Skip to main content

गविकाकाचा सल्ला

पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किम्वा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.

प्रश्न
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.

एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः

श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.

गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.

तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.

तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.

याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.

तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.

आपला का?का?.

गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.

द.ही.:

फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.

--मनोबा व गविकाका

सविता Fri, 10/01/2014 - 14:44

काका. मला हल्ली हापिसात काम करावेसे का का का वाटत नाही?

आत्ता आहे त्याच्या १/१०० पगार असताना मी यापेक्षा जास्त काम करत होते असे मला वाटते.

प्रेमभंग, परिक्षा इत्यादी पुर्वी मन उदास अस्वस्थ करणारी कारणे सुद्धा राहिली नाहीत.

मग हा मेन्टल ब्लॉक येण्याचे काय कारण असावे आणि त्यातून बाहेर कसे यावे याबद्दल आप्ले अनमोल मत द्यावे.

गवि Fri, 10/01/2014 - 15:33

In reply to by सविता

प्रश्न गंभीर असला तरी तो कॉमन आहे हे लक्षात घेऊन तुम्हाला थोडा दिलासा मिळायला हरकत नाही.

कोणतेही काम कितीही रोचक असले तरी सुरुवातीच्या काही काळात त्याचा भर ओसरतो आणि एकारलेपणा येतोच. पण तोपर्यंत आपण त्या कामात कुशल झाले असल्याचं परसेप्शन सर्वत्र झालेलं असल्याने आपण थोड्याफार फरकाने त्याच प्रकारच्या क्षेत्रात त्याच प्रकारचं काम करत राहतो आणि "स्पेशलाईझ" होत जातो.

पैसे मिळायला लागण्याचाही आनंद सुरुवातीच्या स्ट्रगल पीरियडमधेच सर्वोच्च असतो. त्यानंतर त्यातही नवीन काही न राहिल्याने आपण एकूणच स्टेग्नेट होतोच.

अशावेळी एक उपाय करुन पाहता येईल. आनंदाच्या किंवा एक्साईटमेंटच्या मागे लागायचंच नाही. बाहेर कुठेही या गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत याची खात्री बाळगायची. कंटाळा आला तर चक्क कंटाळणे हा उत्तम उपाय असतो. त्या कंटाळ्यामुळे नव्हे, तर कंटाळ्यापासून सुटकेच्या धडपडीने आपण अस्वस्थ असतो.

एकदा हे करुन पाहिलंत की तो कंटाळाही सरेल.. कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो अशी अस्वस्था. आणि मग तुम्हाला कधीच कंटाळल्यासारखं किंवा "स्टक इन द सेकंड गियर" फीलिंग राहणार नाही.

- गविकाका

मी Fri, 10/01/2014 - 16:11

त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते.

हिच ती ब्राह्मण उपवर मुले असावीत.

अजो१२३ Fri, 10/01/2014 - 16:16

गवि/मन,
या लेखात दिलेला आपला पहिला सल्ला जाम आवडला.

