अलीकडे काय पाहिलंत? - १४

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
==========

एका मित्राच्या सुचवणीला भूलून "टूरिंग टॉकीज" पाहिला.

या तंबूतल्या सिनेमांची value chain काय असते कोण जाणे, पण प्रत्यक्ष प्रोड्युसर आणि डायरेक्टर तंबूवाल्यांकडे सिनेमाची रिळं घेऊन दस्तुरखुद्द फिरत असावेत असं वाटत नाही. डिस्ट्रीब्यूटर कशासाठी असतो मग?

हुच्चभ्रू डायरेक्टरचा सामाजिक हुच्च स्तर दाखवण्यासाठी की काय तो पडद्यावर आला की इंग्रजी गाणं वाजतं.

ऐसीच्या लाडक्या सूनबै सौ जाह्नवी श्री. गोखले (याददाश्तवाले) यांच्याप्रमाणे यातली नायिकाही वपुंच्या डायरीतून उचललेल्या सुभाषितांचे डोस वेळोवेळी पाजत रहाते.

सिनेमाची गोष्ट बर्यापैकी जमलेली असली तरी शेवट अत्यंत म्हणजे भयंकरच प्रेडिक्टेबल आहे.

जमा बाजूला
- किशोर कदमचा अभिनय
- काहीकाही जमलेले संवाद
- संधी असूनही गाणी घुसडायचा टाळलेला मोह

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

नुकताच मुस्कुराहट नावाचा

नुकताच मुस्कुराहट नावाचा नितांत सुंदर चित्रपट पाहिला . प्रियदर्शन या सध्याच्या आघाडीच्या दिग्दर्शकाचा हा हिंदी मधला बहुदा हा पहिला चित्रपट . जय मेहता हा अभिनेता (याला काही typical मसाला चित्रपटात पाहिले होते . या चित्रपटा प्रमाणेच त्याचे बहुतेक चित्रपटांची निर्मिती त्याच्या वडिलांनीच केली होती ) रेवती (माझी आवडती अभिनेत्री ) आणि अमरीश पुरी (कमाल ) हि तीन मध्यवर्ती पात्र . आपल्या दुरावलेल्या बापाला पुन्हा आयुष्यात आण्यासाठी एका मुलीने राजू (जय मेहता ) याच्या सहाय्याने केलेल्या नाना खटपटी हा चित्रपटाचा मध्यवर्ती विषय . यावरून हा चित्रपट गंभीर आहे असे वाटू शकते पण तसे नाही . धमाल विनोदी चित्रपट आहे . राजू चा धान्दरट आणि कायम मार खाणारा मित्र (अन्नु कपूर ) आणि अमरीश पुरी च्या घरात काम करणारा घाबरट नौकर (जगदीप ) यांनी धमाल आणली आहे . रेवती तर उत्तम अभिनेत्री आहेच पण जय मेहता पण बर काम करून जातो . पण चित्रपटाचा backbone आहे अमरीश पुरी . एका खडूस रुक्ष कडक माणसापासून ते नंतर मुलीच्या सहवासात आल्यानंतरचा हळुवार आयुष्य समरसून जगणारा इसम त्याने भन्नाट रंगवला आहे . चित्रपटात अनेक हळवे प्रसंग पण तरलतेने घेतले आहेत . विशेषता climax संगीत आपल्या राम लक्ष्मण याचं आहे . गुन गुन करता आया भवरा हे गाण प्रियदर्शन ने सुंदर शूट केल आहे . शितावरून भाताची परीक्षा करायची असेल तर उत्सुकाना तुनलिवर बघता येईल . पूर्ण चित्रपट एका हिल स्टेशन वर घडतो आणि अप्रतिम छायांकन आहे . तस ते प्रियदर्शन च्या बहुतेक सिनेमात असत . आमचा चित्रपट हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटाच्या जातकुळीतला आहे असे आजकाल उठसुठ कुणी पण म्हणतो . पण असला काही दावा न करता चित्रपट अडीच तास निखळ मनोरंजन देतो . कुणाला काही वेगळ try करायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून बघा .

अवांतर - सुरुवातीच्या काळातला प्रियदर्शन हा (मुस्कुराहट , गर्दिश , विरासत ) हा पोस्ट हेराफेरी इरा पेक्षा खूप वेगळा वाटतो

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

गर्दिश

गर्दिश पाहण्यासारखा वाटतो.
तेंडुलकर्-निहलानी-ओम पुरी- सदशिव अमरापूरकर ह्यांचा अर्धसत्य, रामूचा सत्या , काही प्रमाणात गुलाम ह्यांच्याच लायनीतला तो गर्दिश.
पण त्यातला जॅकीचा मुद्दा, ती तगमग मांडायला जमलय त्यांना.
.
असो. मुस्लुराहटाही पहावा म्हणतोय.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खूप पूर्वी हा चित्रपट

खूप पूर्वी हा चित्रपट बघितल्याचं स्मरतं. छान आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बिकांच्या शिफारसी नुसार

बिकांच्या शिफारसी नुसार विकांताला 'द कलर पर्पल' हा सिनेमा पाहिला. बोलावं तेवढं कमी आहे ह्या चित्रपटा बद्दल. असे कित्येक तरी सिन आहेत सिनेमात जे हृदयाला हात घालतात पण उगीच डोळ्यात बोटं घालून रडवत नाहीत. कथे बद्दल लिहत नाही इथे - कदाचित कथा वाचल्यावर 'ह्यात काय नवीन' असं वाटू शकतं पण तरीही म्हणेन कथेची उत्तम मांडणी (अलाईस वॉकर ह्यांची मुळ कादंबरी त्याच नावाची, ज्याला पुलित्झर सन्मान मिळाला आहे). दर्जेदार अभिनय - अगदी बालकलाकारांचा देखील. सिनेमा पहाताना तो त्या मानाने ऐंशी दशकात प्रदर्शित/निर्मित असेल असं वाटत नाही एवढं सरस चित्रीकरण (चित्रपटाचा काळ तिसाव्या दशकातला आहे). ओपरा विनफ्री चा पहिला चित्रपट हे सिनेमाचं वैशिष्ट्य.

