सध्या काय वाचताय? - भाग ७

याआधीचे भागः | | | ४ | ५ |

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
***************

गेल्या आठवड्यात "वंशवृक्ष" वाचले. खरंतर "आवरण" वाचल्यानंटर भैरप्पा वाचावेत का असे वाटु लागले होते पण इथेच मेघना, बॅट्या वगैरेंनी शिफारस केल्यावर विकत घेऊन वाचलेच. आणि त्यांचे ऐकल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

पुस्तक आवडलेच. भैरप्पानी जी पात्र उभारणी केली आहे त्याला तोड नाही. मुळ कथेतल्या गुंत्यापेक्षा प्रसंगी कथेपेक्षाही - ही पात्रे आणि त्यांच्या भोवतीचा परिसर अधिक वेधक आणि जिवंत वाटतो - मला अधिक आवडला.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

तिळा तिळा दार उघड.

This comment has been moved here.

'मृच्छकटिकम् - मातीच्या

'मृच्छकटिकम् - मातीच्या गाड्याचं प्रकरण' हे राजीव नाइकांनी केलेलं भाषांतर वाचलं. नाटक तर रोचक आहेच, पण ते संस्कृत नाटकांच्या परंपरेत (आणि जगभरातल्या नाट्यप्रवाहांतही) नक्की का नि कसं वेगळं आहे हे उलगडून सांगणारी नाइकांची पुरवणी खरी मस्त आहे.

कमी कालावधीत जास्त घटना असल्यानं (चार दिवसांत एक राज्यक्रांती आणि काही प्रेमकथा), नाटकात वाहते रस्ते स्थळ म्हणून अनेक वार वापरल्यानं, एकाच वेळी दोन ठिकाणच्या घटना दाखवणारी चित्रपटीय क्लृप्ती वापरल्यानं नाटकाचा वेग जास्त आहे. नाटकात नाटकात नेहमी भेटणार्‍या लोकांपेक्षा निराळे असे अनेक व्यवसाय आहेत (ब्राह्मण चोर, वेश्या, दासी, व्यापारी आणि घरबश्या ब्राह्मण नायक, विनोदी-लोभी खलनायक इत्यादि), तसंच ते रूढापेक्षा वेगळ्या गोष्टी करायला कचरत नाहीत. नाटकात संस्कृत आणि प्राकृत भाषांचा सामाजिक स्थान दर्शवायला उत्तम वापर केला आहे.

हे सगळं नाइकांच्या अघळपघळ शैलीत (उद्गारचिन्हांचा वापर करायला लावणारं 'मृच्छकटिकम्'चं वेगळेपण) आणि नाटकीय संज्ञा नक्की करत जात जात (उदा. नाट्यपूर्ण आणि नाट्यात्म यांतला फरक!) वाचायला फारच मजा येते.

आता मी 'त्यांची नाटकं' हे विजय केंकरेंचं पुस्तक वाचतेय (होय, लोकसत्तेत येत असलेलं सदर, बरोबर). मुख्यत्वेकरून लंडन आणि अमेरिकेतल्या नाट्यप्रयोगांबद्दल लेख आहेत. राजीव नाइकंची प्रस्तावना आहे. मजा येतेय.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कैरी

काल रात्री 'कैरी' पुन्हा (कितव्यांदा लक्षात नाही) वाचली आणि नेहमीप्रमाणे झोपेचे खोबरे झाले.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

Their Finest Hour and a Half

Their Finest Hour and a Half - Lissa Evans

लंडनवरच्या बाँबहल्ल्यांच्या ऐन भरात जनतेचं मनोधैर्य उंचावण्यासाठी एक प्रपोगंडा चित्रपट काढायचं ठरतं. पण हातीपायी धड असणार्‍या सर्वांनाच लढाईला पाठवलेलं. त्यामुळे सिनेमा बनवणारे म्हणजे काहीही अनुभव नसलेले नवशिके लोक आणि लढायच्या वयाच्या पलिकडचे म्हातारे. त्यातून काय गमतीजमती घडतात आणि शेवटी उत्तम चित्रपट कसा बनतो त्याची ही गोष्ट.

लेखिका लिसा एवन्स म्हणजे "कुमार्स अ‍ॅट नं ४२" या प्रसिद्ध कार्यक्रमाची दिग्दर्शिका.

आवडलेल्या गोष्टी:
- बाँबहल्ल्यांना कसं धैर्याने तोंड दिलं वगैरे प्रपोगंडी कथा लय आहेत. पण रहात्या घरावर बाँब पडल्यावर कशी फाटते याचं प्रामाणिक वर्णन लेखिका करते. "डिफायन्स केम लेटर, आय वॉज शिट स्केअर्ड अ‍ॅट दॅट टाईम" असं एकाने ब्लिटझचं वर्णन केलं आहे.
- मानवी भावभावना फार छान दाखवल्या आहेत.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

यादीतली पुस्तकं वाचतेच आहे.

यादीतली पुस्तकं वाचतेच आहे. सोबत 'मृच्छकटिकम्'चं राजीव नाइकांनी केलेलं भाषांतर आणि त्यावरचं त्यांचं भाष्य वाचते आहे.

बादवे: मी बरेच दिवस राजीव नाइकांचं 'नाटकातली चिन्हं' नावाचं एक पुस्तक शोधते आहे. कुठे विकत / उसनं मिळेल काय?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठाणे नगर वाचन मंदिर

>> मी बरेच दिवस राजीव नाइकांचं 'नाटकातली चिन्हं' नावाचं एक पुस्तक शोधते आहे. कुठे विकत / उसनं मिळेल काय? <<

'ठाणे नगर वाचन मंदिर'मध्ये ते उपलब्ध आहे असं दिसतंय.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयला! काखेत कळसा! धन्यवाद.

आयला! काखेत कळसा! धन्यवाद. (दात काढत)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ताजा धागा वर काढायसाठी

ताजा धागा वर काढायसाठी प्रतिसाद. कृपया नवे वाचन इथे नोंदवावे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या वर्षी वाचलेली इंग्रजी

या वर्षी वाचलेली इंग्रजी पुस्तके:

१. अ स्पोर्ट्समन्स स्केचेसः इव्हान तुर्गेन्येव्ह

१८५२ साली प्रसिद्ध झालेला, छोट्या स्फुटांचा/व्यक्तिचित्रांचा हा संग्रह अनेक दृष्टींनी रोचक आहे. प्रामुख्याने पक्ष्यांच्या शिकारीनिमित्त भटकताना लेखकाला भेटलेल्या वल्लींचं, अनुभवांचं आणि निसर्गाचं काहीशा अलिप्त (मात्र तटस्थ नव्हे) भावनेने केलेलं वर्णन म्हणून याला 'रिअ‍ॅलिझम'च्या सदरात गणता येईल. त्याच वेळी, नेपोलियनची मोहीम (१८१२) ते रशियन राज्यक्रांती (१९१७) या कालखंडाच्या साधारण मध्यात घेतलेला तत्कालीन रशियन समाजाचा - जाचक वर्गव्यवस्था, जमीनदारी आणि छोट्या शेतकर्‍यांची हलाखीची स्थिती - या सार्‍यासह घेतलेला वेधही यात डोकावून जातो. निव्वळ साहित्यिक दृष्टीने पाहिलं तर दीर्घ पल्ल्याच्या आणि विस्तृत पटाच्या कादंबर्‍यांनी रशियन साहित्य व्यापण्यापूर्वी गाजलेलं हे पुस्तक, चेकॉव्हसारख्या लघुकथालेखकांना प्रेरणा देणारं ठरलं.

प्रवासात भेटलेल्या व्यक्तींच्या लकबींचं नेमकं वर्णन ["Yermolaï, as always, shot triumphantly; I— rather badly, after my custom. Sutchok looked on at us with the eyes of a man who has been the servant of others from his youth up; now and then he cried out: 'There, there, there's another little duck'; and he constantly rubbed his back, not with his hands, but by a peculiar movement of the shoulder-blades."] किंवा एका छोट्याशा गावी भेटलेल्या डॉक्टरने व्यक्त केलेलं मनोगत यासारख्या बाबी सॉमरसेट मॉमच्या लघुकथांची (विशेषतः 'इस्ट अँड वेस्ट') आठवण करून देतात.

