दिनवैशिष्ट्य
१३ नोव्हेंबर
जन्मदिवस : शिखांचे महाराजा रणजीत सिंग (१७८०), भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लर्क मॅक्सवेल (१८३१), लेखक रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन (१८५०), लेखक, विधिज्ञ, पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर (१८७३), के जीवनसत्त्व शोधणारा नोबेलविजेता एडवर्ड डॉईजी (१८९३), लेखक, विचारवंत व 'नवी क्षितिजे'चे संस्थापक संपादक विश्वास रघुनाथ पाटील (१९२८), अभिनेत्री जीन सेबर्ग (१९३८), लेखक हुमायूँ अहमद (१९४८), सन मायक्रोसिस्टम्सचा सहसंस्थापक स्कॉट मकनीली (१९५४), अभिनेत्री व्हूपी गोल्डबर्ग (१९५५), अभिनेत्री जुही चावला (१९६७), लेखिका अयान हिरसी अली (१९६९)
मृत्युदिवस : चित्रकार लुदोव्हिको काराच्ची (१६१९), संगीतकार रोसिनी (१८६८), चित्रकार कामिय पिसारो (१९०३), लेखक हेक्टर ह्यू मन्रो उर्फ साकी (१९१६), सिनेदिग्दर्शक व्हित्तोरिओ द सिका (१९७४)
---
जागतिक कनवाळूपणा दिवस.
१६८१ : संभाजींनी औरंगजेबाविरोधात बंड करून त्याचा मुलगा अकबर याची महाराष्ट्रात भेट घेतली.
१९५६ : अलाबामा राज्यातील बसमध्ये गौर-कृष्णवर्णीयांसाठी वेगळे राखीव विभाग ठेवण्याची तरतूद बेकायदेशीर असल्याचा अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
१९७१ : बालभारतीने 'किशोर' मासिकाचा अंक प्रायोगिक पातळीवर प्रथम प्रकाशित केला. जाने. ७२ पासून नियमित प्रकाशन.
१९९५ : सौदी अरेबियाच्या रियाध शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या ट्रक-बॉम्बस्फोटात पाच अमेरिकन व दोन भारतीय ठार.
२००१ : अमेरिकन फौजांनी तालिबानकडून काबूलचा ताबा मिळवला.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- Rajesh188
@राही - चंट/चटोर
चंट = street-smart असावा.
'चटोर'चा कुठला अर्थ तुम्हाला अपेक्षित आहे ? माझ्या मते 'उथळ' असा अपेक्षित असावा. तसे असेल तर shallow person म्हणता येईलच.
’चटोर’मध्ये फक्त ’उथळ’
’चटोर’मध्ये फक्त ’उथळ’ अभिप्रेत नसून शिवाय ’चारित्र्यानं थोडा/डी(च) सैल/रंगीत’ अशीही छटा असावी. राहीचं मत?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होय
चटोर आणि छचोर हे थोडे समानार्थी.'काय ती चटोर पुस्तकं वाचतोयस' म्हणजे त्या काळात नो नो असलेल्या प्रेमबिमाच्या कथा वाचतोयस म्हणजेच असे सैल वागू नये वगैरे.यात चटोर म्हणजे टुकार ही छटाही होती.
छचोर हिंदी सिनेमे वगैरे उपदेश आणि उपहासात्मक शब्द मागच्या पिढीत खूप प्रचारात होते.
चंट चा अर्थ मला वाटते विदर्भात थोडा वेगळा, सभ्य आहे. उलट आपल्याकडे चंट पोरगी म्हणजे थोडी जादा,उनाड, उंडगी वगैरे. चंट हा 'स्मार्ट' या अर्थाने वापरलेलाही ऐकला आहे.
मी "आपल्याकडचा" नाही. मी खाली
मी "आपल्याकडचा" नाही. मी खाली दिलेला अर्थ विदर्भालाच लागू आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
चारित्र्य
चटोर शब्दाशी थोडी चारित्र्यहीनताही जोडली गेली आहे असे वाटते. नुसतेच उथळ नव्हे तर मेघना म्हणते तसे वागणुकीतला सैलपणा हा अर्थ अपेक्षित होता.
चटोर - frivolous चंट - witty
चटोर - frivolous
चंट - witty
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फर्स्ट इज़ परफेक्ट. दुसर्यात
फर्स्ट इज़ परफेक्ट. दुसर्यात अंमळ वेगळी अर्थच्छटा अभिप्रेत आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
quick-witted in specific
quick-witted in specific
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
street Smart अचुक वाटतो
street Smart अचुक वाटतो
चंटपणे उत्तर दिले.
चंटपणे उत्तर दिले. ---witty
-------------------------------------------------------------------
चंटपणे प्यूनला १० रु देऊन दाखला घेऊन आला. ------------ street smart.
====================================================================================
पण मराठीत बाकी काहीच न म्हणता नुसतं चंट म्हटलं तर हुशार, क्विक, इफेक्टिव, हजरजब्बाबी, इ इ बोध होतात.
स्ट्रीट स्मार्ट म्हणतो तेव्हा अन्यत्र तो माणूस इतका इफेक्टीव नाही हे इम्प्लाय होतं जे मराठी चंट माणसाचं लक्षण नाही. म्हणून quick witted as primary preference.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
चिरचिरी "क्षक्षक्ष" आफ्रीकेत
चिरचिरी "क्षक्षक्ष" आफ्रीकेत जाऊ देत अन तिचे तिथेच कोटकल्याण होऊ देत. पैकी "कोटकल्याण होणे" अर्थात एकदाची कटकट मिटणे ला इंग्रजी शब्द काय?
