आन्सर क्या चाहिये? : व्यक्ती आणि प्रवृत्ती २

भाग १ : भाग २ : भाग ३ : भाग ४ : भाग ५ : भाग ६ :
भाग ७

प्रॉफ्स बद्दल बोलू काही-
(बाय द वे, संदीप आणि सलिलची गाणी पहिल्यांदा ऐकली तेव्हा झंझनावून गेलेलो. बर्‍याच वे़ळाने कुणीतरी मराठीत काहीतरी नवीन करत होतं. पण नंतर सलीलचं सर्ववाद्यसमावेशक संगीत जरा डोक्यात जायला लागलं. एकदा चुकून यूट्यूबवर "भलते अवघड असते"चा विडियो बघितला आणि चड्डीतली नाडी शर्टात गेली. च्यायला, असले भिकार व्हिडिओ काढण्यापे़क्षा चिंगम विका.)
.
तर इंजिनेरींगातले प्रोफेश्वर.
.
चांगलं शिकवणारे प्रॉफ्स: सचिन तेंडुलकर जसा आपोआप बाकी क्रिकेटरांत ओळखून येतो, तसे हे प्रॉफ्स असतात. त्यांच्या लेक्चरला कुत्रंसुद्धा आवाज करत नाही. बॅकबेंचर्स आणि Visiting Studetntsही ज्यांना मानतात, अशी दुर्मिळ जात. त्यांच्या बाबतीत सांगण्यासारखं एवढंच की ते तुमच्या इंजिनेरींग आयुष्यात येतीलच असं नाही. आले तर तुम्हाला आपोआप कळतं, त्यांना शोधावं लागत नाही. अख्ख्या कॉलेजांत, सगळ्या ब्रँचेसमधे मिळून असे २-३ प्रोफेश्वर असतात. डिपार्टमेंटचा लौकिक किंवा इज्जत ह्यांच्यावरच अवलंबून असते. ईश्वर त्यांची भरभराट करो.
.
झाँबी लोक: झाँबी चित्रपट तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला ही उपमा चटकन कळेल.
झाँब्यांची वैशिष्ट्यं काय? तर त्यांना मन नसतं. केवळ संवेदनाहीन असं शरीर असतं जे यंत्रवत गोष्टी करत रहातं. तसेच हे प्रॉफ्स!
हे झाँबी प्रोफेश्वर हे ह्याच नियमाचं पालन करत असतात. समोरच्या पोरांना शिकवण्यात त्यांना काहीही रस नसतो. ते येतात, काहीतरी बरळतात आणि निघून जातात. लेक्चरमधे पोरांनी काहीही केलं तरी त्यांना फरक पडत नाही. ते नेमाने हजेरी घेतात, त्यात प्रॉक्सी वगैरे मारण्यालाही त्यांची हरकत नसते. एखाद्या वेळी नारायणन्, संकल्प किंवा पूजा लोकांनी शंका विचारल्या तर ते मठ्ठपणे काहीतरी फेकून वेळ मारून नेतात.
बॅक बेंचर्ससाठी वरदान असलेले हे प्रोफेश्वर. ह्यांची आणि बॅक बेंचर्सची प्रचंड मैत्री असते.
.
कधीमधी हे प्रोफेश्वर सरप्राईज टेस्ट घेतात. मी २००% खात्रीने सांगतो की त्यातले प्रश्न काय येणार हे सगळ्यांना आधीच ठाऊक असतं. वर्षानुवर्ष झोंब्या तेच प्रश्न काढत असतात.
झोंंब्याशी पंगा घेणं वाईट. एरवी मेलेल्या माशीलासुद्धा ते त्रास देत नाहीत. पण तुम्ही जर त्यांच्याशी नडलात, तर ते वाईट पिदवतात. अशा वेळी झोंबीचा सबमिशन सैतान होऊ शकतो. हे फार फार फार वाईट.
.

