धमाल वासलेकर....

श्री संदिप वासलेकर हे नाव काही महिन्यांपूर्वी ऐकलं. त्यानंतर अमेरिक अर्थव्यस्थेबद्दलच्या धाग्यात , सौर ऊर्जेच्या उत्पादनातील आशावादाबद्द्ल वाचून ननि ह्यांना त्यांच्याबद्दल वाटणारा आदर कमी झाल्याचं दिसलं.
.
आताच इ-सकाळवर त्यांच्या नावानं पुढील मजकूर प्रकाशित झालाय.
(दुवा देत नाहीये; कारण लोकसत्ता काय किम्वा इ सकाळ काय ह्यांचे दुवे काही काळातच गंडल्यासारखे होतात. कालांतराने उघडतही नाहित.
त्यापेक्षा आख्खा लेखच पेस्टवतोय.(त्यांच्या नावासकट जशास तसा देत असल्यानं इथे प्रकाशित करायला हरकत नसावी असा माझा अंदाज आहे.))
.
***************************************लेख सुरु********************************************************
जग प्रचंड वेगानं बदलत चाललं आहे. एक मोठं वादळ क्षितिजापलीकडे भयंकर आवाज करत आपल्या दिशेनं येत आहे. नवीन युगाची नांदी होण्याची चिन्हं दिसत आहेत; पण आपल्याला याची कल्पना आहे का?

माझे मित्र हान्स एकदाल एका बहुराष्ट्रीय उद्योगसमूहाचे जागतिक अध्यक्ष होते. आता निवृत्त झाल्यावर नव्या तंत्रज्ञानाचं संशोधन करणाऱ्या काही कंपन्यांचे ते मालक झाले आहेत. या कंपन्या ते केवळ हौस म्हणून चालवतात. ते स्टॉकहोमच्या उपनगरात राहतात. मी स्वीडनला गेल्यावर स्टॉकहोम शहराच्या मध्यवर्ती भागात राहतो. ते मला भेटायला नेहमी रेल्वेगाडीनं दुसऱ्या वर्गाच्या डब्यातून येतात.

सातासमुद्रापलीकडं टोरांटोच्या उपनगरात दुसरे एक मित्र निकोलस पार्कर राहतात. ते "क्‍लीनटेक' या कल्पनेचे जनक आहेत. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी उपकरणं निर्माण करणाऱ्या तरुण उद्योजकांना लाखो डॉलर भांडवल मिळवून देण्यासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. त्यांच्याकडं स्वतःची मोटारगाडी नाही!

सध्या युरोप, कॅनडा व इतर काही देशांमध्ये खासगी मालकीची गाडी न ठेवता सार्वजनिक वाहतुकीचा वापर प्रचंड वेगानं लोकप्रिय होत आहे. हळूहळू लोक, विशेषतः सुशिक्षित लोक, गाडी घेण्याचं बंद करतील. याचा अर्थ मोटारव्यवसायाचं सरकारीकरण होत आहे, असं नव्हे. नवीन प्रकारचे उद्योग उदयाला येत आहेत. काही उद्योगसमूह वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या घेऊन लोकांना सुटीसाठी, खरेदीसाठी व प्रवासासाठी भाड्यानं देतात. हळूहळू लोक सार्वजनिक वाहतूक अथवा भाड्याच्या गाड्या वापरून आपल्या मालकीची गाडी ठेवणं बंद करतील. 2050 पर्यंत युरोपमधून खासगी मालकीची गाडी ठेवणं, ही कल्पनाच संपून जाईल, असं दिसतं. गाडीप्रमाणेच खासगी मालकीचं घरदेखील लोकांच्या मनातून उतरू लागलं आहे. 2000-2008 च्या दरम्यान बॅंकांनी अतिशय कमी व्याजात कर्ज दिलं. अमेरिकेत सर्वसामान्य लोकांनी ते घेऊन प्रत्येकी 3-4 घरं विकत घेतली. एके दिवशी हा कर्जाचा फुगा फुटला व पाश्‍चिमात्य अर्थव्यवस्थाच कोलमडते की काय, अशी भीती वाटू लागली. आता लोकांना लोभीपणा आणि चंगळवाद याबद्दल घृणा वाटू लागली आहे. हे विचार अल्प प्रमाणात चीन, जपान, कोरिया इथंही पसरत आहेत.

अजून 35-40 वर्षांचं जग असं असेल, की त्यात खासगी मालमत्ता नक्कीच असेल; पण तिच्याकडं प्रगत देशातले लोक केवळ उपयुक्ततेच्या दृष्टीनं पाहतील. गाडी व घराचा स्टेटसशी असलेला संबंध आता तिकडं संपत चालला आहे.

खासगी मालमत्तेप्रमाणेच देशाचं सार्वभौमत्व ही कल्पनाही हळूहळू लोप पावेल. युरोपमधल्या 27 देशांनी स्वखुशीनं आपलं सार्वभौमत्व एका राष्ट्रसमुदायाला बहाल केलं आहे. देशाच्या राष्ट्रीय सरकारचं महत्त्व कमी होत चाललं आहे. भारतातल्यायुरोपीय राष्ट्रांच्या वकिलाती नेहमी दोन ध्वज फडकवतात. एक ध्वज जर्मनी, फ्रान्स, इटली अशा एखाद्या देशाचा असतो आणि बाजूला युरोपीय समुदायाचा ध्वज असतो. युरोपीय समुदायाची स्वतःची संसद, चलन (युरो), परराष्ट्रसेवा, सरकार व अध्यक्ष आहेत. प्रत्येक देशाला युरोपीय समुदायाच्या घटनेनुसार आपलं वार्षिक बजेट, कायदे व मानवी हक्कांचं पालन करणारी व्यवस्था बनवावी लागते. एखाद्या देशानं अतिरेकी विचारांचा पंतप्रधान निवडला, तर इतर देश त्याला राजीना मा देण्यास भाग पाडू शकतात. "माझा देश', "माझं राष्ट्र' ही कल्पना युरोपातले लोक हळूहळू गुंडाळून टाकून त्याऐवजी

"माझा बहुराष्ट्रीय समुदाय' ही कल्पना आपलीशी करू लागले आहेत.

विशेषतः युरोपच्या सीमेवरचे युक्रेन व तुर्कस्तान हे देश युरोपीय समुदायात येण्यासाठी स्वेच्छेनं प्रयत्न करू लागले आहेत. त्यादृष्टीनं त्यांनी स्वतःचं सार्वभौमत्व कमी करून युरोपीय समुदाय म्हणतो, त्याप्रमाणे स्वतःच्या देशात अंतर्गत बदल करण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे "युनो'देखील नवीन कायदे करून "राष्ट्रीय सार्वभौमत्व' ही कल्पना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. सुमारे 3-4 वर्षांपूर्वी युनोच्या आमसभेनं "संरक्षणाची जागतिक जबाबदारी' हे तत्त्व मान्य केलं. त्यानुसार एखाद्या देशात जर सरकार नागरिकांवर अत्याचार करत असेल, मोठ्या प्रमाणात हिंसाचार, हत्याकांड व बलात्कार असे प्रकार होत असतील, तर युनोच्या सुरक्षा परिषदेनं ठराव मंजूर केला तर इतर देश अशा देशावर हल्ला करून ते सरकार बरखास्त करू शकतात. भले ते सरकार कितीही मतांनी निवडून आलेलं असलं, तरी त्याला "संरक्षणाची जागतिक जबाबदारी' या तत्त्वानुसार इतर देशांपुढं नमतं घेणं जरुरीचं आहे. अर्थात, या तत्त्वाचा गैरफायदा घेतला जाण्याचा मोठा धोका आहे. अमेरिकेनं हेच तत्त्व वापरून इराक व लीबियावर हल्ले केले. तिथली सरकारं उलथून टाकली. सद्दाम हुसेन व मोहंमद गडाफी यांच्या हत्या केल्या.

येत्या काही वर्षांत नवीन ठराव युनोमध्ये संमत करण्यात येतील. त्यांनुसार कोणत्याही देशाचं स्वतःचं असं सार्वभौमत्व हळूहळू कमकुवत करण्याच्या दिशेनं प्रयत्न होतील. याची सुरवात मानवी हक्क संरक्षणापासून झाली आहेच. येत्या 10-15 वर्षांत पर्यावरणरक्षण व जलसुरक्षा याबाबतीतही देशांची स्वतःची किंमत कमी होत जाईल. जिथं नागरिक हवामान अथवा जलप्रवाह दूषित करतील, तिथं संपूर्ण देशाला शिक्षा होईल.

अशा या बदलत्या विश्‍वात प्रत्येक देशाचं स्थान त्या त्या देशातल्या नागरिकांवर अवलंबून राहील. जिथं नागरिक स्वतःहूनच समाज, निसर्ग, अल्पसंख्याक यांची काळजी घेतील, असे समाज सक्षम व सशक्त बनतील. ज्या समाजात संशोधन व ज्ञानाच्या पायावर नवीन शोध लावण्यात येतील, अशा देशाला जगभर मान मिळेल. ज्या देशांमध्ये नेतेमंडळी सर्वसामान्य लोकांचे हक्क आणि भवितव्य दडपतील, भ्रष्टाचाराला व बेशिस्त प्रवृत्तींना आळा घालणार नाहीत व लोभीपणामुळे स्वतःची संपत्ती वाढवताना सर्वसामान्य लोकांच्या स्वप्नांचा व निसर्गसंपदेचा विध्वंस करतील, अशा देशांचं भवितव्य धोक्‍यात येईल. जग प्रचंड वेगानं बदलत चाललं आहे. एक मोठं वादळ क्षितिजापलीकडं भयंकर आवाज करत आपल्या दिशेनं येत आहे. नवीन युगाची नांदी होण्याची चिन्हं दिसत आहेत; पण आपल्याला याची कल्पना आहे का?

मात्र, "हे सर्व वैचारिक मंथन झालं; प्रत्यक्षात असं काही होत नाही, सत्ता हेच सत्य आहे...,' असं ज्या मदमस्त झालेल्या शक्तिमान नेत्यांना वाटतं, अशांसाठी माझे स्वतःचे हे काही प्रत्यक्ष अनुभव ः मी 1991 मध्ये जानेवारीत मॉस्कोला मिखाईल गोर्बाचोव्ह हे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अनेक देशांचे नेते त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते. त्यात अमेरिकेचे आल्बर्ट गोर हेही होते. मी पुन्हा 1992 च्या अखेरीस गोर्बाचोव्ह यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा सोव्हिएत युनियन राहिली नव्हती. गोर्बाचेव्ह यांना एका अमेरिकी युवकानं पैशाच्या बाबतीत फसवलं म्हणून ते - एका महासत्तेचे माजी राष्ट्रप्रमुख- हतबल झालेले, हिरमुसलेले, कोमजलेले मी प्रत्यक्ष पाहिलं आहे.

पूर्वी दक्षिण आफ्रिकेतले श्‍वेतवर्णीय लोक कृष्णवर्णीय लोकांना अक्षरशः जनावरांसारखे वागवत असत. आता तेच लोक कृष्णवर्णीय नेत्यांभोवती पिंगा घालून आपल्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. दक्षिण आफ्रिकेतला श्‍वेतवर्णीयांचा एकेकाळचा रुबाब व आता कृष्णवर्णीयांबरोबर विनयानं सहकाराची भाषा वापरून वागण्याचा प्रयत्न हे दोन्ही प्रकार मी जवळून पाहिले आहेत.

जगात शाश्‍वत असं काहीच नसतं. वर्षानुवर्षं आपण गृहीत धरलेल्या कल्पना अस्तास जाऊ शकतात. शाश्‍वत असतात, ती केवळ मूल्यं. ज्या समाजाला शाश्‍वत मूल्यांचं महत्त्व आतून कळतं व त्यानुसार तिथले नेते व नागरिक वर्तन करतात, असा समाज युगांतरं झाली तरी सशक्त राहतो. ज्या समाजात नेते व नागरिक या दोघांनाही हे कळत नाही व जे जबाबदारी एकमेकांवर ढकलून देतात, त्यांनी स्वतःच्या लाभासाठी व भवितव्यासाठी एवढं समजून घ्यावं ः रात्र वैऱ्याची आहे. जुन्या युगाचा अस्त होत आहे. नवीन युगाची नांदी होणार आहे... सावधान!!

