे. थोड्या दिवसांत कडकडीत सुकला की पूड करून ठेवू म्हणजे मसाल्यासोबत तोही सर्रास वापरता येईल स्वयंपाकात.

तुटलेल्या प्लॅस्टीक बास्केटमध्ये बटाटे लावलेत. बटाट्याच्या फक्त कोंब आलेला भाग कापून घेऊन तेवढाच लावला, बाकी बटाटा स्वयंपाकात वापरला. मस्त धुमारे आले आहेत. धुमार्‍यांचे वरचे शेंडे खुडून टाकले जेणेकरून वर वाढण्याऐवजी रोपाने त्याची शक्ती मुळं वाढवण्यावर एकवटावी.

कांदे-बटाट्यांचं प्लॅस्टीकचं रॅक तुटलं तर त्याचे कप्पे वेगळे करून आजच त्यात मेथ्या आणि धणे पेरले आहेत. सोलून फीजमध्ये ठेवलेल्या लसूणाला कोंब आलेत म्हणून तेही एका चुटुकल्या कुंडीत खोचून ठेवले आहेत.

अरे हो, एक राहिलंच की सांगायचं. आजच लाल वेल्वेट रंगाच्या जास्वंदाच्या फुलाचं मुद्दामहून परागसिंचन केलं. कालच यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ पाहिला होता - सोप्पं वाटलं.. केलं. फुलाच्या ठिकाणी खुणेसाठी एक सुतळीचा तुकडाही अडकवून ठेवला आहे. आता बघुया किती यश येतं ते. काल तो व्हिडिओ पाहण्याअगोदरपर्यंत मला अजिबात माहिती नव्हतं की जास्वंदाला बियाही येतात ते! कायम फांदीच लावायची माहिती त्यामुळे असेल कदाचित. नविन काहितरी केलंय आज.

बाकी पालेभाज्यांच्या (शेपू, आंबटचुका, पालक, वगैरे) उत्तम बिया कुठे मिळू शकतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरारा कढीलिंब तोडला? त्याच्या फुलांवर खूप फुलपाखरे ( ब्लु जे येतात ) नंतर लाल फळांसाठी कोकीळ ,हळद्या येतात.
पालेभाजी बाजारात आली की त्यात कधीकधी मुळंवाली जुडी येते ती स्वच्छ धुवून विरळ लावा.बी वगैरेसाठी त्यातलीच तीन चार झाडे पाला न काढता वाढवा.त्याचेच बी खाली पडून कायमची भाजी होते.चवळी,माठ,चुका इत्यादी.पालकाचं बी लावा अथवा वरीलप्रमाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजून काय नवीन?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भेंडी पाठोपाठ आमच्या टोमॅटोलाही बाळ झालंय..
मेघना, तुझ्या पुढल्या पुणेभेटीत बाळंतविडा नक्की आण हो! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भेंडी पाठोपाठ आमच्या टोमॅटोलाही बाळ झालंय..

चला बरं झालं!
आता ऐसीवरच्या बायकांच्या आड्यन्सला रडावायला तो टोमॅटो हिरवा असतांनाच तोडून त्याची भाजी करू नका! त्याला पि़कू द्यात!
हिरवा टोमॅटो तोडून, त्याची भाजी खाऊन, इथल्या बायकामाणसांना रडवून, ढेकर द्यायचा म्हणजे पाऽऽऽप बघा!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उन्हाळी पीक आवरलं. हिरवे टोमॅटो काढले, थंडीमुळे झाडांचं लक्षण बरं नव्हतं. किलोभर टोमॅटो शेवटी मिळाले. शेवटच्या चार (भोपळी) मिरच्याही बारक्या आहेत.

हिवाळी पिकासाठी वाफा चुकीच्या ठिकाणी लावला. तिथे घराची सावली येते. तो ख्रिसमसात हलवणार आहे. जाने-फेब्रु. साठी पुन्हा पिकं काढून बघायचा विचार आहे.

खतं-पाण्याबद्दल :
घराच्या जुन्या मालकांनी एक रेन बॅरल दिलंय. त्या पिंपात ६० गॅलन (गुणिले ३.७५ लिटर) पाणी मावतं. त्यातून पाणी जोरात येत नाही, पण पाइप झाडांत सोडून देते. दहा मिनिटं जोरदार पाऊस झाला तर पिंप भरतं. आॅस्टिन मनपा पिंप विकत घ्यायला थोडे पैसेही देते.

आवारातली दोन झाडं पानगळीला प्रतिसाद देणारी आहेत. काही पानं टाकून दिली. आता काळ्या, प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पानं भरली आहेत. कंपोस्टरात तेवढी जागा नाही. त्या पिशव्यांमध्येच कंपोस्ट करून बघायचा विचार आहे. दोन वर्षं लागली तर तेवढी वाट बघायची.

