स्पॅम फोन कॉल्स

प्रगत देशात राहण्याचे तोटे, अशी एक लेखमाला लिहिण्याचा विचार करत होते. पण तसं केल्यास उजव्या लोकांचा रोष उद्भवेल (अं ... तो तसाही ओढवून घेतेच मी, विसरलेच!) अशी एक भीती आधी वाटली. मग डाव्या लोकांच्या रोषाचीही भीती वाटली. "एवढा राग आहे प्रगत देशांवर तर मग राहतेस कशाला तिथे!" म्हणून या निबंधाचं नाव 'स्पॅम फोन कॉल्स' असं ठेवलं. हे असे इंग्लिश शब्द वापरले म्हणून ठाकरे लोकांचा रोष उद्भवणार नाही; बघा, देवनागरीत लिहिलंय. वर पॉप कल्चर अनुसरण्यामुळे जादाचे कूल पॉइंट्स मिळतील. आणि एक भलती भीती म्हणजे समजा भारतातही आता असले फोनवर फोन येत असतील तर भारतही प्रगत देश झालेला आहे. पण तिथे राहण्याचे तोटे असं म्हटलं तर माझ्या देशभक्तीबद्दल प्रश्न विचारले जातील!

तर मुद्दा असा की अमेरिकेत घरच्या नंबरवर फार स्पॅम कॉल्स येतात. आत्ता थोड्या वेळापूर्वी एक येऊन गेला. जालावर लेख लिहिण्यासाठी हे टायमिंग अचूक आहे. मनात विचार आला, लिहून टाकलं आणि लोकांकडून वाहवा मिळवली. या 'हाय'वर चार दिवस जगायचं आणि मग पुन्हा एक पोस्ट पाडायची! स्पॅम फोनकॉल्सबद्दल बोलण्याची माझ्याकडे पात्रताही आहे. गेल्या वेळेस नव्हता का 'फोन अ फ्रेंड' नावाचा धागा काढलेला!

बहुतेकशा स्पॅमर्सशी बोलताना मला ट्यूरिंग चाचणी आठवते. ट्यूरिंग चाचणी म्हणजे काय तर उत्तर देणारं यंत्र आहे का व्यक्ती हे समजण्यासाठी केलेली चाचणी. यंत्र आणि व्यक्तींमधला फरक त्यानं गृहीत धरला म्हणजे व्यक्ती हुशार असतात. त्यामुळे आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली टेप माणसं वाजवत नाहीत. आपण बाथरूममधून जोरात विचारलं, "साबण कुठे आहे?" तर त्याचं उत्तर "मी नाही खाल्ला" असं आलं तर उत्तर यंत्राकडून आलंय का माणसाकडून, हे ट्यूरिंग चाचणीमधून समजतं.

तर असे फोन येतात. मी हॅलो म्हणते. हे लोक सुरूच होतात, "तुमच्या गाडीची वॉरंटी संपल्ये. आम्ही तुम्हाला नवी कोरी वॉरंटी देऊ शकतो. तुमच्या गाडीवर किती मैल पडल्येत?"
बरेचदा मी फोन ठेवून देते. कधी कधी मला घरातली बिनडोक कामं संपवायची असतात. तेव्हा फोनवर बोलून कोणी टाईमपास करून दिला तर हवाच असतो. असंच मी एकदा उत्तरादाखल प्रश्न विचारला, "मला माझ्या जुनाट गाडीसाठी नवी कोरी वॉरंटी खरेदी करायची आहे, असं मी कधी तरी तुम्हाला सांगितलं का हो?"
तो पोपटासारखं त्याला जे काही पढवलेलं होतं, ते बोलतच राहिला. मी त्याला विचारलं, "तुम्ही यंत्र आहात का माणूस?"
"का? का विचारलंस?"
"नाही, मी काही खवचट प्रश्न विचारला. तुम्हाला तो समजला असं वाटलं नाही, म्हणून तुमची ट्यूरिंग चाचणी घेतली."
तर तो बाब्या भडकला. "तू फारच उद्धट आहेस!" मला म्हणाला.
मी जोराऽऽत हसले. "नवीन काही सांगा मला. मला जे माहित्ये तेच पुन्हा सांगून कितीसे कूल पॉइंट्स मिळणार!"
तो ट्यूरिंग चाचणीचा मुद्दा त्याला लागला असावा. "तू मूळची इथली वाटत नाहीस, तुझ्या अॅक्सेंटवरून!"
"तुमच्यासारखीच मी पण विस्थापित. इथले मूलनिवासी इंग्लिश बोलायचे नाहीतच."
"पण तू कुठली आहेस?"
"परग्रहावरून आल्ये मी!"
तोवर बहुदा त्याच्या बॉसला आमच्या या संभाषणात रस उत्पन्न झाला असावा. "मी याचा मॅनेजर बोलतोय. तुमच्या गाडीवर किती मैल पडल्येत?"
"तीन."
मग तो मगाचचा माणूस पुन्हा आला, "तुझ्या ग्रहाचं नाव काय?"
"तीन."