**********************************लेख समाप्त**************************************************************************
लेखात खास मराठी संस्थळावंर गप्पा हाणाल्या जाणार्‍या चविष्ट विषयांपैकी एकः- "जागतिक सीमा, त्यांचे ध्रुवीकरण का एकीकरण्,राष्ट्रवाद, चंगळवाद" ह्या सगळ्यावरच तुफानी ब्याटिंग केलिये.
तर मांडा मग तुम्हाला लेखाबद्दल काय वाटतं हे इथं सविस्तर.
सुरुवात स्वतःपासूनः-
मला काय वाटतं? :-
विशेष काहिच नाही. पूर्वीइतक्या गांभीर्यानं मी वृत्तपत्रातील तत्वज्ञानाकडं लक्ष देत नाही. मौज मजा म्हणून ह्यांच्या चिंता, ब्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल इकॉनॉमी, जागतिक स्थैर्य्,sustainable growth वगैरे वगैरे चहाचे घुटके घेत घेत सुटिच्या निवांत दिवशी भरल्यापोटी वाचायला बरं आहे.
.
बादवे, हा इसम युरोपच्या देशांची एकीकरणाकडे होणारी वाटचाल सूचित करतोय. मला इथे आज भारत म्हणवला जाणारा मल्टिप्लुरलिस्टिक भूभागच उद्या नकाशात एकसंध दिसेल की नाही ह्याची शाश्वती वाटत नाही.पाकचे अजून किती तुकडे होतात ठाउक नाही.युरोपात लोक्संख्येचा धार्मिक तोल ढळण्याच्या मार्गावर असल्यानं तिथल्याही देशांचे नकाशे तीन्क पिढ्यात बदलणार हे नक्की. पाहूयात हा सूथ सेयर जिंकतो की आम्ही डूम सेयर.
तुमच्या कमेंटा आता येउ द्यात.

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

शाश्‍वत असतात, ती केवळ मूल्यं.

इथे(ही) असहमत आहे

सध्या फक्त इतकेच मत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फक्त असहमत आहे?
बाकी त्यांच्या लेखात सदैव
"परवाच (रशियन अध्यक्ष) गोर्बाचेव्ह म्हणाला...
तरी क्लिंटनला म्हटलं होतं लफडी करु नकोस म्हणून....
शेवटी सद्दामनं माझं म्हणणं गुंडाळून दुराग्रह सुरुच ठेवला...."
ह्या धर्तीवरचं वाचायची जाम मज्जा वाटते बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जगात शाश्‍वत असं काहीच नसतं. शाश्वत असतात ती केवळ मूल्य

या २ वाक्यांवरच प्रचंड चर्चा होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख सप्तरंग मधे वाचलाच होता. त्यांच्या काही गोष्टी खटकतात तर काही पटतात (आणि मला तर त्यांच्या काही गोष्टी समजवून घेण्याची बौद्धिक क्षमताच नसते). बाकी काहीही असो पण त्यांच्या 'एका दिशेचा शोध' ह्या पुस्तकाचा तर आपण बुवा फ्यॅन आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबरचा भंपक लेख आहे. आणि हे गृहस्थ नेहमीच असं काहीतरी भंपक लिहित असतात. स्वीडनमधलं उदाहरण घेऊन अख्ख्या युरोपबद्दल काही म्हणणं हा बावळटपणा आहे, पण उर्जावापराबद्दल बोलताना भारत, चीन आणि अमेरिकेची उर्जासंस्कृती आणि वाहनसंस्कृती त्यातून वगळणं हे भयानक अज्ञानमूलक आहे. त्यातून हे असले निष्कर्ष निघतात -

>>हळूहळू लोक, विशेषतः सुशिक्षित लोक, गाडी घेण्याचं बंद करतील.<<

>>आता लोकांना लोभीपणा आणि चंगळवाद याबद्दल घृणा वाटू लागली आहे.<<

नवउदारमतवादी धोरणांमुळे भारत आणि चीनसारख्या देशांतून जो नवमध्यमवर्ग उदयाला येतो आहे तो असलं काही करेल ह्याची नजीकच्या भविष्यात तरी शक्यता दिसत नाही.

>>युरोपमधल्या 27 देशांनी स्वखुशीनं आपलं सार्वभौमत्व एका राष्ट्रसमुदायाला बहाल केलं आहे.<<

हे म्हणणं म्हणजे पुन्हा अर्धवट ज्ञान उघडं करण्यासारखं आहे. प्रत्येक देश आपापले कायदे करत असतो, आपापलं सैन्य ठेवतो, आपापल्या निवडणुका घेतो. ह्या सर्वात काही समान भाग आहे - उदाहरणार्थ, फाशीची शिक्षा रद्दबातल असणं वगैरे, पण 'सार्वभौमत्व सोडलेलं आहे' हे फार सरसकटीकरण आहे.

असो. सध्या एवढंच पुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हळूहळू लोक, विशेषतः सुशिक्षित लोक, गाडी घेण्याचं बंद करतील.

हा निष्कर्ष आहे असं नाही वाटलं. अंदाज वाटला. आणि खूप हुकलेला आहे असही नाही. कार पूलिंग, ५-७ कंपन्यांनी मिळून एकत्र बस सुविधा सुरु करणे या गोष्टी पुण्यात सुरु झालेल्या आहेत. हा त्याच दिशेचा प्रवास आहे असं वाटतं. लांबचा आहे पण त्याच दिशेचा आहे.

पण 'सार्वभौमत्व सोडलेलं आहे' हे फार सरसकटीकरण आहे.

पुन्हा, सार्वभौमत्व पूर्ण सोडलेलं नाही हे आहेच, पण काही शेजारी देशांनी एकत्र येऊन व्यापार, मानवाधिकारांचे कायदे करण हा त्याच दिशेचा प्रवास आहे असं त्यांना म्हणायच आहे असं मला वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

संदीप वासलेकरांचे मी जे वाचले आहे त्यात फार आक्षेपार्ह वा चुकीचे काही नसते. चांगल्या दर्जाच्या वृत्तपत्रांच्या वाचकांना जे विचार सामान्य ज्ञानाचा भाग म्हणून माहीत असतात तेच वासलेकर मांडतांना दिसतात. अशा विचारांना नेहमीच दोन well-argued बाजू असतात आणि त्यामुळे 'तात्यासाहेबांचेहि बरोबर आहे आणि बाबासाहेबहि ठीक बोलताहेत' असे प्रकारचे लिखाण केले जाते. (ते सर्वसामान्यतः बरोबरच असणारे लिखाण 'द्रष्ट्याच्या' भूमिकेतून लिहायचे आणि प्रसिद्ध होईल हेहि जमवायचे हे एक कौशल्य आहे आणि ते वासलेकरांना जमले आहे असे मला वाटते.)

चिकित्साखोर विचारच करायचा तर त्यांच्या लेखनातील name-dropping फार जाणवते. हे गृहस्थ नेहमी जगभरच्या राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमन्त्री अशा दर्जाच्या लोकांबरोबर सलगीच्या नात्याने अगदी घरगुती पातळीवर गप्पा करतांना दिसतात. जगातल्या कोठल्याहि अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारायला सवड असते (प्रस्तुत धाग्याचा विषय असलेल्या लेखातीलच उदाहरण पहा. अल गोर हे राष्ट्रप्रमुखांच्या एका परिषदेत गोर्बाचोव ह्यांच्याशी हस्तांदोलन करायची धडपड करतांना वासलेकरांनी पाहिले कारण तेव्हा वासलेकरहि गोर्बाचोव ह्यांनाच भेटायला गेले होते असे ते म्हणतात. इतक्या उच्च पातळीवरील प्रसंगात वासलेकर कसे आणि का बरे शिरले असावेत? इतके राष्ट्रप्रमुख एकत्र असतांना सुरक्षिततेचे वलय किती पातळ्यांचे असे असेल हे आपण कल्पनेने पाहू शकतो. हे 'सूर्यमंडळ भेदिले' करून वासलेकरांना कोणी आणि का बरे आत घेतले असेल? नंतरच्या वर्षात गोर्बाचोव ह्यांची सत्ता गेल्यावर त्यांना कोणा अमेरिकन तरुणाने पैशाच्या बाबतीत फसविले आणि त्यामुळे गोर्बाचोव 'हिरमुसले' आणि 'हतबल' झालेले वासलेकरांना दिसले. गोर्बचोव ह्यांची ही खाजगी बाब वासलेकरांना कशी समजली?)

असल्या name-dropping मुळे आणि jet-setting प्रवासांच्या casually टाकलेल्या उल्लेखांमुळे लिखाणातले खरे किती अशी शंका येऊ लागते. सर्वसामान्य, हिंदुस्तानाच्या बाहेर न जाणार्‍या आणि कोठल्याहि राष्ट्रप्रमुखाच्या घरातसुद्धा प्रवेश मिळणे अशक्य असणार्‍या मराठी वाचकाला 'दिपवून' टाकून आपले दुकान चालू ठेवायचे हाच लेखनाचा हेतु आहे असे एखाद्या नतद्रष्ट चिकित्साखोराला वाटले तर ते चुकीचे असेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वासलेकर म्हणतातः
"मी 1991 मध्ये जानेवारीत मॉस्कोला मिखाईल गोर्बाचोव्ह हे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अनेक देशांचे नेते त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते. त्यात अमेरिकेचे आल्बर्ट गोर हेही होते."

ह्यावरून मला ह्या वेळी काय डायलॉग झाला असेल ह्याची कल्पना करता येते.

संदीप आणि गोर्बी ह्यांची भेट आधीच कन्फर्म्ड असल्यामुळे हॉटेल मस्क्वामधील आपल्या नेहमीच्या गार्डन स्वीटमधून संदीप झपाझपा पावलं टाकत लॉबीमध्ये उतरतात. पोर्चमध्ये क्रेमलिनचा झेंडा फडकवणारी गाडी तयारच असते. कॉन्सिअर्जनं अदबीनं दार उघडल्यावर संदीप मागच्या सीटवर बसतात आणि डौलदार वळण घेऊन गाडी क्रेमलिनकडं निघते. तेथे पोहोचताच झपझपा पावलं टाकत आणि आसपासच्या फ्लंकीजचे नमस्कार अ‍ॅक्नॉलेज करत संदीप गोर्बीच्या ऑफिस स्वीटपर्यंत पोहोचतात. तेथे अनेक राष्ट्राध्यक्ष आपल्याला आत जाऊ दे ना असं काकुळतीनं दारावरच्या गार्डांना विनवीत उभे असतात. तिसर्‍या जगातले काहीजण गार्डांच्या हातात डॉलरबिलं सरकवण्याचाहि प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्याकडं दुर्लक्ष करीत संदीप आत शिरणार एवढ्यात त्यांना गर्दीत आल (गोर, आलं लक्षात?)दिसतो. घामाघूम झालेला बिचारा आल केवळ साधा उपराष्ट्राध्यक्ष असल्याने त्याला राष्ट्राध्यक्षांच्या रांगेतहि उभं राहून दिलेलं नसतं. आता डायलॉगः

संदीप - हाय आल, इकडे कुठं?
आल - अरे ही राष्ट्राध्यक्षांची परिषद गोर्बीनं बोलावलीय ना. खरा बिलच यायचा. पण त्याची आणि मोनिकाची आधीच गुप्त भेट ठरली होती. तिकडं कसं जाता येणार म्हणून बिचारा तळमळत होता. मग मीच त्याला म्हटले, अरे बाळा, दोस्त कशासाठी असतात? मी जातो तुझ्या जागी. म्हणून निघालो पण निघण्याच्या घाईत इन्विटेशन बरोबर ठेवायचं विसरलो. आता हे गार्ड लोक म्हणतायत की तुम्ही आत जायला सायबांची परमिशन नाही. परत गेल्यावर मी बिलला काय सांगू?
संदीप - अरे आल, तूच म्हणालास ना की दोस्त कशासाठी असतात? चल माझ्याबरोबर आत. माझी गोर्बीबरोबर सोवियट युनिअनमधील ताणतणाव कसे कमी करता येतील ह्याबद्दल आताच मीटिंग आहे. तूहि चल आत दोन मिनिटं.
आल - आलो अस्तो रे पण गोर्बीला आवडेल का? हे रूस्की प्रोटोकोल फार मानतात ठाऊक आहे ना?
संदीप - डोंच्यू वरी. गोर्बी माझा शब्द मानतो. परवाच त्याला एका अमेरिकनानं काही हजार डॉलर्सना गंडा घातला आणि मीच ते पैसे त्याला परत मिळवून दिले. माझ्या शब्दाच्या बाहेर नाही तो.
(दोघेही आत शिरतात. अर्थात ह्या वेळी केजीबीचे दारावर बसलेले कर्दनकाळ गार्ड अजिबात विरोध करत नाहीत. उलट दोघांसाठी अदबीनं दार उघडून धरतात. आत शिरताच -)
गोर्बी - द्ब्रो पज्झालवात संदीप. आणि हे काय आल पण? हौडी आल? (गोर्बीला अमेरिकेचं फार प्रेम आहे आणि आपण अगदी अमेरिकन इंग्लिश बोलतो असं त्यानच संदीपला पूर्वी एकदा सांगितलं होतं त्याची संदीपला आठवण येते. तो मनातच हसतो.)
आल - गुड मॉर्निंग तवारिश प्रित्सिदात्येल! ग्रीटिंग्ज फ्रॉम बिल.

