विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत

मी मिसळपाववर एका प्रश्नाचे उत्तर दिले आहे. माझ्या मते ज्यांना विपश्यनेची काहीच माहीती नाही त्यांना ती या लेखातुन होउ शकेल. तो उतारा जसाच्या तसा ईथे देत आहे. मी प्रथमच ईकडे लेख टाकतोय. जर नियमात बसत नसेल तर काय योग्य असेल ती कारवाई करावी.

लेख आवडला पण आचरणात आणणे कठीण आहे. कारण माफ करणे म्हणजे काय ? त्या व्यक्तीशी आपण अगदी नीट वागलो, जुन्या गोष्टी पुन्हा त्याच्यासमोर उगा़ळल्या नाहीत, अगदी वागण्यातूनही काही दाखवलं नाही, तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे.

प्रथमतः धन्याचं या जीवनाच्या सर्वात महत्वपुर्ण अंगावरील लेखाबद्दल अभिनंदन. खुपच गहन विषय आहे हा. प्रत्येक मनुष्य आपापल्या परीने यावर उपाय शोधत असतोच हे आलेल्या प्रतिसादांवरुन दिसुन येइल. पण मला तिमांचा हा ( तरी ते आपल्या मनातून इरेज करणं अशक्य आहे)प्रश्न सर्वात मूळ आणी महत्वाचा वाटला. या विषयाबद्दल माझा अनुभव .

जीवनामधे दुख: आहे हे कोणीही नाकारु शकणार नाही. मग ते दुख: म्हणजे आहे तरी काय? याचा खरच कोणी तटस्थपणे मागोवा घेइल तर लक्षात येइल की ढोबळमानाने दुख:म्हणजे कुठलीही गोष्ट(व्यक्ती,घटणा,स्थीती,परीस्थीती)माझ्या मनाविरुध्द होणे.याउलट मनाप्रमाणे होणे म्हणजेच सुख. मग आता मन म्हणजे काय? मन ही सर्वात वेगवान आणी गुन्तागुन्तीची प्रक्रीया आहे.ही स्वतः अनुभवाच्या पातळीवर समजुन घेतल्याशिवाय आपण जेजे करु ते आपल्याला दुक्खातच लोटेल. अगदी आत्ता सुखद वाटणारी घटनाही थोड्याच काळात दु़ख्खात बदलेल/बदलते हे आपल्याला आपल्याच तटस्थ निरीक्षणाने लक्षात येइल. तर यासाठी मनाला समजुन घ्यावे लागेल.

मनाचे साधारणपणे दोन भाग असतात. पहीला चेतन मन. यानेच आपले रोजचे व्यवहार आपण पार पाडत असतो. अनेक चांगल्या वाईट घटनांवर चिंतन मनन करुन आपण निर्णय घेत असतो. निरीक्षण केलेत तर असे दिसुन येईल की मनाच्या विचलीत अवस्थेत जे निर्णय घेतले त्यात काही ना काही त्रुटी असेल अन मन विचलीत नसताना जे काही कराल ते योग्य असेल.आपले मन काहीही करताना द्वंद्वामधे असते मग बर्याचदा चुकीच्या गोष्टी घडुन पश्चाताप करावा लागतो हेही दुक्खदच.मग करायचे काय? मन शांत ठेवुन व्यवहार करणे, ते तर आपल्याला कळते पण कसे करायचे ते वळत नाही.

मग मनाचे निरीक्षण करायचे. खरच लक्षपुर्वक पाहीले तर आपले मन हे दोन क्षेत्रात रमते. एकतर भुतकाळात ( ते त्याने असे केले, मला समजत नव्हते तेंव्हा, आता भेटेल तर मग दाखवतो. नाहीतर मी विश्वास ठेवला म्हनुन फसलो अश्या अनंत तर्‍हा असो.) नाहीतर लगेच भविष्यात उडी मारते ( मी दोन वर्षानी अमुक पदावर असेल, मग मला या पावर असतील, मग मी लोकांचे भले करण्याचे निर्णय घेउ शकेल, कींवा माझेच भले करु शकेल , अमुक करेल नी तमुक करेल, थोडक्यात स्वप्नरंजण). जगामधे जो अन्याय होतो तो त्या व्यक्तीच्या/ समाज्याच्या कल्याणाच्या नावावर सर्वात मोठ्या प्रमाणात होतो हे दिसुन येइल , खासकरुन धर्माच्या नावावर. अगदी कुटूंबातही अशी उदाहरणे सापडतील.मग आणखी लक्षपुर्वक पहा.

तर असे दिसुन येईल मन भुतकाळात असु की भविष्यात दोनच गोष्टीत रमते. जेजे प्रिय ते सुखद आनी जेजे अप्रिय तेते दुखद. सुखद आठवण असेल तर तासंतास ती आठवण/ घटणा मनाच्या रंग मंचावर पहाण्यात निघुन जातात,मनाला प्रसन्न वाटते. तसेच दुखद आठवणी आपल्याला पुन्हापुन्हा दुखः देतात मग आपण त्या मनातुन काढुन टाकण्यासाठी पुन्हा चांगल्या घटणा आठवतो/ किंवा मित्राला फोन लावतो/ सिनेमाला जातो/ फिरायला जातो/ व्यसन करतो अशा अनेक गोष्टी.कारण त्या दुखद गोष्टीचा त्रास नको म्हणुन आपण असे उपाय योजतो. मग ज्या घटणेमुळे व्याकुळता आली ती दाबली जाते अंतरमनात आणी आपले चेतन मन त्या सिनेमात रमुन जाते त्यामुळे आपल्याला बरे वाटते . असे वाटते की त्या व्याकुळतेतुन सुटका झाली. होतेही पण तात्पुरती, कारण तिचा पुर्ण निचरा न होता ती अंतरमनात जाते. परत त्या व्याकुळतेशी संबंधीत काही घटणा घडली तर ती पुन्हा प्रकट होते आणी आपण पुन्हापुन्हा व्याकुळ्/दुक्खी होतो.मग उपाय काय तर त्या व्याकुळतेचा पुर्णपणे निचरा/इरेज करणे की तीच पुन्हा आपल्याला त्रास देउ शकणार नाही.
हे कसे शक्य आहे यावर आपल्या संतांनी/ऋषीमुनिंनी खुपच प्रयोग केले तर त्यांच्या लक्षात आले की चेतन मन हा मनाचा फार लहान हिस्सा आहे. आपल्याला सुख/दुख्ख/आनंद कुठे होतो तर आपल्या शरीराच्या आतमधे. घटणा बाहेर जरी घडली तरी सुख/दुख्ख/आनंद हे शरीरात होते. मग त्यांनी आतमधे डोकवायला सुरवात केली आनी एकेक रहस्य बाहेर येउ लागले. ते सारे आपल्याला धर्मग्रथांत/ संत साहित्यात आजही सापडेल. सगळ्यांना माहीत आहे मला राग येतो ,त्याचा त्रास मला होतो तसा मझ्या सभोवतालच्या लोकांना /वातावरणालाही होतो . जेंव्हा मी दुख्खी असतो तेंव्हा मी ते दुख्ख माझ्यापुरतेच न ठेवता त्याचे वितरण करतो आणी आजुबाजुच्या लोकांना वातावरणाला दुख्खी करुन टाकतो ( कळत नकळत).
मग ज्यांनी अंतर्मनाचा अभ्यास केला त्यांच्या हे लक्षात आले की चेतन मन सुद्धा स्वतंत्र नाही आहे. अंतर्मन जास्त बलवान आहे. चेतन मनाने कुठलेही संकल्प करा ते संपुर्णपणे सिद्द्दीस नेता येत नाहीत कारण अंतर्मन त्याचे काहीही ऐकत नाही, त्याची अंतर्मनावर काहीही हुकुमत नाही, सगळ्या समस्यांचे माहेरघर म्हणजे हे अंतर्मन. मग त्यांनी अनेक साधनाविधी शोधल्या त्यांचे तत्कालीक फायदेही झालेत , आजही होताहेत. मग अनेक संशोधनानंतर गौतम बुद्धांनी अंतर्मन पुर्ण शुद्ध करण्याची विद्या विपश्यना शोधुन काढली. जी आज भारतात आणी जगातही अनेक केंद्रांमार्फत मोफत शिकवली जाते.
मी स्वतः विपश्यनेचा साडेतीन वर्षांपसुन नियमीत अभ्यास करतोय त्यामुळे वरील गोष्टी जरी विपश्यनाचार्य गोयंका सांगत असले तरी मी त्यांचा घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे ईथे लिहीत आहे. एका जरी माणसाला यातून लाभ झाला/ प्रेरणा मिळाली आणी त्यांना मार्ग मिळाला तर माझे हे लिहीण्याचे सार्थक झाले एवढाच उद्देश. ईथे अनेकांनी विपश्यना केलेली आहे त्यांना माझी विनंती आहे की नियमीत अभ्यास करा आणी वर्षातुन एकदा कोर्स करा. खरी साधना २०/३०/४५/६० दिवसांत चालु होते. १० दिवसांचे शिबीर तर पुर्वतयारी आहे अंतर्मनात खोलवर उतरण्याची.
मी ४ ऑगस्टला ३० दिवसांचे शिबीर करुन आलोय आणी पुर्ण शुद्ध मनाने हे सांगतो वर लिहिलेला प्रत्येक शब्दनशब्द माझ्या स्वतःच्या अनुभवावर उतरलेला आहे. कुठलीही पोपटपंची यात नाही. आता सागळ्या शंका मिटल्यात मार्गाबद्दल. पुर्णपणे यावर चालण्याचा निर्धार केलाय अगदी मरेपर्यंत. जेवढे अंतर्मन साफ होते त्यात्या वेगवेगळ्या अनुभुती येताहेत पण त्या काही महत्वाच्या नाहीयेत. रहायचय तर याच समाज्यात. सुखद/दुख्खद घटणांमधे मन जराही विचलीत होउ न देता समता ठेवणे हीच खरी कसोटी.
फार लांबचा रस्ता आहे कारण आपण जमा केलेले संस्कार. हेच अडचणीत आणतात. या साधानेने ते इरेज होतात. जेंव्हा चांगला/ वाईट अगदी शेवटचाही संस्कार इरेज होईल तीच संपुर्ण दुखःमुक्ती. आपण जमा केलेले चांगले/ वाइट संस्कार हीच मनाची कंडीशनींग. तीचा संपुर्ण निचरा म्हणजेच मुक्ती.