__
get rid of? - नाही तितकासा चपखल नाही.
छे छे
कोटकल्याण होणे म्हणजे एकदाची कटकट मिटणे नव्हे.कोटकल्याण होणे म्हणजे चांगले होणे,एखाद्याचे भले होणे, भरभराट होणे. हा कोट नवकोटनारायणमधला कोट असावा का?
अरे बापरे. हे माहीत नव्हते
अरे बापरे. हे माहीत नव्हते
तोच असावा. गडकोट मधला कोटही
तोच असावा. गडकोट मधला कोटही तोच बहुतेक. गढीसदृष महालाला कोट म्हणत असावेत.
नवकोटनारायण मध्ये कोट हा
नवकोटनारायण मध्ये कोट हा "कोटी" (१,००,००,०००) या अर्थाने आला आहे ना? नऊ कोटींचा मालक = नवकोटनारायण
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
येस, त्याच अर्थाने. कोट =
येस, त्याच अर्थाने. कोट = किल्ला आणि कोटीचा अपभ्रंश म्हणून कोट हे दोन वेगळे प्रकार आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खूळ कि टूम?
फॅडला काय म्हणावं?
प्रत्येक शब्द कुठे वापरता येतो आणि कुठे नाही याला काँटेक्स्ट असतो. बरीच गृहितके असतात. बरेच रँडम नियम असतात. अर्थांचा एकूण मल्टीडायमेंशनल स्पेक्ट्रम घेतला तर एका झोनमधे एक शब्द जास्त शोभतो, मग सीमा धुसर होते नि दुसरा दिसू लागते. सेट्स थेरी मधे जितके ओवरलॅप्स असू शकतात तितके शब्दार्थांत असतात.
फॅडला खूळ म्हणावे कि टूम पाहू -
खूळ- हे थोडे जास्त विचित्र असते. खूळ व्यक्तिगत किंवा २-४ लोक , एक गाव, इ इ असे सिमित जास्त असते. खूळ समोरच्याला पूर्णपणे पटलेले नसते. खूळात केवल वेगळेपणाच नसतो तर ते ध्येय प्राप्त करायची तीव्रता जास्त असते. खूळ जेव्हा तीव्र असते तेव्हा सतत मनावर असते पण नंतर ते जाते.
टूम - टूममधे वैचित्र्य असणं आवश्यक नाही. टूम व्यक्तिगत आणि सामाजिक दोन्ही असू शकते. टूम, एक कृती म्हणून, खूळापेक्षा जास्त "नॉर्मल" असते. मात्र तिची जागा, वेळ प्रचंडच विचित्र असू शकते. टूममधे तीव्रता नसते. टूम अगदीच अल्पजीवी असते.
फॅड - हे व्यक्तिगत आणि सामाजिक दोन्ही असू शकते. यात वैचित्र्य कमी आणि अॅडिक्शन, जास्तदा करणे जास्त असते. बाहेर राहणारांच्या मते ते अननुकरणीय असते. हल्किशी निगेटीव टींज कधीकधी असते. फॅडात ध्येय अजिबातच नसते. फॅड बर्यापैकी टिकते.
किसच पाडला तर हे तीन वेगवेगळी जगे आहेत. संदर्भानुसार पाहावे लागेल. दोन्ही बरोबर आहेत. फॅडला, गरजेनुसार, अन्य शब्दसुद्धा पर्यायी ठरू शकतात.
====================================================================================
आपणांस एका शब्दास एकच अर्थ आहे आणि दुसर्या कोण्या त्याच्या समानार्थी शब्दासही तोच एक अर्थ आहे असे वाटत असल्यास सांगा. पैकी कोणत्याही शब्दाचे कसे अधिक अर्थ ध्वनित होतात नि त्या दोन शब्दांच्या अर्थच्छटेतील भेदाचे उदाहरण द्यायचा मी प्रयत्न करेन.
उदा.
१. श्वान आणि कुत्रा. कुत्र्यामधे जो घृणार्थ कधीकधी असतो तो सहसा श्वानात नसतो.
२. मैत्री आणि सख्य. सख्यमधे नाती, व्यक्तिगतता जास्त येते. मैत्री राष्ट्रांची जास्त असते, राष्ट्रांचे सख्य साठी खूप्पच जवळचे नाते लागेल (सीमेवर सैन्य नाही, विसा नाही.)
============================================================================
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
to explore किंवा explorer या
to explore किंवा explorer या शब्दांच्या जवळ जाणारं काही आठवतंय का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
शोधा
शोध/धांडोळा/मागोवा/हुडकणे/पालथे घालणे इत्यादी संदर्भाप्रमाणे
हे सगळे ठीकच आहेत. पण
हे सगळे ठीकच आहेत. पण 'एक्स्पोअर'मध्ये आजवर 'एक्स्प्लोअर'(!) न केलेलं काहीतरी करण्याचं सूचन आहे. उदाहरणार्थः बर्टननं लोककथांचं विश्व 'एक्स्प्लोअर' केलं. तसा एखादा मराठी शब्द आठवतो का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
इन्व्हेन्ट
नै, बहुधा 'इन्व्हेन्ट' करावा लागेल
मला धांडोळाच योग्य वाटतो. Her
मला धांडोळाच योग्य वाटतो.
Her heart was an unchartered territory, he was eager to explore.
एखाद्या अज्ञात, अगम्य प्रदेशासारख्या तिच्या हृदयाचा धांडोळा घेण्यास तो उत्सुक होता.