मुद्दाम करायचं म्हणून नव्हे, तर कथेच्या ओघात येणारी निसर्गाची वर्णनंही सुरेख -
The heat forced us at last to go into the wood. I flung myself down under a high nut-bush, over which a slender young maple gracefully stretched its light branches. Kassyan sat down on the thick trunk of a felled birch-tree. I looked at him. The leaves faintly stirred overhead, and their thin greenish shadows crept softly to and fro over his feeble body, muffled in a dark coat, and over his little face. He did not lift his head. Bored by his silence, I lay on my back and began to admire the tranquil play of the tangled foliage on the background of the bright, far away sky. A marvelously sweet occupation it is to lie on one's back in a wood and gaze upwards! You may fancy you are looking into a bottomless sea; that it stretches wide below you; that the trees are not rising out of the earth, but, like the roots of gigantic weeds, are dropping—falling straight down into those glassy, limpid depths; the leaves on the trees are at one moment transparent as emeralds, the next, they condense into golden, almost black green. Somewhere, afar off, at the end of a slender twig, a single leaf hangs motionless against the blue patch of transparent sky, and beside it another trembles with the motion of a fish on the line, as though moving of its own will, not shaken by the wind. Round white clouds float calmly across, and calmly pass away like submarine islands; and suddenly, all this ocean, this shining ether, these branches and leaves steeped in sunlight—all is rippling, quivering in fleeting brilliance, and a fresh trembling whisper awakens like the tiny, incessant plash of suddenly stirred eddies. One does not move—one looks, and no word can tell what peace, what joy, what sweetness reigns in the heart. One looks: the deep, pure blue stirs on one's lips a smile, innocent as itself; like the clouds over the sky, and, as it were, with them, happy memories pass in slow procession over the soul, and still one fancies one's gaze goes deeper and deeper, and draws one with it up into that peaceful, shining immensity, and that one cannot be brought back from that height, that depth….

['प्रोजेक्ट गटेनबर्ग'वर हे पुस्तक प्रताधिकारमुक्तपणे उपलब्ध आहे.]

२. ब्लाईंडनेस - जोझ्ये सारामागो

एका गाडीचा चालक, सिग्नलला थांबला असताना अचानक आंधळा होतो. हा आंधळेपणा दोन दृष्टींनी निराळा असतो. एक म्हणजे, अंध झालेल्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर काळ्याऐवजी सर्वत्र पांढरा रंग दिसतो आणि दुसरं म्हणजे हा आंधळेपणा संसर्गजन्य असतो. वेगाने पसरलेल्या ह्या रोगामुळे त्या देशात उडालेल्या हाहाकाराचं वर्णन म्हणजे या कादंबरीचं कथानक, असं म्हणणं हे अन्याय्य होईल.

मानवी स्वभाव, संकेत आणि नियमांवर उभा असलेला सुव्यवस्था आणि संस्कृती यांचा नाजूक डोलारा, अराजक माजल्यावर माणसांतलं उफाळून येणारं पशुत्व, नीती-अनीतीतले द्वंद्व, स्मृती आणि काळाचा प्रवाहीपणा, या सार्‍या गदारोळात दृष्टी शाबूत राहिलेल्या व्यक्तीला दृष्टीचा डोळा पाहोन 'तव भीतरी पालटू झाला' सारखा येणारा अनुभव - ह्या सार्‍या बाबी या कादंबरीत येऊन जातात.

"Magical realism is not a realism to be transfigured by the supplement of a magical perspective, but a reality which is already in and of itself magical or fantastic." या न्यायाने या कादंबरीचा समावेश डिस्टोपियन कादंबर्‍यांसोबतच जादुई वास्तववादातही करायला हवा.

३. अमेरिकन पास्टरल - फिलिप रॉथ

ज्यांना या वर्षीचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे, अशा लेखकांच्या यादीत फिलिप रॉथ यांचं नाव गेली अनेक वर्षं येत राहिलं आहे. गेल्या वर्षी याच लेखकाचा 'गुडबाय, कोलंबस' हा संग्रह वाचला होता आणि तो आवडलाही होता. त्या पार्श्वभूमीवर 'अमेरिकन पास्टरल' या कादंबरीच्या सुरुवातीचा भाग अतिशय आवडला; पण काही पानांनंतर कादंबरी दुर्दैवाने चक्क रटाळ आणि तेच तेच मुद्दे पुन्हा उगाळणारी वाटू लागली.

न्यू जर्सीत स्थायिक झालेल्या ज्यू धर्मीय समाजाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या पिढ्यांची मुख्य प्रवाहात सामील व्हायची, दुसर्‍या महायुद्धाच्या काळातली धडपड आणि या संघर्षातलाही दोन पिढ्यांतला फरक - हे ढोबळमानाने दोन्ही पुस्तकांचं मुख्य सूत्र म्हणता येईल. 'अमेरिकन पास्टरल'मध्ये, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य असलं तरी शालेय पातळीवरही ज्यू धर्मीय विद्यार्थी मैदानी खेळात मागे आहेत असा सामुदायिक न्यूनगंड असणार्‍या वस्तीत चक्क अष्टपैलू ज्यू धर्मीय खेळाडू पैदा होतो. त्याचं आयुष्य दृष्ट लागावं असं जाणार, अशी चिन्हं त्याच्या मध्यमवयापर्यंत दिसतात. मात्र व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात टोकाची भूमिका घेणारी त्याची मुलगी या सार्‍याला सुरुंग लावते, असं हे - एका अर्थाने, तत्कालीन अमेरिकेचंच - कथानक.

एका व्यक्तीच्या जीवनातील पाच-सहा दशकांचा घेतलेला मागोवा (आणि पर्यायाने बदलत्या अमेरिकन समाजाचाही) यापूर्वी जॉन अपडाईकच्या 'रॅबिट' मालिकेत समर्थपणे येऊन गेला आहे. त्या तुलनेत 'अमेरिकन पास्टरल' बरीच थिटी पडते, हे वैयक्तिक मत.

४. केलब्स क्रॉसिंग - जेरल्डीन ब्रुक्स

स्थानिक लायब्ररी आणि पब्लिक रेडिओ स्टेशन हे दरवर्षी मिळून एक पुस्तक निवडतात. त्या वर्षी, मग त्या लेखकाची मुलाखत किंवा पुस्तकातल्या थीमवर आधारित काही कार्यक्रम अधूनमधून होत राहतात. १६६१ साली, Caleb Cheeshahteaumuck हा हार्वर्डमधून ग्रॅज्युएट झालेला पहिला नेटिव्ह अमेरिकन विद्यार्थी ठरला. त्याच्या आयुष्यावर बेतलेलं म्हणून या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती.

शीर्षक जरी केलबबद्दल असलं तरी पुस्तक मुख्यतः बेथिया नावाच्या काल्पनिक मुलीच्या दृष्टिकोनातून लिहिलं गेलं आहे. त्यामुळे लिहिण्याची शैली उत्तम असली आणि त्या काळची भाषा, भूगोल आणि इतर ऐतिहासिक गोष्टी अचूक पुस्तकात याव्यात यासाठी घेतलेली मेहनत सतत जाणवत राहिली तरीही जेत्यांची संस्कृती स्वीकारायची ठरवली तरीही प्रसंगी होणारी त्रिशंकू अवस्था; नव्यानेच स्थापन झालेल्या वसाहतींची ऑक्सफर्ड-केंब्रिजसारखे प्रतिष्ठित विद्यापीठ नावारूपाला आणण्याची स्थानिकांची धडपड आणि नव्या जगातही मर्यादित असणारे धार्मिक स्वातंत्र्य या गोष्टी म्हणाव्यात इतक्या ठळकपणाने पुस्तकात येत नाहीत. त्या आल्या असत्या तर एक उत्तम 'हिस्टॉरिकल फिक्शन' वाचायला मिळाले असते.

जेरल्डिन ब्रूक्स

हिची पीपल ऑफ द बुक आणि यिअर ऑफ वंडर्स ही दोन पुस्तके आधी वाचली आहेत. तिची पुस्तके खिळवून ठेवतात असा अनुभव आहे. मला यांतले पहिले पुस्तक दुसर्‍यापेक्षा बरेच जास्त आवडले आहे. आता 'केलब' वाचायला घेईन.

राधिका

नंदनशेठ, एक कडक सॅल्यूट

नंदनशेठ, एक कडक सॅल्यूट घ्यावा आमच्याकडून _/\_

तुर्ग्येनेव्ह सोडला तर अजून कोणीच माहिती नैत. अन त्याचेही नाव सोडून कैच ठाऊक नै. तो वाचावा लागणारच असे दिसतेय एकूण.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नंदन, ही चारही गेल्या ४-५

नंदन, ही चारही गेल्या ४-५ आठवड्यात वाचलेली?! तुला शि.सा.न!
बॅटमॅन, सारामागो चं हिस्टरी ऑफ द सीज ऑफ लिस्बन ही मस्त आहे - इतिहासात रुची असलेल्यांचं ते खास आवडतं आहे!