जरा उशीरच झालाय पण समजुन घ्याल अशी अपेक्षा.

बुद्धांनी ज्याला धम्म म्हटलय ती आहे जीवन जगण्याची कला.
गौतम बुद्धांनी धम्म म्हटलय तो धम्म असा.
शील+समाधी+प्रज्ञा(विसड्म, समज, बोध). एवढच .धम्म परिपुर्ण झाला. यातुन काही वजा नाही करायच , काही वाढवायच नाही. थोडक्यात मोड्तोड करायची नाही.

विपश्यनेचे शिबीरातील नियम फार कडक आहेत.
he pahaa

शिलपालन:

१)कुठल्याही प्राण्याची(जिवाची) हत्या करायची नाही.
२)चोरी करायची नाही.
३)ब्रम्हचर्य पाळणे .(व्याभीचार न करणे)गृहस्थांसाठी.
४)खोटे न बोलणे.
५)कुठलीही नशा न करणे.

शिबीरात जायच्या आधी काय असेल ते असेल. पण शिबीरात हे पाळावेत. १० दिवस काढुन विपश्यना आजमावयाला आल्यावर कटाक्षाने पाळावेत.

विपश्यना आहे आपल्यातील मनोवीकार दुर करनारी साधना. मनावर ताबा मीळ्वण्याची विद्या. जे इतके चंचल आहे मग हे काम सोपे नाहि. कठीणात कठीण आहे. मनोविकार जेवढे जेवढे कमी होतील तेवढी तेवढी मनशांती अनुभवास येइल.बरेचसे आजार जे मनामुळे शरिरावर प्रकटतात तेही यामुळे बरे होतात.पण हा उद्देश नसावा. कुठलाही फक्त शारिरीक असा आजार विपश्यनेने बरा होत नाही. त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी. शीलपालनाने मन स्थिर व्हायला मदत होते.

आर्यमौन शीलपालनाला मदत करते.कडकपणे शीलपालन केले तर समाधीला(चित्ताची एकाग्रता) मदत होते. समाधी चांगली झाली तर प्रज्ञेला मदत होते. जितकी गहन समाधी, तितकेच गहन अंतर्मनात उतरता येते. आणि तेथील विकारांची सफाइ करता येते.कुठलेली कर्मकांड तेथे करता येत नाही.

१० दिवसात तुमचा अनुभव तुम्ही घ्यायचा.ध्यान कसं करायच एवढच तेथे शिकवतात. पुढे करायची की नाही हे सर्व तुमचे तुम्ही ठरवायचे.बंधन नाही. ज्यांना लाभ होतो ते साधनामार्गावर चालतात. नाही ते सोडुन देतात. हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न.

शील+समाधी+प्रज्ञा(विसड्म, समज, बोध). हे संपुर्न मीळुन ब्रम्हाचरण (ब्रम्हआचरण).
त्यावरुनच ब्रम्हचर्य हा शब्द आलाय. पण आजकाल ब्रम्हचर्य म्हनजे फक्त कामवासनेशी निगडीत आहे. बुद्धांच्या वेळेस ब्रम्हाचरण (ब्रम्हआचरण) म्हण्जे ब्रम्हचर्य असे होते . असो.

बुद्धाम्चा धम्म म्हण्जे निसर्गनियम, सत्य्,रीत्,स्वभाव.
चित्तवर क्रोध धारण कराल तर त्याची वाढ होउन जास्त क्रोधी व्हाल.तुम्ही दुसर्यावर क्रोध करा की स्वतःवर परीणाम तुम्हालाच भोगावे लागतात.एकदा का हा बोध झाला अनुभवाच्या पातळीवर मग एकच पर्याय. की कुठल्याही परीस्थीतीमधे चित्तवर क्रोध जागु न देणे. हेच प्रत्येक विकाराला लागु होइल. जसं बाहेर होतंय आंबा लावला तर आंबाच येतो. कडुलिंब लावले तर कडुलींब. तिच प्रक्रुती आतमधे तसेच काम करते.हे आता तुम्हाला पटणार नाही कडाचीत पण १० दिवसात तुमचा स्वतःचा अनुभव होइल. मग जर मनुष्यप्रानी सुखशांतीसाठीच झटतोय तर त्याला ती का मीळत नाही. मिळाली तर ती चिरकाल का टिकत नाही? तर आपन जमा केलेले विकार. जेवधे ते कमी तेवढी मनशांती जास्त.

पंचेंद्रिये आमी सहावे मन सतत काहीना काही विकार जागवतात. त्यामुळे शरीरावर संवेदना उमटतात. पुर्वसंस्कार त्याचे मुल्यांकन करतात. मुल्यांकन चांगले असे झाले तर शरीरावर सुखद संवेदना होतात, मुल्यांकन वाईट आहे असे झाले तर शरीरावर दुखद संवेदना उमटतात. मुल्यांकन कोण करते तर पुर्वसंस्कार.हेच आपल्याला त्रास्दायक आहेत. हिच अंतर्मनाची जी मुल्यांकन करण्याची अंध सवय झालीय.ती मोडुन प्रज्ञा(बोध) जागवायची साधना म्हणजे विपश्यना. साधना करताना तुमच्या लक्षात येते की कोणतीही संवेदना कायमची रहात नाही. सतत बदलतेय. हेच ते सत्य. एकच एक असे काहीच नाही. सतत बदल. हेच एक सत्य आहे की सतत बदल होतोय. जसं परिवर्तन संसार का नियम है. ऐकलय बर्याचदा पन हे प्रत्यक्ष ध्यानात अनुभवावर उतरते. हे चेतन मनाला( बुद्धी) समजते पण अचेतन आंधळं आहे, तेच बलवानही आहे. ते चेतन मनाचे काहीच चालु देत नाही. कळतय पण वळत नाही असं होतं.
अचेतन सतत शरिराशी जोडलेले असते. शरीरावर संवेदना उमटली रे उमटली की त्याचे मुल्यमापन करुन जर सुखद आहे असे मुल्यमापन झाले तर संपुर्ण शरीर सुखद संवेदनांनी कंपन पावायला लागते. तेच दुखदच्या बाबतीत. मग हे आंधळे अंतर्मन सुखद संवेदनांनी आसक्त होउन अजुन हवे अशी मागणी करते सवयीने. पण सतत बदलणे या निसरर्गनियमाने सुखद संवेदना जाउन दुखद येते तेंव्हा ते परत व्याकुळ होते. सुखद जाउ नये ते कायम रहावे हीच आसक्ती. दुखद लवकर जावे आनी सुकद संवेदना यावी अशी मागणि ते सतत करते. त्याला समजतच नाही की हे सतत बदलते आहे. त्यामुळे ते सतत प्रतिक्रिया देते. चेतनला समजते पण त्याचे काहीच चालत नाही. या अचेतनने जर प्रतिक्रिया न देता तटस्थपणे होणार्या संवेदनेकडे पाहीले तर जो विकार संवेदनेच्या रुपात जागलाय त्यचा नैसर्गनियमाने निचरा होतो. नवीन संस्कार बनत नाहीत आनी जुने वर येत त्यांचाही निचरा व्हायला लागतो.ही प्रक्रीया इतकी वेगवान असते की आपन सहज पकडु शकत नाही. म्हणुनच साधनाविधी.