आता मी माझ्या मित्राला पडलेला एक प्रश्न विचारतो. तसा त्याला पडलेला प्रश्न फार वेगळा आहे पण मी तो सभ्यतम शब्दांत मांडण्याचा यत्न करतो. आमचा मित्र म्हणे पहिल्यांदा स्त्रीकडे फक्त पाहतो, म्हणजे परिचयाची कोणी स्त्री काही कामानिमित्त त्याच्याकडे आली तर तो सुरुवातीला काही वेळ त्या व्यक्तिकडे पाहतो. पण १-२ मिनिटानंतर म्हणे तो स्त्री देहाकडे पाहू लागतो. त्याच्याकडे म्हणे स्त्रीला कळू न देता तिच्याकडे पाहण्याचे कौशल्य आहे. पण त्याला असे करणे अपराधीपणाचे वाटते. त्याला ती सवय काढून टाकायची आहे. त्याने काय करावे?
मी त्याला सल्ला दिला होता कि तू सरळ प्रत्येकीला आई-बहिण मानू लाग (आसाराम टाईप सल्ला) म्हणजे तुझे देहाकडे बघण्याचे कमी होईल. आई आणि बहिणीकडे आपण भारतीय, व्यक्ति/पुरुष म्हणून, सन्मानाने पाहतोच पाहतो आणि तिथे हे संभवणार नाही. त्यावर तो म्हणाला कि आई आणि बहीण अत्यंत जवळची नाती आहेत आणि २-३ मिनिटात वा अन्यथाही कोणाला तसे मानू लागणे असंभव आहे. प्रयत्न केला पण ती जागा इतर स्त्रीयांना देणे शक्य झाले नाही.
माझा मित्र केवळ (पण आम आदमीपेक्षा फार जास्त प्रमाणात) पाहतो आणि फँटॅसाईझ करतो. त्यापुढे तो विचार/ कृती करत नाही नाही. पण त्याचे नंतरचे अपराधीपण पाहवत नाही. सल्ला द्या.

(जास्तीत जास्त विनोदी सल्ला द्या. सगळे गंभीर सल्ले देऊन झालं आहे.)

मन Fri, 10/01/2014 - 16:55

In reply to by अजो१२३

काही संभाव्य उपाय :-

१.कच्चा कांदा भरपूर खायला सांगा. मग तोंडाचा वास येणे प्रशस्त वाटत नसल्याने माणसे आपोआप इकडे तिकडे पहात, तोंड लपवत, तोंड फिरवत बोलतात; किम्वा पुटपुटतात.
पूर्ण लक्ष स्वतःच्या बोलण्याकडेच असेल तर समोर आयेश टाकिया असली समोर पाहणे मुळात सुचणारच नाही.

२.स्त्री कडे पहात असताना स्वतःला अजिबात आवरु नकोस असे आम्गावे. बिम्धास्त बघु द्यात ऑफिसमध्ये किम्वा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी.
त्यानंतर जो काय प्रकार घडेल, त्याने फार तर थोडीफार इजा होइल, गाल वगैरे सुजेल पण अशी वाईट वाईट्ट सवय निघून जाइल एकदाची.
the best way to remember your wife's birthday is to forget it ones. च्या चालीवर वरील प्रतिसाद वाचावा.

३. साने गुरुजींचे पठण दिवसातून तीन वेळा करायला लावा. श्यामची आई पासून ते इतर काही शिकवा.

४."पगार कमी करायची बॉसला/कंपनीला विनंती करावी." ते आनंदानं ह्या उपचारात, पगार कमी करणयत सामील होतील.
आहे तोच पगार हरेकाला कमी वाटत असल्यानं तो अजूनच घटल्यावर महागाईचे आकडे डोळ्यासमोर नाचतील. इतर काही सुचणारच नाही. समोर कोण आहे ह्याचे भान राहणार नाही.
सदैव चिंता,चिंता व चिंता इतकाच प्रकार होइल

५.बाबा रामदेव ह्यांच्या आश्रमात पाठवावं. ते गे लोकांना स्ट्रेट करु शकतात म्हणे. मग ह्याच्या डोळ्यांचाही नक्कीच इलाज करु शकतील.
"अरे पण मग ते स्वतःचय डोळ्याला कायमचं ठीक का करत नाहित" असा फाल्तु प्रश्न काही हल्कट लोकं आता विचारतील .
आपण हापिसच्या टायमात कामाकडे करतो तितकच किंवा त्याहून अधिक त्या लोकांकडे दुर्लक्ष करावं.

लॉरी टांगटूंगकर Fri, 10/01/2014 - 17:52

In reply to by अजो१२३

कोअर मेकॅनिकल कंपनीमध्ये नोकरी मिळवायला सांगा. औषधाला पण स्त्रिया दिसणार नाहीत. बाकी मनोबांचे उपाय झक्कासच आहेत.