(त्याच दिवशी सकाळी 'फाईडींग फॅनी' थेटरात जाऊन पाहिला होता पण दुपारी घरी कलर पर्पल पाहिला आणि त्याच्याच हँगओवर मधे होतो इतका त्याचा इम्पॅक्ट, अगदी 'फाईडींग फॅनी' पाहिल्याचं ही विसरलो होतो (डोळा मारत) )

अरेरे

अरेरे

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मॅजिक इन मूनलाईट

नुकताच आलेला वूडी अ‍ॅलनचा मॅजिक इन मूनलाईट सिनेमा पाहिला. वूडी अ‍ॅलनच्या चाहत्यांना अपेक्षेप्रमाणे हलकेफुलके कथानक, चतुर संवाद अन निखळ विनोद अनुभवयाला मिळतील. कथानक एकोणिसाव्या शतकाच्या पुर्वार्धात घडते. नायक, कॉलिन फर्थ, हा विज्ञानाची जादुचे प्रयोग करून लोकांचे मनोरंजन करतो. विज्ञानाची कास धरणारा आणि जगाला फसवणार्‍या भोंदूचे पितळ उघडे पाडणारा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा एक मित्र त्याला अशाच एका भोंदू 'सायकिक'चे पितळ उघडे पाडण्याकरता बोलावतो. सायकिकचे अद्भूत कौशल्य, तिची निरासगता आणि याचे विज्ञानावरचे प्रेम यासगळ्यात अडकेल्या नायकाची ही कथा.

कथेचा शेवट थोडासा 'प्रेडिक्टेबल' आहे. बाकीचे चित्रण छान, फर्थचा अभिनय नेहमीप्रमाणेच चांगला, एका वॉट्सनही बर्‍यापैकी. आपल्या मध्यमवयीन स्टेबल गर्लफ्रेंडसोबत पाहण्यासारखा चित्रपट. (फार तरूण किंवा नविन मैत्रिण असेल तर धोका संभवतो. बायकोबरोबर पाहिल्यास पश्चात घरातील पडलेल्या कामाबद्दल ऐकून घ्यावे लागेल!)

+१ माय फेअर लेडी

+१
अनेक प्रसंगांत "माय फेअर लेडी"मधील संवादांची आठवण आली.

विशेषतः त्याचे अहंगंडप्रचुर प्रपोझल, शेवटी नात्यातील पोक्त स्त्रीच्या मध्यस्थीने घडून आलेली समेट वगैरे.

कदाचित जरा जास्तच हलकाफुलका आहे. पण हे ठाऊक असून मग बघितला तर निराशा टळते, आनंदच होतो.

इंग्लिश

कथानायकाच्या 'इंग्लिश' वृत्तीबद्दल थोडंस लिहायचं होतं, पण बॉसची नजर चुकवून प्रतिसाद लिहण्याचा नादात ते राह्यलंच!

अ सिंपल प्लॅन

काल "अ सिंपल प्लॅन" नामक चित्रपट पाहिला.
थोड्क्यात - तीन मित्रांना (दोन भाऊ आणि त्यांचा एक मित्र) एक प्रेत आणि त्याजवळ एक पैशांनी भरलेली बॅग सापडते. हुज्जतीनंतर तिघे ती ठेवण्याचा निर्णय घेतात. मग त्यातून उभी रहाणारी नवी लफडी आणि शेवट-
असा थोडक्यात सारांश आहे. बिली बाबा थॉर्नन्टन (thornton) काम झकास झालंय. एकदा तरी नक्की बघावा असाच चित्रपट.
१- फार्गो ज्यांनी पाहिलाय, त्यांना टिपिकल बर्फाळ गाव आणि त्यातले लोक ह्यांची आठवण झाल्याशिवाय रहाणार नाही.
२- ह्याच चित्रपटाची "लोणावळा बायपास" नावाने केलेली बेकार नक्कल मी चुकून आधीच पाहिलीये (त्यात विजय कदम आहे. ईश्वर प्रेक्षकांना शांती देवो). त्यामुळे मूळ चित्रपट अजूनच चांगला वाटला.

द काईट रनर- तसा जुना पिच्चर,

द काईट रनर- तसा जुना पिच्चर, पण आम्ही अलीकडेच पाहिला. कादंब्री इ. वाचली नाही, पण पिच्चर जो कै आहे तो अतिशय आवडला. अफगानिस्तानातले वातावरण फार सुंदर दाखवले आहे. मनावरचे असंख्य घाव झेलूनही लोक कसे ठामपणे जगतात ते फार म्याटर ऑफ फ्याक्टलि दाखवलेले आहे. फारच भारी _/\_

====================================================

तोपरेंत मुघल ए आझम डौनलोडवायला टाकला होता तोही पूर्णपणे डौनलोड झाला. आता पुनरेकवार त्यात हरवून जायला मोकळा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मुघल ए आझम लैच फेवरिट आहे.

मुघल ए आझम लैच फेवरिट आहे. विशेषतः ड्वायलाग आणि गाणी. "एक शहजादे के धड़कते दिल के लिए हम हिंदोस्ताँ की तकदीर नहीं बदल सकते" वगैरे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

मुघल -ए -आझम हा अमळ ओवर

मुघल -ए -आझम हा अमळ ओवर रेटेड चित्रपट आहे अस वाटणारे (माझ्याशिवाय ) अजून कोणी आहेत का इथे ?

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

सहमत

>> मुघल -ए -आझम हा अमळ ओवर रेटेड चित्रपट आहे अस वाटणारे (माझ्याशिवाय ) अजून कोणी आहेत का इथे ? <<

संवाद तडतडीत आहेत. कव्वालीतली निगार सुलताना (आणि गाणारी शमशाद बेगम) आवडते. दुर्गा खोटे आवडते. नौशादच्या कंठाळी संगीताबद्दल फार प्रेम नाही. टेक्निकलर मधुबाला आणि आरसेमहाल वगैरे चकचकीतपणा आवडत नाही. म्हणून ओव्हररेटेडशी सहमत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शंका

तमाम ऐसीकरांना परत एकदा तोच प्रश्न-

मधुबाला आकर्षक आहे का सुंदर आहे? का दोन्ही आहे?

