Skip to main content

ए. आर. रेहमान की हिमेश रेशमिया?

रेहमान लोकांना का आवडत असावा ?
"सुक्या लाकडाचा भुगा दगडाच्या लहान लहान तुकड्यांसोबत काय चविष्ट लागतो. अहाहा!" असं कुणी म्हटलं तर तुम्हाला काय वाटेल ?
रेहमान आवडणं हे असच आहे.

ऋषिकेश Wed, 01/07/2015 - 09:44

एखादी गोष्ट, गाणे, व्यक्ती एखाद्याला का आवडते याचे उत्तर देणे कठीणे मनोबा.
बर्‍याच गोष्टी तरल असतात, मग रे रेहमान आवडणे/नावडणे असो वा लैंगिकता! :प ;)

तुला रेहमान आवडत नाही का? (छातीवर हात टॅप करत) इट्स ओके, इट्स ओके! (आठवा मेघनाचा चित्रदर्शी प्राईड मार्च धागा)

अमुक Wed, 01/07/2015 - 09:59

मागे एका रहमानच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत तुम्ही 'हिमेश रेशमिया' आवडतो असं सांगितलं होतंत नि रहमानच्या संगीताला नावं ठेवली होतीत. त्या चर्चेत मी रहमानच्या गाण्यातली काही वैशिष्ट्य थोडक्यात उलगडून दाखवली होती. त्याच वेळी अतिशय कुतुहलाने 'हिमेशच्या संगीतात काय आवडतं?' असंही मी विचारलं होतं. त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.

नंदन Wed, 01/07/2015 - 13:34

In reply to by अमुक

मागे एका रहमानच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत तुम्ही 'हिमेश रेशमिया' आवडतो असं सांगितलं होतंत नि रहमानच्या संगीताला नावं ठेवली होतीत.

मन की किताब से तुम, मेरा नाम ही मिटा देना...

त्या चर्चेत मी रहमानच्या गाण्यातली काही वैशिष्ट्य थोडक्यात उलगडून दाखवली होती.

गुण तो न था कोई भी, अवगुण मेरे भुला देना...

त्याच वेळी अतिशय कुतुहलाने 'हिमेशच्या संगीतात काय आवडतं?' असंही मी विचारलं होतं. त्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.

मुझे आज की 'विदा' का, मर के भी रहता इंतजार! ;)

adam Wed, 01/07/2015 - 14:05

In reply to by अमुक

'हिमेशच्या संगीतात काय आवडतं ते नेमकं सांगता यायचं नाही. आणि हिमेश लैच आवडतो असंही नाही; पण "रेहमानपेक्षा हिमेसभाई परवडला" असं ते आहे.
आता मीही रेहमानीसंगीत आवडून घ्यायला सुरुवात करेन हवं तर . पण पब्लिकनं लागलिच "निरर्थक" का म्हणून मार्क करावं ?
.
.
अवांतर :-
रेहमान हा सोफिस्टिकेटेड संदिप चौटा आहे; असं माझं होतं. संदिप चौटा म्हंजे रामगोपाल वर्माच्या "मस्त" वगैरे सारख्या दोन चार पिच्चरांत टपरा संगीत दिलेला प्राणी. पण माझ्या नेमक्या तक्रारी गविंनी रेह्मानच्या निगेटिव्हज् खूपच अचूक मांडल्यात. मलाही बव्हंशाने तेच म्हणायचे आहे. आणी वरती कुणीतरी "रेहमान आवडत नै , म्हंजे पंजाबीच संगीत ह्यांना काय ते आवडत असणार " असलं कायतरी लॉजिक मांडलय. ते ठार चूक हाये.
रेहमान काय एकटाच नॉन-पंजाबी संगीत देतो असं म्हण्णं आहे का ? काहीही.
हा शंकर एहसान लॉय पासून सरसकट सर्वांचाच अपमान आहे. अगदि प्रीत्म ,विशाल शेखर वगैरे चोट्टेही प्रत्यक्षात चोरुन जे काही आणतात ते पंजाबी व्यतिरिक्त खूप काही असतं. ह्यांनी कोरियन, ब्राझिलियन ,हंगेरियन आणि अजुऊन न जाणो कोणकोणती गाणी चोरलेली आहेत. उगाच काय काहीतरी.
पंजाबी संगीताचा शिखरबिंदू, मानबिंदू म्हणजे य्यो य्यो हन्नीसिंग. तो आम्हाला आवडतो असा कुणी अर्थ काढतय की काय अशी भीती वाटली. ही असली धादांत खोटी अफवा चार चौघात पसरली तर जगणं अवघड च्यायला.

अमुक Wed, 01/07/2015 - 14:49

In reply to by adam

१. रेहमानपेक्षा हिमेसभाई परवडला
..........अहो याचंच तर कारण ऐकायचं आहे.

२. तुम्हाला एखादा संगीतकार आवडणं/न आवडणं वेगळं नि आवडत नाही म्हणून नावं ठेवणं वेगळं.
बरं, नावं ठेवा हवं तर पण मग जे अधिक चांगलं वाटतं त्याविषयी लिहा ना.. मी खरोखरीच्या उत्सुकतेने वाचेन नि तेच कधीपासून विचारतोय. म्हणजे उदा. गविंनी जे रहमानचे दोष सांगितले त्यातले हिमेशभाईंच्या संगीतात नाहीत असे कुठले ? बरं जे रहमानचे गुण सांगितले आहेत त्यातले कुठले हिमेशच्या संगीतात आहेत ? एखादं उदाहरण ?

