जाहिर फोरमवर काय आणि कसं मांडावं ?

मित्रहो, एक शंका आहे.
आंतर जाल हे माध्यम म्हणून तुम्ही कसं पाहता ? ह्यावर काय काय मांडता येतं ? काय काय मांडण्यात यावं ?
आणि ह्यावर जे लिहिलं गेलय त्याची जिम्मेदारी नक्की कुणावर असते ?
.
.
माझं मत :- फोरम्सवर "मी अडचणित आहे. काही सल्ले, रास्त मदतीचे पॉइण्टर्स कुणी देउ शकेल का " असं विचारणं ग्यारंटीड चालून जावं.
(प्लीझ नोट :- मी मदतीबद्दल फक्त सल्ला विचारलेला आहे.उदा :- घरगुती अत्याचाराबाबत मदत करनारी हेल्पलाइन आहे का ?, ज्येष्ठ नागरिकाम्साठी काही पेन्शन योजना आहेत का , ह्यास्टाइलच्या विचारणा. "मदत" म्हणजे आर्थिक मदत नव्हे. ती एक पै चीसुद्धा मागू नये असे आपले माझे मत. अगदि "अमक्या ठिकाणी भूकंप झालेला आहे, त्यासाठी मदत निधी म्हणून ..." किंवा "तमुक कलाकारास उतारवयात सहाय्यता म्हणून निधी जमा करित आहोत, त्याबद्दल मदत म्हणून..." अशीसुद्धा मागणी करणे मला उचित वाटत नाही. किंवा समजा माझी बॅण्ड वाजलेली आहे; तेव्हाही "मनोबा बचाव समितीला मदत म्हणून पाच पन्नास लाख जमवायचे घाटत आहे. त्यासाठी मदत जमा करा " असे म्हण्ण्याने मदत होणार नाहिच, हसे मात्र जरुर होइल. )
तस्मात आर्थिक मदत विचारु नये.
.
.
तक्रार :-
तुम्हाला काही संशय अथवा तक्रार असेल तर जितकी तथ्यं तुम्हाला थेट, स्पष्टपणे दाखवता येतील, तितकीच लिहावीत.
एक काल्पनिक उदाहरण :-
समजा एखाद्या व्यक्तीच्या एरियातल्या एखाद्या लोकप्रतिनिधीने सार्वजनिक जागा(केंद्र-राज्य सरकारच्या अखत्यारीतील किंवा मनपाची जागा ) बळकावून ठेवल्याची वदंता/कुजबूज त्या व्यक्तीच्या कानावर आहे. तर त्याने हे इथे जाहिर करावे का ?
तर अर्थातच नाही. कुणीही उठून काहीही "अमुक चर्चा दबक्या आवाजात आहे" म्हणून टाकू लागेल; ह्याने एखादी प्रभावशाली व्यक्ती दुखावली गेली; तर मूळ धागाकर्ते रहायचे बाजूलाच; पण ऐसीचे अ‍ॅडमिन-मालक-संपादक वगैरेच आधी गोत्यात येतील. त्यांनी का असं जीवावर उदार व्हावं ?
.
.
अगदि लख्ख पॉइण्टर्स असले आणि समजा अगदि तुम्ही कोर्टातही दावा टाकलेला असलात आपलं म्हण्णं मांडायला; तरी त्याबाबतीत इथे जरा जपूनच बोलावं. कारण पुन्हा तेच -- आपल्यामुळे भलतीच माणसं गोत्यात यायला नकोत.
.
.
थोडक्यात इथे भूमिका मांडताना "मी अडचणीत आहे. बाहेर येण्यासाठी काय काय करावे लागेल ह्याबद्द्दल सूचना द्या बुवा." असा सूर असलेला बरा.
"मी अमक्यामुळे खड्ड्यात आलो; अमक्याने मला ढकललं असण्याची शक्यता आहे" वगैरे बोलायच असेल इथे, तर त्यापूर्वी दहा हजार वेळा तरी विचार करावा.
.
.