हे समजुन घेउन जरी पटले तरी लाभ होत नाही. प्रत्यक्ष साधनेत ते तुमच्या लक्षात येइल. म्हनुन मानो मत जानो!!!!

प्रत्यक्ष साधना जरी तिथे १० दिवस असेल तर ३५५ दिवस तुम्ही ईथे समाजात वावरताना
शीलपालन कारावयाचे आहे. त्याशिवाय साधना पुढे सरकत नाही. कुणी म्हनेल मी इथे कसाही वागेल आनी मुक्त होइल हे केवळ अशक्य. त्यामुळे ज्याला साधनेत पुढे जाउन गहन अशी मनःशांती मिळवायची आहे त्यांना शीलपालनाला पर्यायच नाही.
खुप आहे लिहायला . हे फारच संक्षीप्त आहे. लिहिलं तरी अनुभव येणार नाही. म्हणुन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो.

तीन प्रकारचे सत्य असते.
१) शब्द सत्य. कोणितरी अधिकारी व्यक्तीने सांगीतले ते.
२) अनुमान सत्य. तर्कवितर्क करुन ठरवले ते.
३) प्रमान सत्य( प्रत्यक्ष तुमच्या अनुभवावर उतरलेले)

पहीले दोन्ही आपण मानतो. तिसरे आपन जाणतो. पहीले दोन्ही चुकु शकतात. तिसरा तुमचा अनुभव आहे. हाच खरा. पण बाहेरचा प्रत्येक अनुभव आपण घेउ शकत नाही. कोणि म्हनालं हे जहाल वीष आहे आनी मी म्हणेल अनुभव घेतल्याशिवाय मी माननार नाही. काय अनुभव घेणार, प्राण गेल्यावर कसला डोंबलाचा अनुभव? म्हनुन प्रत्येक गोष्टीचा आपन अनुभव घेतलाच पाहिजे असे नाही. दुसर्याच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग करता येतो.

हीच नेमकी अडचण आहे अंतरजगतामधे. दुसरा केवळ मार्ग सांगू शकतो. आपल्याला स्वतःलाच त्याचा अनुभव घ्यायला लागतो. बुद्धाला बोधी प्राप्त झाली त्यातुन फक्त एकच मानुस मुक्त झाला तो मह्णजे सिद्धार्थ गौतम. बाकीच्यांना करुनेने मार्ग शिकवला जे चालतात ते मुक्त होतात.

असो: चुकभुल असेल तर माझी.

अवांतर: लोक म्हणतात सुर्य पुर्वेला उगवतो अन पश्चीमेला मावळतो. मला असे वाटते आहे की आपली पॄथ्वीच पश्चीमेला उगवते आनी पुर्वेला मावळते. हे लिहायला काहीच कारण नाही वाटले म्हणुन लिहीले.

ही इगतपुरीची माहीती Igatpuri centre

हे जगातील केंद्र World Centres

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

गेल्या आठवड्यात माझ्या एका मैत्रीणीच्या नवऱ्याकडून विपश्यने बद्दल थोडीशी माहिती मिळाली व दोनच दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीला मी आपण विपश्यना करू या का असं विचारलं व ती ही हो म्हणाली. माझ्या मनातील संकल्पाला तुमचा लेख ही सकारात्मक पुष्टी आहे असचं मी म्हणेन. तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद. सलग १० दिवस रजा मिळणं थोडं कठीण आहे, पण मी नक्कीच प्रयत्न करीन.

तुम्ही सांगीतलेला १ मिनीटाचा प्रयोग मी केला. मनात विचार येत होते. पण पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यावर विचारांचं प्रमाण कमी झालं. तुम्ही म्हणता तशी या गोष्टी साठी साधना आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विलासराव,
आपण या विषयावर साधेपणाने लेखन करून अनेकांसाठी अनुभव जन्य ज्ञानाचा पेटारा उघडून दाखवलात. धन्यवाद.
मला मध्यंतरी या ध्यान साधनेचा लाभ घेता आला. प्रत्यक्ष साधनेच्या बाबत कमी लिहून एक धागा मिसळपाव वर टाकला होता. कदाचित तो येथील अनेकांनी वाचला असेल.

त्रयस्थपणे पाहून अनुभवून ही ध्यान साधना करणाऱ्याला सोपी. व न करणाऱ्याला फाटे फोडू पर्याय उपलब्ध करून देणारी. ाा आत्महत्या करायला जायच्या आधी या साधनेने काही फरक पडतो का ते आजमावणाऱ्या लिपारेंची आठवण ताजी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणताही भौतीक पदार्थ केवळ तरंग आहे फक्त या विषयावर प्रकाश पाडावा. मी त्याचा माझ्या लेखाला कुठल्याही प्रकारे समर्थन म्हणुन समजणार नाही. मलाही विज्ञान या विषयावर काय म्हणतेय ते कळेल.

विज्ञानानुसार कोणताही अणू/रेणू तरंग किंवा पदार्थ या दोन्ही अवस्थांमध्ये असतो; आपल्या प्रयोगानुसार आपल्याला काय दिसेल ते ठरतं. तरंगावस्था दिसण्यासाठी अणू/रेणू किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे कण पहावे लागतात. मनुष्याच्या आकाराची वस्तू तरंगरूपात पाहणं सध्यातरी भौतिक-तंत्रज्ञानाला शक्य नाही. जेव्हा अणू-रेणू, अणूपेक्षा छोटे कण पाहणंही शक्य नव्हतं, सिद्धांतापलिकडे याबद्दल काही करणं शक्य नव्हतं तेव्हासुद्धा फारतर शब्दांमध्ये काही बाही विचार मांडले असता त्याला कितपत महत्त्व द्यावं? बुद्धीविलासाशिवाय विज्ञान तोकडंच पडतं.

बुद्धाबद्दल इतर अनेक कारणांमुळे आदर असला तरी भौतिकशास्त्राबद्दल बुद्ध किंवा बुद्धाचे अनुयायी काय म्हणतात यावर विश्वास ठेवू नये. विज्ञान हे विज्ञानाच्या पद्धतीनेच अभ्यासावं आणि त्या शिस्तीनुसार मांडणाऱ्यांची मतं ग्राह्य मानावीत. 'वेदों में विज्ञान' हा जसा चेष्टेचा विषय आहे तसा 'धम्म में विज्ञान' बनायला वेळ लागणार नाही. (पण सद्य "अच्छे दिन" कालात धम्म ही विकाऊ गोष्ट नसून वेद आहे; तेव्हा काय फरक पडतो म्हणा!)

(या प्रतिसादाला विज्ञानातला अंतिम शब्द समजू नये. आकलनाच्या दृष्टीने बरंच सुलभीकरण केलेलं आहे.)

---

बाकी विपश्यनेची व्यक्तिगतरित्या मला काहीही आवश्यकता भासत नाही. श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागले तर झोप लागेल असा, ऋषिकेशसारखाच, स्वतःबद्दल अनुभवसिद्ध दावा आहे. (माझी डुलकी दहा मिनीटांवर होत नाही एवढाच काय तो फरक.) या विषयाबद्दल त्यापुढे मत व्यक्त करण्याइतका माझा अभ्यास नाही. त्यामुळे पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती खुप खुप आभार.

बुद्धाबद्दल इतर अनेक कारणांमुळे आदर असला तरी भौतिकशास्त्राबद्दल बुद्ध किंवा बुद्धाचे अनुयायी काय म्हणतात यावर विश्वास ठेवू नये. विज्ञान हे विज्ञानाच्या पद्धतीनेच अभ्यासावं आणि त्या शिस्तीनुसार मांडणाऱ्यांची मतं ग्राह्य मानावीत.

पुर्णपणे सहमत.

'वेदों में विज्ञान' हा जसा चेष्टेचा विषय आहे तसा 'धम्म में विज्ञान' बनायला वेळ लागणार नाही. (पण सद्य "अच्छे दिन" कालात धम्म ही विकाऊ गोष्ट नसून वेद आहे; तेव्हा काय फरक पडतो म्हणा!)

मि स्वतः अंशतः सहमत. पण तुमचं मत( तुमचा अनुभव या अर्थाने) म्हणुन आदर आहेच म्हणुन त्याच्याशी अर्थातच पुर्णपणे सहमत.