असा थोडा गुडीगुडी डायलॉग काही मिनिटं चालतो. गोर्बीचा वेळ महत्त्वाचा आहे हे संदीपला माहीत आहे. फॉर्मॅलिटी पुरी झाल्यावर तो आलला हलकेच मानेने खूण करतो. आलचंहि काम झालेलं असतंच. दोघांचाहि निरोप घेऊन तो आनंदानं बाहेर पडतो. जाताजाता संदीपच्या कानात हलकेच 'पुढच्या वेळी वॉशिंग्टनला आलास म्हणजे एक डिनर टिपर आणि माझ्याबरोबर करायचीय हे लक्षात ठेव' असं सांगायला विसरत नाही. तो बाहेर गेल्यावर संदीप आणि गोर्बी सोवियट युनिअनमधलं टेन्शन कसं कमी करायचं ह्या महत्त्वाच्या विषयाकडे वळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!
या लेखनाचा वेगळा दुवा करायला (धमाल कोल्हटकर) हात शिवशिवताहेत Wink
टु गुड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या लेखनाचा वेगळा दुवा करायला ( धमाल कोल्हटकर) हात शिवशिवताहेत टु गुड! >> +१
आणि अदितीची राजपुत्राची गोष्ट पण विडंबन म्हणुन वेगळा धागा पाहीजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भन्नाट.
तुफ्फान....
अत्युकृष्ट स्पिन बोलिंगसाठी जगविख्यात असणार्‍या शेन वॉर्ननं बोलिंगला यावं; सुसाट राइट आर्म फास्ट टाकून सरळ तीन यॉर्करवर तीन दिग्गजांची दांडी उडवावी, आणि पाहणार्‍यांना गोलंदाज वॉर्न आहे की शोएब्/ब्रॅत ली असा चकितप्रश्न पडावा असे झाले. एकदम प्रथमच संपूर्ण वेगळ्या जॉनरचा विस्तृत प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरारारारा ROFL ROFL ROFL ROFL

डायरेक सुपरमार्केट उठवल्या गेले आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मजा आली !
मात्र संदीप वासलेकरांच्याच मूळ लिखाणामधे "अ‍ॅनाक्रॉनिझम" अर्थात, कालक्रमाची गडबड वाटते. वासलेकर म्हणतात
"मी 1991 मध्ये जानेवारीत मॉस्कोला मिखाईल गोर्बाचोव्ह हे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती असताना त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा अनेक देशांचे नेते त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करण्यासाठी धडपडत होते. त्यात अमेरिकेचे आल्बर्ट गोर हेही होते."

या , दुव्यानुसार :

Clinton and Gore accepted the nomination at the Democratic National Convention on July 17, 1992

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अर्रर्रर्र हे असं आहे काय! मला तर वरील संवाद खरोखर घडलेला वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

साधारण याच प्रकारचा एक उत्तम, खुसखुशीत लेख इथे वाचला :
http://rbk137.blogspot.com/2013/06/blog-post_15.html?utm_source=feedburn...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जेव्हा जेव्हा मुंबईत माझ्याकडे लोक येऊन अधिकाऱ्यांना अथवा राजकारण्यांना फक्त शिव्या देतात, तेव्हा मला तिचा रडतानाचा चेहरा आठवतो व माझ्या घरासमोरच्या सागराकडे पाहून माझा प्राण तळमळतो...!

संपूर्ण लेख इथे वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या लेखाचा हा दुवा बहुदा "शाश्वत" असेल.

अरविंद कोल्हटकरांचा प्रतिसाद वाचून सध्या हसण्याचा अटॅक आला आहे. तो ओसरला आणि कोल्हटकर, जंतू यांच्याकडून काही सुटलेले मुद्दे मला दिसले तर गंमत करेन.

---

या दुव्यात लेखावर आलेल्या काही वेचक प्रतिक्रिया:

yogeshwar birangal - रविवार, 19 मे 2013 - 02:16 PM IST
सर प्रत्येक रविवारी सप्तरंगची वाट पाहत असतो कारण कि आपला लेख वाचयाचा असतो.आपल्या लेखात वेगळी अशी ऊर्जा असते, नवीन अशी आशा असते.आपल्या लेखात आजच्या जगाची वस्तुस्थिती असते.भारताचे आजच्या घडीला जगात असणारे स्थान आपल्या 'लेखातून' कळते.दि.१९ मे २०१३ आपल्या 'क्षितिजावर उभ आहे नव युग' हा लेख खुपच आवडला त्यातील तुम्ही दिलेले मिखाईल गोबार्चोव्ह याचे उदाहरण आवडले.

सुमित पालवे - सोमवार, 20 मे 2013 - 10:06 AM IST
मला कधी कधी असे वाटते कि आपण पुन्हा पुन्हा तेच करतो आहे...... आधी बाहेरून आलेले इंग्रज जे करतील तीच गोष्ट खूप छान .... त्या बद्दल आदर ..... आणि आता .... इतर विकसित देश जे करतील त्याच गोष्टीला महत्व ......... भारतीय विचारांना नेहमीच दुय्यम स्थान मिळते , त्याला मुख्य कारण म्हणजे आपल्यावर असलेला १५० वर्षांचा इंगाजांचा पगडा ........

chintu - सोमवार, 20 मे 2013 - 02:49 PM IST
त्यानुसार एखाद्या देशात जर सरकार नागरिकांवर अत्याचार करत असेल, मोठ्या प्रमाणात हिंसाचार, हत्याकांड व बलात्कार असे प्रकार होत असतील, तर युनोच्या सुरक्षा परिषदेनं ठराव मंजूर केला तर इतर देश अशा देशावर हल्ला करून ते सरकार बरखास्त करू शकतात.. वा वा वा ...बहोत दिन बाद आज दिल खुश हो गया ....म्हणजे आता कॉंग्रेस चे सरकार पाडणार तर हे उनो वाले लोक ..वा वा ह्याच दिवशाची तर आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत ....भारतावर उनो चे राज्य यावे ..

याच प्रतिक्रिया निवडण्याचं कारण असं की भंपक लेखांमुळे काय नुकसान होतंय हे दिसावं. अन्य काही प्रतिक्रिया चांगल्याही आहेत. एकाने या लेखाला 'गोंधळलेला लेख' असंही म्हटलं आहे, एकाने "वासलेकर सर स्वतः द्विधा वाटतात" असंही लिहीलेलं आहे. चंगळवादावर टीका हा ही काही प्रतिसादांचा सूर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>याच प्रतिक्रिया निवडण्याचं कारण असं की भंपक लेखांमुळे काय नुकसान होतंय हे दिसावं. <<

You are giving too much credit to one shallow article. या प्रतिक्रिया लिहिणार्‍यांची र्‍हस्वदृष्टी आणि पाचकळपणा या त्यांच्या स्वयंभू गोष्टी आहेत. अशा प्रतिक्रिया वासलेकरांच्याच नव्हे तर कुठल्याही मुक्तपीठीय लिखाणावरही पैशाला पासरी दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा धागा येउन एक वर्ष उलटून गेलं. कधीकधी वेळ छान जावा म्हणून मुद्दाम कोल्हटकरांचा तो धमाल प्रतिसाद वाचत असतो.
असो. तो मुद्दा नाही.
अदितीने लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या इथे दिल्यात.
त्यावर मुसुंची प्रतिक्रिया होती :-
You are giving too much credit to one shallow article. या प्रतिक्रिया लिहिणार्‍यांची र्‍हस्वदृष्टी आणि पाचकळपणा या त्यांच्या स्वयंभू गोष्टी आहेत. अशा प्रतिक्रिया वासलेकरांच्याच नव्हे तर कुठल्याही मुक्तपीठीय लिखाणावरही पैशाला पासरी दिसतात.

म्हणजे "ह्यात लक्ष देण्यासारखं काय आहे"
एक प्रातिनिधिक उदाहरण घेउ.
म्हणजे आता कॉंग्रेस चे सरकार पाडणार तर हे उनो वाले लोक ..वा वा ह्याच दिवशाची तर आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत ....भारतावर उनो चे राज्य यावे ..

ह्यातला उनो/युनोचा भाग सोडून देउ. पण "कॉम्ग्रेस नको" ह्या भावना असलेल्या अशा प्रतिक्रिया इतक्या प्रचंड येत होत्या की बस रे बस.
एकूणात नजर फिरवली तर लोकांच्या कलाचा अंदाज यावा.
" ह्ह्या: ... हे कोण पाचकळ लोक. populist मतं सगळी" वगैरे म्हणून आपण फक्त डोळे ब्म्द करीत आहोत. त्याने वास्तव बदलत नाही.
तुम्हाला जे पाचकळ वाटताहेत ते प्रचंड संख्येने इकडे आणि तिकडेही भरलेले आहेत. ते बर्‍यापैकी एकत्रित डोक्यानच विचार करतात.(झुंडीनं करावा तसा.)
अधिकृतरित्या ते संघटनेचा भाग नसले तरी संघटनेचा त्यांच्यावर बर्राचसा (अप्रत्यक्ष) ताबा असतो(कधी कधी त्यासाठी खुद्द मिडिया धरला जातो हाताशी कधी इतर काही).
कोणी काही म्हटलं तरी समुद्राच्या अलिकडले काय आणि पलिकडले काय ....
आपण सारेच लोकशाही म्हणवून घेणार्‍या वय्वस्थेत राहतो आणि इथे दरडोइ एकच मत हीसुद्धा फ्याक्ट आहे.
लोकांचा कल, वाहणारे वारे ह्याचा अंदाज ह्यावरून घेता यावा.(हे अर्थातच एकट्या दुकट्या प्रतिसादावरून शक्य नाही. पण एकूणात जेव्हा तुम्ही प्रतिक्रियांचा ओघ बघता तेव्हा "लोकांची बोंबाबोंब कशाबद्दल सुरु आहे ","तक्रार कुणाबद्दल आहे", त्यांच्या नजरेत "चोर" कोण आहे, अशा सार्‍या प्रश्नांची उत्तरं शोधायला थोडेफार (थोडेफारच)
सहाय्य होते.)
शेवटी तुम्हाला त्याच लोकांसोबत राहायचं आहे. इतकच नाही, लोकशाहीत त्यांची भूमिकाही संख्याबळामुळे अधिक असणार आहे.
तुमच्यावर प्रशासन कुणाचं असावं; हे अशाच बुद्धीमत्तेची प्रचंड संख्येनं असलेली मंडळी एकत्र येउन ठरवणार आहेत.
तिकडे दुर्लक्ष करुन कसं चालेल ?
शिवाय ते अधिकाधिक मूर्ख/सवंग्/भंपक बनत असले तर अंतिमतः भोगायला आपल्यालाच लागणार आहे.
.
.
.
वरचा तो प्रतिसाद, तत्सम इतर प्रतिसाद आठवून पहा. १६मे रोजी काय निकाल लागला आठवून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>हे गृहस्थ नेहमी जगभरच्या राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमन्त्री अशा दर्जाच्या लोकांबरोबर सलगीच्या नात्याने अगदी घरगुती पातळीवर गप्पा करतांना दिसतात. <<

त्यांचा विकीवरचा बायोडेटा खरा असेल, तर जेटसेटिंग आणि नेमड्रॉपिंग खरोखरचं असणं शक्यही आहे. माझा मुद्दा पुढचा आहे - इतकं एक्स्पोजर मिळूनही हे असं शाळकरी भंपक का लिहीत राहतात? मग आकलन आणि अक्कल वगैरेबद्दल मूलभूत शंका उपस्थित होऊ लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"प्रॉपर्टी इज थेफ्ट" असं एक डावखुरा फ्रेंच म्हणून गेलाय, आणि प्रॉपर्टी जमवणारे लोक पहाता सगळ्यांनाच हा डावखुरा विचार कधीतरी पटला असावा. अनेक प्रगत समुदाय ह्या उदारमताला विकसनशील समुदायांच्या मानाने जास्त महत्त्व देत आहेत/असतील, प्रगत समुदायामधे उदार लोकांची संख्या जास्त असण्याचे ते लक्षण असावे. पण स्वामित्वाची संकल्पना निदान भौतिक प्रगतीकडे नक्कीच नेते हे अनेक प्रगत समुदायांनी अनुभवलेले सत्य आहे, त्यामुळे स्वामित्व जपण्याचा प्रयत्न अनेक प्रगत तर सगळेच विकसनशील देश करणार ह्यात शंका नाही.