वा! तुम्ही म्हणता आहात तर ही

वा! तुम्ही म्हणता आहात तर ही कादंब्री वाचणे अवश्यमेव दिसतेय. धन्यवाद (स्माईल)

अखेरीस सापडले.

http://en.wikipedia.org/wiki/The_History_of_the_Siege_of_Lisbon

मी आधी history of the seas of lisbon असे सर्चवले पण दिसेना मग सारामागोचं नाव अ‍ॅडवून सर्चवलं. धन्स वन्स अगेन!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

व्हिएना

हपिसकृपेने सुदैवाने गेल्या महिन्यात बराच निवांत वेळ मिळाला, त्याचा परिणाम (स्माईल)
हिस्टरी ऑफ द सीज ऑफ लिस्बन आता वाचायच्या यादीत टाकले आहे. व्हिएनाच्या सीज/लढाईबद्दलही असं एखादं पुस्तक आहे का?

क्रॉसाँ

वियेना च्या सीज बद्दल ऐतिहासिक कादंबरी माहित नाही, पण आमचे एक सर मजेदार दंतकथा सांगायचे. हा किस्सा १५२९ च्या सीज बद्दल, आणि १६८३त झालेल्या ऑटोमन हल्ल्याबद्दलही सांगितला जातो - सुलेमान ची (अथवा मुस्तफाची) सेना वियेनाच्या दारावर येऊन उभी राहिल्यावर शहरातले लोख खूप घाबरले. त्याचे सांत्वन करून आपले जीव कसे वाचवावे याचा विचार करू लागले. तेव्हा शहरातल्या बेकर मंडळींना एक युक्ती सुचली. सुलेमान कट्टर मुसलमान आहे हे ध्यानात घेऊन त्यांनी त्याच्यासाठी एक खास चंद्रकोराच्या आकाराची पेस्ट्री तयार केली. सुलेमान ला ती पसंत पडून बेकरांचे जीव वाचले की नाही हे माहित नाही, पण ती पेस्ट्री शहरात चांगलीच गाजली. काही शतकानंतर, १७७०च्या दशकात वियेनात वाढलेल्या एका राजकन्येचे फ्रांसच्या राजाशी लग्न झाले, तेव्हा ती ही पेस्ट्री पॅरिस ला घेऊन आली. राजकन्येचे नाव - मरी आंंत्वानेत, आणि पेस्ट्री चे नाव? क्रॉसाँ!

पण क्रोसाँ पेस्ट्री कुठे

पण क्रोसाँ पेस्ट्री कुठे असते?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

फ्रेंच्मध्ये असते

फ्रेंचमध्ये Pâte म्हणजे पेस्ट. खाण्याच्या पदार्थांत जिथे जिथे पेस्टसारखं मिश्रण वापरलं जातं त्या पदार्थप्रकारांना त्यावरून pâtisserie म्हणतात. त्यामुळे Pâte à pain (ब्रेडसाठीची पात) Pâte à pizza (पिझ्झासाठीची...) वगैरे शब्दप्रकार आहेत. इंग्रजीत pâtisserieचं भाषांतर पेस्ट्री होतं, पण ते सहसा अगोड पदार्थांसाठी वापरलं जात नाही.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पॅनोप्ली

क्रॉसाँच्या शोधाचा किस्सा मजेदार आहे. दाराशी ठेपलेल्या शत्रूची मनधरणी करण्यासाठी, धर्मांतरासाठी आणि राजसत्तेच्या विरोधातल्या सामान्य जनतेच्या खाण्याचे प्रतीक म्हणून पावाच्या वेगवेगळ्या प्रकारांची इतिहासातली ही पॅनोप्ली रोचक आहे (स्माईल)

१. स्पॅनिशमध्ये pan = पाव

सह नौ भुनक्तु

रोचक माहिती.

इंग्रजीतील companion हा शब्ददेखिल लॅटीनातील a "एकत्र पाव खाणारे" यावरून आला आहे असे मानले जाते.

a) From Middle English companion, from Old French compaignon (“companion”), from Late Latin compāniōn- (nominative singular compāniō), from com- +‎ pānis

ही पॅनो१प्ली रोचक आहे

ही पॅनो१प्ली रोचक आहे

आईगं..... that is a very pain-ful pun! (डोळा मारत)

'अ‍ॅसेंट ऑफ मॅन' आणि निश्चिततेले धोके

अनेक वर्षांपूर्वी बीबीसीची 'अ‍ॅसेंट ऑफ मॅन' ही मालिका भारतात दाखवली जायची. जेकब ब्रॉनोव्स्की हा त्याचा लेखक / सादरकर्ता आणि ती मालिका कदाचित इथल्या काही वृद्धांना आठवत असेल. त्याविषयीची एक सणसणीत आठवण नुकतीच 'न्यू यॉर्क टाइम्स'मध्ये वाचली. विज्ञान आणि नैतिकता ह्या विषयांत रस असलेल्या कुणीही आवर्जून हा लेख वाचावा (आणि अखेरचा व्हिडिओसुद्धा पाहावा) अशी शिफारस.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जेकब ब्रोनौस्कीचा सैंटिस्ट अन

जेकब ब्रोनौस्कीचा सैंटिस्ट अन नैतिकतेवरचा कुठलासा लेख वाचला होता लै वर्षांपूर्वी. मस्त होता.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

जेकब ब्रोनौस्की

जेकब ब्रोनौस्की - वा वा वा. क्या बात है !!!

अ‍ॅसेंट ऑफ मॅन आठवले. व त्यावरून अ‍ॅसेंट ऑफ मनी पण आठवले.

नेम्स नोटेड युरॉनर.

नेम्स नोटेड युरॉनर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

A Bend in the Ganges -

A Bend in the Ganges - Manohar Malgonkar

काही पुस्तकं सहज हाताला लागतील अशी ठेवली जातात. परत परत वाचली जातात. त्यातलंच हे एक पुस्तक.

फाळणीच्या काळातलं कथानक आहे. ग्यान तलवार नावाचा गांधीवादी / अहिंसावादी तरूण परिस्थितीच्या बुक्क्यांमुळे कसा बदलत जातो याचं चित्रण आहे. टोकाचा आदर्शवाद आणि टोकाचा स्वार्थीपणा यात ग्यानची व्यक्तिरेखा हेलकावत रहाते.

ग्यानबरोबरच ही कथा देबीदयाल, त्याची बहीण सुंदरी आणि अंदमानचा जेलर असलेल्या मलिगनचीही आहे.

फाळणीवर अनेकांनी लिहिलं आहे - सदात हसन मंटो, गुलजार, भीष्म सहानी वगैरे चटकन आठवतात. माळगांवकरांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते फक्त गोष्ट सांगतात.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

चिं.त्र्यं. खानोलकर यांचे

चिं.त्र्यं. खानोलकर यांचे "रात्र काळी...घागर काळी" हे इथल्याच किंवा इतरत्र "सध्या काय वाचताय" स्वरूपाच्या धाग्यावर वाचून घेतलेले पुस्तक वाचतेय.

निम्मे वाचून झालेय आणि फारसे आवडले नाहीये.. पूर्ण करेन कदाचित - तसे फार मोठे नाही, पण दुसर्‍या कोणाला भेट देऊन कटवून टाकेन बहुदा कारण संग्रही ठेवण्याच्या लायकीचे वाटले नाही.

चिं.त्र्यं. खानोलकर यांचे हे मी वाचलेले पहिलेच पुस्तक(आणि कदाचित शेवटचेही ठरण्याची दाट शक्यता) पण मला ती शब्दबंबाळ शैली अजिबातच आवडली नाहीये.. "लसालसा धावत आली" वगैरे शब्द प्रयोग अगदी डोक्यात गेले. "लसालसा" जस्ट डजन्ट अ‍ॅट ऑल गो वेल विथ "धावणे" . उगाच लिहायची सुरसुरी आली म्हणून कुठलेही विशेषण कशालाही लावलेय असे निदान चार-पाच ठिकाणी वाटले.

