कॅफे..
कॅफे या प्रकारच्या खाद्यगृहाचा एक स्वतःचा चाहता वर्ग आहे. नुसती कॉफी अन कुकीज मिळणार्या जागांपासून ते कॉफीचे शंभर प्रकार, सँडविच, पिज्झाचे चाळीस प्रकार आणि अगदी बियर, वाईन, कॉकटेल्स सर्व्ह करणार्या क्षुधाशांतिगृहांनाही कॅफे असं नाव दिलेलं दिसतं.
कॅफे आणि थीम रेस्टॉरंट या प्रकारात व्यावसायिक म्हणून नसला तरी ग्राहक म्हणून बराच अनुभव गाठीशी आहे. आपल्यातल्या अनेकांच्या असेल. आपलं स्वतःचंही एक कॅफे कॉलेजच्या कॉर्नरवर, बीचवर, मैदानाशेजारी किंवा कुठेतरी असावं अशी इच्छा अनेकांना असते. मला तरी नक्की अनेकदा अशी सुप्त इच्छा जाणवली आहे.
ते जाऊ दे. पण ग्राहक म्हणूनसुद्धा कॅफेचा जास्तीतजास्त उत्कृष्ट आणि लक्षात राहण्यासारखा, लाँग टर्म कस्टमरशिप तयार करणारा अनुभव बर्याच ठिकाणी येतो.. आणि त्याहून जास्त ठिकाणी कॅफेचे प्रयोग फसलेले दिसतात. काहीतरी नकोसं जाणवतं. अनुभवात मिठाचा खडा पडतो. चव हा सर्वात महत्वाचा मुद्दा हे सर्वच जाणतात. पण खरंच तसं असतं का? निव्वळ थंड साठवलेले रॅपरमधले पदार्थ देणारं मोठ्या ब्रँडचं कॅफे त्याच्या अँबियन्समुळे चांगलं चाललेलं दिसतं. आणि खूप खर्चिक थीम्स बनवूनही काही ठिकाणी
बसण्याची रचना, लोकेशन, पदार्थांचा चॉईस, सर्व्हिसला लागणारा वेळ, निवांतपणा, या सर्व गोष्टींचे आपल्या मनात आपोआप पॉईंट्स जमा होत राहतात.
आता माझे प्रश्न.. कॅफेमधे कोणत्या गोष्टी आपल्याला आवडतात? मी काही उदाहरणं देतो.
१. सेल्फ सर्विस की टेबल सर्विस?
२. फिक्स प्राईस बुफे की अ ला कार्टे
३. कस्टमायझेबल कॉफी, कस्टमायझेबल सँडविच की निवडक चारपाच चॉईस ?
या मुद्दा क्रमांक तीनबद्दल, दोन्ही बाजूचे लोक असतात. कोणता ब्रेड, कोणता साईझ, कोणती टॉपिंग्ज, कोणती सॉस हे सर्व आपल्या म्हणण्याप्रमाणे बनवून देणारे कॅफेवाले काहीजणांना खास वाटतात. इतर काहीजणांना "आम्हाला काही कळत नाही, आम्हाला भूक लागली आहे.. कॅफेवाला भुकेचा एक्सपर्ट आहे असं समजून आम्ही त्याच्याकडून अशी अपेक्षा करतो की त्यानेच बेस्ट कॉम्बिनेशन असलेली दोनतीन निवडक सँडविच स्वतःहूनच झटपट बनवून द्यावीत. तेच कॉफीचं.. बाबा रे.. तुझ्याकडे आम्ही आलोय ते चांगली कॉफी प्यायला. त्यात अरेबिक बिया घालू की जावा, साखर किती घालू, दूध किती घालू हे सर्व मीच सांगायचं असेल तर मग मीच बनवून घेतो कॉफी..
याउलट कस्टमायझेशन ऑप्शन्स आवडणारेही लोक असतात.
४. कस्टमायझेबल ऑर्डर्सः
काही कॅफेंमधे अमुकमधे तमुक अॅड करा आणि मील कॉम्बो बनवा.. इतके रुपये अॅड करुन ड्रिंक आणि चिप्स मिळवा.. वगैरे अश्या ऑफर्स कम कॉम्प्लिकेशन्स असतात. बर्याचदा काहीजणांना (रीडः मला) ऑर्डर देऊन झाल्यावर सरबरल्यागत फीलिंग येतं. शेवटी काउंटर बॉय जी रक्कम सांगेल ती निमूट टिकवून आपल्या ट्रेत काय येतंय याची वाट पाहात बसावं लागतं.
५. बसण्याची जागा सोफे, कॉफी टेबल्सवाली.. नुसती उंच बार स्टूल्स असलेली.. निवांत आरामात लॅपटॉप किंवा पेपर उघडून कितीही वेळ बसा..असा माहोल करणारी किंवा मग उभ्याउभ्या चटचट खा आणि कटा असा अविर्भाव रचनेतून दाखवणारी.. अशी अनेक रचनांची कॅफे असतात.
६. नेहमी एकच मेन्यू ठेवणारी.. दिवसाला मेन्यू बदलणारी.. एकदाच पदार्थ बनवून ठेवणारी अन संपले की संपले असे सांगणारी.. प्रत्येक पदार्थ ऑर्डर आल्यावर गरम बनवून सर्व्ह करणारी..
७. एकाच पदार्थाला वाहिलेली.. सर्व पदार्थ मक्याचेच.. किंवा नुसते पंचवीस प्रकारचे पराठेच फक्त.. किंवा नुसते केक्स अन बेकरी पदार्थच फक्त... अंडे एके अंडे..
८. लॉयल्टी स्कीम्स देणारे.. पुढच्या वेळी याल तेव्हा अमुक डिस्काउंट.. हॅपी अवर्सवाले... इत्यादि..
अशा अनेक पद्धतीची कॅफे अन थीम रेस्टॉरंट्स असतात.
व्यक्ती तितक्या प्रकृती हे खरंच.. पण कॅफेच्या मालकांना आपण ग्राहक म्हणून काय सूचना करु शकतो.. ? आदर्श कॅफेची लक्षणं असा एक मसावि की लसावि काय शिंचा म्हणतात तो काढता येईल का?
आपल्याला कोणकोणते गुण अपील होतात आणि कोणते रिपल्सिव वाटतात? कोणत्या गुणांमुळे पुन्हापुन्हा जावंसं वाटतं ? चव.. नंबर एक.. गोज विदाउट सेइंग.. त्याखेरीज?
उदाहरणासहित अन कॅफेंच्या नावासहित लिहिलं तरी चालेल..!!
Taxonomy upgrade extras
भरपूर वेळ बसायची सोय अधिक
भरपूर वेळ बसायची सोय अधिक मुभा देणारे कॅफे परमप्रिय आहेत. बाकीचं ठीक आहे.
पुण्यातले पॅरेडाईज, व्होल्गा, कै. लकी, चंद्रविलास (हा एक महाटपराट अमृततुल्य 'कॅफे' आहे..) अतीच आवडते.
आमच्या लायडेन गावातल्या आईन्स्टाईन, बाबेल आणि कायझर्शिए या तीन कॅफेत बीअर, जाड्या चिप्स सोबत कित्येक दुपारी घालवल्या आहेत. त्यातही आईन्स्टाईन भर चौकात (तिथे कधीतरी आईनस्टाईन भेट देऊन गेला, म्हणून हे नाव), कायझर्शिये जरा आतल्या बाजूला, आणि बाबेल कालव्याच्या किनारी. ह्या... गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, वगैरे वगैरे.
गवि, कॅफे वगैरे काढताय की काय?
ऋ आणि आबा, दोघांचेही प्रतिसाद
ऋ आणि आबा, दोघांचेही प्रतिसाद आवडले.