आकर्षक आणि सुंदर या शब्दांची

आकर्षक आणि सुंदर या शब्दांची नेमकी काय व्याख्या अभिप्रेत आहे?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

कॉमन व्याख्यांप्रमाणे पाहिले तर मला ती दोन्हीही वाटते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला फक्त लोकांचा परिप्रेक्ष्य

मला फक्त लोकांचा परिप्रेक्ष्य तपासायचा आहे, आकर्षक सुंदर असेलच(वाटेल) असे नाही, सुंदर आकर्षक असेलच(वाटेल) असे नाही. मला मधुबाला आकर्षक वाटते(कधी-कधी).

सुंदर आणि आकर्षक या

सुंदर आणि आकर्षक या गोष्टींच्या व्याख्या इतक्या व्यक्तिसापेक्ष आहेत की असल्या तपासणीतून हाती काय येईल याबद्दल माझ्या मनात मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. पण तसंही बरेचदा तुमच्या प्रश्नांबद्दल ते माझ्या मनात कायमच असतं. त्यामुळे त्यात नवीन काही नाही.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भुमिका

सुंदर आणि आकर्षक या गोष्टींच्या व्याख्या इतक्या व्यक्तिसापेक्ष आहेत की असल्या तपासणीतून हाती काय येईल याबद्दल माझ्या मनात मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे.

एकाच घटनेवर अनेक लोकांचे अनेक परिप्रेक्ष्य आपल्याला न गवसलेले दृष्टिकोन देतात असं माझं मत आहे, ते दृष्टिकोन लक्षात घेतल्यावर माझी मतं बदलली आहेत हा अनुभव आहे, त्यामुळे निरपेक्ष व्याख्येपेक्षा/मतापेक्षा/विचारापेक्षा परिप्रेक्ष्यामुळे मला वैयक्तिक फायदा अधिक होतो असं सामुहिक चर्चा करताना जाणवलं आहे.

निदान लोकं असाही/कसाही विचार प्रामाणिकपणे करतात हे लक्षात येतं, आपली भुमिका बनवताना/मांडताना त्याचा फायदा होऊ शकतो.

सुंदर आणि आकर्षक या गोष्टींच्या व्याख्या इतक्या व्यक्तिसापेक्ष आहेत

माझा अनुभव - ज्युलिया रॉबर्ट सुंदर आहे असं अनेकांच मत आहे, माझंही होतं, पण तिच्या चेहर्‍यात(उदा.) नक्की काय सुंदर आहे असं विचारलं तर ठामपणे सांगता येणार नाही, पण ते ऐश्वर्याबद्दल सांगता येत होतं(जेंव्हा ती मिस वर्ल्ड झाली तेंव्हा), पण कदाचीत ज्युलिया सुंदर असण्यापेक्षा आकर्षक अधिक आहे असं मला वाटतं, आकर्षक असण्याला सौंदर्याप्रमाणे काही मोजमाप नाही, पण ते वाटतं एवढचं.

पण तसंही बरेचदा तुमच्या प्रश्नांबद्दल ते माझ्या मनात कायमच असतं.

वर माझी भुमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी एक कोलॅटरल फायदा सांगतो, काही प्रश्न निरर्थक वाटले तरी त्यावरच्या चर्चांमधुन इतरांच्या प्रतिसादांमधून चांगलं काही हाती लागु शकतं ,. उदा. अमुक किंवा चिंज ह्यांचा 'प्रत्यक्ष आणि रेकॉर्डेड कलामाध्यमे' धाग्यावरचा प्रतिसाद. त्याउप्पर दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहेच. (डोळा मारत) (स्मायली खास आग्रहास्तव)

पण तसंही बरेचदा तुमच्या

पण तसंही बरेचदा तुमच्या प्रश्नांबद्दल ते माझ्या मनात कायमच असतं. त्यामुळे त्यात नवीन काही नाही.

बहुतेक वांझोट्या चर्चांबद्दलही तेच मनात असतं कायम.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

वांझोट्या वाटल्या तरी बर्‍याच

वांझोट्या वाटल्या तरी बर्‍याच चर्चांनी मन वळतं, अंधश्रद्धा कमी होतात, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जातो, निदान एक जाणीव होते की आपण किती नम्र असायला हवं कारण लोक किती व्हर्सेटाईल असतात, किती व्यासंग असतो. आपण एककल्ली असू शकतो अन तो एककल्लीपणा अशा चर्चांमुळे कळून येतो.
बरेच फायदेही आहेत.

फायदे

अपर्णा प्रतिसादात उल्लेखलेले सर्व फायदे उपटतात. त्यांच्या भल्याला कारणीभूत्/साहाय्यकृत होणार्‍या ऐसीकरांना छदामही देत नाहित.
ऐसी व्यवस्थापनाने त्यांच्याकडून शुल्क वसूल करुन इतर सदस्यांत वितरित करावे अशी मी मागणी करतो. (डोळा मारत)
बाकी, मराठी संस्थळाबद्दल इतके छान बोललेले पाहून भडभडून का गदगदून काय म्हणतात ते आले.
डोळे पाणावले. नाक चोंदले.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

टॉकिंग अबाऑट द फायदे ... यु

टॉकिंग अबाऑट द फायदे ... यु बेट!!! (डोळा मारत)

अनेकांचं मत उद्बोधन होतं असं

अनेकांचं मत उद्बोधन होतं असं आहे, ही उत्तम गोष्ट आहे.

बाकी

नाक चोंदले.

दाक चोद्ले या खर्‍या उच्चाराची (नेहमीप्रमाणे लोकापवाद इ.इ. मुळे) नाकचेपी आपलं दाकचेपी केल्याचा निषेध दिशेद.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रोचक.

वांझोट्या वाटल्या तरी बर्‍याच चर्चांनी मन वळतं, अंधश्रद्धा कमी होतात, वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला जातो, निदान एक जाणीव होते की आपण किती नम्र असायला हवं कारण लोक किती व्हर्सेटाईल असतात, किती व्यासंग असतो. आपण एककल्ली असू शकतो अन तो एककल्लीपणा अशा चर्चांमुळे कळून येतो.
बरेच फायदेही आहेत.

असे मत असलेले किती लोक इथे आहेत ते पहायला आवडेल.