सामाजिक स्वामित्वाची आणि सत्तारुढ समुदायाची गणितं जमली तर ती संकल्पना प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही, पण ज्या प्रगत समुदायांमधे विकसनशील समुदायांच्या तुलनेत उदार बदल दिसून येतात त्या समुदायांमधे स्वामित्वाची प्रगत आणि इतर काही समिकरणे तयार होत जात असणार/जाणार असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>खासगी मालमत्तेप्रमाणेच देशाचं सार्वभौमत्व ही कल्पनाही हळूहळू लोप पावेल <<<<

माझी एक बाळबोध शंका :

सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या काही चोपड्यांच्या आधारे, स्टॅलिन नावाच्या इसमाने उपरोक्त संदर्भांत सुमारे नव्वद वर्षांपूर्वी कायसेसे सुरू केलेले मला अंधुकसे स्मरते आहे. गेल्या शतकात पंचाहत्तर वर्षे चालवलेल्या त्या "प्रयोगा"ची परिणती, काही कोटी माणसे अकाली मरून, देशोधडीला लागून सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी कशांत झाली तेही थोडेथोडे स्मरते आहे. त्याचा, आणि वासलेकर जे बोलत आहेत त्याचा काही संबंध आहे काय ? गेल्या शतकातली ही रक्तवारुणि नव्या "वासलेकर बॉटलिंग कंपनी"तर्फेच पुनर्वितरित होत आहे काय ?

वासलेकर ज्या रीतीने बोलत आहेत त्या पद्धतीचं बोलणं एकोणीसाव्या शतकातले लोक करत होते. त्याला "युटोपियन इकनॉमिक्स" असं नाव होतं. "collectivism" आणि "end of private ownership" या गोष्टींकडे एखादा देश/समाज/अर्थव्यवस्था जाऊ पहाते तेव्हा जे जे काही होतं ते गेल्या शतकाने अनुभवलेलं आहे.

"आपण जे बोलतो आहोत ते पूर्वीच्या प्रयोगापेक्षा वेगळं कसं आहे, पूर्वसुरींच्या असफल प्रयोगातले धोके आपण ओळखले आहेत का?" याचा काही अभ्यास केला आहे का? किमान असं काही घडलं होतं याची जाणीव या सार्‍या विवेचनात कुठे आहे का ? (सकाळच्या लेखात मला ती दिसली नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लोकं गाड्या विकत घेणार नाहीत हे भविष्य न्यूयॉर्क, लंडन, पॅरीस अशा गजबजलेल्या शहरांमधे आजही काही प्रमाणात दिसतं. कार-टू-गो किंवा फोल्डींग कार अशा प्रकारच्या गोष्टी अमेरिकेतल्या छोट्या, कमी गर्दीच्या शहरांमधे जोर पकडतानाही दिसत आहेत. शहराच्या गजबजलेल्या ठिकाणी पार्किंगच्या अडचणींवर मात करण्यासाठी हे उपाय केले जातात असं दिसतं. पण विस्तीर्ण उपनगरं, खेडेगावांमधे रहाणारी, काम करणारी जनता अशा पर्यायांचा स्वीकार करेलसं वाटत नाही.

या लेखाच्या सुरूवातीला एक मोठं, भयंकर वादळ येण्याचा उल्लेख आहे. ते नक्की कोणतं हे काही समजलं नाही. काही पर्याय सुचले:
१. लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणे (पर्यायाने कार उद्योगात मंदी येणे.)
२. खासगी मालमत्तेचं महत्त्व उपयुक्तता यापुढे न रहाणं. (म्हणजे नक्की काय हे मला विचारू नका.)
३. नागरिक स्वतःहूनच समाज, निसर्ग, अल्पसंख्याक यांची काळजी घेतील (एन्जीओजचं दुकान बंद)
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटते ते वादळ म्हणताहेत ते पीक प्रॉस्पेरिटीचे असावे. पाशात्य समाजात संपन्नतेची परमावधी झाली आहे आणि आता तिथे जास्त वाढ होणे शक्य नाही. त्यात एन्ट्रॉपी आणि आधीच असलेला कर्जभार यातून आहे तेच टिकवण्याची किंमत वाढत जाणार.
२०३९ साली ब्रिक्स देशांची एकूण अर्थव्यवस्था सर्व प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी होईल असा अंदाज आहे. असे झाले तरी ब्रिक्स देशांमधील दरडोई संपन्नता कधीही सध्याच्या विकसित देशांच्या पातळीला जाणार नाही.
आजचे विकसित देशांमधील संपन्न आयुष्य हे अ‍ॅज गुड अ‍ॅज इट गेट्स असे आहे.
यापुढे त्यात वाढ होणे दुरापास्त आहे. त्यात रिसोर्स लिमिट्सची भाकितं खरी ठरली तर इट वुईल बी ए पर्फेक्ट स्टॉर्म.

बाकी लेखातल्या सौर ऊर्जेबद्दल नव्हे तर वस्तू नव्यासारखी करणार्‍या ़जंतूंबद्दल वाचून वैताग आला होता हे सांगावेसे वाटते. कदाचित ते नॅनोपार्टिकल्स असू शकतील म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

FB 214 -कई बार जीवन में , कुछ ऐसे पल आते हैं जहाँ जीवन की सचाई स्वयं आकर खड़ी हो जाती है आपके सामने ...
एक गाना गया था मैंने अपनी फिल्म में ... " मेरे अंगने में ..."
उसके शब्द कितने सच निकलते हैं .. " मेरे अंगने में , तुम्हारा क्या काम है .. जो है नाम वाला वही तो बदनाम है .."
पहले नाम कमाओ मेहनत खून पसीने और आंसू ओं से , और जब नाम हो जाये तो बदनामी के हर रूप झेलो ...
जीवन में सब को सब कुछ नहीं मिलता ...
बदनामी को ऐसे अवसर पे , माँ का चेहरे पे, लगाया हुआ काला टीका मान लेना चाहिए - ताकि नज़र न लगे .. !!
नज़र बट्टू !!!

-- अमिताभ बच्चन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे, हा इसम युरोपच्या देशांची एकीकरणाकडे होणारी वाटचाल सूचित करतोय. मला इथे आज भारत म्हणवला जाणारा मल्टिप्लुरलिस्टिक भूभागच उद्या नकाशात एकसंध दिसेल की नाही ह्याची शाश्वती वाटत नाही.

युरोपाच्या एकीकरणाकडच्या वाटचालीबद्दल कल्पना नाही, पण भारत एकसंध राहणार नाही, असे का वाटावे बुवा?

कसाही का असेना, पण इतकी वर्षे टिकला आहेच ना?

पाकचे अजून किती तुकडे होतात ठाउक नाही.

त्याची चिंता पाक्यांना करू द्या की! सगळ्यांची चिंता आपणच काय म्हणून करायची?

(पाकिस्तानबद्दलही तेच लॉजिक. जोपर्यंत भारत किंवा अशीच कोणतीतरी पुरेशी सक्षम इंटरेस्टेड थर्ड पार्टी काड्या घालत नाही, १९७१सारखा थेट हस्तक्षेप करत नाही, तोपर्यंत, कितीही मारामार्‍या झाल्या, तरी काहीही होणार नाही. इतकी वर्षे टिकलाच आहे ना?)

(बादवे, पाकचे तुकडे होणे हे सध्या कोणाच्याही फायद्याचे असावे, असे वाटत नाही. ठरले, तर तोट्याचेच ठरावे.)

युरोपात लोक्संख्येचा धार्मिक तोल ढळण्याच्या मार्गावर असल्यानं तिथल्याही देशांचे नकाशे तीन्क पिढ्यात बदलणार हे नक्की.

युरोपाचे नकाशे गेल्या तीनएक पिढ्यांत तसेही कितीदातरी बदलले. समजा आणखी एकदा बदलले, तर नेमका काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख न वरच्या थोड्या प्रतिक्रियासुद्धा वाचल्या हो!
लेख काही पटला नाही. ज्या ज्या वेळेस जे जे सोयिस्कर असेल त्याचा लोक स्विकार करतात...कदाचित स्वीडनमधल्या काही लोकांना गाडीची गरज वाटत नसेल / सार्वजनिक सुविधा उत्तम असतील तर गाड्यांची काय गरज ? पण त्यावरुन आख्खा युरोप जोखणे काही समजत नाही.

अमेरीकेतसुद्धा बारकाल्या गाड्या / स्कुटर अगदी तुरळक प्रमाणात दिसतात. मोठ्या शहरात लहान गाड्या उपयोगी आहेत..पण त्याबाहेर नाही.. मायलेज, गरज, सार्वजनिक वाहने इ.चा विचार केला जाणारच.

तसंच केवळ युनोच्या सांगण्यावरुन / युरोपिय समुदायाच्या सांगण्यावरुन एखादा देश आपला नेता बदलेल हे सुद्धा कसं शक्य आहे?

थोडक्यात कैच्या कै लेख वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वासलेकरांची मते मान्य असण्याचा/नसण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या धाग्याच्या निमित्ताने जी विनोदनिर्मिती झाली आहे तिचे मूल्यही कमी नाही. पण हा लेख हा पूर्णतः/बव्हंशी हसण्यावारी नेण्याचा प्रकार आहे असे कूणी गंभीरपणे समजू लागले तर मला या व्यक्तिला असा निर्णय घेण्यापूर्वी ४-५ मुद्दे सांगायची इच्छा आहे.
१. पहिला मुद्दा सार्वभौमत्वाचा. पुढील दुव्यावर युरोपिअन युनिअन चा कायदा व सदस्य देशाचा कायदा यांची काय मांडणी आहे ते सांगीतले आहे. इतरत्र तर जाऊच द्या, जेव्हा स्थानिक कायदा आणि युनियनचा कायदा परस्परविरोधी असतात तेव्हा युनिअनचा कायदा prevail होतो हे वास्तव आहे. युनियनच्या अधिकार क्षेत्राचा व्याप पाहता किमान ५०%+ सार्वभौमत्व तिला बहाल झालं यात कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. link2 . याला दुजोरा देणारे हे वृत्त पहा.
Link

२. दुसरा मुद्दा सार्वजनिक वाहतुकीचा - JNNURM, BRTs, Metro अशा योजनांकडे पाहता 'लोकांनी व्यक्तिगत वाहनाचा वापर सोडून सार्वजनिक वाहने वापरावी' यावर भारतातच काय काय होत आहे याची कल्पना यावी. लक्षात घ्या 'सार्वजनिक वाहन व्यवस्थेत जास्त गुंतवणूक' हा मुद्दा इथे नाही. भारताच्या नागरी परिवहन खात्याच्या सचिवाला या दोन पर्यायांपैकी कोणता समोर ठेऊन या योजना आखल्या (क्षणभर समजा की त्या mutually exclusive आहेत्)असे विचारले तर तो 'व्यक्तिगत वाहनांचा वापर सोडून ....' असे उत्तर देईल. आपण या खात्याची वेबसाईट पाहिली तर सरकारचा या प्रकारावर किती जोर आहे हे लक्षात येईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर UITP चे प्रकल्प (Projects) पाहा. यावरही येथल्या वाचकांचा कयास खरा होण्याची शक्यता मी नाकारत नाही, पण जे सत्तेत आहेत त्यांचा अधिकृत मानस तरी असाच आहे.

३. क्षितिजापलिकडचे वादळ - वासलेकरांनी वादळ हा ऋण शब्द एका चांगल्या गोष्टीचे वर्णन करण्याकरता वापरला आहे. मला वाटतं मराठी शब्दांच्या प्रयोजनात त्यांना गती नाही. त्यामुळं त्यांचं लिखाण गंभीर न होता विनोदी झालं आहे. शिवाय तपशील देण्याची त्यांची पद्धत एका नामांकित consultant ला तरी शोभत नाही. UNO, WTO, trade zones, economic cooperation zones, FDI/FII rules, Visa/immigration rules, इ यांची एकूण दिशा पाहिली तर जग जवळ येत आहे असा एक दृष्टीकोन काही लोकांचा असायला हरकत नाही. सहसाअ ज. कटजूंना सगळे खूप हसतात. भारत नि पाकिस्तान २० वर्षांनी एक होणार अशी विधाने ते करतात म्हणून. पण व्यक्तिगत पातळीवर जगात कुठेही भेटणारे भारतीय व पाकिस्तानी 'वास्तविक हे दोन वेगळे देश नाहीत' हे मनोमन मान्य करतात. कदाचित या विरोधाभासातील हास्यास्पद भूमिकेचा भाग वासलेकरांनी निभावला आहे.

