आन्सर क्या चाहिये? : बारावी

भाग १ : भाग २ : भाग ३ : भाग ४ : भाग ५ : भाग ६ :
भाग ७

.

बारावी वगैरे गोष्टी आपोआप घडतात. तुम्ही मुंबैतले मध्यमवर्गीय असाल, तर त्यात काहीच नवल नाही. दहावीला स्पेशल क्लास, कोचिंग, बोर्डात येण्याचं स्वप्न वगैरे गोष्टी जितक्या नॉर्मल, तेवढंच बारावीत जाणं हेसुद्धा. मॉलमधल्या एस्कॅलेटरवरचा माणूस जसा आपोआप पुढे सरकत जातो, तसं मुंबैकर मध्यमवर्गीयांचं पोर पहिलीतून आत गेलं की डायरेक्ट बारावी होऊनच बाहेर पडतं.

माझंही तंतोतंत -जमलाय हा शब्द- तेच झालं. नाही म्हणायला दहावीनंतर अकरावी नावाच्या एका वेगळ्याच जगात सहा महिने रहाता आलं, हे जमलं. अकरावीत असताना रोज अभ्यास नव्हता; परीक्षेत पास होण्यापुरते मार्क मिळाले तरी चालून गेले; कालेज बिन्धास्त बंक केलं; चक्क मुलींकडे बघण्यात वेळ घालवला. भलतीच एक्साईटमेंट होती. एकदोनदा तर मुलींशी बोललो पण. टाईट.

पण अकरावीच्या दिवाळीनंतरचे बारावीचे क्लास. अग्रवाल क्लासेस म्हणे. हरामखोर साले. "Topmost students almost always come from Aggrawal Classes". येणार नाहीतर काय? च्यायला साले अ‍ॅडमिशनच तशा देतात. आईला तर नवस वगैरे फेडावासा वाटत होता तिथे अ‍ॅड्मिशन मिळाल्यावर.
पण घाण्याला जुंपेपर्यंत बैलाला कुठे माहिती असतं की नक्की काय होणारे?
.
टाईमटेबल बघा-
सकाळी ७ ते दुपारी १
किंवा नंतर -
दुपारी २ ते रात्री ८.

आमची आता हगवंती आहे.
.

त्यात १.५ तासाची ४ घनघोर लेक्चर्स. मधे जेवायला कुठेतरी एक छोटा ब्रेक. रोजची लेक्चर्स ठरलेली. त्यात पुन्हा प्रत्येक शिक्षकाची ठराविक लकब- आमच्यासाठी नवे पण जुनेच ठरलेले विनोद- त्या १ तासाला सुसह्य बनवण्यासाठी केलेला त्यांचा खटाटोप. चांगदेव म्हणतो तसं आपोआप लघवी केल्यासारखं शिकवणं जमलेले अग्रवाल क्लासेसचे शिक्षकगण. आणि समोर आम्ही. पुढल्या २ रांगा मुलींसाठी राखीव. त्यांच्याच मागे बसणार्‍या मुलांच्या रांगेचा ५ तास वाटणारा हेवा. त्या हेव्याच्या पुढे पोचलं तर मग प्रत्येक शब्द टिपून घ्यायची धडपड.
"Mark with a red pen- Energy is equal to?"
"What is an ellipse?.. please write down the definition-"
"Last bench, stand up, what is ionic equilibrium?"
"probability of same birthdays-"

असं चालूच. अव्याहत. कानांवरून ओघवणारा वेगवेगळ्या विषयांचा प्रवाहो. घोघोघोssss अग्रवालच्या आयचा घो.

आणि हे क्लासेस दिवाळीतपण चालूच. दिवाळीतला फटाके फोडण्याचा मंगल दिन. सकाळी ५.३० वाजता समोरची मुग्धा बेल वाजवून शिरस्त्याप्रमाणे फटाके फोडायचं आवताण द्यायला आलीये.
मी डबा, वह्या आणि समीकरणांतून डोकं वर करून तिला "सॉरी" म्हणून वाटेला लावल्याचं दु:ख आजही विसरता येत नाही. इतक्या सुंदर दिसणार्‍या दिवाळीला ठुकरावून दळभद्री अग्रवाल क्लासेसच्या दिशेने जायला घराबाहेर पडलेलो मी. लवंगी आणि बाँब्सच्या मागून दिसणारे हसरे चेहेरे. मुग्धाने केलेला टाटा. पण अग्रवाल्सने मला ते सगळं तेव्हा आठवू दिलं नाही. "आजची टेस्ट महत्त्वाची आहे. निदान ४५/५० तरी-" असले माझ्या मनातले तेव्हाचे विचार काश मला खोडून टाकता येते. हरामखोर अग्रवाल क्लासेस.

.
अग्रवाल क्लासेसचे दिवस आता माझ्या डोळ्यांसमोर फक्त एक ग्राफ बनून उभे आहेत. घोटून घोटून काढलेला, जवळपास पान फाटून निघेल एवढ्यांदा गिरवलेला ग्राफ. बस्स.
.
मग ते सगळं अंगवळणी पडलं. रोज ५ तास क्लासेस, घरी परत आल्यावर तासभर काहीतरी टंगळमंगळ करून उरलेला अख्खा दिवस दुसर्‍या दिवशीच्या टेस्टचा अभ्यास. त्यात आईबाबांच्या पाया पडून मी आय.आय.टीच्या क्लासेसमधून सपशेल माघार घेतलीये म्हणून बरं. तिथे तर ते महात्मे काय बोलतात एक अक्षर कळत नाही. आधीच दहावीपरेंत मराठी मिडियम. त्यातून सटपटून समजलेल्या गोष्टी मी तिथे अप्लाय करेपरेंत तो तिकडे काहीतरी भलतंच बोलायला लागायचा. माझ्या बाजूला आला तर मग हाताने झाकून घ्यायची वही. उगाच काहीतरी विचार करत बसल्याची अ‍ॅक्टींग. कान एकदम गरम व्हायचे.
आय.आय.टी, सॉरी. तुम्ही महान, आम्ही लहान. आमुचा राम राम घ्यावा.