बॅटमॅन Sat, 11/01/2014 - 00:32

In reply to by लॉरी टांगटूंगकर

४ वरून ५ मार्मिक झाले ते माझ्यामुळे.

(पूर्वाश्रमीचा मेक्यानिकल इंजिनिअर, १५० लोकांत १० पोरी त्यापण....असोच!!! इ.इ.इ.) बॅटमॅन.

पुरावा आहे, उगाच नाही सांगत!!! आमच्या एका मित्राने सांगितले त्यानुसार म्हणे आम्रिकेतसुद्धा मेक्यानिकलमध्ये पोरी कमीच =))

लॉरी टांगटूंगकर Sat, 11/01/2014 - 15:14

In reply to by बॅटमॅन

:ड :D =)) अरेरेरे उसात पण असंच का, बॉस म्हणतो फार निगेटीव्हीटी आहे ब्रँचमध्येच. सुरुवातच स्ट्रेस पासून होते. त्यानंतर फटीग, मग थेअरीज ऑफ फेल्युअर :ड . इथे पोरी नसतात त्याच हेच कारण! आणि ज्या असतात त्या पोलादी असतात (Fe-males =)) =)) =)) ) :D :D :)

मिसळपाव Fri, 10/01/2014 - 17:41

काका,
मी काहि वर्षांपूर्वी मिसळपाव संस्थळावर मिसळपाव म्हणून आयडी घेतला. गंमत म्हणून. नंतर इथे ऐसीवर पण तोच वापरतो. पण दर वेळेला इथे लिहिताना 'मी या संस्थळाचा अवमान तर करत नाहिये ना?' या भावनेने मी व्याकूळ होतो. हे म्हणजे कोपर्‍यावरच्या शा चापशी वाण्याकडे जाउन "खिमजी पटेलांचं वाणसामानाचं दुकान कुठे आहे हो?" असं विचारल्यासारखं होतंय या कल्पनेने जीव गलबलतो हो. पण "एकवेळ दुसरं लग्न करेन पण डू आयडी शकय नाही" असं मी बाणेदारपणे, तेजस्वीपणे वगैरे म्हणालो आहे. (रेवतीताईकडे खाजगीत असलं म्हणून काय झालं, बाणेदार आणि तेजस्वी होतंच मुळी.) आणि बोले तैसा चाले. त्यामुळे सगळीकडे मी आता मिसळपावच. त्यामुळे सगळ्या शा चापशींकडे तीच....अं नाही, सगळ्या संस्थळांवर तीच प्रतारणा, तिच व्याकुळता, तेच जीव गलबलणं....काका, सांगायला पण संकोच वाटतोय म्हणून ईत़की वर्ष मुकाट्याने सोसलं. पण आता नाहि सहन होत. पटकन दुसरा आयडी घेउनच टाकावा असा प्रबळ विचार मनात येतो. काका, मी काय करू? बोले तैसा कीती काळ चालू? काका, मला वाचवा........

Nile Fri, 10/01/2014 - 20:02

In reply to by मिसळपाव

ऐसिअक्षरे घेऊन पहा. (येडमिन लोकांनी रिझर्व करून ठेवला नसेल तर!) मिसळपावर मिसळपाव असणारेच ऐसीअक्षरे वर ऐसिअक्षरे असतील हे सिंपल करोबरेशन आहे. ;-)

मिसळपाव Fri, 10/01/2014 - 20:55

In reply to by Nile

ऐसीअक्षरे (संपादकानी बहुदा) आधीच घेउन ठेवला आहे. मी आत्ताच ऐसिअक्षरे घेतला. नाही वापरायला नाही. येडमिनानीच घेउन ठेवायला हवा होता पण विसरले बहुदा. त्यामुळे कोणी गैरफायदा घेउ नये म्हणून अडवून टाकला इतकंच. अ‍ॅडमिन, वाचलंत ना?