नष्टपैलू: क्रिकेटमधल्या अष्टपैलूंना जसं सगळं जमत, त्याच्या उलट हे प्रॉफ्स असतात. ह्यांना काहीही शिकवता येत नाही, हे सगळ्यांना ठाऊक असतं. ते वर्गात येऊन जे काही फळ्यावर लिहीतात, ते भेंडी फर्स्ट बेंचरसुद्धा उतरून घेत नाहीत.
मग हे प्रॉफ्स पोरांशी मांडवली करतात. उगाच क्रिकेट किंवा फुटबॉलमधे इंट्रेस्ट दाखवतात. प्रॉक्सी मारली तरी अलौ करतात- कारण त्यांना पोरांत पॉपुलर व्हायचं असतं.
नष्टपैलूज् आर हार्मलेस.
साळुंखे नावाचे एक प्रॉफ एकदम अवली होते. ते पोरांना महिन्यातून एकदा संपूर्ण महिन्याची प्रॉक्सी मारायला द्यायचे- पण फक्त त्याच लेक्चरला. मग महिन्यातलं त्यांचं ते एक लेक्चर हाऊसफुल असायचं.
आता गोम अशी होती, की ते लेक्चर कुठलं आहे, ते साळुंखे सर आधी सांगायचे नाहीत. पण तरीही पोरं जमा व्हायचीच!
.

