धर्मांतर....आपल्या सर्वांचं घडून गेलेलं

मला जाणवत असलेल्या विविध गोष्टी (संकीर्ण संग्रह म्हणा हवं तर) इथे एकत्रित लिहितो आहे.
कुणाला काही दुरुस्ती सुचवायची असल्यास, मूळ मुद्द्यांत भर टाकायची असल्यास(किंवा लेखाला छानपैकी
शिव्या घालायच्या असल्या तरी) स्वागत आहे.
.
.
हे अमुक पुरेसे "आधुनिक " नाहित; ते तमुक आधुनिक आहेत; असं येतं बोलण्यात कधी कधी.
" आधुनिक " ह्या शब्दाखाली जे जे काही येतं; त्यावर अमेरिकन आचार-विचार-संस्कृतीचा मोठाच पगडा दिसतो.
शिवाय "आंतरराष्ट्रिय" , "जागतिक" ह्या शब्दाचा खरा अर्थ खूपदा "अमेरिकेच्या कानावर पडलेली गोष्ट" असा असतो.
"अमुक अमुक माणसाच्या कार्याची आंतरराष्ट्रिय सतरावर दखल घेतली गेली " म्हणजे अमेरिकास्थित/स्पॉन्सर्ड संस्थेने दखल घेतली असा अर्थ वाटतो.
अमुक विद्या, तमुक शास्त्र, अभ्यास-व्यायाम पद्धती, मार्शल आर्ट्स,योगशास्त्र, अध्यात्मविचार ,स्वयंपाक पद्धती ,आहार शैली आंतरराश्ट्रिय स्तरावर
पोचली म्हणजे अमेरिकेतील निदान काहिंनी त्याची दखल घेतली असा होतो.
अमेरिकेची मान्यता म्हंजे जगाची मान्यता!
जागतिकीकरण म्हणजे अमेरिकीकरण.
तुमची पद्धत अमेरिकेत सामावली गेली पाहिजे किंवा अमेरिकन पद्धत तुमच्यात सामावली गेली पाहिजे.
आपण आपल्याही नकळतपणे त्या प्रवाहात जोरात खेचले गेलेलो आहोत.
(असं खेचलं जाणं चूक अथवा बरोबर, ह्यातील काहीही आमचे म्हण्णे नाही. तो मुद्दा नंतरचा.)
विचारही त्यांच्याच पद्धतीचा केला जावा, अशी आपली आपल्याचकडून अपेक्षा असते.
.
.
अमेरिकनिझम हा नवा धर्मच उदयास आलेला आहे. आपण एखाद दोन पिढ्यांपूर्वीच त्यात सामील झालेलो आहोत.
जे व्हायचे बाकी आहेत; तेही लवकरच होतील हे नक्की. पण हे होताना त्यांनाही कळेलच असे नाही.
.
.

अमेरिकनिझम हा मायावी आहे तो ह्याच साठी.
ते तुम्हाला प्रेषित दाखवत नाहित. नवा ईश्वर/गॉडही दाखवत नाहित.
पण तुमच्या वागण्या-बोलण्यात , अगदि विचार करण्यापासून ते आचरणापर्यंत ते तुम्हाला बदलवून टाकतात.
पण "आम्ही तुम्हाला बदलत आहोत" अस प्रचार न केल्यानं आणि नवा प्रेषित समोर न दिसल्यानं आधीच्या धर्मातले लोक तितके खवळून उठतच नाहित.
कुणाचं म्हण्णं असेल की :-
"

कोणी काय करावं हे न सांगता विलिंगली लोक फॉलो करतात व फॉलो करताना त्यांचे विकल्प काढूनही घेतले जात नाहीत. जे चाललय ते स्वेच्छेनं होतय.
तुझ्या लिहिण्यातून "मुक्त विचार" हाच कॉन्स्पिरसी आहे असे ध्वनित होतेय.