अरे पण जरी मी ऐसीअक्षरे उपलब्ध असला आणि घेतला तरी तो डू आयडी झाला. मिसळपाव = ऐसीअक्षरे / ----- हे दर शा चापशाला सांगत बसू का काय? छे, त्यापेक्षा व्याकुळ होणं, जीव गलबलणं परवडलं !

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/01/2014 - 20:41

In reply to by मिसळपाव

आदरणीय मिसळपाव (काका),

तुमचा प्रॉब्लेम भलताच आहे अशी शंका येते. तुम्ही आयडी घेताना झणझणीत घेतलात खरा, पण तुम्ही मुळात वरण-भात-तूप-लिंबाची फोड आहात. मुळात तुम्ही कोणत्याही संस्थळावर मिसळपाव असा आयडी घेणं हीच वाचकांची प्रतारणा आहे. तेव्हा वाईट वाटायचं तर त्याचं वाटून घ्या. बाकी ते ऐसी अक्षरेवर कायतरी अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून आरडाओरडा करायला लोकांना फार आवडतं. त्याचा मनमुराद गैरफायदा (तुमच्या मूळ वरण-भात बाणेदार, तेजस्वी स्वभावाकडे पहाता, तुम्ही किती गैरफायदा घेणार!) घ्या आणि सुखाने धागे-प्रतिसाद देत रहा.

सांगून सवरून दुसरा आयडी काढला तर त्याला डुप्लिकेट म्हणायची पद्धत नाही. तेव्हा साहस करायचं असेल तर न सांगता नवा आयडी काढा. शिवाय दुसऱ्या आयडीने त्रास दिला नाही तरीही कोणी नव्या आयडीला डुप्लिकेट म्हणत नाहीत. काका असल्यामुळे तुम्हाला या तरुण लोकांच्या संकल्पना माहित नसतील, पण आता तुमच्या (व.भा.तू.लि.) मनात काहीही किंतु राहिला नसेल अशी आशा आहे.

तुमची लाडकी पुतणी,
Aunt Agony

मिसळपाव Fri, 10/01/2014 - 20:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"...... पण तुम्ही मुळात वरण-भात-तूप-लिंबाची फोड आहात. मुळात तुम्ही कोणत्याही संस्थळावर मिसळपाव असा आयडी घेणं हीच वाचकांची प्रतारणा आहे........" :-))))))))))))

विशेषतः मी कसा "लगेच ऐसिअक्षरे आयडी अडवून ठेवला आहे" यामुळे तर अजूनच :-)))))

वेल, आहे बुवा मी व-भा-तू-लिं......

Nile Fri, 10/01/2014 - 21:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात तुम्ही कोणत्याही संस्थळावर मिसळपाव असा आयडी घेणं हीच वाचकांची प्रतारणा आहे.

हो ना! उद्या कोणीतरी टिप्पीक्कल काकूबाई 'लवंगी मिरची' म्हणून आयडी घेतील. आम्ही आशेनं त्यांचं खातं उघडावं आणि ... असो!

मन Fri, 10/01/2014 - 17:07

In reply to by ऋषिकेश

प्रिय छोट्या मित्रा, प्रश्न पडणं हे धोतर/लंगोट पडणं वा सुटणं ह्यासारखचं असतं. दरवेळीच ते आपल्याला हवं तेव्हा पडेल असं नाही.
कधीकधी चुकून लंगोट निसटतं, धोतर सुटतं तसच कधीकधी अचानक प्रश्न पडतो.
पाऊस पडण्म हे आपल्या हातात नसतं, तसच प्रश्न पडणंही पूर्णतः नियंत्रणात असेलच असं नाही.
प्रश्न पडणं नॉर्मल आहे, तितकच न पडणंही नॉर्मल आहे.
तू स्वतःला कमी समजू नकोस. प्रयत्न करत रहा. अभ्यास चालू दे.
तसंही बोर्डामध्ये प्रश्न पडण्याला मार्क्स मिळत नसून उत्तर लिहिण्याला पडतात हे लक्षात घे.
तूही चार चौघांसारखाच आहेस. उलट थोडं चौकस असणं तुला आवडतं हेच तुझ्या पृच्छेतून दिसून येतं.

