अमिताभ व कबुलीजबाब

नुकतेच जुने जाणते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात असे कबूल केले की सन २००० मध्ये त्याना टीबी रोग झाला होता ,परंतु उपचार घेवून त्यानंतर ते पूर्ण बरे झाले .तरी टीबी च्या पेशंट नी /परिवाराने हताश न होता पेशंटवर पूर्ण उपचार करून घ्यावेत . हे वाचल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले . \

अमिताभ यांनी ही गोष्ट इतके दिवस लपवून का ठेवली ? याआधी मला आठवते त्यानुसार २००० सालच्या दरम्याने त्यांची तब्येत बिघडून हॉस्पिटल मध्ये admit झाले होते व त्यानंतर काही काल सिनेमा/ टीव्ही पासून दूर होते .(त्याच वेळी कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम अमिताभ ऐवजी शाहरुख खानने सादर केला होता ) त्यावेळी आजाराचे कारण पोटदुखी अथवा तत्सम काहीतरी सांगितले गेले होते . याचाच अर्थ टीबी रोगाबद्दल एकूण समाजात असलेले भय अथवा तत्सम भावना आणि टीबी पेशंट ना मिळणारी वागणूक (संसर्गजन्य असल्याने ) यामुळे कुठेतरी " आपल्याला टीबी आहे". हे सांगणे किंवा जाहीर करणे कमीपणाचे वाटले असावे का ? कारण तसे जाहीर झाले असते तर त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला असता का ?किंवा त्यानंतरच्या काळात त्यांच्याबरोबर काम करणार्या इतर अभिनेते/अभिनेत्री यांचा approach बदलला असता का ? किंबहुना एकूणच "अमिताभ" या नावाभोवती असलेले लोकप्रियतेचे वलय कमी होईल या भीतीने इतके वर्षे ही बाब लपवून ठेवली होती का?

आपणास काय वाटते ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

आपणास काय वाटते ?

मला वाटतं अस्स्स्स्स्स्सं छान पिसासारखं उडावं- पाखरांसारखी गाणी गावी आणि माशांसारखं पोहावं. मधमाशीसारखा मध गोळा करून सुंदर सुंदर फुलांभोवती घुटमळावं- काहीतरी शोधावं- काहीतरी हरवावं----
दवणेंसारखं बोलावं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबुलीजबाब ROFL
चालू द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0