(असे पाहून तरी काय हाती लागणार म्हणा- बरोबरच ए- आडातच नाय तं पोहर्‍यात कुठून येणार?)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला पण त्यामध्येच धरा. कला,

मला पण त्यामध्येच धरा.

कला, राजकारण, अर्थकारण या विषयावर वेगवेगळ्या बाजूंची मतं आणि ती तशी का आहेत याची कारणं कळतात.

मग यावर आधारित अपण कोणत्या बाजूला झुकायचा का, संतुलित कशा प्रकारे राहता येईल ते कळते.

अर्थात जेवढा काढता येईल तेवढा निष्कर्ष काढे पर्यंत चर्चा केल्यानंतर सुद्धा काही वेळा स्कोर सेटलिंग, शब्दांचा किस पाडत गु-हाळ चालते ते मात्र वांझोटे नक्कीच वाटते.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

बॅटमन मी "डाव्या सोंडेचा

बॅटमन मी "डाव्या सोंडेचा गणपती" सारखे तद्दन अंधश्रद्धाळू लेख टाकलेले आहेत अन त्याबद्दल टीकाही झेलली आहे. मिपा, ऐसी यांच्यामुळे विचारात खूप बदल झाला आहे. वैज्ञानिकतेला जी प्रतिष्ठा दिली जाते ती पाहून अन स्वतः (जमेल तितका) विचार, आत्मपरीक्षण करुन एक फरक नक्की पडला आहे.
_______
चिंजंचे प्रतिसाद अन दृक कलेविषयीचा त्यांचा व्यासंग अन अनेक अन्य लोकांचे गुण हे काहीतरी फरक घडवतातच की.

दुर्मिळ प्रामाणिकपणा.

आंतरजालीय चर्चांत फारच दुर्मिळ असलेला प्रामाणिक प्रतिसाद आवडला. आपल्या धारणांचा पुर्नविचार, मूल्ये चाचपून पहाणे, आत्मपरिक्षण आणि माहितीत भर हे बाजूला राहिले तर चर्चा वांझोट्याच रहातात. एरवी "मी तुझ्याहून किती शहाणा / शहाणी" अशा चालणार्या चढाओढीत तुमचा प्रतिसाद फार भावला.

जालावर लिहीणाऱ्या मन, ऋषिकेश,

जालावर लिहीणाऱ्या मन, ऋषिकेश, क्लिंटन यांनी जालावरच्या चर्चांमुळे आपले विचार बदलले असल्याचे प्रतिसाद लिहीले आहेत. मी ही त्यातलीच.

अलीकडच्या काळात ऐसीवरच्या फोटोस्पर्धांमुळे माझं आकलन वाढलं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते ठीके ओ. पण मुळात व्याख्या

ते ठीके ओ. पण मुळात व्याख्या काय अभिप्रेत आहे?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

प्रतिसादकाच्या 'मनातल्या'

प्रतिसादकाच्या 'मनातल्या' व्याख्येनुसार मत जाणून घ्यायचे आहे, व्याख्या प्राथमिक नाही, मत प्राथमिक, मत दिल्यावर व्याख्येबद्दल चर्चा करावी वाटल्यास करता येईल.

ओक्के, ठीक. माझ्यापुरते उत्तर

ओक्के, ठीक. माझ्यापुरते उत्तर वर दिलेच आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मधुबाला , अशोक कुमार बरोबर

मधुबाला , अशोक कुमार बरोबर पूर्ण खुलते असे मत आहे.

http://www.youtube.com/watch?v=zFO9QvDV3JI ........... ये भी कोई दिल है क्या, जहां मौका मिला फिसल फिसल गया!!! ....... मस्त गाणं आहे (स्माईल)

अन http://www.youtube.com/watch?v=zAhFP43X5fE या गाण्यात ती किशोरकुमारच्या गळ्यात फासा अडकवून जे काही करते ..... उफ्फ!!! दोघही तूफान आहेत या गाण्यात
____________
तेव्हा फक्त मधुबाला इज ओके ओके. पण किशोर अन ती सुभानल्ला!!! किशोरकुमारचा आचरटपणा अन वेडे चाळे मस्त!!!!

:)

मधुबालाबद्दल सहमत, पण किशोर एकदम येडपट वाटतो (स्माईल), आणि फासा अडकवलेली मधुबाला दोन वेण्या घातलेलीही बरी दिसते आहे.

मला किशोर कुमारचा वेडेपणा

मला किशोर कुमारचा वेडेपणा, आचरट्टपणा प्रचंड प्रचंड आवडतो. नो वंडर मधुबाला त्याला मिळाली. अन शिवाय योगिताबाली अन ती दुसरी गोल चेहरावाली. कमालीचा प्रेमात अन खुळा वाटतो. अर्थात तो अभिनय असेलच.
_________
इन फॅक्ट या २ गाण्यात किशोर-कुमारनी अभिनयात मधुबालेला खाल्लय (डोळा मारत) .... तिनी जरा संयम अन सौंदर्याचा गर्व सोडून त्याच्या उल्लूपट्ठेगिरीला हवा दिली असती तर किती मजा आली असती ... पण ते दिग्दर्शकाच्या हातात होतं.
_____
असो थांबत (डोळा मारत)

तिनी जरा संयम अन सौंदर्याचा

तिनी जरा संयम अन सौंदर्याचा गर्व सोडून त्याच्या उल्लूपट्ठेगिरीला हवा दिली असती तर किती मजा आली असती

"Conditional Heteroskedastic Time Series Models of स्पष्टवक्तेपणा" या शोधप्रबंधासाठी मॅडम अपर्णा यांना डॉक्टरेट देण्यात येत आहे हो. मेहरबान जाहीर व्हावे !!!

(पळा पळा....)

बाकी काही म्हणा.

बाकी काही म्हणा. संख्याशास्त्र मात्र हेटेरो ऐवजी होमो प्रेफर करते असे म्हणायला पाहिजे (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बाऊन्सर जातात -

बाऊन्सर जातात - तुझे(संख्याशास्त्रिय) अन गब्बरचे(लिंंकन) प्रतिसाद.