बॅटमॅन Fri, 10/01/2014 - 19:39

In reply to by ............सा…

संबंधित प्रश्नः संभावितपणे ट्रोलिंग कसे करावे जेणेकरून दुढ्ढाचार्य लोक माना डोलावतील आणि लागायचे त्यांना व्यवस्थित लागेल?

'न'वी बाजू Fri, 10/01/2014 - 21:45

In reply to by बॅटमॅन

चांगला प्रश्न आहे.

(१) ते उपजतच अवगत असावे लागते, आणि (२) ते उपजतच अवगत नसल्यास प्रयत्नाने साध्य होण्यासारखे नसते, हे अनुभवावरून सांगू इच्छितो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/01/2014 - 20:42

In reply to by ............सा…

गविकाका ट्रोल बनले? गविकाका ट्रोल कधी बनले? का बनले? आणि मला कोणी सांगितलं का नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/01/2014 - 21:17

In reply to by गवि

जालावरचे स्त्री आयडी फारच बाई चहाटळ! पुरुष आयडींना जीव अगदी नकोसा करून टाकतात.

पण मग त्यावर उपाय काय गविकाका?

बॅटमॅन Mon, 13/01/2014 - 14:21

In reply to by सविता

हा प्रतिसाद वाचताक्षणी मीही गविंच्या प्रतिसादाला माहितीपूर्ण श्रेणी दिली. नमस्काराबद्दल आभारी आहे, बोला कुठला आशीर्वाद देऊ.

सविता Mon, 13/01/2014 - 14:25

In reply to by बॅटमॅन

येत्या शुक्रवारी अप्रेझल रिझल्ट लागतोय त्यात मनासारख्या आकड्याची लॉटरी लागो असा आशिर्वाद द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/01/2014 - 02:34

In reply to by मिसळपाव

हे आणि हे पाहिलं नाहीयेत वाट्टं!

थोडक्यात तु्म्हीही कधीतरी तिखटजाळ लिहायला हरकत नाही. बाकी उत्क्रांती, मुलांशी कसं वागावं वगैरे (व.भा.तू.लिं.) ठीक आहे हो.

मिसळपाव Sat, 11/01/2014 - 03:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि "चला आता तिखटजाळ लिहूया" असं नसतं बायो! कधी आतून येईल तेव्हा नक्किच लिहिन. तोपर्यंत व.भा.तू.लिं.च खरं. sighh...... जाउंद्या. तुम्हा मुलीना नाहि उमगायचं ते. :-)

पण अरविंदराव, "हे आणि हे" पाहिलं. तरीहि.... तुम्हि? !

मन Mon, 13/01/2014 - 14:18

सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार.
*****************************************गविकाकांचे विशेष आभार.*******************************
अशीच प्रश्नोत्तरे एखाद्या अनिय्तकालिकासारखी प्रकाशित करण्याचे डोक्यात आहे.
तुमच्या शंका,प्रश्न व्य नि ने मला किंवा गविकाकांना पाठवाव्यात.
दरवेळी एक "विनर"/विजेता एण्ट्री घोषित केली जाइल.
प्रश्न पेप्रात छापून येतात तसले असले तरे चालतील, त्यातून प्रेरित झालेले, किम्व त्यात तुम्ही भर घातलेले असल्यासही हरकत नाही.
तुम्ही स्वयंत्स्फूर्त असे प्रश्न बनवणयसही ना नाहिच.
.
पुनश्च आभार.