मला या लोकांच्या पगारासाठी पैसे देण्यात काहीही रस नाही हे लक्षात आलं असावं. ट्यूरिंग चाचणी पास झाले हे लोक! फोन ठेवला. हे लोक म्हणजे स्वतःला काय समजतात, हे मला समजत नाही. मी पैसे खर्च करून काही तरी विकत घ्यावं अशी अपेक्षा असेल तर 'मी म्हणते ती पूर्व दिशा' हे मान्य करावं, एवढा सोपा फंडाही या लोकांना नसतो. मग खरंच ट्यूरिंग चाचणी पास होईल इतपत हुशार आहेत का हे लोक! मला बुचकळ्यात टाकणारे लोक आवडत नाहीत. स्पष्ट काय ते संकेत द्यावेत ना, हुशार आहेत का नाहीयेत! 'अमेरिकन आहेत', अशी मी माझ्या मनाची समजूत काढते.

'साईनफेल्ड'च्या 'न'व्या आवर्तनात दोन किस्से सापडले. एकदा 'साईनफेल्ड'ला फोन येतो, "तुम्हाला न्यू यॉर्क टाईम्सचं वर्गणीदार बनायला आवडेल का?" "होऽऽऽ" म्हणून तो फोन ठेवून देतो.

असाच दुसरा प्रकार म्हणजे साईनफेल्ड स्पॅमरलाच त्याचा घरचा नंबर विचारतो. "संध्याकाळी सातनंतर फोन करेन तुझ्या घरी!" "नाही सर, हे शक्य नाही." तर साईनफेल्ड म्हणतो, "आता समजलं ना मला कसं वाटतं ते!"

ते पहिल्या प्रकारासारखं 'होऽऽऽ' म्हणायला मला फार आवडतं.

एका गुरुवारी सकाळी सव्वानऊला फोन वाजला. मी एकीकडे न्याहारी खात, 'मशीन लर्निंग' कोर्सचा गृहपाठ करत होते. माझ्यासारख्या गप्पाडीच्या तोंडी हे वाक्य अजिबात शोभत नाही, पण मला तेव्हा स्पॅम फोनसारखे लक्ष विचलीत करणारे प्रकार अजिबात नको होते. अर्थातच, तेव्हा फोन वाजला! एरवी मी फोनवर गप्पा मारण्यासाठी बकरे शोधत असताना कुठे जातात हे सगळे #$^&* लोक कोण जाणे!

फोनवर या ताईंनी एक-दीड मिनीटभर निबंध वाचला. विषय - कर्करोग झालेल्या मुलांचे किती हाल होतात. कर्करोग झालेल्या मोठ्या माणसांचे हाल तुम्हाला दिसत नाहीत का, असा चाबरट प्रश्न मी गिळला.
"खरंच! तुम्ही विकडेला सकाळी सव्वानऊ वाजता, कामाच्या वेळेस, कर्करोग झालेल्या मुलांचे खूप हाल होतात, हा निबंध वाचून दाखवायला फोन केलात?"
"मी आवरतं घेतेच आहे."
"माझ्याकडे आणखी ३० सेकंद आहेत. काय ते चटकन बोला."
बाईंचं निबंधपठण दरेक सेकंदाला गीतापठनामध्ये रूपांतरित होत होतं. याची अजिबात जाणीव न ठेवता बाईंनी विचारलं, "हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की त्या मुलांना तुमच्या मदतीची गरज आहे?"
"होय. तुमचे ३० सेकंद संपले. बाय." असं म्हणून मी फोन ठेवून दिला.