३. मला तुमचे प्रतिसाद निरर्थक वा विनोदी वाटत नाहीत. तसेच माझे प्रतिसाद रहमानच्या संगीताची पाठराखण करण्यासाठी नाहीत. मला खरोखरीच जाणून घ्यायची आहेत तुमच्या मतांमागची कारणं.

adam Wed, 01/07/2015 - 16:42

In reply to by अमुक

रेहमानबद्दलच्या विशेष महत्वाच्या बाबी :-

-वाद्यसंगीताद्वारे "आवाजा"ला दाबून टाकणे (पुन्हा एकदा उपरोक्त कारण?!). बर्‍याचदा शब्द लागतही नाहीत ऐकताना.

-कृत्रिम वाद्यवृंदाचा अतिरेक, त्यामुळे नैसर्गिक गोडवा नाही

- वर म्हटल्याप्रमाणे सिनेमाची कथा, तिची प्रकृती, प्रसंगातली नजाकत किंवा एकूण प्रसंगाशी मेळ खाणारं संगीत क्वचितच. सर्वत्र छापून काढल्यासारखं यांत्रिक आणि आधुनिक भासणारं संगीत.

ह्या व्यतिरिक्त शब्दांची विचित्र आणि प्रमाणाबाहेर मोडतोड.
उदा:-
गजनी चित्रपट. "तू मेरी अधूरी प्यास प्यास तू आ गयी मन रास रास " हे अदरवाइज गाणं म्हणून छान वाटायला लागतं. पण
"केह दे तू हां तो जिंदगी, चैन से छूटके हसेगी" ह्या ऑलीनंतर "मोत्ती होंगे मोत्त्त्ती राहो मे" हे असलं काहीतरी करुन ठेवलय की वैताग येतो.
.
.
शिंपल्यात "मोती" असतो की "मोत्त्त्ती" ???
.
.
हे एकच उदाहरण. असे कैक आहेत. आणि मग एरव्ही आवडलेली बाकीची गाणी किंवा त्याच गाण्यातला इतर भाग विसरुन हेच डोक्यात रुतून बसतं. माझ्या हिंदीमावशीचा (मायमराठी तसं हिंदीमावशी) असा खून करतोय का ? अरे?? तमिळियन आहेस मान्य; ट्यालण्टॅड आहेस, हे ही मान्य.
पण म्हणून हिंदीचा इतका राग करावा ? जमेल त्या मार्गानं तिला घायाळ करत सुटावं ?
कुठे फेडाल ही पापं?
.
.
किंवा त्याच्या गाण्यांना चालच नसते खूपदा, असली तर विचित्र असते. ते ऐकल्यावर कसंतरीच व्हायला लागतं.
उदा :-
रंगीलामधलं "यारों सुन लो जरा अब न येह केहना"
किंवा ते दिल से मधलं "सतरंगी रे"
ह्या काय चाली आहेत ?
ह्याच्यावर राष्ट्रिय बंदी घातली पाहिजे.

घाटावरचे भट Wed, 01/07/2015 - 16:45

In reply to by adam

गजनी चित्रपट. "तू मेरी अधूरी प्यास प्यास तू आ गयी मन रास रास " हे अदरवाइज गाणं म्हणून छान वाटायला लागतं. पण
"केह दे तू हां तो जिंदगी, चैन से छूटके हसेगी" ह्या ऑलीनंतर "मोत्ती होंगे मोत्त्त्ती राहो मे" हे असलं काहीतरी करुन ठेवलय की वैताग येतो.

'तोच चंद्र मान भात' चालतं ना तुम्हाला?

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 16:45

In reply to by adam

रंगीलामधलं "यारों सुन लो जरा अब न येह केहना"
किंवा ते दिल से मधलं "सतरंगी रे"
ह्या काय चाली आहेत ?

"मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपूडी खा रहा था",
"सुनो ससुरजी अब जिद छोडो, मान लो मेरी बात, दुल्हन तो जायेगी दुल्हेराजा के साथ",
"अ आ ई, उ उ ओ, मेरा दिल ना तोडो"

या गाण्यांच्या चाली बहुधा अजून उत्तम असाव्यात. वायझेडच म्हटला पाहिजे रेहमान, नै?

adam Wed, 01/07/2015 - 16:58

In reply to by बॅटमॅन

वरील प्रतिसादात उल्लेख केलेली सगळीच गाणी भिकार आहेत असं मान्य केलं तरी
"बघ बघ... बाकीचेही रद्दड गाणी देतातच की" हे काय लॉजिक आहे ?
"रेहमान लैच वैताग आणतो" ह्या वाक्याचा अर्थ "इतर कोणीही वैताग आणतच नाही" असा होतो का ?
(वरच्या प्रतिसादातून तसच ध्वनित होतय. )
.
.
वरती "तोच चंद्र मानभात " बद्द्लच्या कमेंटलाही हेच सर्व लागू.
.
.
एखाद्यानं "राहुल गांधी माठ आहे" असं म्हटल्यावर "राहुल महाजन नैय्ये का मग माठ ?" असा प्रश्न विचारणं विचित्र आहे.
"राहुल गांधी माठ का नाही" हे सांगणं एकवेळे समजू शकतो.

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 17:05

In reply to by adam

ब्वॉर्र. पण यारो सुनलो जरा ही चाल कै रद्दड वगैरे आजिबात नाही. तुला वाटत असेल तर तुझ्या लेखी चाल कशी पायजे ते तरी सांग बघू.