आबा.. कॅफे काढत नाहीये. पण हा धागा, जर चांगले प्रतिसाद मिळाले तर, एखाद्या कॅफे व्यावसायिकाला खूप किंमती ठरु शकतो. बर्याचदा अशा ठिकाणी काहीतरी खटकलेलं असतं किंवा आवडलेलं असतं. ते कंझ्युमर कंप्लेंट फोरममधे नोंदवण्यासारखं गंभीर नसतं किंवा तपशीलवार रिपोर्ट लिहिणं एकेका कॅफेसाठी शक्य होत नाही. अश्या आठवणी आणि त्यातून आलेल्या अपेक्ष एकत्र ठेवण्यासाठी, मुख्य म्हणजे एकमेकांना सांगून एकसारखी आवड दिसते का हे पाहण्यातल्या इंटरेस्टपायी धागा काढला आहे.
मला सबवे सँडविच आवडतात. पण त्यांच्या ब्रेडचा बाईटसाईझ आणि त्याउपर ठासून भरलेले स्टफिंग,मेयो अन इतर सॉसेस यामुळे कितीही कागदात गुंडाळलेल्या अवस्थेत पकडून खाल्लं तरी टापटिपीने खाता येत नाही. एका बाईटमधे न सांडता किंवा तोंडाला न बरबटता घास तोडणं मला तरी कठीण जातं.. कदाचित मला ती सफाई नसेल.. पण ब्रेडची रुंदी किंचित कमी ठेवली अन लांबी जास्त केली तर खूप सोयीचं होईल.
काही ठिकाणी कुकीज, डोनट्स असे खास मुलांना जास्त आवडणारे पदार्थ, अगदी खूप व्हरायटीसहित काचेत डिस्प्लेसाठी ठेवलेले असतात. पण ते इतक्या उंच जागी की लहान मुलं ते बघूच शकत नाहीत. मग त्यांना उचलून घ्यायचं किंवा आपल्या आवडीने मागवायचं. लहान मुलांचे पदार्थ थोडे कमी उंचीवर ठेवले तर? त्यांनाही दृष्टिसुख घेऊ दे की..चॉईस करु देत की.. उलट ती हट्ट करतील अन जास्त डोनट खपतील. ;)
मी त्या कॅफेवाल्याला बोललो. पण तो नोकर होता. तो डिफेन्सिव्ह मोडमधे जाऊन ती उंची कशी योग्य आहे याची कारणं द्यायला लागला.
काही ठिकाणी आवर्जून हात बरबटवणारे खाद्यप्रकार असतात आणि हात धुवायला बेसिन किंवा पाणी ठेवणं त्यांच्या कन्सेप्टमधे बसत नसतं. मग कागदाने हात पुसून चिकट फीलिंगने भारतीय ग्राहक बाहेर पडतो.
अशा बर्याच गोष्टी..
ॠ: कॅफे-रोबोज हा शब्द झकास आहे.
भरपूर वेळ बसायची सोय अधिक
भरपूर वेळ बसायची सोय अधिक मुभा देणारे कॅफे परमप्रिय आहेत. +१
निवांत बसायची मोठ्ठी जागा. शक्यतो शांत आणि गर्दी नसलेलं वातावरण पुरेसं आहे. अमुकमधे तमुक अॅड करा आणि कॉम्बो बनवा.. इतके रुपये अॅड करुन ड्रिंक आणि चिप्स मिळवा.. वगैरे अश्या ऑफर्स नसाव्यात. मागतोय तितकं व्यवस्थित द्यावं.
अश्या ऑफर्स नसाव्यात. मागतोय
अश्या ऑफर्स नसाव्यात. मागतोय तितकं व्यवस्थित द्यावं.
हा विचार एकदम जुळतोय माझ्या विचाराशी. काहीही मागवलं की "पण पण सर... हाच पदार्थ थेट न मागवता अमुक कॉम्बोचा भाग म्हणून मागवलात तर पैसे वाचतील" किंवा तुमच्या ग्रुपचे एकूण अमुक इतके बर्गर आहेत, त्यातला एक मी कॉम्बो करतो म्हणजे त्यासोबत कोक किंवा शेकपैकी एक काहीही घेता येईल.. आणि वीस रुपये अॅड करुन मी तीस रुपयाचे फ्राईज देतो.. इ इ.. असे तो बोलू लागला की बर्याचदा मी म्हणतो की जे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे, पण मी जो पदार्थ सांगितलाय तो आणि तेवढाच दे फक्त मला. कधीकधी मी शरण जातो. माझं खूप नुकसान होतंय असं त्याने पटवून दिलं तर मी "बरं, द्या मग कॉम्बो" असं म्हणून जो काही ट्रे अन बिल येईल ते उचलतो.
मुळात भारतीय पिंडामुळे सेल्फ सर्व्हिस हा प्रकार मनातून कुठेतरी आवडत नाही. आगाऊ पैसे भरा अन अन्न उचलून फुटा. मग तुमचे तुम्ही पहा, असा कोरडेपणा त्यात जाणवतो. अर्थात ते कॅफेवाल्याला सोयीचं असतं आणि आपले पूर्वग्रह असतात हेही खरंच.
मला सेल्फ सर्विस आवडते पण
मला सेल्फ सर्विस आवडते पण तुम्ही म्हणताय तशी शिकवलेली आणि तुमच्यावर ग्राहम म्हणून घोटलेली वाक्ये बोलणारी पोपटपंची सुरू झाली की खाणं नको पण बडबड आवर असं वाटतं
सब-वे अतिशय आवडतं. पण त्याच्या प्रत्येक ब्रान्चमध्ये वेगळे अनुभव. सबवेचे काही कॅफे आवडलेही आहे, तर काही अगदिच भिकार सर्विसचे आहेत
मला सेल्फ सर्विस आवडते का
मला सेल्फ सर्विस आवडते
का आवडते ? त्यात काय कम्फर्टेबल वाटतं ?
टेबल सर्व्हिस अधिक चांगली का वाटत नाही? टेबल सर्व्हिस असली की वेटर हवंनको पाहण्याच्या दृष्टीने आपलं किती खाऊन झालंय वगैरे ते आसपास उभा राहून न्याहाळत राहतो ते अनकंफर्टेबल वाटतं का?
एक पदार्थ संपला आणि अजून हवं असलं की पुन्हा जागा सोडून काउंटरवर रांग लावण्याचा अन नवे बिल / सुटे पैसे देणेघेणे वगैरेचा रसभंग होत नाही का?
मला सेल्फ सर्विस आवडते
मला सेल्फ सर्विस आवडते म्हणण्यापेक्षा सेल्फ सर्विसमध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही असे लिहायला हवे होते.
किंबहुना सर्विस देण्याचा प्रकार कोणता आहे हे माझ्यासाठी गौण आहे. पण टेबल सर्विसमध्ये ऑर्डर घ्यायला येणारा वेटर असो वा सेल्फ सर्विसमध्ये कौंटर पलिकडला तो यांत्रिक बोलू लागला की मी 'टर्न ऑफ'च होतो. शिवाय अति बडबडही नको. एक-दोनदा त्या कॅफेत गेल्यावर चेहरा लक्षात ठेऊन सोबत आवडी लक्षात ठेवणारे वेटर्स असले - नी नेमके काही सुचवू लागले की आमचे त्या कॅफेशी ऋणानुबंध जुळतात :)
बाकी आपल्याकडे कॉफीबद्दल जाणकारी असणारे कॅफे अगदीच विरळ आहेत. मोका, कापुचिनो वगैरे नावाची मशीनवरची बटणे दाबून जे येईल दे गिर्हाईकाच्या पुढ्यात ठेवण्यात येते.
