डोळ्यांसमोर पसरलंय् हिरवेगार रान
तरीही खुणावतंय् एक कोरडं पान ...
रसरहित पिवळं , शुष्क , निष्प्राण
हवेवर घेतंय् गिरक्या छानं
जशी एक सुरेल तान
क्वचित् थांबतं , पुन्हा उडतं
हलकेच विसावतं , गिरक्या घेत होतं नजरे आड
पिवळं , हलकं , शुष्क , निष्प्राण
कुठेतरी हरवलंय् ते नियतीचं वरदान
नेत्रासमोर खुले पुन्हा लख्ख हिरवे रान
रंगबेरंगी फुलांनी सजलंय
अन तरीही ' नजरेत तरंगतय् '
ते कोरडं पान ...