(या प्रतिसादाला विज्ञानातला अंतिम शब्द समजू नये. आकलनाच्या दृष्टीने बरंच सुलभीकरण केलेलं आहे.)
---
बाकी विपश्यनेची व्यक्तिगतरित्या मला काहीही आवश्यकता भासत नाही. श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागले तर झोप लागेल असा, ऋषिकेशसारखाच, स्वतःबद्दल अनुभवसिद्ध दावा आहे. (माझी डुलकी दहा मिनीटांवर होत नाही एवढाच काय तो फरक.) या विषयाबद्दल त्यापुढे मत व्यक्त करण्याइतका माझा अभ्यास नाही. त्यामुळे पास.

हाहाहा असं होतं. अगदी विपश्यना करताना सुरवातीच्या काळात बर्याचदा झोप लागते. कारण अभ्यास नसताना १०-११ तास बसुन ध्यान करताना बरीचशी माणसे डूलक्या काढतात खास करुन जेवणानंतर जे सेशन असते त्यात.

बाकी विपश्यनेची व्यक्तिगतरित्या मला काहीही आवश्यकता भासत नाही

वादासाठी नाही पण हे फार धाडशी वाक्य आहे असे माझे मत.

पुन्हा एकदा माझ्या विनंतीला प्रतीसाद दिल्याबद्द्ल आभार.

कोणताही भौतीक पदार्थ केवळ तरंग आहे फक्त या विषयावर प्रकाश पाडावा. मी त्याचा माझ्या लेखाला कुठल्याही प्रकारे समर्थन म्हणुन समजणार नाही. मलाही विज्ञान या विषयावर काय म्हणतेय ते कळेल.

माझ्या या प्रतिसादातील कुठल्याही शब्दाने/ वाक्याने जर माझे समर्थन व्यक्त असेल तर हा प्रतीसाद उडवावा. कींवा मला सांगा मी तो डीलीट करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विपश्यनेची व्यक्तिगतरित्या मला काहीही आवश्यकता भासत नाही, असे माझेही मत आहे. तुम्हाला ते धाडसी विधान का वाटते, ते सांगू शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विपश्यनेची व्यक्तिगतरित्या मला काहीही आवश्यकता भासत नाही, असे माझेही मत आहे. तुम्हाला ते धाडसी विधान का वाटते, ते सांगू शकाल का?

माझा स्वतःचा अनुभव. मलाही अगोदर असेच वाटायचे. अध्यात्मीक अनेक पुस्तके मी खुप वाचलीत आजही वाचतोय. पन कोणत्याही देवळात देवाच्या साक्षीने चाल्लेली लुटमार. अनेक गुरु/बाबांचे उघड झालेले फालतु प्रकार. त्यांनी अध्यात्माच्या नावाखाली जमवलेली कोट्यावधीची माया. विश्वास ठेवा, प्रश्न विचारु नका, विचारलेचं तर तुमची श्रद्धाच नाही किंवा तत्सम कारण सांगुन केलेली बोळ्वण. माझ्या घरात कुठलाही देव नव्ह्ता. मी कधीही देवाला काहीही मागीतले नव्हते. मी कधिही पुजापाठ केलेला नाही कुठल्याच प्रकारे. पण आज माझ्या घरात विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचे फोटो आहेत. ते मी विपश्यना केल्यावर आणलेत. मी विवेकानंदाची अनेक पुस्तके वाचली होती बुद्धीला पटतही होती. पण तरीही त्यांनाही माझ्या घरात प्रवेश नव्ह्ता. कारण ते जे काही अध्यात्मावर बोलायचे हे मला कितीही आकर्षक वाटले ,कोणत्याही कारणाने तरी माझ्या अनुभवावर उतरत नव्ह्ते. मला वाटायचे की मी ईतकं समजावुन घेउन चिंतन करतोय तरी माझ्या अनुभवाशी त्याची सांगड बसत नव्हती. खरतर त्यांना मी घरात आनले मला त्यांच्याकडे पाहुन सतत ध्यानाची आठवण जागवण्यासाठी. तो फायदा तर झालाच. पण एक तोटाही झालाय माझा भाउ जो माझ्याबरोबर रहातो त्याला ध्यानात तर गती नाही पण त्याने साग्रसंगीत पुजापाठ सुरु केलाय.जो मी कधीही केला नाही , करायची गरजही नाही. त्याने आधी कधी कोणता फोटो/मुर्ती आणला नव्हता.
माझा विरोधही नव्ह्ता, पण मी आणले कशासाठी आनी हा करतोय काय? माझ्या घरात साग्रसंगीत बहारदार पुजा चालते आज.चालु द्या. माझ्याकडे दोनच पर्याय आहेत एक ज्यांना मी घरात आनले त्यांना घराबाहेर काढायचे , माझी त्याला काय हरकत नाही .
दुसरा जे चालेय ते तटस्थपणे पहायचे जे मी करतोय. माझं श्र्द्धेला कदीच विरोध नाही/नव्ह्ता. श्रद्धेबरोबर विवेक हवा. असो.

मग जेंव्हा विपश्यनेचा पर्याय समोर आला तेंव्हा मी वेबसाईटवर फीज आकारली जात नाही असा स्प्ष्ट उल्लेख असताना मी जवळच्या केंद्रावर गेलो. त्यांना अनेक प्रश्न विचारले.त्यांनी सर्व उत्तरे दिली. काही पटली काही अजिबात नाही पटली. पण त्यांनी कूठेही हे विचारु नका ते विचारु नका. किंवा तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा असे सांगीतले नाही. मला हे नवीन होते. मग मी माझा मास्टर प्रश्न केला. मी खरोखरच कुठल्याही कारणाने , कशाच्याही नावाने १ रुपयाही देणार नाही. ते म्हनाले ठीक आहे. तसेही ईथे आम्ही कधीही मागत नाही.मग मी म्हनालो करुन पहायला काय हरकत नाही. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहित्तर मोडुन खाल्ली.आनी मी जेंव्हा गेलो तेंव्हा फक्त २०० रुपये जवळ ठेवले. मागीतलेच तरी देता येउ नये म्हणुन. पुन्हा एकदा फीचे बोलुन घेतले मगच आत गेलो.आनी तिथलाच होउन राहीलो. जे मला विवेकानंदाच्या, ओशोंच्या, जे. कृष्णमुर्तींच्या, तुकाराम महाराजांच्या , अनेक संताच्या ध्यानाविषयी आकर्षीत करत होते वाचुन, ते माझ्या प्रत्यक्ष अनुभवार उतरले. एकच गोष्ट समोर आली ती ही की मी जे काहीतरी शोधायचा वाचुन प्रयत्न केला होता ती वस्तु हीच.ती माझ्या अनुभवावर उतरली. म्हणुन कोणी हे मानावेच असे नाही, तर कोणीही अनुभव घ्यावा. तरीही नसेल पटत तर सोडून द्यावे. कुठलाही आग्रह्/दुराग्रह नाही. असण्याचे कुठलेच कारण नाही. पूढचे सर्व मी लिहीलेच आहे लेखात. हा माणुस काय टीवटीव करतोय .याचं थोबाड एकदाचे बंद करारे कोणीतरी. एवढे अनाठायी प्रश्न विचारुनही हा शांततेने कसे काय उत्तर देतोय. मग याला नक्कीच फायदा होत असेल. नाहीतर मग हा माणुसच निर्ल्लज्ज असेल. असे विचार येउ शकतात्/येतात याची मला जाण आहे. मी काय आभाळातुन पडलो काय? अरे एखाद्या गोष्टीत निर्भेळ आनंद मीळतो/मीळु शकतो हे आपण का विसरतो? तुम्हाला या ध्यानाच्या गोष्टीत निर्भेळ आनंद नसेल मीळत पण दुसर्या कोणत्याही गोष्टीत मीळालाच नाही का कधी? तो तुमचा अनुभव नाही काय? कोणी तुम्हाला झालेल्या निर्भेळ आनंदाचा पुरावा मागीतल्यास तुम्ही काय कराल? कमीतकमी मला अनुभव नाही पण तुम्ही एवढं म्हणताय तर असेल बुवा कदाचीत असा आपण विचार सुद्धा करु शकत नाही का? असा विचार करुन तुमचे समर्थन आहे असे थोडेच होते? आपला अनुभव माणसाने मांडुच नये काय?