शिवाय पात्रे जे काय वागतात त्याच्या मागे कोणतेही पटू शकेल असे प्रसंग किंवा कारण दिसत नाही. आणि "आजूबाजूचे कोणत्याही वयाचे झाडून सगळे पुरूष पाहताच वेडे होतात इतकी सुंदर स्त्री" ही कल्पनाच मला पटत नाही (आणि पूर्ण कथा याच कल्पनेभोवती फिरते). प्रत्येक व्यक्तीच्या (बायका किंवा पुरूष) स्वतःच्या सौंदर्याच्या व्याख्या असतात त्याप्रमाणे त्यांना कोणीतरी अतीव सुंदर वाटते, कोणी ठिकठाक आहे इतपतच वाटू शकते. "सर्वांनाच" भान विसरायला वगैरे लावू शकेल असं कोणी काही मला आजवर दिसलेले नाही.

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

+/-

ते मीही वाचलेय. लक्ष्मीच्या सौंदर्याला आणि स्त्रीत्वाला न्याय कधीच मिळत नाही. सगळ्यांचा या ना त्या प्रकारे केएलपीडी होतो. बाकी वर्णने टिपिकल अंगावर येणारी आहेत. लक्ष्मीला तिच्या तोडीचा कोणीच कधीच मिळत नाही इतपत कळाले. लसालसा बद्दल सहमत. एकूण या कादंबर्‍या म्हणजे निगुतीने केलेल्या खिरीत पडलेल्या पालीचे वर्णन करावे तशा वाटतात काहीवेळेस. पण वर्णनशैलीत दम असतो खरा.

पण इतकेही प्रतिकूल मत करून घ्यायचे कारण नाही. चानी आणि कोंडुरा वाचा. जबराट प्रकार आहे.

अतिअवांतरः अनझेपेबल स्त्रिया अन पानीकम पुरुष हा फंडा शक्यतोवर देशावरल्या कादंबर्‍यांत दिसत नाही. इथे मात्र दिसतो. चूभूदेघे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अनझेपेबल स्त्रिया अन पानीकम

अनझेपेबल स्त्रिया अन पानीकम पुरुष

अगदी पर्फेक्ट निरीक्षण!

गारंबीचा बापू आणि तुंबाडचे खोत ही दुसरी उदाहरणं. किरण करमरकरांच्या "रावण अ‍ॅण्ड एडी" मध्ये पण बहुदा अशी पात्रं आहेत.

रच्याकने: "रावण अ‍ॅण्ड एडी"चा दुसरा भाग कोणी वाचला आहे का? बरा आहे का? (पहिला भाग आवडल्यावर सीक्वल वाचायची एक भीती वाटते, त्यातला प्रकार...)

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

नगरकर

किरण करमरकरांच्या "रावण अ‍ॅण्ड एडी" मध्ये पण बहुदा अशी पात्रं आहेत.

किरण नगरकर. (स्माईल)

दुसर्‍या भागाचं नाव काय आहे?

नगरकर नगरकर ... शंभरदा लिहितो

नगरकर नगरकर ... शंभरदा लिहितो च्यायला. इतकी बावळट चूक झाल्याबद्दल लाज वाटते आहे.

सीक्वलचं नाव "द एक्स्ट्राज". रावण आणि एडी बॉलिवूडमध्ये एक्स्ट्रा नट होतात अशी काहीतरी कथा आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

होतं असं. सैबेरिया - सर्बिया.

होतं असं. सैबेरिया - सर्बिया. Sad

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अच्छा.

माझं फक्त सात सक्कं वाचून झालंय. रावण आणि ककल्ड केव्हाचे धूळ खात पडलेले आहेत.

"तुंबाडचे खोत" मध्ये थोडे फार

"तुंबाडचे खोत" मध्ये थोडे फार असेल पण त्यामध्ये सगळी गोष्ट वाहून गेली नाहीये. सामान्य पात्रे पण आहेत आणि कथा मुळात पकड घेणारी आहे.

पण श्री.ना.पेंडसेंची बरीच पुस्तके लागोपाठ वाचल्यानंतर त्यातला हा समान धागा मला पण जरा जास्त जाणवला आणि मग पुढे त्यांची अजून पुस्तके वाचण्याची उत्सुकता कमी होत गेली. पण सुरूवातीला वाचून जी आवडली ती आवडतीच राहिली, तुंबाडचे खोत हे त्यापैकी एक!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

गारंबी राहिलंय वाचायचं. रावण

गारंबी राहिलंय वाचायचं.

रावण अँड एडी कसंय?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

कथा म्हणून बघायला गेलं तर

कथा म्हणून बघायला गेलं तर रावण अँड एडी तसं साधंच आहे. पण नगरकरांची शैली सलाम घेऊन जाते. लहान मुलाने दारामागून "भोss" करावं आणि मोठ्या माणसानेही क्षणभर दचकावं अशी काहीशी शैली आहे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ऐला...शैलीचे हे वर्णन आवडले.

ऐला...शैलीचे हे वर्णन आवडले. अवश्य वाचल्या जाईल!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

किरण नगरकर यांच्याबद्दल

किरण नगरकर यांच्याबद्दल प्रचंड ऐकुन आहे. भन्नाट माणूस (असं ऐकुन आहे).

"केएलपीडी" म्हन्जे काय? हमने

"केएलपीडी" म्हन्जे काय?

हमने फर्स्ट टाईम सुन्या!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वाच्यार्थ

वाच्यार्थ राहूद्या.

गर्भितार्थ असा की आतुर इच्छा पुरी होत नाही. वाच्यार्थाशी अंमळ फारकत आहे खरी इथे. पण असो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सांग ना

वाच्यार्थ राहूद्या.

ए सांग नं रे!!

ए नको नं रे!!

ए नको नं रे!!

आजिबात अवांतर नै: या निळोबासाठी 'हल्कत' श्रेणी शेप्रेट सुरू केली पाहिजे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

"केएलपीडी" म्हन्जे काय?

"केएलपीडी" म्हन्जे काय?

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

अर्थाजीराव तुम्ही वेड पांघरून

हा अर्थाजी एक नंबरचा हल्कत आहे (लोळून हसत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

असं काय करता गडे… सांगा नं..

असं काय करता गडे…
सांगा नं..

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

असं काय करता गडे… सांगा नं..

असं काय करता गडे…
सांगा नं..

गडे वगैरे शब्द वाक्यात योग्य क्रमाने वापरल्याबद्दल तुम्हाला एक्स्टॉ प्वाईंट. नाहीतर अनर्थ झाला असता. आधीच बिचारे लाजाळू ब्याटू शब्दार्थ न सांगता-सांगता घायकुतीला आले आहेत, त्यात आणखी ही भर नको.

ठीके गडे. K केवल L लालसा P

ठीके गडे.

K केवल
L लालसा
P पर
D धोका (डोळा मारत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

माहीतीपूर्ण ष्रेणी(!!) दिलेली

माहीतीपूर्ण ष्रेणी(!!) दिलेली आहे, पण ही माहीती चुकीची आहे हे नम्रपणे (कारण आज अपुन विनम्र है) नमूद करतो.

निव्वळ शब्दानुगामित्व दाखवले

निव्वळ शब्दानुगामित्व दाखवले तरी उत्तरार्ध आहे तस्सा आहे यात दुमत नसावे.

तदुपरि पूर्वार्धही अर्थानुगामित्व दाखवल्यास तोच आहे.

इतके असूनही आमचे कौतुक राहोच, वर चुकीची माहिती देण्याचा आरोप करणार्‍या दूष्ट मन्द्याचा धि:कार असो!!!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

धि:कार केल्याबद्दल बुभुक्कार

धि:कार केल्याबद्दल बुभुक्कार करून निषेध केलेला आहे. अर्थानुगामित्व पहाता हा फरक एअरबस आणि यष्टी बस इतका आहे.

अर्थानुगामित्व हे जेनेरिक

अर्थानुगामित्व हे जेनेरिक टायपापुरते मर्यादित असले तरी परिप्रेक्ष्यानुगामित्व दाखविल्यास विशिष्टार्थ स्वयंस्पष्ट व्हावयास काही प्रत्यवाय नव्हता.

पण बुभु:कार या शब्दाबद्दल शेप्रेट टाळ्या. लै दिवसांनी हा शब्द ऐकला. रादर, रामदासांचे चरित्र सोडल्यास कुठे फारसा ऐकलाच नाही म्हटले तरी चालेल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अर्थानुगामित्व,

अर्थानुगामित्व, परिप्रेक्ष्यानुगामित्व वगैरे डोक्याच्या २ फूट वरून गेले आहे. (आमचे संस्कृत पासिंग पुरतेच!)

बुभु:कार या शब्दाबद्दल शेप्रेट टाळ्या.

शमत!

