Skip to main content

संदर्भ देण्याची गरजच काय ?

'उब' आणि 'कॉपेब' या पदव्यांचा अर्थ काय ? उब म्हणजे 'उचलेगिरी बहाद्दूर' आणि कॉपेब म्हणजे 'कॉपीपेस्ट बहाद्दर'. चारएक वर्षापुर्वीच आरोप झालेल्या जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील तथाकथीत संशोधन चौर्य प्रकरणी, सन्माननीय दैनिक सकाळने त्यांच्या अग्रलेख आणि बातम्यातून अचानक पुन्हा एकदा धूण धुण्यास घेतल्या प्रमाणे चर्चा का चालू केली आहे ते माहित नाही. (संदर्भः , , ). खरंतर तुम्ही एखादी माहिती देताना, ती माहिती तुम्हाला कुठून मिळाली याचा संदर्भ देण्याची क्षूल्लक बाब, पण आमची बेफिकीर भारतीय वृत्ती या विषयाकडे शेक्सपीअर नावात काय ठेवलय म्हणतो तसा, 'मी लिवलयं, आता संदर्भात काय ठेवलयं ?" या दृष्टीनेच बघत असावी.

या सर्व प्रकरणाची सुरवात घोकंपट्टीच्या शालेय स्तरावरील संस्कृतीतूनच होते असे म्हणतात. दुसर्‍याच म्हणण, स्वत:च्या शब्दात लिहावयाच आधी ते कठीण आणि स्वतःच्या शब्दात लिहून पुन्हा त्या दुसर्‍याचा संदर्भ का द्यायचा ? घोकंपट्टी आम्ही केली, कॉपीपेस्ट आम्ही नकलवली, आमची मेहनत नाकारतात वर उचलगिरी म्हणतात ? ते नको म्हटलात स्वतःच्या शब्दात लिवल तर मार्क तर देतच नाही, वर आधार आणि संदर्भ नाही म्हणतात; आधार आणि संदर्भ देण्याची भानगड नको म्हणून तर आम्ही कॉपीपेस्ट नकलवतोना ? एवढ करून पदरात काय येतं तर थट्टा. नाय लिवल तर लिवता पण येत नाही म्हणतात. लिवल तर तिकडून बि थट्टाच. मग तोडगा काय, वाचक हो तुमीच सांगा ?

* आपल्या लेखनाला संदर्भ देणं, ते ही प्रत्येक ओळीत संदर्भ देण हि गोष्ट तशी केवळ विकिपीडिया करता म्हणून मर्यादीत असे नव्हे तर; विकिपीडिया, ज्ञानकोश आणि सर्वच माहिती आणि ज्ञानक्षेत्रातील सर्व साधारण लेखन संस्कृतीचा भाग असावयास हवी.(आणि म्हणून मी चर्चा सर्वसाधारण चर्चा विभागात लावली आहे.) मी वर जरासं उपरोधानी लिहिलय, तसे गोष्टी अंत्यंत बेसीक्स पाशीच अडखळत असाव्यात. विकिपीडियावर संदर्भ कसे देतात ? या विषयावर येत्या काळात मलाही लेखन करायच आहे. पण एनी वे विषय वृत्तपत्रीय बातम्यांमुळे चर्चेत आहेच तर या विषयावर जरा चर्चा करून घ्यावी हा उद्देश. तर या चर्चा धाग्यात अत्यंत बेसीक प्रश्न आहेत.
**स्वतःच्या शब्दात लेखन कस कराव ? आणि संदर्भ देण्याची गरजच काय ? या प्रश्नांची मार्गदर्शनार्थ उत्तरे हवी आहेत.

** प्रतिसादातील उपयूक्त नोंदी विकिपीडियाच्या मार्गदर्शन पानातही वापरता याव्यात म्हणून या धाग्यावरील आपले प्रतिसाद लेखन प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जाईल.

बॅटमॅन Mon, 28/07/2014 - 12:11

अर्थातच काहीही गरज नाही. विनासंदर्भ लेखनही भक्तिभावाने वाचणारे लय लोक आहेत. पानपतावर ५०० पानी पुस्तक लिहूनही संदर्भ न देता वर तोंड करून 'संदर्भ दिले तरी ते वाचून लोक बायस्ड होतील, मग कशाला द्यायचे?' छाप प्रश्न लोक करतात तेव्हा खरेच वाटते, काऽही गरज नाही.

