सध्या काय वाचताय? - भाग ४

या धाग्याची ४थी आवृत्ती! (पहा भाग , , आणि )

प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले होते:
बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे.
***************

१) गेल्या आठवड्यात अनुपमा राव यांचे "द कास्ट क्वेस्चन: दलित्स अँड द पॉलिटिक्स ऑफ मॉडर्न इंडिया" हे पुस्तक वाचले. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर, व दलित चळवळीचा अत्यंत रोचक, सखोल आढावा. जोतीराव फुल्यांपासून अंबेडकरांचे राजकीय, धार्मिक व न्यायव्यवस्थेवरचे विचार, दलित पँथर, नामांतर चळवळीपर्यंत. यातील फॅक्च्युअल माहिती इथल्या वाचकांना तेवढी नवीन नाही (अमराठी, अभारतीय वाचकांसाठी ही पार्श्वभूमी आहे), आणि त्यांची शैली थोडी बोजड आहे (ज्यांना इंग्रजी अ‍ॅकेडेमीज भाषा आवडत नाही त्यांना हे जास्तच जाणवेल)पण त्यातील प्रश्नांची मांडणी व चर्चा विचारप्रवर्तक आहे. पहिले प्रकरण येथे वाचता येईल.

वेळेअभावी त्याच्याबद्दल फार खोलात लिहिणे दुर्दैवाने शक्य नाही, पण भारतीय, आणि खासकरून महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात, जातिविरोधी आंदोलनांच्या इतिहासात रस असलेल्या सगळ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. संविधानिक, कानूनी स्वरूपाची संरक्षणं असूनही दलितांविरुद्ध हिंसा गेल्या काही दशकात का व कुठल्या स्वरूपात वाढली आहे? दैनंदिन पातळीवर घटनेतल्या, विविध अ‍ॅक्टांच्या अंमलबजावणीमध्ये काय काय परस्पर विरोधी, मूलगामी मुद्दे नजरेस येतात? दलित चळवळीने "आधुनिकते" चा विचार कसा केला, व त्याचा भारताच्या १९४७ओत्तर राजकीय स्वरूपावर काय परिणाम झाले? "दलित" या राजकीय संज्ञेच्या दृष्टीकोनातून, त्याच्या घडवणीच्या इतिहासातून राव आधुनिक भारतीय राजकीय विचारविश्वाचा, त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या अनेक संज्ञांचा - समता, नागरिकत्व, न्यायव्यवस्था - परामर्श घेतात.

२) डी. आर. नागराज, "द फ्लेमिंग फीट". नागराज हे कन्नड साहित्याचे समीक्षक होते, आणि कर्नाटकातल्या ब्राह्मणेतर-दलित चळवळीत सहभागी होते. बहुतेक कन्नड मधेच लिहीत. कन्नड दलित साहित्यावर, आणि दलित चळवळितील विविध राजकीय विचारांवरच्या निबंधांचा हा इंग्रजीतला संच त्यांच्या अकाली मृत्यूनंतर पुन:प्रकाशित झाला. त्यात गांधी व अंबेडकर यांच्या विचारांचा एकत्र विचार करण्याचा रोचक प्रयत्न आहे. या चौकटीतून ग्रामीण विकास / शहराकडे स्थलांतर व गावकी सोडण्याचे आव्हान, आर्थिक प्रगती / पर्यावरण, आधुनिकता/संस्कृती, अशा विविध द्वंद्वांवर नागराज लिहीतात, दलित चळवळीने घेतलेल्या दिशांचा, राजकीय -सांस्कृतिक कार्यक्रमांचा आढावा घेतात. यातील एक निबंध इथे वाचता येईल.

३) कृष्णात खोत, रौंदाळा - अजून वाचतेय. कादंबरीत संवादातून वातावरण मस्त निर्माण झाले आहे, वाचकाला एकदम गोष्टीत खेचून घेते. ग्रामीण भाषेचा संवादातच नाही तर निवेदनातही वापर अगदी सरस आहे. मी घरी जाताना मेट्रोमधे वाचायला सुरुवात केली, आणि वेळ कसा गेलं कळलं नाही. माझं स्टेशन चुकून, पुढच्या स्टेशनाची घोषणा ऐकू आली तेव्हा खाली ठेवले. पुढे कथानकाचा वेग, आणि माझा उत्साह, दोन्ही ढेपाळणार नाही अशी आशा आहे!

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

अ रूम ऑफ वन्स ओन`

This comment has been moved here.

'अ‍ॅण्ड दी माउंटन्स एकोड्' हे

हा प्रतिसाद आनि यापुढिल सर्व प्रतिसाद भाग - ५ मध्ये हलवले आहे.
नवीन वाचनाची नोंद त्या धाग्यावर करावी

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता-कविता-कविता

सुंदर सुंदर कविता वाचते आहे. विशेषतः कवयित्रींच्या कविता. आज सप्ताहांत असूनदेखील, तोंडात असलेल्या कडवट चवीला साजीशी कविता पुढे देते आहे

डिस्क्लेमर- कविता कडवट नसेलही मला वाटतीये. पिरीअड!!! तुमचं सत्य ठेवा तुमच्यापाशी. (खास त्या लोकांसाठी जे परत त्यांना सापडलेलच सत्य कसं श्रेष्ठ हे सांगायला धडपडतील त्यांच्यासाठी.)

Adam's Complaint - Denise Levertov

Some people,
no matter what you give them,
still want the moon.

The bread,
the salt,
white meat and dark,
still hungry.

The marriage bed
and the cradle,
still empty arms.

You give them land,
their own earth under their feet,
still they take to the roads

And water: dig them the deepest well,
still it’s not deep enough
to drink the moon from.

:)

>>>तुमचं सत्य ठेवा तुमच्यापाशी. <<<

हे थोडं चर्चास्थळाच्या अस्तित्त्वाविषयीच प्रश्नचिन्ह उभं करणारं वाटतंय् (स्माईल) ज्यानेत्याने आपापलं सत्य आपल्यापाशीच ठेवलं तर क्वः चर्चा क्वः च चर्चास्थलः.
पण असो.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Almost Single

गेल्या दोन आठवड्यात सिडने शेल्डनच्या दोन 'टिपिकल टाईमपास' कादंबर्‍या वाचल्यानंतर आता "अद्वैता काला" चे "Almost Single" हातात घेतले आहे.
हल्लीच्या इंग्रजी स्त्रीलेखिकेचं पुस्तक अगदी क्रांतिकारी नसलं तरी बर्‍यापैकी समकालिन म्हणता यावं असं आहे. तिशी येऊनही लग्न न झालेल्या तीन आर्थिक स्वायत्त मैत्रीणींचं विश्व मस्त खुसखुशीत लेखणीतून साकारलं आहे. समलैंगिकता, भारतीय डेटिंग, जुन्या मनोवृत्तीचा समाज - पालक, त्यातच हातात हात घालून चालणार्या अंधश्रद्धा/बुवाबाजी वगैरे चपखल उतरले आहे.

वाचलं तसेल तर वाचा!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओळखीवरुन तरी अत्यंत रोचक

ओळखीवरुन तरी अत्यंत रोचक वाटते आहे.

जॉन ग्रिशम

जॉन ग्रिशमचे द रेन मेकर वाचायला घेतलं आहे. कोर्ट रूम ड्रामा स्टाइल पुस्तक आहे. त्या नंतर वाचायला हिरोज ऑफ ऑलिंपस हा एक ठोकळा आणून ठेवलाय.
लै दोस्तांनी रिकमेंट केलेलं मेलुहा वाचुन मजबुत पकलो. ते अजिबात आवडलं नाही.

हो "मेलुहा" माझ्या

हो "मेलुहा" माझ्या मैत्रिणींनीही सुचवले होते. तेच ना ज्यात शंकर एक राजा / सम्राट म्हणून चित्रीत केले आहेत? मी वाचले नाही.

डॉ. प्रशांत बागड 'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' (शब्द प्रकाशन)

नुकतेच डॉ.प्रशांत बागड यांचे 'विवादे विषादे प्रमादे प्रवासे' (शब्द प्रकाशन)वाचून काढले. एकदा वाचून झाल्यावर पुन्हापुन्हा वाचायचा मोह आवरला नाही. मराठी कथाविश्वातील एक आगळावेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहायला काही प्रत्यवाय नसावा. साठोत्तरी, नव्वदोत्तरी, महानगरीय वगैरे प्रकारांना सलाम करत, त्या पलीकडे जात, बागड काही स्फुट कथा-प्रसंगांच्या कोलाजसदृश मांडणीतून चिंतनाची आगळी पद्धत वाचकांसमोर प्रस्तुत करतात. एकूण कथांना पारंपारिक बाज नाही पण कथेचे 'कथात्व' अगदी वेगळ्या पद्धतीने मांडून बागड यांनी त्यांच्या भविष्यातील लेखनाविषयी उत्सुकता वाढवून ठेवली आहे. अवश्य वाचावं असं पुस्तक!

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

थीम?

या नावावरून स्वाध्यायी मंडळींमध्ये रोज घराबाहेर पडताना म्हटला जाणारा श्लोक बर्‍याच दिवसांनी आठवला

विवादे विषादे प्रमादे प्रवासे
जले चानले पर्वते शत्रुमध्ये
अरण्ये शरण्ये सदा मा प्रवासी
गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेकां भवामि!!

पुस्तकातील कथांना "घराबाहेर पडताना.." किंवा "घराबाहेरचं खडतर जग" वगैरे थीम आहे का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी यातल्या पहिल्या दोन कथा

मी यातल्या पहिल्या दोन कथा वाचल्या, आणि मग काही कामामुळे पुस्तक बाजूला ठेवलं ते राहिलंच. पहिली कथा खूपच आवडली होती.

वॉटरशिप डाऊन- रिचर्ड अ‍ॅडम्स

वॉटरशिप डाऊन- रिचर्ड अ‍ॅडम्स

गेल्या आठवड्यात लायब्ररीतून सहज घेऊन आले. अजून पूर्ण वाचून व्हायचं आहे तरी इथे लिहिते.
या पुस्तकातली पात्र म्हणजे ससे आहेत आणि त्यांचीच ही एक रोमांचक गोष्ट आहे.
ज्यांना रणजीत लाल यांचं 'द क्रो क्रोनिकल्स' किंवा तत्सम लेखन आवडलं आहे त्यांना वॉटरशिप डाऊन बहुतेक आवडेल.एक मस्त पुस्तक अचानक हातात पडल्याचा आनंद झाला आहे.

फेडरिक फोरसिथ

हि कथा विजय देवधरांनी अनुवाद केलेली फेडरिक फोरसिथ ची असावी बहुतेक.

ओके. धन्यवाद फ्रेडरीक

ओके. धन्यवाद (स्माईल)
फ्रेडरीक फोरसिथचे नो कमबअॅकस् आवडलेले.

Amazing Amy

+१ फ्रेडरीक फोरसिथचे नो

+१
फ्रेडरीक फोरसिथचे नो कमबॅक्स आणि जेफ्री आर्चरचे टु कट अ लाँग स्टोरी शॉर्ट हे दोन्ही कथा संग्रह आवडले आहेत.
जेफ्री आर्चर कादंबर्‍यांबरोबर/पेक्षा कथालेखन अधिक चांगले करतो असे माझे मत त्या पुस्तकावरून झाल्याचे आठवते आहे

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही वर्षाँपुर्वी

काही वर्षाँपुर्वी लोकसत्ता/सकाळ मधे एक अनुवादीत लघुकथा वाचलेली.
नवीन सिमेँटचा रस्ता बनवायचा म्हणुन घरं पाडणे चालु असत. पण एक म्हातारा काही केल्या घर सोडायला तयार नसतो. शेवटी पोलिस त्याला जबरदस्ती बाहेर काढतात. नंतर ते घर पाडताना फायरप्लेसमागे एक सांगाडा सापडतो. त्या म्हातार्याचा इतिहास शोधता, तो सज्जन होता, पण त्याची चवचाल बायको अचानक गायबलेली, परपुरुषासोबत पळुन गेली असेच सर्वाँनी अझ्युम केलं...
पुढे काय होतं सांगत नाही. पण मस्त कथा होती ती. कोणाला त्या लेखकाचं नाव माहीतीय का? मला त्याच्या इतर कथा वाचायच्या आहेत.