("जुडी? कशाची जुडी? आरं मेथीची का चवाळीची जुडी? आरं नावं कशी अस्त्यात? कलावती, मंदावती, प्रभावती, अशी नावं अस्त्यात. काय तं म्हने जुडी! हे:!" च्या चालीवर.)

अमुक Wed, 01/07/2015 - 17:07

In reply to by adam

तुमच्या याच मुद्द्यासाठीच्या माझ्या पूर्वीच्या प्रतिसादातील हा भाग -
गाणे तोडण्याचा आरोप मी प्रथमच ऐकतो आहे कारण आत्तापर्यंत तसे कधी जाणवलेच नाही.
थोडा विचार केला असता एक गाणे आठवले कारण ते प्रथम ऐकताना त्यातले रहमानने घातलेले स्वल्पविरामी हेलकावे फारच लोभस वाटले होते.
'तक्षक' चित्रपटातले 'बूँदोंसे बाते' हे गाणे.
कडवे : मैंने पूछा बूँदोंसे सच सच बोलो हैं राज़ क्या यूँ बरसे घटा किस ग़म में
..........कहने लगी ये तो आस हैं किसी की चाह में खुशियों के
..........पर्वत की दिवानी वो, बरसे घटा मस्तानी वो, मुझमें भी हैं दिवानापन किसीका
..........देखो करने लगी हूँ मैं बूँदोंसे बाते...
यात 'सच सच बोलो | हैं राज़ क्या यूँ | बरसे घटा | किस ग़म में
.......कहने लगी ये | तो आस हैं किसी | की चाह में | खुशियों के'
अशी रचना केली आहे जी मला फारच आवडते. कदाचित अश्या प्रकाराला मनोबा तोडणे म्हणत असावेत.

नितिन थत्ते Wed, 01/07/2015 - 11:37

+१.

रेहमानपेक्षा मला अन्नु मलिक जास्त आवडतो.
----------------------------
सुगम संगीतावरील बहुतेक चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये गाण्याचा अर्थ त्यातली भावना आणि संगीत यांचं घट्ट नातं सांभाळण्यावर भर दिलेला असतो. रहमानच्या बाबतीत हे कॉम्बिनेशन हुकलेले वाटते.

गवि Wed, 01/07/2015 - 11:57

In reply to by नितिन थत्ते

रेहमान पॉझिटिव्हजः

-वाद्यांमधली विविधता (आधुनिक वाद्यांचं सरसकट प्रमाणही लक्षणीय.. हा कधीकधी निगेटिव्ह मुद्दाही)
-शास्त्रीय संगीताचा बर्‍यापैकी पाया घेऊनही जुनाट किंवा बोजड न वाटणारं संगीत
-तालाची उत्तम जाण आणि त्यावर खास भर (वेगवेगळ्या वाद्यांतून आणि वस्तूंमधून परक्युशन्स)
-उचलेगिरी जवळजवळ नाहीच. अपवादानेच असेल.

रेहमान निगेटिव्हजः

-वरवर नवोदितांना संधी असं वाटत असलं तरी, गाणं "रेहमानचं"च व्हावं आणि ओळखलं जावं याकरिता की काय कोण जाणे, पण बहुतांश वेळा दुय्यम गायक गायिकांना घेऊन "गाण्यात" ते वरचढ होणार नाहीत हे पाहणे. कधीकधीच लता आशा इत्यादिंचा आवाज घेणे.

-वाद्यसंगीताद्वारे "आवाजा"ला दाबून टाकणे (पुन्हा एकदा उपरोक्त कारण?!). बर्‍याचदा शब्द लागतही नाहीत ऐकताना.

-चांगल्या लिरिक्सविषयी अजिबात आग्रही नसणे. डब केलेला सिनेमा असो वा मूळ असो, रेहमानच्या संगीताचं जे गाणं असेल त्यात एखाद्या उत्तम सुंदर शब्दरचना असलेल्या गाण्यामागे वीस गाण्यांची तद्दन फालतू किंवा सामान्य दर्जाची शब्दरचना असते. रेहमान स्वतः ती गाणी लिहीत नाही हे खरं पण नेमकी याच्या बाबतीत लिरिक्सची इतकी वाट का लागते?

-कृत्रिम वाद्यवृंदाचा अतिरेक, त्यामुळे नैसर्गिक गोडवा नाही

- वर म्हटल्याप्रमाणे सिनेमाची कथा, तिची प्रकृती, प्रसंगातली नजाकत किंवा एकूण प्रसंगाशी मेळ खाणारं संगीत क्वचितच. सर्वत्र छापून काढल्यासारखं यांत्रिक आणि आधुनिक भासणारं संगीत.

कदाचित यामुळेच त्याची नवीन गाणी आल्याआल्या एकदम खूप हिट पण (रोजा आणि इतर काही अपवाद सोडले ..[मणिरत्नम!?]) तर सदैव वर्षानुवर्षे मोठ्या संख्येने लोकांना आठवत राहावीत अशी गाणी त्याची नाहीत.

घाटावरचे भट Wed, 01/07/2015 - 14:13

In reply to by गवि

वरवर नवोदितांना संधी असं वाटत असलं तरी, गाणं "रेहमानचं"च व्हावं आणि ओळखलं जावं याकरिता की काय कोण जाणे, पण बहुतांश वेळा दुय्यम गायक गायिकांना घेऊन "गाण्यात" ते वरचढ होणार नाहीत हे पाहणे. कधीकधीच लता आशा इत्यादिंचा आवाज घेणे.

