शाकाहार :- काही नवीन पैलु
नमस्कार.
मी सुमारे सहा सव्वा सहा वर्षापूर्वी खालील धागा टाकला होता मिपावर.
http://www.misalpav.com/node/1740 ही त्याची लिंक.
तेव्हा डोक्यात बराच गोंधळ ,संभ्रम विविध बाबतीत होता.
त्यामानाने आज विशेष संभ्रम नाही.
माझी तेव्हाची सारीच मते आज जशाला तशी आहेत असेही नाही.
शाकाहाराबद्दल मारामारी सुरु होती, त्यात म्हटलं आपणही थोडं चिमूटभर भर टाकून पहावी.
मुद्दा क्र.५ पहावा.
मित्रहो,
जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.
मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते.
जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी.
जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी.
माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः-
१.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंवा फ्यामिली) प्राण्यांचा आहार समान/मिळताजुळता/साम्य असलेला असतो.
जसे घोडा आणि झेब्रा हे एकाच प्रवर्गातील प्राणी.
त्यांच्या शरीरात विलक्षण साम्य आहे.म्हणुन त्यांच्या आहारातही साम्य आहे.
दोघेही हिरवळ चरतात,त्यावर् जगु शकतात.
आता डोळ्यासमोर चित्र आणा की मांजर् उंदीर् पकडते आहे.
दुसरे चित्रः- चित्ता किंवा वाघ ससा पकडत आहेत.
काही साम्य दिसलं? दुसर्या चित्रात उंदीर(भक्ष्य) मोठा झाला आणि बनला ससा
तसेच भक्षक ही मोठा झाला आणि मनी मावशी चा बनला वाघोबा.
बरोबर? कारण हे दिसत की वाघ/चित्ता आणि मनी माउ हे एकाच म्हणजे मार्जार प्रवर्गातील असल्याने त्यांच्या
आहारात हे साम्य आहे.
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. )
त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे.
ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा.
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
२.मांसाहारी प्राण्यांची शरीर रचना वैशिष्ट्य म्हणजे अति तीक्ष्ण दात जबड्याच्या समोरील भागात् असतात.(थोडेफार् ड्रॅक्युलासारखेच,भयावह) उदाहरणः- कुत्रा,वाघ,लांडगा.
येथे, अन्न तोडणे हे मुख्य उद्दिष्ट् आहे, चर्वण नव्हे.
याउलट,शाकाहारी प्राण्यांकडे सहसा अशा दातांचा अभाव असतो.
त्यांचे दात असतात प्रामुख्याने "चर्वण" करण्यासाठी.जात्याच्या दोन दगडात जसे धान्य रगडले जाते,
त्याच प्रकारे अन्न हे ह्या प्राण्यांच्या रुंद पृष्ठभाग असणार्या दातात "रगडले" जाते.
नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा.
(जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.)
ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
३.शाकाहारी प्राणी "चावुन" खातो. मांसाहारी प्राणी चावतो कमी,"गिळतो" जास्त.
("अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"
मिसळली जाते.मांसाहारी प्राण्यात ही प्रक्रिया तेव्हढ्या प्रमाणात होत नाही.(जवल् जवळ् नगण्य.)
माणसाच्या लाळेचे अन्नात मिसळण्याशी गुणोत्तर काढले,तर् ते शाकाहारी प्राण्यांच्या अगदी निकट जाते.
४.ऍपेंडिक्स् हे नाव बर्याच लोकांनी(जवळपास् आपण सर्वांनीच) ऐकले असावे.
काय असते हे ऍपेंडिक्स?
तो आहे मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग.
तो हिरव्या वनस्पती खाणार्या प्राण्यात कार्यरत् असतो.
त्याचे कार्य हेच की:- हरित वनस्पतीतील सेल्युलोज चे पचन करुन त्यातुनही उर्जा मिळवणे.
मानवी शरीरात हा भाग् कार्यरत् नसल्याने हरित भाग उर्जेसाठी वापरता येत् नाही आणि मग विष्ठेतुन बाहेर् टाकला जातो.
पण ह्या अवयवाची उपस्थिती हेच सुचित करते की मानवी शरीर तुर्तास शाकाहारास जवळचे आहे.
शाकाहारच ते प्रमुख्याने नीट पचवु शकते.