Amazing Amy

राईझ अँड फॉल ऑफ रजत गुप्ता

रजत गुप्ता आणि राजरत्नम यांच्या घोटाळ्याबाबत आलेला हा लेख रजत गुप्ताची बाजू घेऊन लिहिल्यासारखा वाटत असला तरी आवडला.
http://www.nytimes.com/2013/05/19/magazine/rajat-guptas-lust-for-zeros.h...

१० रुल्ज ऑफ झेन प्रॉग्रॅमर

झेन प्रॉग्रॅमरचे १० नियम वाचलेः
http://www.grobmeier.de/the-10-rules-of-a-zen-programmer-03022012.html?g...

परफॉर्मन्स रिव्ह्यू व अप्रजेलचे दिवस असल्याने मनाजोगता निकाल न लागल्यास हे नियम मानसिक आधार देतील असे वाटते .(स्माईल)

अनिस निन च्या "House of

अनिस निन च्या "House of Incest" मधील काही उतारे वाचले, परत ,परत वाचते आहे. अशरीरी आत्म्याला भटकताना जी अशारीरीक अनुभूती येईल, पंचेंद्रियांच्या पलीकडे एखाद्या अचेतन मनाला (सबकॉन्शस) प्रसंग जसे जाणवतील त्याचे वर्णन आहे असे वाटले. मग विकी कडे धाव घेतली, गुड रीडस वरच्या समीक्षा वाचल्या. गुड रीडस वर एकजण म्हणते - "A wild, intense assault of images. Visceral and raw. Thoroughly female and savage, in the best sense"

मला काही वर्णने खरोखर फार आवडली जसे - "She was spreading herself like the night over the universe and found no god to lie with." किंवा "Sabina, you made your impressions upon the world. .... eyes which reflect like water and drink like bloating paper, the pity which flickers quietly like candlke light, the
understanding on which people lay themselves to sleep?" किंवा "Your beauty drowns me, drowns the core of me."

विकीपाडीयाच्या माहीतीनुसार "Incest" हा शब्द केवळ प्रतिकात्मक वापरला असून, तो "अत्यंतिक स्वार्थी" प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरला आहे. दुसर्‍यामध्ये फक्त स्वतःला शोधणारे प्रेम. असे प्रेम, जे स्वतःहून दुसरे असे भिन्नत्वच स्वीकारत नाही. प्रथम प्रथम असे प्रेम बिनधोक व आश्वासक वाटले तरी कालांतराने ते विषारी, तुरुंग होऊन बसते; या कल्पनेवर/तथ्यावर आधारीत असे हे ७२ पानांचे मुक्तक/साहीत्य आहे.

स्वप्नात जसे प्रसंग Surreal रीतीने येतात , एकमेकांत विरघळत नवीन प्रसंग साकार होतात, वाचताना अगदी तसे वाटते. हे साहीत्य मिळवून वाचले पाहीजे एवढेच प्रकर्षाने जाणवले.

आनाईस् नीन्न

तुम्ही छान वर्णन केले आहेत.
मला 'आनाईस् निन्न'चे एक वाक्य खरेपणाबद्दल फार आवडते.
Each friend represents a world in us, a world not born until they arrive, and it is only by this meeting that a new world is born.

धन्यवाद अमुक. २/३

धन्यवाद अमुक. २/३ वर्षांपूर्वी, तिने, माझे लक्ष वेधून घेतले ते पुढील वाक्यामुळे - "The day came when the risk to remain tight in a bud was more painful than the risk it took to blossom" हे वाक्य खूप आवडले होते. मग मी खूपदा तिची निवडक वाक्ये वाचायचा प्रयत्न करत असे, तिच्याविषयी वाचत असे.

त्यामुळेच, यावेळी लायब्ररीत तिच्या वेचक कामाची ओळख करुन देणारे पुस्तक सापडले ते लगेच उचलले गेले. हे वाक्य पहा - Stumbling from room to room I came into the room of paintings, and there sat Lot with his hand upon his daughter's breast while the city burned behind them, cracking open and falling into the sea." पुस्तकात, ही पॉवरफुल, भीतीदायक अन सुंदर इमेजरी सापडते. काहीतरी खूप प्रिमिटीव्ह अन रॉ म्हणूनच सुंदर समोर येत रहातं. "There where he sat with his daughter,the oriental rug was red & stiff, but the turmoil which shook them, showed through the rocks splitting around them, through the earth yawning beneath their feet, through the trees flaming up like torches, through sky smoking & smouldering red, all cracking with joy & terror of their love"

मुख्य गाभा विकी मध्ये सापडला अन तो हाच आहे की - आत्मकेंद्रित परिचिताचा हव्यास अन त्यातून आलेला कंटाळवाणा तोचतोच पणा, अंधारी कुबटपणा.

शेवटी एक हात नसलेली अन बहीरी नर्तिका समोर येते. गोष्टींना सतत कवटाळून, कवेत घेऊन, पकडून ठेवल्याने तिचे हात तुटले आहेत. ज्या क्षणी तिला ते कळते, तिचे हात तिला परत मिळतात अन जणू काही मुक्त दान दिल्यासारखे ती तिचे बाहू पसरते.

आनाईस् नीन्न- २

रोमांचक आहे ! धन्यवाद.
तिच्या आवाजातले तिच्या डायरीचे तासभराचे वाचन इथे ऐकायला मिळेल.
तसेच तिच्यावर माहितीपटही आहे.

घरी गेल्यावर ऐकते. धन्यवाद.

घरी गेल्यावर ऐकते. धन्यवाद.

लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री-

This comment has been moved here.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

'सिल्वर लाईनिँग्ज प्लेबुक'

'सिल्वर लाईनिँग्ज प्लेबुक' वाचलं.
कथानक विकीवर आहे त्यामुळे परत इथे देत नाही (मला वाटत चित्रपटदेखील बर्याच जणांनी पाहीला असेल).
पुस्तकाची सुरुवात रोचक आहे पण एकदा का तो खेळाचा कल्ट चालु झाला की मलातरी बोअर झालं आणि शेवट तर पुर्ण नोजडाईव वाटला.
चित्रपट पाहीला नाहीय पण imdb summary वरुन स्क्रिनप्ले आणि पुस्तकात खूप फरक आहे असे वाटले. आणि तरीही ऑस्कर नॉमिनेशन्स मिळण्यासारखं काही वाटलं नाही त्यात. जेनिफरच केरेक्टरदेखील ढिगभर पुरस्कार मिळण्याएवढे हेविवेट अजीबात वाटलं नाही...

Amazing Amy

आभार! हा चित्रपट पहाता पाहता

आभार! हा चित्रपट पहाता पाहता न पाहिल्याचं शल्य कमी झालं (स्माईल)

(आपण नाही का पापडाकडे जाणारा हात चटकन चटणीकडे वळवतो, (अर्थात इति पुलं) तसं झालं या चित्रपटाचं)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नवी जुनी पुस्तकं आणि मासिकं

अरुण खोपकर यांची दोन पुस्तकं नुकतीच वाचली : १. चित्रव्यूह, २. चलत चित्रव्ह्यूह.
गणेश मतकरी यांची दोन पुस्तकं वाचली : १. सिनेमॅटिक, २. चौकटीबाहेरचा सिनेमा
दीपक घारे यांचं 'लिओनार्दो - बहुरूपी प्रतिभावंत' हे एक चांगलं पुस्तक.
डॉ. उज्ज्वला दळवी यांचं 'जेनेटिक्स कशाशी खातात' हे माहिती व भाषा दोन्हींसाठी वाचावं असं चांगलं पुस्तक.
भैरप्पा यांची 'तडा' ही भयावह कादंबरी नेटाने पूर्ण केली. अनुवाद अर्थातच उमा कुलकर्णी.
उदयप्रकाश यांचं 'ईश्वर की आंख' आणि 'नयी सदी का पंचतंत्र' ही दोन पुस्तकं वाचली.
विनोदकुमार शुक्ल यांचं 'खिलेगा तो देखेंगे' पुन्हा वाचलं.
पुष्पा भावे यांचं 'रंग नाटकाचे' हे एक महत्त्वाचं पुस्तक.

यादीत आता सुमारे ८० रोचक पुस्तकं रांगेत उभी आहेत. खेरीज 'जलसा' नावाचं एक हिंदी त्रैमासिक निघतंय नव्याने. त्याचे दोन अंक अधुरे वाचून झालेत. हे पुस्तकाच्या ( डेमी ) आकाराचं मासिक खूप चांगलं आहे. नवं लेखन आणि परदेशी भाषांमधले हिंदी अनुवादही त्यात वाचण्यास मिळतात.
'उदभावना' या मासिकाच्या रॉयल आकाराच्या सातशे पानी खंडाला मात्र हात लावण्याची हिंमत अजून केलेली नाही. चाळून पाहूनच दमले. उदभावनाचा हा ९७वा अंक सध्या माझ्याकडे आहे शमशेर बहादुर सिंह विशेषांक.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

धन्यवाद.

धन्यवाद.

एकंदर वाचनाचा पैस लक्षांत घेता प्रत्येक पुस्तकावर लिहिता येणें शक्य नाही याची कल्पना आहे. तरी किमान पुस्तकांची नावें द्यावीत ही विनंती.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

खिलेगा तो देखेंगे

विनोदकुमार शुक्ल या मोठ्या हिंदी कवीचा नुकताच एक कवितासंग्रह प्रफुल्ल शिलेदार या मराठी कवीने मराठीत अनुवादित केला आहे. 'नौकर की कमीज' या कादंबरीसाठी हिंदीही वाचणार्‍या मराठी वाचकांना विनोदकुमार अधिक माहीत आहेत. ( ही लहानशी कादंबरी खरोखरच अदभुत आहे. ) कविता, कथा, कादंबरी या तिन्ही रूपबंधात विनोदकुमारांनी लेखन केले आहे. नौकर की कमीज आधी वाचून मग ही कादंबरी वाचावी.

त्यातला एक तुकडा :

गुरुजींना लोहाटी कुलुपाची आठवण आली. लोहाटी कुलूप दिसत नव्हतं. पत्नीसोबत मुलांनीही कुलूप शोधायला सुरुवात केली. कुलूप लावायची गरजच वाटत नसे. ठाण्यात एखादवेळी गरज भासे. संसारात एकच एकुलतं कुलूप होतं. आणि तेही न लावलेल्या अवस्थेत असायचं. पत्र्याची पेटी उघडली, तेव्हा पत्नीला त्यात ठेवलेलं ते कुलूप सापडलं.
"पेटीत तर ठेवलं होतं." पत्नी म्हणाली.
"पेटीला लावलेलं असतं तर ठेवलेलं दिसलं असतं."
कुलूप लावणं म्हणजेच कुलूप ठेवणं असतं का? कुलूप टेबलावर, ओट्यावर ठेवतात. बूट घालून बूट ठेवता येत नाही. बूट काढून ठेवावा लागतो. सदरा ठेवणं सदरा घालून शक्य होत नाही. पेटीत कुलूप बंद करून ठेवलं असेल तर कुलूप ठेवणं कसं होईल?