रहमान ते गायक आधी वापरतो आणि मग इतर लोक ते गायक वापरतात. याचा अर्थ रहमानला ट्यालंटची परख जास्त चांगली आहे असा होत नाही का? बादवे रहमानच्या एका मुलाखतीत त्याला विचारलं असता त्याने आपला फेवरेट गायक उदित नारायण आहे असं सांगितलं होतं. त्याच्या तमिळ सिनेमांतही तो उदित नारायणला गायला लावतो (तिथले लोक उ.ना.चे तमिळ उच्चार चुकीचे आहेत म्हणून बोंबाबोंब करत असूनही). आणि जावेद अली वगैरे अलीकडचे नवीन गायक रहमाननेच पहिल्यांदा बाजारात आणले होते.

वाद्यसंगीताद्वारे "आवाजा"ला दाबून टाकणे (पुन्हा एकदा उपरोक्त कारण?!). बर्‍याचदा शब्द लागतही नाहीत ऐकताना.

असहमत. उदाहरण देऊ शकाल? हां, एक गोष्ट मान्य करायला हवी की रहमान जी गाणी स्वतः गातो त्यात बर्‍याचदा शब्द लागत नाहीत, उदा. दिल से रे. एक सूरज निकला था नंतर तो 'एक साया/फाया/हाया/काया/राया पिघला था' वगैरे जे म्हणतो ते काय कळत नाही.

चांगल्या लिरिक्सविषयी अजिबात आग्रही नसणे. डब केलेला सिनेमा असो वा मूळ असो, रेहमानच्या संगीताचं जे गाणं असेल त्यात एखाद्या उत्तम सुंदर शब्दरचना असलेल्या गाण्यामागे वीस गाण्यांची तद्दन फालतू किंवा सामान्य दर्जाची शब्दरचना असते. रेहमान स्वतः ती गाणी लिहीत नाही हे खरं पण नेमकी याच्या बाबतीत लिरिक्सची इतकी वाट का लागते?

आता यात रहमानचा काय बरं दोष? त्याचे सुरुवातीचे चित्रपट डब होऊन इथे आले. त्या गाण्यांतील सामान्य शब्दरचनेचे पातक बहुतांशी त्या तमिळ टू हिंदी भाषांतर करणार्‍यांचे आहे. हिंदीत रहमानने गुलजा़रादी मातब्बर मंडळींसोबत काम केलेलं आहे.

कृत्रिम वाद्यवृंदाचा अतिरेक, त्यामुळे नैसर्गिक गोडवा नाही

असहमत. किंबहुना रहमान हा त्याच्या उत्कृष्ट वादकांच्या टीमसाठी ओळखला जातो. उदा. शिवमणी (पर्कशन), नवीनकुमार (बासरी) वगैरे

वर म्हटल्याप्रमाणे सिनेमाची कथा, तिची प्रकृती, प्रसंगातली नजाकत किंवा एकूण प्रसंगाशी मेळ खाणारं संगीत क्वचितच. सर्वत्र छापून काढल्यासारखं यांत्रिक आणि आधुनिक भासणारं संगीत.

रोजा पासून ते स्वदेस पर्यंत आणि रंगीला पासून दिल्ली६ पर्यंत तुम्हाला छापलेलं संगीत कुठे आढळलं ते सांगा.

अर्थात इतकं सगळं टंकल्यानंतर हे पण म्हणावसं वाटतं की 'पूर्वीचा रहमान राहिला नाही, पूर्वीचा रहमान राहिला नाही'.
जाता जाता - रहमाननेही टुकार संगीत दिलेले चित्रपट - दौड ('ओ भवरें' वगळता), युवराज ('तू मेरी दोस्त' वगळता), ब्ल्यू, रावण, स्लमडॉग मिल्येन्यर ('लतिकाज थीम' हे गाणं वगळता)

मेघना भुस्कुटे Wed, 01/07/2015 - 14:36

In reply to by घाटावरचे भट

झालंच तर 'रॉकस्टार'. त्यात रहमाननं काय पाडापाडी केलीय हो? पण ते एक असो. 'सड्डा हक एत्थे रख'मध्ये 'एथ्थे एथ्थे रख' म्हणताना रणबीरने जे काही आक्रमक हावभाव केले आहेत, ते न करता मला ते गाणं कधीच ऐकता येत नाही, इतकं त्याचं जेश्चर त्या गाण्यात मिसळून गेलेलं आहे.

अमुक Wed, 01/07/2015 - 16:56

In reply to by गवि

रेहमान पॉझिटिव्हजः
-वाद्यांमधली विविधता (आधुनिक वाद्यांचं सरसकट प्रमाणही लक्षणीय.. हा कधीकधी निगेटिव्ह मुद्दाही)

.........मी 'ऐसी'वर इतरत्रही हे लिहिलं आहे की भारतीय चित्रपटसंगीतात वेगळा 'आवाज' आणणारे दोन लक्षणीय संगीतकार म्हणजे आर्.डी. बर्मन आणि रहमान. आपण रोजच्या आयुष्यात इतके विविध प्रकारचे आवाज ऐकतो. त्यातल्या कित्येक आवाजांशी भावभावना जोडलेल्या असतात. मग चित्रपटसंगीतात एखादा भाव व्यक्त करण्यासाठी कायम तबला, संतूर, व्हायलीन, पियानो, इ. इ. वाद्येच का बरं वाजवावीत ? रहमानच्या संगीतात कित्येक अशी उदाहरणे देता येतील. उदा. धाग्यात 'यह हसीं वादियाँ' चा उल्लेख आहे. त्यात अचानक समोर आलेला प्रचंड हिमडोंगर पाहून रोजाच्या मनात उठणारे भाव, शिरशिरी कशी फक्त वाद्यांतून निर्माण केली आहे ते ऐका. मुख्य म्हणजे रहमानची गाणी जर तुम्ही हेडफोनवर वा ग्रामोफोनवर ऐकली नसतील तर अनेक गाणी ऐकलीच नाहीत असे म्हणेन.