"

कॉन्स्पिरसी किंवा काय आहे ते नेमके सांग्ता यायचे नाही.
खूपशे लोक स्वेच्छेने सामील होताहेत हे खरे आहे.
("भुलवणे" हा शब्द इथे वापरता येइल का ?
भुलवण्याच्या क्रियेतही भुलवली गेलेली बाजू स्वेच्छेनेच निवड करताना दिसते.)
हे जे काही होतय ते खूपसं उत्स्फूर्तपणे होतय हे १००% मान्य.
.
.
पण जे तसे नाहित; त्यांची ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली जाते; त्यातून न्यूनगंड वाढीस लागण्याची शक्यता.
मग न्यूनगंड असलेलेही एखादेवेळेस अधिक समर्थ होण्यासाथी तुमच्यासारखेच होण्याचा प्रयत्न करतात.
ही पण एक बाजू आहे.
.
.
गब्बरने मागे कुणाचंतरी एक नेमकं वाक्य ऐकवलं होतं.
we all are wanna be americans!
अमेरिकन(किंवा पाश्चात्त्य) विजयाचं ह्याहून भारी वर्णन करता येणं अशक्य आहे.
ते थेट डेमोग्राफी बदलू पहात नाहित. कत्तल करीत सुटत नाहित.
"तुझं धर्मांतरच करतो भडव्या" म्हणत नरड्या धरत नाहित.
तुमच्याही नकळत तुमचा माइंडसेटच बदलतात. (ह्याला ब्रेनवॉश म्हणता यावं का ? )
.
.

मला अमेरिका आवडते की ह्याच साठी की त्यांनी प्रत्यक्षात सोयीस्कर मुक्त विचार, आधुनिकता वगैरे वगैरेचा जप करत अमेरिकनिझम हा नवीन धर्म अस्तित्वात आणला आहे.
तो इतका मायावी आहे की तो वेगळा असा जाणवतही नाही. त्याचा प्रचार हा प्रत्यक्षात त्याचा प्रचार म्हणूनही होतच नाही.
"आधुनिकतेचा प्रचार" नावाची गोळी लोकांच्या गळी उतरवली की झालं.
शिवाय तुम्ही तुमचा आधीचा धर्म explicitly सोडूनच इकडे यावं असं बंधन नाही.
ही प्रोसेस इतकी हळूवार आणि अल्लाद होते (पाणयत उकळल्या जात असलेल्या बेडकासारखे) की आधीचा धर्म तुम्ही कधी सोडलात हे तुम्हालाच कळत नाही.
नावाला तुम्ही जुन्याच धर्माचे असता.
प्रत्यक्षात अमेरिकनिझमचे आचरण करत असता.
काही प्रमाणात हे हिंदू नावाच्या धर्मासारखच आहे.
माणूस हिंदू बनला तरी त्याला तो हिंदू बनल्याचा पत्ताच नस्तो.
.
.
कॉन्स्पिरसी म्हण्णे किंवा चांगले-वाईट असे मी काहिच म्हणत नाहिये.
सध्या जे जसं दिसतय, ते जमेल तितकं तस्सच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
.
.
चार -दोन टाळकी मिळून बसली आणि "आता हे मिशन सुरु करु. हा प्रपोगेंडा करु" असे म्हणून अंतिम टार्गेट ठरवून बसलित असं वाटत नाही.
हे काहीतरी वेगळय. सतत उत्क्रांत होत जाणारं वेगळच कॉक्टेल आहे.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (6 votes)

५०-६० वर्षांनी जग चीनी होत आहे काय? असा लेख येईल का? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इंट्रेष्टिंग आहे लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१०० वर्षांपूर्वी भारतात ब्रिटिश धर्म होता का? तशी हाकाटी वाचलीय, 'आंग्लविद्याविभूषित' अशी कुत्सित विशेषणेही रूढ झालेलीही पाहिलीत पण 'ब्रिटिशाळलेले' ऐवजी 'आंग्लाळलेले' जास्त ऐकलेय. म्हणजे 'ब्रिटिश' ऐवजी 'इंग्लिश' असा भाषिक प्रभाव होता का? आणि आता सांस्कृतिक= अमेरिकन असा काही प्रभाव जास्त जाणवतोय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अमेरिकनिझम हा नवा धर्मच उदयास आलेला आहे. <<