सबमिशन सैतान: सर्वात त्रासदायक प्रकार. ह्या प्रोफेश्वरांना बहुतेक मिलिटरी पार्श्वभूमी असावी- कारण ते शिस्तीचा प्रचंड माज करतात. इंजिनेरींगातला सर्वात डेडली प्रकार म्हणजे सबमिशनं. ही सबमिशनं लॅब्,ट्यूटोरिअल्स, टेस्ट्स, जर्नल्स अशी कसलीही असू शकतात. ज्याप्रमाणे सरकारी हापिसात बडे बाबूंच्या सहीशिवाय कुत्रंदेखील हगत नाही, तशी इंजिनेरींगात सबमिशनवर सही झाल्याशिवाय काहीच होत नसतं.
मग अशा वेळी हे सर्/मॅडम आपली सबमिशनची फाईल "घेतात".
"अरे ह्याला ग्राफ नाही काढलास. परत आण, जा."
"इथे पेज नंबर घातले नाहियेत."
"ह्याचं उत्तर चुकलंय. युनिट्स पण लिहिली नाहियेत. परत लिही."
"हे रीडिंग कसं आलं? एक्सपरिमेंट नीट झाला नाहीये- नेक्स्ट!"
.
अशी चित्रविचित्र उदाहरणं देऊन फाईल दाबली जाते. त्यात एखाद्याने जर त्या सरांच्या लेक्चरमधे काही झोल केला असेल, तर तो चिंबला. मग हे सबमिशन सैतान त्याची फाईल काहीकेल्या पुढे सरकवत नाहीत.
चिलटाएवढ्या आपल्या औकातीचा पुरेपुर उपयोग करून पोरापोरींना रडवण्यात काय समाधान मिळत असेल ह्यांना?
की आपलीही काहीतरी वट आहे हे सिद्ध करायला हे आमचा असा गेम करतात?
.
एकदा एका जर्नलचं सबमिशन होतं. तिथल्या सरांनी पटकन् जर्नल तपासून सही केली, नवीन असावेत बहुतेक! बाहेर जाता जाता दुसर्‍या जुन्या जाणत्या एका प्रोफेश्वरांनी "इधर आव" म्हणून बोलवलं.
"हे काय आहे?"
"जर्नल आहे सर--"
"ते दिसतंय. पण ह्या पानापुढे डायग्रॅम नाहिये. काढून आणा".
"ओके सर." म्हणून मी जायला लागलो, तर त्यांनी हातातल्या पेनानेच "थांब" अशी खूण केली.
"आणि ह्या डायग्रॅमपुढे त्याचं वर्णन नाहिये, ते लिहून आण."
"ओके सर".
.
हुकूमानुसार मी जेव्हा आठवड्याने परत गेलो, तेव्हा त्याच सरांनी ते २ डायग्रॅम अनावश्यक असल्याचं सांगितलं. अनुभवी असल्याने मी त्यांना त्यांच्याच आदेशाचं स्मरण करून दिलं नाही. नाहीतर मग त्याहूनही हगू शि़क्षा केली असती त्यांनी.
.
एकदा मला एका निर्जन बेटावर अशा एका सबमिशन सैतानाला पकडायचंय. मग तिथे तो खायला मागेल तर मी म्हणेन "तुमची भूक शक्ती कपूरच्या लैंगिक भुकेएवढी एवढी तीव्र नाहीये. परत या".
पाणी मागितलं तर सांगेन "सॉरी, पण प्यासा पिक्चरमधे गुरूदत्त तुमच्यापे़क्षा तहानलेला वाटला होता. गो बॅक."
.
सबमिशन सैतानावर एकच जालीम उपाय आहे- प्रार्थना.
.
.
ऑफिसातले क्लार्क्सः ही जमात जरा वेगळी आहे. हे लोक तसे खरंच चांगले असतात. त्यांना एरवी कधी कॉलेजबाहेर भेटलात तर घरी जेवायला बोलावतील. पण एकदा का त्या ऑफिसच्या खुर्चीत त्यांचं बूड टेकलं, की ते तुम्हाला ऐकणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा - प्रत्यक्ष देवाशी पंगा घेतलात तरी चालेल, पण ह्यांच्याशी नाही. एकदा का जर हे अडले, तर तुम्ही वारलात. डायरेक्ट.
इथे मग काही सब जमाती असतात.
.
कॉलेज रजिस्ट्रार: कॉलेजाची फी, लायब्ररीची पुस्तक पावती, कुठल्याही पैसेवाल्या बाबतीतला हा राजा. मग अशा वेळी आपण नडलेलो असतो त्याचा पुरेपूर फायदा घेणार.
त्या कोंबडीच्या खुराड्यासारख्या खोलीच्या आत बसून येणार्‍या जाणार्‍या पोरांना रडकुंडीला आणणे - हा रजिस्ट्रारचा विषेश करमणुकीचा खेळ. एकदा का फीयाबियांचा शिजन संपला, की पोरं त्या रजिस्ट्रारवर मुतणारही नाहीत. तेव्हा वर्षातून एकदा सहन करावा लागणारा त्रास.
.
रेल्वे कन्सेशन देणारे काका/काकू: आईच्या गावात आणि बाराच्या भावात.
ह्या माणसावर तुमचा अख्खा प्रवास अवलंबून असतो. आमच्या कॉलेजात वेस्टर्न रेल्वेला एक आणि सेंट्रलला एक असे दोन काके हे काम करत. दुर्दैवाने सेंट्रलवाले काका चिकार फास्ट आणि एकदम दिलदार होते.
वेस्टर्नवाले काका बहुतेक डायरेक्ट कासवाच्या वंशातले असावेत. ते जिमी अ‍ॅडम्सच्या बॅटिंगपेक्षा हळू होते- Can you believe it? एका रेल्वे कन्सेशनच्या फॉर्मवर सही करायला ते १५ मिनिटं तरी घेत.
आधी माझं आय कार्ड, मग रेल्वेवं आय कार्ड, मग त्यातला फोटो, मग माझ्याकडे बघून मी तोच असल्याची खात्री - हे सगळे सोपस्कार पार पाडले की मग ते काका सावकाश तो फॉर्म खेचत.
माझं अख्खं शरीर त्यांना "लवकर करा हो!" असं ओरडून सांगायचं- पण काका वेगळ्याच गियरमधे.
ह्याच अमानुष काकांनी मला एकदा कन्सेशन फॉर्मवर माझी सही मॅच होत नसल्याचं सांगून परत पाठवलं. सेंट्रल काकांना कळवळा येऊन त्यांनी मागील दाराने आम्हाला मग फॉर्म सही करून दिला.
.
जनरल परपझ त्रास: उगाच पोरांवर डाफरायला ठेवलेले एक काका. ह्यांना बाकी काहीही काम करताना कुणीही बघितलेलं नसतं, पण पोरांवर ओरडायची वेळ आली की हे अचानक उगवतात. निव्वळ डोक्याला शॉट.
Avoid at all cost.
.
ओळखीचे काका/काकू: इतर जगाशी जरी हे भैताडून वागत असले, तरी तुमच्या आईच्या मैत्रिणीच्या ओळखीचे असल्याने तुमच्याशी ते (नाईलाजानेच बहुतेक-) बरे वागतात. मग परीक्षेचा फॉर्म, मार्कशीट, GRE साठी लागणारी कागदपत्रं वगैरेसाठी ह्यांचाच वापर करावा लागतो. हे ब्रह्मास्त्र आहे- लक्षात ठेवायला पाहिजे.
.
.
===================================
पण ह्यापेक्षा जास्त इंट्रेश्टिंग लोक कॉलेजच्या बाहेर होते. त्यांच्याबद्दल सांगायला पाहिजे. यो.