रेहमान निगेटिव्हजः
-वरवर नवोदितांना संधी असं वाटत असलं तरी, गाणं "रेहमानचं"च व्हावं आणि ओळखलं जावं याकरिता की काय कोण जाणे, पण बहुतांश वेळा दुय्यम गायक गायिकांना घेऊन "गाण्यात" ते वरचढ होणार नाहीत हे पाहणे. कधीकधीच लता आशा इत्यादिंचा आवाज घेणे.
.......... आश्चर्य वाटलं हा आक्षेप वाचून. हे म्हणजे सत्यदेव दुबेंनी एखादं नाटक नसिरुद्दीन शाहऐवजी एखाद्या नवोदिताला घेऊन केलं कारण त्यांना त्यांचं दिग्दर्शकीय श्रेष्ठत्व दाखवायचं होतं असं म्हणण्यासारखं आहे.
ह्याबद्दलही मी पूर्वी 'ऐसी'वर इतरत्र लिहिले आहे. रहमानचं संगीत हे मुख्यत: ध्वनिप्रधान आहे. म्हणजे वाद्यांचा नि गायनाचा जो एकत्रित परिणाम आहे त्यावर ते अधिक अवलंबून आहे. (हेमंतकुमार नि कानू रॉय हे असे संगीतकार होते जी ज्यांनी वाद्यं अतिशय कमी वापरली. याउलट सलिल चौधरी वा शंकर-जयकिशन यांनी वाद्यवृंदासहित केलेली गाणी अधिक आहेत.) असं असताना, जो गायकाचा आवाज आहे त्याला गाण्यातील इतर घटकांइतकंच महत्त्व असणं साहजिक नाही का ? का बरं एखादं गाणं त्यातल्या फक्त गायक वा गायिकेमुळे अधिक ओळखलं जावं नि निव्वळ 'गाणं' म्हणून नाही ? वा चित्रपटाचा एक भाग म्हणून नाही ? अशी निर्मितीच का करावी ज्यात एका घटकाला एकूण एकत्रित परिणामापेक्षा अधिक महत्त्व असावं?
'रोजा'मधली 'दिल हैं छोटासा' म्हणणारी गायिका मिनमिनी. तिचं दुसरं कुठलं गाणं तुम्हाला माहिती आहे वा ऐकलं आहे ? किंवा 'इंदिरा' या तमिऴ चित्रपटातलं (हा 'प्रियांका' या नावाने हिंदीत प्रदर्शित झाला) 'नीलंकाय्गिरदु' हे गाणारी हरिणी ही गायिका. हिला रहमानने ती शाळेत असताना गायनस्पर्धेत ऐकून निवडले. ते गाणे ऐका. हिची दुसरी कुठली गाणी तुमच्या कानावर पडली ? रहमानच्या गाण्यांत अशी किती गाणी सापडतील की ज्यात आशा-लतांऐवजी इतर कुणी गाणे गायल्याने ते कमअस्सल झाले आहे? वा उलट - मिनमिनी वा हरिणी यांऐवजी लता-आशांचे आवाज कल्पून पाहा. बरं वाटेल का ? तुमचे तुम्हीच ताडून पाहा. रहमानने आपण आधी कधीही न ऐकलेल्या आवाजांशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या आवाजांचा तसा वापर इतर कुणी केला का ? खुद्द रहमाननेच मिनमिनीला पुन्हा कधीच वापरले नाही कारण त्या प्रसंगाला, त्या गाण्यासाठी फक्त तिचाच वैशिष्ट्यपूर्ण आवाज आवश्यक होता. थोडक्यात गायक-गायिका हेदेखील एखाद्या वाद्यासारखेच वापरण्याने जर गाण्याचा परिणाम साधत असेल तर का बरं तसं करू नये ?

-वाद्यसंगीताद्वारे "आवाजा"ला दाबून टाकणे (पुन्हा एकदा उपरोक्त कारण?!). बर्‍याचदा शब्द लागतही नाहीत ऐकताना.
...........आवाजाला दाबून टाकल्याचे उदाहरण माहीत नाही. पण ऐकताना शब्द न लागल्याची उदाहरणे आहेत.
'रंग दे बसंती'मधील 'लूज कंट्रोल' या गाण्यात 'लूज कंट्रोल' हेच शब्द सुरुवातीस आहेत हे मला कळले नव्हते. किंवा 'युवा'मधले 'धक्का लगा बुक्का' वा 'डोल्डोल' यातले अनेक शब्द कळत नाहीत. पण 'युवा'सारखे अनेक चित्रपट हे दक्षिणेत प्रथम बनल्याने त्या गाण्यांच्या धुनेवर हिंदी शब्द चढवल्याने हे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (याउलट 'दिल से' चित्रपटात 'जिया जले जाँ जले' या गाण्यात 'उंजिरीकंजीकंजिक्यो' वगैरे शब्दांना काहीही अर्थ नसूनही ते नादासाठी अप्रतिमरित्या वापरले आहेत. किंवा 'युवा'मधले 'डोल डोल' हे गाणे. सलाम-नमस्ते या शब्दांशिवाय काहीही कळत नाही. पण गरजच नाही.)