दुसरा तुकडा ;

आनंदी होण्याआधी निमित्त शोधलं
पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे.
नंतर ही निमित्तं कारण बनून जातात.
खरोखरच आनंद देऊ लागतात.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

तडा : भैरप्पा

ही भैरप्पा यांची अजून एक वादग्रस्त ठरलेली कादंबरी.
याच्या ब्लर्बवर लिहिलंय : भारतीय समाजाला ज्ञात असलेल्या तड्यांचं दर्शन घडवत, हृदयाला पीळ पाडणारी; समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन-दर्शन घडवणारी कादंबरी.

भैरप्पा हे मला एका अर्थाने आपल्या श्याम मनोहरांसारखे वाटतात. श्याम मनोहर अजिबात गोष्ट सांगत नाहीत आणि भैरप्पा फक्त गोष्टच सांगतात, हा दोघांमधला मुख्य फरक. मग साम्य ते काय?
तर साम्य हे दोघेही आधी आपले 'विधान' निश्चित करतात. लेखकाला पुस्तकातून काहीतरी सांगायचे असते आणि ते विधान कोणते? हे शोधणार्‍या वाचकांसाठी हे दोघे दोन टोकांना उभे असलेले लेखक. मध्ये विधानाचा धागा समान.
त्यात मनोहर गोष्ट सांगत नाहीत, म्हणून ते लोकप्रिय लेखक नाहीत आणि भैरप्पा गोष्ट सांगतात म्हणून ते कन्नडसह मराठीतही आणि अजून काही भारतीय भाषांतही लोकप्रिय लेखक आहेत. कारण : भारतीय वाचकांना गोष्टी आवडतात!!

तर तडा वादग्रस्त यासाठी ठरली की त्यांनी स्त्रीमुक्ती आंदोलन, तथाकथित मुक्त स्त्री आणि स्त्रियांच्या बाजूने असलेले कायदे यात टारगेट ठरवले.

नायकाची साडी नेसून त्यावर कामाच्या वेळी कोट घालणारी (इंजिनिअर असलेली ) , केसांत गजरा-कपाळी कुंकू असलेली, धार्मिक, पतीवर प्रेम व भक्ती दोन्ही करणारी आदर्श बायको मरते. मग दुसरी एक बाई लैंगिक आकर्षणापायी त्याच्या आयुष्यात येते. ती त्याच्या अ‍ॅबनॉर्मल मुलीला त्रास देते, किंबहुना तिच्याविषयी त्याला लैंगिक आकर्षण वाटत असल्याचे ( कारण ती त्याच्या पहिल्या बायकोसारखी दिसते ) टोकाचे आरोप करते. ती फसवून लग्न करते. प्रॉपर्टी बळकावू पाहते. उपकथानकेही अशीच. विद्यापीठात प्रोफेसर असलेली बाई एका मंत्र्याला जाळ्यात पकडते आणि त्याचे फार्महाऊस ढापू पाहते. त्याच्या बहिणीचा मुलगा परदेशी आहे. तिथेही त्याची बायको ( जी आधीही घटस्फोटित आहे व तिला आधीची मुले आहेत ) घटस्फोटाची केस करते आणि त्याची प्रॉपर्टी ढापते. वकील असलेल्या बायका या बायकांना सपोर्ट करतात आणि स्त्री मुक्ती आंदोलनात सहभागी करून घेतात, त्यातली एक लेस्बियनही असते, ती नायिकेचा गैरफायदा घेते. नायक वेश्येकडे जातो, तिथेही पकडला जातो आणि पुरता बरबाद होतो. त्याच्या आईवर दुसर्‍या सुनेला हुंड्यापायी त्रास दिल्याचा खोटा आळ आल्याने ती तुरुंगात आहे, ती अनेक वर्षांनी सापडते. मग ती मुलाला संकटातून बाहेर पडायला मदत करते. ज्या सुनेने तिच्यावर खोटा आळ घेतला तिच्या मुलीला खरोखरच हुंड्यापायी त्रास होतो व ती आत्महत्या करते. नायकाचा एनआरआय भाचा 'आता फुलांचे गजरे करणे जमत असलेल्या' नायकाच्या अ‍ॅबनॉर्मल मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. इत्यादी इत्यादी.

कुणाला स्वपीडक बनायचे असेल आणि जाणीवपूर्वक डोकेदुखी हवी असेल, तर त्यांनी 'तडा' नक्की वाचावी.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

भैरप्पा टाळणेच योग्य?

भैरप्पा म्हणजे एकूणच प्रतिगामी / एकांगी प्रकरण आहे असे माझे मत त्यांची दोन पुस्तके वाचून झाले होते. वरिल सारांश वाचुन त्यास अधिक बळकटि आली. उगाच डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा भैरप्पा टाळणेच योग्य या निष्कर्षाकडे येत आहे.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

... समकालीन जीवनासमोर आरसा

... समकालीन जीवनासमोर आरसा बनून जीवन-दर्शन घडवणारी कादंबरी.

हा किती सालचा समकाल?

कुणाला स्वपीडक बनायचे असेल आणि जाणीवपूर्वक डोकेदुखी हवी असेल, तर त्यांनी 'तडा' नक्की वाचावी.

हे 'रेकमेंडेशन' आवडलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर

>>नायकाची साडी नेसून .... <<<

इथे जरा अडखळलो. अवांतराबद्दल क्षमा करा.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मनोहर

मनोहरांचे विधान पटते. पण 'रचलेली' गोष्ट पटत नाही. ती कधीच 'अधिकृत' वाटत नाही.

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

:-)

नायकाची या शब्दानंतर ',' हवा होता. (स्माईल).

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

'रंग नाटकाचे'

थोडे सविस्तर लिहायला हवे होते. पण तसे नंतर ध्यानात आले. ट्यूबलाईट!! Sad

काही पुस्तकांविषयी सांगते. ( बाकीच्याही जमेल तसे सांगेन.)

पुष्पा भावे यांचे 'रंग नाटकाचे' हे राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक. 'आधुनिक रंगभूमी : नवे भान देणारी समीक्षा' असे या पुस्तकाचे उपशीर्षक आहे. मुखपृष्ठ सामान्य आणि ब्लर्ब हास्यास्पद. यात हास्यास्पद असलेली अजून एक गोष्ट आहे : संपादकीय. पुस्तकांना संपादकीयं देण्याचा वाईट प्रकार आजकाल राजहंस प्रकाशनाने सुरू केला आहे. संपादकांनी हौसेने लिहिलेला मजकूर याहून अधिक दर्जा त्याला नाही. तो प्रकाशन संस्थेच्या हाऊस मॅगझिन मध्ये फारतर छापण्यास हरकत नव्हती अशी एक पोरकट कोटी मनात आलीच. पैठणीला चिंधी जोडण्याचा हा उद्योग केला नसता तर बरे झाले असते. 'सखाराम बाइंडर', 'घाशीराम कोतवाल' आणि 'महानिर्वाण' या तीन महत्त्वाच्या नाटकांवरील लेख ऐनवेळी वगळले गेले असे समजले. तक्रार नोंदवली असता ते 'पुढील आवृत्ती'त छापले जातील... असा खुलासा मिळाल्याचेही समजले. आता अशा पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या निघणार त्या केव्हा? असो. ती तक्रार / कुरबुर करून झाल्यावर आता मुळ पुस्तकाकडे वळते.

यातील माधव वझे यांची प्रस्तावना आणि त्यांनीच घेतलेली पुष्पा भावे यांची मुलाखत दर्जेदार मजकूर कसा असावा हे सांगणारी आहे. समकालीन असणे आणि निदान चाळीसेक वर्षे एकमेकांना ओळखत व ओळखून असणे यामुळे या मजकुरात गंमत आहे. टीकाही आहे, दोष- त्रुटी दाखवणेही आहे आणि त्यामागचा हेतू स्वच्छ आहे, हे त्याची भाषाच सांगते. उदा.
"एक म्हणजे या आधीच म्हटल्याप्रमाणे आपल्या वाचकांचीही काहीएक तयारी आहे, असं त्या गृहीत धरतात. ...... नाटकवाले आणि नाट्यसमीक्षकांनीही ग्रोटोस्कीचा विचार जिथे पुरतेपणाने समजून घेतला नाही, तिथे वाचकांना तो विचार माहीत असल्याचं पुष्पा भावे गृहीत धरतात असं दिसतं." इत्यादी.
या नंतरच्या मुलाखतीतले प्रश्नही फार निराळे आहेत, ते फोफशे आणि नेहमीचे नाहीत. त्या प्रश्नांसह काहीवेळा वझेंनी स्वतःची मते देखील मोकळेपणानं, स्पष्टपणानं मांडलेली आहेत. कुठेही दडपणाचा लवलेश नाही आणि निव्वळ गप्पांचा, स्मरणरंजनाचा टोनदेखील नाही.

बाईंची "मनोरंजन हा कलेचा हेतू नाही तर परिणाम असतो." किंवा "विशिष्ट शब्द-वाक्य-दृश्य भडक वा अश्लील नसतं. त्या विशिष्ट दृश्याचा तोल कलाकृतीशी साधला गेला नाही की ते भडक होतं." अशी महत्त्वाची व विचार करण्यास प्रवृत्त करणारी विधाने माधव वझेंनी प्रस्तावनेत उद्धृत केली आहेत. नावांनिशी मुलाखतीत जे बोललं गेलं आहे, ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे.
मुख्य मजकुराचे भाग आहेत - १. संहिता आणि प्रयोग. यात खानोलकर, एलकुंचवार, कानेटकर इ. नाटककारांची काही नाटकं - ज्यांची माझ्या पिढीने केवळ नावं ऐकली आहेत आणि काहींच्या संहिता वाचल्या आहेत - यांविषयी व काही वेगळ्या, दखल घेण्याजोग्या प्रयोगांविषयी लिहिलं आहे. आजकाल अनेक लोक नाट्यसमीक्षा वा परीक्षणांच्या नावाखाली निव्वळ नाटकाचा वृत्तांत लिहीत असतात; त्यांच्यासमोर 'आजही' हे इतके जुने लेख नमुना म्हणून ठेवावेत असे आहेत.
२. रंगकर्मी. या दुसर्‍या भागात शांता जोग यांच्यावरील लेख मला विशेष आवडला. ही व्यक्तीचित्रं नाहीत खरंतर. त्यात लालित्य नाही. पण त्या माणसांविषयी आपल्याला काहीतरी वेगळं समजलं किंवा यांच्या कामांकडे 'असंही बघता येतं' हे समजलं, असं वाचताना वाटत राहतं. दत्ता भट, माधव मनोहर, बेन किंग्जले यांच्याविषयी या भागात लिहिलेलं आहे. ३. विविधा. हा तिसरा भाग पुस्तकातील जुन्या लेखांना ( मुलाखतीप्रमाणेच ) वर्तमानाशी जोडून घेणारा आहे. यातील 'आपण सारे मराठी प्रेक्षक' हा लेख खूपच रोचक आहे. ( "नाटक एक स्वतंत्र माध्यम आहे. ते आपल्या जीवनाचे छायाचित्र टीपणारे यंत्र नाही वा आपल्या थकल्या मनाला रिझवणारे खेळणेही नाही." किंवा "आपण नाटकाची काव्यात्म संकल्पना नाकारली आणि काव्यात्म भाषेला प्रतिसाद दिला. नाटक एक दृक श्राव्य माध्यम म्हणून त्याच्या शक्यतांचा विचार न करता भव्य नेपथ्याला टाळी दिली, नकलांना अभिनय म्हणून दाद दिली, नाटकातल्या संगीताला संगीत नाटक मानले, भावनेची गाढ अनुभूती पेलली नाही तेव्हा ऊरबडवे नाट्याभ्यास पत्करले, जुन्याच नाटकावर नवे तंत्र चिकटवले, त्याला नवनाट्य मानले. कारण शेवटी घोषणांच्या पाठीमागे जाणारा आशाळभूतपणा आपला सामाजिक स्वभाव आहे. घोषणा बदलल्या की समाजपुरुष बदलतो असे मानणारा आळशी भाबडेपणाही आपल्याजवळ आहे.") दिग्दर्शक, भाषांतर यांविषयीचे लेख, 'समकालीन व तात्कालिक' यातील फरक नोंदवणारा 'जीवघेणा आतला अंधार' हा लेख आणि मला सर्वात आवडलेला 'नाटक ज्याचे त्याचे' हा लेख ( प्रशांत दामलेची लोकप्रियता हे रसविघ्न आहे, असे एक धमाल विधान यात आहे.) यानंतर आहेत. 'व्यावसायिक रंगमंचावरून नाटककार अदृश्य' हे शीर्षकच बोलके ठरावे. नाटकांच्या जाहिरातीच्या वाढत्या आकारमानाचा त्यात उल्लेख आहे. ( अवांतर : नुकत्याच आलेल्या 'झालाच पाहिजे' या नाटकाची जाहिरात रंगीत व पूर्ण पान ( तेही पहिले पान ) होती. ही पहिलीच घटना असावी. नारायण राणेंचा मुलगा या नाटकाच्या पाठीशी आहे.) शेवटाकडे 'नाट्यविषयक लेखन : काही प्रश्न' या लेखात त्यांनी नाट्यसमीक्षेबाबतही लिहिले आहे.