किंबहुना योग्य व्यक्तीला

किंबहुना योग्य व्यक्तीला उकसविण्यात यश आल्याबद्दल मी माझी पाठ थोपटून घेतलेली आहे (डोळा मारत) (I do deserve a Pumpkin spice Latte.)
.
.
बाकी ते कंडिशनल सॅडिस्टिक (डोळा मारत) काही कळलं नाही. गुगल करणार आहे .
.
.

दुर्गा खोटे आवडते आणि मधूबाला

दुर्गा खोटे आवडते आणि मधूबाला आवडत नाही!

उठाले रे भगवान!!!
__/\__

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

चालू द्या

>> दुर्गा खोटे आवडते आणि मधूबाला आवडत नाही!
उठाले रे भगवान!!! <<

माझ्या उद्धृतात 'टेक्निकलर मधुबाला' आहे हे लक्षात आलं नसेल तर त्याकडे लक्ष वेधतो. बाकी चालू द्या.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते वाचलं होतं आणि लक्षातही

ते वाचलं होतं आणि लक्षातही आलं होतं. माझी प्रतिक्रिया अजूनही लागू आहे. बाकी चालू आहेच. (स्माईल)

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ऊप्स हमका माफी देदौ. गल्ती हो

ऊप्स हमका माफी देदौ. गल्ती हो गयी.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

चिंजं,

'कंठाळी' म्हणजे हो काय?

कंठाळी

वाचा - वाचाळ
कंठ - कंठाळी
शब्द - शब्दबंबाळ
भूत -भुताळी जहाज्/जागा/वास्तू
काही अंदाज येतोय का पहा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कंठाळी

>> 'कंठाळी' म्हणजे हो काय? <<

गोंगाट, गलबला असलेलं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उगंच भोचकपणा

तुमच्यामते रेहमानपण कंठाळी आहे का हो?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रहमान, रिपिटेशन आणि गोडवा

This comment has been moved here.

+१

अपडेटः चिंजंना काय म्हणायचं होतं ते समजलं.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

+१ -१

मला +१ म्हणावसं वाटतय .
पण लोकापवादाच्या भयानं मी तसं म्हण्णार नाहीये.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोकापवादाच्या भीतीतच गुदमरून

लोकापवादाच्या भीतीतच गुदमरून मृत्यू होणार तुमचा मनोबा.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(कधी नव्हे ते इ.इ.इ.) मेघनाशी

(कधी नव्हे ते इ.इ.इ.) मेघनाशी सहमत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

म्हणजे?

म्हणजे अजून आहेत होय?

मला हा सिनेमा बाकी आवडला, तशी

मला हा सिनेमा बाकी आवडला, तशी विशेष तक्रार नाही आणि क्लासीक चित्रपटांच्या यादीत नक्कीच मानाचं स्थान म्हणेन. पण दिलीप कुमार हा अभिनेताच मुळात ओवर रेटेड वाटतो आणि ह्या चित्रपटात जास्तच जाणवलं. पण आमची मधूबाला अशी समोर असताना काय तो दिलिप आणि आनंदांचा देव - डजंट मॅटर.

मी नक्की नाही. मुघलेआझम हा एक

मी नक्की नाही. मुघलेआझम हा एक परिपूर्ण, देखणा-श्रवणीय आणि आशयघन चित्रपट आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धक्का

तुझ्याकदून अशी प्रतिक्रिया बघून धक्का बसला.
असो. लोकापवादाच्या भयाने गप्प बसतो.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक्स्यूज मी?

+१११११११११११११११११

जोधाबाई: हमारा हिंदुस्तान कोई तुम्हारा दिल नही जिसपर एक कनीज हुकूमत करे.

सलीमः तो मेरा दिल भी आपका हिंदुस्तान नही जिसपे आप हुकूमत करे!!!!

जब रात है ऐसी मतवाली तो सुबहा का आलम क्या होगा हे गाणं सगळ्यात जास्त रडवणारं आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

लॉर्ड ऑफ द फ्लाईज

प्रतिसादात कादंबरी, चित्रपटाची गोष्ट टाळण्याचा प्रयत्न केला आहे. (तरीही ऋषिकेशसारख्या 'घाबरट' लोकांनी कादंबरी वाचण्याआधी किंवा चित्रपट बघण्याआधी, वाटल्यास, प्रतिसाद वाचू नये.)

या कादंबरीबद्दल ऐकलं होतं. कादंबऱ्यांचे चित्रपट बनवले की त्यातली मजा जाते हे ही तसं अपेक्षित आहे. पण 'क्रायटेरियन कलेक्शन'च्या चित्रपटांबद्दल खात्री असल्यामुळे हा चित्रपट आणला. हा विश्वास सार्थ ठरवणारा चित्रपट आहे.

ही गोष्ट आहे डिस्टोपियाची. समाजातून नैतिकता हद्दपार झाली की समाज न राहता ती झुंड बनते, झोटिंगशाही सुरू होते, बागुलबुवा उभा करून त्यांच्यासाठी बळी चढवले जातात आणि जे कोणी त्यातल्यात्यात समंजस असतात, किंवा हतबलतेपोटी वेगळा मार्ग सुचवतात त्यांना पद्धतशीरपणे हटवलं जातं, असं या गोष्टीचं सूत्र. माणसांच्या स्वभावाबद्दल ज्यांना काही समजून घ्यायचं आहे त्यांनी जरूर वाचावी अशी ही गोष्ट.

या गोष्टीला "फीअरमॉंगरींग" म्हणत हिणवता येईल इतपत डिस्टर्बिंग दृष्य, घटना यात आहेत. लेखकाने मुद्दामच टोकाची परिस्थिती निवडून गोष्ट रंगवलेली आहे. काही कारणामुळे, एका बेटावर फक्त काही मुलगेच उरले आहेत. यांतले काही लहान आहेत, बरेचसे मुलगे निदान वर्तनातून तरी टेस्टोस्टीरॉनचं वाढतं प्रमाण दाखवणारे आहेत. माणसांची नैतिकता ठराविक प्रकारे विकसित होण्यामागे उत्क्रांतीजन्य कारणं आहेत असं मानलं जातं.'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'च्या गोष्टीतल्या या परिस्थितीत उत्क्रांती होण्याची काही शक्यताच नाही, कारण या गटामध्ये मुली/स्त्रिया नाहीत. म्हणजे या समाजाला काही भविष्य नाही. भविष्य नाही म्हणजे "पुढच्या जन्मात काय होईल" किंवा "कयामतच्या दिवशी आपण काय उत्तर देणार" अशी भीती बहुसंख्येने असणाऱ्या सामान्य माणसाला नाही. त्यामुळे एक कोणी टोकाचा निर्णय घेतो तेव्हा बाकीचे सगळे त्याच्या पाठोपाठ चालायला लागतात; बागुलबुवा मोठे करतात आणि आपल्यातल्याच वेगळ्या आवाजाचा खूनही करतात.