शोध/मागोवा असेच इतिहासलेखनात
शोध/मागोवा असेच इतिहासलेखनात वापरले जाते. Examine/analyze/research (या विषयाची/चे चर्चा/ऊहापोह/मीमांसा/संशोधन), explore (शोध/मागोवा/धांडोळा) हेच शब्द पुन्हापुन्हा येतात.
’पादाक्रांत’ची संदर्भचौकट
’पादाक्रांत’ची संदर्भचौकट युद्धविषयक आहे. त्यामुळे तो सगळीकडे नाहीच वापरता यायचा. पण तो जवळचा आहेसा वाटतो का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
’पादाक्रांत’ची संदर्भचौकट
डुप्रकाटाआ
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
वाटा, मार्ग, रस्ते, इ.?
नव्या वाटा चोखाळणे, नवे मार्ग धुंडाळणे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
चोखाळणे मस्त आहे. सगळ्यात जवळ
चोखाळणे मस्त आहे. सगळ्यात जवळ जाणारा आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मराठी किंवा भारतीय लोकांना
मराठी किंवा भारतीय लोकांना कधीही काहीही Explore करायची इच्छा झाली नसल्यामुळे ह्या पर्फेक्ट अर्थाचा शब्द मिळणे अवघड आहे.
चाळोखणे, चोखाळणे, कि काहीतरी
चाळोखणे, चोखाळणे, कि काहीतरी शब्द आहे.
मला इंग्रजी कविता एक्सप्लोर करायच्या आहेत = मला इंग्रजी कविता चोखाळायच्या आहेत
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हिंदी
हिंदीत खोज आणि अन्वेषण असे दोन शब्द आहेत.
मराठीत संदर्भानुसार 'अजमावणे' चालू शकेल. 'त्याने लोककथांचा प्रांत अजमावण्याचे ठरवले'. मुशाफिरी करणे सुद्धा वापरता येईल. पण मुशाफिरी म्हणजे निर्हेतुक भटकंती. हाताला काही लागले तर लागले. एक्स्प्लोअर् म्हणजे काहीतरी सापडवण्यासाठीचे (सापडण्यासाठीचे नव्हे)चाचपणे. चाचपणी करणे सुद्धा संदर्भानुसार वापरता येईल. शैलीदार लिहायचे झाल्यास 'नवी क्षितिजे धुंडाळणे' अशी लांबलचक शब्दमालिका वापरता येईल.
होय चाचपणी करणे हा शब्द मलाही
होय चाचपणी करणे हा शब्द मलाही आठवला होता. काही ठिकाणी तो फिट्टं बसतो.
मुशाफिरीही मस्त आहे. हा
मुशाफिरीही मस्त आहे. हा ’एक्स्पोअर’च्या बर्याच छटांच्या जवळचा आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
explore
to explore किंवा explorer या शब्दांच्या जवळ जाणारं काही आठवतंय का?
.........'खळवटणे' असा एक दुर्मिळ शब्द आहे. त्यावरून 'खळवट्या कोलंबस' वगैरे चालू शकेल.
किंवा थोडं 'उच्च' मराठीत explorationसाठी 'विचक्षणा' कदाचित वापरता येईल.
’खळवटणे’ ठाऊक नव्हता. वेगळाच
’खळवटणे’ ठाऊक नव्हता. वेगळाच आहे. पण तो (एखादा प्रदेश) ’विंचरून काढणे’ किंवा (एखादे भांडे) ’निपटून घेणे’ यांच्या जास्त जवळचा वाटतो. संदर्भचौकटीनुसार वापरता येईलच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भांडे निपटून घेणे = खंगाळणे
भांडे निपटून घेणे = खंगाळणे (= विसळणे) .
नाही, निपटून घेण्यात ते भांडे
नाही, निपटून घेण्यात ते भांडे (पाण्याने) धुऊन घेणे अभिप्रेत नाही. ते विसळण्यात वा खंगाळण्यात आहे.
विसळणे: पाण्याने धुऊन घेणे. (इथे घासणे बहुधा गायब असते.)
खंगाळणे: पाण्याने धुऊन घेणे. (इथे बहुधा हाताने घासून घेणयची क्रिया अभिप्रेत असते. 'चांगलं खंगाळून घे भांडं. ओशटपणा गेला पाहिजे.' वाह्यात वापरः 'हा काय अवतार? पावडरकुंकू राहू दे, थोबाड निदान खंगाळून तरी ये, जा!')
निपटून घेणे: (बहुधा) बोटाने वा हाताने भांड्यातला पदार्थ काढून घेणे व भांडे शक्यतो लख्ख करणे. ('निपटीशिपटी' हा शब्द याच्याशी संबंधित असावा. लहान मुलाला जेवण भरवताना तो वापरतात. अगदी शेवटचा घास पानात राहिलेला असला, म्हणजे मग 'अगदी निपटीशिपटी राहिली आहे बघ. निपटीशिपटी खाई आणि बबड्या मामाच्या गावाला जाई' असे म्हणून तो घास त्या मुलाच्या गळी (अक्षरशः!) उतरवला जातो.)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
खंगाळणे म्हजणे बहुदा खळखळून
खंगाळणे म्हजणे बहुदा खळखळून धुणे. त्यातही घासणीने घासणे अपेक्षित नसते.
उष्टे फुलपात्र विसळलेले चालते, मात्र चेहरा नुसता विसळून पुरत नाही खंगाळावा लागतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पाल्हाळ लावणे ला इंग्रजी शब्द
पाल्हाळ लावणे ला इंग्रजी शब्द काय? - spin wheels बरोबर वाटतोय मला तरी. अन्य असल्यास सांगावा.