लेखांचा कालखंड देणे गरजेचे होते. काही जुने संदर्भ लागत नाहीत व परिभाषा उलगडत नाहीत; त्यामुळे तळटीपा गरजेच्या होत्या.
पुष्पाबाईंची स्त्रीवाद, स्त्रियांच्या कविता, स्त्रियांची आत्मचरित्रे, लेखकांच्या पत्नींची आत्मचरित्रे अशा विषयांवरील काही व्याख्याने ऐकण्याचा योग आला आहे. ही व्याख्याने ( अर्थातच! ) रेकॉर्ड केलेली नाहीत. निदान इथे वझेंनी जशी मुलाखत घेतली आहे, त्या पद्धतीने या ( आणि अजून काही ) विषयांवरील प्रश्न बाईंना विचारून बोलते केले, तर अजून एक उत्तम, स्पष्ट, परखड मते असलेले पुस्तक हाती येईल. या विशेषणांसोबत अजून एक शब्द जोडावा वाटतो - कळकळ. एखाद्या क्षेत्राविषयीची कळकळ असेल, तर माणूस ज्या प्रामाणिक उत्स्फुर्ततेने बोलतो, ते या मुलाखतीत जाणवत राहते. त्यात खोडसाळपणा नाहीये व कुरापती काढणे तर अजिबातच नाहीये.

जाताजाता बाईंचा अजून एक मुद्दा सांगण्याचा मोह झाला आहे. तो त्यांच्याच शब्दांत :
"कोणत्याही समाजाच्या इतिहासात काही वेळा अशा येतात की काही प्रवृत्ती सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेल्या दिसतात. तसे आज सर्व क्षेत्रांत अनुभव पृष्ठभागावर घेणे, कोणत्याही गोष्टीविषयीचा अभिप्राय शेरेबाजीच्या स्वरूपात देणे, एकाग्रतेने काही ऐकण्याचा कंटाळा करणे हे विशेष सामाजिक व्यवहारात दिसतात. वर्तमानपत्राचे संपादकीय पान न वाचता बातम्यांचे मथळे वाचणे, व्याख्यानमालेतील विषय निवडताना चुटके, आठवणी यांना स्थान देणे, संभाषणात विशेषणांची खैरात करणे असे त्याचे आविष्कार सांगता येतील. या प्रवृत्तीचा प्रेक्षकवृत्तीवरही अनिष्ट परिणाम होत असतो."

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

उदय प्रकाश यांच्या कथा

उदय प्रकाश : हिंदीतला उत्तम दर्जाचा हा लेखक मी वाचला मात्र मराठीमधे. "तिरीछ आणि इतर कथा" या नावाने त्यांच्या निवडक कथा मराठीमधे प्रकाशित झालेल्या आहेत.

हा कथासंग्रह प्रकाशित व्हायच्या आधीच त्यांची "पॉल गोमरा का स्कूटर" नावाची कथा मी मराठी मधे वाचली होती. या कथेचा मनावर झालेला संस्कार अजूनही आठवतो. प्रस्तुत टिपण हे या आठवणींच्याच नोंदी आहेत असे म्हणता येईल.

पन्नासच्या दशकामधे उत्तर प्रदेशात जन्माला आलेल्या आणि दिल्लीमधल्या एका सरकारी कचेरीमधे काम करणार्‍या एका मध्यमवयीन माणसाला नव्वदीच्या दशकामधे आलेले अनुभव असे या कथेचे सरळसोट् वर्णन करता येईल. परंतु, या साध्याशा घटनेच्या निमित्ताने उदयप्रकाश सद्य काळामधे झपाट्याने बदलणार्‍या जगामधे सामान्य माणसाच्या मूल्यव्यवस्थेमधे झालेली उलथापालथ नोंदवतात. बदलत्या वास्तवाचे , त्या बदलाच्या वेगाचे, या सार्‍या वेगात सामान्य माणसाच्या उडालेल्या गोंधळाचे चित्रण करतात.

"रामगोपाल सक्सेना" नावाचा हा गोंधळलेला , हिंदी कवितांवर प्रेम करणारा माणूस असा गोंधळलेला आहे. काळाने रोखलेल्या शिंगाला तो भिडू शकत नाही. आपल्या देशी, कुठलीही बहुपदरी ओळख नसलेल्या आपल्या व्यक्तित्त्वाचा या आधुनिक जगतामधे मेळ घालता यावा म्हणून दोन निर्णय घेतो . एक म्हणजे आपल्या "रामगोपाल" या नावाचा त्याग करून "पॉल गोमरा" असे नाव घारण करणे आणि परवडत नसतानाही एक स्कूटर विकत घेणे ! कधीही चालवता न आलेल्या स्कूटरमागे त्यांची झालेली धूळाधाण आणि एकंदरच नव्या जगाचा आणि त्या जगात आपल्या अस्तित्वाचा अर्थ समजून न आल्यामुळे शेवटी इतरांना वेडे वाटेल अशा अवस्थेपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि त्यांचा मृत्यू हाच या कथेचा गाभा.

अत्यंत गंभीर , प्रसंगी जीवघेण्या अशा घालमेलीचे चित्रण कराताना त्यांची शैली एकाच वेळी व्यंगात्म असते आणि त्याचबरोबर करुणेने ओतप्रोत भरलेली. आपल्या चालू काळाचे अनेक स्नॅपशॉट् घेतल्यासारखी भेदक , चित्रदर्शी शैली. या शैलीची या कथेपुरती झलक पाहू :

"... म्हणजे ते कामचुकार होते असंही नव्हतं. ते अतिशय कष्टाळू होते. प्रूफ रीडींग, ले आउट् ची कामं झपाटून एखाद्या भुताप्रमाणे करत. इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पण वर्तमानकाळ मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर होता.....खूप परिश्रमपूर्वक एकाग्रतेने ते सद्यस्थिती समजून घ्यायचा प्रयत्न करत, पण तोवर ती परिस्थिती बदलून जातसे. खासकरून गेल्या दहा वर्षांत तर पाहता पाहता सर्व जग बदलून गेलं होतं. त्यांचं वर्तमानपत्रच मोनोप्रिंटींगह्या भूतकाळातून निघून फोटो-कंपोझिंगमधे जाता, आता पूर्णपणे कंप्यूटराईज्ड् होऊन गेलं होतं. पापणी लवण्याच्या आत पानंच्या पानं सॅटेलाईट् प्रक्षेपणाद्वारे दिल्लीहून मुंबई, अहमदाबादला जाऊन पोचत. जाड भिंगांचा चष्मा घातलेले, चिमटीने टाईप जुळवून एकेक अक्षर मात्रा जुळाविणारे विड्या फुंकणारे म्हातारे कंपॉझिटर्स् नाहीसे झाले होते...."

"पॉल गोमरांच्या नजरेला दिसणारं दृष्य आणि त्यांच्या मेंदूतले विचार यातली तर्कसंगतीच गडबडून गेली होती. संन्यासी वातानुकुलित गाडीतून तीर्थयात्रा करत होते आणि एनाराय् धनाच्या सहय्याने कारसेवा करत होते. एक तांत्रिक आंतरराष्ट्रीय शस्त्रबाजारात खरेदीविक्रीत दलाली करत होता.आणि पन्नास वर्षे एका झाडावर मकाण बांधून राहिलेल्या एका बाबाच्या पायाच्या अंगठ्याची धूळ मस्तकाला लावण्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं मंत्रिमंडळ रांग लावून चिखलात उभं होतं..."

...." हे दोन्ही निर्णय हिंदी कवी पॉल गोमराच्या आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे निर्णय होते. आणि प्रतिकात्मरीत्या या दोन्ही निर्णयांचा परीघ अतिशय विस्तृत होता.त्यांना या युगाचे अगणित संदर्भ होते.."

"..पॉल गोमरांची स्कूटर अजूनही शांतिवनाशेजारच्या दर्यागंज ट्राफिक पोलिसांच्या आवारात मागल्या बाजूला मोडतोड झालेल्या अवस्थेत पडलेली आहे. त्या दुर्घटनाग्रस्त स्कूटरच्या बॉडीवर विक्षिप्त पॉल गोमरांच्या रक्ताचे डाग आहेत. जे सुकून् काळे पडले आहेत.

आणि त्या स्कूटरच्या डिकीत पॉल गोमरांच्या कवितेची एक डायरी अजून् पडून आहे. तिच्या शेवटच्या पानावर लिहिलं आहे :
लुप्त होत आहेत ज्या प्रजाती
वास्तव नष्ट करतंय त्यांचं अस्तित्त्व
होता नये आपण त्यांच्या हत्येत सामील
आणि शक्य झाल्यास जपून ठेवायला हव्यात
त्यांच्या प्रतिमा....
या प्रतिमा स्मृतिचिन्हे आहेत पूर्वकाळाची....."

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

उत्तम

प्रतिसाद अतिशय आवडला. पॉल गोमरावरून संतोष शिंत्रे यांची 'यिन, यँग अन साताळकर' ही कथा आठवली.

आणखी एक उत्तम ओळख

हे देखील पहा.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"द बिग शॉर्ट"

मायकेल लुइस या अर्थक्षेत्रातल्या पत्रकाराने लिहिलेलं "द बिग शॉर्ट" हे २००८ सालातल्या अमेरिकन बँकिंग क्रायसिसमधील काही महत्त्वाच्या घटनांचं वर्णन करणारं पुस्तक.