५.सहज प्रवृत्ती:-
एका (पाश्चात्त्य)विश्लेषकाचे निरिक्षण आहे ते असे........
तुम्ही एका नुकत्याच थोड्याशा मोठ्या झालेल्या वाघाच्या भुकेल्या बछड्यासमोर किंवा मांजरीच्या पिल्लासमोर एक
सफरचंद ठेवा आणि ठेवा एक छोटेसे जिवंत कोंबडीचे पिल्लु.
नैसर्गिक बुद्धिनुसार्, बछडे त्या पिलाला (भक्ष्य म्हणुन) मारुन खाइल, व सफरचंदाशी खेळत बसेल्.
आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा.
बालक ते सफरचंद खाउन टाकेल आणि त्या पिलाशी खेळण्यात मग्न होइल.
बछडे सफरचंद् खायचा विचारही करणार् नाही.
बालक त्या पिलाला मारुन मग खाण्याचा विचारही करणार नाही.
ह्याचे कारण?नैसर्गिक वृत्ती,नैसर्गिक जाणीव किंवा उपजत् ज्ञान म्हणा हवं तर.
मग ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने
शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
तूम्हाला काय वाटतं?
वरील निरिक्षण,तर्क् आणि निष्कर्ष योग्य दिशेने जाताहेत, की त्यात कुठे काही विसंगती,तर्क् दोष आहे?
Taxonomy upgrade extras
आपण माकडापासून उत्क्रांत
आपण माकडापासून उत्क्रांत झालो, माकडे एकजात सगळी मांसाहारी होती का शाकाहारी? माझा अंदाज, अगदी शिकार करून खात नसले तरी त्यांना मांसाहार वर्ज्य नसावा.
चुभुदेघे चिम्पान्झी वा अन्य कोणत्या तरी प्रजातीमध्ये जी माणसाच्या सर्वात जास्त जवळची समजली जाते, त्यांचे दात माणसासारखे नाहीत, वरती तुम्ही सांगितले तसे मांसाहारास योग्य आहेत.
कदाचित माणूस उत्क्रांत झाला तसे त्याने शिजवणे, भाजणे वगैरे शोध लावले मग "कच्चे मांस खाण्या व पचवण्यासाठी आवश्यक गोष्टींची त्याला गरजच राहिली नसेल?
क्या बोलते मनोबा, पाॅसिबल?
अपेंडिक्सचे उदाहरण ...?? हॅ
अपेंडिक्सचे उदाहरण ...??
हॅ हॅ हॅ..
एखादा शाकाहारपचनाचा अवयव उपयोगाअभावी निष्क्रिय होऊन नाममात्र उरला आणि तरी मनुष्य अजूनही तूर्तास शाकाहाराला जवळचा?
जय हो.
चला.. झाडावर लटकू .. बोटांच्या विरुद्ध अंगठा ही रचना तूर्तास मनुष्य शाखारोही प्राणी आहे असे दाखवते..
शिवाय कण्यातले शेवटचे काही मणके शेपूट असल्याचा पुरावा आहेत..तस्मात ...
हे देखिल पहा.
शाकाहार-मांसाहार या नेहमीच्या यशस्वी लढाईत या बातमीचा उल्लेख करावासा वाटला. या पेलियो डायटमधे मांसाहारावर भर असतो आणि शाकाहारी लोकांना पोषणासाठी अतिशय महत्वाचे असलेले कार्बोहायड्रेट्स निषिद्ध असतात. त्यामागे अलिकडच्या काळात झालेला शास्त्रीय अभ्यास आहे असे हे वाचून वाटले.
व्यक्तीशः मी अशा ताज्या माहितीच्या आधारावर खाण्यापिण्याच्या सवयीत मूलभूत बदल करण्याच्या विरुद्ध आहे कारण परस्परविरोधी असणारे अनेक शास्त्रीय अभ्यास आणि विचारप्रवाह आहेत असे दिसतात. शिवाय अनेकदा पूर्ण अभ्यासानंतर त्यातल्या तृटी समोर येतात. खोबरेल तेल, शेंगदाणा तेल वगैरे बाबतीत 'प्रकृतीसाठी पूर्णपणे वाईट' पासून 'प्रकृतीसाठी अतिशय उत्तम' असे अभ्यास आठ-दहा वर्षांतच झाले आहे आणि आता लोणी, प्राणिजन्य पदार्थ, अंडी या बाबतीतही तेच चालू आहे. तरीही डॉ. टेरी वॉल्सची बातमी विचार करण्यासारखी वाटते कारण त्यामागे त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. अशा प्रकारच्या संशोधनांनंतर आपण शाकाहार की मांसाहार या चर्चेकडे भूतदया, क्रौर्य, धार्मिक चालीरिती, उपलब्धता याच्यापलिकडे जाऊन शास्त्रीय दृष्टीकोनातून पहायची गरज आहे असे लक्षात येते.