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

अर्थानुगामी=निव्वळ अर्थ

अर्थानुगामी=निव्वळ अर्थ पाहणे.

परिप्रेक्ष्यानुगामी=संदर्भ,काँटेक्स्ट, इ. पाहणे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आमचा आणखी एक प्रयत्न

आमचा आणखी एक प्रयत्न. "खास लम्हें पर धोखा"

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

वाह!!!! धन्य ते मुसु आणि धन्य

वाह!!!! धन्य ते मुसु आणि धन्य त्यांची मुसमुसती प्रतिभा. (डोळा मारत) मान गये हेवेसांनल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

काही अन्य संदर्भ

येथे "मॉन्सून वेडींग" वर झालेली चर्चा पहा. त्यात हा संदर्भ आलेला आहे.

http://www.echarcha.com/forum/showthread.php?t=7227

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बिट्रेयल ऑफ द.........बापरे,

बिट्रेयल ऑफ द.........बापरे, काय क्रिएटिव्हिटी आहे!!!!! हॅट्स ऑफ _/\_

त्यासोबतच दिसणारे प्रथम सदस्यनामदेखील काळजाला भिडले. जुन्या आठवणींनी डोळे पाणावले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

:)

(स्माईल)

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एकतर लोकांना न समजणारे शब्द

एकतर लोकांना न समजणारे शब्द वापरायचे, पुढे वाच्यार्थ, गर्भितार्थ वगैरेंच्या जंगलातून फिरवायचं. ज्ञान लपवून नका ठेऊ बॅटमॅन भाऊ...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तुमच्यासकट

सगळे एक नंबरचे हल्कत आहेत!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

गुस्ताखी

हा प्रश्न विचारण्यासाठी हा धागा तितकासा योग्य नाही पण गुस्ताखी करतोच ...

http://indianexpress.com/article/opinion/columns/national-interest-war-a...

ह्यात Eagles Over Bangladesh : The Indian Air Force in the 1971 Liberation War ह्या पुस्तकाचा जिक्र केलेला आहे. लेखक - by P V S Jagan Mohan , Samir Chopra

हे पुस्तक किंवा ह्या लेखकांचे दुसरे पुस्तक - The India-Pakistan Air War of 1965 - कुणी वाचलियेत का ?

नायन्टीन एटीफोर

बरेच दिवसांपासून वाचायची ठरवलेली ऑरवेलची "१९८४" कादंबरी शेवटी वाचली...
कादंबर्‍या वाचायचं वय निघून गेल्याची परत जाणीव झाली.
यात कादंबरीचा दोष नाही (कसा असेल म्हणा!)
असो,
साम्यवादी क्रांती होउन त्याच विचारसरणीचे सरकार झालेल्या "ओशनिया" या देषातल्या एका नागरीकाची ही गोष्ट आहे. मानवमुक्तीचे तत्वज्ञान सांगणारी विचारसरणीच शोषणासाठी कशी वापरली जाऊ शकते याचं कादंबरी मध्ये वर्णन आहे. कादंबरी वर्णनावरून वाटते त्याप्रमाणे काही प्रमाणात रुपकात्मक आहे. शीतयुद्ध कालीन घडामोडींशी जुळणारी वर्णने पाहून ऑरवेलच्या दूरदृष्टीचं कौतुक वाटतं (कारण ऑर्वेलचं १९५० मध्येच निधन झालं).
परंतू तत्वतः कोणत्याही व्यवस्थेचा शोषणासाठी वापर करता येऊ शकतो, असा विचार वाचून झाल्यावर मनात येत राहतो (स्नोडेन, असांजे वगैरे आहेतच पुराव्या दाखल).

अवांतर : "बिग ब्रदर इज वॉचिंग यू" हा वाक्-प्रचार याच कादंबरीवरून आलेला आहे

आल्डस हक्स्लीची द ब्रेव्ह

आल्डस हक्स्लीची द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड जास्त रिलेवंट वाटेल कदाचित आजच्या काळात.

Hope is NOT a plan!

वाचली

आजच वाचली, आवडली
सुचवणी बद्दल थँक्यू !

शंकर शर्मा यांचा लेख

बिझनेस स्टँडर्ड वर्तमानपत्रात शंकर शर्मा यांचा एक रोचक लेख वाचला. (http://www.business-standard.com/article/economy-policy/2014-the-year-of...)
भारतीय अर्थविषयक वर्तमानपत्रे व इतर माध्यमांमध्ये शंकर शर्मा ही व्यक्ती नेहमी वादग्रस्त विधाने (व वर्तणूक) करण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय व जागतिक अर्थव्यवस्थेबाबत उलटसुलट विधाने करण्यात या व्यक्तीचा हात कोणी धरणार नाही. मनमोहन सिंग सरकारवर सर्वत्र टीका होत असताना या व्यक्तीने या सरकारची स्तुती केली आहे. उदा. या लेखातील खालील विधाने विशेष रोचक वाटली.

0. I see plenty of political chaos before any stability, which is a tragedy, given that India has handled the Great Recession the best of any economy, growing solidly at 7.1% since 2008, with declining debt/GDP, little sovereign debt, and sharply lower poverty and higher rural incomes. No country comes even close. I blame our slowing growth squarely on the RBI’s 3 year experiment with rate increases which have killed growth but have done nothing to inflation, because rates and consumer inflation in Indiahave almost no linkage.

No government in India’s history as ever delivered so much to so many. The data is unequivocal. And we want to boot out this government. This is what an under-analysed, over-simplified perspective results in.

1. The UPA has let courts, the CBI, the CAG become too independent, and hence deserves to suffer.

2. Markets, though, have a different problem: they have fallen in love with an under-analysed, over-simplified perspective, which posits that a Modi-led government is the magic bullet that India needs.
But serious analysts should ask serious questions: Can a majority-CM be an effective Coalition-PM?

3. Why has there been no services sector boom in Gujarat (IT, E-commerce, Software, Finance: precisely the sectors where youth expect employment generation), and why is its growth totally dependent on smokestack polluting industries (where the youth don’t want to go) like chemicals, dyes, refining, ship-breaking (Services are just 45% of Gujarat’s GSDP as compared to the 62%+ for India and other major states), with almost the entire growth coming from Refining ? Why have no new-gen manufacturing like automobiles gone to Gujarat, (save for labor-unrest driven Nano and Maruti plants, of very recent vintage) and instead have chosen Haryana, Tamil Nadu, Maharashtraas their homes?

यु पी ए सरकारांनी केलेले

यु पी ए सरकारांनी केलेले दारेद्र्य निर्मूलनाचे काम भारताच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. इतके कि तिसर्‍यांदा निवडून द्यावे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

उत्सुक

त्यांनी नक्की दारिद्र्य निर्मूलन केले म्हणजे काय केले हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
कोणत्या योजनांमुळे साध्य झाले?
त्याची अंमलबजावणी योग्य होइल अशी त्यांनी खबरदारी कशी घेतली, वगैरे बद्दल तपशील दिलेत तर बरे होइल.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रोचक! यावर गब्बर सिंग व अन्य

रोचक!
यावर गब्बर सिंग व अन्य माहितगारांची मते वाचायला आवडतील!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

शंकर शर्मा ही व्यक्ती निश्चितच विश्वासार्ह नाही. (उदा. http://www.dalalstreet.biz/investor/2008/02/shankar-sharma-global-chamel...)

मात्र त्या लेखातील मुद्द्यांची पडताळणी किंवा प्रतिवाद अर्थकारणातील जाणकारांपैकी कोणीतरी करावा असे नक्कीच वाटते.