तेव्हा आय.आय.टी वगैरे सोडून द्या. हे बारावीचंच लोढणं झेपत नाही इथे. कॉलेज. मग क्लास. त्यात परत स्पेशल टेस्ट सिरीज. हे म्हणजे बारावीचे पेपर्स लिहायची रंगीत तालीम. कधीतरी मला मिलिटरीत असल्यासारखं वाटतं- एक दो तीन चार- डायग्रॅम, नावं, त्याच्या X/Y अक्षांवरच्या किमती, आणि मग ते बिंदू सराईतपणे जोडणारा ग्राफ. सगळं एकदम पर्फेक्ट असलं पाहिजे. नेहेमीच.
.
बारावीतले खंडीभर क्लासेस, टेस्ट सिरीज, कॉलेज, प्रॅक्टीकल ह्याबरोबरच अजून एक गोष्ट बारावीशी जुळून गेलीये- लोकल ट्रेन्स. अकरावीत फारशी ओळख नव्हती. क्वचित जायचो कॉलेजात त्यामुळे हाय हॅलो. पण आता सकाळची ५.४० चुकली की मेलोच. मग विरार पकडायची हिंमत नाही आपल्यात. घरून सांगितलंय त्यावाटेला जायचं नाही. मग ५.४७ची स्लो. आणि ७ च्या ठोक्याला अग्रवालमधे पोचायला मरणाची धावपळ.
रोज माझे जवळपास ४ तास लोकलमधे जातात. सकाळी ६.१० च्या सुमारास वांद्र्याच्या खाडीचा अलार्म. मग माटुंगा-माहीमचा वास. मेलेल्या कुत्र्याच्या आतड्यांचा वास एकदा घेतला होता, परवडला ह्यापेक्षा. परतीचा प्रवास मात्र फुल एसीच. अख्खी गाडी आपलीच. लटका ट्रेनला- खिडकीत बसून एफ.एम ऐका किंवा समोरच्या लोकलमधल्या मुली बघा. दुनिया एकदम रंगीन वाटायची त्या परतीच्या प्रवासात.
.
आणखी एक म्हणजे वडापाव. कधी रेल्वे स्टेशनवर लोकलची वाट बघत असताना बकाबका हाणलेले, कधी कॉलेजच्या प्रॅक्टीकलसाठी उशीर होतोय म्हणून दरवाजातच गिळलेले तर बरेचदा कॉलेजच्या कँटीनात बसून कमी मार्कांचं गम भुलवायला सावकाश रेंगाळलेले असे वेगवेगळे वडापाव. मुंबैकर कॉलेजकर असाल तर वडापावाशी तुमचं किती घट्ट नातं जुळतं हे कळणं कठीण जाणार नाही. हा माझा बारावीतला पाहिला जिवाभावाचा मित्र.
एक वडापाव मारला की मी कुठेही कधीही जायला तयार. स्पार्टन. हऊ!हऊ!हऊ!
आणि ही दुपारची १.३७ लोकल माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे बारावीच्या वर्षात. दुसरी एक आहे ती ४.१७ ची स्लो. पण ती कधीतरीच नशीबात असणारी. जास्त हाय क्लास.
बारावीच्या वर्षाची सग़ळ्यात मोठी कमाई म्हणजे हा १ मित्र आणि ह्या २ मैत्रिणी.
.

कारण कॉलेजात मित्र मैत्रीणी वगैरे इंपॉसिबल. आणि त्यात ती साली इंग्लीश मिडियमची पोरं. त्यांचा उच्छाद.
"हे, व्हॉट आर यू डुइंग धिस सॅssटडे?"
"लेट्स गो टू सतारा धिस टाईम. व्हॉट से ड्यूड?"
"आय अ‍ॅम अ‍ॅक्चुली बिझी-"
माझं कानकोंडं उत्तर आणि त्याबरोबर फ्री म्हणून दिलेलं एक मिळमिळीत हास्य.
आणि मग त्या पॉश मुलामुलींचा हास्यफवारा. त्यातली एक खरं तर फार गोड हसते. आणि तेवढीशी परकीही वाटत नाही. मराठी असेल का? पण नको. च्यायला उद्याच्या टेस्टमधे माती खाल्ली तर झेपणार नाही.
.

तास, दिवस, महिने, वर्ष संपलं. वेगवेगळे आवाज, रंग, टेस्ट ट्यूब, ब्युरेट आणि पिपेट मधला गोंधळ, रंग बदलणारा वॉल्यूमेट्रिक अ‍ॅनालिसिस. सोनोमीटर म्हणून एक कोणीतरी. मग एक लॉग टेबल. आईभवानीच्या आशीर्वादाने बायोलॉजीपासून झालेली फारकत. बेडूक कसले कापताय? आमचीच मारलीये इथे.
.
"सायन्सला जाणारे. नक्की - मग, एवढे मार्क मिळवलेस आता- सायन्सलाच घाल ग ह्याला." इथून झालेली सुरूवात-
५.४० ची लोकल. बॉस, दादर उतरने का है? हटो फिर.
७ बज गये. लेटमार्क. What is the velocity of this satellite?
कल के क्लास में देख यार, अब सोने दे. २ दिन से सोया नही.
डबा आजपण नाही खाल्लास. टेस्ट सिरीज कितीला आहे?
Radiation pattern is -
नको. मी नाही येणार, तुम्ही जा वाढदिवसाला.
अबे ये क्या है? सिर्फ २३/५०?
प्रॅक्टिकल्स बरे होते. फिजिक्स कठीण. १ मार्क सुटला.
पण पंचाण्णव ट्क्के तरी मिळतील. बघूया" इथे येऊन संपते.