Please quit spinning wheels & get to the point.
long winded < काहीतरी* > *
long winded < काहीतरी* >
* प्रोसेस, टेल, डायलॉग वगैरे
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ओह नवा शब्द मिळाला.
ओह नवा शब्द मिळाला.
___
"beating around the bush" देखील आहे थोडा मिळताजुळता.
Please quit meandering and
Please quit meandering and get to the point.
Please stop getting sidetracked and get to the point.
Your story is all over the map; get to the point.
This is too wide-ranging; get to the point.
Why are you rambling? Get to the point.
This is such a long-winded story. Can't you get to the point?
ब्लॅबर.
ब्लॅबर.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
वटवट करणे. चर्हाट लावणे.
वटवट करणे. चर्हाट लावणे.
अजो ब्लॅबर = बाष्कळ व्यर्थ
अजो ब्लॅबर = बाष्कळ व्यर्थ बडबड असे म्हणता येइल.
एक्स्प्लोअररला शोधयात्री कसा
एक्स्प्लोअररला शोधयात्री कसा वाटतोय?
शोधयात्री - चांगला शब्द
वापरातही आहे. उदा. कृष्णमेघ कुंटे यांचे 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे पुस्तक.
चांगला आहे. पण 'अमुक एक
चांगला आहे.
पण 'अमुक एक प्रदेश एक्स्पोअर केलेला नाही' या वाक्यात ते नाम काहीच कामाचं नाही. तिथे यात्रा गाळून फक्त शोध वापरावा लागतो. मग 'नवे प्रदेश धुंडाळण्या'चा अर्थ लोपतो.
अर्थात शब्दास जसाच्या तसा त्याच अर्थछटांचा नि जातीचा प्रतिशब्द मिळणे नाही हे अध्याहृत आहे आणि तीच गंमत आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
एक्सप्लोअर शब्दावर चाललेल्या
एक्सप्लोअर शब्दावर चाललेल्या चर्चेवरुन ही आठवली. आमच्या तरुण वयातली ५० सीसी गियरवाली बाईक (काहीशी बाईकसारखी दिसणारी आणि ल्यूनासारखे पेडल नसल्याने षोडषवयात माचो इफेक्टचा भास देणारी..)
आभार: www.team-bhp.com
"नेसेसरी ईविल" ला मराठीत
"नेसेसरी ईविल" ला मराठीत पर्याय आहे का?
आवश्यक संकट.
आवश्यक संकट.
असून अडचण नसून खोळंबा
अगदी तस्साच अर्थ नाही, तरीही "असून अडचण नसून खोळंबा", ही म्हण चालून जावी!
कबाब में हड्डी.. म्हणजे अर्थ
कबाब में हड्डी.. म्हणजे अर्थ असा की अनवांटेड काहीतरी. पण माश्यात काटा किंबा असेच काहीतरी कॉईन करता येईल की ज्यात सुक्यासोबत ओलेही, वांछितासोबत अवांछितही अनिवार्य आहे. लग्नाच्या फायद्यात सासू हा अनिवार्य भाग (कधीकधी नवरा पण अनिवार्य भाग).
नेसेसरी इव्हिल हा शब्दच मुळात फार अचूक नाही असं वाटतं. नेसेसरी म्हणजे आवश्यक. पण जनरली हा शब्द जिथे वापरला जातो तिथे ते नकोसं पण बळंच सोबत येणारं अशा अर्थाने (अनअव्हॉईडेबल) अशा अर्थाने असतं.
हो. नेसेसरी ईविल - जे आवडत
हो. नेसेसरी ईविल - जे आवडत नाही, तरी स्वीकारावे लागते ते. रादर जे काम पार पाडण्यात नको असलेले, पण टाळता न येणारे. कबाब में हड्डी हे त्या अर्थाने वेगळे आहे, नाही का?
कबाब में हड्डी वेगळेच आहे..
कबाब में हड्डी वेगळेच आहे.. मी नेमका अर्थ पकडणारं नवीन काहीतरी करता येईल का ते पाहात होतो.
ओह. ओक्के. बरोबर.
ओह. ओक्के. बरोबर.
बायको किंवा नवरा हे दोन्ही
बायको किंवा नवरा हे दोन्ही शब्द चालून जातील.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
खालील नवीन श्रेणीज षिरेसली
व्यवस्थापन : धाग्यावरचे अवांतर टाळण्यासाठी ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.
थत्ते काका - मार्मिक प्रतिसाद
थत्ते काका - मार्मिक प्रतिसाद ऑफ द मंथ.
मला श्रेण्या देण्याचा अधिकार नाही, नाहीतर तुम्हाला ५०० मार्मिक दिल्या असत्या.
अगदी अगदी
१९११ वेळा मार्मिक. किंवा जे काही असेल ते.
बाय द वे, आवश्यक लोढणे म्हणता येईल का? त्यासाठी म्हैसच (किंवा म्हसोबा) असायला हवे अशी अट नसावी बहुतेक.
नवरा हा बायकोसाठी 'सरी ग सरी अन गळ्यात दोरी' असा अलंकार असतो (असे बायका) म्हणतात.
नवरे बापडे बापुडवाणेपणाने 'ठुशी तर ठुशी, आता तरी नांद खुशी खुशी' असे शरणवाक्य (मर्मवाक्यमपि नोच्चरणीयम् म्हणून.) उच्चारण्याचा क्षीण प्रयत्न करीत असावेत.