(रुची : होय, आम्ही डिसेंबरात पानं गोळा करतो. कालच घरासमोरच्या झाडाचा खराटा दिसायला लागला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"ब्लू लाँग" वांगं. तीन रोपांना भरपूर वांगी लागलीयेत. काल लांब-लांब बारीक काप करून हलकेच तळून "बेगुन-भाजा" खाल्लं.
blue

आदिवासी अमेरिकन लोक "तीन बहिणीं"ची शेती करत - कणीस, शेंगा आणि भोपळा (स्क्वॉश). तेच या मोठ्या पिशवीत करायचा प्रयत्न. थोडा फसला आहे बहुतेक, कारण भोपळा सर्वत्र फोफावून बाकीच्या झाडांवर सावली पाडतोय, आणि कणसाला फुलं फुटणार आहेत की नाही देव जाणे. पण भरपूर फरसबी मात्र लागलीय.

three

टोमॅटोंना फुलं पुष्कळ आहेत पण अजून फळ नाही. बटाटा का कोण जाणे, मध्येच मान टाकून मेला. पुन्हा लावलाय, पण फोटो दाखवण्याइतका नाही. बीट, राजगिरा, पालक, कोथिंबीर, मेथी वगैरे सगळे याच आठवड्यात पेरले, कारण आत्ताशी कुठे थोडं तापमान कमी होतंय इथे. थंडीच नाही मेली.

या वर्षी बरीच फुलझाडं लावलीयेत - झेंडू, पेटुनिया, पॅन्जी, मल्वा (रुचीकडून साभार!) कधी वाढून फुलं येतायत वाट बघतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टोमॅटोंना फुलं पुष्कळ आहेत पण अजून फळ नाही.

बहनाऽऽऽ ....
आमच्याकडेही ऊन तापायला लागलं की फळं धरत नाहीत. टोमॅटो धरण्यासाठी तापमान ३२ से च्या खाली असलं पाहिजे.

वांग्याच्या पायाशी पेंढा मल्च म्हणून घातलाय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो. वांगं त्याला लागून वाकायला लागलं म्हणून त्याला थोडं पसरलं. मल्च मुळे खूप फरक पडलाय. आता दर तिसर्‍या दिवशी पाणी घालावं लागतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्लू लॉन्ग वॉन्ग!! नाईस!! Smile
आमच्याकडे पण ही आली होती.
पण आम्ही फोटो काढायच्या आधीच कारभारणीने कापून इडलीबरोबरच्या सांबारात घातली....
चिलया बाळाच्या मातृवंशातली आहे ती!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रिसमस ट्रीची एक डॅाक्युमेंट्री पाहिली.छोटी झाडं पाच सात वर्षांची उपटून विकतात पण किंमत परवडणाय्रांसाठी अठरा वीस वर्षांची पाचसात मिटर्स उंचीची कापून विकतात.ते घरात एका स्टँडवर बसवायचे आणि नंतर फेकून द्यायचे.
इकडे वटपौर्णिमेला वडाच्या डहाळ्या तोडण्यावरून सात पिढ्यांचा उद्धार करतात पर्यावरणवाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नर्सरीत मुद्दाम कल्टिव्हेट (वाढवतात) करतात का? अघोरीच प्रकार आहे पण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून आता बर्‍याच समजूतदार लोकांनी प्लास्टिकपासून बनवलेले पण हुबेहूब दिसणारे ख्रिसमस ट्री लावायला सुरवात केली आहे.
ते अनेक वर्षे टिकतात आणि पुन्हापुन्हा वापरता येतात...
आमच्या घरचा ट्री आम्ही गेली ६-८ वर्षे वापरतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाबासकी!प्लास्टिकच्या झाडासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१
जर तेच झाड वर्षानुवर्षे वापरते जाते तर कचर्‍याचाही प्रश्न नाही. अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा त्या झाडाचा आज काढलेला फोटो. Smile

DSC_0660

पूर्वी कृत्रिम झाडं आणण्यात एक तोटा होता. खर्‍या पाईनच्या झाडांना एक प्रकारचा मंद सुगंध असतो. कृत्रिम झाड लावल्यावर तो मिळत नाही.
पण आता तो पाईनचा सुगंध देणार्‍या मेणबत्त्या निघाल्यात. त्या जाळल्या की तोच सुगंध घरभर दरवळतो.
मग झाडाला स्पर्श करेपर्यंत कळत देखील नाही की हे झाड कृत्रिम आहे ते!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो हाफिसातून दिसत नाहीये, त्यामुळे त्याबद्दल नंतर!
मात्र पाईनचा सुगंध मलाही आवडतो. आम्रिकेत असताना हाफिसात माझ्या क्युबच्या शेजारीच हे झाड असे. त्यानंतर तो वास पुन्हा मिळाला नव्हता
काही महिन्यांपलिकडेच इथे 'मोर' ने 'पाईन' च्या वासाचे "फिनाईल" आणले.. मोठ्या आशेने व आनंदात घेऊन आलो. पण छे! अगदीच भिकार वास निघाला. पाईनशी काहीच संबंध नसणारा! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर सुंदर Smile
मी लाल बो वालं Christmas wreath खिडकीत लावलय आणि दिव्यांच्या भरपूर माळा. या लोकांच्या सौंदर्यदृष्टीचा वाण नाही पण गुण लागला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

dw tv वर आहे व्हिडिओ. "in focus"मध्ये.
होय मुद्दाम वाढवतात नर्सरीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडाचा फोटो आणि सजावट आवडली.
हॅप्पी क्रिसमस तुम्हाला सर्वांना.

पाइनचा डिंक म्हणजेच राळ,पुर्वी सोल्डरिंग करताना वापरायचे.आणि तेल टर्पिंनटाइन.आता सजावटीच्या अवजड वस्तू पेलणारा ब्लू स्प्रूस वापरतात असं त्या कार्यक्रमात कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सजावटीचं श्रेय आमच्या फॅमिलीला! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0