या सर्व गोष्टी पहाता पहील्यांदाच आलेल्या लोकांशी मी शेवटच्या दिवशी बोललोय त्यांचा अनुभव. त्यातील अनेक लोक म्हनतात इथे यायच्या अगोदर आम्हालाही असेच वाटायचे पण अमक्या तमक्या मित्राने/नातेवाइकाने/ किंवा इतर कोणीही सुचवले म्हनुन आलो. तर बरे झाले आलो नाहीतर मला काही हे पटत नव्ह्ते. चला विलासराव खोटारडा. तुम्च्या जवळच्या केंद्रावर शेवटच्या जाउन ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना प्रत्यक्ष विचारा, नुसते त्यांच्या चेहर्यावरील भाव पहा विचारयची गरजही पडणार नाही.
पण आम्ही नाय जा!!! आम्ही इथेच बसुन पुरावे मागणार. अरे बाबा हे मनावर करावे लागनारे प्रयोग आहेत, मन प्रयोग शाळेत नाही आनता येत अजुन. बरं तुला पुरावेच पाहीजे तर तु मला घेउन प्रयोगशाळेत प्रयोग कर मला खरच असा अनुभव आला की नाही. नसेल तर तु असे उपकरण शोधुन काढ गरज वाटत असेल तर. न्युट्नने सफरचंद पडताना पाहीले ते पहिल्यांदाच पाहीले होते काय? त्याअगोदर ते वर जात होते काय? मग तो एवढा हुशार होता तर आधी का नाही सुचले? बर सुचले तर काय फरक पडला त्या सफरचंदाला? त्या लॉ ऑफ ग्रॅव्हीटीला? त्याच्याआधी ती कार्यरत नव्हती का?
बर मग काय फरक पडला त्याने जे होते ते सांगीतल्याने. फरक हाच पडला की त्या नियमाच्या आधारे अनेक आधी अज्ञात असलेल्या गोष्टींची कारन मिमांसा समजली. त्यातला कार्यकारणभाव समजला. त्याआधारे आपन अनेक सुवीधाजनक उपकरणे बनवली. त्यांचा लाभ आपण घेतोय. आता हे सर्व कशासाठी तर मानवी मनाला असलेलं कुतुहल शमवण्यासाठी. सुवीधा कशासाठी तर मनुष्य्मात्राला/ प्राणिमात्राला सुखशांती मिळावी म्हणुन. हरकत नाही. मग किती प्रजा आज खरोखर सुखशांतीचा अनुभव घेतेय. खुप संपत्ती असलेले लोक सुखशांती अनुभवतात काय? तुम्हाला जरा आनंद झालातर तुम्ही पेढे घेउन मनापासुन वाटत नाही काय? खरोखर आनंद झालाय हे कोणत्या विज्ञानाच्या कसोटीवर पाहुन ठरवता? नाहीतर आनंद झालाच नसेल तर पेढ्याचे पैसे वाया जातील. मग या संपत्तीधारकांना का असा आनंद होत नाही? होत असेल तर ते का संपत्तीचा हव्यास सोदत नाहीत लोककल्यानासाठी? सोदत असतील तर तो पैसा खरच प्रामाणिकप्णे कमावलेला आहे काय? दान म्हनजे काय लोकांच्या खिशातील पैसे अनंत मार्गांनी लुबाडुन त्यातील १०० कोटी वाटुन पेपर्/मिडीयामधे जाहिरात करणे आहे काय?

असो. आता पहा लोक कसे तुटून पडतील? भरपुर राळ उडवायला जागा आहे या प्रतिसादात. सारासार विवेक आम्ही केंव्हा वापरनार? असो.

तुमच्या किंवा आदितीवर नाही हा प्रतिसाद. ईन जनरल आहे. माझा अनुभव आहे. त्यावर मला जे मनात आले ते आनी तसे लिहीन्याचा मि प्रयत्न केलाय. पहा पटतय का? मला इथे कोणतेही नाव नाही कमवायचे. कोनाला मिळो न मीळो मला त्यात आनंद मीळतो. अर्थातच कोणाच्याही भावना न दुखावता. पण आजकाल भावना दुखावण्याला काही तारतम्यच नाही राहीले. त्याचा विचाअर केला तर थोबाड बंदच ठेवावे लागेल. बरेच लोक कुठल्याही कारनाने का होईना बंद ठेवतात. मला त्याची गरज नाही.
या प्रतिसादावरील जर कोणता उपप्रतिसाद विपश्यनेसंबंधी आलाच तरच मी उत्तर देईल.णिदान प्रश्न तुम्ही केलाय तर या उत्त्रावर तुमचा प्रतिसाद मला अपेक्षीत आहे. अर्थातच दिलाच पाहीजे असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला प्रतिसाद अपेक्षित आहे म्हणून देतो. तुमचे उत्तर अगदी लक्ष देऊन वाचले, पण विपश्यनेची मला माझ्या आयुष्यात गरज का पडू शकेल याचे उत्तर काही मिळाले नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या घरातही कुठलाही देव नाही, मी आयुष्यात कधी अध्यात्माची धार्मिक पुस्तके वाचली नाहीत कारण मला माझ्या आयुष्यात याची कधी गरज पडली नाही किंवा उणीवही भासली नाही. माझ्या दृष्टीने विपश्यनेबद्दल पण मला तसेच वाटते.

तुम्ही म्हणालात की त्यांनी कूठेही हे विचारु नका ते विचारु नका किंवा तुम्ही विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा असे सांगीतले नाही. माझ्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. त्यातून किमान त्यांचा प्रामाणिकपणा तरी दिसतो. मान्य आहे, पण तुम्ही म्हणताय की एकदा अनुभव घेऊन बघा. हे म्हणणे म्हणजे एकदा अ‍ॅमवेच्या मिटींगला येऊन बघा, असेच मला वाटतेय. अ‍ॅमवेचे लोक किमान सांगतात तरी की तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का? पण माझ्या आयुष्यात अशी काय कमतरता आहे की ज्याच्यामुळे मला विपश्यना करावीशी वाटेल (किमान १ अनुभव म्हणूनतरी) ते मला अजून कळले नाही.

विपश्यनेसाठी फी आकारली जात नाही, हे म्हणणे म्हणजे माझ्या दृष्टीने ते १ फीचर (feature, मराठी?) आहे. म्हणजे मी १ रेस्ट्राँ सुरू करून मेनूकार्डावर छापणार की तुम्हाला आवडेल तितके पैसे द्या, दिले नाहीत तरी चालेल. अर्थातच जर लोकांनी पुरेसे पैसे मला दिले आणि माझी जाहिरात झाली तर तोच मग माझा USP (Unique Selling Proposition) होतो. हा प्रकार पण मला थोडाफार असाच वाटला.

तुम्ही म्हणताय की विपश्यना म्हणजे स्वतःच्या मनाचे तटस्थपणे ( कुठलीही प्रतिक्रिया न देता केलेले) निरीक्षण, मनाला समजून घेणे, दहा दिवस मौन करणे. इतपत मला समजले. मौनामुळे अंतर्मुख व्हायला मदत होते याच्याशी सहमत आहे. त्यासाठी सतत १० दिवस मौन का करावे लागते, ते मला कळले नाही. मीसुद्धा रोज थोडावेळ स्वतःशी बोलायला/विचार करायला वापरतो; जसे आंघोळ करताना, चालायला जाताना, झोपताना वगैरे. पण सतत १० दिवस मौन का करावे लागते, ते मला कळले नाही. म्हणजे मी रोज २ वेळा गार पाण्याने आंघोळ करतो आणि त्याने मला बरे वाटते, पण म्हणून सतत १० दिवस मी स्विमिंग पुलामध्ये राहीन का आणि का राहावे?

एखाद्याला विपश्यना करून आनंद मिळत असेल तर त्याने ती जरूर करावी. कोणी विपश्यना करावी की करू नये, अध्यात्मिक ग्रंथ वाचावेत की नाही, हा पूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न आहे. पण माझ्या आयुष्यात माझ्याकडे लिमिटेड वेळ आहे, याची मला जाणीव आहे, त्यामुळे तो वेळ मी मला ज्यात आनंद मिळेल त्यात घालवतो. विपश्यना करायची झाली तर मला माझ्या आवडीच्या गोष्टीसाठी कमी वेळ द्यावा लागेल, त्यामुळे जर मला कोणी सांगितले तर मी "का" हा प्रश्न विचारणारच. पण व्यक्तिशः मी विपश्यना का करावी याचे उत्तर मला कळले नाही. जर मी विपश्यना केली नाही तर मला काय फरक पडतो? समजा मी माझा बहुमूल्य वेळ घालवून विपश्यना केली, तर माझ्या आयुष्यात काय फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर माझ्या घालवलेल्या वेळेपेक्षा/कष्टापेक्षा अधिक फायद्याचा आहे का? हा माझ्यासाठी तरी खरा कळीचा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुप्परसहमत...

अत्यंत मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी विपश्यना का करावी याचे उत्तर मला कळले नाही.