>> ते तुम्हाला प्रेषित दाखवत नाहित. नवा ईश्वर/गॉडही दाखवत नाहित. <<

इथे थोडा गोंधळ जाणवतो. गोंधळ दोन कारणांसाठी -

  1. प्रचार आणि प्रसार कोणत्याही विचाराचा केला जाऊ शकतो. त्यातल्या प्रत्येकाला धर्मविचार मानण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, पूर्वी डाव्या विचारांचाही असाच प्रचार केला जाई. किंवा, 'आज जर्मनीच्या हलाखीला ज्यू जबाबदार आहेत' असा प्रचार हिटलरनं केला होता. हे राजकीय विचार होते. तुम्ही ज्याला 'अमेरिकनिझम' म्हणता आहात, तोदेखील खरा तर राजकीय विचार आहे.
  2. दुसरं कारण म्हणजे जाहिरातबाजी कशाचीही करता येते. ज्याची विक्री करायची आहे अशा उत्पादनाचीच जाहिरातबाजी होते असं नव्हे. 'देशाला तुमची गरज आहे; सैन्यात सामील व्हा' हीदेखील जाहिरात असते. आणि मायावी असणं हा जाहिरातबाजीचा गुणधर्म आहे. पाहा त्यासाठी केलेला स्त्रीचा वापर -

त्यामुळे 'धर्मविचार' किंवा 'कॉन्स्पिरसी' वगैरे बाजूंनी पाहण्यापेक्षा एक 'मीम' म्हणून त्याकडे पाहिलंत तर काही तरी अधिक इंटरेस्टिंग सापडू शकेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सध्याच्या आघाडीच्या मीम पैकी हा एक अत्यंत प्रभावी मीम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

याच स्वरूपाचं उत्तर मी देणार होतो. धर्म आणि संस्कृती किंवा जीवनपद्धती यामध्ये लेखात गफलत झाल्यासारखी वाटते. अर्थात धर्मांमध्ये जीवनपद्धती काही प्रमाणात सांगितलेली असते. मात्र संपूर्ण संस्कृतीला तो व्यापून टाकणारा क्वचित होतो.

या सांस्कृतिक/भौतिक/आचरणात्मकदृष्ट्या आकर्षक ठरणाऱ्या जीवनपद्धतीला निव्वळ एक मीम म्हणून चालणार नाही. अनेक एकमेकांशी मिळतेजुळते मीम एकत्रित येऊन जेव्हा त्यांचा एक ढोबळ आकारबंध बनतो तेव्हा त्यासाठी मीम्प्लेक्स असा शब्द आहे (मीम्सचा कॉंप्लेक्स).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायावी असणं हा जाहिरातबाजीचा गुणधर्म आहे.

ही वाक्य आवडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पटण्यासारहा लेख. मीम म्हणा की अजून काही; धार्मिक लोक ज्या प्रकारे पोथीपंडीत होतात त्याच प्रमाणे अमेरिकन जे आहे ते ते लोकांना अनुकरणीय आणि वंदनीय वाटतं हे निरिक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते थेट डेमोग्राफी बदलू पहात नाहित. कत्तल करीत सुटत नाहित.
"तुझं धर्मांतरच करतो भडव्या" म्हणत नरड्या धरत नाहित.
तुमच्याही नकळत तुमचा माइंडसेटच बदलतात. (ह्याला ब्रेनवॉश म्हणता यावं का ? )
.

छानच नीरीक्षण आहे. एकदम आवडले. यांकी डूडल नावाचे, आईसक्रीमचे एक दुकान होते भारतात पूर्वी. कशाकरता हवय ते तसलं नाव?
लेखच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अमेरिका म्हणजे गावातला पाटलाचा वाडा. मोठा वाडा. राबायला सारे गावकरी. पाटलाच्या वाड्यातून गावाचे नियम ठरणार. सगळी संपत्ती पाटलाच्या वाड्यावर. पाटलाकडे कोणी डोळा वाकडा करून पाहत नाही. ज्याच्या त्याच्या मुखी पाटलाच्या वाड्यावर काय चाललंय त्याची चर्चा. प्रत्येकाला पाटील व्हावे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण मी ऐकलेलं की युरोपमध्ये अमेरीकन माणूस एकदम uncouth, uncultured , कचरा समजला जातो. हे खरे आहे का?
___
अमेरीकेत कोणाचाही पायपोस कोणालाही नसतो. कोणी हा धर्म फॉलो करतय तर कोणी तो. यांचे पूर्वज अर्धे आयरीश अन अर्धे जर्मन तर कोणाचे चायनीज अन ब्रिटीश असा प्रकार आहे एकंदर.
त्याचा फायदा - कोणी कोणाला कमी लेखत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अमेरिकनिझम मधे जे काही अंतर्भूत आहे ती अंधश्रद्धा आहे का ??

----

अलेक्सिस टॉकविल यांचा हायेक वर सॉलिड प्रभाव होता. माँट पॅलेरिन सोसायटी चे आधीचे नाव अ‍ॅक्ट्न टॉकविल्ल सोसायटी असे ठेवायचा प्रस्ताव हायेक ने ठेवला होता. फ्रँक नाईट यांनी त्या प्रस्तावास विरोध केला विरोध यासाठी की "अ‍ॅक्ट्न टॉकविल्ल" या नावातून कॅथलिक लोकांची सोसायटी असे ध्वनित होतेय व ते या सोसायटीच्या वृद्धीस मारक ठरेल. म्हणून मग काँप्रो म्हणून ... हे संस्थापक लोक ज्या हॉटेल मधे भेटले त्या हॉटेल चे नाव "माँट पॅलरिन" ... या सोसायटीला द्यायचे ठरले (असे मी ऐकलेले आहे). टॉकविल्ल यांनी त्यांच्या डेमॉक्रसी इन अमेरिका या पुस्तकात "सॉफ्ट डेस्पोटिझम" नावाची संकल्पना मांडली होती. मनोबाच्या मुद्द्याच्या जवळपास जाणारी ही संकल्पना आहे. डिक्टब्लँडा ही राज्यशास्त्रातील संकल्पना सुद्धा मनोबाच्या मुद्याच्या जवळपास जाते. खरंतर अमेरिकनिझम ची रूट्स ही अमेरिकन "सोशल काँट्रॅक्ट थियरी" मधे आहेत असे मला वाटते. पण अमेरिकन सोशल काँट्रॅक्ट थियरी ची रूट्स युरोपिअन तत्वज्ञांनीच खतपाणी घालून रुजवलेली आहेत असेही मला वाटते.

सोशल काँट्रॅक्ट थियरीतील एक महत्वाचे कलम आहे Voluntarism. कोणीही कोणावरही जबरदस्ती करायची नाही. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल व गटाने करायची असेल तरी गटात लोकांना जबरदस्तीने ओढायचे नाही. व Voluntarism मधे अंतर्भूत असलेला आणखी एक मुद्दा - either tacitly or explicitly, without coercion - या वर या "सो कॉल्ड अमेरिकनिझम" ची लेजिटिमसी ठरते. कारण युतीवाद हा आहे की बळजबरी होत नसेल आणि व्यक्तींना फायदा होत सेल तर व्यक्ती तो गट जॉईन करणार नाहीत. हे अगदी देवाणघेवाणीच्या प्राथमिक तत्वाप्रमाणेच आहे. कोणत्याही बळजबरीच्या अनुपस्थितीत देवाणघेवाण तेव्हाच होईल जेव्हा देवाणघेवाण करणार्‍या सर्व पार्टीज ना असे वाटेल की देवाणघेवाण करून आपला फायदा होईल. फ्रीडम ऑफ असेंम्ब्ली च्या मुळाशी हाच मुद्दा आहे.

रा. स्व. संघाचा मुद्दा इथे आणणे संयुक्तिक आहे कारण संघाच्या नावात स्वयंसेवक हा शब्द आहे. (आता लगेच "नुसता नावात शब्द असून काय उपयोग" असा प्रश्न उपस्थित केला जाईलच.) संघ जॉइन करायची जबरदस्ती नाही. त्यामुळे संघाचे अस्तित्व लेजिटिमेट ठरते($$). पण म्हणून संघाची प्रत्येक कृति मात्र लेजिटिमेट ठरत नाही. उदा. जबरदस्तीने धर्मांतर/घरवापसी घडवून आणणे. ही जबरदस्ती संघ करतोच असे मी म्हणत नाहीये. पण करत असेल तर ते इल्लेजिटिमेट ठरते. पण कोणतीही जबरदस्ती होत नसेल तर मात्र धर्मांतर्/घरवापसी लेजिटिमेट ठरते व संघविरोधकांना वैचारिक विरोध व्यक्त करण्यापलिकडे काहीही करता येणार नाही. (या मुद्यावर चर्चा अपेक्षित नाही. "गब्बर हिट अँड रन करतोय" असा आरोप केलात तरी चालेल.)

अमेरिकनिझम मधे उस्फूर्तता / वोलंटरिझम अपेक्षित आहे. संकल्पना व्यक्तीसमोर प्रेझेंट केली जात्ये व व्यक्ती स्वतःहून कोणत्याही जबरदस्तीविना ती संकल्पना अंगिकारत्ये हे "व्यक्तीला त्या संकल्पनेचा फायदा होणार आहे हे पटलेले आहे" याचे द्योतक आहे. आता फायदा हा अर्थशास्त्रीय मेट्रिक आहे व व्यक्ती ही इकॉनॉमिक मॅन आहे असे गृहित धरत आहात - असा आक्षेप असू शकतो.

----

($$) - याचा अर्थ हे लेजिटिमसी साठी सफिशियंट आहे असा नाही. पण लेजिटिमसी साठी नेसेसरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बळजबरी होत नसेल आणि व्यक्तींना फायदा होत नसेल तर व्यक्ती तो गट जॉईन करणार नाहीत. हे अगदी देवाणघेवाणीच्या प्राथमिक तत्वाप्रमाणेच आहे. कोणत्याही बळजबरीच्या अनुपस्थितीत देवाणघेवाण तेव्हाच होईल जेव्हा देवाणघेवाण करणार्‍या सर्व पार्टीज ना असे वाटेल की देवाणघेवाण करून आपला फायदा होईल. <<

कधी तरी अमेरिकेतल्या फडतुसांच्या स्वातंत्र्याविषयीही (किंवा त्याच्या अभावाविषयीही) बोला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुस्तक वाचून मगच त्यावर बोलणे संयुक्तिक.

पण फडतूसांचे स्वातंत्र्य हा मुद्दा मजेशीर आहे. स्वातंत्र्य व अधिकार या दोन संकल्पनांमधे तळ्यात मळ्यात केले की असे मुद्दे लगेच बहरायला लागतात.

--

Despite the advantages of her race, education, good health and lack of children, Ehrenreich's income barely covered her month's expenses in only one instance, when she worked seven days a week at two jobs (one of which provided free meals) during the off-season in a vacation town.

हे एक अति निर्लज्ज स्टेटमेंट आहे. मिनिमम वेजेस, मेडिकेड, मेडिकेअर, सोशल सिक्युरिटी हे सगळे असूनही ही बोंब. (आता लगेच सोशल सिक्युरिटी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली आहे असा आरडाओरडा होईलच.)

--

तुम्ही मला पुस्तक सुचवलेले आहे. त्याबदल्यात मी ही तुम्हास एक पुस्तक सुचवतो. The Race between Education and Technology

लेखिका क्लॉडिया गोल्डिन. Barbara Ehrenreich ची ही गत का झाली ते या पुस्तकावरून समजेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तक वाचावसं वाटतय. काही रिव्ह्युज वाचले.
Goldin and Katz point out that, by leading the world in increasing the supply of educated workers at each of these stages, we should have been producing an oversupply of educated workers, quickly reducing the economic returns to investment in more skills and knowledge. But that did not happen because technology was advancing so swiftly that that the demand for more highly educated workers was increasing just as fast or even faster than the supply. It was this symbiotic relationship between advancing technology and increased supply of every-better educated workers that enabled the U.S. to build the world's most successful economy.

because we were providing a far more democratic form of education for the whole population, our economy and our society could produce prosperity not just for the few, but prosperity that could be broadly shared by all classes of the society.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

प्रतिसाद आवडला. सगळं तर्कसुसंगत (आणि पटण्याजोगं) वाटतंय खरं,
पण.. चिंजं.नी म्हटल्याप्रमाणे वेगळी वास्तवेही आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांनी प्रत्यक्षात सोयीस्कर मुक्त विचार, आधुनिकता वगैरे वगैरेचा जप करत अमेरिकनिझम हा नवीन धर्म अस्तित्वात आणला आहे.

नाही. हे सगळं या आधीच याच जगात सर्व धर्मात, परिसरात, लोकांमधे अंर्तभुत आहे. अमेरिकानिझम हे त्याचे फक्त नामकरण झाले अन याला ग्लोबल आय्डेंटीटी मिळाली. तुम्ही ज्याला अमेरिकानिझम म्हणता त्यातिल कोणतीही गोष्ट नैसर्गीकपणे कोणत्याही व्यक्तीत विकसीत झालेली नसेल तर तो याला अथक प्रयत्न करुनही थारा देणार नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

यात "पॉप कल्चर" नावाची पण एक गोष्ट आहे. रोजच्या संभाषणात त्यांच्या "पॉप कल्चर" चे संदर्भ देणे हे अमेरिकनांचे आवडते काम… आणि हे संदर्भ आपल्याला माहित नसतील तर आपण एक तर बावळट माणसाप्रमाणे त्यांच्या तोंडाकडे बघत राहतो, नाहीतर कंटाळून संभाषण सोडून देतो. त्यामुळे आमच्या संभाषणात सहभागी व्हायचे असेल तर आमचे संदर्भ माहित करा, ही या लोकांची सुप्त इच्छा असते. कुणीच तसं बोलून दाखवत नाही. आता काही मजेशीर चर्चांमध्ये तुम्हाला hollywood films ची वाक्यं आठवतात, आम्हाला हिंदी आठवतात, शेअर करे तो कैसे? बरं यात चूक कोण? अपना "पॉप कल्चर" अलग, उनका अलग. एखाद्या client focused कंपनी मध्ये काम करत असाल तर client call वर काम सुरु होण्याआधी "small talk" करता आला पाहिजे. त्यासाठी NFL / NBA follow करा… यंव नि त्यंव…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे तुम्हांला कदाचित आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> त्यामुळे आमच्या संभाषणात सहभागी व्हायचे असेल तर आमचे संदर्भ माहित करा, ही या लोकांची सुप्त इच्छा असते. कुणीच तसं बोलून दाखवत नाही. <<

हे सगळीकडे होतं. लोक जेव्हा पुलंच्या व्यक्तिरेखांचे किंवा त्यांच्या कुठच्या तरी पुस्तकातल्या विनोदाचे संदर्भ बोलताना देतात तेव्हा तेसुद्धा आपल्या 'पॉप कल्चर'चेच संदर्भ घेऊन बोलत असतात. फरक हा, की अमेरिकन पॉप कल्चरचा मारा जगभर कमीअधिक प्रमाणात होत असतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदी शीर्षकातच कंसात एक विशिष्ट जाहीर खुलासा करणे हे सहज झाले असले तरी रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे गवि. शीर्षक बदललय आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अमेरीकेची मायावी प्रभावळ बरीचशी हॉलिवुड्पटांनी देखील निर्माण केलेली आहे. अगदी नक्की!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

जगातले सगळ्यात बोरींगपट असावेत हॉलिवूडपट. रामायण, महाभारत सिरीयल्स पाहिल्यासारखं वाटतं नेहमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>जगातले सगळ्यात बोरींगपट असावेत हॉलिवूडपट. रामायण, महाभारत सिरीयल्स पाहिल्यासारखं वाटतं नेहमी.

+१

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् .... (व्यासांनी सगळंच उष्टावून ठेवलं आहे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् .... (व्यासांनी सगळंच उष्टावून ठेवलं आहे).

व्यासांनी 'सगळेच' नाही, 'सगळे जग' उष्टावून ठेवले आहे.

पण मग त्याला उपाय आहे. व्यासांना जग उष्टावत बसू देत. तुम्ही जगातून पाणी पिऊ नका, तांब्यातून प्या. मामला खतम. प्रॉब्लेम सॉल्व्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या वाक्यानुसार पहिल्या वाक्यात दुरुस्ती हवी.

व्यासांनी सगळे जग उष्टावून ठेवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुरुस्तीनंतरही नवीबाजूंचे तांबे शेष राहिलेच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कोण बालाजी? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवा आवडला. ही संकल्पना इथे चपखल बसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

काही अनुकरणे आणि काही अंधानुकरणे (अमेरिकनिस्म ची उदाहरणे)

अनुकरण: अमेरिकेच्या धर्तीवर चकचकीत मॉल / मल्टीप्लेक्स बनवणे.
अंधानुकरण (अमेरिकनिस्म): मॉल मधल्या चकचकीत दुकानातला माल चांगला समजणे / मॉलच्या मालाच्या मोलावर घाशाघीस न करणे, बाहेर पडताच १५ रुपयांच्या हातरुमालांसाठी १५ तास भांडून ५ रुपये किंमत कमी करायला लावणे… रस्त्यावरची ताजी भाजी दिसत असूनही "Reliance Fresh" मधली लाईट सोडलेली आणि पाणी मारलेली भाजी घेणे (यात रस्त्यावरचं सगळं ग्रेट असं नाही, तिथेही पाणी मारणारे आहेतच… पण चकचकीत दुकानातला पाणी मारणारा जास्त इमानदार असे समजणे…)

अनुकरण: अमेरिकेतल्या "CollegeHumor" वगैरे सारखे कॉमेडी ग्रुप तयार करणे, कॉमेडी चे वेगवेगळे प्रकार (standup, skits, improv, "roast") प्रयोगात आणणे.
अंधानुकरण (अमेरिकनिस्म): अमेरिकेतल्या "भाजणी" (roast) मध्ये फकाफकीच्या शिव्या घातल्या म्हणून तशाच शिव्या इथे पण घालणे, भाजणीतले सगळे पीठ तसेच ठेवून फक्त हिरवी सोडून लाल मिरची टाकणे (जोक्स तसेच ठेवून फक्त नावे बदलणे), video च्या सुरुवातीला "तुम्हाला वाईट वाटणार असल्यास आत्ताच बाहेर जा" असे audience ला सांगणे आणि audience मध्ये नसलेल्या व्यक्तींवर जोक मारणे (म्हणजे त्यांना वाईट वाटले तर त्यांनी तेल लावत जावे…)

अनुकरण: अमेरिकेच्या किंवा जगाच्या बरोबरीने २४ तास बडबड करणाऱ्या News वाहिन्या काढणे.
अंधानुकरण: अमेरिकन News channel च्या लोकांची personality सुद्धा कॉपी करणे, ते लोक ओरडतात म्हणून आपणही ओरडून "Nation wants to know" असे उठसुठ विचारणे… अमेरिकेतली चानेले उघड उघड एखाद्या पक्षाची समर्थक असली तरी, आपण एखाद्या पक्षाला छुपे समर्थन चालू ठेवणे पण वर स्वतः पक्षपाती नसल्याचा कांगावा करत राहणे…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते लोक ओरडतात म्हणून आपणही ओरडून "Nation wants to know" असे उठसुठ विचारणे

सॉल्लिड.

काही वेळा हाच प्रश्न अशा बाबतीत विचारला जातो की - ज्याबद्दल प्रश्न विचारणे व उत्तर मिळवणे हे जनतेच्या अधिकाराच्या बाहेरचे असते. (आत्ता लगेच उदाहरण आठवत नैय्ये ... पण...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम मांडणी. छान छान निरीक्षणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोचक लेख आणि प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0