-चांगल्या लिरिक्सविषयी अजिबात आग्रही नसणे.
.......चित्रपटसंगीत कसं बनतं याविषयीच्या तुमच्या कल्पना वास्तवापेक्षा वेगळ्या आहेत असं दिसतं.
आणि वाईट शब्द असूनही तुम्ही ते संगीतामुळे ऐकता, हा त्या संगीताचा गुणच नाही का? :)

- वर म्हटल्याप्रमाणे सिनेमाची कथा, तिची प्रकृती, प्रसंगातली नजाकत किंवा एकूण प्रसंगाशी मेळ खाणारं संगीत क्वचितच.
........एखादं उदाहरण ?

सर्वत्र छापून काढल्यासारखं यांत्रिक आणि आधुनिक भासणारं संगीत.
........ यांत्रिक छपाईचं उदाहरण ? आधुनिक म्हणजे काय म्हणायचं आहे ? जुन्यासारखं भासत नाही असं?
तुम्ही मणिरत्नमच्या 'इरुवर' या चित्रपटाचे संगीत ऐकले आहे ? एम.जी.आर च्या कारकिर्दीवरच्या या चित्रपटात रहमानने त्या काळचे संगीत वाटावे असे एक 'पो पोडियिन् पुन्नग़इ' हे गोड गाणे दिले आहे ते ऐका. थोडक्यात - रहमान जुन्या पठडीतले संगीत देऊ शकत नाही असे नाही, पण चित्रपटाची गरज काय आहे ?

राहिला मुद्दा गाणी दीर्घकाळ लक्षात न राहण्याचा. तर याच्या नेमके विरुद्ध मत कौशल इनामदार याने मांडले आहे. पण त्याचबरोबर ती गाणी डोक्यात का बसतात याचेही चांगले विवेचन त्याने केले आहे. एकूणच दाक्षिणात्य चित्रपटसंगीतात इलैयाराजापासूनच गाण्यातल्या दोन-दोन ओळींना समान संगीत देण्याची 'शैली' रूढ आहे. त्याच परंपरेचा रहमान वारसदार असल्याने त्याच्याही अनेक गाण्यांत ते आढळले आहे. हा त्याच्या संगीतातला दोष.
असो.

गवि Wed, 01/07/2015 - 17:09

In reply to by अमुक

खंडन आवडलं. रेहमान आवडतच नाही असं नाहीये. मी फक्त जाणवलेल्या दोन बाजू मांडल्या. रेहमानपेक्षा संगीतात जास्त गोडवा असलेले संगीतकार आहेत आणि ते जास्त आवडतात इतकंच. रेहमानच्या उत्कृष्ट गाण्यांची खूप उदाहरणं आहेत. वंदे मातरम (शांतरसापेक्षा वेगळं वीरश्री आणणारं), छोटीसी आशा (रेगी रिदम स्टाईल), रंगीला थीम, बॉम्बे थीम..

आता पुन्हा ऐकताना तुम्ही मांडलेले मुद्दे लक्षात घेऊन ऐकीन.

बादवे...

अवांतरः "हाय रामा ये क्या हुआ" (रंगीला) हे गाणं ऐका आणि "देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही" (दुनियादारी) हे गाणं ऐका. कधीही मधेच इंटरचेंज करता येतंय इकडून तिकडच्या ओळी गाऊन.

ऋषिकेश Wed, 01/07/2015 - 20:23

In reply to by अमुक

ऐला मनोबा, तुला फुडल्या भेटीला एक कटिंग माझ्यातर्फे तुला!
तुझ्या डिवचण्याशिवाय अमुककडून इतके तपशीलवार नी फर्मास तेही खंडन(!) वाचायचा योग येणे कठिण!

अमुक, __/\__

घाटावरचे भट Wed, 01/07/2015 - 13:37

In reply to by नितिन थत्ते

सुगम संगीतावरील बहुतेक चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये गाण्याचा अर्थ त्यातली भावना आणि संगीत यांचं घट्ट नातं सांभाळण्यावर भर दिलेला असतो. रहमानच्या बाबतीत हे कॉम्बिनेशन हुकलेले वाटते.

आता संगीतापेक्षा संगीतावरच्या चर्चा का बरं ऐकायच्या? मुळात संगीत, मग ते कुठलंही असो (सुगम संगीतही), भावपूर्ण बनवण्यासाठी शब्दांची आवश्यकता भासतेच असं नाही. आणि अन्नु मलिक अशी कुठली जडीबूटी खातो की त्याच्या संगीतात हे नातं घट्ट जपलेलं दिसतं? पूर्वीच्या काळापासून बहुतांश संगीतकार हे उत्तर हिंदुस्तानी असल्याने आपल्या कानाला तेच ते पंजाबी वाद्यमेळ ऐकायची सवय झालेली आहे, त्यामुळे नवीन काही कानावर पडलं तर ते रुचतंच असं नाही. मला स्वतःला जतिन-ललित ह्या जोडीचं संगीत अज्जिबात आवडत नाही. 'प्रत्येक गाण्याच शिंचा ढोलक आणलाच पाहिजे का? हे काय पंजाब्यांच्या लग्नातलं संगीत चालूए का' असंच वाटतं.