जाताजाता पिंक टाकतो -
जाताजाता पिंक टाकतो - शाकाहारात म्हशीचे दूध अंतर्भूत आहे. व म्हशीला आपण गोठ्यात बांधून ठेवतो. तिला गवत खायला अवश्य घालतो पण तिच्या पिलास जन्म देण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर अंकुश लावून आपल्यास हवे तेव्हाच ते घडून देतो. जन्मलेल्या पिलास तिच्याकडून मिळणार्या नैसर्गिक आहारास त्यास (रेडकू) हवा तेव्हा व हवा तेवढा / पूर्ण अॅक्सेस देत नाही. कारण आपल्याला खरवस हवा असतो (असंच काहीतरी आहे. नक्की माहीती नाही.). तेव्हा शाकाहारी लोक कनवाळू नसतात. - असा युक्तीवाद आमच्या मामाश्रींनी केलेला होता. आता त्यांच्या शी वाद घालायला मला टायम नव्हता. पण हा मुद्द्दा इतका सुलभ/सोपा नैय्ये.
एखादा प्राणी हा केवळ
एखादा प्राणी हा केवळ मांसाहारी किंवा केवळ शाकाहारीच असावा हा आग्रह काढून टाकला की गोंधळ उरत नाही.
थोडक्यात उत्तरं
१. मानवाचे निकटच्या प्रजाती शाकाहारी आहेत तेव्हा मानवही असायला हवा. - ही माहिती बरोबर नाही. चिंपांझी उभयभक्षी गणले जातात. ओरांगउटानही अधूनमधून मांस खातात.
२. मानवाचे दात मांस खाणारांसारखे नाहीत. - बरोबर. पण आहेत त्या दातांनी त्याला मांस खाता येत नाही असं नाही. निसर्गात असं एक किंवा दुसरं असं नसतं. जे आहे ते ज्यासाठी वापरता येईल त्यासाठी वापरलं जातं. मनुष्य जर वेगवेगळ्या काळांतून जात असेल तर काही वेळा शाकाहार, मिळेल तेव्हा मांसाहार अशा परिस्थितीशी मिळतेजुळते दात असणं सहज शक्य आहे.
३. चावण्याची क्रिया - उत्तर वरीलप्रमाणेच
४. अॅपेंडिक्स म्हणजे शाकाहाराचा पुरावा आहे. - किंबहुना अॅपेंडिक्सचं निरुपयोगीपण हाच बदलत्या आहाराचा पुरावा नाही का?
५. सहजप्रवृत्ती, सफरचंद, कोंबडीचं पिलू. - पुन्हा मिश्राहारी बनत चाललेल्या प्रजातीची तुलना पूर्णपणे मांसाहारी प्रजातीशी करणं योग्य नाही.
थोडक्यात मानवाची शरीररचना 'अमुक खाण्यासाठी बनली आहे' वगैरे युक्तिवादांना फारसा अर्थ नसतो. गेली कित्येक हजार वर्षं माणूस सर्वच संस्कृतींमध्ये मांस खात आलेला आहे. त्याचा प्रतिवाद 'ठेविले निसर्गे तैसेचि रहावे' असं म्हणून करता येत नाही.
ह्या सगळ्या गोष्टी बर्याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
मानव खात असलेलं अन्न तपासून पाहिलं, तर ते खरंही आहे. सात बिलियन लोकांसाठी तीनशे मिलियन टन मांस बनतं. सरासरी दरडोई सुमारे सव्वाशे ग्रॅम. त्यातून दहा-पंधरा टक्क्यांच्या आसपास कॅलरी मिळतील. बाकीचा सगळा शाकाहारच.