हे थोडक्यात माझं बारावीचं वर्ष. डोक्याला शॉट आहे ही बारावी. शिवी देण्याएवढीही लायकी नाही ह्या वर्षाची, तेव्हा ती तरी कशाला वाया घालवू? थूत.

क्रमश:

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (5 votes)

प्रतिक्रिया

आई ग!!! Sad वाढदिवस नाहे, फटाके नाहीत Sad खूप करुण स्फुट आहे .... देवा शप्पत!!
त्यात मराठी मिडीअमचे आपण खरय!!! मला तर सगळे वर्गबंधू-भगिनी स्मार्ट वाटत. कारण - विंग्रजी मिड्यमाचे ना!!

आमची आता हगवंती आहे.

इथे फक्त फु-ट-ले ROFL काय हो अस्वलजी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

करूण वगैरे आता वाटतं! तेव्हा माझ्या मते सगळेजण इतके अभ्यासगुंगीत असतात की हे सगळं जाणवतही नाही. आजूबाजूला फक्त मार्क पसरलेले असतात.
सुपर मारियोसारखे ते वेचत जाणे एवढंच पोरांचं ध्येय.

वैयक्तिक आठवण आहे- बारावीत होतो. आज्जीला एकदा फ्रॅक्चर झालं. मी सहाजिकच घरी नव्हतो. पब्लिक फोनवरून आईशी बोललो, तिने सगळे डिटेल्स सांगितले.
मग नंतर एकदा शेजारच्या काकांनी हॉस्पिटलचं नाव विचारलं आणि मी ब्लँक. कुठे अ‍ॅडमिट केलंय तिला? नक्की आठवत नव्हतं. जास्त लाज वाटली की वाईट वाटलं ते आठवत नाही, कारण दुसर्‍या दिवशी एक टेस्ट होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८ वी त, आमच्या "दातार" क्लास मध्ये एक गोरापानेस्ट मुलगा आवडायचा मला. पुण्याची गुलाबी थंडी- तो लालबुंद स्वेटर घालून यायचा. लाल लाल स्वेटर दिसला की अक्षरक्षः हृदयात कळ यायची, पोटात फुलपाखरं उडायची. आमच्या मुलींच्या रांगेमागे बसायचा. हुषार तर इतका होता ... इतका ... की वर्गात सर्वात हुषार Biggrin .... १००% हात वर असायचा, १००%.
मी शाळेच्या गणवेशात - पांढरे ब्लाऊझ अन नीळा स्कर्ट .... आत्मविश्वासशून्य अन स्वतःला फ-क्त कमी लेखणारी अन स्वतःचे दोष हुडकणारी. पुढे तो फर्ग्युसनमध्ये मध्ये वर्गात आला अन मुख्य त्याच्या अन आमच्या गृपच्या नादाने आय आय टीत गेले, तिथेही तो वर्गात होता. खूप सहली, सिनेमे, कॉफी, अगदी सर्व प्रकारचे जोक्स, "सर्व प्रकारचे" सिनेमे सगळं झालं पाहून त्याच्याबरोबर ..... पण एकटे नाही गृपमध्ये अर्थात . शशी भागवतांचं "मर्मभेद" त्यानेच दिलेलं वाचायला. त्याच्या बरोबर आता चांगली-उत्तम मैत्री वगैरे आहे. आताही एकाच राज्यात फक्त ३०० मैल अपार्ट आहोत.
__________
... अजूनही तो लाल स्वेटर आठवला की खूप, प्रचंड नॉस्टॅल्जिक वाटतं. किती प्रॉमिसिंग वर्षे होती, किती गोड अन स्वप्नाळू असतो आपण, पण हे तेव्हा समजतच नाही. Sad
___
कर्क सूर्य + वृश्चिक चंद्र + कर्क शुक्र अन धनु लग्न होता. आम्हाला दोघांना ज्योतिषाचा नाद होता. मी प्रेम नाही केलं त्याच्यावर पण ते आकर्षण मला विसरता येणार नाही. आता अगदी छान मित्र आहे पण आता ती बात नाही. .... अभी वोह कशीश कहां.
____
यावेळेला भारतवारीत पहीलं पुस्तक "मर्मभेद" च उचललं गेलं. Is it a coincidence? I bet not.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अन आमच्या गृपच्या नादाने आय आय टीत गेले,

ग्रुपच्या नादाने आयआयटीत गेले ?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत?

सादर प्रणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा एकत्र अभ्यास करायचो - पल्लवी, किरण, अर्चना अन मी. किरणला TIFR अन IIT दोन्हीत मिळाली मध्ये. पल्लवी अन मला IIT त. अर्चना मारवाडी होती लग्न लावलं शिकू नाही दिलं.
पण आम्ही गृपने अभ्यास अन टवाळक्या एकत्र केल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लेखमाला आवडली.

आणखी काही संज्ञा येतील असं वाटलं होतं.
- व्हेकेशन/व्हेकेशन कम रेग्युलर बॅचेस
- पीसीएम/पीसीबी
- जर्नल्स्/डायग्राम्स/सबमिशन्स्/प्रोजेक्ट्स
- नाईट आऊट करणे/नाईट मारणे
- गवर्नमेंट सीट्स्/प्रायव्हेट सीट्स्/अ‍ॅडमिशन

काही प्रश्न :
- इयत्ता बारावी ही सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात अस्तित्वाच्या मुळाशी असलेली का मानली जाते ?