कलाभान - अभिजीत ताम्हणे

'लोकसत्ता'मध्ये गेलं वर्षभर येणारं अभिजीत ताम्हणे ह्यांचं सदर 'कलाभान' आता संपलं आहे. त्याचा शेवटचा भाग आज प्रकाशित झाला. तो इथे वाचता येईल. सदराला कितपत वाचक लाभले, कुणाला काय आणि किती कळलं वगैरेंबद्दल मी सांगू शकणार नाही. पण माझ्या मते ते गेल्या वर्षातलं एक महत्त्वाचं सदर होतं. त्याची कारणं थोडक्यात सांगायची झाली तर -

मराठीतलं कलाविषयक वृत्तपत्रीय लिखाण हे मुख्यतः माहितीवजा असतं. थोडं लिखाण समीक्षात्मक असतं. आणि पुष्कळदा फक्त कोणत्या लिलावात कोणतं चित्र कितीला विकलं गेलं किंवा कुठलं चित्र चोरीला गेलं वगैरेंबद्दल बातम्या असतात. ह्या सदरानं हे सगळं टाळलं. अनेकदा कलेचं बाजारीकरण हे तुच्छतापूर्ण दृष्टीतून पाहिलं जातं. ह्या सदरानं हेसुद्धा टाळलं. त्याऐवजी त्या बाजारीकरणातून नक्की काय कलात्मक/अकलात्मक घडतं आहे ह्याविषयी त्यात भाष्य केलं गेलं. मराठी (किंवा एकंदर) कलारसिकाला पडणारे काही कळीचे प्रश्न त्यात मांडले गेले. उदाहरणार्थ, कलाकृतीला कसं अप्रोच व्हावं? कलाकृतीत सामाजिक आशयाला कितपत स्थान असावं, वगैरे. त्यांची काही प्रमाणात उत्तरं देण्याचाही प्रयत्न झाला, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रश्नांकडे थोड्या वेगळ्या नजरेनं पाहता येतं ह्याची जाणीव व्हावी इतपत मांडणी त्यात केली गेली. त्यासाठी अनेक समकालीन कलाकारांचे आणि त्यांच्या कलाकृतींचे संदर्भ घेतले गेले. कलेच्या क्षेत्रात सध्या नवीन किंवा वेगळं काय घडतं आहे ह्याविषयीही वाचकाला त्यातून काही तरी कळत गेलं असेल अशी आशा आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्काइव्ह?

मागील लेख वाचण्याची काही सुविधा आहे का? किंवा इतरत्र उपलब्ध आहेत का?

हा प्रश्न डोक्यात आला म्हणून शोध घेता ही लिंक सापडली. इतर कोणास उपयोगी पडेल म्हणून हा प्रतिसाद.

+१ सदर महत्त्वाचं आहेच

+१
सदर महत्त्वाचं आहेच माझ्यासारख्याला बरीच नवी माहिती देणारं सदर आहे.
या लेखमालिके मुळे कलाभान आलं की नाही माहिती नाही पण ते यावं अशी इच्छा दृढ झाली हे ही नसे थोडके

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'लोकरहाटी' पुस्तक प्रकाशन

मुकुंद कुळे लिखित 'लोकरहाटी' ह्या पुस्तकाचं प्रकाशन उद्या विद्या बाळ ह्यांच्या हस्ते पुण्यात होणार आहे. डॉ. सदानंद मोरे प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोणी-धामणी गावच्या महिला जात्यावरच्या ओव्या सादर करणार आहेत.
स्थळ : भारत इतिहास संशोधन मंडळ, भरत नाट्य मंदिराशेजारी, सदाशिव पेठ.
शनिवार २८ डिसेंबर संध्याकाळी ५:३० वा.
पुस्तकाविषयी 'सकाळ'मधून उद्धृत -

गावाकडचं वातावरण, तिथल्या चाली-रीती, कृषी संस्कृती हे चित्र आता तसं दुर्मिळच म्हणायचं. शहरीकरणाच्या रेट्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वेगात गावांची झपाट्यानं शहरं बनत आहेत. असं असलं तरी सगळंच काही अगदी मोडीत निघालं आहे, असं नाही. दूरची खेडी अजूनही आपलं गावपण जपून आहेत. असंच गावपण टिपणारं "लोकरहाटी' हे पुस्तक प्रकाशित होत आहे येत्या 28 डिसेंबरला. पत्रकार मुकुंद कुळे यांचं हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. पत्रकारितेच्या निमित्तानं राज्यभर फिरताना कुळे यांना जी खेडी आणि तिथली जीवनपद्धती पाहता आली, त्याचं चित्रण या पुस्तकात असेल. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची प्रदीर्घ प्रस्तावना या पुस्तकाला आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रिपोर्टिंग चे दिवस - अनिल अवचट

अवचटांच्या मी आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी हे सर्वात आवडले. त्यांचे साधारण ७० च्या दशकातील लेख एकत्र करून छापलेले आहे. लेख वाचल्यावर असे वाटते की बहुतांश "होते तसेच" छापले असावेत. कारण शैली एकदम वेगळी आहे. आणि कोठेही "पॉलिटिकली करेक्ट" केलेले नाही. तेव्हा जे दिसले तसेच छापलेले आहे. "इंदिराबाईचा फेरा" हा इंदिरा गांधींच्या पुणे भेटीवर, त्याआधी व नंतर घडलेल्या गोष्टींवर लेख सर्वात जमलेला आहे. इतरही सगळे लेख आवडले. राजकीय घटनांवरचे सूक्ष्म निरीक्षण व त्यावरची मजेदार टिप्पणी वाचताना आपण पुलं तर वाचत नाहीना असे वाटते. "शिष्टमंडळ मूळ मोर्चापेक्षाही मोठे होते" सारखी वाक्ये धमाल आहेत.

१००% रेकमेण्डेशन.

थिंकिंग स्लो and फास्ट

थिंकिंग स्लो and फास्ट हे पुस्तक वाचते आहे. आजूबाजूचे लहान लहान घटक आपल्या विचारांवर कसे परिणाम करतात याची काही उदाहरणे व अनॅलिसिस आतापर्यंतच्या वाचनात आला. एकंदर लेखकाने पहिल्या भागता हे मांडले आहे की - एक विचारप्रणाली "ऑटोपायलट" वर असते तर दूसरी "प्रयत्नशील /तार्किक/ कॉन्शस " मोड़ वर असते. या प्रनाल्या एकमेकींवर कशा परिणाम करतात व कशा एकत्र नांदतात.
(१) तरुण मुलांच्या एका ग्रुपला "म्हातारया माणसांशी/ वृद्धत्वाशी निगडीत" ५ वाकये बोलायला सांगितली, नंतर त्याना कुठेतरी घेऊन गेले. तेव्हा या मुलांचा चालण्याचा वेगा मन्दावल्याचे लक्षात आले.
(२) हाच प्रयोग पैशाशी संबंधित केला असता अन्य ग्रुप अधिक स्वावलम्बी, इतरांशी फटकुना वागणारा व इतराना कमी मदत करणारा झालेला आढळला.
(३) दातात आडवी पेन्सिल धरलेल्या एका ग्रुपला व ओठांचा चंबू करुनं पेन्सिल धरलेल्या दुसर्या ग्रुपला कार्टून दाखवली ज्या ग्रुपने पेन्सिल आडवी धराली होती (हसरा चेहरा) त्याना कार्टून अधिक विनोदी वाटली. दुसर्या ग्रुपला (अठ्याळ चेहरा) कार्टून कमी आवडली.

६०-७० पाने वाचून झाली आहेत. पुस्तक रोचक वाटते आहे.

काह्नेमन मस्त माणूस आहे. ह्या

काह्नेमन मस्त माणूस आहे. ह्या पुस्तकाची ऑडिओ ऐकलेली आहे.

कल्पक

ह्या उचापत्या कल्पक वाटताहेत

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाओमी क्लाईनचे The Shock

नाओमी क्लाईनचे The Shock Doctrine वाचायला घेतले आहे.
मानसिक धक्क्याच्या तंत्राचा उगम व त्याचा वापर करून शिकागो स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (म्हणजे मुख्यतः मिल्टन फ्रीडमन) व त्यांच्या शिकागो बॉईजनी "फ्री मार्केट"च्या संकल्पना राबवण्यासाठी साऊथ अमेरिकेपासून इंडोनेशियापर्यंत कायकाय उपद्व्याप केले त्याबद्दल पहिल्या एक-दोन प्रकरणात वाचले.
धक्कादायक विपदांचा फायदा घेऊन "नवनिर्मिती" करणारा "डिझॅस्टर कॅपिटॅलिझम" व तशी परिस्थिती आल्यावर (वा आणल्यावर) उगवून याव्यात म्हणून इतर वेळी या मुक्त बाजाराच्या कल्पनांची बीजे इतस्ततः टाकत राहणारे अर्थतज्ज्ञ यांचा इतिहास रोमांचक असेल अशी खात्री आहे.

Hope is NOT a plan!

The books looks like a bit on

The books looks like a bit on the line of 'confession of an economic hitman'.It would be intersting to know how tthe auhor has connected the text to fridman. Do write about it once you complete the book..

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

Calling him an economic

Calling him an economic hitman will be a gross overestimation of his capabilities.
All he did was provide an academic facade to the big corporations' interests.
Having said that, his awareness of and involvement in the so called "counter-revolution" is frequently highlighted in the book.
I am not sure I want to write about it.