तुम्ही प्रतिसाद दिलाय त्याबद्द्ल धन्यवाद. त्यात एकही दोष मला तरी दिसत नाही त्यात. प्रत्येक मताशी सहमत.अभ्यास करुन दिलाय यात वाद नाही.

खरच मी माझा प्रतिसाद पुन्हा वाचला.माझा आनी अने़कांचा अनुभव आहे असाच त्यातुन अर्थ निघतो आहे. हा माझा दोष.

माझा आनी अने़कांचा (पुर्ण जगाचा का असेना) अनुभव आहे म्हनुन कोनीही (एकाही मनुष्याने) विपश्यना का करावी हा अगदी रास्त प्रश्न आहे.

मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना.
हे सर्व कसे होते याचा कार्यकारणभाव जानुन घेउन त्यापासुन आपल्याला होणार्या त्रासापासुन(दु:ख्खापासुन) सुटका करुन घेणे यासाठी विपश्यना विद्या शिकावी लागते.

हे विपश्यना का करावी याचे उत्तर आहे.
मी विपश्यना का करावी याचेही हेच उत्तर आहे पण ते त्या व्यक्तीला पटल्यास.

जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही.

मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे ज्याचे त्याने ठरवावे लागते. हेच नेमके काचे (कुणाच्याही) उत्तर आहे.

त्रासात पडल्याने जो(महत्वाचा असा काळ्/वेळ) वेळ वाया जातो त्यामुळे.
त्यासंदर्भातील हे तुमचे वाक्यः
आयुष्यात काय फायदा होईल आणि जर फायदा होत असेल तर माझ्या घालवलेल्या वेळेपेक्षा/कष्टापेक्षा अधिक फायद्याचा आहे का? हा माझ्यासाठी तरी खरा कळीचा मुद्दा आहे.

हे एक महत्वाचे कारण झाले. जीवन कसे जगावे हे ही त्यामुळे आपल्याला कळते. घाईने मत बनवु नका की जीवन कसे जगावे दुसर्याकडुन शिकण्याची काय गरज?
मी लिहीतोय त्यावर. लवकरच टाकतो मुळ लेखात तेही साधनेचे प्रमुख अंग आहे.
त्याशिवाय विपश्यना करुच शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनुष्यप्राण्यात राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु)असतात. ते कसे उत्पन्न होतात, मनुष्यप्राण्याला प्रभावीत करतात आनी त्याचा त्याला त्रास होतो रोजचे जीवन जगताना. हे ज्याचे त्याने ठरवावे लागते. हेच नेमके काचे (कुणाच्याही) उत्तर आहे.

उदयराव षडरिपूंच्या पल्याड गेलेला मानूस दिस्तो. का दुसरा अर्थ खरा म्हनायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जो कोणी राग,लोभ,काम, क्रोध. मद,मत्सर्,मोह, माया (षढरिपु) यांनी प्रभावीत होउन त्रासात (दु:खात) पडत नाही त्यांच्यासाठी विपश्यनेची गरजच नाही. साध्य साध्य झालेल्या व्यक्तिसाठी साधनेची गरज(प्रयोजनच) नाही.

आभार्!
एकूण चर्चा रोचक आहे.
मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे. त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला?

असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आभार्!
एकूण चर्चा रोचक आहे.
मुळात मला या षड्रीपुंचा त्याग करायचाच नाहिये, कारण या गोष्टींचा जो काही कमी-अधिक प्रमाणातील मिलाफ आहे तो मी आहे. याच्या पल्याड गेलो तर मी मीच उरणार नाही. सध्याचा मी जसा आहे तसा मला प्यारा आहे.

हेच अध्यात्माचं सार आहे. हीच ती मुक्ती मी पासुन.अर्थातच निर्णय ज्याचा त्याने घ्ययचाय. हे वरती नमुद केलेलच आहे.

त्यामुळे जे काही सुख-दु:ख वाट्याला येते तो ही आयुष्याचा भागच आहे. ते टाळायचे कशाला?
असो. जर हे विपश्यना करायचे कारण असेल तर मलाही विपश्यनेची गरज नाही असे सहज म्हणता यावे.

तुमचा निर्णय योग्यच आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(पण सद्य "अच्छे दिन" कालात धम्म ही विकाऊ गोष्ट नसून वेद आहे; तेव्हा काय फरक पडतो म्हणा!)

उठायचं नि कोणत्याही गोष्टीचं खापर भाजप या राजकीय पक्षावर फोडायचं ही प्रवृत्ती कधी जाईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

श्वासावर लक्ष केंद्रित करायला लागले तर झोप लागेल असा, ऋषिकेशसारखाच, स्वतःबद्दल अनुभवसिद्ध दावा आहे.

कोइंसिडेंटली हा दावा नॉन्मॉडर्न मेडिकलच्या दाव्याशी मेळ खाणारा आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणजी धाग्याच्या संबंधात यातुन काहीच प्रबोधन होत नाही. किंवा होत असेल तर मला आकलन होत नाही. आदीतीने माझ्या विनंतीवरुन प्रतिसाद दिलाय. त्यांनी स्वतः या धाग्यावर आजपर्यंत हजेरी लावलेली नव्हती आणी अर्थातच तो त्यांचा अधिकार आहे.तेंव्हा जरा थांबाव ही विनंती.

तिथे आपण जे शिकतो ते आपल्या रोजच्या व्यवहारात कामाला येत नसेल तर काय करायचे आहे ते ध्यान. लोणचे घालायचे काय ध्यानाचे? विपश्यना नेमकी या रोजच्या व्यवहारात काय काम करते हे मी सवीस्तर लिहीतो . ईथेच त्यासाठी मला वेळ द्यावा ही विनंती.

खुपच नाजुक विषय आहे म्हणुन थोडासा वेळ लागतोय.पण एक दोन दिवसात मूळ ले़खातच उत्तर देतो.

ते एकदा आले की माझं काम संपलं. मग जे लोक या धाग्यावर कुठल्याही कारणाने आले नाही. पण त्यांच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया तर उमटली असणारच. चांगली की वाईट हा प्रश्न नाही. त्यांनी जसंच्या तसं मत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. म्हणजे हा विलासराव काय मुर्ख्/नालायक/अक्कलशुन्य / अवैज्ञानीक कींवा अक्षरश जे मनात उमटले ते जसेच्या तसे प्रामाणीकपणे लिहावे ही विनंती. आनी त्यांची कोणीही टर उडवु नये.वाचक सुजाण असतो आनी ज्याला जेजे पाहीजे तोतो ते घेईल.

माझी किंवा माझ्या लेखाची/लेखातील माझ्या विचाराची जी काही टर उडवायची ती उडवा. माझ्या बाजुने अगदी मला शिव्या घातल्या तरी हरकत नाही. नवी बाजु ऐकताय ना? तो हो जाव शुरु. पण ऐसी अक्षरेचे जे काही नियम असतील ते पाळुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेंव्हा जरा थांबाव ही विनंती

डन, बॉस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आदीतीने माझ्या विनंतीवरुन प्रतिसाद दिलाय.
का? असं का केलत ?
म्हणजे फक्त अदितीलाच खास विनंती का म्हणून ?
आम्हाला का नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तरीही मला वाटते की ईथे अनेक विज्ञानातील जाणकार आहेत त्यांनी लेखावर मत नसेल द्यायचे तर देउ नये. पण फक्त कोणताही भौतीक पदार्थ केवळ तरंग आहे फक्त या विषयावर प्रकाश पाडावा. मी त्याचा माझ्या लेखाला कुठल्याही प्रकारे समर्थन म्हणुन समजणार नाही. मलाही विज्ञान या विषयावर काय म्हणतेय ते कळेल.

आदितीला विज्ञानाची माहीती( अर्थातच सार्वभौम अस नाही) आहे हे त्यांच्या एका धाग्यावरुन मला वाटले. सर्व लोक मला माहीत नसल्याने ईथे अनेक विज्ञानातील जाणकार आहेत असं ही म्हटलय. यात तुम्हीही आलात. सांगा तर मग?
बरं यात नसाल तर मग जे लोक या धाग्यावर कुठल्याही कारणाने आले नाही. पण त्यांच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया तर उमटली असणारच. चांगली की वाईट हा प्रश्न नाही. त्यांनी जसंच्या तसं मत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. म्हणजे हा विलासराव काय मुर्ख्/नालायक/अक्कलशुन्य / अवैज्ञानीक कींवा अक्षरश जे मनात उमटले ते जसेच्या तसे प्रामाणीकपणे लिहावे ही विनंती. असं म्हणलय.