एकाधिकारशाही, सत्ताकेंद्र एकवटणं, हुकुमशाही या गोष्टींमुळे समाजाची झुंड कधी बनते हे लक्षातही येत नाही. याची एक वेगळीच मिती या चित्रपटामुळे मला लक्षात आली. चित्रपट तर पाहिलाच, कादंबरीही वाचली पाहिजे.

(सध्या ऐसीवर दिसणारे कीवर्ड्स प्रतिसादात वापरले आहेत. चित्रपट पाहून ऋषिकेशसारख्या, बहुदा अल्पसंख्य असणाऱ्या, 'घाबरटां'च्या भीतीबद्दल मला किंचित अधिक आदर निर्माण झाला आहे. त्यांनी हा 'घाबरटपणा'सतत मिरवावा, अशी सदिच्छा.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांनी हा 'घाबरटपणा'सतत

त्यांनी हा 'घाबरटपणा'सतत मिरवावा, अशी सदिच्छा.

हम्म्म, एखाद्याच्या मांडीवर बसून त्याच्या हाताला घाबरण्यापेक्षा त्यालाच घाबरुन मांडीवरुन उतरणे बरे. पण हाताला घाबरणेच फक्त फ्याशनेबल आणि अ‍ॅक्सेप्टेबल आहे असे दिसते. पूर्ण गोष्टीला घाबरणारे अव्यवहार्य आणि फॅनॅटिक ठरण्याचा धोका असतो.
आणि त्यांना तसे ठरवणार्‍यांची झुंड इतकी मोठी आहे की अशा घाबरट लोकांना सॅनिटी टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. असो.

Hope is NOT a plan!

प्रतिसाद बाऊन्सर गेला.

प्रतिसाद बाऊन्सर गेला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसादाचा अर्थ

ऋषीकेश फक्त नजीकच्या भविष्याचे जे चित्र आहे त्या चित्रातील तुकड्यालाच घाबरतोय.
प्रत्यक्ष चित्राचा तो फक्त एक भाग आहे.
ऋ ची भीती तुच्छ आहे.
ननिंचीच भीती तेवढी ग्रेट आहे.
राजकीय विषयाची चर्चा/भीती सोडा.
पर्यावरणाकडे, पर्यावरणातील घडामोडींमुळे माणसाचं जे काय होणारे त्याकडे बघा हो.
खोलीतील हत्ती तिकडे आहे हो.
घाबरा हो घाबरा.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हम्म!

तुम्ही सांकेतिक भाषेचे डिकोडिंग करण्यात भारी आहात (स्माईल) असे दिसते पण मी प्रतिसादाचा अर्थ असा वाचला,

ऋषीकेश फक्त नजीकच्या भविष्याचे जे चित्र आहे त्या चित्रातील तुकड्यालाच घाबरतोय.
प्रत्यक्ष चित्राचा तो फक्त एक भाग आहे.
तरीही त्याच्या भितीला (इथे) सन्मान आहे.
पर्यावरणाकडे, पर्यावरणातील घडामोडींमुळे आणि अमर्यादित वाढीच्या हव्यासापोटी माणसाचं जे काय होणारे त्याकडे पाहून त्याविषयी घाबरणार्यांना मात्र फॅनॅटिक आणि मनोविकारी समजले जाते.
खोलीतील हत्ती तिकडे आहे हे कोणाच्या फारसे लक्षात येत नाहीय.
भीतीचे आवाज महत्वाचे असतात आणि त्यातूनच भविष्यापुढे असलेले धोके लक्षात येऊ शकतात पण मराठी आंतरजालावर मात्र एकाच प्रकारच्या आणि आत्तापर्यंत अनेकांनी आवाज उठवलेल्या भितीच्या आवाजांना सन्मान आहे."

"अदितीच्या चित्रपटाच्या आणि पुस्तकाच्या संदर्भात एका प्रकारच्या भितीचे स्थान अधिक सुस्थानी आहे हे खरे आहे पण थोडा दूरदर्शीपणाने विचार केला तर सध्याच्या काळापुढे असलेल्या इतर, अधिक मोठ्या समस्यांना पुढे आणण्यार्या भितीच्या आवाजांना दडपण्यात येणारी झुंडशाही लक्षात येऊ शकते." -हे माझे परिपेक्ष्य आणि मत.

"एकमेकांना चिमटे काढण्यापलिकडे आणि ओरबाडण्यापलिकडे कधीतरी मराठी आंतर्जालावर (निदान ऐसी अक्षरेवर तरी) वादग्रस्त विषयांवर सकस चर्चा होऊ शकतील हा माझा भाबडा विश्वास आहे (तो क्वचित कधीतरी खराही ठरलाय)" - हे माझे भोळे मत.

श्रेणी

रोचक , मार्मिक वगैरे श्रेणी देउन टाकली आहे

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चित्रपटांबद्दल लिहीताना ऋचीच

चित्रपटांबद्दल लिहीताना ऋचीच भीती सुस्थानी आहे. तो अनेकदा स्वच्छपणे ''चित्रपट बघितल्यावर लेख/प्रतिसाद वाचेन'' असं लिहीतो.

आणि तसंही इथे ऋषिकेश हा त्या समूहातला एक आहे, प्रतिनिधी म्हणून. त्याची भीती थोर, इतरांची कमी थोर असं काही माझ्या डोक्यात नव्हतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(No subject)

(स्माईल)

पीटर ब्रूक

आवडती कादंबरी आणि आवडता चित्रपट. त्याच बरोबर पीटर ब्रूकचा 'मोदेरातो काँताबिले'ही मिळाला तर पाहा. 'लॉर्ड ऑफ द फ्लाइज'पेक्षा खूपच वेगळा आहे.