काय राव, लै गोंधळ घालता
धाग्याचा विषय मानव हा शाकाहारी आहे कि मांसाहारी आहे, जैविक निकषांवर हा नाही.
धाग्याचा विषय मानवाला जैविक गरजा भागवण्यासाठी शाकाहार जास्त सुयोग्य आहे कि मांसाहार हा नाही.
धाग्याचा विषय सुबुद्ध, प्रगत, विवेकी, विचारशील, सुसंस्कृत, (काय माणुसकी हाय का नाय असे कधी म्हणणारा) शाकाहारी आणि मांसाहारी मनुष्य यांत कोण अधिक भूतदयावादी आहे हा आहे.
------------
शुद्ध जैविक प्रेरणा पाहिली तर माणूस कपडे घालतो का नाही याने फरक न पडावा. कपडे न घालणारा पुरुष वा स्त्री जैविक निकषांवर तितकेच सुयोग्य वर्तन करते, कदाचित जास्त, जितके घालणारा. शिवाय एखाद्याने कपडे काढले तर असे काय दिसते ज्याचा इतका बाऊ करावा? काय दिसणार हे सर्वसाधारणपणे माहितच असते. मग कपडे न घालणे, कमी घालणे, सूचक घालणे, उत्तान घालणे, दिखावा करणे हे कमी सुसंस्कृत का मानतात? (मी फक्त भारताबद्दल बोलतो. आईसलँडमधे लोक राष्ट्रपतींकडून पदक घ्यायला नागडे जात असतील तर कल्पना नाही.) तर त्या वर्तना निगडीत अनेक भाव आहेत. वाईट हा आरोप कपड्यांवर नसून त्यामागील त्या भावांवर्/तत्त्वज्ञांनावर असतो.
-------------
मानवतेचा सजीवतेचा आदर हा एक हिस्सा आहे. मानवाने ऑर्गॅनिक मॅतर खायचे नाही म्हटले तर मरणे हाच एक पर्याय उरतो. मग सजीवतेच्या स्पेक्ट्रममधले जे उच्चजीव आहेत ते जास्त चविष्ठ आहेत अस्सोनही वनस्पती खाणे हे जास्त भूतदयावादी ठरते. जो प्राणी मनुष्यतेच्या जितका जास्त जवळ तितकी ती हत्या भीषण वाटते. माणसे मारणारी माणसे क्रूर असतातच, पण त्यातही स्वतःच्या बापाला मारनारी माणसे जास्त लॉजिकल म्हणवली जात नाहीत, विकृत म्हणवली जातात, मारणाराला इस्टेट लगेच मिळत असली तरी असेच म्हणतात. काय खायचे यात माणसाला क्रूर असण्याशिवाय पर्याय नाही, पण आपल्या किती निकटचा सजीव संपवायचा याचा सुसंस्कृत चॉइस मानवाची भूतदया दर्शवतोच दर्शवतो.
----------
पर्यायांच्या उपलब्धतेप्रमाणे आणि भारतीय संस्कृतीची प्रेरणा पाहिली तर, दिवसरात्र रेनडिअर खाणारा, त्याचेच दूध वापरणारा, बर्फाळ प्रदेशात राहणार दक्षिण न्यूझिलँडचा वासी भारतीय बटर चिकन खाणारापेक्षा जास्त भूतदयावादी ठरतो. प्रश्न किती मांस खाल्ले हा नाही, एकूण पार्श्वभूमीवर तुम्ही कसे वागत आहात हा आहे.
धाग्याचा विषय मानव हा
धाग्याचा विषय मानव हा शाकाहारी आहे कि मांसाहारी आहे, जैविक निकषांवर हा नाही.
धाग्याचा विषय मानवाला जैविक गरजा भागवण्यासाठी शाकाहार जास्त सुयोग्य आहे कि मांसाहार हा नाही.
धाग्याचा विषय सुबुद्ध, प्रगत, विवेकी, विचारशील, सुसंस्कृत, (काय माणुसकी हाय का नाय असे कधी म्हणणारा) शाकाहारी आणि मांसाहारी मनुष्य यांत कोण अधिक भूतदयावादी आहे हा आहे.
वेगळ्या धाग्यावरही माझ्याच विषयावर चर्चा करावी हा अट्टाहास का?