काही गोष्टी सामान्य वाचकाला साधारणपणे माहिती असतातच : २००८ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेमधे प्रचंड मोठी मंदी आली, या मंदीमागे मोठमोठ्या बँकांचं वाजलेलं दिवाळं कारणीभूत होतं, या बँका बुडण्याचा संबंध रिअल इस्टेट चा बुडबुडा फुटणं हे होतं. हा बुडबुडा फुटला त्यामधे "सबप्राईम लोन्स" क्रायसिसचा - अर्थात एरवी प्रचंड मोठी गृहकर्जे मिळण्यास पात्र नसलेल्या लोकांना दिलेली कर्जे बुडणं या घटनेचा - मोठा हात होता. या घटनांदरम्यान बेअर स्टर्न्स, लेहमन ब्रदर्स, वकोव्हिया , वॉशिंग्टन म्युचुअल या वॉलस्ट्रीट वरच्या सर्वाधिक मोठ्या ब्यांकांपैकी असणार्‍या संस्था बुडाल्या, मेरिल लिंच सारखा मोठा मासा अन्य बँकेने विकत घेतला आणि अमेरिकन सरकारने हजारो कोटी डॉलर्स यात ओतले इत्यादि इत्यादि.

२००८ पासून उपरोक्त दुर्घटनांबद्दल वर्तमानपत्रांमधून, नियतकालिकांमधून आणि हजारो पुस्तकांमधून बरंच लिहिलं गेलं/जात आहे. एकाच एका पुस्तकामधे या सर्व जगड्व्याळ प्रकाराचा थांग लागणं अशक्यच.

मायकेल लुइस यांच्या प्रस्तुत पुस्तकाचा व्यूह आहे, तो या सर्व बुडित खात्यांच्या पार्श्वभूमीवर, ज्यांनी हे असं होणार असं नेमकं ओळखलं इतकंच नव्हे तर ज्यांनी या बँकांच्या विरोधात जुगाराचा डाव लावला आणि या क्रायसिसच्या अखेरीस प्रचंड पैसे कमावले त्यांच्याबद्द्लचा. पुस्तकाचा एकंदर प्रकार उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरीसारखा आहे असं म्हणता येईल.

या सर्व प्रकाराला समजून घेण्याकरता लागणारी मूलभूत संज्ञांची माहिती लुईस रटाळ न होऊ देता वाचकाला करून देतो. काही संज्ञा आणि काही घटनांमागची मीमांसा या गोष्टी मला या पुस्तकातून समजल्या.

उपरोक्त "सबप्राईम लोन्स"मुळे काही मोठमोठ्या बँका नष्ट झाल्या, बर्‍याचशा बँकाना फटका बसला या गोष्टी सर्वज्ञात आहेच. मात्र ज्या बँका बुडाल्या त्या काही लोकांना कर्जे देणार्‍या बँका नव्हत्या तर प्रामुख्याने "इन्व्हेस्टमेंट बँका" होत्या. अमेरिकन रिअल इस्टेट कदापि बुडणार नाही, जागांचे भाव वाढतच रहातील, आणि यात "सबप्राईम लोन"ही सुरक्षित रहातील या गृहितकांवर आधारित काही "बाँड्स" बाजारात आणले गेले. त्यांचं वर्णन "सबप्राईम मार्केट बाँड्स" असं केलं गेलं. आता या बाँडस चा अर्थ काय ? तर "ही गृहकर्जे बुडणार नाहीत" या गृहितकावर आधारित इन्शुरन्स. विविध गृहकर्जांवरच्या या बाँड्सचे एकत्र गठ्ठे करून त्याची वेगवेगळी प्रोडक्ट्स बनविण्यात आली. लेहमन आणि बेअर स्टर्न्स या बँका (इतर बँकाप्रमाणेच) हा इन्शुअरन्स विकत तर होत्याच, परंतु त्यात होणारा फायदा पाहून त्यापैकी बरेचसे बाँड्स त्यांनी स्वतःही विकत घेऊन ठेवले होते. या दोन मोठ्या बँका बुडण्यामागे हे मोठं कारण होतं.

हे "सबप्राईम मार्केट बाँड्स" उच्च दर्जाचे - म्हणजे अत्यंत सुरक्षित आहेत - पर्यायाने ज्या कर्जांवर आधारित हा इन्शुरन्स आहे ती कर्जे अत्यंत सुरक्षित आहेत असा "आशीर्वाद" मूडीज् , एस अँड पी या रेटींग एजन्सीजनी दिला. त्यांचाही या सर्वनाशामधे मोठा हात होता/आहे. या एजन्सीनी जर का सरसकट सर्वांना त्यांचं AAA रेटींग दिलं नसतं तर ही प्रोडक्ट्स मार्केटमधे येऊ शकली नसती, आली तरी कुणी त्याला हात लावला नसता.

आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाँड मार्केटमधील नियंत्रणाच्या अभावाचा. स्टॉ़क्स, म्युचुअल फंड्स, सेक्युरिटी यांच्या व्यवहारांमधे असले असुरक्षित आणि मुख्य म्हणजे ग्राहकाला फसवणारे व्यवहार होऊ नयेत म्हणून (भारतातल्या सेबी सारखी) अमेरिकेतली SEC सारखी पोलीसी यंत्रणा कार्यरत असते. मात्र बाँड्सचा बाजार या अखत्यारीत न येण्याचा मोठा हातभार या क्रायसिसला लागला.

ज्या व्यक्ती/संस्थांनी या बाँड्सच्या विरोधात आपला दावा लावला - म्हणजे ही इन्शुरन्सची प्रोडक्ट्स बुडतील तेव्हा त्यांना पैसे मिळतील अशा प्रकारच्या व्यवस्थेमधे खरेदीदार म्हणून भाग घेतला, ते लोक अर्थातच अल्पमतात होते. एका अर्थाने त्याने बँकिंग व्यवस्थेच्या विरोधातच दावा लावलेला होता. जेव्हा बाजी उलटायची वेळ आली तेव्हा इतक्या मोठ्या व्यवस्थेने कसे अडसर आणले, "आपण बरोबर आहोत" या विश्वासाला धरून ठेवून वाटचाल करणं किती कठीण होतं आणि जेव्हा मार्केट उलटलं आणि पैसे मिळवण्याची वेळ आली तेव्हा तोंडात कशी कडवट चव आली याचीही वर्णने पुस्तकात येतात.

अमेरिकन अर्थव्यवस्थेतल्या एका महत्वाच्या (काळ्या म्हणता येईल अशा) अध्यायायाचं , "हावरटपणा" व्यवस्थेमधे कसा येतो, आणि त्यावर नियंत्रण नसण्याच्या परिस्थितीमधे काय उद्भवू शकतं याचं अत्यंत रोचक असं विवेचन या पुस्तकातून मिळालं.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मार्जिन कॉल

अमेरिकन अर्थव्यवस्थमधील उलथापालथीच्या सुरुवातीच्या काळात एका फायनान्स कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना या प्रकाराची कुणकुण लागते आणि या घोटाळ्यात आपले कमीतकमी नुकसान होण्यासाठी कसे अचाट प्रकार केले जातात हे दाखवणारा मार्जिन कॉल हा चित्रपटही या निमित्ताने आठवला. पाहिला नसल्यास अवश्य पाहावा.

http://www.imdb.com/title/tt1615147/?ref_=sr_1

सिनेमा

सिनेमा पाहिलेला आहे. उत्तम आहे.

कंपनीच्या दोन ज्युनियर लोकांनी केलेल्या संशोधनावरून कंपनीने मॉर्टगेज बॅक्ड सेक्युरिटीज मधून त्वरेने अंग काढून घेण्याबाबत गोल्डमन सॅक्स या कंपनीशी मिळतंजुळतं चित्रण आहे असं ऐकून आहे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

भारी

प्रतिसाद अतिशय आवडला. क्रायसिसचा वेगळाच पैलू दिसतोय एकदम! हे पुस्तक केवढ्याला मिळेल? घेऊनच टाकतो. तेवढेच अर्थशास्त्रातले आपल्यालाही काही कळते असा भाव मारायला बरे (डोळा मारत)

(अमेरिकेची आर्थिक घडी बसविण्याचा खरा मार्ग सांगण्यास उत्सुक असलेला पुण्यनगरीपौरसंस्थेतील मुख्य मूषकसंहारक) बॅटमॅन.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

१. फ्लिपकार्टावर पहा मिळतं

१. फ्लिपकार्टावर पहा मिळतं का.

२. पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या "व्यक्तिरेखां"बद्दल : http://www.businessinsider.com/where-are-they-now-the-big-short-edition-...

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

फ्लिपकार्टावर पाहिले, मिळतेय.

फ्लिपकार्टावर पाहिले, मिळतेय. लिंकबद्दल धन्यवाद. (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

लिहावे नेटके

काही दिवसांपूर्वी चिंतातुर जंतूंचे हे परीक्षण वाचल्यापासून डोक्यात होता तो 'लिहावे नेटके' हा पुस्तकसंग्रह काल विकत घेतला. पुस्तके फार म्हणजे फार सुंदर आहेत. रंगीत चित्रांच्या साहाय्याने सोप्या भाषेत भाषेच्या लकबी, वाक्यरचना, क्रियापदे, विरामचिन्हे, उपसर्ग इ. भाषिक अंगे समजावली आहेत. मुलांशी थेट संवाद साधत मिश्कील शैलीत पुस्तके लिहिली आहेत. मुलांना नियम थेट सांगण्यापेक्षा उदाहरणांमधून मुलांनी नियम स्वतःच शोधावा यावर भर आहे. पुस्तकात अनेक कोडी, रंजक भाषिक खेळही आहेत. आज्ञार्थ ह्या प्रकरणातील हा गमतीदार उतारा आणि त्यावरील प्रश्न पहा.

....

मी तेव्हा सात-एक वर्षांचा असेन. कुणाच्या तरी मंगळागौरीच्या जागरणाच्या निमित्ताने आळीतल्या उत्साही मुलींनी आम्हा लहान मुलांचे नाटक बसवायचे ठरवले. त्यात राजपुत्र, राजकन्या, राक्षस वगैरे नेहमीचाच मसाला होता. पण समजत नसलेले शब्द घडाघडा म्हणण्यातही मजा असते, तशी मजा आम्हाला येत होती. राजपुत्राला संवादच नव्हते. त्या मानाने अख्खी दोन वाक्ये वाट्याला आलेली साधूची भूमिका मला मिळाल्यामुळे मी खूष होतो.

पहिलीच तालीम प्रत्यक्ष प्रयोगापेक्षा जास्त संस्मरणीय ठरली. माझे वाक्य होते : 'राजकन्ये, राजपुत्राच्या आठवणीनं तू झुरू नकोस. तो तुला लवकरच भेटेल, असा मी आशीर्वाद देतो.' राजकन्या झालेली समोरच्या वैद्यांची मधुरा मख्ख चेहेऱ्याने माझ्याकडे बघत होती. मागून प्रतिमाताई कुजबुजत होती, "हं, टिंबू... म्हण, राजकन्ये, ... राजपुत्राच्या आठवणीनं...." तिचे दोन-तीनदा ऐकून घेतल्यावर मी एकदम मधुरावर ओरडलो, "अगं, झूर ना! त्याशिवाय मी 'झुरू नकोस' असं कसं म्हणणार?" यावर हसण्याचा असा काही स्फोट झाला, की मधुरा घाबरून रडायलाच लागली.

माझ्या संवादात ह्या वाक्याची भर घालण्यात आली आणि प्रत्यक्ष प्रयोगात तर सगळ्या बायकांनी मला तो पुन्हा पुन्हा म्हणायला लावला. राजकन्येला झुरण्याची आज्ञा देण्याची माझी कल्पना एकदम सुपरहिट झाली. तेव्हापासून मलाच चित्रविचित्र आज्ञा करण्याचा छंद सगळ्यांना जडला. मी रुसलो की, 'ए टिंब्या, फूग ना!'. स्वस्थ बसलो की, 'थोडा चुळबुळ रे!' बारकी पोरेसुद्धा रस्त्यातून जाताना 'ए टिंब्यादादा, खिडकीतून ढुंक ना जरा!' म्हणून ओरडत. असे मी कॉलेजला जायला लागेपर्यंत चालू राहिले.