या असल्या गळेपडू, भावनिक ब्लॅकमेली बलात्काराचा मला प्रचंड राग येतो. लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार, रोग यांचं पॉर्न म्हणता येईल असं वर्णन करायचं. मग पैसे मागायचे. मला खरोखर या कामाबद्दल आपुलकी असली ना तरी असल्या भावनिक ब्लॅकमेलमुळे मी पैसे देणार नाही; कदापि देणार नाही; छदामही नाही; असं मला ओरडून सांगावंसं वाटतं. "आवडलं तर ठोका लाईक" हा या लोकांचा मराठी-फेसबुकी अवतार. मला हे पेट्रनायझेशन असह्य होतं. खरोखर आवडलेली गोष्टही, या पेट्रनायजेशनमुळे मी अडगळीत टाकून देईन.

आजच्या लेखाचं खरं कारण म्हणजे आजचा फोनवाला मला आवडला. याला चक्क-चक्क कणा होता, स्वाभिमान होता आणि आपल्याला नोकरी देणाऱ्या मालकाची अस्मिताही जपायची होती. त्यानं वेळसुद्धा कशी बरोबर साधली.

मी एस्प्रेसो मशीन सुरू करून, पाणी गरम होण्याची वाट बघत उभी होते. तेव्हाच शेजारचा फोन वाजला.
"हॅलो."
"श्रीमती किंवा श्रीयुत घराचे मालक आहेत का?"
"नाही."
"ठीक आहे. मी नंतर फोन करेन. निरोप असा काही नाही." आणि माझ्या होकार-नकाराची वाट न बघता फोन बंद!

मला त्या माणसाला कडकडून मिठी मारावीशी वाटली. 'किती रे माझा गोडगोड, छबकडा, बकुळी स्पॅमर!' मला भरून आलं. किती तरी वेळ कॉफी गाळण्यासाठी मशीन तयार होतं, हे ही मला समजलं नाही.

त्यानं, त्या अनोळखी इसमानं माझ्यावर विश्वास ठेवला. मी घराची किंवा घराची मालक नाही, अशी थाप मारली; ती पण त्यानं माझ्याशी वाद न घालता मान्य केली. फक्त मानली असं नाही, त्यावर मला आणखी काही काम सांगितलं नाही; घरमालकांना देण्यासाठी काहीही निरोप ठेवला नाही. एवढंच नाही तर, बाणेदारपणे, 'तू मला भाव देत नाहीस तर मी ही तुला हुडुत् करतो', अशा भावानं त्यानं फोन ठेवून दिला. मला आयुष्यात पहिल्यांदाच त्या अनोळखी इसमामुळे, अमेरिकी लोकांनाही बुद्धी, कणा, अस्मिता, स्वाभिमान असू शकतात याची जाणीव झाली.

Learn something new every day!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'फोन अ फ्रेंड' या जुन्या लेखाची लिंक मिळाल्यामुळे तोही वाचला. तो तर याहूनही भारी आहे. गेल्या चार वर्षात नूरचा फोन न आल्यामुळे मराठी वाचक आणखी कितीतरी उदरविदारक विनोदांना मुकला आहे ते लक्षात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंमळ आळशीपणा केलाय, असं आता वाटतंय. थोडी अधिक मेहनत घेऊन पुन्हा लिहून बघायला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परदेशातल्या लोकांना होणारे त्रास याबद्दल मला जाणून घेण्यास आवडतं. आता हे फोन कॅाल्स- काय माहिती सांगतात/विचारतात आणि त्याला लेखकाने दिलेली उत्तरे. टीकाटिप्पणीपेक्षा काय घडलं ते इत्थंभूत कथन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड लेख.

बादवे,गाडीचे किती मैल पडलेत खरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्तर हजारच्या आसपास असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोनवर या ताईंनी एक-दीड मिनीटभर निबंध वाचला. विषय - कर्करोग झालेल्या मुलांचे किती हाल होतात.

Oncallogically sound!

पाणी गरम होण्याची वाट बघत उभी होते.

चाळीतल्या घरातली, ओट्यावरच्या ग्यासवर पतिपरमेश्वरांच्या (ओल्ड गिझर!) आंघोळीसाठी टोपात पाणी गरम करणारी सटोपचंद्रिका गृहिणी डोळ्यांसमोर उभी राहिली आणि अं.ह.झालो.

मला आयुष्यात पहिल्यांदाच त्या अनोळखी इसमामुळे, अमेरिकी लोकांनाही बुद्धी, कणा, अस्मिता, स्वाभिमान असू शकतात याची जाणीव झाली.

रिमेम्बर, रिमेम्बर; द एट्थ ऑफ नोव्हेंबर!*

(हीदेखील 'फॉक्स' नाईट म्हणा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंद्या, नंद्या ... सवयीचा गुलाम ना रे तू!

पतिपरमेश्वरांची ओल्ड गिझरशी तुलना करत, ओल्ड फेथफुलची आठवण करून देण्याबद्दल निषेध! जळ्ळी मेली विवाहसंस्था आणि जळ्ळं मेलं तिचं कौतुक! तरीही, माहितीची देवाणघेवाण म्हणून, सोमवार ते शुक्रवार मी स्वतःसाठीच पाणी गरम करते. शनिवार-रविवार स्वयंपाकी आणि भांडी घासणाऱ्यांचं पॉप्युलेशन इनव्हर्जन होतं; त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या, बरा अर्धा माझ्यासाठी पाणी गरम करतो.

रिमेम्बर, रिमेम्बर; द एट्थ ऑफ नोव्हेंबर!*

गाय फॉक्सनं त्याच्या तत्त्वासाठी प्राण दिले. अमेरिकेत लोकांनी फक्त मतं दिली. आता काही नतद्रष्ट मोर्चे काढताहेत, पण ते काही खरे अमेरिकी लोक नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोकांवर होणारे अन्याय, अत्याचार, रोग यांचं पॉर्न म्हणता येईल असं वर्णन करायचं.

पॉर्न शब्दाला कधीकधी तुम्ही निगेटिव प्रकारे पण वापरता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>अमेरिकी लोकांनाही बुद्धी, कणा, अस्मिता, स्वाभिमान असू शकतात याची जाणीव झाली.

हे सगळं त्यांना असू शकत नाही असं तुम्ही लोकांनी गृहीत धरल्याने त्यांनी ट्रंपोबाला निवडून दिलंय !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज थत्तेचाचा वर्कींग फ्रोम होम दिसतायत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. बराहा वापरून टायपवतोय.

पण ते कायम ऑन ठेवता येत नाही ! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कणा, भिंत इ. वरून सुचलेले हे शीघ्रविडंबन. विनोद असल्याने कृहघे.

'ओळखलंत का चाचा मला?' - ठाण्यात आला कोणी
कपडे होते इस्त्रटलेले, केसांवरती प्राणी

क्षणभर हसला, नंतर बसला, बोलला खालती पाहून
पुतिनकाका पाहुणे आले, गेले टॉवरात राहून

माहेरवाशीण पोरीसारखे, सार्‍या मजल्यांत नाचले
मोकळ्या हाती जातील कसे, ट्विटर फक्त वाचले

'भिंत' खचली, ताज बुडले, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून डीसीमध्ये, हॅकर्स थोडे ठेवले

कल्याणीला घेउन संगे, चाचा आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, मिनिमम वेज देतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"रुपये नकोत चाचा, जरा रुबलपण पाठवा.

भरला नाही टॅक्स, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त मागा म्हणा!"

१. http://www.newser.com/story/237721/dead-animal-on-head-stewart-returns-t...
२. https://www.nytimes.com/2016/06/12/nyregion/donald-trump-atlantic-city.html
३. http://www.vanityfair.com/news/2017/01/kellyanne-conway-alternative-facts
४. MAGA, अर्थात मेक अमेरिका __ अगेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे काय ROFL ROFL ROFL ROFL ROFL

धन्य धन्य _/\_

शेप्रेट पोस्ट करा रे याची कुणीतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निव्वळ थोर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे प्रसवणाऱ्या नंदोबाला गोड गोड पापे.
(आजच दोन काका लोकांच्या गप्पांत तुझी आठवण निघाली होती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोर्कविता!

ब्याक्कार हसतो आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नंदू, काळजी घे रे बाळा. आता दिवस फारच कठीण आलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>कल्याणीला घेउन संगे, चाचा आता लढतो आहे<<
......ते स्वल्पविरामाचं जागा जरा चुकलं काय?
कल्याणीला घेऊन चाचा स्वतःच लढतोय असा अर्थ होतोय.

.
बाकी काय म्हणावे.. नं-दनदनादन्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> ......ते स्वल्पविरामाचं जागा जरा चुकलं काय?
किंचित 'इदर'कल्याणीपणाला स्कोप हो Wink

१. http://www.aisiakshare.com/node/1478#comment-19649 किंवा https://msblc.maharashtra.gov.in/Sabdakosh/index.php/%E0%A4%87?limit=20&...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदूशेठनी सिक्सर मारली आहे आणि बॉल दादोजी कोंडदेवच्या बाहेर आकाशातून थेट रश्या पर्यंत गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0