शेंगदाणे काका: रस्त्याने जाता जाता वाटेत एक मिनिट थांबल्यावर एका विविक्षित जागी शेंगदाणे भाजल्याचा खरपूस वास यायचा. एकतर डोकं शिणलेलं असायचं. लेक्चर्स, प्रॅक्टीकल्स, उगाचची खिचखिच- परत घरी जाताना ट्रेनला होणारी गर्दी- च्यायला. मग त्या ठिकाणी थांबून बघितलं तर शेंगदाणे काका आपल्या घमेल्यातल्या वाळूत शेंगदाणे भाजताना दिसायचे. एकदम फाटकेसेच होते, पण तोंड भरून हसायचे नेहमी. फ्रेश.
माझी दिवसाची ऐपत - १ रू. त्यांच्यापुढे करून म्हणायचो "१ रू. का देना" ; पण त्यांना आधीच माहीती होतं मी कितीचे घेणारे ते.
शेंगदाणे काका मग एका छोट्या मेजरमेंट वाटीतून शेंगदाणे कागदी सुरनळीत ओतायचे आणि माझ्या हातात द्यायचे-
"लो."
एस.ई, टी.ई आणि बी.ईच्या पहिल्या सेमिस्टरपर्यंत हा आमचा ठरलेला प्रोग्रम होता. एके दिवशी शेंगदाणे काका अचानक गुल झाले. Didn't even say bye. But why should he? मी तरी इंजिनीर झाल्यावर त्यांना बाय केलं असतं का?

ज्यूसवाले काका: चैनीची परमावधी असेल तर माझं बजेट ५ रूपये होतं. मग ऑप्शन्स दोन- एक तर उस का ज्यूस किंवा कलिंगड ज्यूस. सीझन असेल तर मँगो मिल्कशेक.
ज्यूसवाले काका आपलेच होते. "अंकल, वो थोडा वॉटरमेलन पीसेस-" असं म्हटलं की नाखुशीने(दरवेळी!) कलिंगडाच्या छोट्या फोडी आमच्या पेल्यात टाकायचे.
नंतर आम्हाला माज आला आणि आम्ही त्या फोडी गृहीत धरायला लागलो तशी काकांनी ही खिरापत बंद केली.
मग आम्हीसुध्दा "प्लीज अंकल.."वर आलो. ज्यूसवाल्या काकांचं नंतर प्रमोशन झालं आणि त्यांनी गाडी सोडून परमनंट दुकान टाकलं. किमती वाढवल्या. मग दुसरी गाडी.

झेरॉक्स दादा: इंजिनीरींग कालिजासमोर झेरॉक्सचं दुकान नसेल तर ते कॉलेज नकली आहे. आमच्या कॉलेजासमोरही अशीच झेरॉक्सांची लाईन होती.
अनुभवांती आम्ही त्यातल्या एका ठिकाणी जायला लागलो. कारण तिथले झेरॉक्स कमी काळे, थोडे जास्त टिकणारे, पूर्ण पेपराचे असायचे.
पण सर्वात महत्त्वाचं तिथला झेरॉक्स दादा भारी होता. तो बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करून आमच्या असाइन्मेंटच्या झेरॉक्स सपकन् काढून द्यायचा.
शिवाय त्याच्याकडे फ्लॉपी, पेन ड्राइव आणि इंटरनेट -अशा सगळ्या प्रकारच्या डेटा ट्रान्सफरची सोय होती. काळाच्या अडीच पावलं पुढे होता तो.
नंतर बाकीच्या झेरॉक्सवाल्यांनी त्याची झेरॉक्स मारली असावी. आम्ही त्याचे उपकार स्मरून मग आमच्या बी.ई प्रोजेक्टचं "काम" त्याला दिलं.

