Skip to main content

सत्यजित राय आणि रित्विक घटक यांच्या फिल्म्स का आवडतात?

सत्यजित राय आणि घटक यांच्या फिल्म्स मी पाहण्याचा प्रयत्न करत आहे. खूप संथ आणि बोर वाटत आहे. मी कुठल्याच प्रकारे त्यातल्या पात्रांबरोबर आणि गोष्टीबरोबर कनेक्ट होऊ शकत नाही.
बाकी तितक्याच संथ अन्तोनिओनि च्या द पसेंजर मधली पात्र जवळची वाटतात.

नगरीनिरंजन Thu, 10/04/2014 - 17:05

कुमारवयात पाहिलेला सत्यजित रेंचा "गोपी गाइन बाघा बाइन" हा चित्रपट आवडला होता.
बाकीचे अजून पाह्यचेत; त्यामुळे चर्चा वाचण्यास उत्सुक

अमुक Thu, 10/04/2014 - 17:31

घटक यांच्या 'सुवर्णरेखा' या चित्रपटातले कॅमेरावर्क पाहा. विमानपट्टीची दृश्ये , सुवर्णरेखा नदीभोवतालची दृश्ये, इ. विशेषकरून.

चिंतातुर जंतू Thu, 10/04/2014 - 18:07

सदर अभिव्यक्तीत घेतलेली दिग्दर्शकांची नावे - सुमारे १२ (चूभूद्याघ्या)
लिखाणात एकूण वाक्यसंख्या - सुमारे ३३ (चूभूद्याघ्या)
झोल आहे, झोप येते, बोर मारतो, लैच भारी, आवडतो, फ्रीक्वेन्सी जुळते, सटकलाय, धन्य आहे, पॉइन्ट दिसत नाही इ. इ. म्हणजे मापे काढणारी, शेरेबाजी असलेली किंवा स्तुती असलेली वाक्यसंख्या - सुमारे २७ (चूभूद्याघ्या)

सबब, सदर लिखाण ट्रोल पातळीचे वाटते. त्यात विशेष दखल घ्यावी असे काहीही आढळत नाही. त्यामुळे अल्पमती जंतूचा पास. बाकी आपल्या अभिव्यक्तीबद्दल काय बोलावे? 'चर्चा' चालू राहावी.

सुशेगाद Thu, 10/04/2014 - 19:35

In reply to by चिंतातुर जंतू

स्पष्ट अभिव्यक्ती करायला काय हरकत आहे. हा थोडेच बायबल/ मुक्तपीठ मध्ये लिहितोय मी. माप काढली थोडी तर काय बिघडलं? जे वाटत ते बोलाल कि लगेच त्रोल काय ?

चिंतातुर जंतू Fri, 11/04/2014 - 10:47

In reply to by सुशेगाद

>> स्पष्ट अभिव्यक्ती करायला काय हरकत आहे. हा थोडेच बायबल/ मुक्तपीठ मध्ये लिहितोय मी. माप काढली थोडी तर काय बिघडलं? जे वाटत ते बोलाल कि लगेच त्रोल काय ?

स्पष्ट अभिव्यक्तीला आणि मापं काढण्याला काहीच हरकत नाही. मात्र मग तुमचीही मापं काढली गेली तर त्यासाठी तयारी हवी.

  1. तुमची अभिव्यक्ती ट्रोल का आहे ह्यासाठी मी वर संख्याशास्त्रीय कारणं दिली आहेत. त्यांचा काहीच प्रतिवाद तुमच्याकडून नाही.
  2. राय आणि घटक ह्यांच्या चित्रपटांविषयी शंका असतील, तर तारकॉव्हस्की बालिश आहे, गोदारचं डोकं सटकलंय, मणी कौलच्या फिल्म्स काय फिल्म्स असतात का, वगैरे विधानं केल्यामुळे किंवा इतर दहाजणांची मापं काढण्यानं त्या चर्चेला दिशा मिळेल असं तुम्हाला का वाटतं?
  3. पाथेर पांचाली पाहताना तुम्हाला झोप आली. 'बरं, मग?' किंवा धनंजय ह्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना झोप आलेली नसल्याची कबुली ह्या पलीकडे ह्याचा प्रतिवाद काय केला जाऊ शकतो? का करावा?
  4. आणि कम्युनिस्टांबद्दल तुमच्या असलेल्या भावनांचा राय / घटक ह्यांच्याशी नेमका काय संबंध लागतो?