आनी याही पुढे जाउन माझी किंवा माझ्या लेखाची/लेखातील माझ्या विचाराची जी काही टर उडवायची ती उडवा. माझ्या बाजुने अगदी मला शिव्या घातल्या तरी हरकत नाही. नवी बाजु ऐकताय ना? तो हो जाव शुरु. पण ऐसी अक्षरेचे जे काही नियम असतील ते पाळुन.

मग. मनराव लोभ असावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदितीला विज्ञानाची माहीती( अर्थातच सार्वभौम अस नाही) आहे हे त्यांच्या एका धाग्यावरुन मला वाटले.

Left-handed compliment? (की तारीफ + टोमणा?)

-----------------------------------------------------------------------------------------------------

Gauche१अ की sinister१ब?

१अ उगम.

१ब उगम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगा तर मग.
नको. मी अल्पमती ह्या घडिस जालीय मौन पाळू इच्छितो.
तुम्ही विचारलत, म्हणून "मी मौन पाळणार आहे" हे सांगण्यापुरता अवतरलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नवी बाजु ऐकताय ना? तो हो जाव शुरु. पण ऐसी अक्षरेचे जे काही नियम असतील ते पाळुन.

१. म्हणजे? मी बंद नेमका कधी पडलो होतो?

२. मी जे काही लिहितो, ते 'ऐसी'च्या नियमांत बसते की नाही, ते ठरवायला (आणि, नसल्यास, त्याबद्दल उचित वाटेल ती कृती करायला), मला वाटते, 'ऐसी'चे प्रशासन सक्षम आहे.

तर मग, आपला लोकस स्टॅण्डाय नेमका काय आहे म्हणालात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बूच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१. म्हणजे? मी बंद नेमका कधी पडलो होतो?

असं नव्हतं म्हणायचं मला.

२. मी जे काही लिहितो, ते 'ऐसी'च्या नियमांत बसते की नाही, ते ठरवायला (आणि, नसल्यास, त्याबद्दल उचित वाटेल ती कृती करायला), मला वाटते, 'ऐसी'चे प्रशासन सक्षम आहे.

माझी किंवा माझ्या लेखाची/लेखातील माझ्या विचाराची जी काही टर उडवायची ती उडवा. माझ्या बाजुने अगदी मला शिव्या घातल्या तरी हरकत नाही. पण ऐसी अक्षरेचे जे काही नियम असतील ते पाळुन.नवी बाजु ऐकताय ना? तो हो जाव शुरु.

आता बरोबर आहे काय? मी आवाहन केलं म्हणुन आम्ही लिहीलं असं व्हायला नको म्हणुन. मी प्रथमच ईकडे लिहीलय म्हणुन. माझी कातडी वाचवायला. बाकी काही नाही. आणी तिऱकस पण मार्मीक लिहायला पण हुषारी लागते याची जाण आहे म्हणुन. आता तुम्हालाच का म्हनालो तर माझी खरडवही पहा, मी सवीताताईंना गैरसमजाने उत्तर दिले होते. म्हणुन माफी मागीतली. त्यावर त्यांंचे आलेले उत्तर

अहो मनाला लाऊन नका घेऊ, मला कळले की तुमचा गैरसमज झाला त्यामुळे माफी मागण्याची आवश्यकता नाही.
उलट तुम्ही जेन्युइनली लेख लिहिलाय आणि सगळ्यांच्या शंकांना अतिशय मनापासून उत्तरे देत आहात हे पाहिले म्हणूनच मी न'वी बाजूंचे विनाकरण ट्रोलिंग थांबवायचा प्रयत्न केला कारण पहिल्याच लेखाला असे तिरकस प्रतिसाद जास्त आले तर नवीन लेखकाचा हिरमोड होण्याची शक्यता जास्त असते.
असो, पुढील लिखाणाला शुभेच्छा, लिहित राहा.
न'वी बाजू इथले फ्रेंडली नेबरहूड ट्रोल आहेत, फार नका मनाला लावून घेऊ त्यांचे प्रतिसाद!

म्हणुन खोडसाळपणे नाही तर सहजच म्हणालो.

तर मग, आपला लोकस स्टॅण्डाय नेमका काय आहे म्हणालात?

मग जे लोक या धाग्यावर कुठल्याही कारणाने आले नाही. पण त्यांच्या मनात काहीतरी प्रतिक्रिया तर उमटली असणारच. चांगली की वाईट हा प्रश्न नाही. त्यांनी जसंच्या तसं मत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. म्हणजे हा विलासराव काय मुर्ख्/नालायक/अक्कलशुन्य / अवैज्ञानीक कींवा अक्षरश जे मनात उमटले ते जसेच्या तसे प्रामाणीकपणे लिहावे ही विनंती. आनी त्यांची कोणीही टर उडवु नये.वाचक सुजाण असतो आनी ज्याला जेजे पाहीजे तोतो ते घेईल.

प्रस्तुत प्रतिसाद वाचून आपणांस पुरेसे बोर झाले का? आपल्या सेवेसि आम्ही सदैव तत्पर आहोत.

अजीबात नाही. प्रत्येकाने मनातील प्रतिक्रिया लिहाव्यात आनी त्यांनीही सहभाग नोंदवावा असं वाटलं म्हणुन.
कशीही प्रतिक्रिया असेना का ,ती देणाराच आदरच आहे, कारण ती त्यांची स्वाभावीक प्रतीक्रिया असेल. माझा असा अनुभव आहे की कीतीही साधारण/ जहाल प्रतिक्रिया असेना बर्याचदा आपण कोण काय म्हणेल असा विचार करुन लिहीत नाही. किंवा स्वतःची जालीय प्रतिमेला धक्का लागेल म्हणुन आपण लिहीत नाही.त्यात मीही आलोच. पण ती जशीच्या तशी आपण लिहील्यास आपल्याला बरे वाटते असा माझा अनुभव आहे. तर त्यांनी ती लिहावी आनी असं काही वाटल्यास तेही लिहावं असा उद्देश.

शिवाय लेखाचा विषय सर्वसाधारणपणे माझ्या आकलानाप्रमाणे बराचसा रुक्ष आहे. त्यामुळे मार्मीक आणी खुमासदार प्रतीक्रीयांमुळे जर कोणाच्या चेहर्यावर हास्याची लकेर उमटली तर मला आनंदच आहे. मलाही काही विनोदाचं वावडं नाही. एवढ्यानही समाधान नाही झालं तर नया हु मय असं समजुन सोडुन द्यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊ द्या हो विलासराव. तुम्हाला काय म्हणायचं ते मला समजलं, मला काय म्हणायचंय ते तुम्हाला समजलं. पटलं/न पटलं तरी तुम्हाला फरक पडत नाही, मला फरक पडत नाही. बाकीचं इकडून तिकडून बरंच वारं गेलं तर आपली करमणूक होत्ये असं समजायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विपश्यनेबद्दल फार उत्सुकता आहे. बाकी काही असो नसो, दहा दिवस कोणाशीही काहीही न बोलता आपण आणि आपले विचार ही कल्पना आकर्षक वाटते. कोणाशीतरी बोलावसं वाटावं इतकं शांत राहायची वेळ आयुष्यात कधीच आलेली नाही किंवा येऊ दिलेली नाही आणि डोक्यात त्यामुळे पूर्ण करायला वेळ न मिळालेल्या अर्धवट विचारांची गर्दी झालीये असं वाटत असतं सारखं.
भीती फक्त एकच आहे, दहा दिवस शांत बसल्यावर स्वतःची खरी ओळख पटली आणि मूळ डिफॉल्ट आयुष्यात परत यावसं वाटलं नाही तर काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भीती फक्त एकच आहे, दहा दिवस शांत बसल्यावर स्वतःची खरी ओळख पटली आणि मूळ डिफॉल्ट आयुष्यात परत यावसं वाटलं नाही तर काय?

यासाठीच तर आहे अट्टाहास सगळा.तेच अंतीम लक्ष आहे.
पण ननी ते एवढं सोप्प नाही. कठीणात कठीण आहे.
म्हणुन तर साधनामार्गावर चालणे हा सर्वात मोठा पुरुषार्थ मानला गेला.
ज्याने अथक प्रयत्नाने मुक्ती साधली तो वीर. आनी अने़॑कांना मार्ग दाखवुन सहाय्य केले ते महावीर.
तुम्ही प्रत्यक्ष साधना जेंव्हा केंव्हा कराल तेंव्हा याची प्रचीती येइल.
वाणीचे मौन फार वरवरची गोष्ट आहे साधनामार्गात. पण नवीन साधकासाठी तिही कठीणच आहे .
हा इतका शुद्ध मार्ग आहे की या मार्गावर थोडे जरी चालाल तर लगेच मनःशांतीचा प्रत्यय येईल.