या कॉफीप्रकारांमधील फरक आम्रिकेतील एका आफ्रिकन अमेरिकनांच्या क्याफेमध्ये आम्हाला समजावला गेला होता. टाइम स्वेअर च्या मागल्या अंगाला तो काहीसा एकटा क्याफे होता. आमच्या एका क्लायंट कम मित्राचा तो लाडका क्याफे असल्याने तो आम्हाला तिथेच घेऊन जाई नी आम्ही क्रिकेटबद्दल बोलत असू, म्याचेसही बघत असु. टिव्हीवर क्रिकेट म्याचेस लावणारा तो एक अभारतीय क्याफे होता (तो - माझा क्लायंट कम मित्र - वेस्ट इंडीजचा होता. त्या क्याफेतही त्याच्याच भाऊबंदाची वर्दळ असायची. आता तो ही आपल्या गावी परतलाय, तो क्याफेही बंद झालाय आणि तिथे स्तारबक्स निघालेय असे ऐकले :( )
===
अर्थात हे सारे आफ्टरथॉट्स. नेमक्या त्यावेळी एखादी जागा का आवडते हे नंतर सांगु शकत असलो तरी कोणत्या प्रकारची जागा हमखास आवडेलच हे नक्की सांगणं कठीण वाटतंय! कारण ती जागा आवडण्यात तिथे सोबत असणार्या कंपनीचंही महत्त्व/वाटा आहेच, तो दरवेळी कुठून आणायचा?
पुस्तक वाचत, unwind होत, तासन
पुस्तक वाचत, unwind होत, तासन तास बसू देणारे कॅफे प्रचंड आवडतात अन तिथे जर सुंदर-देखणे अन्य गिर्हाईक येत असतील तर फारच छान, being highly visual.
पुस्तकातून मान काढून जरा वेळ स्त्रियांची वेशभूषा अन accessories पहाण्यात वेळ जातो. एखाद्या सुंदर जोडप्याकडे लक्ष वेधले जाते. अति विकल्प असतील तर लोक कसे निर्णय घेतात अथवा गोंधळून विचारात पडतात हे पहायला फार मजा येते.
बाकी एक साध्या कॉफीवर हे करायला फार मजा येते, cost-effective वाटतं, जग सुंदर भासतं. मास्लोच्या भाषेत self-actualization चा अनुभव येतो.
कॉफी अगदी एकटीला आवडते कारण अन्य कोणी असेल तर फार alert अन attentive रहावं लागतं.
द पॅरेडॉक्स ऑफ चॉईस या
द पॅरेडॉक्स ऑफ चॉईस या पुस्तकावर आणि विषयावर स्वतंत्रपणे चर्चा करण्यासारखा त्याचा आकार आहे. पण काही मुद्दे कॅफेजमधल्या मेन्यू चॉईसेसच्या संख्येलाही लागू पडतातच.
http://en.wikipedia.org/wiki/The_Paradox_of_Choice
हा पहिला मुद्दा मला वाटतं अजो नेहमी जे म्हणतात त्यासारखा आहे:
Choice and Happiness. Schwartz discusses the significance of common research methods that utilize a Happiness Scale. He sides with the opinion of psychologists David Myers and Robert Lane, who independently conclude that the current abundance of choice often leads to depression and feelings of loneliness. Schwartz draws particular attention to Lane's assertion that Americans are paying for increased affluence and freedom with a substantial decrease in the quality and quantity of community. What was once given by family, neighborhood and workplace now must be achieved and actively cultivated on an individual basis. The social fabric is no longer a birthright but has become a series of deliberated and demanding choices. Schwartz also discusses happiness with specific products. For example, he cites a study by Sheena Iyengar of Columbia University and Mark Lepper of Stanford University who found that when participants were faced with a smaller rather than larger array of chocolates, they were actually more satisfied with their tasting.
आणि दुसरा मिस्ड अपॉर्च्युनिटीजचा मुद्दाही रोचक आहे:
Missed Opportunities. Schwartz finds that when people are faced with having to choose one option out of many desirable choices, they will begin to consider hypothetical trade-offs. Their options are evaluated in terms of missed opportunities instead of the opportunity's potential. Schwartz maintains that one of the downsides of making trade-offs is it alters how we feel about the decisions we face; afterwards, it affects the level of satisfaction we experience from our decision. While psychologists have known for years about the harmful effects of negative emotion on decision making, Schwartz points to recent evidence showing how positive emotion has the opposite effect: in general, subjects are inclined to consider more possibilities when they are feeling happy.
आयला इंटर्नेट कॅफेबद्दल
आयला इंटर्नेट कॅफेबद्दल उल्लेखच नाय ...? पास द्यावा काय ;)
मला अपारंपारीक सजावट, बसायला प्रशस्थ जागा,जसे आपण म्हणालात तसे अगदी लॅपटॉप पेपर पसरुन निवांत बसता येइल असे कॅफे पसंतआहेत, सर्वीस जरा वेळखाउच हवी पण अशी पाहिजे की एकदा पदार्थ पुढ्यात आला की संपल्याशीवाय हात रिकामे झालेच नाही पाहिजे.. म्हणजे पुढची ऑर्डर द्यायला सोयीचे होते.
इराणी हॉटेलसुधा आवडतात, पुण्यात पॅरेडाइजमधे आम्ही चेस खेळत तासंतास बसायचो. चेसबोर्ड कायम एकाच्या सॅकमधे मुद्दाम ठेवलेला असायचा... सकाळी ९ ते रात्री ११. कोणत्याही वेळी जाउन बसायचो... मग खेळता खेळता गप्पा, चहा, बनमस्का, रोल्स... आहाहा काय धमाल वेळ जायचा छान ग्रुप जमायचा. आमचा प्रकार बघुन इतरांनाही प्रेरणा मिळाली आणी ते ही चेस बोर्ड घेउन येउ लागले त्यांनंतर केव्हांही जा एका टेबलावर चेस हमखास चालु दिसायचे... अन अचानक एक दिवस हे सर्व कायमचे बंद पडले... मालकाने तंबी दिली चेस खेळायचा नाही म्हणून. कारण पोलिसांनी त्याला तंबी दिली की क्लब उघडलाय का म्हणून...? खरेखोटे त्यालाच माहित पण चेस बंद झाल्यापासुन आमचा वावर थोडा कमी झाला. पण असा कॅफे हवाच... जिथे मिटर चालु असेल तर टेबलावरच्या कोणत्याही हार्मलेस उद्योगावर बंदी नको.
निव्वळ थंड साठवलेले रॅपरमधले पदार्थ देणारं मोठ्या ब्रँडचं कॅफे त्याच्या अँबियन्समुळे चांगलं चाललेलं दिसतं. आणि खूप खर्चिक थीम्स बनवूनही काही ठिकाणी
हा प्रकार जाम डोक्यात जातो... विषेशतः पुणे रेल्वेस्टेशनमधे.. तेच ते कॉम*म. पण दुसरा समर्थ पर्यायही उपलब्ध्द नाही. रात्री १.३० वाजता सोबत मुलिं असताना भुक लागली असते.. डोळे तरारलेल्या (येणार्या झोपेमुळे) अवस्थेत कोणत्याही टुकार कारणास्तव बेफाम खिदळण्याच्या मुडमधे तिथले महागडे परंतु (माझ्या नजरेत) शिळे पदार्थ खात पहाटेपर्यंत टीवीवर गाणीबघत एकमेकांच्या खोड्या करत बसणे हा एक मस्त विरंगुळा आहे. आजही डिस्को बंद झाले की शनीवारी हे ठिकाण मध्यरात्री १-२ तासासाठी आखुडवस्रांनी भरुन जाते. त्यामुळे... हो कॅफे असा हवा जो २४ तास उघडा असतो...