करण्याची आज्ञा देता येत नाही, पण न करण्याची आज्ञा मात्र देता येते, अशी मजा आणखी कोणत्या क्रियापदांची होते? आठवतील तेवढी लिही.
हे करताना कोणत्याच प्रकारची आज्ञा देता येत नाही, अशीही क्रियापदे तुला सापडतील. त्यांचा वापर करून आधीच्या उताऱ्यामध्ये आहेत तशी मजेदार आज्ञा देणारी वाक्ये तयार कर.
....

पुस्तकाच्या शिफारशीसाठी जंतूंचे मनापासून आभार.

....
गौरी देशपांड्यांचे 'उत्खनन' वाचले. चांगले वाटले, पण मध्ये मध्ये कंटाळवाणेही वाटले थोडे.

अरेच्या! हे पुस्तक, त्याचा

अरेच्या! हे पुस्तक, त्याचा चिंजंनी केलेला परिचय काहिच वाचनात आले नव्हते.
वरीत प्रतिसादावरून आणि चिंजंच्या परिक्षणावरून हे अगदी माझ्यासाठीच (अन् माझ्यासारख्या लेखनकला-अज्ञांसाठी) लिहिलेले पुस्तक वाटते आहे (स्माईल)

मिहिरचे अनेक आभार.. पुस्तकसंच नक्की विकत घेतला जाईल. ऑनलाईन मिळतोय का बघतो.

बाकी बॅट्या: १,२,३ वगैरे बघुन काल तुला 'न'वी बाजू भेटून गेले की काय असे वाटले (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(No subject)

(दात काढत)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रोचक! एकुणात रवींद्रनाथकृत

बहुत रोचक! एकुणात रवींद्रनाथकृत सहजपाठाचा मराठी अवतार दिसतोय. हे अशा पद्धतीने शिकल्यावर व्याक्रणाचे शिक्रण सगळेजण भुर्कत खाऊन टाकतील यात शंका नसावी. (स्माईल)

शिक्रण न आवडणार्‍यांसाठी मटार उसळ आहेच.

पोळ्या कुठे म्हणून उसळू नये. आपापल्या घेऊन याव्यात.

अवांतर समाप्त.(एकदाचे)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

व्हॉट इफ वुई नेव्हर रन ऑउट ऑफ ऑईल

व्हॉट इफ वुई नेव्हर रन आउट ऑफ ऑईल?, उर्जा अक्षय्यतेच्या-बाबत धोक्याची घंटा वाजविणार्‍यांचे हात धरणार्‍यांसाठी हे वाचन रोचक आहे असं शिर्षकावरुन तरी वाटतयं.

वनवास...

ऱोचना -> पहिला हात 'वनवास'लाच घातला आहे.. पण निरागसतेचा डोस जास्त होतो आहे अस वाटल की..'सिन्हासन' हातात घेतो. तोल चान्गला साम्भाळला जातो (स्माईल)

वनवास...

ऱोचना -> पहिला हात 'वनवास'लाच घातला आहे.. पण निरागसतेचा डोस जास्त होतो आहे अस वाटल की..'सिन्हासन' हातात घेतो. तोल चान्गला साम्भाळला जातो (स्माईल)

लम्पन..

लम्पन बद्दल बरेच ऐकल्यामुळे...'वनवास', 'पन्खा','झुम्बर' आणि 'शारदा सन्गीत' तसेच आवडती 'सिन्हासन' आणि 'मुम्बइ दिनान्क' बूकगन्गा वरुन घेतली.. वाचनलायतुन आणलेल 'शिवार' पण आहे.

जसे मोकळ्या बस मधे असताना ह्या सीट्वर बसु का त्या? होत...तस हे पुस्तक वाचु का ते... असे होते आहे.

लंपन

लंपन आवडल्यामुळे शोधुन शोधुन प्रकाश संतांचे आणखी एक पुस्तक हुड्कुन काढलेच... चांदण्याचा रस्ता...छानच आहे... बाकी संतांच्या लेखनाविषयी काही सांगायला नकोच.. (स्माईल) (स्माईल)

manaamanasi.wordpress.com

सर्वात आधी "वनवास"! मालिकेतले

सर्वात आधी "वनवास"! मालिकेतले माझे आवडते पुस्तक. सगळ्याच कथा मस्त आहेत, पण क्रिकेटची टीम गोळा करण्याचा किस्सा, आणि लॅडीज च्या खेळाची गोष्ट खासच.

+ १०१००.भैरप्पांचे चपखल

+ १०१००.

लंपन म्हंजे सत्राशेसाठ वेळा वाचला तरी मॅडसारखा पुन्हा एकदा खुणावणारा, नाकापुढचा दोरेबुवाच जणू.

भैरप्पांचे चपखल भाषांतर उमा कुलकर्णींनी केले तसे लंपनचे भाषांतर खास धारवाडी-बेळगावी कन्नडमध्ये कुणीतरी करावे अशी फारा दिवसांपासूनची इच्छा आहे. वाचायला लै मज्जा येईल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अगदी, अगदी! नीव माडरी, नाव

अगदी, अगदी!
नीव माडरी, नाव ओदावरु रगड मंदि इद्दीव इल्ले!

अदरसलवागि मराठी-कन्नड

(स्माईल)

अदरसलवागि मराठी-कन्नड इब्बुरदु भाळ प्रॅक्टिस बेकरी, अदक्क नीवु माडबिडी लंपनद केलसा (स्माईल) मत्तु नानगरे प्रॅक्टिस आगतद (स्माईल)

अवांतरगळु: सीमावर्ती भागातल्या मराठीवर कन्नडचा जास्त प्रभाव असतो की कन्नडवर मराठीचा? मला तरी मराठीवर कन्नडचा जास्त प्रभाव असतो असे वाटते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

रिबेका वाचलं. इतर गॉथिक

रिबेका वाचलं. इतर गॉथिक पुस्तकांप्रमाणेच ( वुदरिँग हाईट्स, जेन एर ) एकदा वाचण्यासारखं आहे. हिचकॉकचा चित्रपट आधीच पाहीलेला त्यामुळे कथानक माहीत होते.
या पुस्तकाच्या प्रसिद्ध पहील्या आणि शेवटच्या वाक्यांऐवजी 'she was not even normal' हे वाक्य जास्त रोचक वाटलं. normal कोणाला म्हणायच फार मोठा प्रश्न आहे (स्माईल)
आता 'रिबेका अॅज नअॅरेटर' अशी कथा वाचायला आवडेल...

Amazing Amy

http://www.rediff.com/getahea

http://www.rediff.com/getahead/slide-show/slide-show-1-books-40-and-unde...
यापैकी कोणाची &/ कोणती पुस्तकं वाचावीत सुचवू शकाल का?
मला फक्त फिक्शनमधे रुची आहे.

Amazing Amy

freakonomics फ्रिकॉनॉमिक्स

freakonomics फ्रिकॉनॉमिक्स हा गंमतीशीर प्रकार वाचतोय.
जालावर बर्‍याच जणांकडून त्याबद्दल ऐकलं होतं म्हणून वाचायला घेतलं.
दर गोष्टीला नव्या चष्म्यातून पहायची, विद्यासकट त॑पशील मांडण्याची शैली आवडली. त्यामुळेच वाचताना घासूगुर्जींचीही मधून मधून आठवण होत होती.
असो.इथल्या पब्लिकची त्याबद्दलची मतं जाणून घ्यायला आवडतील.
.
मधे टैम मिळाला होता तेव्हा जाता-येता शेजवलकरांचं "निजाम्-पेशवे संबंध" वाचलं. तेही वाचावे असे इतरांस सुचवू इच्छितो.
.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'तेवढे' धक्कादायक नाही

फ्रिकनॉमिक्स माझ्याकडे आहे. मी मोठ्या अपेक्षेने आणले होते.
पुस्तक चांगले आहे. बरीच मते, निष्कर्ष वगैरे रोचक आहेत.
--
फक्त मी ज्या अपेक्षेने आणले होते तेवढे धक्कादायक काहि हाती लागले नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बॉस्टन/किंडल सिंगल्स

बॉस्टनमधल्या स्फोटानंतर वाचलेल्या बातम्या किंवा लेखांतून लागलेला सूर काहीसा बॉम्बस्फोटोत्तर 'मुंबई स्पिरिट'सारखा आहे. यावर दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. एक त्या शहराच्या स्पिरिटबद्दलचा अभिमान मिरवणारी, दुसरी 'आपण कसे मुर्दाड बनत चाललो आहोत, हे स्पिरिट म्हणजे इतर काही नसून आपला निबरपणा आहे' अशी हमखास आंजाप्रतिक्रियाखेचक आणि काव्यपाडक.

मात्र बदलत्या जगाबरोबरच अशा घटना काही प्रमाणात घडतच राहणार; हे जाणून काही लहान, रचनात्मक बदलही परिणामकारक ठरू शकतात. बॉस्टनमधल्याच डॉ. अतुल गवांडे यांचा हा छोटेखानी लेख त्याबद्दलचः
Talking to people about that day, I was struck by how ready and almost rehearsed they were for this event. A decade earlier, nothing approaching their level of collaboration and efficiency would have occurred. We have, as one colleague put it to me, replaced our pre-9/11 naïveté with post-9/11 sobriety. Where before we’d have been struck dumb with shock about such events, now we are almost calculating about them.

---

काही मोजकी नियतकालिकं सोडली तर एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती देणारे लेख किंवा बराच काळ शोध-पत्रकारिता करून लिहिलेले लेख तसे दुर्मिळच. त्यातच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्राबल्यामुळे वाचकांच्या 'अटेन्शन स्पॅन'वरही परिणाम होत असल्याने छोट्या, बाईट-साईझ बातम्या देण्याकडे कल वाढला आहे, असं म्हटलं जातं. (अपवाद 'स्नो फॉल' सारख्या पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांचा एकत्रित वापर करणार्‍या काही लेखांचा/फीचर्सचा).

किंडल सिंगल्स हा त्यातल्या त्यात मध्यम मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न आहे. काही महिन्यांपूर्वी त्यात 'द हार्ट ऑफ हायकू' हे अतिशय रोचक इ-पुस्तक/फीचर सापडले होते. अलीकडेच याच प्रकारात स्टीव्हन किंगचा 'गन्स' हा लेख वाचनात आला.

सँडी हूक किंवा ऑरोरा येथे झालेल्या दुर्घटनांनंतर प्रतिक्रियांचा, प्रति-प्रतिक्रियांचा आणि अखेरीस 'जैसे थे'चा जो ठरावीक घटनाक्रम दिसून येतो; तो या लेखात परिणामकारकपणे रेखाटला आहे. योगायोगाने आज सिनेटमध्ये झालेल्या फियास्कोने त्यावर नेमके शिक्कामोर्तब केले. स्वत: अनेक बंदुका बाळगून असणार्‍या आणि सेकंड अमेंडमेंटवर गदा येऊ नये, अशी धारणा असणार्‍या व्यक्तीने अजिबात टोकाची भूमिका न घेता याबद्दल सोदाहरण लिहिले आहे, हे विशेष.

हा लेख

बोस्टनचा विषय आहे म्हणून. हा एक लेख वाचला.

'स्नो फॉल' साठी धन्यवाद.

'स्नो फॉल' साठी धन्यवाद.

नक्की कोणत्या धाग्यात लिहावं

नक्की कोणत्या धाग्यात लिहावं हे न समजल्यामुळे या धाग्यात लिहीते आहे.

कौशल पारेख या व्यावसायिक छायाचित्रकाराची मुलाखत इथे वाचली. या मुलाखतीमधला मला महत्त्वाचा वाटलेला भागः

With today’s digital technology almost everyone can take great images in the Himalayas or in Alaska. But put photographers on the streets of Mumbai or New York and you will end up with mostly unsatisfying images regardless of the technology at hand. Street photography is not for everyone and that’s because it’s not easy to make a good street image. It’s even harder to make one that someone would like to hang in their home. But it is real and in a way it is a documentation of history.

पारेख आणि अन्य लोकांनी भारतातल्या रस्त्यांची काढलेली छायाचित्रं इथे बघता येतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्थिरचित्र विरुद्ध नाट्यमयता

>>Street photography is not for everyone and that’s because it’s not easy to make a good street image.<<

सहमत आहे. भारतातल्या रस्त्यांवर शेकडो नाटकं एकाच वेळी एकाच जागी घडत असतात. त्यातून नेमकं काहीतरी गवसण्यासाठी छायाचित्रकाराला एक वेगळं कौशल्य लागतं. इथे नियमित होणाऱ्या छायाचित्रण स्पर्धेत लोक ज्या प्रतिमा देतात त्या पाहून मला अनेकदा जाणवतं, की लोकांचा कल हा मुळात स्थिर असणाऱ्या दृश्याला कॅमेऱ्यात पकडण्याकडे अधिक असतो. कारण तिथे रचना करायला पुरेसा वेळ मिळतो. अगदी निसर्गातसुद्धा नाट्य असतं, पण लोक बहुतेक वेळा ते पकडणं टाळून स्थिर दृश्यंच चित्रित करत बसतात, कारण ते तुलनेनं सोपं वाटतं (त्यातही आव्हानं असतात, पण लोक पुष्कळदा तीदेखील टाळताना दिसतात). अगदी 'उत्सव' हा ताजा विषय पाहा. त्यात खरं तर नाट्यमयता पकडणारी चित्रं द्यायची चांगली संधी होती. तरीही स्पर्धेसाठी आलेले बहुतांश फोटो नाट्यहीन आहेत.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रोचक विषय

रोचक विषय. कौशलच्या मुलाखतीची लिंक, तुम्ही दिलेली थोडी गंडली आहे बहूदा.

कौशल पारेख ह्यांनी लँडस्केप फोटोग्राफीबद्दल बोलण्यात थोडा कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंटरेस्ट आहे असं वाटतं, उत्तम फोटोग्राफ म्हणजे नक्की काय हे कलेच्या इतर क्षेत्राप्रमाणेच आवाडीनुसार/समज-पातळीनुसार बदलत जातं, अवघडं किंवा सोपं हे बरचसं कलाकृती सादर करणार्‍याच्या प्रतिभेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे, लँडस्केप फोटोग्राफीमधे रचनेला महत्व आहे. घासुन गुळगुळीत झालेल्या रचनांचे फोटोग्राफ कोणीही काढू शकत असला तरी त्याचे मुळ फोटो काढणार्‍याने इतरत्र बघितलेल्या कलाकृतीत प्रत्यक्ष असते, त्याच भवतालात इतर रचना करणे शक्य असतेच पण 'रचना करण्याचा' उद्देश असला तरच प्रयत्न होऊन उत्तम कलाकृती बनण्याची शक्यता वाढते. हिमालयाच्या निरस पार्श्वभुमिवर ही रचना मला जास्त आवडली, तसेच स्ट्रीट फोटोग्राफीमधे हे, हे किंवा हे मला अधिक आवडले.

हे बघितल्यावर Andreas Gurskyचा २.७ मिलिअन पौंड कमावणारा फोटो चांगला कसा हे कळणं तर अवघडचं आहे, पण तो स्वतः म्हणतो - "It says a lot using the most minimal means … for me it is an allegorical picture about the meaning of life and how things are."

पुनःश्च गोडबोले

>>म्हणजे मुद्दा सामान्य माणसांचं भान वाढवता येईल असं लिखाण कितपत उपयोगाचं आहे असा असू शकतो. <<

असं लिखाण मी मूलतः टाकाऊ ठरवत नाही आहे , कारण मी वर असं म्हटलं आहे -

ते लिहितात त्या विषयांवर कुणीतरी मराठीत माहितीपर लिहिणं याला माझा मूलभूत आक्षेप नाही

>>त्यात रीसर्चपेपरमधे अभिप्रेत असलेली खोली नाही हे मला मान्य आहेच. पण तसा इथे दावा केला गेलेला नाही. <<

त्यांच्या लिखाणाला शोधनिबंधाची खोली असावीच असं मलाही अपेक्षित नाही. मुद्दा असा आहे की जो माणूस आपल्या आत्मचरित्रात आपल्या वैचारिक संस्कारांची एवढी थोरवी गातो त्या माणसाला अशा लिखाणात आपले विचार व्यक्त करता का येत नाहीत? तो निव्वळ कॉपी-पेस्टच का करत राहताना दिसतो? मग पुराव्याअभावी मला हे म्हणणं भाग पडतं की त्यांच्यापाशी मौलिक विचारधन बहुधा नसावंच. मग ते वैचारिक संस्कार केवळ पोकळ जाहिरातबाजीपुरतेच असावेत असं वाटू लागतं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मायकल क्रायटनची 'प्रे'

मायकल क्रायटनची 'प्रे' कादंबरी वाचली.
थीम चांगली आहे, पण पुस्तक फसलंय असं मला वाटलं. शेवट तर फारच फिल्मी आहे.. कै च्या कै..
त्यातल्यात्यात नायकाचं 'हाउसहजबंड' दिनचर्येचं वर्णन आवडलं.
कादंबरी वाचताना त्यातले काही परीच्छेद घासकडवीँच्या 'सत्याचा विजय' ची आठवण करुन देत होते. प्रे मधे इ-कोलाय ना नॅनो पार्टीकल्स चे असेँब्लर म्हणुन वापरतात. तसेच पृथ्वीच्या निर्मीतीपासून 'आताचा मनुष्य' निर्मीतीपर्यँतची उत्क्रांती २४ तासात बसवायची म्हणल्यास चित्र कसे दिसेल याचा परीच्छेद फार रोचक आहे

Amazing Amy

बिचार्‍या हजबंडाच्या दैन्यावर

बिचार्‍या हजबंडाच्या दैन्यावर समाधान व्यक्त करता काय? दुस्त कुतले!!!! पण पुस्तक फसलंय वैग्रे असहमत हां (स्माईल) आमचे आवडते पुस्तक आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

+१ सहमत आहे

आमचे आवडते पुस्तक आहे.

कथानकापेक्षाही त्यात क्रायटनने ज्या कन्सेप्ट्स वापरल्या आहेत व त्यासाठी जी माहिती पुरवली आहे त्यामुळे हे पुस्तक जास्त वाचनीय होते.

दैन्य म्हणण्यासारखं काय आहे

दैन्य म्हणण्यासारखं काय आहे त्यात?
'एक पुरुष, छानपैकी इन्व्हॉल्व होउन, दोन मुली, एक मुलगा (वय १२, ०.७५, ८ वर्ष) व्यवस्थित सांभाळतोय' हे वाचायला आवडलं मला. खर्‍या जगात हे पहायला मिळणं सध्यातरी अशक्य वाटतय. अधुनमधुन थोड्या वेळासाठी संभाळु शकतील, पण हाउसहजबंड बनुन ६ महीने हे करणारा (म्हणजे ते बाळ ३महीन्याच असल्यापासुन) एटलिस्ट फिक्शनमधेतरी वाचु द्या की (दात काढत).
आणि दैन्य वाटत असेलच तर आजुबाजुला नेहमीच एवढ्या बायका हेच आयुष्यभर करताना दिसतात की. त्यालापण दैन्यच म्हणणार का?
मला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत म्हणुन कादंबरी फसलेली वाटली
१. रिकी ज्युलीआ वगैरेचा कंट्रोल स्वार्मकडे पुर्णपणे नक्की कधी जातो? ज्युलीआचा अपघात होईपर्यँत तरी ते झालेलं नसतं. तोपर्यँत पार्शली निर्णय कंट्रोल करत असतात, असं मानलं तरीही पटणं अवघड जातं.
२. रिकी ज्युलीआचं अफेअर असतं की नाही?
३. स्वार्म बाकी सगळ्यांना इन्फेक्ट करतात, पण हिरोइनला नाही. का बरे? बायको मेल्यावर हिरोपाशी ऑप्शन असावं म्हणुन?
४. त्या सशाचं डिसेक्शन बिल्डिँगच्या जवळ आणुन का करत नाहीत?
५. स्टोअररुमधुन हवं ते मटेरील पटकन जमा करुन बाकीची कामं मेन बिल्डिँगमधे का करत नाहीत. उगाच ओढुनताणुन अॅक्शन सीन साठीच ना?
६. इन्फेक्टेड रिकी वगैरे बिल्डिँगच्या आत कसे जातात?
मी व्हँपायर वगैरेपण आवडीने वाचते, त्यामुळे अचाट कल्पना ना आक्षेप नाही. पण या पुस्तकात मला तरी बर्याच गोष्टी ओढुनताणुन आणलेल्या वाटल्या. भट्टी नीट जमली नाही.
ही लिंक छान आहे
www.nanotech-now.com/Chris-Phoenix/prey-critique-old.htm

Amazing Amy

जोक लक्षात घ्या हो, लग्गेच

जोक लक्षात घ्या हो, लग्गेच फेमिनिष्ट ब्रिगेड सोडू नका आमच्यावर (स्माईल)

बाकी मुद्द्यांबद्दल सहमत आहे, मला मुख्यतः नॅनो क्लाउड या कल्पनेसाठी कादंबरी भयंकर आवडली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पुस्तकाची थीम छान आहे हे

(दात काढत)
पुस्तकाची थीम छान आहे हे मान्य आहे.

Amazing Amy

अवचट

अजून अनिल अवचटांचा नम्बर कसा लागला नाही चर्चेमध्ये?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नव्या धाग्याचा प्रस्ताव

काही शीर्षके सुचवतो :
"अच्युत गोडबोले : एक न आवडणं" (प्रेरणा : http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html )
"आपण अच्युत गोडबोलेंना मठ्ठ तर समजत नाही ना ?
"अच्युत गोडबोले आपल्याला मठ्ठ तर बनवत नाहीत ना ?"

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मठठ

आपण अच्युत गोडबोलेंना मठ्ठ तर समजत नाही ना ?
"अच्युत गोडबोले आपल्याला मठ्ठ तर बनवत नाहीत ना ?"

येथे मठ्ठ हा शब्द अप्रशस्त वाटतो. 'एखाद्याला बनवणे' यासाठी मराठीत एक चपखल वाक्प्रचार आहे. दुर्दैवाने तो इथे लिहिणे शक्य नाही 'उगा .... बनवतो काय आपल्याला? येडा वाटलो का काय मी तुला?' वगैरे. जाणकारांनी अशी वाक्ये मनाशी म्हणून बघावीत.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मान्यच

>>>> येथे मठ्ठ हा शब्द अप्रशस्त वाटतो. 'एखाद्याला बनवणे' यासाठी मराठीत एक चपखल वाक्प्रचार आहे. <<<

हे आम्हाला मान्यच आहे. या "चपखल वाक्प्रचारात"ली गंमत अशी की, हा वाक्प्रचार हिंदीत वापरताना चमेली मधला "च" वापरतात असं दिसतं आणि मराठीत आल्यानंतर मात्र चमच्यातला "च" वापरताना ऐकल्याच्या मधुर स्मृती जाग्या झाल्या....