बाकी अभिव्यक्ती वगैरे चालू द्या.

अनुप ढेरे Thu, 10/04/2014 - 18:26

विषय आवडता आहे. तुमचे काही मुद्दे चांगले आहेत.
चित्रपट आपला आपल्यालाच आवडला तर मजा आहे, एकदाच बघितल्यावर वा २-३ वेळा बघितल्यावर. उगीच कोणी समीक्षकानी काहीतरी लिहिलेलं वाचल्यावर 'आवडला!' अशी स्वतःचीच समजूत घालून घेण्यात काही मजा नाही. त्यामुळेच मला चित्रपट रसग्रहण वर्ग अश्या गोष्टींना लोक का जातात हा प्रश्न पडला आहे? एखाद्या कलाकृतीमधील सौंदर्यस्थळे स्वत:च स्वतःला समजली तर त्यात जास्त मजा येते असं मला वाटतं भले त्याला कितीही वेळ लागो.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 10/04/2014 - 18:55

अर्ध्या तासानंतर आपोआप झोप लागते. झोप कधी लागते हे कळतच नाही. नक्की काय झोल आहे.

इतर वेळी झोप कधी लागते हे समजतं का? सर्वसामान्य लोकांना झोप कधी लागते हे समजत नाही. जे समजू शकत नाही ते समजायलाच हवं या अट्टाहासाने तुम्ही चित्रपट पाहता असा संशय येतो. त्याऐवजी जे आकलनाच्या कक्षेच्या आत आहे तेच समजून घ्यायचा प्रयत्न करत रहा.

सुशेगाद Thu, 10/04/2014 - 19:29

इमोशनल होऊन थोड ट्रोलिश लिखाण झाल आहे. एडीट करून व्यवस्थित शब्दात मांडायचा प्रयत्न करतो. म्हणन एवढाच आहे कि तुम्हा लोकांना राय आणि घटक यांच्या फिल्म्स मधल्या कुठल्या गोष्टी आवडतात.
मी प्रामाणिकपणे राय यांच्या फिल्म्स बघायचा आटोकाट प्रयत्न केला पण नाही समजत नक्की काय खास आहे. राय आणि राजा परांजपे यांच्या फिल्म्स सारख्याच वाटतात.
टेरेंस मलिक च्या फिल्म्स समजतात अस नाही म्हणत मी पण कमीत कमी एन्जोय तरी करतो तो अनुभव तास राय/घटक यांच्या बाबतीत होत नाही. आता त्यांच्या समकालीन दिग्दर्शकांविषयी बोलायचं म्हंटल तर फेलिनी बघताना पण मजा येते/ छान वाटत/ बर्याच काळाकरिता चित्र डोक्यातून पुसली जात नाहीत. हिच्कोक कडे चांगली गोष्ट असते.
तर्कोवास्की ची कुठली तरी फिल्म बघत होतो अर्धा तास साला सायकल वरून तात्त्विक गोष्टींवर गप्पा मारत काय फिरत आहेत. एकदम स्लो कॅमेरा. काहीच घडत नाही.
आता काहीच न घडणार्या फिल्म्स देखील बर्याच असतात.आता किरोस्तमी ची टेस्ट ऑफ चेरी मध्ये किंवा टेन मध्ये काहीच घडत नाही खास पण तरीसुद्धा फिल्म धरून ठेवते. अन्तोनिओनी ची दि पसेंजर स्लो आहे तरीपण बोर मारत नाही. तर्कोवास्की लैच बोर मारतो. नक्की तुम्ही काय बघता त्यांच्या फिल्म्स मध्ये?अस कुठल रहस्य आहे. का माझा आर्ट क्वोशंट कमी आहे?

जनरली फिल्म्स फेस्त नंतर लोकांच्यातले संभाषण

"आहाहाहा काय फिल्म्स होती अफाट तुम्हाला कशी वाटली?"
नक्की काय अफाट वाटल ते सांगता पण येत नाही काही लोकांना. काही लोक काहीतरी अतार्किक न पटणारी अधायात्मिक स्पष्टीकरण देत बसतात.
असे सगळे कॉमि लोकांनी एकत्र येऊन ना इन्तेलेक्चुअल 'कम' उधळतात वैतागच!!!!

धनंजय Thu, 10/04/2014 - 20:22

मी जेव्हा "पथेर पांचाली" बघितला तेव्हा झोप लागली नाही. त्याच प्रमाणे "जलसाघर", "गोपी गाईन बाघा बाईन", "सीमाबद्ध" चित्रपटही आवडले.

काही चित्रपट काही लोकांना कंटाळवाणे वाटतात हे खरे आहे. मी स्वतः कुरोसावाचा राशोमोन वर्षातून एकदा तरी पुन्हा बघतो, डीव्हीडी विकत घेतली आहे, वगैरे - म्हणजे उगाच आवडतो असे म्हणत नाही, तर वेळ आणि पैसा खर्च करून आवड दाखवली आहे (put my money where my mouth is). तरी माझ्या काही आप्त मित्रांना तो चित्रपट कंटाळवाणा वाटतो. त्या विवक्षित आप्त मित्रांचे मत त्यांच्यापुरते प्रामाणिक आहे, असे मला वाटते.

अशा मित्रांशी मी मग या चित्रपटाबद्दल चर्चा करत नाही. आणि हे मित्रसुद्धा माझ्यावर खोटी आवड सांगितल्याचा आरोप करत नाहीत. म्हणून मैत्री शाबूत राहाते.

कोण्या व्यक्तीला या चित्रपटांतील माझी "आध्यात्मिक वगैरे*" आवड चर्चायची असेल, म्हणा. तर माझी आवड ढोंगी आहे, असे त्या व्यक्तीचे गृहीतक असल्यास चर्चा विफळ होते, आणि मनस्ताप होण्यापूर्वी थांबल्यासच बरे. ते गृहीतक ठेवल्यास डिवचणे हेच उद्दिष्ट्य असलेला विसंवाद = डंखीणगप्पा** (ट्रोलिंग) ओळखून न-बोललेले बरे.

-------------
*आध्यात्मिक वगैरे : माझ्या बाबतीत यांच्या अंतर्गत अनुभवांची उत्कटता जाणवणे, पात्राचे अंतरंग ओळखून अनुभवाशी समरस होणे, तंत्रामुळे वातावरणाचा किंवा पार्श्वसंगीताचा परिणाम गहिरा होणे, वगैरे, समाविष्ट आहेत. दैवी आविष्कार वगैरे नाही. परंतु चर्चाप्रवर्तकाने "आध्यात्मिक" शब्द वापरला, म्हणून मी तो वापरला.

**"डंखीण" शब्द डाकिनी वरून आलेला असला, तरी अपभ्रंशाच्या योगायोगाने शब्दात "डंख" शब्द उद्भवलेला आहे. शिवाय कबीर म्हणतो :
कबीर माया डाकिनी, सब काहू को खाय
दांत उपारुं पापिनी, सन्तो नियरै जाय।
डाकिनीचे हे रूप थोडेफार ट्रोलिंगसारखे वाटते.

ऋषिकेश Fri, 11/04/2014 - 10:25

मी रे यांचा "देवी" (१९६०) पाहिला आहे. मला तो आत्यंतिक आवडला होता - आवडतो. संग्रही ठेवला आहे.

किमान तो चित्रटट तुम्ही म्हणताय त्या पठडीतील नाही. कथेला काहिसा संथ वेग असला तरी कथा साचलेली नाही - प्रवाही आहे किंवा मधेच अनावश्यक अवकाश येत नाही.

सुशेगाद Fri, 11/04/2014 - 17:21

माझी माप काढायला काही हरकत नाही.
१. संख्याशास्त्र आणि ट्रोल यांना कुठल्या आलेखावर तोलून तुम्ही निष्कर्ष काढले ते माहिती नाही. एकूणच चर्चा व्यापक व्हाव्ही म्हणून दहा बारा अन्य लोकांची नाव घेऊन त्यांच्याबद्दल एका वाक्यात मत सांगितलं
२. इवांस चाईल्डहूड बालिश आहे अस म्हंटल होत तर्कोवास्की नाही. बाकी एकेका वाक्यात तो तो दिग्दर्शक कसा वाटतो ते सांगितलं.
३. झोप येणे याचा लिटरल अर्थ का घेताय?झोप येणे म्हणजे कंटाळा येणे , बोर होणे , रस निर्माण न होणे असे अनेक कंगोरे असू शकतात. त्यांना झोप आली नाही म्हणजे त्यांना काहीतरी रुची वाटली फिल्म मध्ये तर नक्की काय अनुभव आला अस विचारायचं होत.
४. जगातले मोस्ट ऑफ द ऑफ बिट कलाकार हे डाव्या विचारसरनिकडे झुकलेले असतात हे तरी सत्य आहे?

आणि मला एक गोष्ट काळात नाही मी ट्रोल आहे का नाही या प्रश्नात एवढा गुळ काढण्यापेक्षा चर्चेचा विषय चघळणे सोपे राहील नाही का?

रमताराम Fri, 11/04/2014 - 21:27

In reply to by सुशेगाद

जगातले मोस्ट ऑफ द ऑफ बिट कलाकार हे डाव्या विचारसरनिकडे झुकलेले असतात हे तरी सत्य आहे?>> चौथ्या प्रश्नातील निष्कर्षाशी सहमत. अविचारी झापडबंद जगणार्‍यांच्या जगात एखादा माणूस विचार करू लागला की डाव्या बाजूला झुकतोच.

बॅटमॅन Sun, 13/04/2014 - 00:23

In reply to by रमताराम

अविचारी झापडबंद जगणार्‍यांच्या जगात एखादा माणूस विचार करू लागला की डाव्या बाजूला झुकतोच.

अगदी अगदी. कृती विसरून फक्त विचारच करत राहिला तर डा'वी बाजूच दिसेल. कृती करायची असेल तर मात्र उज'वी अथवा मध'ली बाजू विचारात घ्यावी लागेल. ते झेपलं तर ठीक, नपेक्षा या ना त्या भित्तिकांस तुंबड्या लावण्यात परिणती होते.

सुशेगाद Fri, 11/04/2014 - 22:25

डाव्या विचारांकडे जे लोक झुकतात ते पलायनवादी असतात अस वाटत. त्यांना या सगळ्या अवघड परिस्थितीवर उपाय काय आहे हे कळत नसल्यामुळे ते बर्यापैकी अनार्किस्ट लोक असतात अस माझ मत आहे. चुभूदेने .

'न'वी बाजू Mon, 14/04/2014 - 00:15

In reply to by सुशेगाद

डाव्या विचारांकडे जे लोक झुकतात ते पलायनवादी असतात अस वाटत.

पळून जाण्याकरिता कष्ट घ्यावे लागतात. पक्षी: काहीतरी करावे लागते. उलटपक्षी, वर श्री. रा. रा. ब्याटम्यान यांनी (अचूकपणे) प्रतिपादल्याप्रमाणे, आम्ही काहीही करत नाही.

सबब, आपल्या वाटण्यात काहीही तथ्य नाही.

क्यू. ई. डी.

----------------------------------------------------------------------

(अतिअवांतर: 'भडकाऊ', प्लीज!)

ऐसि पाहुणा Sat, 12/04/2014 - 08:11

'संथ वाहते कृष्णामाइ, तिरावरल्या सुखदु:खांचि जाणिव तिजला नाहि' असे तुमचे आवडते राजा परांजपेच सांगुन गेले भाउ. तसेच कलाकृतिंचे आहे. तुम्हि झोपल्यामुळे चित्रपटाचि रिळे फिरणे थोडेच थांबवणार आहेत. तुम्हाला बॉब डिलनच्या गाण्यातलि एक ओळ सांगाविशि वाटते: “Don't criticize what you can't understand.”

ऐसि पाहुणा Sat, 12/04/2014 - 18:13

In reply to by सुशेगाद

तुमचेहि योग्यच आहे. एखाद्या गोष्टित काहि समजले नाहि तर जाणकारांना विचारुन घ्यावे. पण येथे विचारु नये. पहिल्यांदा गुगल, विकिपिडिया इकडुन माहिति वाचुन घ्यावि आणि इथे त्या महितिला स्वतःच्या शब्दात मांडुन लेख लिहावा. मागे एक चित्राचा अर्थ विचारणारा धागा आला होता. तेथे चित्रकाराचे किंवा चित्राचे नाव नसल्याने गुगलण्याचा पर्याय नव्हता. मग त्याचा अर्थ काहि लागला नाहि. लोकांनि काय दिसले ते सांगितले पण अर्थ काहि समजला नाहि. म्हणजे एखाद-दुसरा अंदाज होता पण चित्रातल्या सगळ्या घटकांशि सुसंगत असे त्यांत काहि नव्हते.

चिंतातुर जंतू Sat, 12/04/2014 - 14:50

>> ४. जगातले मोस्ट ऑफ द ऑफ बिट कलाकार हे डाव्या विचारसरनिकडे झुकलेले असतात हे तरी सत्य आहे?

अशा विधानांत प्रचंड सरसकटीकरण आहे किंवा संदर्भचौकट पुरेशी व्यापक नसावी. उदाहरणार्थ,

  1. रशिअन कम्युनिस्ट राजवटीत अभिप्रेत असलेल्या चाकोरीत सिनेमा बनवण्याच्या दृष्टिकोनाशी तारकॉव्हस्कीचे प्रचंड झगडे झाले. त्याचा जवळपास प्रत्येक चित्रपट पश्चिमेत महोत्सवांत गाजला, रशिअन जनतेनं उचलून धरला, पण कम्युनिस्ट पक्षाला तो पुरेसा डावा वाटला नाही. अखेर तारकॉव्हस्की पश्चिमेत पळून गेला. नॉस्टाल्जिआ, सॅक्रिफाइससारखे त्याचे अखेरच्या काळातले चित्रपट रशिआबाहेर निर्माण झाले. त्याच्या सख्ख्या बायकोची आणि मुलाची भेट घेणं त्याला दुरापास्त झालं होतं, कारण ते रशिआत मागे राहिले आणि त्यांना देशाबाहेर पडण्यात कम्युनिस्टांनी आडकाठी आणली.
  2. मिलोश फॉर्मन चेकोस्लोव्हाकिआतून ६७-६८च्या सुमाराला बाहेर पडला. १९६७च्या त्याच्या 'फायरमॅन्स बॉल' चित्रपटात कम्युनिस्टांवर टीका होती. (१९६८मध्ये तिथल्या कम्युनिस्टविरोधी उठावाचा रशिअन फौजांनी बीमोड केला.) अमेरिकेत त्याच्या 'वन फ्ल्यू ओव्हर द ककूज नेस्ट' आणि 'अ‍ॅमॅड्यूस'साठी त्याला ऑस्कर मिळालं.
  3. रोमान पोलान्स्की १९६१च्या सुमाराला कम्युनिस्ट पोलंडमधून बाहेर पडला.
  4. व्हेरा चितिलोव्हा किंवा यिरी मेंझेलसारखे दिग्दर्शक कम्युनिस्ट राजवटींत राहिले, पण त्यांच्या चित्रपटांना बंदी, सेन्सॉरशिप वगैरेंना सामोरं जावं लागलं.
  5. आंद्रे वायदानं पोलंडमध्ये राहून 'मॅन ऑफ मार्बल'सारख्या चित्रपटांतून कम्युनिस्ट राजवटींतले अत्याचार उघड केले.
  6. किस्लॉव्हस्कीनं पोलंडमध्ये राहून 'ब्लाइंड चान्स', 'नो एंड'सारख्या चित्रपटांतून कम्युनिस्ट राजवटीवर टीका केली. १९८१च्या 'ब्लाइंड चान्स'वर १९८७पर्यंत बंदी होती.

किस्लोव्हस्की आणि तारकॉव्हस्कीचा उल्लेख तुमच्या मूळ (आणि आता तुम्हीच उडवलेल्या) अभिव्यक्तीमध्ये होता. त्यामुळे तुमचा प्रश्न अधिकच अस्थानी किंवा अज्ञानमूलक वाटला. आणि ही केवळ निवडक आणि सुप्रसिद्ध उदाहरणं झाली. जॉर्जिअन सर्गेई पाराजानोव्ह वगैरे इतर आहेतच. अशी उदाहरणं इतर राजवटींतही आहेत. उदा : कम्युनिस्ट क्युबामधला थॉमस आलिआ. 'स्ट्रॉबेरी अँड चॉकोलेट' ह्या त्याच्या चित्रपटात डावा कार्यकर्ता आणि एक समलिंगी तरुण ह्यांच्यातल्या नातेसंबंधांमधून त्यानं कॅस्ट्रोच्या क्यूबावर टीका केली.

संदर्भचौकट केवळ पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि भारतासारख्या देशांपुरती मर्यादित केली, तर अर्थात तिथल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथले अनेक बिनीचे कलाकार डाव्या चळवळींशी सहानुभूती दाखवणारे वाटू शकतात आणि त्यामुळे असं सरसकटीकरण योग्य वाटू शकतं, पण अभ्यास वाढवणं हा त्याला एकमेव पर्याय सुचवू शकेन.

(सोबतचं चित्र : किस्लॉव्हस्कीच्या 'नो एंड'चं पोलिश पोस्टर)

रमताराम Tue, 15/04/2014 - 17:06

In reply to by चिंतातुर जंतू

एकंदरीत तुम्हाला सध्या बराच मोकळा वेळ दिसतोय यावर शिक्कामोर्तब झालंय. :p

ॲमी Tue, 15/04/2014 - 18:00

In reply to by रमताराम

हं?
तसे असेल तर जंतूंनी थोडा वेळ थत्तेँनी फोटु काढलेल्या चित्राच्या धाग्यावर खर्च करावा ही नम्र विनंती ;-)

सुशेगाद Sat, 12/04/2014 - 17:47

सुरवातीच्या काळात वर उल्लेख केलेले सर्व दिग्दर्शक हे डाव्या विचारांकडे झुकले होते बरोबर ? नंतर त्यातला फोल पण लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या विरोधात फिल्म्स बनवायला सुरवात केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली गेली?
भारताच्या बाबतीत पश्चिम बंगाल हा कायमच कमुनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहील आहे. राय आणि घटक दोघेही डाव्या विच्रासारानिकडून प्रभावित होऊन फिल्म्स बनवायचे अस वाटत.

सुशेगाद Sat, 12/04/2014 - 19:39

माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग खुले आहेत. इथे तेवढे जाणकार लोक असतील /वाटले म्हणून विचारल. प्रत्येक गोष्ट विकी किंवा तत्सम साईट वरून वाचून लिहिण्याइतका रेडीमेड प्रवृत्तीचा नाही मी. या उपर या धाग्यावर फिल्म्स विषयक काही बोलायचं असेल तर आवर्जून बोलव. माझी मापे काढायची असतील तरी स्वागतच आहे.

चिंतातुर जंतू Sun, 13/04/2014 - 11:19

>> सुरवातीच्या काळात वर उल्लेख केलेले सर्व दिग्दर्शक हे डाव्या विचारांकडे झुकले होते बरोबर ? नंतर त्यातला फोल पण लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या विरोधात फिल्म्स बनवायला सुरवात केल्यामुळे त्यांची हकालपट्टी केली गेली?
भारताच्या बाबतीत पश्चिम बंगाल हा कायमच कमुनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहील आहे. राय आणि घटक दोघेही डाव्या विच्रासारानिकडून प्रभावित होऊन फिल्म्स बनवायचे अस वाटत.

तारकॉव्हस्की कम्युनिस्ट विचारांचा होता असा तुमचा दावा असला तर त्या दाव्याच्या समर्थनार्थ तुम्ही काही मांडणी केली तर त्याचं उत्तर दिलं जाईल. अन्यथा, हा अजून एक ट्रोलसदृश दावा मानून त्याकडे दुर्लक्ष केलं जाईल.

तोच मुद्दा राय ह्यांच्याबद्दलचा. राय डाव्या विचारांचे होते असं म्हटलं तर त्याच्या समर्थनार्थ काही मांडणी करा. अन्यथा, गरीब ब्राह्मण कुटुंब (अपू त्रयी), मध्यमवर्गीय भद्रलोक (चारूलता, महानगर त्रयी, शाखा प्रोशाखा वगैरे) अशा समाजघटकांचं त्यांच्या चित्रपटांत घडणारं सहानुभूतीपूर्ण दर्शन पाहता राय कम्युनिस्ट वाटतात असं म्हणायला फारसा वाव उरत नाही, असा उलटा दावा मी करतो.

जाता जाता : आपण जितकी जास्त विधानं करत जाताहात तितकाच कसलाही आधार न देता निव्वळ सरसकटीकरण करण्याच्या ट्रोल वर्तनानुसार वागत असल्याचा अधिकाधिक पुरावा वाचकांना देताहात ह्याची ह्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण करून देतो. धन्यवाद.

सुशेगाद Sun, 13/04/2014 - 17:10

राय किंवा ताराकोवास्की यांच्या बद्दल आणि त्यांच्या विचारप्रणाली बद्दल बरीच पुस्तक लिहील गेली आहेत , बराच अभ्यास झाला आहे. मी आता पप्रत्येक फिल्मच उदाहरण देऊन त्याच स्पष्टीकरण करण मला योग्य वाटत नाही. कारण इथे चर्चा करण्याचा मुद्दा असा आहे कि तुम्हाला कोणत्या प्रकारचा अनुभव या फिल्म्स देतात?
सतराशे साठ फिल्म्स बघून आणि त्यांच्या विषयी वेगवेगळी पुस्तके वाचून बौद्धिक पांडित्य येत , ज्या प्रमाणे तुम्ही इकडून तिकडून जगभरातल्या हावर्ड होक्स, ब्रेस्सोन पासून ते सध्याच्या apichatpong weerasethakul पर्यंत वेगवेगळी उदाहरण देऊ शकता. अभ्यासाचा आवाका खूप मोठा असलाच पाहिजे यात वाद नाही पण तो रेडीमेड नसावा. माझा फिल्म्स या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन अनुभवावर आधारित आहे. दुसर कोणी सांगत म्हणून किंवा गुगलून माहिती मिळवून त्या कलाकृतींच महत्व पटवून घेण्यापेक्षा ती कलाकृती बघून काय अनुभव मिळतो , अनुभूती मिळते हे माझ्या दृष्टीने महत्वाच आहे. त्याच्या पलीकडे विचारसरणी डावी, उजवी असणे या गोष्टी गौण ठरतात.

मला मुळ विषय राय आणि घटक सोडून इकडे तिकडे भटकायचं नाही आहे पण आता राहवत नाही म्हणून सांगतो.
मलिक चा badlands पहिला.दोन तीन वर्षे झाली पण ती फिल्म अजून लख्ख लक्षात आहे. पूर्ण फिल्म बघताना एका वेगळ्याच दुनियेत गेल्यासारख वाटत होत. मार्टिन शीन च्या पात्राच्या बाजूने विचार करायला लागलो होतो. त्याने केलेले सगळे गुन्हे माफ करत गेलो. त्याच सीसी पेक वरच आंधळ , बेलगाम प्रेम जस्टीफाय करायला लागलो होतो. पात्रासोबत एकरूप होण म्हणतात ना तसा अनुभव होता. तिचा अतिशय थंड आवाजातला वाईसओवर , मध्येच निसर्गाच केलेलं चित्रण , त्या पात्रांचा थंडपणा , कुठलीच भावना अनुभवण्याची हरवलेली क्षमता हे सगळ अतिशय वेगळ्या पातळीवरच होत. तो अनुभव असा शब्दबद्ध करणे खर तर खूप अवघड आहे कधीतरी अस वाटल कि मला थोडीफार ती फिल्म समजली आहे तर त्यावर लिहायचा प्रयत्त्न करेन(म्हणजे अजून दहा वीस वर्षांनी) तर हा सगळा असा एक वेगळा अनुभव होता.

जंतू वरती टीका वैगेरे करायचा उद्देश नाही आहे पण ते इतके रिजिड पद्धतीने विचार करत आहेत कधीतरी असा वाटत( आता मनातल बोलल्याशिवाय राहवत नाही) कि घे बीसी मी तुझ्यापेक्षा हजार फिल्म्स जास्ती बघितल्या आहेत तर्कोवास्की , किल्सोवास्की रोज माझ्याबरोबर उजाला बारला प्यायला बसतात. अश्या हजारो artist लोकांना मी कोळून प्यायलो आहे तू zyatu सुशेगाद मला काय सांगतोय??

जंतू पण मी अनुभवाबद्दल बोलतोय अभ्यासाबद्दल नाही. आजकाल गुगलुन शेंबडी पोरसुद्धा ज्ञान बदाबद ओततात पण ते फील करतात का त्यातलं काही?

चिंतातुर जंतू Sun, 13/04/2014 - 23:01

>> जंतू वरती टीका वैगेरे करायचा उद्देश नाही आहे पण ते इतके रिजिड पद्धतीने विचार करत आहेत कधीतरी असा वाटत( आता मनातल बोलल्याशिवाय राहवत नाही) कि घे बीसी मी तुझ्यापेक्षा हजार फिल्म्स जास्ती बघितल्या आहेत तर्कोवास्की , किल्सोवास्की रोज माझ्याबरोबर उजाला बारला प्यायला बसतात. अश्या हजारो artist लोकांना मी कोळून प्यायलो आहे तू zyatu सुशेगाद मला काय सांगतोय??

आधी सरसकट आणि भडक विधानं करायची, आणि त्यांचा मुद्देसूद प्रतिवाद झाला की प्रतिवादीवर अवांतर चिखलफेक करायची हीदेखील एक सुप्रसिद्ध ट्रोल स्ट्रॅटेजी आहे एवढंच निदर्शनाला आणतो. ह्यानंतर माझ्याकडून ह्या धाग्यावर लेखनसीमा.

सुशेगाद Mon, 14/04/2014 - 01:57

अजूनही विषय सोडूनच लिहिण्यात जास्ती रोचकता दिसत असेल तर माझ्या तर्फे सुधा या धाग्याला लेखन सीमा. तुम्ही कितीही ट्रोल म्हणून ताणून मारायचा प्रयत्न केलात तरी नक्की मुद्दा काय आहे हे यावरती मी मागच्या विस्तृत प्रतिसादात सांगितलं आहे आणि त्याला रोचक हि श्रेणी मिळाली आहे. त्याल निरर्थक किंवा अवांतर हि श्रेणी मिळाल असत तर मी मान्य केल असत सगळ ट्रोल आहे म्हणून. जो मेन मुद्दा आहे तो सोडून वैयेक्तिक मुद्दे उचलण्यावर तुमचा भर दिसत आहे. असो. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या रोगाचा शिकारी असतो मी देखील आहे तस तुम्हीदेखील आहात. ते मान्य करून निकोप चर्चा करण्याची तुमची इच्छा स्पेशाली जंतू ची इच्छा नाही दिसत. त्यांना तो लास्ट परिच्छेद लैच खुपालय. खुपणारच ना.....लोक कायम स्तुती करून घेण्याची सवय असेल कोणीतरी सरळ बोलला कि प्रस्थापित जगात हा प्रोब्लेम होतोच. त्यामुळे तुमच्या मानसिकतेला दोषी धरण्यात माझ काही हाशील नाही.

सुशेगाद Mon, 14/04/2014 - 02:12

तेवढा प्रतिसाद लैच खुपला वाटत. इकडे काय पूर्ण सरकारी भाषेत बोलाव असा नियम असेल तर तश्या प्रकारे भाषा मोडून बोलत जाईन. प्रोब्लेम हाच आहे ना कि तू दुसर्याशी कितीही खोट बोल किंवा काहीही कर पण स्वताशी बेईमानी नाही करू शकत ना...

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/04/2014 - 01:57

'ऐसी अक्षरे' संस्थळाची उद्दिष्टे, मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे या धाग्यातून -

- लेखन करताना दर्जाला व साहित्यमूल्यांना महत्त्व द्यावे. खेळ, करमणूक, गप्पाटप्पा व दंगा यांसाठी स्वतंत्र सदर असल्यामुळे ललित लेखनात व चर्चांमध्ये अवांतर विषय टाळावेत.
- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.
- प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.
- वाचकांनी साईटवरील लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत करावी. त्यासाठी दर्जा मोजण्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. हे साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व लेखनाला श्रेणी देण्याची सुविधा अनेक जुन्याजाणत्या सदस्यांना दिलेली आहे.
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.

(अधोरेखन या धाग्यापुरतं, माझ्याकडून)

सुशेगाद Tue, 15/04/2014 - 20:21

अजूनही त्या मोठ्या प्रतिक्रियेची श्रेणी रोचकच आहे पाच वरून स्कोर तीन वर आणला आहे तरीसुद्धा.

सुशेगाद Tue, 15/04/2014 - 20:40

खास चिडवण्यासाठी धाग्याशी असम्बंध व वैयक्तिक टिप्पणी करणारा प्रतिसाद दिल्याबद्दल "अखिल जागतिक आमचीच लाल" संघटनेतर्फे रमताराम यांचे हार्दिक अभिनंदन.