लास्ट बट नॉट लीस्ट - स्टेशनवर मसाला सोडा देणारे काका: मुंबैच्या घामोळ्या हवेत आम्हाला आमच्या पाण्याच्या बाटलीत तो मसाला सोडा भरून देणारे काका. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर - आमच्या हातातून पैसे आणि बाटली घेऊन- टॅप चालू करून बाटली भरून - उरलेले सुट्टे पैसे आमच्या हातात कोंबून- टॅप बंद करून बाटली परत हातात देऊन- आम्हाला ट्रेन पकडायला वेळ असायचा.
तेंडुलकरच्या स्ट्रेट ड्राईव्हचं कौतुक करणार्‍यांनो, इथेही बघा- कलाकार अ‍ॅट वर्क.
सलाम टू दॅट परफॉरमन्स.

कदाचित क्रमशः

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

उस का ज्यूस बोले तो किस का ज्यूस? Wink
या भागात ज्यूस थोडा कमी वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावना विव्हळ केलेस मित्र. ( मला माहित आहे शब्द भावना विवश आहे.)

असो लोहित जा ... कोणीतरी इंजिनिअर वर लिहिलेच पाहिजे.

कोणते कॉलेज ? ब्रांच? वर्ष ? ( मी १९९६च साबू सिद्दिक चा वाहन अभियान्त्रिक ( ओटोमोबाईल इंजिनिअर )).

झेरॉक्स याम्ह्त्वाच्या तंत्राद्यानावर खरे तर येक ग्रंथ लिहिता येईल . हे नसती तर मी इंजिनिअर झालो नसतो ..

पुभाप्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चड्डीची नाडी शर्टात? भौ, कुठून आणतोस? गेल्या खेपेला असाच 'चादरमोद' शब्द वाचून घाईघाईनं नमस्कारला प्रतिसादाच्या खिडकीत धावले होते.

बादवे, सलिल नावाची नासपाडकी ब्याद येण्याच्या आधी शैलेश रानडे नावाच्या माणसासोबत संदीपची एक क्यासेट आली होती. ऐकली आहेस ना? आत्यंतिक फ्रेश प्रकर्ण होतं. नंतर संदीपके जिंदगीमें सलिल आई. तरी सुरुवातीला गाणी चांगली होती. (मी 'आ.बो.का.'चा व्हिडो बराच उशिरा बघितला. बघितल्यावर काही महिने चारचौघात संदीप-सलिल-आयुष्य यांतला एक शब्द जरी ऐकला तरी 'होय, मला काही सिनेमातला चंद्रचूड सिंग आवडतो' असं सांगताना झाल्यासारखी कानशिलं लाल होत असत. पुढे पुढे मी निर्ढावले.) पुढे पुढे मग काही धरबंधच राहिला नाही. 'देवा, मला एक अपघात कर', 'काचेची पट्टी, हट्टी, कट्टी, बट्टी'... असलं काहीही विकायला त्यांनी सुरुवात केली. असो. असो.

हायबरनेशनमध्ये जाऊ नका, अस्वलराव. गपगुमान लिहीत चला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ते सलिल नसून सलील आहे.
संदर्भ: ड्यारेक्ट फ्राम दी हार्सेस मौथ - https://www.youtube.com/watch?v=wYC_895K5QA (७:०५ मि)
(त्याने संस्कृत फोड अंमळ जास्तीची करून चुकवली असली तरी अर्थ/भावना समजावून घेणे (त्याच्या)).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलील कुलकर्णीची मुलाखत ऐकून त्याच्या नावाचं लेखन चूक की बरोबर हे ठरवण्यात स्वतःचा फावला, पैसे न देणारा वेळ फुकट घालवू? पण आता सांगितलंतच आहात, तर पुढे लक्षात ठेवीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तर हे पुस्तक छापून जोंधळेच्या किंवा दत्ता मेघेच्या गेटवर उभा राहून विकेन .बादवे : कुलगुरु वगैरे झालोच तर हे पुस्तक मास्तरांच्या क्रमीक वाचनात टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रभु रामचंद्रा! आज तुझा वाढदिवस! तझ्या दासाच्या या इच्छा पूर्ण कर रे बाबा! लै मज्जा येईल असला प्रकाशक / कुलगुरू असला तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

तर हे पुस्तक छापून जोंधळेच्या किंवा दत्ता मेघेच्या गेटवर उभा राहून विकेन .बादवे : कुलगुरु वगैरे झालोच तर हे पुस्तक मास्तरांच्या क्रमीक वाचनात टाकेन.