जे अगदीच १० दिवस काढू शकत नाहीत आत्त तरी.
कुठल्याही जवळच्या केंद्राशी संपर्क साधा.
१ तासाचा आनापान सतीचा अभ्यास शिका आनी रोज घरी १०-१० मि. सकाळ संध्याकाळ अभ्यास करा घरच्या घरी. एखाद्या महीन्यात काय वाटतय पहा. नंतर वेळ मिळेल तेंव्हा जा .कुणीही हे करुन पहा. तुम्हालाच कळेल या साधना कीती बलवान आहे. विपश्यनेची ही फक्त पहीली पायरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे अगदीच १० दिवस काढू शकत नाहीत आत्त तरी.
कुठल्याही जवळच्या केंद्राशी संपर्क साधा.
१ तासाचा आनापान सतीचा अभ्यास शिका आनी रोज घरी १०-१० मि. सकाळ संध्याकाळ अभ्यास करा घरच्या घरी. एखाद्या महीन्यात काय वाटतय पहा. नंतर वेळ मिळेल तेंव्हा जा .कुणीही हे करुन पहा. तुम्हालाच कळेल या साधना कीती बलवान आहे. विपश्यनेची ही फक्त पहीली पायरी.

धन्यवाद. खरचं दहा दिवस मौन. कल्पनाच करवत नाही. पण सुरवातीला १ तासाचा हा अभ्यास शिकायला नक्की आवडेल. जवळच्या केंद्रावर जाऊन चौकशी करते. पुन्हा एकदा धन्यावद.

सीमा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@मौन व्रत -> passive मौन पाळलं आहे. म्हणजे कोणाशी न बोलता किंवा कुणाचाही शब्द कानी न पडता १-२ दिवस काढले आहेत. "आवाज" ह्या स्वरूपात होणारा मानवी संबंध टाळणं फारसं अवघड नाही, असं अनुभवांती मत आहे.

पण active मौन (म्हणजे वर्तमानपत्रे, इंटरनेट, फोन, पुस्तकं इ.इ.) कुठलीही संपर्कसाधनं न बाळगता किती वेळ काढता येईल ह्याची शंका वाटते. जंगलात वगैरे क्यांपिंग केल्यामुळे १-२ दिवस नक्कीच आनंदात जातील ह्याची खात्री असली तरी १० दिवस हा थोडा कठीण भाग वाटतो.
एक खूपच ईंट्रेस्टिंग प्रयोग म्हणून नक्कीच करून बघण्यासारखा आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त मौन रहाने या एकाच कारणासाठी विपश्यनेला न येणारांचा आकडा प्रचंड मोठा आहे.
ही फक्त एक गोष्ट आहे.
मौन बोले तो आर्यमौन. बोलना नही, लिखना नही, पढणा नही, किसीकी तरफ जानबुझके देखना नहि, यहातक की इशारोंसे भी बात नही करनी है. हे फक्त शरिर आनी वाणीने साध्य करायचा प्रयत्न करायचा आहे. हे काही खरे मौन नाही. हे सगळे १००% पाळले तरी मन स्वतःशी बडबड करत रहाते.ते जेंव्हा गप्प होईल तेंव्हा जे मौन अवतरते ती फार वेगळी अनुभुती असते. सहजसाध्य नाही. म्हणुनच साधना. साधनेत जेंव्हा प्रगती होते दुसरे ध्यान पुर्ण साधते तेंव्हा ही गोष्ट साधते. त्यानंतर्ही पुढे खुप लांबचा प्रवास आहे मुक्तीचा. असो.

असेच पंचशील पालनही कारवे लागते. हे वाचुन पहा.
http://www.vridhamma.org/uploadedfiles/hcod.pdf


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचानक ऐसी अक्षरे संस्थळावर येने झाले व हा लेख वाचन्यात आला.खुप छान लिह्ले आहे प्रतिक्रिया देन्यासाठी member झाले.

विपश्यने मुळे मला नविन जल्म मिळाला. आजुबाजुला जेव्हा दु:खि, निराश लोक पाहतो तेव्हा त्याना विपश्यने विशयि सागावेसे वाटते.

ज्या लोकाविशयि आपल्यालाला प्रेम्,आपुलकि आहे.त्यानितरि जरुर करावे असे वाटते.मला लिहन्याचि सवय नसल्याने ज्यास्त लिहित नाहि.
तुम्हि असेच लिहित रहा माझ्या मनापासून शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लिहन्याचि सवय नसल्याने ज्यास्त लिहित नाहि
ऐसीवर स्वागत.
लिहित रहावत असं सुचवतो.
सवयीनं जमेल हळूहळू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars


लिहित रहावत असं सुचवतो.

लिहीत रहावंत असं सुचवतो. जमेलच हळूहळू. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐसीवर स्वागत! मनोबाशी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ण लिहिण्यासाठी shift + n वापरावा. (n = न, N = ण)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अचानक ऐसी अक्षरे संस्थळावर येने झाले व हा लेख वाचन्यात आला.खुप छान लिह्ले आहे प्रतिक्रिया देन्यासाठी member झाले.

अनेक धन्यवाद.

विपश्यने मुळे मला नविन जल्म मिळाला. आजुबाजुला जेव्हा दु:खि, निराश लोक पाहतो तेव्हा त्याना विपश्यने विशयि सागावेसे वाटते.
ज्या लोकाविशयि आपल्यालाला प्रेम्,आपुलकि आहे.त्यानितरि जरुर करावे असे वाटते.मला लिहन्याचि सवय नसल्याने ज्यास्त लिहित नाहि.

असाच माझाही अनुभव आहे. त्यामुळे जमेल तसे लिहीत/सांगत असतो. अर्थातच आग्रह नसतोच. ज्यानेत्याने निर्णय घ्यावा.

तुम्हि असेच लिहित रहा माझ्या मनापासून शुभेच्छा!

परत एकदा धन्यवाद. लिहीत राहीलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

William Hart ह्यानं लिहिलेलं The Art of Living: Vipassana Meditation हे पुस्तक सध्या वाचतोय.
प्रस्तावना बहुतेक स्वतः गोयंकांनीच लिहिली आहे.
(पुस्तकाच्या नावात Art of Living असलं तरी थोर्थोर,महानमोस्ट, द वन्न अ‍ॅण्ड ओन्ली श्री श्री रविशंकर ह्यांच्याह्सी संबंधित हे पुस्तक नाही. विपश्यनेबद्दलच आहे.)
ह्या घडिला विपश्यनेबद्दल काहीही मत देउ शकत नाही. (कारण वाचून काही विशेष होणार नाही; तो एक "अनुभव"* आहे असं त्याच पुस्तकात वारंवार स्पष्ट केलय.)एकूणात गौतम बुद्ध ह्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल, आणि त्याला जे जाणवलय त्याबद्दल जबरदस्त कुतूहल वाटते आहे.
सर्वात भारी म्हणजे मांडणी प्रचंड आवडली. जे काही आहे , समजू शकतं त्याबद्दल बोललं गेलय.
काल्पनिक संज्ञा नाहित. देव-दानव फंडे नाहित. पळी-पंचपात्रे, नमस्कार्-चमत्कार नाहित.
फक्त आहे ते निरीक्षणातून उलगडत गेलेल्या गोष्टी. that's it.
म्हणजे ते इतकं सरळ साधं आहे की जामच आवडतं.
"पहा.पहात रहा. शांत रहा." हे असं आणि इतकच.
कुणीतरी येउन आकाशातून पडणारे किंवा तुम्हाला आकाशात/स्वर्गात जायचय किंवा लै लै उद्धार करुन घ्यायचाय वगैरे काहिच नाही.

* तो अनुभवही योग्य त्या मार्गदर्शनाखालीच घ्यायचा आहे हे वारंवार सांगितलय. स्वतःहून प्रयोग/उपद्व्याप करु नयेत अशी सूचनाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काल्पनिक संज्ञा नाहित. देव-दानव फंडे नाहित. पळी-पंचपात्रे, नमस्कार्-चमत्कार नाहित.
फक्त आहे ते निरीक्षणातून उलगडत गेलेल्या गोष्टी. that's it.
म्हणजे ते इतकं सरळ साधं आहे की जामच आवडतं.
"पहा.पहात रहा. शांत रहा." हे असं आणि इतकच.
कुणीतरी येउन आकाशातून पडणारे किंवा तुम्हाला आकाशात/स्वर्गात जायचय किंवा लै लै उद्धार करुन घ्यायचाय वगैरे काहिच नाही.

धन्यवाद मन. पुस्तक वाचुन अभिप्राय लिहील्याबद्द्ल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने