Skip to main content

संगीत

ए. आर. रेहमान की हिमेश रेशमिया?

Taxonomy upgrade extras

रेहमान लोकांना का आवडत असावा ?
"सुक्या लाकडाचा भुगा दगडाच्या लहान लहान तुकड्यांसोबत काय चविष्ट लागतो. अहाहा!" असं कुणी म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल ?
रेहमान आवडणं हे असच आहे.

रहमान, रिपिटेशन आणि गोडवा

Taxonomy upgrade extras

(अलीकडे काय पाहिलंत? या धाग्यातून चर्चा वेगळी काढली आहे.)

या प्रतिसादाला किंवा उपचर्चेला थेट उत्तर म्हणून नाही, पण अन्य धाग्यावरील प्रतिसाद आणि खवउचकपाचक यांच्या संदर्भात अलीकडे वाचलेल्या ह्या दोन संबंधित लिंक्स:

१. 'I' ह्या तमिळ चित्रपटाच्या संगीताबद्दल लिहिताना भारद्वाज रंगन. (अवांतर - विक्रम ह्या नायकाचे मूळ नाव Kennedy Vinod Raj असे आहे!)

प्राची दुबळे यांचे आदीवासी संगीतावरील व्याख्यान

Taxonomy upgrade extras

मी तसा जमिनीपासून काही दशांगुळे वर तरंगणारा मनुष्य आहे. हरभर्‍याचे झाड मला अतिशय प्रिय असल्याने मी त्यावर सतत चढून बसत असतो. अशावेळी माझे कुटुंबीय आणि मित्र मला जमिनीवर खेचायची भूमिका इमाने इतबारे निभावत असतात. मात्र काहीवेळा एखादा लहानसा कार्यक्रम आपल्याला आपणहून जमिनीची ओढ लावतो याचा प्रत्यय मी रविवारी 'सुदर्शन'ला प्राची दुबळे यांच्या व्याख्यानादरम्यान घेतला.

हे शक्य आहे?

Taxonomy upgrade extras

भारतीय-पाश्चात्य पेहरावातील ती...
सखीसमवेत ती...
गंभीर-अवखळ-प्रसन्न मुद्रांतील ती..
नग्न-अर्धनग्न ती...
तर्‍हतर्‍हेचे दागिने ल्यालेली ती...
रेखांकनातून स्वत:ला साकारणारी ती...
कॅनव्हाससमोर उभी चित्रकर्ती ती...
तीच ती, अमृता शेरगिल... स्वत:ला विविध रंग-रुपांत रेखाटणारी!

`मी अशी - मी तशी’.... थेटपणे स्वत:ला साकारणं...
प्रत्येक कलाकाराला स्वत:ला ‘दाखवावं’ असं वाटत असणार.
किंबहुना,
अवगत असणार्‍या माध्यमातून ‘स्वत:ला अनेक तर्‍हांनी न्याहाळणं’ हेही कलेचं प्रयोजन असणार.
चित्रं-शब्द-शिल्प... मूर्त माध्यमांतून थेटपणे स्वत:ला ‘दाखवता-न्याहाळता’ येतं.

मंगेशकर भगिनी आणि इतर, स्पर्धा, वगैरे

Taxonomy upgrade extras

Lata Mangeshkar
मूळ धाग्यात चर्चा लांबल्याने आणि धागाविषयाशी अवांतर असल्याने इथे हलवण्यात आली आहे.

आवाज वाढव डीजे ...... तुझ्या आयची ......

शांताबाई ...............
बाणूबाया ....../......
पोपट पिसाटला ............
नागाच्या पिल्लाला ..........
ही पोळी साजूक तुपातळी ....
जपून दांडा धार ...
आणि काय काय ?
तर.........
तुझ्या आयची ......?

हेच का ते मराठी फिल्म म्युजिक ?
श्रीनिवास खळे , सुधीर फडके , दत्ता डावजेकर ,जयवंत कुलकर्णी आणि इतर नामवंत दिग्गजांनी ज्या उंचीवर नेवून ठेवले होते ...

तो दर्जा ... तो लेवहल नक्की किती खाली आणावं याला काही मर्यादा ?

की फक्त डीजे मध्ये वाजते एवढीच गाण्याची पातळी?

दिङ्मूढ उ.ख.

Taxonomy upgrade extras