अरे वा, मस्त! मी आधी ऐकली
अरे वा, मस्त! मी आधी ऐकली नव्हती ही म्हण.
धरलं तर चावतं- सोडलं तर
धरलं तर चावतं- सोडलं तर पळतं
ही म्हण सुसंगत वाटतीय.
आपलेच दात आणी आपलीच जीभ असा एक वाक्प्रचार आहे.
म्हणजे दातानी जीभ चावली गेली तरी दातां ना शिक्षा करता येत नाही कारण दोन्ही आपलेच.
नेसेसरी इव्हील ला समानार्थी
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
घटोत्कच!
घटोत्कच!
या धाग्यावर हे थोऽडं अवांतर
या धाग्यावर हे थोऽडं अवांतर आहे. पण त्याचं पुढे काही झालं तर त्याची फांदी वेगळी छाटता येईलच.
मी काही जुन्या मराठीतले म्हणता येतील असे शब्द अजूनही सररास वापरते. असं दिसतं की ते वापरात नसल्यामुळे इतरांना पटापट कळतातच असं नाही. त्यांची इथे नोंद करत आहे.
दवडणे - घालवणे
बैस - 'बसणे'चे आज्ञार्थी रूप
वागवणे - एखादी वस्तू (ग्रह/कल्पना/गंड इत्यादीही!) सोबत बाळगणे (बरेचदा तितकासा वापर / उपयोग नसताही)
ताल करणे - हट्ट / नखरे / कांकूं / अळंटळं / तमाशे करणे
दुग्ध्यात पडणे - द्विधा मनःस्थितीत असणे
तुम्ही असे शब्दप्रयोग करता का? करत असाल, तर इथे जरूर द्या. आपण (आंजाकरांनी) 'अंमळ'चं पुनरुज्जीवन केलं, तसं इतरही काही शब्दांचं करू.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मुळाबरहुकूम, त्याबरहुकूम. हा
मुळाबरहुकूम, त्याबरहुकूम.
हा एक शब्द मी सर्रास किंवा सेमीसर्रासपणे वापरतोच. बाकी आठवायला लागतील.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आता बूच बसल्यामुळे बदल करता
आता बूच बसल्यामुळे बदल करता येईनात.
दवडणे हे to get rid of चं, ताल करणे हे to throw a tantrum चं, वागवणे हे to carry चं, तर दुग्धा हे dilemna चं शक्य तितकं जवळ जाणारं भाषांतर आहे, असं लक्षात आलं. अर्थात इतर अर्थ आणि उपयोग आहेतच. पण हेही आहेत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दवडणे हे to get rid of
फक्त हे बरोबर वाटत नाही. get rid of मधे स्वइच्छा असावी असे वाटते. "दवडण्यात" चुकीमुळे आणि इच्छेविरुद्ध काहीतरी गमवायला लागणे वाटते.
इथे असा अर्थ सापडतो: दवडणें
इथे असा अर्थ सापडतो:
दवडणें (p. 404) [ davaḍaṇēṃ ] v i ( H) To run. Pr. तोंडावाटें का- ढावें आणि देशांतरास दवडावें.
दवडणें (p. 404) [ davaḍaṇēṃ ] v c ( H) To urge or impel violently; to make to gallop or run: to despatch quickly; to start off (upon some errand). 2 To let go or throw away; to squander, waste, lavish. Pr. हातचें दवडा आणि पळत्याचे पाठीस लागा. 3 fig. To destroy or throw away (a good name &c.): also to cast off or remove (an imputation, a calamity): to put to flight--as medicine does a disease &c. It applies in almost all the figurative applications of घालविणें.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्मायली बाकी रोचक आहे.
स्मायली बाकी रोचक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अवांतर
अरे, तिथल्या विरामचिन्हांमुळे ती आपोआप आलीय!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ते माहितीये
.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दवडणें [ davaḍaṇēṃ ]
गोव्यात कुठेशी आहे हे ?
...
गोव्यांत असतें, तर Davarnem नसतें झालें?
अरे!
म्हणजे दवडणे हे 'दौडना'वरून आले आहे की काय!
दुचाकी, चारचाकी, यंत्र, संच,
दुचाकी, चारचाकी, यंत्र, संच, आसन, फाटक, उंडारणे, कोळपणे हे निदान लक्षात येत आहेत.
मला
मला कधी कधी 'धाडणे' हा शब्द वापरण्याची हुक्की येते. तसेच 'बोवळणे' हा शब्द बहुतेक 'पण लक्ष्यात कोण घेतो' मध्ये वाचला होता, नुसतेच इकडून तिकडून फलकारणे, प्रत्यक्ष काम न करता फुकटची लुडबूड करणे, गोंधळ माजवणे या अर्थी. तो आवडला होता. बोळवणे, बोळवण करणे हा वेगळा शब्द.
तसेच 'चिरणे' ह्या शब्दाचा वापरही कमी होत चालला आहे असे वाटते. आता 'कापणे' वापरला जातो. 'तू टाक चिरून ही मान' मध्ये चिरून नसून चिणून आहे की काय असे मध्ये मला कुणीतरी विचारले होते. पतकर घेणे, कैवार घेणे हेही कमी वापरले जातात. 'उसने'ऐवजी 'उधार' वगैरे बरेच सांगता येतील.
धाग्याची कल्पना आवडली.
होय की. धाडणे, चिरणे, पत्कर
होय की. धाडणे, चिरणे, पत्कर घेणे, कैवार घेणे मीही वापरते. पण बोवळणे मात्र ऐकला नव्हता. त्याचा जरा उपयोग करून दाखवशील का वाक्यात?