"मठ्ठ" शब्द वापरण्यामागची आमची प्रेरणा ही होती : http://www.aisiakshare.com/node/1720

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अच्युत गोडबोलेंविषयी

>>आत्मचरित्रामधे जर का "आपण कसे घडत गेलो" याचं प्रामाणिक चित्रण करायचं असेल तर आपल्यावर कसले कसले वैचारिक संस्कार झाले ते टिपणंही विशेष महत्त्वाचं. गोडबोले यांच्यासारख्या अफाट वाचन असलेल्याने, आपल्या impressionable वर्षांमधे जे जे वाचलं त्याबद्दल वाचताना त्यांनी या बाबीला न्याय दिला आहे असं मला वाटलं. किती वेगवेगळ्या अंगाने विचार केला जाऊ शकतो, वैचारिकतेचे पैलू कसे शेकडो असू शकतात याचा हा एक आनंददायी आणि उपयुक्त संदर्भ आहे.<<

हे सगळं ठीकच आहे; पण मग ते पाहाता असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही : एवढे वैचारिक संस्कार वगैरे होऊनदेखील जर लेखक विकीपीडिआमध्ये मिळणारी माहिती देणारी वृत्तपत्रीय स्फुटं लिहिण्यात आणि मग त्यांची बेस्टसेलर पुस्तकं पाडण्यातच धन्यता मानत असेल, तर मग हे वैचारिक संस्कार नक्की कितपत सखोल आणि किती सघन आहेत? की तो आपलीच स्तुती आपण करण्याचा निव्वळ एक प्रकार आहे? ते लिहितात त्या विषयांवर कुणीतरी मराठीत माहितीपर लिहिणं याला माझा मूलभूत आक्षेप नाही; पण त्यात पृथक्करण किंवा तौलनिक विचारांचा असणारा अभाव एकीकडे स्पष्ट दिसतो, आणि लेखक स्वत:च आपल्या वैचारिक संस्कारांची टिमकी मिरवताना दिसतो तेव्हा तो अभाव फार खुपतो.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतू यांना प्रतिसाद

गोडबोले यांच्या विचारामधे वैचारिक खोली सापडत नसणे मला शक्य वाटते. हा विषय थोडा अधिक विस्तृत आहे हे येथे मान्य व्हावे.

थोडे ढोबळपणाने - आणि काहीशा घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांत - बोलायचे तर इथे ज्ञानाची खोली आणि पैस (किंवा विस्तार) असा विचार करता येईल. माझ्यामते अच्युत गोडबोले यांचं लिखाण काहीसं दिशादर्शकासारखं किंवा उघडलेल्या दरवाज्यांसारखं मला वाटतं. अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, नॅनो टेक्नोलॉजी या आणि अशा अनेक विषयांवर गोडबोल्यांनी लिहिलेले आहे. सामान्य माणसांकरता लिहिलेल्या पुस्तकांमधे शोधनिबंधाचा ऐवज शोधायला गेलं तर माझ्यामते गोडबोले उथळ असल्याचा अनुभव येऊ शकतो. गोडबोल्यांची सर्व पुस्तकं मी वाचली आहेत. त्यामधे कुठेही रीसर्चपेपरवजा लिखाण केल्याचा दावा त्यांनी केल्याचं मला आढळलं नाही.

म्हणजे मुद्दा सामान्य माणसांचं भान वाढवता येईल असं लिखाण कितपत उपयोगाचं आहे असा असू शकतो. किंवा उपयुक्तता हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही असंही म्हण्टलं तर "गुणवत्तेचा" असं म्हणूया.

माझ्यामते सामान्य माणसांकरता केलेलं लिखाण, त्यात केलेली विषयाची सांगोपांग मांडणी, मुख्य म्हणजे अशा अनेकविध विषयांच्या मागे लागून केलेलं काम आणि मुख्य म्हणजे त्यात राखलेला दर्जा हे सारं मला आवडलं. हां, त्यात रीसर्चपेपरमधे अभिप्रेत असलेली खोली नाही हे मला मान्य आहेच. पण तसा इथे दावा केला गेलेला नाही.

अवांतर : गोडबोल्यांच्या स्वनामधन्यतेबद्दल इथे उल्लेख आलेला आहे. गोडबोले यांचा हा अवगुण मला ठाऊक आहे. किंबहुना, मी इथे गोडबोल्यांचा भाट म्हणून आल्यासारखं वाटत असेल तर याच गोडबोल्यांबद्दल तीनचार वर्षांपूर्वी मीच काढलेला हा धागा पहावा. http://mr.upakram.org/node/1012 . पण अहंमन्यता/स्वतःची जाहिरात आणि त्यांचं काम यांची फारकत केली जाऊ शकते.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ते वेगळे , हे वेगळे

मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादातील - "ती वाचण्याकरता लागणारं इंग्रजीचं मूलभूत ज्ञान असणारी असेलच याची माझ्यामते शाश्वती नाही आणि माझा तर्क असा आहे की असा त्यांचा मोठा वाचकवर्ग आहे" हा भाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या या म्हणण्याला माझा दुजोरा आहे.

मुळात गोडबोले यांची जी मराठी पुस्तके बेस्टसेलर झाली तीच मुळी या समाजाच्या बहुसंख्येला इंग्रजीचं मूलभूत ज्ञान नसल्याने. आणि गोडबोल्यांची जी इंग्रजी पुस्तके बेस्टसेलर झाली ती याच समाजाला इंग्रजीचं कामचलाऊ ज्ञान असूनही माहितीतल्या क्लिष्टतेमुळे तिच्यातले 'ज्ञान' समजत नसल्यामुळे. ज्या बहुसंख्य हिश्शाला माहितीच नीट समजत नाही तर ज्ञान कुठून होणार? थोडक्यात गोडबोल्यांचे श्रेय 'सुलभीकरणाचे' आहे. ते त्यांना द्यायलाच हवे. या पुस्तकांमध्ये त्यांच्याकडून पृथक्करण किंवा तौलनिक विचारांची अपेक्षाच करणे चुकीचे आहे.

हे झाले त्यांच्या 'माहितीप्रद' पुस्तकांबाबत. अशी 'बेस्टसेलर पुस्तके पाडणे' यावर आक्षेप आहे का? (माझा नाही. कारण मी त्यांच्या वाट्यालाच जात नाही.)

पण त्यांच्या आत्मचरित्रातही हा माहितीप्रदपणा यावा का? तर त्याला माझा आक्षेप आहे. हे आत्मचरित्र "अ रेडी रेकनर टू फिलॉसॉफिज, सोशल मूव्हमेंटस, अ‍ॅण्ड व्हॉट नॉट" अशा स्वरूपाचे झाल्याने तुकड्यातुकड्यांमध्ये कृत्रिम वाटते. या पुस्तकात बर्‍याच वेळेला गोडबोले यांनी 'नेम्स ड्रॉपिंग'ला आक्षेप घेतला आहे. पण नेमके तेच त्यांनी केले आहे की काय असाही संशय येऊ लागतो. बर्‍याच वेळेला हा माणूस काही अमुक या विषयाच्या समुद्रात गळ्यापर्यंत खोलात उतरलेला नाही पण त्याला ओझरता स्पर्श करूनसुद्धा मला समुद्र माहित आहे असे म्हणतो की काय असे वाटते. पण इतर बर्‍याच ठिकाणी त्याचे अनुभव सच्चे आहेत.

अवांतर माहिती घुसडल्यामुळे झाले आहे काय की अनुभवांचे सच्चेपणही अंगावर येत नाही आणि 'मी - एक विकीपेडिया' या नावाचे पुस्तक आपण वाचत आहोत असे वाटत रहाते.

बेस्टसेलर

गोडबोले यांची पुस्तके बेस्टसेलर होण्याचे एक वरचे (मूलगामी कारणे, जी इंग्रजी भाषेशी संबंधित आहेत, तुम्ही लिहिली आहेतच) कारण 'अशा विषयांवर मराठीत पुस्तके येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे', हे असावे. त्यातही त्या-त्या क्षेत्रातील (गोडबोल्यांनी संगीत, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा विषयांवर लेखन केले आहे, अशी माझी माहिती आहे) ज्ञानवंतांकडून होणारे लेखनही अपवादात्मक आहे, अशीही स्थिती असावी. किंवा त्यांनी केलेले लेखन लोकांपर्यंत पोचत नसावे. त्या अडचणींवर गोडबोल्यांच्या पुस्तकांनी मात केली असावी. अशा स्थितीत त्यांची पुस्तके बेस्टसेलर होण्याला बाजाराची गतीशीलता हे कारण ठरते, आणि म्हणून बाजारव्यवस्थेतच आपण असल्याने त्याला हरकत नाहीच. प्रश्न इतकाच राहतो की, गोडबोले माहिती देतात की ज्ञान देतात? तर, ते माहिती देतात, आणि त्या माहितीला दुर्दैवाने ज्ञान मानले जाण्याचा (जात असल्याचाही) धोका आहे. आणि हे फक्त गोडबोल्यांबाबतच घडते असे नाही. इतरत्रही घडते. अगदी संस्थळीय लेखनातही घडतेच. (स्माईल)

आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान.

"आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान"
असे समर्थ सांगून गेलेत, (आणि त्यापुढे 'येर ती पोट भरायाची विद्या' असेही).

बरोबर

सर्वस्वी मान्य. (हम्म, संस्थळावरील लेखकांनी मराठीत बेस्टसेलर व्हायची संधी घालवलीच... (डोळा मारत) )

हाहाहा

संस्थळीय लेखकांनी संधी घालवलेली नाही. ती आत्ता कुठं त्यांच्यासमोर खुली होतीये. तेव्हा, वाट पहा थोडी. मग तुम्ही गुगल आणि विकीनं संस्थळीय लेखक कसे घडवले हे लिहू शकाल. (डोळा मारत)

आम्ही कसले लिहीणार?

खरे संस्थळीय लेखक तर तुम्ही! आम्ही काय लिहिणार? तुम्ही लिहिलेत की वावा ,+१ इतपत आम्ही आपले प्रतिसाददाते. असो.

हे बाकी एकदम मार्मिक! पटेश

हे बाकी एकदम मार्मिक! पटेश एकदम. श्रामो म्हंटात त्याप्रमाणे माहितीसमृद्ध आणि ज्ञानसमृद्ध यांत बराऽऽच फरक आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नेमका

नेमका मुद्दा आहे हा! माहितीसमृद्ध आणि ज्ञानसमृद्ध हे वेगळे असते. पहिल्याला दुसरे समजण्याची गल्लत अनेकदा होते. इथेही काहीसा असाच प्रकार दिसतो.

कॄष्णा'ज की

गो.ग.आगरकरांचे निवडक लेख या पुस्तकातील काही निवडक लेख वाचल्यावर आता हातात अश्विन सांघीचं "कॄष्णा'ज की" नावाची विंग्रजी कादंबरी घेतली आहे.
मागे "खजिना" कथा लिहिल्यावर मी एका मित्राला त्यामागचे काहिसे बंडखोर विचार सांगितले, तर त्याने "अरे भारतीय प्लॉटवरची अशी पुस्तकं आहेतच, अर्थात मराठीत माहित नाहि पण हल्लीच्या अश्विन सांघी नावाच्या लेखकाची पुस्तकं वाच" असे म्हटल्यावर त्याच्याच शिफारसीवरून हे पुस्तक वाचायला घेतलं आहे.

कन्सेप्ट चतूर असली तरी सुरवात तरी फारशी धडाकेबाज नाही, बघू, नुकतंच सुरू केलं आहे पूर्ण वाचल्यावर सांगेन आवडलं का ते

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!