बॅटमॅन Mon, 28/07/2014 - 14:15

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सर या सर्व मोहमायेच्या पलीकडे आहेत. तूर्त आम्ही यात उल्लेखिलेल्या महोदयांबद्दल बोलत आहोत.

इथे अजून माहिती सापडेल.

लॉरी टांगटूंगकर Mon, 28/07/2014 - 14:26

In reply to by बॅटमॅन

सरांनीच पुस्तक पब्लिश केलंय रे.
नेमकं काय मत आहे यांच्या लिखाणाबद्दल ?? पुस्तक पब्लिश होण्याच्या आधी पासून तो ब्लॉग वाचलाय. मला लिखाण आवडलेलं. पण रियासत, शेजवलकर आणि विश्वास पाटलांचं पुस्तक या पलीकडे माझं वाचन नाही. त्या लेखकाचं पुस्तक विकत नाही घेतलेलं, पण ब्लॉग पूर्ण वाचलेला आहे. (पुस्तक पब्लिश होतांना सगळ्या ब्लॉग पोस्ट गायब केल्यात.)

बॅटमॅन Mon, 28/07/2014 - 14:28

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मी पुस्तक वाचलेलं नाही, सबब मत देणं उचित होणार नाही.

पण या ब्लॉगवरील लिखाणात भर घालून पुस्तक केलेले आहे असे दिसते. आणि ब्लॉगवरील लिखाण कधीकाळी वाचले होते तेव्हा फॅक्च्युअल चुका थोड्याफार दिसल्या होत्या. सध्या आठवत नाहीयेत, एका मित्रासोबतची जुनी जालचर्चा पहावी लागेल. त्यामुळे म्हटलं मरो तेज्यायला, स्वतःच्या चुका असूनच्या असून इतरांना जज करतोय.

गब्बर सिंग Mon, 28/07/2014 - 12:53

मोस्ट साईटेड रिसर्चर - अशी क्रेडिबिलिटी/रेप्युटेशन रॅंकिंग सुद्धा असते व ती संदर्भांमुळेच बनते. जेवढे तुमच्या शोधपत्रास रेफर करणारे दुवे जास्त तेवढी तुमची रँकिंग उच्च.

--

संदर्भ देण्यामागे आणखी ही एक हेतू असतो व तो म्हंजे - संदर्भ देऊन - You outsource critical thinking and diligence for a portion of the argument to some other work by someone else.

मन Mon, 28/07/2014 - 13:41

In reply to by गब्बर सिंग

म्हणूनच गब्बरच्या प्रतिसादात लिंकांचा आणि संदर्भांचा वर्षाव असतो.
गब्बरने सारं काही औटसोर्स केलय असं समजावं का ?

गब्बर सिंग Mon, 28/07/2014 - 13:47

In reply to by मन

अ ... हं

लिंका देऊन मी मूळ शोधपत्र लेखकाची रँक वाढवण्याचा यत्न करीत असतो.

("रंका" ची काळजी आम्ही नाही करायची तर कोणी करायची ?)

अजो१२३ Mon, 28/07/2014 - 13:03

* आपल्या लेखनाला संदर्भ देणं, ते ही प्रत्येक ओळीत संदर्भ देण हि गोष्ट तशी विकिपीडिया करता म्हणून मर्यादीत असावयास नको.

या ओळीत कोणता संदर्भ आला आहे? कृपया सुधारून लिहा.

माहितगारमराठी Mon, 28/07/2014 - 18:36

या विकिमीडीया दुव्यावर संदर्भ हवा या विषयावरील वेब कॉमीकचे एक चांगले कार्टून आहे. (कॉपीराईट मर्यादे मुळे विकिपीडियाच्या बाहेर देता येत नाही.) म्हणून जरासे ओबड धोबडच खालील कार्टून बनवण्याचा मी जरासा प्रयत्न केला आहे. या विषयावर अशीच अजून कार्टून बनवून मिळाल्यास हवी आहेत.

(सौजन्यः विकिमीडिया_कॉमन्स )
https://commons.wikimedia.org/wiki/File:Sandarbha_hava_mr_2.png हि लिंकदुवा बरोबर डिस्प्ले होण्यात अडचण येत आहे


....


....

*(प्रतिसादांसाठी गब्बर सिंग, बॅटमन, मन, मन्दार, अरुण जोशी आपणा सर्वांना धन्यवाद.)