चिरणे सहसा 'कापणे'ला पर्याय म्हणून चालावा. पण आमच्या घरात थोडा भेदभाव करतात. भाजी चिरायची, पण कागद कापायचे. हे विळी आणि सुरी/कात्रीशी (अर्थात हत्याराशी) संबंधित असेल का? की ज्यावर ते हत्यार चालवायचं ती वस्तू ओली/कोरडी/सजीव/निर्जीव यावर? की केवळ दोन पर्याय? कुणास ठाऊक.
असाच अजून एक मी वापरते तो 'ढणकणे'. तो जुना आहे की कसं ते ठाऊक नाही. एका मैत्रिणीकडून उचलला. कामधाम न करता, रिकामचोट भटकायला / 'उंडारायला' / 'गाव घ्यायला' जाणे म्हणजे 'ढणकणे'. उदा. कुठे गेली टिंकू? - काय माहीत! होती की मगाशी इथेच. गेली असेल कुठे तरी ढणकायला.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
पत्करणे हाही एक शब्द माझ्या
पत्करणे हाही एक शब्द माझ्या तोंडी आहे. ’स्वीकारणे’ अशा अर्थी. ’पत्कर घेणे’पेक्षा त्याचा अर्थ निराळा आहे. उदा. आता पत्करलं आहे ना काम? मग निभावणे आहे. आणि ’कशाला पण इतकं धावूनधावून करायला हवं तिचं? तू काय पत्कर का घेतला आहेस तिचा?’
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
चिरणे
मलाही वाटते की सजीव (कोणतीही) वस्तू चिरायची आणि निर्जीव कापायची. पण ह्याला अपवाद आहेतच. उदा. केसाने गळा कापला.
बोवळणेचे उदाहरण. - सुंद्रीच्या लग्नात मथी लुगडे नेसून नुसती बोवळत होती. काही कामाची नाही.
..तसं नाहीये.या दोन वेगळ्या
..तसं नाहीये.या दोन वेगळ्या फंक्शनल क्रिया आहेत.
.कट आणि स्लिट..साधारण.
.चिरणे हे सिंगल पात्याने एकाच बाजूने जोर लावून तुकडा पाडणे.यात जनरली कोणत्यातरी बेसवर टेकवून धरुन रिपिटिटिव्ह तुकडे.
.कापणे हे दोन किंवा अधिक अंगांनी पाती / फोर्स लावून एकदाच तुकडा पाडण्यासाठी.
..पात्याचा प्रकार यापेक्षाही एकदाच व्हर्सेस रिपिटिटिव्ह हे जास्त महत्वाचे.
ब्लेडने / सुरीने (हाताला)
ब्लेडने / सुरीने (हाताला) कापणे??
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
.जनरली एकच वार,एकच स्नॅप.
.जनरली एकच वार,एकच स्नॅप.
लाकूड
करवतीचा वापर करुन लाकूड कापले जाते. जनरली एकच वार नसला आणि वन डिरेक्शनल फोर्स असले तरीही 'कापणे' हाच प्रयोग योग्य वाटतो.
नाही हो.
आम्ही लाकूड चिरणे म्हणतो. चिरफळ्या करणे/काढणे असे म्हणतो.
कदाचित चिरणे म्हणजे पार आरपार पोटात खुपसणे असेल आणि कापणे वरवरचे असेल. चिरण्याची अॅक्शन फोर्सफुल वाटते. कापण्याची कमी ताकदीची.
वाळवी लाकूड/लाकडाला चिरत जाते असे म्हणतो. (जखम चरत जाते असे म्हणतो.)
अगदी अगदी फोर्स जाणवतो
अगदी अगदी फोर्स जाणवतो चिरण्यात. कापणं त्या मानाने हलके वाटते.
लाकूड "तोडतात" असे वाटते.
लाकूड "तोडतात" असे वाटते. लाकूडतोड्या आणि कुर्हाड.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तोडणे
लाकडूतोड्या झाडाचे लाकूड तोडतो. पण ते रॉ मटेरिअल जेव्हा सुताराला दिले जाते तेव्हा तो करवतीने ते कापतो.
बरोबर. इथे लाकूड
बरोबर. इथे लाकूड चिरण्याबद्दल म्हटले गेले म्हणून....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ओके
मीही लाकडाचे उदाहरण हे वरील व्याख्येशी विसंगत वाटल्याने दिले. लाकूड चिरणे हा शब्दप्रयोग मी आजच इथे वाचला.
चिरणे/कापणे
प्लायवूड वगैरे फर्निचरकामात करवतीने लाकडावर जी क्रिया केली जाते त्याला चिरणे म्हणत नसावेत असा माझा संशय आहे.
बरोबर वाटतेय.
कट आणि स्लिट हे अगदी चपखल इंग्रजी शब्द आहेत कापणे आणि चिरणे साठी. तरीही मराठीत कधी कधी अदलाबदल होतेच. जसे की झाडांच्या फांद्या कापल्या पण खोड चिरले. डोंगर कापले, (खरे तर फोडले, तोडले, तासले) पण पत्थर (फत्तर) चिरून चिरे पाडले. बकरा कापला, कोंबडी कापली हे हिंदूंना ठीक आहे पण हलालसाठी एका झटक्यात कापायचे नसते. तेव्हा? पण अर्थात हे फार ओढून ताणून झाले. शस्त्रक्रियेने पाय कापला, आतडी कापून काढली, बोट कापले हे बरोबर वाटते. तिची (किंवा कुणाचीही) किंकाळी माझे (किंवा कुणाचेही) काळीज चिरत गेली हेही बरोबर वाटते. इथेही एक घाव दोन तुकडे नाहीत.
