Skip to main content

बागकाम

बागकामासंबंधी धागे या प्रकारात मोजावेत.

बागकामप्रेमी ऐसीकर - २०१७

Taxonomy upgrade extras

या वर्षी काय-काय पेरलंय/पेरणार?

मी (गावठी वाणाचे) टोमॅटो, भेंडी, (कमी तिखट जातीच्या) मिरच्या, कुर्जेटं आणि बेझिल लावले आहेत. फुलांमध्ये या वर्षी लिल्यांचे कंद लावलेले उगवून आले, फुलंही आली आहेत. ग्लॅडीओलाचे कंद उगवून आल्येत, पण फुलं यायला वेळ आहे. गेल्या वर्षी लावलेल्या झिनियाची फुलं तिथे टाकली होती, त्याची तीन झाडं उगवून येत आहेत. जर्बेराची दोन झाडं थंडीत टिकली, तीही फुलायला लागल्येत. सगळ्यांचे फोटो सवडीनं.

आजच गेल्या वर्षी लावलेल्या स्ट्रॉबेरीची दोन फळं आणि मोगऱ्याची तीन फुलं मिळाली. या वर्षी सायली (स्टार जाझ्मिन) लावली, त्यांचे फोटो.

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - ३

Taxonomy upgrade extras

ठाण्याजवळच्या लोकांनी कोपरी पुलाजवळ सर्विस रोड कडून प्रवेश असणाय्रा दत्ताजी साळवी उद्यानास भेट द्यावी.सार्वजनिक बाग किती चांगली असू शकते याचे उदाहरण.

भेंडी! सल्ला हवा आहे.

Taxonomy upgrade extras

सूचना -
१. थंड हवामानात राहणाऱ्या आणि बागकाम करणाऱ्या आमच्या मैत्रीण रुची ह्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जळवण्यासाठी हा धागा काढलेला नाही.
२. भेंडी कशी लावावी ह्या विषयावर इथे चर्चा होऊन वाचकांना भेंडी लावण्याची इच्छा झाल्यास धागाकर्ती त्याला जबाबदार नाही.
३. भेंडीसारखे बुळबुळीत प्रतिसाद मनावर घेतले जातील. त्यामुळे भलत्या ठिकाणी भेंड्या (होय, भेंड्या) टाकू नयेत. लोकांना घसरायला होईल.

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - २

Taxonomy upgrade extras

भाजी करण्यासाठी आणलेल्या कारल्याच्या आणि लाल भोपळ्याच्या बिया वेगवेगळ्या कुंड्यांमधे टाकल्या होत्या. त्या चांगल्या रुजल्या आहेत. आणि त्याचे वेल भराभर वाढताहेत.

आणि मी लावलेल्या मोगर्‍याला सुद्धा २५ ते ३० कळ्या लागल्या आहेत. परंतु त्यांचा जन्म काळ वेगवेगळा असल्याने.. एकाच वेळी सर्व फुलणार नाहीत असे दिसतय. रोज २ ,३ . त्या मुळे घरच्या मोगर्‍याचा गजरा करण्याला अजून बराच अवकाश आहे. ( तो पर्यंत गजरा माळण्याएव्हढे माझे केस वाढवायची मला संधी आहे. )

बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - १

Taxonomy upgrade extras

मागच्या वर्षीच्या चर्चेतून प्रेरणा घेवून मी ह्यावर्षी बागकाम ( मायक्रोस्केल वर ) चालू केलंय तर जरा अनुभवी बागकामकरांकडून मार्गदर्शनाची गरज आहे !

मायक्रोस्केल म्हणजे ३-४ च कुंड्या आहेत.
१. जागा - मी अपार्टमेंट मध्ये राहते तरीही जागा पुष्कळ आहे. मोठी बाल्कनी आणि दर्शनी भागात ( मुख्य दरवाजा उघडतो तेथे , जिना सुरु होण्याआधी ) पण जागा आहे . बागकाम कुंड्यातच करणार आहे
२. सूर्यप्रकाश - भरपूर ; दक्षिण दिशेला बाल्कनी आहे.
३. हवामान/ थंडी - मी सॅन डिएगो मध्ये राहते त्यामुळे थंडीचे दिवस फार कमी . हवामान उष्ण व कोरडे .