धागा मनोबांचाय त्यांना ठरवु दे ना विषय
तसे नाहीये
तसे नाहीये, शाकाहारी चांगले असतात आणि मांसाहारी वाईट ह्याला आक्षेप आहे. शिवाय एकदा एखाद्या गोष्टीची सवय लागली की ते बदलणे अवघड जाते. तुम्ही तांदूळ आणि गहू काहीही न प्रक्रिया करता खाऊ शकता असे मला वाटत नाही. ह्याशिवाय डाळी. कदाचित माझे चूक असेल पण भाज्या आणि फळे वगळता सर्वच कच्चे पचेल असे वाटत नाही. म्हणणे इतकेच आहे की एखादा मांसाहार करतो म्हणून तो दया दाखवत नाही आणि एखादा शाकाहारी करतो म्हणून तो जास्त दयाळू आहे ह्याला फक्त आक्षेप आहे. दोन्ही कडे दया दाखवणारे आणि न दाखवणारे असतात एवढेच म्हणणे आहे.
तसाही नसलेले स्वल्पविराम,
तसाही नसलेले स्वल्पविराम, पूर्णविराम वगैरे योग्य जागी घालण्यात मी चुका करत असेन कदाचित.
हे वाचलेले दिसत नाही.
'मी'नंतर स्वल्पविराम घातला तरी उरलेले पुढचे वाक्य अर्थपूर्ण होऊ शकते (करतेय हे तृ.पु. ए.व. किंवा प्र.पु. ए.व. स्त्रीलिंगी रूप असले तरी इथे संदर्भावरून प्र.पु. आहे हे ओळखता येऊ शकते आणि मनातल्या मनात आपण मी हा कर्ता वाचू शकतो). स्वल्पविरामाच्या अभावावरचा एक पीजेचा प्रयत्न होता झाले! :)
किंवा
स्वल्पविरामाच्या अस्तित्वावरच त्या वाक्यापुरता पूर्णविराम लागला.
किंवा
स्वल्पविरामाच्या अभावानं तिथं प्रश्नचिन्ह निर्माण झालं
किंवा
स्वल्पविरामाला वाक्यात आराम देण्याचे काम ही आजकालची आम बात आहे.
किंवा
वक्यातील नाम सर्वनाम ह्यांत नाही स्वल्पविराम , त्याला आराम द्यायचं केलं गेलय काम.
माणूस अन्य मांसाहारी
माणूस अन्य मांसाहारी जनावरांप्रमाणे कच्च मांस पचवू शकत नाही. माणूस सर्व प्रकारचे शाकाहारी अन्न कच्च खाऊ शकतो आणि पचवू ही शकतो.
हे बरोबर नाही. इथे एक रोचक चर्चा आहे.
We can pretty much eat anything but the really hard plant material like Lignin, Cellulose, and Hemicellulose.
मला हा एकूणच युक्तिवाद 'चालणं सोपं असतं, धावणं कठीण असतं - तद्वतच मनुष्याचं शरीर चालण्यासाठी निर्माण केेलं आहे, धावण्यासाठी नाही' या स्वरूपाचा वाटतो.
मला हा एकूणच युक्तिवाद 'चालणं
मला हा एकूणच युक्तिवाद 'चालणं सोपं असतं, धावणं कठीण असतं - तद्वतच मनुष्याचं शरीर चालण्यासाठी निर्माण केेलं आहे, धावण्यासाठी नाही' या स्वरूपाचा वाटतो.
घासकडवीय युक्तिवाद नावाची तत्त्वज्ञानाची नविन शाखा प्रस्थापित करायला पाहिजे ब्वॉ. दोन उदाहरणे देतो.
-----------
'रन होणं सोपं असतं, थांबणं इष्ट नसतं - म्हणून मशीन रन करण्यासाठी निर्माण केेलं आहे, थांबवण्यासाठी नाही' या स्वरुपाचा युक्तिवाद चूक - इति राजेश.
---------
दोन हात दोन पाय यांच्यासोबत जगणं सोपं असतं, एकच हात आणि एकच यांचेसोबत जगणं कठीण आहे- म्हणून मानव हा दोन हात आणि दोन पाय यांच्यासह जगण्यासाठी निर्माण केला आहे हे चूक आहे. - इति राजेश.
----------
मजा आ गया पढ के.
मजा आ गया पढ के.