नक्की काय ते मला ठाऊक नाही.
नक्की काय ते मला ठाऊक नाही. मी कांदा कापला आणि चिरला असं दोन्ही म्हणतो पण आंबा चिरला म्हणत नाही; कापलाच म्हणतो.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
मी कांदा कापते, आंबा कापते पण मेथी चिरते, पालेभाजी चिरते.
टोमॅटो कापते.
मल्टिपल लेयर्स/स्ट्रॅण्ड्स
मल्टिपल लेयर्स/स्ट्रॅण्ड्स कापले जाणे याच्याशी काही संबंध असेल का? मेथीचे एक रोप एकावे़ळी घेऊन कापत नाहीत. तसेच भेंडी/गवार/फरसबी. आंबा/टोमॅटो एकावेळी एक घेऊन कापतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
शॉर्ट्कट म्हणून भेंडी व
शॉर्ट्कट म्हणून भेंडी व फरस्बी एकाच वेळी बर्याच चिरते मी.
आपले बरोबर असावे मल्टिपल स्ट्रॅन्ड्स चे.
'आंबा चिरला'...
...हेही ऐकल्यासारखे वाटते.
चिरल्यावर बरेच लहान तुकडे
सहसा चिरल्यावर बरेच लहान तुकडे होतात तर एकदा कापल्यावर दोन मोठे तुकडे होतात.
हे पर्फेक्टाय!
हे पर्फेक्टाय!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
इथे इंग्रजीमध्ये कापणे/चिरणे
इंग्रजीमध्ये कापणे/चिरणे इ. क्रियांकरता वेगवेगळे शब्द आहेत.
मिन्स, चॉप, डाइस, ज्युलिएन, कट, स्लाईस इ.
झालंच तर हे जातिवाचक शब्द
झालंच तर हे जातिवाचक शब्द असल्यामुळे आता ते वापरणं शिष्टसंमत नाही, ते बरोबरही नाहीतच. पण आजीच्या पिढीतल्या लोकांच्या तोंडी असल्यामुळे ते कानाला इतके खटकत नाहीत. त्यांना एक विशिष्ट (अपमानास्पद) अर्थ चिकटले आहेत. त्यांची नोंद.
बोहारीण - जुनाट गोष्टी जमवून ठेवण्याची आवड असलेली, गचाळ स्त्री
धनगर - अस्वच्छ, गचाळ, अव्यवस्थित ("कसा धनगरासारखा फिरतो आहे पाहा! इकडे ये, हात-पाय तरी धुऊन देते.")
म्हारक्या - लष्करच्या भाकर्या ("तू तुझं काम कर की पण. करायच्यात काय तुला नाही त्या म्हारक्या?")
चांभारचौकश्या - अनावश्यक, भोचक चौकश्या
धेडगुजरी - अनैसर्गिक संकर / मिश्रण असलेला (धेड म्हणजे महार, गुजर हीदेखील एक जात)
बामणी - साटोपचंद्रिकेप्रमाणे अती नेटकं, अनावश्यक उपदेशपर, स्वच्छ, धूर्त
या जातींचे पिढीजात व्यवसाय आणि त्याला लागून आलेलं राहणीमान या शब्दप्रयोगांना कारणीभूत असावं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
???
- ब्राह्मण म्हणजे फक्त चित्पावन अशी समजूत आहे काय?
- देऋब्रा या जमातीचे नाव कधी ऐकले आहेत काय? 'नेटकेपणा' हा शब्द असलेले आमच्या डिक्शनरीचे पान (आमच्या व्याख्येनेच अंगभूत गबाळेपणास अनुसरून) सुटे होऊन कधीच गहाळ झालेले असते. (नसल्यास आमच्यात ते फाऊल धरतात.)
मी वापरते. १. सदर व्यक्ती
मी वापरते.
१. सदर व्यक्ती किंवा सदरहू इसम
२. उजमेखून
सध्या हे दोनच आठवतायत.
बादवे >> आपण (आंजाकरांनी) 'अंमळ'चं पुनरुज्जीवन केलं, << ये कुछ ज्यादा होयेला है. आंजाचा सुळसुळाट होण्यापूर्वीपासून मी माझ्या आजूबाजूला अंमळ भरपूरवेळा ऐकलंय. रेग्युलर वापरायचेही.
- नी
लायबलिटीचं मराठीत भाषांतर कसं
लायबलिटीचं मराठीत भाषांतर कसं करता येईल? हिशेबाच्या संदर्भात तर मला शब्द आठवत नाहीच आहे. पण एरवीही आलंकारिक अर्थानं वापरायचा झाल्यास 'ओझं' याखेरीज काही सुचेना. ब्लँक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
जबाबदारी, जिम्मेदारी, जिम्मा.
जबाबदारी, जिम्मेदारी, जिम्मा.
responsibility आणि liability
responsibility आणि liability या वेगळ्या असाव्यात. जबाबदारी, जिम्मेदारी, जिम्मा हे शब्द पहिल्यासाठी वापरले जातात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
हेच
हेच लिहायचे होते.
बाय द वे, खर्चवेंच मधला वेच लायबिलिटी तर नव्हता?
किंवा, वेच आणि बेच मध्ये काही नाते होते का?
अर्थात 'फुले वेचली तिथे गोवर्या वेचायची वेळ आली' मधले वेचणे वेगळे असावे.