४. त्यांच्या ओळखी - (यातलं laughter potential पूर्ण exploit झालेलं नाही.) पण तरीही...उदा. त्यांनी अमेरिकेचे गोर म्हटलंय - तत्कालिन सिनेटर गोर नाही म्हटलं. कोणाला हे क खटकलं ते कळलं नाही. ते ज्या कोणत्या capacity त असतील त्या पदाने भेटले असतील. त्यांच्या मोठ्या लोकांच्या भेटीचे सगळे तपशील १००% खरे असावेत. त्यांच्या कंपनीच्या कामाचा दर्जा, स्तर जो आहे (मार्केट मधे पण असाच फीडबॅक आहे) त्यावरून त्यांच्या भेटी नक्कीच खोट्या नाहीत, पण त्यातल्या सविस्तर तपशीलाबाबत?

५. २०५० ला अजून ३७ वर्षे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"पण व्यक्तिगत पातळीवर जगात कुठेही भेटणारे भारतीय व पाकिस्तानी 'वास्तविक हे दोन वेगळे देश नाहीत' हे मनोमन मान्य करतात."
ह्या मुद्यास वैयक्तित अनुभवाने समर्थन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

वासलेकराम्चे लेख वाचनिय व माहिति पुर्ण असतात..ही इज माय फ़ेव्ह

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हा दुवा पहा;-
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5365964152849595006&Se...सप्तरंग&NewsDate=20131110&Provider=संदीप वासलेकर&NewsTitle=शोधायला हवा शांततापूर्ण मनुष्यधर्म (संदीप वासलेकर)
.
.
ह्यातले पहिले दोन परिच्छेद उच्च वाटले;-
इंद्रकुमार गुजराल जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा एका राजनैतिक कामामुळं माझं स्टॉकहोम इथं वास्तव्य होतं. पंतप्रधान गुजराल यांचा एक दूत मला भेटण्यासाठी स्टॉकहोम इथं आला व भारतात परतण्यासाठी मला आग्रह करू लागला. गुजराल यांना भारतात एक नवीन कल्पना राबवायची होती व तिची जबाबदारी माझ्याकडं द्यायची त्यांची इच्छा होती.
मी भारतात मित्रांना याबाबत विचारलं. सगळ्यांचं म्हणणं असं पडलं ः "गुजराल यांचं सरकार एका वर्षाच्या आत कोसळेल व त्यामुळं तू परत येऊन काही फायदा होणार नाही.' परिणामी, मी अजून काही काळ स्टॉकहोममध्येच राहिलो. दिल्लीतल्या जाणकार मित्रांनी सांगितल्याप्रमाणे गुजराल यांचं सरकार अपेक्षेपेक्षा लवकरच बरखास्त झालं. त्यांची कल्पना अमलात आली नाही; परंतु भारताच्या प्रगतीसाठी त्या कल्पनेची गरज मात्र नक्कीच आहे.

.
अरविंद कोल्हटकर ह्यांनी "हाय गॉर्बी... हेssय आल् " ह्या स्टाइल काहीतरी लिहिलेलं पुन्हा आठवलं.
.
.
अर्थात ह्याप्रकराबद्दल कौतुक आहेचः-
याशिवाय, बाकीची तज्ज्ञमंडळी काश्‍मीरसंबंधी आपले विचार वाहिन्यांवर मांडत असताना, मी तसल्या गोष्टीत वेळ न दवडता, हातात बंदूक घेतलेल्या दहशतवाद्यांशी चर्चा करून काही दहशतवाद्यांना हिंसेच्या मार्गानं जाण्यापासून कसं परावृत्त केलं, हेही त्यांना माहीत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे वासलेकर राजकीय "हरितात्या" आहेत असे मला अनेकदा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा हा हा, अगदी अगदी!!!! एक फरक करायचा झाला तर हरितात्या सर्व ठिकाणी नुसते असतात, महत्त्वाची भूमिका नसते. इथे तर त्याच्याही पुढची केस आहे.

हे पाहून मला 'मॅन फ्रॉम अर्थ' नामक पिच्चरमधील 'जॉन ओल्डमन' नामक १४००० वर्षे जगलेल्या माणसाची केस आठवते. तो स्वतः पूर्वाश्रमीचा जीजस असल्याचे सांगतो तेव्हा जबराट मजा येते पहायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हरीतात्या वि. वर्तक म्हणावे? अर्थात ह.वि.वर्तक Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नै हो नै. हरितात्या बिचारे साधे सरळ प्रामाणिक होते. वर्तकांइतके सूक्ष्मात कधी जात नसत. वर्तकांऐवजी चं.पी.कर्तक हेच नाव जास्त योग्य दिसेल.

मायला, १९९६ ते २००० या कालावधीत स्वयं वर्तक एकदा घरी आले होते तो प्रसंग आठवला. घरची मंडळी फुल इंप्रेस झाली होती, घरातला हॉल पूर्ण भरून गेला होता अन वर्तक आणि आजोबा या दोघांची काही चर्चा चालू होती. आजोबा सारखे आतल्या खोलीत जाऊन काही पुस्तके आणत आणि त्या ग्रंथाधारे चर्चा रिझ्यूम होई अन बाकीचे लोक 'आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनम्' असे कौतुकाने त्या द्वयीकडे पाहत होते इतकेच आठवते. पण त्याचबरोबर बाबा घंटा काही इंप्रेस झाले नव्हते हेही तितकेच लख्ख आठवते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पाहून मला 'मॅन फ्रॉम अर्थ' नामक पिच्चरमधील 'जॉन ओल्डमन' नामक १४००० वर्षे जगलेल्या माणसाची केस आठवते. तो स्वतः पूर्वाश्रमीचा जीजस असल्याचे सांगतो तेव्हा जबराट मजा येते पहायला.

पण... पण... येशू जर आज हयात असता, तर दोन हजार काहीतरी वर्षांचा असता ना? मग चौदा हजार वर्षांपासून जगत आलेला (पक्षी: आजही हयात असलेला) माणूस हा पूर्वाश्रमीचा येशू कसा असू शकतो?

उलटपक्षी, तो या आश्रमीचा येशू असल्यास, अजून जिवंत कसा? तो इ.स. चौतीस सालाच्या आसपास वारला नाही काय?

(शिवाय, बायबलप्रमाणे या विश्वाची निर्मिती तर सहा हजार काहीतरी वर्षांपूर्वी झाली ना?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या पिच्चरचा फंडा असा आहे की तो "एजलेस" असतो. म्हणजे त्याचे वय समक्ष पाहिल्यास कळून येत नाही आणि शारीरिक क्षमतांवरही काही परिणाम होत नाही. आणि नाझरेथला जन्मलेला येशू वैग्रे या पिच्चरमध्ये ग्राह्य धरलेले नाही सबब इन्कन्सिस्टन्सी नाही. व्हर्जनच वेगळी आहे सबब तो त्रास नाही.

आणि बायबलच्या बर्‍याच भागाला तर पिच्चरमध्ये मोडीतच काढलेले आहे. येशू म्हणजेच हा एजलेस माणूस अगोदर पूर्वेकडे जातजात बुद्धाकडे गेला, त्याच्याकडे शिकून मग त्याने तेच तत्त्वज्ञान नाझरेथवाल्यांना शिकवले इ.इ. थिअरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्हर्जनच वेगळी आहे सबब तो त्रास नाही

ओह! मग ठीक.

बायबलच्या बर्‍याच भागाला तर पिच्चरमध्ये मोडीतच काढलेले आहे. येशू म्हणजेच हा एजलेस माणूस अगोदर पूर्वेकडे जातजात बुद्धाकडे गेला, त्याच्याकडे शिकून मग त्याने तेच तत्त्वज्ञान नाझरेथवाल्यांना शिकवले इ.इ. थिअरी आहे.

आणि ख्रिस्तास क्रूसावर खिळे ठोकून मारण्याची नेमकी काय वासलात (पार्डन द ब्याड पन) लावलेली आहे? (नाही म्हणजे, मुळात ख्रिस्तास मारलेलाच नसेल, तर मग, 'ना रहेगा बाँस' न्यायाने, त्या माणसास आज जिवंत असण्यास काही प्रत्यवाय असू नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि ख्रिस्तास क्रूसावर खिळे ठोकून मारण्याची नेमकी काय वासलात (पार्डन द ब्याड पन) लावलेली आहे? (नाही म्हणजे, मुळात ख्रिस्तास मारलेलाच नसेल, तर मग, 'ना रहेगा बाँस' न्यायाने, त्या माणसास आज जिवंत असण्यास काही प्रत्यवाय असू नये.)

गुड क्वेश्चन. वाटलेच होते हा प्रश्न विचाराल म्हणून. तर यात असे सांगितलेय की वरिजिनली फक्त हातपाय बांधले होते पण सेन्सेशनलाईझ करण्यासाठी म्हणून खिळे-रक्त वैग्रे नंतर अ‍ॅड झाले. आणि त्याने भारतात शिकलेल्या योगक्रियांच्या आधारे स्वत:च्या बॉडी प्रोसेसेस इतक्या स्लो केल्या की लोकांना वाटले तो मेला. मग नंतर त्याच ट्रेनिंगच्या आधारे प्रोसेसेस पूर्ववत हळूहळू नॉर्मलवर आणल्या तिसर्‍या दिवशी गुहेबाहेर पडला, आणि तिथून तो गुपचूप निघून जाणारच होता पण काही भक्त दिसले आणि त्यांनी उदोउदो केला, हेन्स द रिसरेक्शन. पुढे त्यांच्यापासून पळून जाऊन तो सेंट्रल युरोपात गेला वैग्रे वैग्रे........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Sundeep Waslekar is President of Strategic Foresight Group, a think-tank based in India that advises governments and institutions around the world on managing future challenges. He has presented new policy concepts at committees of the Indian Parliament, the European Parliament, UK Houses of Commons and Lords, United Nations Alliance of Civilizations, League of Arab States, World Economic Forum (Davos meetings), among others. He has travelled to 50 countries for consultations with senior leaders.
Sundeep Waslekar was educated at Oxford University, obtaining Bachelor of Arts in Philosophy, Politics and Economics in 1983. He was conferred D. Litt. (Honoris Causa) of Symbiosis International University, at hands of President of India, in December 2011.
Sundeep has been involved in parallel diplomatic exercises to find common ground in times of crisis. Since the mid-1990s, he has facilitated dialogue between Indian and Pakistani decision makers and Kashmiri leaders, heads of Nepalese political parties, and post 9/11 between the leaders of Western and Islamic countries.
He authored three books on governance in the 1990s – The New World Order, South Asian Drama, and Dharma-Rajya: Path-breaking Reforms for India’s Governance. Since 2002, he has authored several research reports on global future under the auspices of the Strategic Foresight Group, including The Blue Peace, Cost of Conflict in the Middle East, and An Inclusive World. In 2011, he co-authored a book of essays on global governance, Big Questions of Our Time.
He has been quoted, reviewed, interviewed and published in more than 1,500 newspapers, websites and television channels including the BBC World Television, CNN, Newsweek, International Herald Tribune, The Economist, Financial Times and The Guardian, most of the major newspapers in India, Pakistan and the Middle East, and national media in some 60-70 countries.
Sundeep has authored a best-seller book in his native Marathi language, Eka Dishecha Shodh (on India’s search for future) which had 12 editions and translations in other Indian languages within the first two years. He also writes a column on foresight in Sakal, one of the leading newspapers in Western India, and has a large following in urban and rural parts of Western India.

वासलेकरांवर हजार जोक करा पण त्यांची ही प्रोफाईल पूर्ण सत्य आहे हे ही ध्यानात असू द्या. शिवाय माझ्या माहितीत अशी राजकीय कंसल्टींग देणारी कंपनी जगात दुसरी ऐकून नाही. इंटनॅशनल बिझनेस एंट्री च्या असाइनमेंट्स करताना राजकीय समस्या असतील तर या कंपनीचं असेसमेंट काय आहे हे जनरली पाहतात.
http://www.strategicforesight.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वासलेकर कुणी मोठ्ठी असामी असेलही. पण म्हणून काय झालं?
जगातील सर्वात मोठ्ठी अर्थव्यवस्था, अतिप्रगत देशांचा मेरुमणी, लष्करी व तांत्रिकदृष्ट्या प्रबळ, एकमेव महासत्ता वगैरे वगैरे असणार्‍या
अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन ह्यांच्यावरही जोक्स होतातच की. त्यामुळे ते मोठी असामी असल्याचं नाकारलं जात नाहिच.
आणि तसंही व्यक्ती पुरेशी मोठी असेल, तर ऐर्‍यागैर्‍या मनोबाने नाकारुनही काही होत नाहिच. सूर्य- थुंकी .... यु नो.
असो.
आणि इथे तर मुळात मी एकही ज्योक मारलेला नाही लेटेस्ट प्रतिसादात. फक्त त्यांच्या लेखातील पहिला परिच्छेद उद्धृत केलाय आणि
त्यांच्या काश्मीर संदर्भातल्या कार्याबद्दल कौतुक वाटतय हे सांगितलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अहो त्यांच्यावर माफक जोक मारला तरी आमचं बकोटं कोणी धरणार नाही की कोणी जेलात टाकणार नाही (असे वाटते) त्यामुळे निदान इथे चालतंय तर चालु द्या की! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुन्हा एकदा वासलेकर...

ही लिंक पहा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्वासावर आधारित सामाजिक व्यवस्था ही नक्कीच आदर्श आहे आणि भारतात अशी व्यवस्था आली तर उत्तमच आहे. परंतु ह्या व्यवस्था काम करण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते उदारणार्थ समाजात पुरेशी सुबत्ता. ही विश्वासावर आधारित व्यवस्था प्रत्यक्षात कशी अवतरेल हा मुख्य प्रश्न आहे. हा विचार मला आदर्शवादी परंतु 'Simplistic' वाटतो. काही वेळा वासलेकर यांचे विचार वास्तववादी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

व्यावहारिक अडचणी सोडा (त्या बर्‍याच आहेत), आणि ह्याबिच्युअल नेम्सड्रॉपिंगसुद्धा सोडून द्या. पण तेवढे वगळल्यास, एक जनरल गायडिंग प्रिन्शिपल म्हणून वासलेकरांचे (निदान ह्या वेळचे तरी) म्हणणे मला दुर्लक्षणीय वाटत नाही.

समस्या सोडवता येण्यापूर्वी, मुळात समस्या आहे, हे लक्षात यावे लागते (आणि मान्य करावे लागते), आणि समस्या नेमकी काय आहे, हे आयडेंटिफाय करावे लागते. (ती सोडवायची कशी, हा फार पुढचा प्रश्न.) त्या दृष्टीने वासलेकरांचा प्रस्तुत लेख (निदान मला तरी) अस्थानी वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर एखाद्या समस्येचे निदान 'simplistic' असेल तर उपाय सुद्धा चुकीचा येतो. काही ठिकाणी त्यांचे हे विचार हानिकारक ठरू शकतात. उदाहरणार्थ वासलेकारांचा जनलोकापालाला विरोध आहे. माझ्या मते 'Carrot and Stick ' हे भ्रष्टाचाराला कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. परंतु वासलेकारांच्या पद्धतीने गेलो तर हानिकारक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

'न'वी बाजू शी सहमत.

या लेखाच्या समर्थनार्थ हा व्हिडिओ पहा -

http://mruniversity.com/courses/development-economics/trust-and-economic...

-

समाजात विश्वास जास्त असणे म्हंजे "ट्रांझॅक्शन कॉस्ट्स" कमी असणे असा माझा कयास आहे. म्हंजे ३ "ट्रांझॅक्शन कॉस्ट्स" पैकी "पोलिसिंग & मॉनिटरिंग कॉस्ट्स" कमी होतात. "ट्रांझॅक्शन कॉस्ट्स" ची थियरी समजण्यास अत्यंत कठिण पण एकदा समजली की लै भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी हा video पाहिला नाही परंतु ''New Institutional Economics' च्या धर्तीवर असावा असा माझा कयास आहे. विश्वासामुळे Transaction Costs कमी होतात याबद्दल माझे दुमत नाही.
परंतु एखाद्या समाजव्यवस्थेत विश्वास निर्माण करणे आणि तो Organically निर्माण होणे निराळे.
जर समाजात विश्वास निर्माण झाला तर.. ही गोष्ट भारतातले राजकारणी प्रामाणिक झाले तर किंवा सर्व सरकारी अधिकारी प्रामाणिक झाले तर या धर्तीवर वाटते. आजच्या समाजाकडून विश्वासावर आधारित समाजाकडे जाणार कसे ह्याचे उत्तर वासलेकर समाधानकारक देत नाहीत (निदान मला तरी वाटत नाही). ज्या पाश्चिमात्य देशांचे उदाहरण वासलेकर देतात त्यातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मात्र तिथला इतिहास, आणि सामाजिक व आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता त्या योजना भारतात लागू करण्याचा आग्रह करणे फायाद्यचे ठरणार नाही.
भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक उपाय योजनांची गरज आहे. परंतु काही उपाय सध्याच्या परिस्थितीत जास्त उपयोगी आहेत, उदा. प्रभावी लोकपाल. मात्र ते सोडून रामबाण ( वासालेकारांच्या दृष्टीने ) उपायाच्या,जो प्रत्यक्षात येणे कठीण आहे, मागे लागणे मला पटत नाही. वासलेकर सांगतात की भारतांत विश्वासावर आधारीत समाज निर्माण झाला तर भ्रष्टाचार आपोआप संपेल, हा लेखाचा मुख्य मुद्दा. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी रास्त आहेत उदा. नियमांचे सुटसुटीकरण, मात्र मुख्य मुद्दा पटत नाही .
जर वासलेकर हे 'Long Term solution' म्हणून सांगत असते तर माझा आक्षेप नसता. परंतु त्यांच्या दृष्टीने हा सध्याच्या काळात प्रभावी मार्ग आहे आणि म्हणून मला त्यांचा हा लेख 'simplistic' आणि पर्यायाने निष्कर्ष 'चुकीचा' वाटतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

New Institutional Economics. वाह. क्या बात है. तुम्हास खास प्रणाम.

---

तुमचा मुद्दा हायेकियन ( Smile )आहे असे मला वाटते. खासकरून हे वाक्य -

परंतु एखाद्या समाजव्यवस्थेत विश्वास निर्माण करणे आणि तो Organically निर्माण होणे निराळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<इंद्रकुमार गुजराल जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले, तेव्हा एका राजनैतिक कामामुळं माझं स्टॉकहोम इथं वास्तव्य होतं. पंतप्रधान गुजराल यांचा एक दूत मला भेटण्यासाठी स्टॉकहोम इथं आला व भारतात परतण्यासाठी मला आग्रह करू लागला. गुजराल यांना भारतात एक नवीन कल्पना राबवायची होती व तिची जबाबदारी माझ्याकडं द्यायची त्यांची इच्छा होती.

मी भारतात मित्रांना याबाबत विचारलं. सगळ्यांचं म्हणणं असं पडलं, "गुजराल यांचं सरकार एका वर्षाच्या आत कोसळेल व त्यामुळं तू परत येऊन काही फायदा होणार नाही." परिणामी, मी अजून काही काळ स्टॉकहोममध्येच राहिलो. दिल्लीतल्या जाणकार मित्रांनी सांगितल्याप्रमाणे गुजराल यांचं सरकार अपेक्षेपेक्षा लवकरच बरखास्त झालं. त्यांची कल्पना अमलात आली नाही; परंतु भारताच्या प्रगतीसाठी त्या कल्पनेची गरज मात्र नक्कीच आहे.> संदीप उवाच.

आल-गोर्बी भेटीसारखाच ह्या वेळचा डायलॉग काय झाला ते मी सांगू शकतो कारण त्यावेळी मी मक्षिकायोनीत (म्हणजे माशी, आलं ध्यानात?) होतो आणि जेथे ही भेट झाली त्या खोलीच्याच छतावर बसलो होतो.

नोबेल प्राइझ कमिटीच्या गुप्त मीटिंगमधून संदीप नुकतेच हॉटेलमध्ये परतले होते आणि दिवसभरचे मीटिंग्जचे राउंड्ज संपवून स्वीडनच्या प्रधानमन्त्र्यांकडे डिनरला जाण्यापूर्वी फ्रेश व्हायचा त्यांचा विचार होता. स्वीडनचे भूतपूर्व प्रधानमन्त्री ओलॉफ पाम ह्यांचा आपल्या आजीकडून भारताशी संबंध असल्याने स्वीडनच्या भेटीवर आलेल्या कोणत्याहि वीवीआयपी भारतीयाला स्वीडनच्या प्रधानमन्त्र्याने भेटायचेच असा तेथील रिवाज आहे. त्यानुसारच हे निमन्त्रण होते.

एव्हढयात फोनची घंटा किणकिणली. ’ओबामानाच ह्या वर्षाचे शान्ततेचे नोबेल प्राइझ मिळावे म्हणून आपण खटपट कराव” अशी विनंति करण्यासाठी यू.एस.अँबॅसॅडरचा फोन बहुतकरून असणार असे संदीपना वाटले. यू.एस.स्टेट डिपार्टमेंटने ह्या कामासाठी जोरात फील्डिंग लावले आहे ह्याचा संदीपना अंदाज आला होता. शिवाय लंगोटीयार आल (आल गोर हो) ह्याचाहि फोन येऊन गेलाच होता. पण तशी विनंति असती तर काहीच प्रॉब्लेम नव्हता कारण गुप्त मीटिंगमध्ये संदीप तीच सूचना करून आले होते आणि त्यांच्या Strategic Foresight Group ह्या थिंकटॅंकची शिफारस मानली जात नाही असे कधी होतच नाही.

संदीपनी फोन उचलला पण तो त्यांच्या सेक्रेटरीचाच निघाला. ’सॉरी टु डिस्टर्ब यू सर, आपण डिनरला जायच्या घाईत असाल ह्याची मला कल्पना आहे’. सेक्रेटरी अपोलोजेटिकली म्हणाला. ’अरे नाही, बोल बोल’, संदीप उत्तरले. (आपल्या संपर्कात येणार्‍या सर्वांशी प्रेमानेच बोलायचे आणि सर्वांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा, कारण सर्व माणसे अ‍ॅट हार्ट गुडच असतात अशी Strategic Foresight Group ची धारणा आहे.) ’सर, एक माणूस सकाळपासून तुम्ही परतायची वाट पाहातो आहे. आपण इथले इंडियन अँबॅसॅडर आहोत असे तो म्हणतो आहे आणि त्याला केवळ दोन मिनिटांसाठी आपल्याला भेटायचे आहे. पाठवू का त्याला वर?" "पाठव, पण त्याला सांग दोनच मिनिटे. स्वीडनच्या प्रधानमन्त्र्याला तिष्ठत ठेवणे चांगले दिसणार नाही."

थोडया वेळातच बेल वाजली आणि दारात एक भारतीय उभा दिसला. ’सॉरी टु डिटेन यू सर, पण मला पीएमनी आपल्याला भेटायला पाठवले आहे. मी भारताचा ह्या देशातला अँबॅसॅडर आहे. मी आत येऊ का, अगदी दोन मिनिटे.’ तो काकुळतीनं म्हणाला.

’या या, काय म्हणतात इंदरजी? सध्या नवे मन्त्री शोधण्याच्या घाईत असतील ना?’ संदीपनी विचारले. ’इंदिरेची साथ सोडा तुम्ही. तिच्याबरोबर राहिल्याने तुमच्या स्वच्छ रेकॉर्डवर शिंतोडे उडतील’ असा सल्ला संदीपनी इंदरजीना एकदा दिला होता आणि त्याचीच गोमटी फळे इंदरजी आता चाखताहेत असा विचार संदीपच्या मनात क्षणभर चमकून गेला.

’त्या बाबतच पीएमनी मला तुमच्याकडे पाठवले आहे,’ अँबॅसॅडर उत्तरला. ’मन्त्रिमंडळाची यादी पीएमनी फायनल केली आहे आणि त्यावर तुम्ही एकदा नजर टाकावी अशी त्यांची इच्छा आहे. अणि आणखी महत्त्वाचे म्हणजे..” अँबॅसॅडर थोडा चाचरला. ’आणखी काय? मोकळेपणे बोला अँबॅसॅडरजी,’ संदीप म्हणाले. धीर करून अँबॅसॅडरजींनी बोलणे पुढे सुरू केले, ’आपल्या मन्त्रिमंडळात एक्स्टर्नल अफेअर्स खाते आपण संभाळावे अशी त्यांची फार इच्छा आहे. आपल्याइतका जगभर प्रवास करणारा ह्यापूर्वी कृष्ण मेननशिवाय कोणी झाला नाही. देशोदेशींच्या प्राइम मिनिस्टर्स, प्रेसिडेंट्स ह्यांच्याशी आपली वैयक्तिक ओळख आहे. स्वत: गोर्बाचोव आणि क्लिंटन आपल्याला मानतात. आपण माझ्या मन्त्रिमंडळात आलात तर माझा एक बोजा हलका होईल हे नक्की. संकोच अशासाठी वाटतो की वस्तुत: आपण पंतप्रधान आणि मी एक्स्टर्नल अफेअर्स हे जादा चांगले दिसले असते पण आपण निवडणुकींच्या प्रान्तात पडणार नाही म्हणून मला ही जागा घ्यावी लागत आहे. तर मग कमीतकमी माझ्या मन्त्रिमंडळात आपण यावे अशी माझी फार इच्छा आहे असा पीएमचा आपल्याला निरोप आहे,’ अँबॅसॅडरजी एका दमात घाम पुसून बोलले आणि एक मोठी कामगिरी आपण पार पाडली असा विश्वास त्यांच्या देहबोलीमध्ये दिसला. ’आणि अजून एक, येथून परतण्याआधी आमच्या एंबसीला एक भेट अवश्य द्यावी अशी माझी वैयक्तिक विनंति देखील आहे.’ होऊ घातलेल्या बॉसला आधीच मस्का मारायची चाणक्यगिरी आपल्याला वेळेवर बरी सुचली असा सेल्फ-कॉंग्रॅच्युलेटरी विचारहि त्यांच्या मनात क्षणार्ध तरळून गेला.

’ह्या सूचनेबद्दल इंदरजीना माझा धन्यवाद कळवा. असेहि सांगा की माझा निर्णय उद्यापर्यंत त्यांना कळेल. बरे तर, आता या,’ संदीपनी अँबॅसॅडरजींना निरोप दिला.

नंतर संदीप डिनरला निघून गेले. रात्री परतले आणि लगेच त्यांनी Strategic Foresight Group मधल्या आपल्या सह्कार्‍यांना फोन लावला. तोपर्यंत भारतात दिवस सुरू झाला होता आणि त्यामुळे सर्व सहकारी एकत्र मिळाले. सहकार्‍यांचे असे मत पडले की गुजरालांच्या सरकारात काही दम नाही आणि ते काही दिवसांचेच सोबती आहे. अशा पडेल मन्त्रिमंडळात भाग घेऊन आपले कॉपीबुक ब्लॉट करण्यापेक्षा संदीपनी अधिक चांगल्या प्रस्तावाची वाट पहावी. ह्या सल्ल्यानुसार इंदरजीना आतल्याऐवजी बाहेरूनच सपोर्ट द्यायचा विचार संदीपनी इंदरजींना दुसर्‍या दिवशी कळवला आणि ह्या प्रकरणाची अखेर झाली.

कोलंबोत नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल परिषदेत तमिळ आणि सिंहली जनता एकमेकांवरच्या विश्वासाच्या आधाराने सध्याची समस्या कशी सोडवू शकेल ह्याबद्दल राष्ट्रप्रमुखांना संबोधित करण्यासाठी संदीप तेथे गेले होते. नरेंद्र मोदींचा एक दूत तेथे त्यांना एका कल्पनेवरून गुप्तपणे भेटलेला आहे आणि भारताच्या प्रगतीसाठी त्या कल्पनेची गरज मात्र नक्कीच आहे इतके मी (म्हणजे माशी) सांगून ठेवते. आगे पर्देपर देखिये होता है क्या...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा वासलेकरांचा सकाळ मधला लेख- 'आक', 'आप' आणि आपण !
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5240700818410070480&Se...

त्यात महत्वाच्या दोन मोठ्या चुका आहेत
१) तुर्कस्थानच्या ग्रोथ रेटची तुलना करतांना गडबड आहे.
१५% हा GDP in Current Prices मधला ग्रोथ रेट आहे. जर आपण भारत आणि चीनचा Current Prices मधला ग्रोथ रेट पहिला तर भारत आणि चीनचा ग्रोथ रेट जास्त आहे
तुर्कस्थान - 15.40 % , भारत -१५.९७% आणि चीन - १९. २१%.

परंतु अर्थशास्रात GDP in Current Prices पेक्षा GDP in Constant Prices वापरत कारण वेगवेगळ्या देशांतील चलनवाढीचा (Inflation) दर वेगवेगळा असतो. आता ग्रोथ रेट इन Constant Prices मध्ये पाहिले तर हा फरक अधिक तीव्र होतो.
तुर्कस्थान - ४. ८२ % , भारत -८. २८% आणि चीन -१०. ९३ %
२) तुर्कस्थानातील 'आक' हा १००-२०० सामान्य लोकांनी मिळून स्थापन केला असे म्हंतात. परंतु विकी काही तरी वेगळेच सांगते. काही जुन्या नेत्यांनी मिळून हा पक्ष चालू केला होता

Source :
१) World Economic Outlook (WEO) data, IMF ( http://www.econstats.com/weo/CIND.htm)
२) http://en.wikipedia.org/wiki/Justice_and_Development_Party_(Turkey)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

आणि सकाळने माझी प्रतिक्रिया प्रकाशित केलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes

सकाळचा बायस जगजाहीर आहे. त्यात काही विशेष नाही. साहेबांविरुद्धच्या कमेंटही छापल्या जात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्यावेळचा वासलेकरांचा लेख सेन्सिबल वाटला म्हणा किंवा मला त्यातला आशय समजू शकला म्हणा, पण वाचनीय आहे खरा.
बारीक सारिक तपशील वगैरेबाबतचे प्रश्न बाजूला ठेवूत. पण मुलात सुचवलेला मुद्दा महत्वाचा वाटला.शिवाय तो किमान व्यक्तिंना तरी
नक्कीच स्वतःपुरता आचरणीय आहे.
हा त्याचा दुवा :-
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5367321973176527190&Se...सप्तरंग&NewsDate=20140119&Provider=संदीप वासलेकर author@esakal.com&NewsTitle=केल्यानं देशाटन येतं शहाणपण (संदीप वासलेकर)
.
.
आणी त्यातील काही महत्वाचं उद्धृत :-
केल्यानं देशाटन येतं शहाणपण
मी अलीकडंच कामासाठी युरोपात गेलो होतो. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत चर्चा व वार्तालाप करून थकलो होतो. मध्ये एक रविवार आला. मी सहकाऱ्यांना सांगितलं - ""आपल्याला कुणीही ओळखू शकणार नाही, अशा ठिकाणी आपण सगळे रविवारी जाऊ या.''

आम्ही संशोधन करून लीशस्टेनस्टाईन या छोट्या देशाची राजधानी वाडुझ इथं जायचं ठरवलं. या देशाचं नावंही बऱ्याच जणांना माहीत नसल्यानं तिथं आराम करता येईल व कुणीही भेटणार नाही, याची खात्री होती.

मी वाडुझ शहराच्या प्रमुख भागात बसमधून उतरलो, तर मागून मराठीत कुण्या महिलेनं हाक मारली - ""अहो, एक मिनिट, संदीप वासलेकर तुम्हीच का?'' प्रथम "नाही' म्हणण्याचा मोह झाला होता; पण "हो' म्हटलं. मराठी महिलांचा तो छोटासा घोळका होता. त्या म्हणाल्या - ""आम्ही "सप्तरंग' पुरवणीच्या नियमित वाचक आहोत. इथं "वीणा वर्ल्ड'बरोबर पर्यटनासाठी आलो आहोत.'' मी त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या. समोरून मराठी पर्यटकांचा दुसरा एक घोळका येत असल्याचं दिसलं म्हणून तिथून सटकलो.

खरंतर वाडुझसारख्या ठिकाणी मध्यमवर्गीय मराठी पर्यटक पाहून मला खूप आनंद झाला होता. हल्ली जगातल्या अनेक भागांत महाराष्ट्रातले लोक पर्यटनासाठी जातात. नवे देश पाहतात. बरेच जण "एका दिशेचा शोध' हे माझं सदर वाचतात. माझी पुस्तकंही त्यांच्या वाचनात असतात. त्यामुळं रस्त्यात मला गाठून माझी ओळख करून घेत स्वतःची ओळख ते करून देतात. पण या पर्यटकांकडं पाहिल्यावर मला एक खंत वाटते. त्यातले बहुसंख्य लोक निवृत्त झालेले असतात. काही कुटुंबांबरोबर लहान मुलं असतात; पण युवकांचं प्रमाण खूपच कमी असतं.

महाराष्ट्रातल्या युवकांनी वर्षारंभानिमित्त देशाटन किंवा भारताच्या विविध भागांत प्रवास करण्याचा निश्‍चय केला, तर आयुष्याला कलाटणी मिळण्याचा अनुभव त्यातल्या बऱ्याच जणांना येईल.

खिशात पैसे नसताना 20-25 वयाच्या दरम्यान मी खूप प्रवास केला. मी जो काही घडलो आहे, त्या माझ्या जडणघडणीत या प्रवासाचा खूप मोठा वाटा आहे. प्रवासासाठी कुण्या पर्यटन कंपनीबरोबर जाण्याची गरज नसते. एक तिकिट काढायचं...थोडे पैसे खिशात ठेवायचे व स्वतःला प्रवाहात झोकून द्यायचं...जे नवनवे अनुभव मिळतील, ते आत्मसात करण्यासाठी मनाच्या खिडक्‍या उघड्या ठेवायच्या...प्रवास करताना नवं ज्ञान, नवे विचार, नव्या कल्पना, नव्या मित्र-मैत्रिणी मिळतील, हीच अपेक्षा ठेवायची.. काही व्यावहारिक फायदा होईल, अशी अपेक्षा ठेवली तर मात्र वाट्याला निराशाच येईल.

मी 25-26 वर्षांचा असताना असाच एकदा ब्रसेल्सला गेलो होतो. तिथं एका स्वस्त हॉटेलात खोली घेतली. हॉटेलचं दोन-तीन दिवसांचं भाडं भरण्याइतपतच पैसे माझ्याकडं होते. फिरायला गेलो तर रस्त्यात एक इटालियन मित्र भेटला. तो कारनं लक्‍झेम्बर्गला चालला होता. मी हॉटेलमधून सरळ बाहेर पडलो व त्याच्याबरोबर लक्‍झेम्बर्गला गेलो. त्याच्या घरी राहिलो. तो त्याच्या कामात मग्न होता. मी मनसोक्त फिरलो. अनेक लोकांना भेटलो. रस्त्यात एक शांतीमोर्चा चालला होता. घोषणा देत त्यात सहभागी झालो. तिथं रिचर्ड दोहर्ती नावाच्या युवकाशी माझी ओळख झाली. तो दुसऱ्या दिवशी ब्रसेल्सला जाणार होता. मी त्याच्या गाडीतून पुन्हा ब्रसेल्सला आलो.

त्यानंतर मी चार दिवस रिचर्डकडं राहिलो. एकदा रात्री फिरून यायला उशीर झाला. मला रिचर्डच्या इमारतीत जायचा रात्रीचा सिक्‍युरिटी कोड माहीत नव्हता. मला ती रात्र बाहेरच अन्यत्र काढावी लागली. रात्रभर ब्रसेल्सच्या रस्त्यांवरून फिरलो. फिरता फिरता अचानक एका इमारतीच्या बाहेर "आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र' अशी पाटी पाहिली. आत अद्यापही दिवे लागलेले दिसत होते. मी बेल वाजवली. तिथल्या लोकांना माझी अडचण सांगितली. मी रात्रभर तिथं राहिलो व रिचर्डला फोन करून "सकाळी येतो,' असं कळवलं.

कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर मी अनेक वर्षं असा प्रवास केला. केवळ एक तिकीट काढून मी मे महिन्यात विदेशी जायचो व खिशात फार पैसे नसतानाही पाच-सहा महिने तिकडंच फिरायचो. थंडी पडायला सुरवात झाली, की नोव्हेंबरमध्ये मुंबईत परतायचो. नंतर डिसेंबर ते मे या कालावधीत जे मिळेल, ते काम करून तिकिटपुरत्या पैशांची पगारातून बचत करायचो.

या सर्व प्रवासातून मला जे शिकायला मिळालं, त्याची तुलना कोणत्याही शिक्षणक्रमाशी करता येणार नाही. आचार्य अत्रे अनेकदा म्हणत असत ः "केल्यानं देशाटन; येतं शहाणपण.'

20 ते 30 या वयोगटातल्या युवकांना माझा कळकळीचा सल्ला आहे - दोन वर्षं काम करा. त्यातून एका तिकिटासाठीचे 50-60 हजार रुपये आणि वरखर्चासाठीचे 50-60 हजार रुपये एवढी बचत करा व तीन-चार महिने फिरायला जा. समजा, एवढ्या मोठ्या रकमेची बचत करता न आल्यास विदेशात जाण्याऐवजी भारतातल्याच एखाद्या भागात; विशेषतः ईशान्य भारत, उडिशा, पुड्डुचेरी, केरळ, हिमाचल, उत्तराखंड अशा ठिकाणी जा. प्रवासात जास्तीत जास्त लोकांशी गप्पा मारा. आदरातिथ्य स्वीकारा व आयुष्याच्या पुस्तकाची नवी पानं कशी उघडतात, ते पाहा!

सावधगिरीचा एक इशारा मात्र देतो. हल्ली जग बघण्यासाठी काही युवक इंग्लंडमधल्या विद्यापीठात "आंतरराष्ट्रीय संबंध,' "हवामानबदल,' "जागतिकीकरण' आदी विषयांवर एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी जातात. त्यासाठी 15-20 लाख रुपये खर्च येतो. ऐपत नसली तरी कर्ज घेऊन जाणारेही अनेक युवक आहेत; पण मोठ्या नामांकित विद्यापीठांतदेखील हे एका वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम अतिशय कमी दर्जाचे आहेत. तिथं जाऊन ज्ञानात वा अनुभवांत काही भर पडणार नाही अथवा नंतर चांगली नोकरीही मिळणार नाही. डोक्‍यावर कर्जाचा बोजा मात्र चढेल.

दुसरी एक महत्त्वाची गोष्ट. देशाटन म्हणजे परदेशात जाऊन स्थायिक होणं अथवा आयुष्यभर ग्रीन कार्डची अभिलाषा धरणं, हे मला अभिप्रेत नाही. देशाटन म्हणजे जगाच्या विविध भागांत जाऊन स्वतःला नव्या विचारांनी समृद्ध करणं.

देशाच्या व जगाच्या विविध भागांत कमीत कमी खर्चात हा प्रवास केला, तरच अनेक अनुभव मिळतील. यूथ होस्टेल अतिशय स्वस्त असतात; तसंच अनेक देशांत स्थानिक लोकांच्या घरी कसं राहता येईल, याची माहिती इंटरनेटवर मिळते. युरोपमध्ये तर विद्यार्थी व युवकांसाठी रेल्वेनं प्रवास करण्यासाठी खूप सवलती मिळतात. जर अनुभवांचं ऐश्‍वर्य संपादन करण्याची आस असेल, तर घरात ऐश्‍वर्य असण्याची गरज नाही.

भारतातले बरेचसे युवक कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर लगेचच करिअरचा विचार करतात; पण "करिअर', "करिअर' असा मंत्र जपत असताना जीवन जगायला मात्र ते विसरतात. घर-दार, पैसा-अडका या सर्व गोष्टी कधी असतात, तर कधी नसतात; पण आयुष्यात अनुभवलेले सुखद क्षण हे ग्रीष्म ऋतूतल्या गुलाबपुष्पांसारखे असतात. आयुष्याच्या अखेरीस त्यांचा सुगंधच जीवन आनंददायी करतो.

प्रवासामुळं यौवनावस्थेत जास्तीत जास्त शिकायला मिळतं; पण व्यावसायिक क्षेत्रात जम बसवल्यावरही उद्दिष्टपूर्ण प्रवास केला तर अनुभवाची विशिष्ट उंची गाठता येते.

महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. तीनुसार शेतीत प्रगत असलेल्या देशांना भेटी देण्यासाठी शासन शेतकऱ्यांना साह्य करतं. काही जणांना वाटेल, की सरकारनं पैशांचा असा अपव्यय करू नये; परंतु दरवर्षी जे मराठी शेतकरी जातात, त्यांपैकी केवळ पाच टक्के शेतकऱ्यांनी जरी काही नवं तंत्रज्ञान आत्मसात केलं, तरी किंवा नव्या कल्पना विकसित केल्या, तरी संपूर्ण ग्रामीण भागात आमूलाग्र बदल होऊ शकतील.

"सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शिक्षणक्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी एक अभिनव योजना बनवली आहे. ते दरवर्षी 100 शिक्षणतज्ज्ञांना घेऊन एका नव्या देशात जातात. तिथली शिक्षणपद्धती, औद्योगिक विकास, आर्थिक परिस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची संधी ते देतात. या योजनेतून प्रवास करणाऱ्या काही शिक्षणतज्ज्ञांचा दृष्टिकोन व्यापक झाला, तर संपूर्ण समाजाला त्याचा प्रचंड मोठा फायदा होईल.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वैचारिक देवाण-घेवाण करून व्यावसायिकांना आपली वैचारिक व्याप्ती वाढवण्याची संधी मिळण्यासाठी सध्या अनेक योजना आहेत. त्यात रोटरी क्‍लबसारख्या सेवाभावी संस्था अग्रगण्य आहेत.

भारतात डॉ. महंमद करीम छागला नावाचे एक अतिशय नामांकित विचारवंत होते. ते काही काळ केंद्रीय मंत्रीही होते; पण ते पदांच्या मागं कधी धावले नाहीत. त्यांनी अनुभवसमृद्ध आयुष्य जगण्यावर भर दिला. "ग्रीष्म ऋतूतलं गुलाबपुष्प' ही कल्पना त्यांनीच मांडली आहे.

मी अशा विचारवंतांपासून थोड्या गोष्टी शिकलो म्हणून स्वतःला सुदैवी समजतो. मी कधीच कोणतंही पद, सत्ता, मान-मरातब प्राप्त केला नाही; पण माझ्या ग्रीष्म ऋतूत सुगंध घेण्यासाठी गुलाबपुष्पं मात्र मी खूप जमवली आहेत! ग्लॉसगो ते यॉर्क या केवळ चार तासांच्या प्रवासातल्या गप्पांनंतर हुंदका देणारी मार्गारेट, मला अचानक चक्कर आल्यावर धावपळ करणारा मारिओ, माझ्या वाढदिवशी मला व्हेनिसमध्ये सतत हसवणारी पोर्टोरिकोची ती अनामिका, 30 वर्षांपूर्वी असाच अचानक भेटल्यानंतर कायमचाच जीवश्‍चकंठश्‍च मित्र झालेला टोरांटोचा निकोलस...असे असंख्य चेहरे, असे अनंत क्षण, अशी अगणित गुलाबपुष्पं...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>भारतात डॉ. महंमद करीम छागला नावाचे एक अतिशय नामांकित विचारवंत होते. ते काही काळ केंद्रीय मंत्रीही होते; पण ते पदांच्या मागं कधी धावले नाहीत. त्यांनी अनुभवसमृद्ध आयुष्य जगण्यावर भर दिला. "ग्रीष्म ऋतूतलं गुलाबपुष्प' ही कल्पना त्यांनीच मांडली आहे.

छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. ते विचारवंत म्हणून गणले जात नव्हते. ते केंद्रीय मंत्री होते हे खरे आहे.

त्यांनी "रोजेस इन डिसेंबर" नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझी फिरायची स्टाईल अशीच असल्याने (चक्क) वासलेकरांचे लेखन (चक्क) आवडले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाचा पहिला भाग आवडला. लोकांनीही पदवीच्या मागे लागण्यापेक्षा हे असंच करावं, हा भाग पुन्हा प्रचारकी थाटाचा वाटला. त्यातही हे 'धमाल' वासलेकर असल्यामुळे अधिकच आंबूस वास आला. पुन्हा प्रतापराव पवार, शेतकऱ्यांना प्रशिक्षण हा भाग चांगला. पण छागलांचं नाव उगाचच, नेम ड्रॉपिंग प्रकारातलं. आणि शेवटचा परिच्छेद ... असोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरं तर हे वासलेकरांच्या नेहमीच्या स्टाईल पेक्षा वेगळं आहे, कारण "तुम्ही असं करा, तसं करा" असं ते सहसा सांगत नाहीत, या लेखात त्यांनी तसं सांगितलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांनीही पदवीच्या मागे लागण्यापेक्षा हे असंच करावं, हा भाग पुन्हा प्रचारकी थाटाचा वाटला.

त्यांनी थेट असं म्हटलं आहे असं नाही वाटलं.

त्यांची वाक्य, अधोरेखन माझं

सावधगिरीचा एक इशारा मात्र देतो. हल्ली जग बघण्यासाठी काही युवक इंग्लंडमधल्या विद्यापीठात "आंतरराष्ट्रीय संबंध,' "हवामानबदल,' "जागतिकीकरण' आदी विषयांवर एका वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी जातात. त्यासाठी 15-20 लाख रुपये खर्च येतो. ऐपत नसली तरी कर्ज घेऊन जाणारेही अनेक युवक आहेत; पण मोठ्या नामांकित विद्यापीठांतदेखील हे एका वर्षाचे पदव्युत्तर अभ्यासक्रम अतिशय कमी दर्जाचे आहेत. तिथं जाऊन ज्ञानात वा अनुभवांत काही भर पडणार नाही अथवा नंतर चांगली नोकरीही मिळणार नाही. डोक्‍यावर कर्जाचा बोजा मात्र चढेल.

जग बघायच आहे या कारणासाठी कर्ज काढून फिरंग विद्यापिठातल्या निम्न दर्जाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश नका घेऊ असं म्हणतायत. मला वावगं नाही वाटलं त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखाच्या पहिल्या भागात ज्या फिरण्याचं वर्णन त्यांनी केलं आहे त्यातून काय शिकले हे लिहीलं असं तर मला ते प्रचारकी वाटलं नसतं. "अनेक युवक" करतात त्यातल्या काही गोष्टी योग्य वाटत नाहीत, असं काहीतरी मोघम लिहून उगाच संशयाचे भोवरे फिरवायचे, हा प्रकार मला dodgy वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'केल्याने देशाटन' हे शीर्षक वाचून पुढील विचार सुचले.

'देशाटनं पण्डितमित्रता च वाराङ्गना राजसभाप्रवेशः| अनेकशास्त्रार्थविलोकनं च चातुर्यमूलानि भवन्ति पञ्च||' हा मूळचे प्रसिद्ध सुभाषित. त्याचे तितकेच प्रसिद्ध मराठी समश्लोकी भाषान्तर 'केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार| शास्त्रग्रंथ विलोकुनि मनुजा चातुर्य येतसे फार|| दोन्ही श्लोक समजायला सरळ आहेत आणि दोघांचीहि निर्माते माहीत नाहीत.

दुसर्‍या मराठी श्लोकात, तो बहुधा बाळबोधाचा भाग म्हणून रचला गेला असल्याने, मुळातील वारांगनेचा उल्लेख वगळून संस्कृत श्लोकामधील पाच चातुर्यलक्षणांपैकी चारच ठेवली आहेत! पडवीवर येरझारा घालत आणि कुटलेला विडा चघळत पोरांना धडे घालणार्‍या पंतोजींना 'वारांगने'च्या उल्लेखामुळे चक्कर येत असणार आणि कोणा चौकस कार्ट्याने 'वारांगना म्हणजे काय हो गुरुजी?' असे विचारलेच तर त्याला उत्तर काय द्यायचे हेहि त्यांना अडचणीचे वाटणार. म्हणून 'वारांगने'ला अजिबातच वगळून टाकले आहे असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपुर्ण+विनोदी असं एकदम. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग 'भले त्यासी देऊ'ची साफसफाई झाली याचं आश्चर्य वाटू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूळ पाठाबद्दल धन्यवाद!!! आजवर पाहिला नव्हता.

बाकी पंतोजीवरून यशवंत पाठकांच्या 'नाचू कीर्तनाचे रंगी' नामक पुस्तकात त्यांनी कीर्तनात मराठीत अश्लील वाटणारे पण अर्थ सभ्य असणारे संस्कृत शब्द टाळून 'सभ्य' वाटणारे शब्द घालावेत अशी सूचना करून त्याची दोनेक उदा. दिलीत ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थोड अवांतर - काही वर्षांपूर्वी नौकरी साठी वासालकर यांनी माझा interview घेतला होता . त्यात त्यांनी माझ्या नॉलेज च्या चिंधड्या उडवल्या होत्या . वर interview संपल्यावर 'मला वाटत या interview चा निकाल काय आहे हे सांगण्याची काही गरज नाही ' असा माझ्या तोंडावरच शेरा मारला होता . तेव्हा पासूनच त्यांच्या बद्दल माझ्या मनात जाम अढी आहे आणि त्यांच्या प्रत्येक मताचा मित्रांच्या दारू पार्टीत निषेध करतो : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम