Skip to main content

सामाजिक

जाहिर फोरमवर काय आणि कसं मांडावं ?

Taxonomy upgrade extras

मित्रहो, एक शंका आहे.
आंतर जाल हे माध्यम म्हणून तुम्ही कसं पाहता ? ह्यावर काय काय मांडता येतं ? काय काय मांडण्यात यावं ?
आणि ह्यावर जे लिहिलं गेलय त्याची जिम्मेदारी नक्की कुणावर असते ?
.
.
माझं मत :- फोरम्सवर "मी अडचणित आहे. काही सल्ले, रास्त मदतीचे पॉइण्टर्स कुणी देउ शकेल का " असं विचारणं ग्यारंटीड चालून जावं.

बृहन्महाराष्ट्र मंडळ २०१५ पुरस्कार

Taxonomy upgrade extras

बृहन्महाराष्ट्र मंडळ गेली कित्येक वर्षे उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृतीचा झेंडा रोवण्याचे काम करत आहे. उत्तर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणावे या हेतूने दर दोन वर्षांनी बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन भरवते. या वर्षीचे अधिवेशन लॉस एंजिलीसजवळ अनाहाईम येथे ३ ते ५ जुलै दरम्यान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अशा अधिवेशनात वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या उत्तर अमेरिकेतील मराठी मंडळींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम

Taxonomy upgrade extras

अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम

'मला नव्याने सुरूवात करायची आहे. मला अशा ठिकाणी जायचं जिथे चित्रपटांवर लोकांची फारशी बंधनं नसतील. मला स्वतःला पुढे न्यायचं आहे. मला मर्यादा आल्या आहेत. आणि इथे राहून मी स्वतःला पुढे नेऊ शकणार नाही', असं अनुरागने सांगितलं. इतरांपेक्षा कायम वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणाऱ्या अनुरागला सेन्सॉर बोर्डाच्या नव्या नियमांमुळे फटका बसला आहे. त्यामुळे तो देश सोडून जातोय, असं सांगण्यात येतंय.

बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचे समन्वयक श्री. शैलेश शेट्ये यांच्याशी बातचीत

Taxonomy upgrade extras

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन आता फक्त दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दोन अडिचशे स्वयंसेवकांना घेऊन चार-पाच हजार लोकांचे तीन दिवस मनोरंजन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या दोन वर्षाहूनही अधिक काळ या अधिवेशनाचे काम सुरु आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्या समर्थ खांद्यानी पेलली आहे त्या शैलेश शेट्येंशी केलेही ही बातचीत.

लॉस एंजिलीसमध्ये अधिवेशन आणण्याची कल्पना कशी सुचली?

डेटींग गेम (The female brain)

Taxonomy upgrade extras

"The Female Brain" पुस्तक वाचते आहे. यात स्त्री-पुरुष प्रेमात कसे पडतात त्याचे एक उदाहरण घेतले आहे. मेलिसा नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर तिला एक दीर्घकालीन रिलेशनशिप हवीशी वाटू लागली. तिने "डेटींग" साइटवर नावही नोंदवले. पुढे काही महीने फसलेल्या डेटींगमध्ये गेले. आज तिला लेस्ली तिच्या मैत्रिणीने पबमध्ये बोलावले आहे. अन तयार होऊन ती गेली आहे. तिथे थोड्याच वेळात तिच्या दृष्टीस रॉब पडतो... केस सॉल्ट-पेपर, आत्मविश्वास अन एक सुखवस्तू व्यक्तीमत्व आहे त्याचे. पहाताक्षणी तिच्या पाठीतून एक शिरशिरी जाते अन ती लेस्लीकडे वळून म्हणते "ऐक ना तो पुरुष पाहीलास का?"
.

अ‍ॅरेंजमॅरेज... फसवणूक... एक लैंगीक गुन्हा ?

Taxonomy upgrade extras

सुनंदाचे लग्न होउन काही महिने उलटले... अतिशय सुरेख जावइ मिळाला म्हणून तिचे कूटुंबिय फार आनंदात होते. तसं दोन्ही स्थळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील खेडेगावातील असल्याने त्यांनी त्यांच्या पध्दतीने मध्यस्थ गाठणे, बघणे, पसंत करणे, विवाह होणे वगैरे सोपस्कार पार पाडले. पण नियतीनेचे फासे शकुनीप्रमाणे असतात. मुलाची आर्थिक परिस्थीती ही जितकी दाखवली तीतकी चांगली नाही, उदा. अमुक हेकर जमीन आहे सांगीतले पण प्रत्यक्षात त्यात ५ हिस्सेदारात याचा वाटा अतिशय कमी आहे हे मात्र लपवले.

एनआरआयची भारतभेट...

Taxonomy upgrade extras

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक.

हुंडा एक रास्त पध्दत

Taxonomy upgrade extras

हुंडा घेणे (आणी बहुदा मागणेही) कायद्याने गुन्हा आहे. हुंडा देउ नका, घेउ नका.

पण मज वाटते ती एक रास्त पध्दत होती. किंबहुना मुलीचा हक्क कुंटुंबाच्या संपत्तीवर सर्वात आधि आहे हे अधोरेखीत करणारी प्रथा होती. सर्वसाधारणपणे संपत्तिचे हस्तांतरण हे त्याची मालकी असलेल्या व्यक्तीच्या इछ्चेने त्याच्या म्रूत्युपुर्व अथवा म्रूत्युनंतर होते. परंतु नॉमीनी जर स्त्रि असेल तीचे लग्न होतानाच तिला तिचा हीस्सा मिळण्याची केलेली व्यवस्था म्हणजे हुंडा पध्दती होय.

धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं

Taxonomy upgrade extras

मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.