Hope is NOT a plan!

आपल्या प्रतीक्रीयाबाबत काही

आपल्या प्रतीक्रीयाबाबत काही शंका.
मला आपला प्रतिसाद नीटसा कळला नाही. आपण 'Confession of an economic hitman' बद्दल बोलत आहात की सध्या वाचत असलेल्या पुस्ताकासंधर्भात ?

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

मी The Shock Doctrine बद्दल

मी The Shock Doctrine बद्दल लिहीले आहे.
पुस्तकाची ओळख व पहिली दोन-तीन प्रकरणे वाचून असं वाटते की मिल्टन फ्रीडमन यांनी "फ्री मार्केट"च्या तत्वांच्या प्रसारासाठी स्वत: प्रयत्न केले असावेत पण पुढेपुढे वाचताना कळत जाते की त्यांनी फक्त मल्टीनॅशनल काॅर्पोरेशन्ससाठी सोयीस्कर असलेले तत्वज्ञान मांडले आणि त्याचा पुरस्कार आपल्या फायद्यासाठी इकॉनॉमिक शॉक ट्रीटमेंटच्या माध्यमातून काॅर्पोरेशन्स व त्यांचे एजंट म्हणून काम करणार्‍या काही अमेरिकन राजकारण्यांनी केला आणि करत आहेत.
अर्थात चिले व इतर दक्षिण अमेरिकन हुकूमशाह्यांची आर्थिक धोरणे ठरवण्यात मिल्टन यांचा सक्रिय सहभागही होताच.
कॅपिटॅलिजम=डेमॉक्रसी या प्रचलित समजुतीला हा इतिहास वाचून धक्का बसतो.
यावरची डॉक्युमेंटरी यू ट्यूबवर उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=7iW1SHPgUAQ

Hope is NOT a plan!

नेओमि क्लाईन यांच्या

नेओमि क्लाईन यांच्या पुस्तकांबद्दल लिहायचे तर किमान दहा धागे काढावे लागतील.

पण हे दुवे पहा -

१) http://cafehayek.com/2007/12/shocking.html

२) http://cafehayek.com/2007/09/shcoked.html

-----

की त्यांनी फक्त मल्टीनॅशनल काॅर्पोरेशन्ससाठी सोयीस्कर असलेले तत्वज्ञान मांडले आणि त्याचा पुरस्कार आपल्या फायद्यासाठी इकॉनॉमिक शॉक ट्रीटमेंटच्या माध्यमातून काॅर्पोरेशन्स व त्यांचे एजंट म्हणून काम करणार्‍या काही अमेरिकन राजकारण्यांनी केला आणि करत आहेत.

चिंताजनक वाक्य.

फ्रिडमन यांची अनेक योगदानं आहेत अर्थशास्त्रात. त्यांना अर्थशास्त्र्यांचे अर्थशास्त्री म्हणतात. माझ्यासाठी तर प्रचंड आदरणीय आहेत ते.

पण त्यांच्या पर्मनंट इन्कम हायपोथिसिस बद्दल वाचलेत तर लक्षात येईल की ते त्यांचे एक उच्च योगदान तर आहेच पण ते सामान्य व्यक्तीचा खर्चाबद्दलचा (consumption) दृष्टीकोन मांडतात. त्यांना दिले गेलेले नोबेल हे मुख्यत्वे consumption analysis साठीच होते. व हा दृष्टीकोन सामान्य व्यक्तीच्या consumption analysis चा होता. कॉर्पोरेशन चा नव्हता.

त्यांनी जी मते मांडली त्याला तत्वज्ञान म्हणणे हे उचित नाही असा माझा दावा आहे. फ्री मार्केट हे अँटि-तत्वज्ञान आहे असा माझा दावा आहे.

त्यांचे - टियर्नी ऑफ स्टेटस क्वो - हे पुस्तक आणखी एक पुरावा आहे की त्यांनी ( मल्टीनॅशनल) कॉर्पोरेशन चे हितसंबंध जपायचा यत्न केला नाही याचा.

------

खरंतर त्यांच्यावर हा जो आरोप झालाय - की त्यांनी मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन चे हितसंबंध जपायचा यत्न केला - हा माझ्या मते प्रचंड खोटा असला तरी ....

मला असे वाटते की - मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन चे हितसंबंध जपायचा यत्न करणे हे - अनिष्ट आहे असा समज उगीचच पसरवण्यात आलेला आहे.

एक पै ही इन्कम टॅक्स न भरणार्‍या कामगार युनियन्स व सबसिड्यांना हपापलेल्या शेतकर्‍यांचे हितसंबंध जपायचा प्रयत्न करण्यापेक्षा - मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन चे हितसंबंध जपायचा यत्न करणे केव्हाही बरे.

बारीक सुधारणा आणि इतर

त्यांना दिले गेलेले नोबेल हे मुख्यत्वे consumption analysis साठी होते.

माझ्या माहितीप्रमाणे consumption analysis हे फ्रिडमन यांच्या अनेक संशोधन प्रकल्पांपैकी एक आहे. फक्त त्यामुळे पारितोषिक मिळाले असे नसावे. समकालिन समस्यांवर काही महत्त्वपूर्ण योगदान असल्यास त्याचा नोबेल कमिटीच्या निर्णयावर जास्त प्रभाव जाणवतो. ६०-७०च्या दशकातील चलनवाढ केनेशियन विश्लेषण वापरून समजावून घेता आली नाही. फ्रिडमन आणि अ‍ॅना श्वार्ट्झ यांच्या 'A Monetary History of the United States,1867 - 1960' या पुस्तकाने मॉनेटरी पॉलिसीचे अनन्यसाधारण महत्त्व दाखवून दिलेले होते. चलनवाढ ही मूख्यतः पैशांच्या पुरवठ्याशी संबंधित असल्याचे नेमकेपणाने दाखवून दिल्याने १९७६ मध्ये फ्रिडमन यांना नोबेल मिळाले असावे. पारितोषिकाची घोषणा करणार्‍या प्रेस रिलिजमधूनः for his achievements in the fields of consumption analysis, monetary history and theory, and for his demonstration of the complexity of stabilization policy. या रिलिजमध्येच खाली From the purely scientific point of view, त्यांचे consumption analysis हे सर्वात महत्त्वाचे काम आहे असा उल्लेख आहे पण पारितोषिकाबाबत तो प्राथमिक महत्त्वाचा मुद्दा असल्याचा उल्लेख नाही.

मिल्टन फ्रिडमन यांच्याबद्दल आदर असूनही 'खाजगी व्यावसायिकांचे हस्तक' वगैरे वाचून मला फारसे वाईट वाटले नाही. अर्थशास्त्रिय धोरणांचे लोकांच्या जीवनावर अधिक दृष्यपणे परिणाम होतात. तेव्हा लोकांची वैयक्तिक निरीक्षणांवर आधारीत अनेक मते असणे नैसर्गिकच आहे. विज्ञानही लोकांच्या वैयक्तिक निरीक्षणांना/पूर्वग्रहांना पूर्णपणे दूर करू शकत नाही. अर्थशास्त्र तर बोलून-चालून लोकांच्या रोजच्या जीवनातल्या व्यवहारांवर भाष्य करते. तेव्हा धोरणांविषयी, धोरणामागे असलेल्या लोकांविषयी चीड-चीड होणारच. पण वारंवार कुठल्यातरी कॉन्स्पिरसी थियरीजला बळी पडून चूकीचे आर्थिक निर्णय घेणार्‍या लोकांविषयी वाईट वाटते.

अगदी. झकास. बरोब्बर पकडलंत

अगदी.

झकास. बरोब्बर पकडलंत मला.

बाकी "A Monetary History of the United States " वाचायचा यत्न केला होता मागे ... पण भलतंच जड आहे ते प्रकरण.

फ्रीडमन यांच्याबद्दल वैयक्तिक

फ्रीडमन यांच्याबद्दल वैयक्तिक काहीही मत नाही. पुस्तकात जे आहे ते मी सांगितले.
लेखिकेचा वैयक्तिक आकस असू शकतो.
बाकी ओबामाना शांततेचे नोबेल मिळाले म्हणून ते सीरियावर बॉम्ब टाकत नाहीत असे नाही.

