Skip to main content

राजकारण

अमोघ वक्तृत्वशैलीचा बहर

पंचावन्न किंवा साठ वर्षांपूर्वीची एक स्पष्ट आठवण मला अजूनही आहे. मी त्या वेळेस एक शाळकरी मुलगा होतो. एका रविवारच्या दुपारी माझे एक मामा टापटिपीचे कपडे करून कोठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत मला दिसले होते. हे माझे मामा चाकरमानी असल्याने रविवार म्हणजे आपला हक्काचा सुट्टीचा दिवस असे बहुसंख्य चाकरमान्यांप्रमाणे मानत आणि रविवारची दुपार सर्वसाधारणपणे लोळण्यात आणि वृत्तपत्र वाचनात घालवत असत. साहजिकच मला आश्चर्य वाटले व मी मामाकडे तो आज रविवार दुपारचा कसा काय आणि बाहेर कोठे चालला आहे? अशी पृच्छा केली. त्याने मला आपण एका मीटिंगला चाललो आहोत एवढेच सांगितले. मला फारसे काही कळले नाही व मी गप्प राहिलो.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्‍या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स