Skip to main content

दुआ

या तर, सरसावू कर आपणही,
आम्हां, ज्यांना अनुष्ठाने स्मरतही नाही..

आम्हीं जे प्रेमाच्या ध्यासाशिवाय
कोणती मुर्ती कोणता ईश्वर ध्यानी ठेवत नाही..

या तर, ढळू देऊया हा जीवंततेचा झरा,
रोजरोजच्या धबडग्यात उद्याची शीतल चांदणं माळूया...

ते जे अहर्निशी पिळवणूकीत हताश पडलेत,
त्यांच्या पापण्या फडफडू देत अंधार आणि उजेडाच्याही पलीकडे..

ज्यांच्या दृष्टीसमोरून सकाळची किरणेही सरत नाही,
त्यांच्या रात्रींत कुठलासा दिवा उजळू दे..

ज्यांच्या पावलांमध्ये कुणावरचा विश्वास दिसून येत नाही,
त्यांच्या नजरेत कुणीतरी दृढता भरू दे..

ज्यांची श्रद्धास्थाने बेगडी आहेत,
त्यांना बेदखल होण्याची हिम्मत आणि बेबनाव करण्याची दिलेरी येऊ दे..

ज्यांचे शीर कलम होण्याच्या प्रतीक्षेत आहे त्यांना
वध करणार्‍याला झटकून देण्याची ईश्वरी मुभा मिळू दे..

वेड लागण्याची सुप्त तर्‍हा ज्यामुळे धडधडते आहे,
आज स्वीकारली जाऊ दे, आणि व्याकुळता विरू दे..
सत्यतेची खटकी हृदयात अशी खटकते काट्यासारखी..
ती अशी प्रत्यक्ष प्रवाही होऊ दे, आणि क्लेश सारे पसार होऊ दे..

फ़ैज़ अहमद फ़ैज़

आइए हाथ उठाएँ हम भी
हम जिन्हें रस्म-ए-दुआ याद नहीं

हम जिन्हें सोज़-ए-मोहब्बत के सिवा
कोई बुत कोई ख़ुदा याद नहीं

आइए अर्ज़ गुज़ारें कि निगार-ए-हस्ती
ज़हर-ए-इमरोज़ में शीरीनी-ए-फ़र्दा भर दे

वो जिन्हें ताब-ए-गिराँ-बारी-ए-अय्याम नहीं
उन की पलकों पे शब ओ रोज़ को हल्का कर दे

जिन की आँखों को रुख़-ए-सुब्ह का यारा भी नहीं
उन की रातों में कोई शम्अ मुनव्वर कर दे

जिन के क़दमों को किसी रह का सहारा भी नहीं
उन की नज़रों पे कोई राह उजागर कर दे

जिन का दीं पैरवी-ए-किज़्ब-ओ-रिया है उन को
हिम्मत-ए-कुफ़्र मिले जुरअत-ए-तहक़ीक़ मिले

जिन के सर मुंतज़िर-ए-तेग़-ए-जफ़ा हैं उन को
दस्त-ए-क़ातिल को झटक देने की तौफ़ीक़ मिले

इश्क़ का सिर्र-ए-निहाँ जान-ए-तपाँ है जिस से
आज इक़रार करें और तपिश मिट जाए

हर्फ़-ए-हक़ दिल में खटकता है जो काँटे की तरह
आज इज़हार करें और ख़लिश मिट जाए