...सर्वात मस्त प्रकार म्हणजे कोरेगांव पार्क लेन फोर मधे ओशो आश्रमाच्या लाइनीतल्याच बंगल्यात बरीस्ता सुरु होते. बंगाला छोटा पण समोर देखण्या हिरवळीचे प्रशस्थ अंगण. अन रात्री हिरवळीवर मोठ्यासंखेने पाश्चीमात्य युवक युवती जमुन गप्पा मारायचे, चंद्राच्या प्रकाशात गिटारवर मस्त सुरावटी काढायचे बहुतांश भार्तीय आमच्यासारखेच ऐकनमात्र. पण आपली फर्माइश सांगायचा अवकाश ते लगेच गिटारसोबत म्हणुन दखवायचे, लास्ट ख्रिसमस जाम फेवरीट होतं... असा कॅफे मी तर मीपुन्हा कधीच अनुभवला नाही. दुर्दैवाने काही कारणाने बरीस्ता बंद झाले व बंगला फक्त निवासी कारणाने भाड्याने दिला गेला :( त्यामुळे असा कॅफे तर हवाच हवा. जिथे बसण्याचा अजुन एक ओप्शन म्हणुन समोर प्रशस्थ हिरवळही आहे... आणी सोबतीला दर्जेदार पदार्थ.
सेल्फ सर्व्हिस कॅफे आवडत
सेल्फ सर्व्हिस कॅफे आवडत नाहीत. काऊंटरवर ऑर्डर द्यायची आणि पदार्थ घ्यायलाही आपणच जायचं हे आवडत नाही.
तयार पदार्थ देणारे आवडत नाहीत. ताजा-गरमागरम पदार्थ हवा. कॉफीचे अनेक चित्रविचित्र प्रकार असलेले आवडत नाहीत. एस्प्रेसो, लॅटे, कापुचिनो, मोका इतके असले म्हणजे पुरे.
पुस्तक वाचताना लोळायची सवय असल्याने आणि भयंकर एकाग्र होत असल्याने कॅफेत पुस्तक वाचायला आवडत नाही. लॅपटॉप घेऊन कॅफेत बसणे आणि तसे करणारे लोक दोन्हीही आवडत नाहीत. पण अशा लोकांसाठी वाय-फाय आणि प्रत्येक टेबलाजवळ पॉवर पॉईंट असल्यास ते लोक खूश होतील असे वाटते.
कॅफेत एकट्याला तासंतास बसायला आवडत नाही; पण आवडती मित्रमंडळी असतील तर तासंतास गप्पा ठोकत बसायला आवडते.
कॉंम्बो आणि सेट मिल देणारे कॅफे आवडत नाहीत. कसंही, आरामशीर बसता येईल अशी सोय असलेले कॅफे आवडतात, म्हणजे अवघडून बसावे लागत नाही.
खूप झगमगाटी दिवे असलेले कॅफे आवडत नाहीत. वाहत्या रस्त्याच्या अगदी कडेला असलेले कॅफे आवडत नाहीत. शांत, आतल्या बाजूचे आवडतात.
ज्या शहरात कॅफे आहे तिथल्या लोकल कल्चरशी जुळणारे कॅफे आवडतात म्हणजे उदा. पुण्यात स्टारबक्स वगैरे इंग्रजाळलेले पब्लिक जातात तसे कॅफे आवडत नाहीत. कॅफे जितका जुना किंवा शहराच्या जुन्या कल्चरशी नाते सांगणारा असेल तितका बरा.
पदार्थ खूप नसले तरी चालते पण असतील ते चवदार आणि ताजे असलेले आवडते.
वेटरलोकं समजदार अस्लेलं महत्त्वाचं. खूप गर्दी असल्यास तासंतास गप्पा ठोकत बसता येत नसल्याने अशा ठिकाणी पटकन खाऊन निघायचे असल्यासच जातो.
लॉयल्टी स्कीम वगैरे फालतू प्रकारांच्या नादी लागत नाही.
कॅफे...
भरपूर प्रकाश असलेले,
मुंबईच्या हवेत पंखे चालू ठेऊन हवा खेळती ठेवणारे,
बर्यापैकी स्वच्छ्ता असलेले,
भयाण शांतता नसून गिर्हाईकांची माफक वर्दळ असणारे,
चवदार पदार्थ देणारे,
रोज सकाळी लावलेल्या चंदनाच्या उदबत्तीचा मंद सुगंध आणि तव्यावरच्या डोशाचा वास एकत्रितपणे दरवळणारे,
"भडव्या, किती दिवसांनी भेटलास,चल कॅफेत जाऊ" असं आपण मित्राला (किंवा मित्राने आपल्याला) म्हंटल्यावर मित्राच्या (किंवा आपल्या) खिशाला खूप मोठी चाट बसणार नाही याचा विश्वास असलेले,
तोंडावरची सुरकुतीही न हलवणारे पण आपल्या नेहमीच्या गिर्हाईकाला खाण्यानंतर चहा लागतो की कॉफी हे लक्षात ठेवणारे वेटर्स असलेले,
बिलाबरोबर बडीशेप न चुकता आणून देणारे आणि त्या बडीशेपेत फारसे खडे नसतील याची काळजी घेणारे,
आपण आपल्या मैत्रीणीला गप्पा मारायला बिनधोकपणे ह्या कॅफेत घेऊन जाऊ शकतो असा विश्वास देणारे,
गंभीर ध्यानीबुद्ध चेहरा ठेवणारे, पण सुट्या पैशांवरून कधीही झिगझिग न करणारे मालक असलेले,
...
...
असे कॅफे मला आवडतात...
उदाहरणार्थः माटुंग्याचं मणीज किंवा डोंबिवलीचं मॉडर्न कॅफे!
मॉडर्न कॅफेने तर एकेकाळी रेग्युलर बॅचलर पुरुष कस्टमर्सची लग्नाआधीच पोटं सुटवली होती!!
:)
फार वेगळेपण असे नाही, पण
फार वेगळेपण असे नाही, पण भाज्यांचे वैविध्य नजरेत भरण्यासारखे असते. छोले, बटाटा, फ्लॉवर या तद्दन नॉर्थ इंड्यन भाज्यांपासून ते खोबरे घालून केलेली कोबीची भाजी, भेंडी, तोंडली, दुधीभोपळा, अशी मोठीच रेंज असते. बाकी मग सोबत पालक घातलेली आंध्रास्टाईल डाळ ऊर्फ पप्पु, टोम्याटो वगैरेची चटणी, फ्राईड ढब्बू मिरची हे अॅकंपनिमेंट्स असतातच. चपाती जरा खाल्ली की मग सांबार, पुढे रसम अन मग शेवटी पेरुगु ऊर्फ दही अशी अनलिमिटेड ओदनपर्वतासमवेत आयटम्सची गर्दी असते. सांबारात दुधीभोपळ्याच्या फोडीही लिबरली घातलेल्या असतात. कधीमधी शेवगा, वांगे, गाजरादींच्या फोडीही असतात. रसमही बरे असते. क्वचित गंडते तर क्वचित लयच भारी लागते.
हे सगळे अनलिमिटेड ८०/- मध्ये मिळते. २-३ चपात्या अन भात आपल्याला पायजे तेवढा घेतला तरी सौथच्या हिशेबाने तो कमीच असतो.
तिकडे फन टाइमच्या मागे
तिकडे फन टाइमच्या मागे फातीमानगरला. लकी रेस्टराँट डायमंड बेकरी अन रेस्टॉरंट आहे (इराणी) जबरा आहे. अवश्य भेट द्या. खायची प्यायची चंगळ आहेच पण अगदी साधी रोटी सुधा अशी जाड अन माउ बनवतात जणू स्लाइसब्रेडच हातात धरला आहे. न चुकता भेट देणे. ड्झर्टपासुन सगळे एकदम कडक चवीचे आहे.
नॉट अलाउड.
नॉट अलाउड.
डायमंड हे नाव वापरायची परवानगी इतर कुणाला नाही , अगदी ब्लु डायमंडला पण नाही.
मेन स्ट्रीट वरचं (कै) डायमंड हे एकच डायमंड.
तेच ते , जिथे एकाच टेबलावर बसून एकजण बिअर, एकजण चहा आणि एकजण मटणसमोसा वगैरे निष्काम कर्मयोग करत सकाळी अकरा ते रात्री दहापर्यंत केव्हाही बसू शकत असे.