तंतोतंत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दंडवत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

नेहमीसारखंच खुसखुशीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'व्हिजिटिंग ष्टूडण्ट' ही संकल्पना मोहक आहे.

बाकी चालू द्या.

- (ष्टूडण्ट अ‍ॅट लार्ज) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ननि- 'ऊ'स का ज्यूस. हीहीही Biggrin
@हेमंत वाघे - ब्रँच्/वर्ष जाऊ देत, श्टोरी तर सारखीच आहे! आणि झे-Rocks!
@मेघना - नाही ऐकली ती गाणी अजून.. ऐकतो. सलीलचं संगीत खरंच झेपत नाही (संधीप्रकाशात.. मधली गाणी हा अपवाद असावा.) कवितांचा अगदी बँड करून टाकतो तो. आणि ते विडिओ.. देवा! दरिद्रीपणात नं.१ आहेत. यूट्यूबनेच काढून टाकले तर बरं होईल.

बाकी काही प्रोफेसर स्टीरीओटाईप राहिलेत खरे. पुन्हा कधीतरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बा जांबुवंता, हळवे करकरून रडवायचा बेत आहे काय?

तदुपरि या लेखमालेची एखादी पुस्तिका तरी नक्कीच होईल आणि पुस्तिका केल्यास ब्वायहाष्टिलांत त्रि-क्ष मानांकित नीलचित्रफिती खपतात त्या रेटने ही पुस्तिका खपेल यात शंका नाही. अति फकिंग उच्च.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अति फकिंग उच्च.

'क्लायमॅक्स'?

(अस्वल गुदगुल्या करून लोकांना हसवते, इतपत ऐकले होते. अस्वलाची पुस्तके वाचून - केवळ वाचून - लोकांना ऑर्ग्याझमसुद्धा येतो, हे नव्याने कळले. एकंदरीत कठीण आहे लोकांचे. (पन नॉट इंटेण्डेड.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'क्लायमॅक्स'?

इज़ंट दॅट व्हेन यू क्राय औट द मॅक्स?

अस्वलाची पुस्तके वाचून - केवळ वाचून - लोकांना ऑर्ग्याझमसुद्धा येतो, हे नव्याने कळले.

नर्डग्याझम ही एक क्याटेगरी आहे असे ऐकले होते. त्याच धर्तीवर समानशीलग्याझम नामक नवीन क्याटेगरी पाडावी म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा ROFL ROFL
.
.
ऑरगॅझम नक्कीच विविध आनंदांनी येऊ शकते. उदा.-
.
(१) जर यदाकदाचित नवरा संध्याकाळी तो आज सिरीयल खाईन म्हणाला (= मला भरमसाठ फळभाज्या घातलेले किचकट, वेळखाऊ सँडविच बनवायला न लागणे)
.
(२) अति थंडीत्/बर्फात अर्धा तास थांबून काळे नीळे पडल्यावर बस येताना दिसणे
.
(३) शनिवारी उठून दूर ड्राइव्ह ला जायचा बेत ठरुन कोणी आडवे न पडणे
.
(४) आपण ज्याला गुरुवार समजत असतो, तो अचानक शुक्रवार निघणे

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

एके दिवशी शेंगदाणे काका अचानक गुल झाले. Didn't even say bye. But why should he? मी तरी इंजिनीर झाल्यावर त्यांना बाय केलं असतं का? >> आमच्या कालिजात मुलींच्या वाहनतळापाशी रखवाली करायला, पावसाळ्यात गाडी लावायला, काढून द्यायला मदत करायला असलेले काका आठवले. त्यांची अधूनमधून अचानकच आठवण येते. बाय म्हणायच राहून गेलेलं...

मस्त झालेत सगळेच भाग. 'कदाचीत क्रमशः' वाचून 'उं?? का बरं??' वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता काय सांगू-

आळस माणसाचा शत्रू आहे.

त्यामुळे त्याला मित्र बनवण्यात सध्या बिझी असल्याने उगाच "कदाचित" टाकलं.
फालतू भाव खायचे धंदे, बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग ही अत्यंत आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down