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 13:44

In reply to by घाटावरचे भट

'प्रत्येक गाण्याच शिंचा ढोलक आणलाच पाहिजे का? हे काय पंजाब्यांच्या लग्नातलं संगीत चालूए का' असंच वाटतं.

+११११११११११११११११११११११. पंजाब्यांनी वात आणलाय. सगळे साले हिरोहिर्विणीदेखील रॉय, ओबेरॉय, कपूर, खन्ना, सिन्हा, सिंघानिया माय अ‍ॅस. बाकी प्रदेशांतल्यांची निव्वळ कॅरिकेचर्स. मराठी आणि दक्षिण भारतीयांचे तर एकदम मॉकिंग क्यारेक्टरायझेशन. *******!!!!!!!!

नितिन थत्ते Wed, 01/07/2015 - 15:53

In reply to by अमुक

नाही नाही. मनोबाच्या प्रतिसादात हिमेस हा प्लेसहोल्डर असावा. तसा माझ्या प्रतिसादात अन्नु मलिक आहे.

मला रहमान मेलोडिअस वाटत नाही.

अस्वल Wed, 01/07/2015 - 23:43

@आवाज आणि वाद्यं - रेहमानच्या चालींमधे Base बरेचदा वापरलीयेत, जो जुनी गाणी ऐकल्यावर काहीसा अनैसर्गिक वाटू शकतो - असं असेल का?
उदा. टिपिकल उदाहरण म्हणजे कुठलंही नवं गाणं ऐकून मग ९० छाप गाणी ऐकल्यावर फरक जाणवतो. कारण कमी वारंवारतेचे (देवा, मला माफ कर) ध्वनी जुन्या गाण्यांत अजिबात नाहीतच.
.
@वाद्यवृंदाखाली आवाज दडपणं - त्याचं खंडन म्हणून सोनूचं "दो कदम और सही" आठवतंय, एकदम मिनिमल वाद्यं आहेत त्यात. अजूनही गाणी असतील.
.
@शब्दांची मोडतोड - बहुतेक तामीळ->हिंदीमुळे. नाहीतर रोबो मधल्या "किलिमांजारो.. लडकी पर्वत की यारो, उसे दिल मे उतारो.. /मोहेंजोदारो" वगैरेची काय गरज आहे स्वानंद किरकिरेंना? पण शब्दांची मोडतोड हा अरोप गीतकारासाठी जास्त लागू पडायला हवा ना?
उदा. रेहमानच्याच चालीवर प्रसून जोशींनी रंग दे बसंती मधला "हर दिल मे बुडबुड करता H2SO4" चपखल बसवलाय. किंवा युवामधल्या "जन गण मन"चं "धक्का लगा बुक्का" असं गाण्याला साजेसं रूपांतरही झालंय.
.
@"सिनेमाची कथा, तिची प्रकृती, प्रसंगातली नजाकत किंवा एकूण प्रसंगाशी मेळ खाणारं संगीत क्वचितच"
असं नाही वाटत.
गेल्या १० वर्षातला रेहेमान पाहिला तर दोन उदाहरणं-
रंग दे बसंतीत पंजाबी ठेक्यांचा वापर आहे, अ‍ॅबसोल्युटली विचित्र असलेलं "लूज कंट्रोल" आणि पुत्रशोकाकरिता निवडलेलं "लुका छुपी" कसं विसरता येईल? लताने त्या गाण्याचे हाल केले आहेत ते सोडून देऊ फार तर.
रॉकस्टारमधल्या प्रसंगानुरूप चाली आहेत. (त्या आवडणं, न आवडणं हा भाग वेगळा)
.. फिर से उड चला सारखी न बांधलेली, गोंधळलेली चाल जेव्हा जॉर्डन गायक बनतो, तेव्हा डिस्कोच्या ठेक्यावर एका लयीत येते.
.. नादान परिंदेमधे जॉर्डनची अगतिकता आहे.
.. शम्मी आणि जॉर्डनची जुगलबंदी Dichotomy of Fame मधे शम्मीची अनुभवी आणि आर्त सुरावट विरूद्ध जॉर्डनची तुटक, पूरक असा जबरदस्त मेळ आहे.
============================

घाटावरचे भट Thu, 02/07/2015 - 09:42

In reply to by अस्वल

>> बेस वाद्ये
बॉलीवूडला कडक आणि चुम्मा दर्जाच्या बेसलाईन्स म्हणजे काय असतं आणि त्या कशा वापरायच्या हे पहिल्यांदा रहमानअण्णांनी शिकवलं. नायतर आधी आपले सगळे ढोलक घेऊनच नाचत होते. उदाहरणार्थच ऐकायचं असेल तर 'मसक्कली'ची बेसलाईन ऐका.

>>वाद्यवृंदाखाली आवाज दडपणं
एक तूही भरोसा - लता मंगेशकर - पुकार

adam Thu, 02/07/2015 - 09:59

In reply to by घाटावरचे भट

'मसक्कली' ह्या गाण्याला चाल नाही; ठेका नाही.
'ज़हर' मधलं "अगर तुम मिल जाओ" , किंवा 'गँगस्टर' "तू ही मेरी शब है सुबह है तू हि दिन है मेरा" ही गाणी ऐकलित का ?
ही मला अप्रतिम वाटतात. त्यांना चाल आहे. मसक्कली मध्ये चाल कुठाय ?
.
.
देवाचे उपकार थोर आहेत ही दोन गाणी रेहमानच्या तावडीतून सुटली.
.
.
@अमुक :-
हिमेशच्या स्म्गीतात काय चांगलं वाटतं, असं विचारलं होतत; ते नेमकं सांगता यायचं नाही. हिमेश म्हणजे बेसिकली नॉन-रेहमानी असे आगहडीचे संगीत दिग्दर्शक अशा अर्थाने म्हणत होतो. पण मला आवडलेली गाणी कोणती , असं कुणी विचारलं तर वरच्या दोन गाण्यांचा त्यात अवश्य समावेश असेल.
तर "अशा प्रकारची गाणी मला आवडतात" असं मी म्हणेन.
.
.
अवांतर :-
रेहमान चे 'युवा'मधील "आओ ना आओ ना होना है फन्ना" हे आवडते. 'पुकार' मधील "किस्मत से तुम हमको मिले हो" हे भक्तीसंगीतासारखं शांत -निवांत वाटतं; शब्दांचा रक्तपात तिथे झालेला दिसत नाही; तेही गाणे आवडते.
पण मी आता रेहमानीसंगीत तुम्हा लोकांसारखच आवडून घेणारे.

घाटावरचे भट Thu, 02/07/2015 - 10:17

In reply to by adam

मनोबा, मसक्कलीचं उदाहरण बेसलाईनसाठी दिलं होतं. शिवाय, गाण्यातून चाल, ठेका, वापरलेली वाद्य असं वेगळं वेगळं काढता येतं का? म्हणजे तुम्हाच्या कानाला एखादं गाणं असं वाटतं का ज्याल अतुम्ही म्हणाल की 'चाल मस्त आहे, ठेका गंडला आहे' किंवा 'ठेका मस्त आहे, पण वाद्यं गटार वापरलीयेत'? गाण्याच्या एकूण परिणामकारकतेकडे पाहा की? 'तूही मेरी शब है' किंवा अगर 'तुम मिल जाओ' ही गाणी त्यांच्या जागी छानच आहेत. प्लीज नोट, रहमान तेवढा एकटा भारी आणि बाकीचे टुकार असं कोणीच म्हणत नाहीये. अगदी हिमेशचीसुद्धा ' मैं जहां रहूं' सारखी अतिशय श्रवणीय गाणी आहेतच की... तसेच विशाल-शेखर आहेत, शंएलॉ आहेत जे ओरिजिनल आणि चांगलं संगीत देतात. आम्ही चांगल्या संगीतकारांत रहमानलाही धरतो एवढंच. फरक एवढाच आहे की संगीतकारांची ही फौज रहमाननंतर बॉलीवूडमध्ये आली आणि रहमानने आपल्या सिनेसंगीताचा जो ट्रेंड बदलला तोच ते पुढे चालवतायत, वाढवतायत. त्या अर्थाने रहमान इज अ पायोनियर. ते जाऊ द्या, तुम्ही 'स्पिरिट ऑफ युनिटी कॉन्सर्ट'चा टायटल ट्रॅक ऐकला का? ताज्या ताज्या, जिंगल्स कंपोज करण्याच्या काळातल्या रहमानचा ट्रॅक आहे. मस्त!!

नितिन थत्ते Thu, 02/07/2015 - 11:06

हिमेस मला पण आवडत नाही पण हे घ्या श्रवणीय गाणं.... याचं पिक्चरायझेशन पण छान आहे. हलकासा डान्स आहे. खूप हेवी नाही. करीना लै सुंदर दिसते यात !!!

धर्मराजमुटके Sat, 04/07/2015 - 23:06

In reply to by नितिन थत्ते

प्रश्न या धाग्यावर अस्थानी आहे पण 'समलिंगी लोक विवाह म्हणजे नक्की काय करणार आहेत?' या तुमच्या स्वाक्षरीतील प्रश्नाचे उत्तर मिळाले की नाही अजून ? स्वाक्षरीतील पहिले वाक्य हे 'विधान' आहे तर दुसरे वाक्य हे 'प्रश्न' आहे म्हणून विचारले.
भोचकपणाबद्दल आगाऊ माफी मागतो.

तिरशिंगराव Thu, 02/07/2015 - 14:16

त्यांना क्षमा कर. इतकी अगणित रत्ने पडलेली असताना, ते दोन दगड घेऊन, त्यांतील कुठला चांगला, यावर चर्चा करत आहेत.

अमुक Sat, 04/07/2015 - 14:39

'ऐसी'वरील एक सदस्य 'अमोल' (ज्यांनी 'दैत्यपटांतील रूपके' हा लेख गेल्या दिवाळी अंकात लिहिला) त्यांचा २००९ साली 'लोकप्रभा'त आलेला हा लेख वाचावा असे सुचवतो. माझ्या 'ध्वनिप्रधान' संगीताच्या मताशी सहमत असलेला म्हणून वा ते रहमानचे फ्यान आहेत म्हणून नव्हे, तर त्याच्या संगीतात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी.
रहमानच्या उमेदीच्या दिवसात तो संगीत कश्या प्रकारे तयार करीत असे याची एक झलक पाहा. ज्या 'घडवलेल्या' (सिन्थेसाइज़्ड्) आवाजाबद्दल बोलले जाते, तो कसा बनतो ते पाहा.

अमुक Sat, 04/07/2015 - 18:29

In reply to by नितिन थत्ते

लोकप्रभा - ६ फेब्रुवारी २००९ - http://www.lokprabha.com/20090206/survat.htm

(विन्डोज़मध्ये फायरफॉक्स नि क्रोम वापरून उघडते आहे.)