- इयत्ता बारावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या अवस्थेची तुलना नात्झीकालीन डेथ मार्चशी करता येईल का ? छळछावण्यांच्या बाहेर आणि आतली जर्मन भाषेतली घोषणा होती "वर्क शॅल सेट यू फ्री". या घोषणेचा अर्थ जितका भयावह होता साधारण तशीच मनोऽवस्था इयत्ता बारावीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची होते असं म्हणता येईल का ?

- मराठी/भारतीय संदर्भांतल्या मराठी वेबसाईट्स/चर्चास्थळांवर जिथे म्हणून सामाजिक-राजकीय-साहित्य-इतिहासादि गोष्टींची देवाणघेवाण चालते तिथे बहुतांश "आन्सर क्या चाहिये" जातीचे लोक भेटतात. याचा अर्थ असा की उपरोक्त विषय, आपली भाषा, आपली (गास्प !) संस्कृती इत्यादि गोष्टींबद्दल ज्यांना रस आहे किंवा कळकळ आहे अशा व्यक्ती इथे ज्या येतात त्यापैकी बहुतेकांनी आपली दहावीनंतरची वर्षं छळछावण्यांमधे काढलेली असतात. याचा सूचित असलेला अर्थ सरळ आहे. आमच्या दिवंगत तीर्थरूपांच्या भाषेत "पोट भरल्यानंतर मग तुम्ही काय मारायच्या त्या बाजारगप्पा मारा. दहावीनंतरच्या वर्षांत तुम्हाला असल्या गोष्टींमधला इंटरेस्ट म्हणजे भिकेचे डोहाळे आहेत." हे शब्द अर्थातच टोचणारे आहेत आणि त्यातून प्रागतिक/उदारमतवादी दृष्टिकोनाचा अभाव, सिनिसिजम दिसतोच. परंतु प्रस्तुत लेखमाला वाचत असताना जगरहाटी हीच होती/आहे याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर येताना दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आमच्या दिवंगत तीर्थरूपांच्या भाषेत "पोट भरल्यानंतर मग तुम्ही काय मारायच्या त्या बाजारगप्पा मारा. दहावीनंतरच्या वर्षांत तुम्हाला असल्या गोष्टींमधला इंटरेस्ट म्हणजे भिकेचे डोहाळे आहेत." हे शब्द अर्थातच टोचणारे आहेत आणि त्यातून प्रागतिक/उदारमतवादी दृष्टिकोनाचा अभाव, सिनिसिजम दिसतोच. परंतु प्रस्तुत लेखमाला वाचत असताना जगरहाटी हीच होती/आहे याचं पुन्हा एकदा प्रत्यंतर येताना दिसतं.

बस्कर्मुसुकित्नारुलायेगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्यातूपैलेबस्कर्यार ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हर्मिट्क्र्याब्बैमीखर्तेच्सांग्तोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरेपणस्वल्जींच्याधाग्यावर्तीकशाकर्ताआपण्दोघेअवांतरकर्तोय? Smile
म्लावाईट्सवयलावल्याचादोष्तुलाच्जातोय ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

बर्बैतुम्च्यासाठिकाय्प्ण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाबासेरेमेरेपठ्ठेजीतेरहोतुम्जियोह्जारोसाल्साल्केदिन्होपचाश्जार.
माझाआय्डीबॅन्होणार्तुझ्यामुळेबॅट्या
अस्वल्भौएक्वार्माफीद्याबॅट्यान्मलाप्लीज्परतवांतर्नाहीकर्णारवचन्देते!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

इक्डेसग्ळंचसवांतराहेचिंतानसावी.

मराठीतली क्लिंगॉन आहे ही.
वाढीला लागो ही सदिच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन कवी इ. इ. कमिंग्ज़ यांची एक कविता :

i will be
M o ving in the Street of her

bodyfee 1 inga ro undMe the traffic of
lovely;muscles-sinke x p i r i n g S
uddeni
Y totouch
the curvedship of
Her-
….kiss her:hands
will play on,mE as
dea d tunes OR s-crap p-y lea Ves flut te rin g
from Hideous trees or

Maybe Mandolins
1 oo k-
pigeons fly ingand

whee(:are,SpRiN,k,LiNg an in-stant with sunLight
then)!-
ing all go BlacK wh-eel-ing

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

क्लींगॉन्व्रूनाठवलं:

ज्यान्तीभाषाकाढ्लीतोयेडाछोताच्याय्लागप्तमिळ्बिमिळ्कैत्रिघेत्ल्यस्तितर्यारामात्खप्ल्यस्तिएल्यन्म्हणून्त्यागोर्‍यांनाकाय्कळ्णारेकाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद! ते सगळं पुढं येईलच असा प्लान आहे Smile
@बारावी- पूर्वी तरी बारावीचेच मार्क इंजिनीरींगसाठी ग्राह्य मानले जात होते. पी.सी.एम मधे २९० वगैरे मिळाले तर मग एकदम चांगलं कॉलेज वगैरे. आता सी.इ.टी. वगैरे आली आहे त्यामुळे बारावीला भाव नसावा. पण कोचिंग क्लासेस तसेच चालू असतील.
@नाझी- कदाचित! इंजिनीरींगला किंवा कुठेही अ‍ॅडमिशन मिळवणं ह्यासाठी बारावीत आम्हाला तरी उपाय नव्हता. पैसेवाल्या मॅनेजमेंट सीट वगैरे बहुतेकांच्या औकातीबाहेरच. त्यामुळे मग मर मर मरून मार्क कमवणे. क्लासेस वगैरे चिंधी गोष्टी नाही केल्या तरी चाललं असतं आरामात. पण आजूबाजूला जो गोंगाट असतो, त्यात वेगळं रहाण्याची रिस्क घेता येत नाही सामान्यांना, म्हणून मग क्लासेस वगैरेचं पेव.
पुढे शिकायचं असेल तर बारावी किंवा तत्सम गोष्टींना पर्याय नाही. चीनमधेही परिस्थिती याहून भयानक आहे असं ऐकलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमची बारावी बरी गेली त्या मानाने. आमच्या* घरच्यांना आमच्याकडून काही होणार नाही अशी खात्री असावी.