-------
कॉर्पोरेशन्स अस्तित्वात यायच्या आधीपासून ज्या जमिनीवर लो़क राहतात, ज्या स्रोतांवर ते जगतात ते काहीही किंमत न देता घेणार्‍या कॉर्पोरेशन्सना इतरांना फुकटे म्हणायचा काय अधिकार आहे असा मला प्रश्न पडतो.
शिवाय कॉर्पोरेशन्सनी एक्स्टर्नलाईझ केलेली कॉस्ट हेच लोक सहन करतात त्यामुळे ते मुळात फुकटे नसतातच.
हे स्रोत मिळवताना व स्वतःच्या मालकीहक्काचे रक्षण करताना मात्र या कॉर्पोरेशन्सना कशी सरकारची मदत लागते?
फ्री मार्केटमध्ये तथाकथित गरीब व फुकट्या लोकांकडून प्रचंड मागणी असलेली सरकार ही एक सेवा नाही काय?

पर्मनंट इनकम हायपोथिसीस हे ठराविक अ‍ॅझम्प्शन्स पाळणार्‍या मॉडर्न इकॉनॉमिक सिस्टीममधे राहणार्‍या एका होमो इकॉनॉमिकसच्या वैयक्तिक पातळीवर अचूक असले तरी संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक पातळीवर हे हायपोथिसीस फेल होते.
असो.

Hope is NOT a plan!

बाकी ओबामाना शांततेचे नोबेल

बाकी ओबामाना शांततेचे नोबेल मिळाले म्हणून ते सीरियावर बॉम्ब टाकत नाहीत असे नाही.

मस्त मुद्दा.

परंतु हा माझ्या मुद्द्याचा प्रतिवाद नाही.

कारण नोबेल मिळाले म्हंजे ती व्यक्ती न्याय्य वागते असा माझा मुद्दा नाहीच मुळी.

माझा मुद्दा हा होता की - The most important and most cited contribution (for which he was rewarded with a Nobel) of Dr. Friedman is NOT about presenting/safeguarding the Multinational corporation's interests. It actualy presents Individual's interest/viewpoint.

आणखी - फ्रीडमन हे अर्थशास्त्री होते ... And even if he is presenting the viewpoint of a corporation ... he is merely doing his job. MicroEconomics is the economic analysis of individiuals and firms (startup/grown-up/corporations). व फ्रिडमन हे मायक्रो व मॅक्रो या दोन्ही क्षेत्रात काम करणारे होते. Is Ms. Klein accusing Dr. Friedman of doing his job ?

--------

कॉर्पोरेशन्स अस्तित्वात यायच्या आधीपासून ज्या जमिनीवर लो़क राहतात, ज्या स्रोतांवर ते जगतात ते काहीही किंमत न देता घेणार्‍या कॉर्पोरेशन्सना इतरांना फुकटे म्हणायचा काय अधिकार आहे असा मला प्रश्न पडतो.

कॉर्पोरेशन्स स्थानिकांचे स्त्रोत हिरावून घेतात हे अर्धसत्य सुद्धा आहे की नाहे याबद्दल मला शंका आहे. थोडे डिटेल्स द्या की नेमके तुम्हास काय म्हणायचे आहे. मग आणखी व्यवस्थित प्रतिवाद करेन.

सरकारी मदत घेऊन शेतकर्‍यांच्या जमीनी जबरदस्तीने बळकावणे - ह्याचे समर्थन नाहीच. कदापि नाही. व फ्रिडमन यांनी ही ते केलेले नाही. पुरावा म्हणूनच Tyranny of status quo हे पुस्तक क्वोट करतो.

खरंतर क्लाईन यांनी वर्णन केल्याच्या नेमके विरुद्ध काम फ्रिडमन यांनी काम केल्याचे पुरावे देऊ शकतो. प्रचंड पुरावे आहेत याचे. वेगळा धागा काढावा लागेल.

--------

शिवाय कॉर्पोरेशन्सनी एक्स्टर्नलाईझ केलेली कॉस्ट हेच लोक सहन करतात त्यामुळे ते मुळात फुकटे नसतातच.

एक्स्टरनॅलिटिज फक्त निगेटिव्ह नसतात. पॉझिटिव्ह सुद्धा असतात. व पॉझिटिव्ह प्रचंड असतात. फक्त त्यांची चर्चा करायला पत्रकारांना आवडत नाही कारण ती खपत नाही. (का खपत नाही ते ही सांगू शकतो.)

खरंतर (निगेटिव्ह) एक्स्टरनॅलिटिज दूर करण्यासाठीच entrepreneur चा अनेकदा जन्म होतो असा टेरि अँडरसन यांनी युक्तीवाद केलेला आहे. व तोच entrepreneur पुढे जाऊन उद्योगपती बनतो.

जे लोक टॅक्स (विशेषतः प्राप्तीकर) देत नाहीत ते फुकटे शिवाय दुसरे काही असूच शकत नाहीत. कारण टेक्निकली बोलायचे च तर - टॅक्स हा एक्झॅक्टली समान द्यायला हवा (प्रत्येकाने). If you want equal rights then you should be willing to take equal responsibility. पण तशी पॉलीसी राबवली तर मते मिळत नाहीत. व म्हणून टॅक्स हा इन्कम व प्रपोर्शन बेस्ड लावला जातो. अगदी सेल्स टॅक्स सुद्धा राबवताना जीवनावश्यक वस्तूंवर शून्य किंवा नगण्य लावला जातो. Because a poor person spends most of his/her income on essential goods. And if those are taxed then he is hurt the most.

यावर प्रतिवाद म्हणून अप्रत्यक्ष कराचा मुद्दा पेश केला जातो. पण तो सुद्धा महाप्रचंड तोकडा आहे. (कसा ते लिहु का ?)

-----

पर्मनंट इनकम हायपोथिसीस हे ठराविक अ‍ॅझम्प्शन्स पाळणार्‍या मॉडर्न इकॉनॉमिक सिस्टीममधे राहणार्‍या एका होमो इकॉनॉमिकसच्या वैयक्तिक पातळीवर अचूक असले तरी संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक पातळीवर हे हायपोथिसीस फेल होते.

हा मुद्दा वादग्रस्त आहे. पण आपण तो खरा आहे असे क्षणभर मानू या.

पण आपण बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दृष्टीकोन वि. व्यक्तीचा दृष्टीकोन याबद्द्ल बोलत आहोत. And for these 2, the modern economic system is common. त्यामुळे - ते संपूर्ण मानवजातीच्या सामूहिक पातळीवर हे हायपोथिसीस फेल होते - हा भाग प्रतिवाद म्हणून गैरलागू आहे.

व मूळ मुद्दा फ्रीडमन यांच्या हेतूंच्या विशुद्धतेचा व त्यांनी कोणाचे हितसंबंध मांडले ह्याचा होता. त्यांनी मांडलेली थियरी - ही टेक्निकली अगदी चुकीची आहे असे क्षणभर गृहित धरले तरी - ती थियरी व्यक्तीचा दृष्टीकोन मांडते - हा मुद्दा खोटा ठरवला जात नाही.

------

फ्री मार्केटमध्ये तथाकथित गरीब व फुकट्या लोकांकडून प्रचंड मागणी असलेली सरकार ही एक सेवा नाही काय?

एकदम मस्त प्रश्न. या प्रश्नाबदल तुम्हास एक मस्त बिर्याणी पार्टी माझ्यातर्फे. प्लस एक टेकिलाची बाटली.

पण सरकार ही सेवा म्हणून मागणी असेल तर ... ती पुरवणार्‍या सरकारची - चालवण्याची कॉस्ट टॅक्स मधून (मुख्यत्वे) मिळवली जाते. वित्त मंत्रालयाच्या वेबसाईट वरून तुम्हास कळेल की व्यक्ती किती टॅक्स देते, टॅक्स च्या गंगाजळीतील किती निधी हा कॉर्पोरेशन्स कडून येतो.

या तपशीलाकडे पाहिलेत तर तुम्हास समजेल की तुम्ही माझ्या मुद्द्यांचे समर्थन करीत आहात.

तत्वज्ञान

तत्वज्ञान tells us how the people should behave;
अर्थशास्त्र tells how the people actually behave
त्यांची तुलना कशी होइल?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अंताजी

'अंताजीची बखर' वाचून झाली. फार आवडली. प्रस्तावनाही आवडली. आता 'बखर अंतकाळाची' विकत घेणे आले. (स्माईल)

रिबेका वाचतेय.... पहिल्यांदा

रिबेका वाचतेय.... पहिल्यांदा जितके आवडले त्यापेक्षा आत्ता जास्त आवडतेय...

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

या याद्यांपैकी बहुतांश

या याद्यांपैकी बहुतांश पुस्तके ऐकलेलीही नाहित आणि वाचले तर एकही नाही Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!