Skip to main content

शिक्षणव्यवस्था

IIT आणि USA

आजकाल आयआयटी / आय आय एम मधील अनेक विद्यार्थ्यांना campus इंटर्व्यू मध्ये किंवा त्यानंतर लगेच सुमारे १ कोटी प्रतिवर्ष पगार देणार्‍या अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या मिळतात . इतरांना देखील गेलाबाजार 10 ते 20 लाख प्रतिवर्ष पगाराचे जॉब अमेरिकेत / परदेशात ऑफर होतात . किंबहुना आयआयटी करणारांचे उद्दीष्ट अमेरिकेत / परदेशात सेटल होणे हेच असते , मग अशा परदेशगमनोच्छुक व परदेश-रहिवासोच्छुक मंडळींच्या शिक्षणाचा खर्च भारतीय करदात्यांच्या पैशातून कशाला?

पर्यायी शाळांविषयी प्रश्न

काल योगायोगाने एका "अपारंपारिक " म्हणवणार्‍या शाळेची भेट घडली. बागडणारी मुले, प्रयोगातून शिक्षण, अनौपचारिक शिक्षण वगैरे केवळ (सं)कल्पना असतात अशी माझी समजूत होती. या शाळांचे प्रथम दर्शन तरी सुखावणारे होते.
अपारंपारिक/परर्यायी याची व्याख्या ढोबळ असली तरी पुण्यातल्या अक्षरनंदन / स्टैनर स्कूल/स्वधा अशा शाळा अपारंपारिक म्हणून गणता याव्यात.

अर्थात काही प्रश्न पडले आहेत
जसे
- या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला खरेच समर्थ पर्याय आहेत का ? वा शिक्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी नवीन फ्याड येत असते हे तसे तर नव्हे ??

संदर्भ देण्याची गरजच काय ?

'उब' आणि 'कॉपेब' या पदव्यांचा अर्थ काय ? उब म्हणजे 'उचलेगिरी बहाद्दूर' आणि कॉपेब म्हणजे 'कॉपीपेस्ट बहाद्दर'. चारएक वर्षापुर्वीच आरोप झालेल्या जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील तथाकथीत संशोधन चौर्य प्रकरणी, सन्माननीय दैनिक सकाळने त्यांच्या अग्रलेख आणि बातम्यातून अचानक पुन्हा एकदा धूण धुण्यास घेतल्या प्रमाणे चर्चा का चालू केली आहे ते माहित नाही.

माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातले ट्रेनिंग प्रोग्राम

अलिकडे आय टी क्षेत्रातल्या प्रोजेक्टचे नवे लचांड अंगावर येऊन पडले आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला काही प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे ते १-२-३ दिवसावाले, सहसा हॉटेलात, इ होणारे, सर्टीफिकेटपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व असणारे नि बर्‍यापैकी मिड लेवल किंवा अ‍ॅडवान्स. येत्या वर्षात मला किमान ५-७ कोर्सेस करावे लागतील असे वाटते. त्यांचे स्वरुप/कंटेट कसे असेल याचा माझा अंदाज मी खाली देत आहे. मी असे कोर्सेस नेटवर शोधले, पण मिळाले नाहीत. म्हणून ते कोणी घडवून आणणार्‍या कंपन्या इ माहित असतील तर सांगा. अशा कंपन्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या (मुंबै सोडून) सांगाल तर उत्तमच!

सत्यजित राय आणि रित्विक घटक यांच्या फिल्म्स का आवडतात?

सत्यजित राय आणि घटक यांच्या फिल्म्स मी पाहण्याचा प्रयत्न करत आहे. खूप संथ आणि बोर वाटत आहे. मी कुठल्याच प्रकारे त्यातल्या पात्रांबरोबर आणि गोष्टीबरोबर कनेक्ट होऊ शकत नाही.
बाकी तितक्याच संथ अन्तोनिओनि च्या द पसेंजर मधली पात्र जवळची वाटतात.

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली.

कोव्हीड-१९ आणि शैक्षणिक तूट : अभियानात्मक प्रयत्नांची गरज

कोव्हीड-१९मध्ये शालेय विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक तूट झाली त्याबद्दल सांगताहेत किरण लिमये.