एक १००% काल्पनिक केस घेउ. उदाहरण काल्पनिक आहे. शिरेसली घेउ नये. माझा एक मित्र क्राइम डायरीसारख्या टीव्ही सिरियल वगैरेचे एपिसोड लिहितो.
त्याचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्याला ऊठसूट जिथेतिथे काही केसेस सुचतात; काही ना काही संशयास्पद दिसतं.
वेडाच्चे तो. पण त्यानं एकदा नवीन घरात रहायला गेलेल्या जोडप्याची म्हणून एक गमतीशीर गोष्ट सांगितली.
अर्थात पूर्णतः काल्पनिक गोष्ट आहे.
*************गोष्ट सुरु ************************
एक आताच तीन चार महिन्यापूर्वी बांधकाम पूर्ण झालेली एक बिल्डिंग आहे. घराचा ताबा मिळून दोन-चार महिनेच झालेत एका कुटुंबाला. एखाद्या बिल्डिंगमधली काही घरातली वीज एकदम जाते. ज्या घरातली वीज गेलेली आहे; अशा केवळ एकाच घरात कुटुंब वास्तव्यास आलेले आहे. इतर घरांमध्ये अजून कुणी रहायला आलेलं नाही. नव्यानं तिथं रहायला गेलेलं कुटुंब चिंतित होउन त्या बिल्डिंगमधल्या इलेक्ट्रिशियनला बोलावतात. (बिल्डरकडून पझेशन घेताना लहान मोठी कामं --पंखे वगैरे लावणं, पडद्याचे रॉड्स वगैरे लावणं, ह्या निमित्तानं त्याची ओळख झालेली. तो साइटवरच, म्हंजे त्याच बिल्डिंगमध्ये बहुतांशवेळा उपलब्ध असतो.)
इलेक्ट्रिशियन सांगतो की "लाइट जाण्याचे कारण म्हणजे मीटर जळालेले आहे. एम एस इ बी च्या हापिसात जाउन काय ते बोला. आणि एम एस ए बी वाले येउन हे सगळं नीट करेपर्यंत तात्पुरती लाइट सुरु करता येइल "
तो लाइट सुरुही करुन देतो. नवीन आलेलं कुटुंब अगदि त्या औदार्यानं दबून वगैरे जातं. बादवे, पण्न जर वीज सुरु झालेली आहे; तर तिकडे एम एस इ बी कडे जायचे कशाला; हे विचारल्यावर इलेक्ट्रिशियन सांगतो "अहो वरच्या एका मजल्यावरच्या कनेक्शन मधून तुम्हाला सध्या वीज दिलेली आहे. म्हनजे तात्पुरतं वापरा हे. जेवढा वेळ तुम्ही वापराल, तेवढं बिल तुमच्या वरच्या मजल्यावरच्या माणसाच्या खात्यावर लागेल. ख्यॅ ख्यॅ ख्यॅ".
कुटुंब तत्काळ हा सगळा प्रकार थांबवायला सांगतं. वरच्या मजल्यावरील कोणाचीही वीज नको, हवं तर नवीन मीटर येउन वीज सुरु होइस्तोवर अंधारात राहू म्हणतं.
इलेक्ट्रिशियन मग तत्काळ ती बेकायदेशीरपणे दोनच मिनिटांपूर्वी केलेली जोडणी काढून टाकतो व निघून जातो.
.
.
कुटुंब लागलिच एम एस इ बी च्या ऑफिसात पोचतं. तक्रार सांगतं. एम एस इ बी वाले म्हणतात "नवीन मीटर बसवून देतो हो. पण बंद पडण्यापूर्वी ह्या आधीच्या मीटरनं बर्रच बिल बनवलय. तेवढं भरा आधी. कालच आम्ही फोटु घेतलाय मीटरचा. " अर्थात एम एस इ बी वाले लागलिच नवीन मीटर बसवून देतात. आणि म्हणतात
की जे भलमोठ्ठं बिल सध्या जनरेट झालेलं आहे; ऑफिशियली तुमच्याकडे पोचायला अजून दोनेक आठवडे लागतिल. भलामोठ्ठं म्हणजे किती आकडा असावा बिलाचा /
तर वर्ष-दीड वर्षाची एकत्रित रक्कमही ज्याच्यापेक्षा कमी असेल, इतकं ते मोठ्ठं बिल आहे.
थोडक्यात, नॉर्मली महिन्याभराचं जे बिल येतं; हे त्याच्या चक्क बारा-पंधरा पट आहे.
आणि हे आता भरायला एम एस इ बी वाले सांगताहेत.
एवढ्यात कुटुंबाला आठवतं :-
"वरच्या मजल्यावरील लोकांच्म कनेक्शन सहज एक मिनिटात आपल्याला मिळणं शक्य आहे; तर आपलं कनेक्शनही इतर कुणी सहजतेनं वापरत नसेल कशावरुन ?"
शिवाय आता त्यांना अजून बाब आठवते. कालपर्यंत ते खुश होते आपल्य अबिल्डिंगमध्येच तलमजल्यावर दोन कमर्शियल जागा प्रत्यक्ष वापरात येताहेत. एका ठिकाणी मोठ्ठं स्पा-सलून बनतय ; तर दुसर्‍या ठिकाणी एक पिझ्झाचं दुकान. आणि हे असं बनत असल्याबद्दल पॉश वस्तीत राहिल्याबद्दल आपण किती खुश होतो!
त्या आनंदात आपण त्यांचा मागील दोनेक आठवडे त्रासही सोसला. त्रास म्हनजे -- सारखं त्यांच्याकडे फर्निचर वगैरेचं काम सुरु असणं. जमीनीवर फिरवायचं आणि टाइल्स प्रोसेस करत राहण्याचं ते ग्रुघ्रुंssssssssss असा कान किट्ट करणारा आवाज काढणारं मशीन; सतत चाललेलं अंतर्गत भागात चाललेलं वेल्डिंग वगिअरे; विजेचा प्रचंड वापर आणि प्रचंड गोंगाट.
.
.
ह्याबद्दल ह्या कुटुंबाला प्रचंड कुतूहल होतं; थोडंफार अप्रूपही होतं; इतक्या जवळ, आपल्याच खालच्या मजल्यावर इतकी छान कमर्शियल कॉम्प्लेक्स बनते आहे ह्याबद्दल.
.
.
पण आता ते कुटुंब डोकं खाजवताना का दिसतय कुणास ठाउक ?
"वीजेची काही मीटरं एकाएकी जळून जातात. मीटर जळण्याचं एक संभाव्य कारण त्यावर अतिलोड येणे हे असते." ह्या ओळी ह्यांच्या डोक्यात का घुमत असाव्यात.
.
.
सोडा. कुटुंब उग्ग्गाच विचार करीत असेल.

*************गोष्ट समाप्त ************************
समजा त्या कथेतल्या कुटुंबातलं कुणी ऐसीवरचा धागाकर्ता आहे ; तर त्या धागाकर्त्यानं स्वतःच्या आ, त्या जागेच्या आणि इतर बाबींच्या तपशीलासकट, नावासकट डोक्यात ज्या काही शंका कुशंका येताहेत त्या लिहाव्यात का ?
माझं मत :- तसं अजिबात करु नये. कारण नेमकं काय झालेलं आहे; हे त्याला स्वतःलाच धड माहित नाही. मग उगाच शंका कुशंका कशाला ?
.
.
एक थोडंफार असच उदाहरण आठवलं. हे मात्र वास्तवातलं. चार-पाच वर्षापूर्वीचं. एक संस्थळ आहे; खाद्यपदार्थाचं नाव असलेलं. चांगलं झणझणीत, तर्री असलेलं नाव आहे त्या संस्थळाचं. त्या संस्थळावर एकदा कुणीतरी धागा टाकला होता आणि त्यात शहरातील काही सामाजिक व राजकीयदृष्ट्या बड्या प्रस्थांचं नाव घेउन ह्यांनी कशी माझी आर्थिक वगैरे फसवणूक केली; वगैरे तपशील लिहिले होते. संस्थळवाल्यांनी काही वेळातच तो धागा उडवला. त्याहीवेळी मला संस्थळवाल्यांची भूमिका पटली होती. अन्यथा भलत्याच भांडणात ते विनाकारण ओढले वा भरडले गेले असते. बाकी वरती दिलेली कथा काल्पनिक आहेच.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

तर त्या धागाकर्त्यानं स्वतःच्या आ, त्या जागेच्या आणि इतर बाबींच्या तपशीलासकट, नावासकट डोक्यात ज्या काही शंका कुशंका येताहेत त्या लिहाव्यात का ?

नाही.
.
फक्त समस्या मांडावी जशी तू मांडलीस तशी.
____

तुम्हाला काही संशय अथवा तक्रार असेल तर जितकी तथ्यं तुम्हाला थेट, स्पष्टपणे दाखवता येतील, तितकीच लिहावीत.

मी तर म्हणते वाईट असे व्यक्तीसापेक्ष मांडूच नये. भले त्यात तथ्य असेना, तुमच्याकडे लाख पुरावे असेना. हे काही कोर्ट नाही. तेव्हा कशाला नाव घ्यायचं कोणाचं Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर्रीवाल्या हॉटेलमालकांनीच बर्‍याच लोकांना चुना लावला ना? कधी-कधी इतरांना सावध करण्यासाठी खरे लिहावे, विशेषतः स्वतःचे खरोखरच आर्थिक नुकसान झाले असेल तर नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणताय ती वेगळी केस आहे; बहुचर्चित आहे. ती इथे नको.
मी उल्लेख करत असलेली केस वेगळी आहे; फारच कमी लोकांना ठाउक आहे.
समजा उद्या "राळेगणसिद्धीमधील समाजकार्यास(किम्वा सरदार सरोवरा संबंधित चळवळीत) मदत म्हणून अमुक रक्कम दिली; आणि त्याचा गैरवापर झाला. " किंवा
"अमुक भूखंड आमच्या मालकीचा असून तमुक राजकीय पुढारी त्यावर कब्जा करुन बसलाय" अशा अर्थाचं इथे कुणी लिहावं का ?
लिहू नये.; असं माझं मत आहे. व्यवस्थेतले रास्त मार्ग आपलं म्हण्णं मांडण्यासाठी चोखाळावेत.(ह्यात वृत्तपत्रापासून ते कोर्ट-पोलिस-आर टी आय -कोणतीही नियामक यंत्रणा असे सगळेच आले.) अर्थात "कोणाकडे जावे" असा प्रश्न विचारला असेल तर चालून जावे (आरोपबाजी न करता सरळ थेट नेमका प्रश्न असेल तर)
आरोपबाजी करुन आपण आपल्याच लोकांना (ज्यांनी संस्थळ उपलब्ध करुन दिलय त्यांना ) गोत्यात आणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुमचं मत बनलेलच आहे, तर मग इतरांना विचारून उपयोग काय?
त्याचं काय आहे, तर्रीवालं हॉटेल आहे भारतात, त्यामुळे तिथे तिथला कायदा लागतो. उद्या कुणी काय लिहिलं (म्हणजे ते खरेखोटे कसेही असो), पण संस्थळाच्या मालकाला ४ फटके खावे लागतील अशी भिती असते. पण ऐसीचं असं नाहीए ना. अमेरिकेत फ्रीडम ऑफ स्पीच आहे. म्हणून १९९६ साली गणेशचतुर्थीला सुरू झालेल्या मराठी संकेतस्थळावर अशाच एका "इडलीवाल्या हॉटेलमालकाचं" पितळ उघडं पडलय. लिंक हवी असेल तर मला व्यनि करा. Smile आता जर अशी माहिती अजून चारचौघांना समजली आणि "पुढच्यास ठेच, मागचा शहाणा" या न्यायाने ते शिकले तर तो फायदाच आहे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका सामान्य व्यक्तीच्या सामान्य समस्यांवर तोडगा निघत असेल तर त्यात काही वाईट नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0