आमच्या काळी सायन्सच्या हुषार मुलांनी रुइयाला (प्लीज नोट- रुपारेल नव्हे) जायची फ्याशन होती. आणि आयायटीच्या अगरवाल क्लासला जायची पण !!! आमचे पालक त्यासाठी आमच्या मागे लागले नाहीत. Smile

*आमच्या म्हणजे माझ्या बरोबरच्या मित्रांच्याही घरच्यांना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी मराठी मिडीयमचा विद्यार्थी असलो तरी शाळेसोबत मराठी मित्रमैत्रीणी आपोआप सुटले ते आता ऐसीमुळे पुन्हा जोडले गेले.

त्यामुळे तो मराठी मिडीयमचा काँम्प्लेक्स नी इतर विंग्रजाळलेल्यां (किंवा कशाही) पोरींपासून दूर राहणं एवढं वगळलं तर बाकी लेख एकदम दिलसे दिलतक पहुंचला!

आमच्याही पालकांनी क्लासेसचं फारसं स्तोम माजु दिलं नव्हतं, पण काही "दिलखेचक" पात्रांच्या ओढीने मीच आपणहून एक क्लास दादरला लावला होता. आमच्या इथून दादर व वापस एवढी 'सोबत' लक्षात राहिली. क्लासेसचा त्यामुळे फार त्रास नै झाला Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी असेच अणुभव... ते एक लोकल वगैरे सोडले तर. पुण्यात बोंबलायला कुठल्या आल्या लोकल... पण आदल्या दिवशी रात्री जागून टेस्ट साठी अभ्यास करून दुसर्‍या दिवशी सकाळी उठायला झालेला उशीर आणि मग ७ मिनिटात शिवाजीनगर ते कर्वे पुतळ्यापर्यंत जाण्याची केविलवाणी धडपड, रस्त्यात मधे येणार्‍यांच्या आईमाईचा उद्धार वगैरे सगळं आठवलं. शिवाय निकालानंतर पीसीएम मधे २ मार्क कमी मिळाल्याने घ्यावी लागलेली पेमेंट सीट, 'पेमेंटच आहे तर मेकॅनिकल कशाला? काही गरज नाहीये. ईएनटीसीच घे' वगैरे करून ईएनटीसीला झालेली रवानगी वगैरे सर्व काही आठवून ड्वाले पानावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ उच्च. नुसते तपशीलच नव्हेत, शैलीही. तुटक अल्पाक्षरी वाक्यं - धुमसता संताप - अगतिकता. कारुण्य - विनोद. मधूनमधून येणार्‍या हरामखोर साले या धृपदासकट. असो. या लेखांकाचं कौतुक करायचं तर नुसत्या सुट्ट्या सुट्ट्या ओळी इथे कॉपीपेस्ट कराव्या लागतील. लवकर पुढचा भाग येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असेच म्हणतो. वाचतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माय गॉड दोज वेअर द डेज!!
फार आवडला लेख _/\_.
तुम्ही गांडूळ, बेडकाच्या काळातले आहात होय. आम्ही उंदीर कापलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>तुम्ही गांडूळ, बेडकाच्या काळातले आहात होय. आम्ही उंदीर कापलेत.

आम्ही लोखंड कापलं आहे. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इंजिनिअरिंगच्या अगोदरही लोखंड कापलेलंत का हो?

आमच्या शाळेत ८वी ते १०वी होता हा प्रकार. वेल्डिंग, जोडकाम, सुतारकाम, नळकाम आणि यांत्रिक चित्रकला. सगळे अध्यापन शुद्ध मराठीतून चालायचे. फिटिंगमध्ये फायलिंगच्या जॉबमध्ये तो जॉब कधी सरळ फाईल झाला तर शपथ. दरवेळेस सरांच्या शिव्या खा नैतर ते लेव्हल चेकवताना पाठीमागे अंधार करा. पण सर्वांत मजा यायची ती आटे पाडताना आणि वेल्डिंग करताना. पोरं वेल्डिंग करताना वाकायची, काही चूक केली की पार्श्वभागावर सरांची काठी ठरलेलीच! पण काय मजा यायची राव. तो असा इलेक्ट्रोड पकडून वेल्डिंगने जॉब जोडताना लै पावरफुल वाटायचे. ग्यास वेल्डिंग करायची संधी मात्र कधी मिळाली नाही. पाहू आता कधी सहज कुठे करता आले तर. झालंच तर सुतारकाम मात्र तुलनेने आरामात होते. रंधा मारताना ते लाकडाचे असे छिलके पडायचे तेव्हा मजा वाटायची. खास लाकडाचा असा एक वास त्या मोठ्या खोलीभर दरवळत असे. गेल्या त्या आठवणी......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळे अध्यापन शुद्ध मराठीतून चालायचे

मेल फिमेल जॉइंटला मराठीत काय शिकवायचे?

आमच्या विजीनीरिंगच्या सरांना - जे बहुतांशवेळा मुलींना मदत करत असत - मुली भोवती असताना मेल-फिमेल जॉइंट ऐवजी एमेफ्जे म्हणायची सवय होती.
आम्ही मुद्दामहून त्यांच्याभोवती मुली जमल्या की तो जॉइंट त्यांच्यासमोर आतबाहेर करत त्यांना "सर, हा मेल-फिलेम जॉइंट बरोबर आहे का गॅप आहे?" असा प्रश्न आळीपाळीने विचारायाला जायचो. ते अगदीच किरमिजी व्हायचे-- जाम मजा यायची! Blum 3

नंतर हा खेळ वर्गातील मुलींनाही कळ(व)ल्यावर त्यांनी कोणालाही पेश्शल मदत करायचे सोडले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मेल फिमेलच म्हणायचे बहुधा. आता नीट आठवत नाही. टूल्सची नावे सगळीच मराठी नसायची, पण कैक असायची.