जाता जाता : 'प्रत्यक्ष आणि रेकॉर्डेड कलामाध्यमे' धाग्यावर ह्या प्रतिसादात उदाहरणादाखल मी जे आरशासहित नेपथ्याचं छायाचित्र दिलं आहे, ते पीटर ब्रूकच्या एका नाट्यप्रयोगातून घेतलं आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्टार ट्रेक इंटु डार्कनेस

स्टार ट्रेक इंटु डार्कनेस (२०१३) पाहिला. नावाला साजेसा, मस्ताड स्पेषल इफेक्ट्स आणि एकूणच फ्रँचायझीला एकदम शोभणारा पिच्चर आहे. कॅप्टन कर्क आणि स्पॉक यांची जुगलबंदी, बेनेडिक्ट कंबरबाखचा 'खान' नामक सुपरम्युटंट म्हणून अभिनय, आणि एकूणच आंतर-आकाशगंगीय प्रवास, वर्महोल, इ. भानगडींमुळे प्रचंड अपील नाही झाला तरच नवल!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Unsealed : Alien Files...

सध्या रोज History HD Channel वर "Unsealed: Alien Files" नावाची सेरिज बघतोय...सोम-शुक्र रात्री ११ वजता...
छान आहे... "विश्वास ठेवावा की नाही?" हा कदचित नतंरचा आणि वादाचा मुद्दा असेल, पण त्यांनी दिलेले पुरावे लॉजीकल वाटतात...
जमलं तर जरुर बघा...

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

हॉलीडे

काल द हॉलीडे (२००६) पाहिला.
रोमँटिक चित्रपट! तगड्या स्टारकास्टचा तगडा अभिनय! केट विन्स्लेट, कॅमरून डिआझ दोघीही आपापल्या भुमिकांना यथेच्छ न्याय देतात.
भावनाप्रधान, मध्यमवर्गीय ब्रिटीश आयरीस (केट) आणि वरवर कोरडी, काहिशी उतावीळ, उत्छृंकल, श्रीमंत अमेरिकन अमँडा (कॅमरून) यांचा वेगवेगळ्या कारणाने ऐन हॉलीडेजच्या तोंडावर हृदयभंग होतो. त्या तिरमिरीत त्या एका वेबसाईटवरून एकमेकिंच्या घरात हॉलिडे घालवायचे ठरवतात नी घरे एक्सचेंज करतात. दोन अनोळखी कधीही न भेटलेल्या वेगळ्या जीवनशैली असणार्‍या या मुली आपापली घरे एक्सचेंज करतात. त्याचबरोबर त्यांछे आयुष्य बदलते. ते कसे हे बघायला हा चित्रपटा बघा.

हळूवार उलगडत जाणारी नाती, आवश्यक तिथेच असलेले संवाद, उत्तम सिनेमॅतोग्राफी, देखणे कलाकार, गोऽड कथा वगैरे सगळं जमून आलं आहे.

जर तुम्हाला काहिशा गोऽड (व तोंडीलावण्यापुरता हलका-फुलका विनोद) अशा प्रेमकथा - प्रेमपट आवडत असतील तर हा चित्रपट बघाच (माझं मानांकन ७/१०)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'द हॉलीडे' माझ्या पण प्रिय

'द हॉलीडे' माझ्या पण प्रिय चित्रपटांच्या यादीतला अर्थात केट मुळेच पण इतर वेळेस फार न अवडणारी कॅमरन डिआझ ह्या चित्रपटात विशेष आवडली. ज्यूड लॉ कमालीचा चिकणा दिसलाय आणि जॅक ब्लॅक म्हणजे तर असा तिखट चिवड्यात अचानक दाताखाली मनुका/बेदाणा यावा असा आंबट-गोड (स्माईल)

मुझसे दोस्ती करोगे ???

मुझसे दोस्ती करोगे ???

गब्बर, नवा आहेस का बे

गब्बर, नवा आहेस का बे मआंजावर?

'मय्त्रि कर्न्र कं' सोडून अन्य कुठल्याही प्रकारे वरील प्रश्न विचारणे म्ह. एक सॅक्रिलेज आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सॅक्रिलेज मंजे काय ?

सॅक्रिलेज मंजे काय ?

व्हायोलेशन ऑफ समथिंग सेक्रेड-

व्हायोलेशन ऑफ समथिंग सेक्रेड- इन धिस केस, द आस्किंग मन्त्रा.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ओ..माय प्लेजर ... घे, केली

ओ..माय प्लेजर (स्माईल) ... घे, केली दोस्ती (डोळा मारत)

रेको

रेको बद्दल धन्यवाद. पाहिलेला नाही.

गब्बर - लॉज बद्दलही.

लॉज ऑफ अ‍ॅट्रॅक्शन व द हॉलिडे

लॉज ऑफ अ‍ॅट्रॅक्शन व द हॉलिडे हे माझे दोन ऑल टाईम फेव्हरिट चित्रपट आहेत.

आमची केट विन्सलेट आहे का

आमची केट विन्सलेट आहे का तिथं? बरं बरं. मग तर पाहणारच.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

केट विन्स्लेट तुमची कधीपासनं

केट विन्स्लेट तुमची कधीपासनं झाली? मागच्या महिन्यात ती अनुप ढेरेंच्या नावानं वडाला प्रदक्षिणा घालत होती. व प्रार्थना करत होती की जन्मोजन्मी हाच एक पति मिळावा म्हणून.

वा वा... पण पुढचा जन्म

वा वा... पण पुढचा जन्म माणसाचा मिळाला नाही तर काय???

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ती आमचीच आहे. पुराव्याचा काय

ती आमचीच आहे. पुराव्याचा काय संबंध? न्यूटन-आईन्स्टाईनला विचारत नाय कधी तुम्ही लोकं पुरावा, आम्हांलाच कायले विचारून र्‍हायले भौ?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ती तुमची नाही याचाच पुरावा

ती तुमची नाही याचाच पुरावा दिलेला की ओ मी. ती ढेरेंची आहे याचा पुरावा दिलेला.