गेले ते बिचारे ,पारश्याचे डायमंड..
अरेरे.
सीसीडी व्यतिरीक्त इतर ठिकाणचा अनुभव नाही.
सीसीडीत जायचो तेही पहिल्या नोकरीत कधीकधी रस्त्यात थांबून मेल पाठवायचे असायचे म्हणून. बरेचसे हॉटेलवाले यहा काम करना अलाउड नही म्हणून सांगायचे. मग दुसरा पर्यायच नव्हता. मुळातच चहा कॉफीसाठी ५०-१०० रु. खर्च करायचे म्ह्टले की जीवावर येते. नावतरी कायकाय
एस्प्रेसो (फेसच काढतो तुझ्या तोंडातून) , लाटे (लाटतोच तुला) , कापुचिनो (कापतोच तुला) , मोका (मोका बघून चौका मारतो) म्हणजे एकूण भ्यायलाच होते. त्यापेक्षा रस्त्याच्या कोपर्यावरच्या राजस्थानी महाराजची कटींग किंवा उडीपी हॉटेलची कॉफी बरी. कॉफी मागीतली की फिल्टर पाहिजे की नेस्कॅफे एवढं सांगीतलं की काम झालं. अगदीच कंटाळा आला तर उकाळा पितो. झालचं तर आमच्या गावी अजूनही कॉफीची वडी मिळते. ती आणून ठेवतो घरी. तलफ आली की अधूनमधून घरीच बनवून पितो. एकंदरीत गर्दीची हॉटेल्स, कॅफे टाळण्याचाच प्रयत्न करतो. म्हणूनच मेडीकल आणी इंजिनियरींग पण नाही केलं. तिथे खुप गर्दी असते ना ! :) अगदी मॉलमधे जायचे, चित्रपट बघायचा तरी तो कार्यक्रम सोमवार ते गुरुवार दरम्यानच करतो.
बाकी बायको घरी जे पदार्थ बनविते ते कधीमधी फारच अप्रतिम होतात. तेव्हा एखादे छोटेसे हॉटेल काढावे व हेच घरगुती पदार्थ बनवून विकावेत असा विचार मनात तरळतो. पण तो तेवढ्यापुरताच.
अवांतर लिखाणाबद्द्ल क्षमस्व.
पुण्यातले बर्गर किंग
पुणे क्यांपात एम जी रोडला समांतर जो मोठा रस्ता आहे(नाव आठवत नाही)त्याच्या टोकाला बर्गर किंग नावाचे कॅफे संस्कृतीत बसणारे हाटेल होते. विदेशी बर्गर किंगच्या साखळीतले नव्हे. मोठ्या बनपावात बनवलेला खिम्यावा वडापाव आणि अननसाचे सरबत चवदार असे. खात खात दिडेक तास सहज गप्पा मारता येत.वरच्या मजल्यावर टोकाची खिडकीलगतची जागा पकडली की पुढचा सारा वाहता रस्ता दिसत असे. एकटे असतानाही वेळ मस्त जात असे. आता ते तिथे आहे की नाही कोण जाणे. आठवणी मात्र भरपूर आहेत.
आता ते तिथे आहे की नाही कोण
आता ते तिथे आहे की नाही कोण जाणे.
हो हो आहे हो अजून तिथेच - येता जातं दिसतं पण मी गेलो नाही एवढ्यात. जायचं झालंच तर कल्याणी नगरातील (ऐबीसी फार्म्स शेजारी) बर्गर किंगात जातो. एका बर्गरात जेवण होते. त्यांचे चिझ-सँडवीच पण छान असतात(ज्यांना सँडवीच मधून गरम गरम चिझ असं ओथंबून वाहत असलेलं आवडतं त्यांना विशेष आवडेल).
बर्गर किंगमधे अॅम्बियन्स असा
बर्गर किंगमधे अॅम्बियन्स असा काही खास लक्षात राहिला नव्हता. त्याचं यश किंवा आकर्षण हे पूर्णपणे त्या बर्गरच्या मोठ्या आकारात आणि रसदारपणात असावं.
एबीसी फार्म्समधे चीज फाँड्यू मिळणारं एक कॅफे / थीम रेस्टॉरंट होतं. आता ते बहुधा बंद झालं असावं. स्विस कॉटेज किंवा तत्सम काहीतरी. आतली सजावट तशीच होती.
पण कुठे काय चांगले खाल्ले यापेक्षाही मुख्य कॅफे / रेस्टॉरंटचे खास गुण आणि पर्सनॅलिटी यावर माहिती हवीय. चांगल्या चवीचे नोंदवण्यासाठी वेगळा धागा आहे याची मला कल्पना आहे.
याठिकाणी खाण्याची चव चांगली असेल असं गृहीत धरलंच आहे. कारण चव वाईट असेल तर इतर कोणत्याही एका सिंगल पॉईंटवर "रिपीट" कस्टमर्स मिळत नाहीत. अपवाद फक्त मोनोपली असलेल्या जागांचा (कॉलेज कॅन्टीन, ऑफिसचे फुकट जेवण वगैरे, दूर निर्जन ठिकाणच्या प्रोजेक्ट्सवर असलेली खाद्यव्यवस्था, आसपास दहा किलोमीटर्स काहीही वस्ती नसणे वगैरे)
एखाद्या रेस्टॉरंटचं केवळ ठिकाण मोक्याचं किंवा सोयीचं आहे म्हणून ते चालतही असेल, पण तिथे प्रवासी वगैरे लोक मुख्यतः सोय म्हणून येत असावेत. आवर्जून नव्हे.
रस्तोरस्ती असलेली कामत रेस्टॉरंट्स हे त्याचं उदाहरण. चवीत किंवा एकूण कशातच दम नसतानाही हायवेवर एक ब्रँडेड ठिकाण आणि बहुधा हायजेनिक फूड मिळण्याची खात्री म्हणून लोक तिथे थांबत असावेत. स्टँडर्डायझेशन किंवा चवीची परीक्षा वारंवार न करता नुसतेच नाव वापरायला देऊन फ्रँचायजी दिल्यासारखे वाटते.
मॉलमधली फूड कोर्टे याविषयी लोकांच्यात काय मत आहे? चांगल्या मॉलमधे फूड कोर्टात स्टॉल ही उत्तम संधी असावी कॅफेवाल्यांसाठी. लोक तसेही फूड कोर्टमधे खाण्यासाठीच येतात. त्यांना आणखी एक ऑप्शन मिळतो. फूटफॉलचा तोटा नसतो. आपला मेन्यू स्पेशल असला की झालं.
मॉलमधली फूड कोर्टे याविषयी
मॉलमधली फूड कोर्टे याविषयी लोकांच्यात काय मत आहे? चांगल्या मॉलमधे फूड कोर्टात स्टॉल ही उत्तम संधी असावी कॅफेवाल्यांसाठी. लोक तसेही फूड कोर्टमधे खाण्यासाठीच येतात. त्यांना आणखी एक ऑप्शन मिळतो. फूटफॉलचा तोटा नसतो. आपला मेन्यू स्पेशल असला की झालं.
मला अजूनतरी छान कॅफे म्हणावा असा प्रकार या फुड कोर्टांमध्ये मिळाला नैय्ये
एकतर सगळे गर्दी असलेले, पायात पळणारी पोरे, त्याच्या मागे धावणारे त्यांचे पालक, फुगे, पिपाण्या, एस्कलेटर एस्कलेटर खेळणारी पोरे, काही नवखे, काही गावकरी, त्यात काही मॉल्समध्ये त्याच मजल्यावर असणारी ती व्हिडीयो गेम्सभोवतीची वर्दळ आणि त्यांचे आवाज-दिवे वगैरे मध्ये मला खाणेच नकोसे वाटते.