'वेच'चं मूळ शोधलं पाहिजे.
'वेच'चं मूळ शोधलं पाहिजे. इंट्रेष्टिंग.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
'वेचणे' आणि खर्चणे यांचा अर्थ
'वेचणे' आणि खर्चणे यांचा अर्थ एकच आहे. (उदा. मी पाण्यासारखा पैसा वेचला.) त्याचं मूळ संस्कृत 'व्यय' शब्दात आहे, असं मोल्सवर्थ-कँडीच्या कोशात लिहिलं आहे. शिवाय या शब्दाला wear and tear अशीही छ्टा असावी. कारण याच कोशात सवेच याचा अर्थ that wastes or wears असा दिला आहे. 'वेचणे'चा दुसरा अर्थ तुम्ही म्हणता तसा (फुले/ गोवर्या वगैरे) उचलून गोळा करणे असा आहे.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे (की व्यवहारे?) उदास विचारे वेच करी
depreciation?
that wastes or wears;
depreciation साठी बाजूला काढलेली रक्कम? तरतूद?
खरं तर लायाबिलिटीसाठी सुद्धा प्रोविजन, तरतूद करावी लागतेच.
गळ्यातली धोंड?
गळ्यातली धोंड?
लोढणं?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आलंकारिक अर्थानं हाच सगळ्यात
आलंकारिक अर्थानं हाच सगळ्यात जवळचा. आर्थिक संदर्भात थत्तेचाच्यांचा 'देणं'.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
"देणे"
"देणे" (अर्थव्यवहाराशी संबंधित)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
डिक्शनरीत "दायित्व" येते आहे.
डिक्शनरीत "दायित्व" येते आहे.
परफेक्ट..
परफेक्ट..
स्वारी, फार संस्कृत आहे बॉ!
स्वारी, फार संस्कृत आहे बॉ!
गंभीरपणे - होय, भाषांतर म्हणून बरोबर. पण मज्जा नाय!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
लायेबिलिटी हा तरी काय अगदी
लायेबिलिटी हा तरी काय अगदी बोलीभाषेतला खेळकर शब्द आहे ?
बरं ओ गवि, तुम्ही 'दायित्व'
बरं ओ गवि, तुम्ही 'दायित्व' म्हणा!
गंभीरपणे: नाही. मान्य आहे. पण आलंकारिक अर्थानं वापरायचा झाला, तर "हे माझ्या गळ्यातलं दायित्वच होऊन बसलंय!" असं म्हणून चालेल का हो? किंवा अगदी ब्यालन्सशीटच्या डाव्या बाजूला तरी 'मुद्दल' या रकान्याखाली 'दायित्व' शोभून दिसेल, की 'देणे'?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
रिमेन्ड टु बी गिव्हन, युअर
रिमेन्ड टु बी गिव्हन, युअर लायेबिलिटी ऑफ नक्षत्राज्..
या एका ओळीबद्दल तुमचं लेखक
या एका ओळीबद्दल तुमचं लेखक म्हणून माझ्या लेखी असलेलं पुण्य एकदम सर्रदिशी सापाच्या तोंडातून ८९ वरून ३ वर घसरलं आहे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बापरे, बरीच ड्यामेजिंग ठरली
बापरे, बरीच ड्यामेजिंग ठरली की एकच ओळ.. :~
पण विनोदबुद्धीचे तुमचे पुण्य
पण विनोदबुद्धीचे तुमचे पुण्य ९० वरुन ९८ गेले आहे.
___
आता सांगा गवि, मेघनाताईंनी दिलेल्या पुण्यलोपास तुम्ही घाबराल की मी दिलेल्या पुण्यवाढीने आनंदाल? "दोन्ही" असं उत्तर नॉय चॉलबे
>>स्वारी, फार संस्कृत आहे
>>स्वारी, फार संस्कृत आहे बॉ!
मी देणे म्हटलं ना !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
होय, मी वर स्वीकारला तो.
होय, मी वर स्वीकारला तो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होय, मी वर स्वीकारला
अभिनंदन..!!! रिसेप्शन वेगळे योजिले आहे का?
आभार. पण समारंभाला विरोध आहे
आभार. पण समारंभाला विरोध आहे माझा. नुसतेच शुभाशीर्वाद चालतील.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
...
एक पुणेरी वाक्प्रचार आहे. परंतु तो मुद्रणयोग्य नाही. (चतुष्पादविशिष्टातील युगुलासंदर्भात आहे.)
असो.
लाएबिलिटी या शब्दात ज्या
लाएबिलिटी या शब्दात ज्या देण्यातून काही मिळण्याची अपेक्षा आहे अशा देण्यांचापण अंतर्भाव असतो. आपण जो गर्दभयुगुलसंदर्भातील शब्द म्हणता आहात त्यात "ज्यातून लाभ होणार नाही अशी खात्री आहे" अशा गोष्टी येतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
देय हे
देय हे payable,देणी-liability.
))लाएबिलिटी या शब्दात ज्या देण्यातून काही मिळण्याची अपेक्षा आहे अशा देण्यांचापण अंतर्भाव असतो. ))-- - -?
कधी कधी 'जबाबदारी' हा अर्थ निघतो.कधी अगोदर घेतलेली वस्तु अथवा त्याबदल्यात इतर काही परत देणे बाकी आहे.गुजरातीत 'उपाधि' म्हणजे मुलीच्या लग्नाची जबाबदारी.'बे उपाधि छे'=दोन मुलींची लग्नं करून द्यायची आहेत.
"सुमार" ह्या शब्दाचा मराठी
ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.