हॅकसॉ, कसू खतावणी, इ. काही शब्द आठवताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुली भोवती असताना मेल-फिमेल जॉइंट ऐवजी एमेफ्जे म्हणायची सवय होती.

खरे तर 'एमेफ्जे' अधिक अश्लील वाटते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो अकरावी-बारावीत कापले. त्या बदल्यात बेडून उंदीर कापले नाहीत. टेक्निकल नामक प्रकार होता.

कानशीने लोखंड घासणे, लाकूड तासणे आणि त्यातून ते कधीच सरळ न घासले जाणे वगैरे गोष्टी डिट्टोच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी.......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सगळ्यात धक्का बसला तो बारावीच्या वर्षाच्या शेवटी शेवटी.

आम्ही टेक्निकलच्या थिअरी आणि प्रॅक्टिकलला गव्हर्नमेंट टेक्निकल स्कूल नामक जागी जात असू. आठवड्यातून दोन दिवस. त्यात अनेकदा शिक्षक आले नाहीत, लाइट नाही इत्यादि कारणांनी खूप काळ काही कामच होत नसे. आम्हीही टाइमपास करीत असू.

टर्मच्या शेवटाला कळले की सर्व जॉब पूर्ण करायचेच आहेत. मग बारावीच्या परीक्षेआधी पंधरावीस दिवसांपर्यंत रात्री आठ आठ वाजेपर्यंत थांबून जॉब कम्प्लीट केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आम्ही टेक्निकलच्या थिअरी आणि प्रॅक्टिकलला गव्हर्नमेंट टेक्निकल स्कूल नामक जागी जात असू.

हे पार्ल्यात आहे तेच का? इर्ला म्हणतात त्या भागात आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नै. ठाण्याला होते. (आता नाहीये असे वाटते).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अच्छा.
पार्ल्यात होतं एक. तिथे बारावी सायन्सच्या वोकेशनलच्या पोरांसाठी थेरी आणि प्रॅक्टीकल असे.
बरेचदा तिथे पोरं क्रिकेटच खेळत. मस्त मोठ्ठं ग्राउंड वगैरे होतं. फायलिंग, जॉब, लेथ मशीन, स्मिथी शॉप, इंटर्नल कंबश्न इंजिन वगैरे मंडळींची ओळख तिथे झाली
शि़क्षक सरळ मराठीतच सुरवात करायचे - "आज मी तुमचं प्रॅक्टीकल घेणार. चला!". एरवी सगळीकडे चमकणारी सौथिंडियन पोरं भयानक तडफडताना बघून बाकीच्यांना खुनशी आनंद व्हायचा मग.
इंजिनीरींगातल्या वर्कशॉप नामक प्रकाराचा ओनामा तिकडे झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाही जोडकामचा जॉब हरवला होता. भेंडी सकाळी लौकर उठून आमच्या सरानं यायला लावलं सुट्टीच्या दिवशी शाळेत अन घासून करून घेतलं. त्यात ते हॅकसॉ ब्लेड कापताना मोडता मोडता वाचलं, नायतर अजून त्रास झाला असता. त्यात परत सराचा डायलॉग "एक जॉब सांभाळता येत नै, उद्या बायको कशी सांभाळणार?" इ.इ. त्यांना सगळे घुबड म्हणायचे. तसा चांगला माणूस, पण उग्गीच कडकपणामुळे डोक्यात जायचा काहीवेळेस. असो.ते आता गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बायको=जॉब
समीकरण रोचक आणि अनेक रूटी आहे. जॉब=बायको म्हणजे नोकरी, कटकट, काम,प्रकरण, खटलं, मांडवली काहीही असू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय. आवडतय. समजू शकतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी पटलं. आजूबाजूची मुलंमुली अखेरचं जीवीतकार्य असल्यासारखी अभ्यास ऐके अभ्यास करायची पण मला हे अभ्यासाचं वेड काही लावून घेता आलं नाही. ते झूल्~ओजी तर भयानक. बेडकाच्या डीसेक्शनची तर प्रचंड भिती आणि किळस वाटायची. त्यात बायोच्या आकृत्या भयानक यायच्या. (त्याला घाबरून परिक्षक पेपर न वाचताच पासिंग मार्क्स देऊन मोकळे होत असावेत ). फ्लॉवर मॉर्फोलॉजी मात्र आवडायचं.
मुक्तसुनीत म्हणतात तसं अवांतर गोष्टी मधला इंटरेस्ट हा गुन्हा वाटावा अशी मोठ्यांची बोलणी. घरातली मोठ्यांची दुपेडी, तिपेडी भांडणं, माझा कमालीचा मुखदुर्बळ आणि अंतर्मुख स्वभाव यामुळे विचार करत बसंणं म्हणजेच दीवास्वप्न बघणं यातच ते वर्ष कसंबसं गेलं. अर्थात मोठा क्लास लावणं वैगेरे खुळं नव्हती घरात ते एक बरंच होतं. आजूबाजूच्या कोणालाच काही विचारावसं,सांगावसं वाटायचं नाही. ईंजिनयरींग जमणार नाही हे माहीती होतंच. जेमतेम फर्स्ट क्लास मिळाल्यावर ती भिती राहीली नाही. पेमेंट सीट वैगेरे गोष्टी घरातल्यांना अपमानास्पद वाटायच्या . त्यामुळे निमूटपणे बीएस्सी केलं. नेमकं संगणक वाटेत तडमडल्याने आता एनंजिनयरांच्या समजल्या जाणार्‍या क्षेत्रात घुसायला मिळालं.
स्वतःबद्द्लचा न्यूनगंड तर ऐवढा होता की वयाने १० एक वर्षांनी मोठी असलेली एक चुलत चुलत बहीण खुप शिकलीय, नोकरीला लागल्यावरही तिने एलेल्बी केलं , वरच्या पोस्टला आहे.. वैगेरे गोष्टी ऐकून तिच्या पुढे कमीपणा वाटायचा. आता वॉट्सॅप च्या भावंडांच्या ग्रुप्मुळे कळलं की ती एमे एलेल्बी आहे आणि हेड्क्लार्क आहे. ( यात एमे किंवा हेड्क्लार्कची नोकरी म्हणजे कमीपणा असं म्हणायचं नाहीय हे कृपया लक्शात घ्यावं. )
मुक्तसुनीत यांचा प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनाचे दुखरे कप्पे पुन्हा उघडले या लेखाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी दिल थाम के वाचत आहे. जबरदस्त म्हणजे कडकच शैली आहे.

