निबंध

गर्वहरण

सुश्रुतला रोज रोज सांगून आता गोष्टींचा ऐवज संपायला आला आहे. ‘एकीचे बळ’, ‘जशास तसे’, ‘दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ’ अश्या नेहेमीच्या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता कधी कधी याच अर्थाच्या नवीन गोष्टी रचाव्या लागतात. परवा ‘गर्वाचे घर खाली’ या तात्पर्याची अशीच एक नवीन गोष्ट तयार केली.

ललित लेखनाचा प्रकार: 

अश्वत्थामा

रोज रात्री झोपताना गोष्टी ऐकायची सुश्रुतला सवय झालीय. किंबहुना आम्हीच ती लावलीय. रोज रोज नवनवीन गोष्टी कुठून आणायच्या हाही एक प्रश्नच असतो. यातून आमच्या कल्पनाशक्तीचा कसच लागतो. वर त्या बोधप्रद असाव्यात, त्यांचं काही तात्पर्य असावं असा आमचाच आग्रह. असंच एकदा कुठली गोष्ट सांगता येईल याचा विचार करीत असताना अश्वत्थामा आठवला.

ललित लेखनाचा प्रकार: 

मीनाक्षी कोकणेची गोष्ट

असामान्य बायकांच्या कथा, 'सक्सेस स्टोरीज' नेहमीच लिहिल्या जातात, 8 मार्चला तर एकदम घाऊक भावात. मेनस्ट्रीम पत्रकारितेत असतानाही मीही असं अनेकदा केलं आहे पण मला नेहमीच खूप नाव नसलेल्या, प्रसिद्धी, कौतुक पुरेसं वाट्याला न आलेल्या तरीही प्रचंड कष्ट उपसणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या खुणावतात. म्हणूनच आज मीनाक्षी कोकणेची कहाणी.

m1

ललित लेखनाचा प्रकार: 

घराविषयीच्या नोंदी

हिजाब की शिक्षण? असं एक राजकीय धार्मिक द्वंद्व सध्या सुरू आहे. कर्नाटकातल्या उडपी जिल्ह्यात - बुरखा घालून कॉलेजात जाणाऱ्या मुलीसोबत काय झालं, हे आपण पाहिलं. सोशल मीडियावर या सगळ्या गोंधळाचे पडसाद उमटले. वेगवेगळे ट्रेंड्स सुरु झाले. हिजाब बुरख्याच्या बाजूने-विरोधात हिरीरीनं मतं मांडली जाऊ लागली. निधर्मीवादाच्या आड लपून स्त्री-स्वातंत्र्याचे आम्हीच जणू कैवारी अशा थाटात अतिरेकी उजव्या संघटनांचे नॅरेटिव्हज, सदाहरित आय.टी.सेलची कर्तबगारी, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, आस्तिक विरूद्ध नास्तिक, स्त्रीवादी विरुद्ध स्त्रीवाद न मानणारे अशा अहमहमिकेत इस्लामोफोबियाचा मुद्दा जरा मागेच पडला.

ललित लेखनाचा प्रकार: 

गणिताच्या निमित्ताने – भाग ७

भौतिक-रसायनादि शास्त्रांप्रमाणेच गणितातही नव्या अनुभवजन्य शोधांमुळे सिद्धांतांत सुधारणा करावी लागते का? आणि, मी माझ्या पत्नीला म्हटले, ‘निर्मला, कल्याणीच्या तोंडातून युक्लिड बोलतोय!’ – प्राध्यापक बालमोहन लिमये यांच्या साप्ताहिक लेखमालेतील पुढील भाग.

ललित लेखनाचा प्रकार: 

कोव्हीड-१९ आणि एक सुखशोधक भिरभिरे फुलपाखरू

मला स्वतःला कोव्हीड-१९ हा आपली जगण्याची पद्धती बदलून टाकणारा प्रकार ठरणार आहे असं कधीच वाटलं नाही. जेव्हा आपल्याला एखादा अनुभव अंतहीन वाटतो तेव्हा आपण त्या अनुभवाशी जुळवून स्वतःत बदल करतो. एखादा अनुभव हा मर्यादित काळासाठी आहे ह्याची जाणीव आपल्याला असते तेव्हा आपण फारसे बदलत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

"द डिसायपल" : नाद आहे या घड्याला अन् घड्याच्या भोवती

चैतन्य ताम्हाणे यांच्या "द डिसायपल" या मराठी सिनेमाला व्हेनिस चित्रपटमहोत्सवात महत्त्वाचा पुरस्कार मिळाल्यानंतर तो सिनेमा पाहाण्याची उत्सुकता वाढली होती. त्या आधी हा सिनेमा हिंदुस्तानी गायकी, गुरुशिष्य परंपरा यांच्याशी संबंधित आहे हे कळलेलं असल्याने या जिव्हाळ्याच्या विषयांवर असणारा हा सिनेमा पहायचा हे ठरलेलं होतंच.

काल एका ऑनलाईन पोर्टलवर, अधिकृतरीत्या प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहायला मिळाला. तो विशेष आवडला.

ललित लेखनाचा प्रकार: 

धारपलेले भागवत !

१. थोडे च-हाट अर्थात प्रस्तावना...

ललित लेखनाचा प्रकार: 

एका नास्तिकाची धार्मिकता

सतीश तांबे म्हणतो, 'आस्तिक आणि नास्तिक हे विरुद्ध अर्थाचे शब्द नाहीतच.' याचं उत्तम उदाहरण पुस्तकी आहे. आयन रँडच्या ’फाउंटनहेड’ मधला हॉवर्ड रोर्क म्हणतो, ’मी आर्किटेक्ट झालो कारण माझा देवावर विश्वास नाही. हे जग जसं आहे, तसं मला आवडत नाही, ते मला बदलावंसं वाटतं.’ पुढे रोर्ककडे हॉप्टन स्टोडार्ड जेव्हा देऊळ बांधण्याचा प्रस्ताव घेऊन येतो तेव्हाही रोर्कचं तेच म्हणणं असतं: मी देऊळ कसं बांधू? माझा देवावर विश्वास नाही. पण एल्सवर्थ टूहीने पढवलेला हॉप्टन अत्यंत आत्मविश्वासाने त्याला ऐकवतो, ’मला नको सांगूस, तू नास्तिक आहेस म्हणून; तुझ्या धर्मपालनाची साक्ष तू निर्माण केलेल्या वास्तूच देताहेत!’

ललित लेखनाचा प्रकार: 

छोट्या बाल्कनीतलं बागकाम!!!

इथं रहायचं का राहतं घर सोडायचं हा निर्णयचं अनेक वर्ष बासनात गुंडाळल्यानं, घर नको असलेल्या वस्तुंनी गच्च भरलेलं. घरातल्या वस्तूंना डाव्या- उजव्या डोळ्यानं बघायला लागल्यानं नको असलेलं ठळक होत गेलं. हे कशाला हवं ? ते कशाला हवं ? असं होत होत संपूर्ण घरंच रिकामं होईल एव्हढी मोठी यादी तयार झाली. जुने लोखंडी रॅक, कोठ्या, प्लग, होल्डर, वायर, पणत्या, बोळके, जुने आकाशकंदील, जुने कपडे, नको असलेली भांडी- कुंडी, पुस्तकं, फोटो, देवाच्या तसबिरी, दिवाळी गिफ्ट्स. एक टेम्पो भरेल इतकं सामान झालं.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - निबंध