बॉटबॉय

बॉटबॉयच्या धाग्यांमध्ये एक खट्याळपणा होता.
तुम्ही बॉटबॉय आहात का ? थेट आय डी चं नावच "मिश्किल" असं घेतलत, म्हणून विचारलं.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमचा पुरावा चूक आहे. आमचीच

तुमचा पुरावा चूक आहे.

तशरीफ-ए-मन सुर्ख़ आस्त.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आम्ही मागत नाही पण हरितात्या

आम्ही मागत नाही पण हरितात्या स्वतःहून ऑफर करतात. की पुराव्याने शाबित करीन म्हणून. आम्हाला मागायची गरजच पडत नाही. काय मिश्किलराव ?

बराबर.

बराबर.

The Young and Prodigious T.S. Spivet

वेळ मिळताच amelie(२००१) या सुप्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा- Jean-Pierre Jeunet याचा "The Young and Prodigious T.S. Spivet" हा सर्वात अलिकडील इंग्रजी चित्रपट पाहिला.

त्याचे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर काही वैशिष्ट्ये लक्षात येतात. मला जाणवलेले "टी. एस." चे सूत्र चित्रपटातल्याच एका प्रश्नात मांडता येते : ते वाक्य साधारणतः असे : "गगनचुंबी इमारतीसारख्या सरळसोट भव्य रचना करणार्‍या माणूस असा वाकडा,अनाकलनीय कसा काय वागतो बरं? " मी पुस्तक वाचलेले नाही, पण जॉन्ची(उच्चार क्षमस्व!) दिग्दर्श्कीय फंडे पाहता मूळ पुस्तक त्याच्या प्रकृतीचेच असावे असे वाटते.
चित्रपटात नेहमीची जॉन-वैशिष्ट्ये आहेतच. : बालपण-त्यात मुलांच्या भावविश्वात असणारी कल्पित पात्रे, बारकावे, विक्षिप्त व्यक्तिरेखा, एखाद्या (नाट्यमय)घटनेने-वियोगाने बदलून जाणारी आणि आयुष्यभर त्या प्रभावांमधून बाहेर न पडणारी माणसे, ध्येयप्रेरित माणसे इत्यादी. सर्व चित्रपटभर अखंड आढळणारा पिवळट प्रकाश, खुसखुशीत संकलन शैली, श्रवणीय संगीत, आणि औद्योगिक क्रांत्यांच्या भग्न खुणा, मानवी आयुष्याला पूरक असणारी- कधी कधी ती आयुष्यभर व्यापून-चिकटून राहणारी यंत्राधारित व्यवस्था हे प्रामुख्याने दिसतात. यांतील पात्रे या यंत्रांशी समरस झालेली असतात, त्यांमध्ये विरंगुळा शोधतात, कधी कधी या यंत्रांच्या आधारेच परावलंबी आयुष्य जगत असतात. एकंदरीत "मेटल" हे जॉनच्या चित्रपटांत जाणवण्याइतपत असते.
या चित्रपटात perpetual motion machine तर केंद्रस्थानी आहे. मागच्या Micmacs मध्ये काही भंगारापासून केलेली Contraption दाखवली होती. या दिग्दर्शकाच्या गोष्टीमध्ये पात्रे विविध क्लृप्त्या लढवत असतात. त्या बर्‍याचदा तांत्रिक असतात. amelie तर संबंध चित्रपटभर काही काहीना कल्पना, क्लृप्त्या योजित असते.
काही कलाकार जॉंच्या चित्रपटात हमखास दिसतातच. इंग्रजी चित्रपटातही विक्षिप्त भूमिका करणारी अशी प्रतिमा असलेली Helena Bonham Carter आहे. तिच्या भूमिका जाँच्या चित्रपटात्ल्या पात्रांच्या पठडीतल्या आहेत. कदाचित ती पुढे त्याच्या आगामी चित्रपटांत दिसेल.
amelie चा प्रभाव अनेक चित्रपटांवर आहे. जॉनच्या शैलीचा प्रभाव आपल्याकडे राजकुमार हिरानीवर दिसतो. 'थ्री इडियट्स' मध्ये amelie मधील संकलन शैली वापरली आहे. अभियंत्याच्या स्पर्मची कल्पनाही amelie मधून घेतली असावी. अलीकडे आलेल्या बुडापेस्ट हॉटेल, मूनराईज किन्गडम यांच्या चित्रकर्त्यावरही जॉन चा प्रभाव मला जाणवतो.

विकांताला "बनी अँड द बुल" हा

विकांताला "बनी अँड द बुल" हा चित्रपट पाहिला. अनेक दृष्टीने मला हा चित्रपट आवडला + लक्षणीय वाटला.

कथा "रोड मुव्ही" या प्रकारातील असली तरी वेगळ्या प्रकारे हाताळणी आहे. दोन मित्रांची ही कथा आणि दोघांचीही उभी राहिलेली पात्रे याला तोड नाही. अतिशय सशक्त अभिनय, संवाद, प्रसंग आहेतच.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष शुटिंग न करता "लाईव्ह अ‍ॅनिमेशन" द्वारे ईन्डोअर स्टुडीयोत इतका सशक्त "रोड मुव्ही" चित्रीत करणे आणि तसे करण्यामागे एक सबळ कारण दर्शवणे मला थोर वाटले.

यावर अधिक नंतर लिहितो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुविचार

लोकसत्तेल्या प्रशांत कुलकर्णींच्या कार्टून कडे नित्यनेमाने जाणे होते.
ऑनलाईन आवृत्तीत तिथे जाताना काही जाहिराती, लोकसत्ता लाईव्ह चा विडीओ, नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर असे बरेच मटेरिअल ओलांडून जावे लागते.
तर, आज "सुविचार" नावाचा प्रकार पाहिला. सुविचारामागे "गृहशोभिका-सरस-सलील" यांच्या चमकू कागदावरच शोभून दिसतील असे फोटो सुविचाराच्या अर्थाला पूरक म्हणून असतात. जर ह्यांचा स्लाईड शो पाहिला तर ते क्रमाक्रमाने बथ्थड होत गेल्याचे जाणवले. हे सर्वात अलीकडील रत्नः

कृपया कोणाला संगती लागत असल्यास उपकृत करावे.