याचं पार दुसरं टोक वाटावं अशी माझी बारावी होती. (कारण आम्ही कामरसाचे विद्यार्थी, जगावर ओवाळून वगैरे टाकलेले.) क्लास तर एकच होता - अकाउंट्सचा. तोही कॉलेजातलेच मास्तर हौसेखातर घेत असलेला. पेठेतल्या एका महिला मंडळाच्या हॉलमध्ये आम्ही सत्रंजीवर, आणि मास्तर समोर श्रीकृष्ण-बासरी-पोजमध्ये पायाची फुली घालून. मुळात क्लास पाऊण तासच असायचा; त्यातही कॉलेजातल्या (इतर) मास्तर-मास्तर्णींची खरी/कपोलकल्पित लफडी, त्यांच्या चाळीस वर्षांच्या नोकरीतले अनुभव, क्लासातल्या एका गर्लफ्रेंडधारक विद्यार्थ्याला चिडवणे, वगैरे भानगडींत वीसेक मिनिटं जात. वर आठवड्यातून एकदा तरी ठणकावत - गुणाकार करता येणार्‍या कोणाही रेम्याला (त्यांचाच शब्द) अकाउंट्समध्ये शंभरपैकी अडुसष्ठ मार्क मिळू शकतात. त्याखाली मार्क मिळवून माझी लाज घालवू नका, वगैरे.

ह्या...णॉष्टॅल्जिक झालो राव....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>गुणाकार करता येणार्‍या कोणाही रेम्याला (त्यांचाच शब्द) अकाउंट्समध्ये शंभरपैकी अडुसष्ठ मार्क मिळू शकतात.

आमची इथेच लै फाटायची. म्हंजे गुणाकार आम्ही लीलया करू शकतो पण ते डेबिट क्रेडिट *ट्टं कळत नसे. पुढे कन्सॉलिडेटेड ब्लालन्स शीट (क्रॉस होल्डिंग असलेल्या कंपन्यांची) म्हणजे तर नाकातोंडात पाणीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चचा, हे बारावीचं चाल्लंय. त्यात डेबिट-क्रेडिटची मुळं तपासणारे प्रश्न सहसा येत नाहीत. प्रश्नही वर्षानुवर्षं तस्सेच असतात - फक्त नावं आणि आकडे बदलतात. हाण सावळ्या तत्त्वानुसारही अडुसष्ट पडतात.

उदा. २००१ च्या पेपरात अनिल, बजरंग आणि किशोर यांनी पार्टनरशिप केलेली असते. त्यातला बजरंग मध्येच खपतो. २००२ च्या पेपरात आदि, बुरजोर आणि कावस तशीच पार्टनरशिप करतात. यावेळी कावस खपतो.

कन्सॉलिडेटेड ब्यालन्स शीट वगैरे सीए फायनलला असतात. तोही शंभरापैकी पंचवीस मार्कांचा संटा प्रॉब्लेम असतो. ("हा प्रॉब्लेम अर्ध्या तासात जो अचूक सोडवून ब्यालन्सशीट टॅली करू शकेल त्याचा पहिला ग्रूप सुटतो" अशी एक श्रद्धा आहे.)

बाकी डेबिट-क्रेडिटचे गोंधळ अकाऊंटिंगची पार्श्वभूमी नसणार्‍यांमध्ये असतात. "मला पैसे मिळाले की ते ब्यांकेत क्रेडिट होतात. मग मी बँक अकाउंट डेबिट अशी एंट्री का करु?" किंवा "मालकाचं भांडवल ही लाएबिलिटी कशी?" हे नेहेमीचे यशस्वी प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आम्ही बारावीला नै ना शिकलो हे. नंतर शिकायची वेळ आली तेव्हा फाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"मालकाचं भांडवल ही लाएबिलिटी कशी?" हे नेहेमीचे यशस्वी प्रश्न.

"नेहमीचा यशस्वी" इज़ राइट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न'बा - तुमची कोणतीतरी एक बाजू सीए/सीपीए आहे की काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण 'आमच्या वेळी' (भारतात त्या मानाने अर्भकावस्थेत असलेल्या) डोमेष्टिक सॉफ्टवेअर इण्डष्ट्रीमध्ये प्रत्येक नवशिक्या, होतकरू प्रोग्रामरच्या वाट्यास एखाद्या तरी क्लायण्टसाठी एखादे तरी फायनान्शियल अकाउण्टिंग 'प्याकेज' (तेही बहुधा डीबेस-३/क्लिपरमध्ये) बनवावयास यायचेच यायचे. (पंचवीसएक वर्षे होऊन गेली त्यास.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर सापडलं का मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(डिस्क्लेमर: पुढील कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून, तिच्यातील कोणत्याही पात्राचे अथवा प्रसंगाचे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी अथवा प्रत्यक्षातील कोणत्याही प्रसंगाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

आटपाट नगर होते. तेथे एके दिवशी श्री. नितीन थत्ते हे श्री. 'न'वी बाजू यांना भेटावयास आले. म्हणाले, "मला काही कामाकरिता पैशाची गरज आहे, तुमचे १००,००० रुपये मला वापरायला देऊ शकाल काय?"