सचिन कुंडलकर ने कोबाल्ट
सचिन कुंडलकर ने कोबाल्ट ब्ल्यू मध्ये एका इराणी कॅफे च अप्रतिम वर्णन केल होत . कोबाल्ट ब्ल्यू जरी कादंबरी असली तरी त्यातले अनेक संदर्भ खऱ्या आयुष्यातून घेतले असल्याने तो कॅफे पुण्यात खरच अस्तित्वात असावा असे वाटते . बाकी वेटर या प्रकारात पण स्त्री पुरुष समानता यावी असे वाटते म्हणजे कॅफेत जाण्याचा आमचा उत्साह वाढेल
सनराइझ
>> सचिन कुंडलकर ने कोबाल्ट ब्ल्यू मध्ये एका इराणी कॅफे च अप्रतिम वर्णन केल होत . कोबाल्ट ब्ल्यू जरी कादंबरी असली तरी त्यातले अनेक संदर्भ खऱ्या आयुष्यातून घेतले असल्याने तो कॅफे पुण्यात खरच अस्तित्वात असावा असे वाटते
तो 'कॅफे सनराइझ'. डेक्कनला जुन्या नटराज थिएटरसमोर. मस्त जागा होती. 'गो गो ग्रीन' आणि 'शिकंजबीन' वगैरे तिथले काही पदार्थ माझे आवडते होते. मालक मेहदीशी अनेकदा गप्पा होत असत. नारायण राण्यांनी ती जमीन विकत घेतली आणि आता गेली कित्येक वर्षं तिथे एका मॉल / शॉपिंग सेंटरसदृश इमारतीचं बांधकाम अर्धवट बांधलेल्या अवस्थेत पडून आहे.
सनराइझ...
हे खूप पूर्वी - बोले तो, विहिंपच्या पहिल्यावहिल्या अधिवेशनाअखेरीस झालेल्या सांगतायात्रेत (या समारंभाचे नक्की नाव विसरलो) त्याची नि हाँगकाँग गल्लीच्या दुसर्या टोकास असलेल्या (कै.) लकीची जाळपोळ झाली (नि त्यानंतर पुण्यात मोठ्ठी दंगल घडली), त्यापूर्वी - खूप चांगले होते, असे ऐकून आहे. प्रत्यक्षात त्या काळात जाण्याचा योग आलेला नाही.
नोकरी करायला लागल्यापासून तेथे कधीमधी टपकू लागलो, तेव्हा मात्र त्याची अवस्था दयनीय होती. एक तर तेथील मेनूवर इडलीसांबारापर्यंत काय वाट्टेल ते दिसू लागले होते. (इतकी दगडी इडली मी आयुष्यात अन्यत्र खाल्लेली नाही!) शिवाय, बर्गरबरोबर वगैरे जे केचप देत, ते भोपळ्याचे असे याबद्दल (फारशी) तक्रार नाही, परंतु मागील गिर्हाइकाचे रीसायकल्ड असे, अशी एक किंवदन्ता होती.
मी तेथे शक्यतो पॉटमधला चहा, टोष्ट, कधी फिंगरचिप्स किंवा हाफफ्राय खात असे. आमच्या वेळेपर्यंतसुद्धा बरी मिळणारी गोष्ट - कदाचित वाट लावण्यास फारसा स्कोप नसल्यामुळे असेल.
असो. गेले ते बरेच झाले म्हणायचे. अवस्था बघवत नव्हती अशा स्थितीस आले होते.
सनराइज
नंतर त्या जागेत डोसा डायनर सुद्धा होते काही काळ.
------
ते "हिंदू जनजागरण" शिबीर होते. तळजाईच्या पठारावर (हे कुठे आहे ते अजून माहिती नाही) हे शिबीर झाले होते. सुमारे १९८३. तेव्हा हिंदू लवकरच अल्पसंख्य होणार असे भाकीत (मी) आमच्या कॉलेजातील काही मित्रांकडून पहिल्यांदा ऐकले होते. तेव्हा मलाही ते पटले असल्याचे स्मरते.
नफा-तोटा
>> बराच काळ यशस्वी ठरल्यावर सनराईज, पूना कॉफी हाऊस, लकी किंवा इतर काही कॅफेजच्या अस्तामागे काय कारणं असावीत?
पूना कॉफी हाऊसचं माहीत नाही, पण लकी आणि सनराइझ ही काही पुष्कळ पैसा कमावणारी हॉटेलं नव्हती. फारसे पैसे न खर्च करता तिथे दीर्घ काळ बसता येत असे. शिवाय, त्या ठिकाणचे जागेचे भावही गगनाला भिडलेले होते. त्यामुळे तोट्यात चालणारं हॉटेल चालू ठेवायचं की विकून बक्कळ पैसा कमवायचा, ह्या तिढ्यात कधी ना कधी हे होणार होतंच. ह्याला जेन्ट्रिफिकेशन म्हणतात. बोहेमियन लोकांनी जागेला रोमँटिक संदर्भ / स्वरूप द्यायचे, मग धंदेवाईकांनी त्यांना हुसकावून लावायचं, वगैरे.
जाता जाता : मेहदीनं नंतर 'शिशा जॅझ कॅफे' सुरू केलं.
???
>> सनराइजचा इराणीपणा त्या जालपोळीनंतर लगेचच गेला.
- मालक इराणी होता.
- तिथे इराणी पदार्थ मिळत.
- तिथल्या चहाची चव इराणी हॉटेलातल्या चहासारखीच राहिली. (ती चव इराणी अजिबात नव्हे.) शिवाय तिथे इराणी चवीचा चहाही मिळे.
- तिथे संगमरवरी टॉपची टेबलं असत.
- तिथे बांबूच्या खुर्च्या असत.
- फार काही न खातापिता तिथे कितीही वेळ बसता येत असे.
नारायण राण्यांनी
नारायण राण्यांनी सनराइजशेजारचं प्रयाग हॉस्पिटलदेखील विकत घ्यायचे प्रयत्न केले असं ऐकलं आहे.
मला पॅराडाइज फायद्यात कसं चालतं किंवा मालकाला ती जागा विकायचा मोह कसा झाला नाही. हे कुतुहल आहे. तिथेही तुम्हाला तासंतास काहीही विकत न घेता बसता येतं. सिगारेटीदेखील तिथल्याच विकत घ्यायच्या अशीही अट नाही.
शिकंजबीन
>> शिकंजबीन म्हणजे काय?
http://www.khanapakana.com/recipe/e224b367-226f-4815-af76-cf7ab80d476e/…
खाण्यापिण्याच्याबाबतीत आम्ही
खाण्यापिण्याच्याबाबतीत आम्ही 'गिळाढोसा काय आयतं &/ फुकट समोर आलंय ते असल्याने फूड हा मुद्दा आमच्यासाठी अगदीच शुल्लक आहे.
तरीही कोणाला भेटायचे असल्यास चांगला अँबीयन्स अन् चांगला क्राऊड असलेले, काहीही ऑर्डर न करता किंवा छोटीशी ऑर्डर देऊन तासनतास बसू देणारे कॅफे आवडतात.
कॅफेमधे जाण्याच्या मुख्य
कॅफेमधे जाण्याच्या मुख्य उद्देशाला अनुसरून कॅफे असावा; म्हणजे खाण्यापिण्याची क्वॉलिटी फ्रेश आणि स्वच्छं असावी. पर्याय मोजकेच आणि झटकन ठरवता येतील असे असावे.
मला स्वतःला सेमी सेल्फ सर्वीस असलेले कॅफे आवडतात. म्हणजे काउंटर्वर जाऊन स्वतः ऑर्डर द्यायची, काँबो आणि काय काय ते ठरवायचं, पैसे चुकते करायचे आणि मग आपल्या आवडत्या जागी येऊन बसायचे. वेटर आपली ऑर्डर घेऊन आला की आपला आणि त्याचा संबंध तुटला, मग फुल्लं प्रायवसी!!
पर्याय मोजकेच आणि झटकन ठरवता
पर्याय मोजकेच आणि झटकन ठरवता येतील असे असावे.
हे अत्यंत महत्वाचं दिसतंय अनेकांच्या दृष्टीने. कॅफेत गेलेलो असताना भूक लागलेली आहे हे गृहीत धरल्यास मोजका अन ठरवण्यात मनाचा गोंधळ न करणारा मेन्यू असलेला अनेकदा आवडतो.
साधारणतः गोव्यात अशी अनेक कॅफेज असतात. त्यात आजचे मुख्य चार खास पदार्थ फळ्यावर हाताने लिहून ठेवलेले असतात. पण नेहमी तेच चार पदार्थ देतात असं होऊ नये म्हणून रोज किंवा आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी वेगळा मेन्यू ठेवतात. यामधे पॅरेडॉक्स ऑफ चॉईस टाळला जात असला तरी एकदा आवडलेला अमुक एक पदार्थ हुकमी प्रत्येक पुढच्यावेळी मिळण्याची खात्री नसते.
कॅफे- हिंदी चित्रपट
एक आठवला - बस् यूँ ही! (२००३)
कितीही वेळ कटकट न करता बसू
कितीही वेळ कटकट न करता बसू देणारी जागा ब्येष्ट. जोडीला बरा चहा आणि जुजबी खाणं असेल तर बोनस. क्याफे पॅरडाइजचा उल्लेख वर झालेला आहेच. त्याशिवाय ओंकारेश्वर मंदिराशेजारी हॉटेल मधुबन म्हणून जागा आहे. मस्तं जागाय. एंबियन्स वगैरे मिनिमल, एक्दम साधा. भारतीय खाणं, वडापाव मिसळ वगैरे मिळतं. एकदम चिल जागा. कोणी तुम्हाला उठवणार नाही जाग्यावरून तासंतास. आधी तिथे बसून बिड्या फुकलेल्या चालायच्या तेव्हा तर ती जागा खूप पॉप्युलर होती.
फर्ग्युसन रस्त्यावरचं कै. सवेरा असंच मस्तं होतं. त्याच रस्त्यावर पोलिस ग्राऊंडसमोर कॅफे रामसर म्हणून जागाय. लूक एक्दम टीपिकल शेडी इराण्याचा लूक. पण तिथल्याइतका इतका गटार चहा कुठे प्यायलो नाहिये.
कॉफी डे - डेड मेन्यू.. क्लिंग
कॉफी डे - डेड मेन्यू.. क्लिंग फिल्ममधे पॅक करुन सकाळीच भरुन ठेवलेला साठा अन तोच गरम करुन किंवा न करता कॉफीसोबत द्यायचा.
क्रेपे कॅफे - अत्यंत उत्तम अॅम्बियन्स आणि प्रेझेंटेशनचं उदाहरण. मेन्यूतले पदार्थ, बसण्याची जागा, आदरातिथ्याची भावना हे सर्व एकदम आयडियल.
पॉप टेट्स - केवळ मेन्यूसाठी अन वातावरणासाठी कम्प्लीट मार्क्स. फुल्ल मॅडनेस. टेस्टबाबतही अर्थात चोखच.
जगहेड्स - फसलेलं पॉप टेट्स (जगहेड्स पॉप टेट्सच्या आधी आलेलं असूनही त्यांना ते वातावरण जमलेलं नाही)
टीजीआय फ्रायडे - नुसताच अॅम्बियन्स पण चव शून्यवत असली की काय होतं याचं उदाहरण.
सबवे - साठा केलेलाच मेन्यू, पण निदान सँडविचची असेंब्ली तरी समोरच करुन देतात. अतिरिक्त चॉईसेस. खायला चवदार पण सुटसुटीत नाही. हात धुण्याचं वावडं. प्यायला पाणी नाही.
भारतीय मॅकडोनल्ड - सुरुवातीला अमेरिकन ताठा वर्षभर होता.. दोनतीनच शाखा होत्या तेव्हा. हिंदी मराठी न बोलणे, कार्ड न स्वीकारणे, हात धुवायला पाणी किंवा स्वच्छतागृह नसणे. आता स्थानिक भाषा बोलतात, बेसिनसह हात धुवायची सोय ठेवतात, प्यायला पाण्याचे ग्लास आणि डिस्पेन्सर ठेवतात, एखादा पदार्थ उशीरा येत असेल तर जागीच आणूनही देतात, प्लेट्स उचलून फेकायला नेणे शक्य असेल तेव्हा नेतात. थोडक्यात भारतीयांना स्वीकारलंय आता. शिवाय क्रेडिट कार्डस वगैरे घ्यायला लागले काही वर्षापूर्वी. चहा वगैरेही ठेवला. टिक्की, तंदुरी, पनीर वगैरेचे भारतीय बर्गर्स आले.. हे अपरिहार्यच होतं. ज्यांनी पहिल्या मॅकडोनल्डचा खास बांद्र्याला जाऊन अनुभव १९९६-९७च्या आसपास घेतलाय त्यांना फरक पटेल.
अवांतर : बरोबरची कंपनी
अवांतर : बरोबरची कंपनी महत्वाची. जागा , अॅम्बियन्स वगैरे डजंट मॅटर.
जिथल्या पदार्थांची चव चांगली असते आणि मुख्य म्ह्णजे कंसिस्टंट असते त्या जागा आवडतात. टाईमपास म्हणुन नुस्ते बसायला कॅफे नको वाटतो. त्यासाठी इथे बर्याच बाक असलेल्या मोकळ्या जागा, पार्क वगैरे असतात, तळी, नद्या वगैरे असतात.
पुण्यात घरच बरे.
पण चांगली चव असेल तर आवर्जुन जाणे होते.
अॅमनोरा मॉल मधलं 'बेकर
अॅमनोरा मॉल मधलं 'बेकर स्ट्रीट' कॅफे आवडलं. ग्रील्ड सँडवीच, पास्ता, पिझ्झा चांगल्या चवीचे आहेत. आपल्याला हवे तसे कस्टमायझेशनही करतात. मी तिथे कॉफी प्यायलो नाही, पण कॉफी चांगली असते म्हणे. आइस्ड टी छान होती... नेमकी कोणती ऑर्डर केली ते विसरलो, पण रिफ्रेशींग होती. बाहेर असलेली वुडन प्लॅटफॉर्मवरची सीटींग अरेंजमेंट छान आहे. कितीही वेळ बसलं तरी कोणीही उठवायला येत नाही... वर्दळ असूनही, त्यामुळे अजून आवडलं.
कॅफे म्हंटलं की डोळ्यासमोर
कॅफे म्हंटलं की डोळ्यासमोर येतं ते पुण्यातलं फातिमा नगर/वानवडी इथे असलेलं 'कॅफे जार'. 'कॉझी' अॅम्बीयन्स, फार कर्कश्श संगीत नाही पण गाणीच रॉक प्रकारातील त्यामुळे अगदी लेम संगीत नाही, बसण्याच्या वेगवेगळ्या सोयी - बिन बॅग्स, खुर्च्या, लेदर-सोफा आणि अगदी कॅफे बाहेरच्या पायर्या देखील. कॅफेच्या आतल्या भिंतींवर कमर्शिअल आर्ट्स कॉलेज च्या बाहेर जसे चित्रं काढलेले असतात तसे चित्रं, टेबलांवर पेपर, मॅगझीन आणि निवडक पुस्तकं. तुमचं हसून स्वागत करणारे आणि मनापासून तुमची विचारपूस करणारे वेटर्स (इथे सेल्फ सर्व्हीस आहे पण असं नोटीस केलं आहे की आपण आपल्याच गप्पांमधे रमलेलो असू किंवा वाचनात मग्न असू तर ते आपली ऑर्डर टेबलावरही आणून देतात) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉफी पेयातलं वेगळेपण. ह्यांच्या कडे ब्लॅक कॉफी स्टील च्या स्वच्छ अश्या जार मधे सर्व्ह करतात त्या बरोबर फिल्मी स्टाईल दाखवतात तश्या टी-सेट च्या भांड्यातून दुध, साखर, चमचा, पेपर नॅपकिन्स आणि कप-बशी असं देतात. जार मधे लहान आणि मोठा असे दोन प्रकार, लहान मधे दोन जणांची पोटभर कॉफी पिऊन होते. एका सर्व्ह मधे हवी तेवढी कॉफी घेऊन बाकीची जार मधे गरमा गरम ठेऊ शकता आणि लागेल तशी आणि हवा तेवढा निवांत वेळ घेत गरम कॉफीचा आनंद घेऊ शकता. ह्या कॉफी व्यतिरिक्त सिसीडी सारख्या फेसाळ कॉफी ही मिळतात, मफीन्स, पेस्ट्रीज, सॅंडविचेस प्रकारही आहेत पण खरी मजा ती त्यांच्या जार मधल्या कॉफीमधे. माझ्या जिवलग मित्राबरोबर बॅचलर डेज मधे कितीतरी वेळ तिथे घालवला आहे ते सोनेरी दिवस आठवले :)
'कॅफे जार' च्या ह्या अनुभवा मुळे असेल कदाचित पण माझं तेव्हा पासून असं मत झालं आहे की तुमच्या कॅफे मधे काहीतरी वेगळे पण हवं. आणि हा वेगळेपणा फक्त मेन्यू मधेच नको तर त्या कॅफेला स्वतःची अशी एक संस्कृती हवी आणि तीच त्याची खासीयत असावी.
असंच एक वेगळी संस्कृती असलेलं कॅफे एका वर्षापुर्वी बाणेर-पाषाण लिंक रोड वर पहाण्यात आले 'पगदंडी-बुक्स,चाय,कॅफे'. ह्या कॅफे ची संकल्पना नक्कीच वेगळी आणि स्तुत्य आहे. इथे पुस्तकांच्या मांडण्या आहेत आणि त्यावर चिक्कार पुस्तकं आहेत - अगदी शिड्याही लावल्यात त्या मांडण्यांना. आपण जायचं हवं ते पुस्तक घ्यायचं आणि आपण जे काही खायला-प्यायला ऑर्डर करू त्या सोबत हव्या तेवढ्या वेळ तिथे वाचत बसायचं. नावात जरी पुस्तक, चाय, कॅफे असलं तरी ह्यांची खासियत 'फ्रोझन योगर्ट'. इथे खाण्या-पिण्या आणि वाचना बरोबरच वेगवेगळे उपक्रम होतात, जसे कुण्या नवोदित लेखकाला बोलावून त्यांच्याशी संवाद. ह्यात कुठेही माईक, खुर्च्या असं नसतं. आलेला लेखक अगदी आपल्या मधे मांडीला मांडी लावून बागेत गोल करून बसल्या गत बसतो आणि आपल्या गप्पा-टप्पा होतात. कधी कधी तिथल्या नेहमीच्या येणार्यांमधे ठरवून तिथेच केलेले गेट-टुगेदर असतात त्यात पुस्तकांबद्दल चर्चा ई. गोष्टी होतात. पण इथे नेहमी येणारे लोक किंवा असे उपक्रम करणारे लोक ह्यांचा एक चमू झाला आहे आणि त्यांची एक वेगळी घट्ट संस्कृती आहे ज्यात नवीन माणूस फार सहज वावरत नाही आणि म्हणून मोकळेपणा जाणवत नाही. त्यामुळे इथे अॅज-अ-होल कॅफेची ची एक वेगळी संस्कृती असली तरीही ज्याला ह्या समूहाचा भाग न होता स्वतः बरोबर वा आपल्या मित्रांबरोबर वेळ एन्जॉय करायचा आहे त्यांना कुठेतरी परकेपणा जाणवत रहातो (जसं त्या आर्ट-ऑफ-लिव्हींग किंवा इस्कॉन च्या चमूत गेल्यावर फिलिंग येतं तसं काहीसं) त्यात शिवाय मग ते चप्पल-बूट बाहेर काढा वगैरे सारखे नियम आणि मुळात फार छोटी असलेली जागा ह्या गोष्टीही खटकतात.
मी माझ्या प्रतिसादात "कॅफे
मी माझ्या प्रतिसादात "कॅफे जार" म्हणालो आहे पण खरं नाव "कॉफी जार" आहे त्यामुळे ते तसंच वाचावं. गविंच्या धाग्याचं कॅफे हे शिर्षक असल्यामुळे 'कॅफे'च तोंडात नी डोक्यात फिट्ट बसलय ;)
अवांतर - आणि हो ब्लॅक कॉफी सोबत चिझकेक चाखणे, अप्रतिम लागतो. चिझकेक सगळ्यांना आवडतोच असं नाही पण ब्लॅक कॉफीच्या चे झुरके रिचवताना मधेच चिझकेक चा एक तुकडा खाल्ला की तो चिझकेक लाजवाब लागतो. ट्राय करावे, आणि ब्लॅक म्हणजे अगदी ब्लॅक कॉफी हो, अगदी विना सा-ख-र म्हटलं :)
'कॅफेज्'बद्दलचा हा सुरेख लेख
'कॅफेज्'बद्दलचा हा सुरेख लेख इथे दिल्यावाचून राहवेना. (बादवे, हा ब्लॉग 'चिन्ह'मधल्या शर्मिला फडकेंचा.)
लोकं- लोकं
मुख्य कॅफेत येणारं रिलॅक्सड आणि रंगीबेरंगी पब्लिक आवडतं. आमच्या गावात अनेक कॅफे आहेत - रेड मग, एम्पोरिअम, ट्विस्टेड पेस्ट्रीज, स्टार बक्स, अमेझिंग ग्रेस आणखी बरेच. 'रेड मग' मध्ये लोकल आणि वयस्कर पब्लिक येतं, 'एम्पोरिअम' मध्ये फार गर्दी नसते, 'ट्विस्टेड' मध्ये सगळ्या प्रकारचे लोकं येतात.तर स्टार बक्स मध्ये ऑफिस क्राउड आणि खूप आकर्षक लोक (स्त्रिया, मुली ) येतात, कॉफी पिताना, या स्त्रियांची वेशभूषा, कपडे , ॲक्सेसरीज व एकंदर वागणे न्याहाळणे हा माझा छंद आहे. अर्थात त्यांच्या नकळत. तेव्हा स्टारबक्सच आवडते. तिथून जर हे पब्लिक नाहीसं झालं, तर मी जाणार नाही.
रोचक विषय आहे.मला मुड्सनुसार
रोचक विषय आहे.
मला मुड्सनुसार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे कॅफे आवडतात.
माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते तुम्ही इतरांपेक्षा वेगळे/खासियत असलेले - शक्यतो खास तुमचे असे - मला काय देताय हे एक. आणि दुसरे वातावरण फार औपचारीक असलेले मला फारसे आवडत नाही. काउंटरवर सांगकामे नोकर असण्यापेक्षा किंचित उशीरा सर्विस पण पदार्थातले जाणकार कोणीतरी असेल तर अधिक आवडते.
थोडक्यात मला अनोळखी, दिवसातील ग्राहक क्र.१७६० इतकी कोरडी/यांत्रिक/कृत्रिम ओळख असण्यापेक्षा अधिक माझ्याकडे एक चवीने खाणारा "माणूस" म्हणून बघणारी नी माझ्या जीभेवर नी आवडीवर माझा हक्क मला बजावू देणारे कॅफे अधिक आवडतात. साधारणतः काही मिनिटांत एकाच चवीचे नी कधीही न बिघडवणारे यांत्रिक पदार्थ हजर करणारे कॅफे-रोबोज पेक्षा किंचित उशीरा पण पर्सनलाइज्ड सर्विस अधिक प्यारी!