Skip to main content

सामाजिक

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

तरीही मुरारी देईल का?

एका भाषेतल्या पुस्तकावर दुसऱ्या भाषेत लिहिताना शीर्षकापासून ठेचकाळणं काही खरं नाही. “The Great Derangement” या अमिताव घोषच्या नव्या पुस्तकाच्या शीर्षकातल्या “derangement” चं चपखल भाषांतर काय असावं? "वेडाचा झटका" हा तसा शब्दशः अर्थ, पण अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो "त्रुटी"कडे जास्त झुकणारा. शीर्षकापासूनच कोड्यात टाकणाऱ्या या पुस्तकाने अनेक कोडी उभी केली. काही सोडवली, काहींची उत्तरं पटली नाहीत, काही कोडी आहेत हेच नवीन ज्ञान झालं.

समीक्षेचा विषय निवडा

हिंदू संस्कृतीचे अभ्यासपूर्ण विश्लेषण

काही वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक व्ही एस नायपॉल यांनी भारताच्या विदारक स्थितीला ‘प्राणांतिक जखम झालेली संस्कृती’ (wounded civilization) असा उल्लेख केला होता. परंतु Culture Can Kill या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, एस सुबोध यांच्या मते या संस्कृतीवरील जखम कधीच बरी न होणारी आणि शेवटपर्यंत क्लेशदायक ठरणारी आहे. या मरणासन्न जखमी अवस्थेवर वेळीच तातडीचे उपाय न केल्यास मृत होण्याची शक्यता जास्त आहे. खरे तर ही स्मशानयात्रा किती खर्चिक असणार आहे, याचाच आता विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा प्रकारची विधानं अनेकांना दुखी करतील वा वाचताना रागही येईल.

समीक्षेचा विषय निवडा

वेलबेकची बत्तीशी वठेल काय?

गांधीजींना म्हणे कोणीतरी विचारलं, "व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन?" आणि ते म्हणे म्हणाले, "इट वुड बी अ गुड आयडिया!"' आता गांधीजींना जॉन रस्किन, विल्यम मॉरिस, टॉल्स्टॉय वगैरेंचं प्रेम होतं. ख्रिस्ती धर्माबद्दल आदर होता. त्या धर्मातल्या काही प्रार्थनाही गांधींजींच्या आश्रमांमध्ये म्हटल्या जात. तेव्हा जर गांधीजींनी वरच्या प्रश्नोत्तरांतला कठोर विनोद केला असेलच, तर ते मैत्रीतल्या चिडवा-चिडवीसारखंच असणार. तसं करायची विनोदबुद्धी गांधीजींमध्ये नक्कीच होती. एक हेही लक्षात घ्यावं, की त्या विनोदाला हिंदुत्ववाद्यांचा प्रतिसाद जास्त असतो तर गांधीवाद्यांचा कमी. हे अर्थात माझं निरीक्षण आहे.

समीक्षेचा विषय निवडा

Syriaतले घर थकलेले... संन्यासी

"घर थकलेले... संन्यासी" ह्या कवितेच्या पहिल्या ३ शब्दातच ग्रेस यांनी सगळं सांगून टाकलं असावं! इतकी अर्थघन शब्दयोजना. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वररचनेतला दोन शब्दांमधला तो जीवघेणा अंतराळ.... त्यात निर्वासितांचं अस्तित्वच नव्हे, तर "टांगणीला" लागलेल्या जीवाचा दाटलेला हुंदका आहे!

समीक्षेचा विषय निवडा