श्री. 'न'वी बाजू यांचे तिजोरीत १००,००० रुपये नाहीतरी धूळ खातच पडले होते; ते लगेच "हो" म्हणाले, आणि त्यांनी शंभर रुपयांच्या प्रत्येकी शंभर नोटा असलेली दहा बंडले तिजोरीतून काढून श्री. नितीन थत्ते यांच्या हातावर टिकवली.

त्यानंतर श्री. नितीन थत्ते, "अरे यार, काल त्या 'न'वी बाजूंकडे गेलो होतो, काय मस्त धनलाभ झाला!" असे सांगत दिवसभर गावभर हिंडत होते, असे वृत्त श्री. 'न'वी बाजू यांच्या कानावर पडले.

अशा रीतीने आमची ही साठां उत्तरांची कहाणी एकाच उत्तरी सफळ संप्रूण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नितीन थत्ते का? बरं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे! किती वर्षांनी हे शब्द ऐकले. आणि ते वॉल्युमेट्रिक! त्यावरून वॉल्युमिनस, वॉलप्शिअस असे जोक्स चालायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय अस्वलभाऊ. फार आवडलं.
आमचं कॉलेज नावालाच इंग्लिश मिडियम असल्याने फार प्रॉब्लेम आला नाही. शेवटी आयायटीची परीक्षा कधी एकदा होते असं झालं होतं. बाकी आमच्यावेळी बोर्डाचं महत्त्व कमी होऊन सीईट्या आल्या होत्या ते एक बरं होतं. तरीही बोर्डाचे म्हणून असलेले (फक्त बोर्डाचे. सीईटीचे नव्हे, त्यासाठी लोक आणखी वेगळी क्लास लावायचे!) क्लास इतके कसे चालायचे असा प्रश्न पडतो.

माझ्या बाजूला आला तर मग हाताने झाकून घ्यायची वही.

बहुतेक अकरावीतल्या परीक्षेत सुरू झालेली ही सवय अजूनही सुरू आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वला, मस्त रे.

ह्या सगळ्या भानगडीतून माझी सुटका झालेली डिप्लोमा मुळे पण आजूबाजूच्या लोकांची कथा (व्यथा, अवस्था) बघितली आहे ती अगदी अशीच होती. इन फॅक्ट, त्या बारावीच्या लोकांच बघून डिप्लोमाला पण क्लास लावायची विचारणा आमच्या पालकांनी केलेली (आणि ती तितक्याच त्वरेने फाट्यावर मारलेली) आठवते. नंतर "इंजिनिअरींग" नामक काळ्या पाण्याची (फक्त अभ्यासाच्या दृष्टीने, इतर वेळात मज्जाच) वर्षे सुरु होतील तेव्हा वाचत राहूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला मस्त लेख. तो माहौल मस्त टिपला आहे.
----------------
बारावीला मी एक ट्यूशनला जात असे. ते सर आमच्याच कॉलेजचे होते आणि ट्यूशन नाही केले तर टेस्ट एक्झामधले मार्क कापतात असे कोणीतरी उठवून दिलेले. सायकल मारत संध्याकाळी पुन्हा ३-४ किमी जाणे माझ्या जीवावर येत असे. नंतर इतर शिक्षकांनी 'तसे काही नाही' सांगीतले तेव्हा दोन महिन्याने मी ते सोडून दिले.

बारावीच्या अभ्यासाच्या नावाने अवांतर वाचन करायची हौस खूप भागवून घेतली. बारावीला आहे म्हणून कोणी काही म्हणत नसे त्याचा मी प्रचंड गैरफायदा घेत असे.
------------
बारावीत माझ्यासोबत एक प्रचंड मोठा हादसा घडला आहे. नंतर कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दोन्ही लेख आजच वाचले आणि अंमळ सोडाच, तुडुंब हळवा झालो.

बारावीत पार्ल्यातलं कालरा-शुक्ला हे एक्स-अगरवालीय प्रकरण अंगावर ओढवून घेतलं होतं. 'बाटगा मुसलमान अधिक जोराने बांग देतो' (पॉलिटिकली इन्करेक्ट वाटत असल्यास, बाटगा एनाराय अधिक जोराने oath घेतो म्हणा. आपलेच दात, आपलीच ओथ!), त्या न्यायाने तिकडची शिस्त आणि वक्तशीरपणा हा मदरशिपलाही लाजवेल असाच होता. पार्ले टिळक मराठी माध्यमाच्याच पुढच्या यत्ता असावं, असं आमचं साठ्ये कॉलेज आणि पश्चिमेतल्या मिठीबाईची 'लखलख चंदेरी' न्यारी दुनिया अधिक तिथलीच गुजराती माध्यमातून शिकलेली मध्यमवर्गीय मुलं, यांचं अजब मिश्रण त्या क्लासमध्ये भरत असे - त्याची आठवण झाली.

(आता पुढच्या भागात विद्यालंकार - क्रॅश कोर्सेस - जीटी इत्यादी 'येथल्याच नच बुजली रांग' आठवणींची वाट पाहतो आहे.) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे भाग पूर्वीच वाचले होते, प्रतिसाद द्यायचा योग आज येतोय. सगळ्यांचे अनुभव पाहता माझी बारावी खूपच मजेत गेली असे वाटतेय. एकंदरीतलं वातावरण पाहता मला गावामध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं नव्हतं. बायो आधीच सोडलं होतं. त्यामुळं इंजिनिअरिंग.

लेखमाला वाचायला मजा येतेय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे