वाचन

भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा

तुम्ही स्वतःला पुस्तकातला किडा समजता? जेवता खाता पुस्तकं वाचून, चश्मिष्ट म्हणून चिडवून घेऊन, पुस्तकात नाक खुपसून तुमचं लहानपण गेलंय? फास्टर फेणे, बिपिन बुकलवार, नंदू नवाथे आणि रॉबिन हुड ही नावं तुम्हांला मित्रासारखी जवळची वाटतात? ज्यूल व्हर्न आणि एच. जी. वेल्स आणि आर्थर कॉनन डॉयल या लोकांशी तुमची ओळख मराठीतून झालीय? द्या टाळी!

मग भारांना तुम्ही किती ओळखता ते आजमावून बघाच! ही आमची प्रश्नमंजूषा भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सहर्ष सादर...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

'भा. रा. भागवत' यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त स्पर्धा

‘भास्कर रामचंद्र भागवत’, अर्थात ‘भा.रा.भागवत’ हे नाव अनेक मराठी वाचकांना परिचित आहेच. मराठी बालसाहित्यातील एक अतिशय नावाजलेले लेखक आणि अग्रणी असे त्यांचे वर्णन करणे अतिशयोक्त होणार नाही. 'बालमित्र' या अंकाचे ते संस्थापक व संपादक. अर्थात, त्यांची ओळख इतर साहित्यापेक्षा 'फास्टर फेणे' या त्यांच्या प्रसिद्ध पात्रामुळेच अधिक आहे. मात्र तो झाला त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील केवळ एक भाग!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

संत अन स्त्रीरुप

सर्वात आधी हे स्पष्ट करते की मी कोणत्याही धर्माचा , सखोल अभ्यास केलेला नाही. पण एक हौस्/छंद म्हणून शीख, ख्रिश्चन, हिंदू आदि धर्मांतील गोष्टी/श्लोक वाचल्या आहेत. बर्‍याच वेळा असे आढळले आहे की - संत हे स्वतःला स्त्री (वधू) मानून परमेश्वराची (पतीची) आराधना करतात. या संदर्भात एक असे विश्लेषण ऐकले होते की परमेश्वर हा धनभारीत (देणारा दाता) असून आपण नेहमीच ऋणभारीत (घेणारे/याचक) असतो अन तो दाता - याचक
संबंध या कथा दर्शवितात.

चैतन्यमहाप्रभू देखील स्वतःला राधा समजत. त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पाहीले अन त्यांना राधारुप दिसले वगैरे आख्यायिका प्रचलित आहेत.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - वाचन