Skip to main content

आंतरजाल

चर्चा वेगळी काढणे, इ.

Taxonomy upgrade extras

आता मराठीला फोरम्स हा प्रकार नवा नसला तरी ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत होता. तेव्हा मी या संस्थळावर वावरत असे. साधारण एका विषयसमुच्चयात रस असलेल्या लोकांनी एकमेकांशी बोलायची केलेली ही सोय अभिनव होती. तिथे हा धागे वेगळे काढण्याचा प्रकार मी प्रथम पाहिल्याचं आठवतं. मला ती सोय फार आवडली होती. त्यामुळे एखाद्या विषयाचा संदर्भ पुन्हा जाऊन पाहणं वा शोधणं वा आपला रसविषय हुडकणं फारच सोईचं झाल्याचं स्मरतं. ती सोय करणारं ऐसी हे मराठीतलं पहिलंच संस्थळ असावं.

इंटरनेट चे भविष्य

Taxonomy upgrade extras

संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय

नुकत्याच अमेरिका स्थित MDIF नामक संस्थेने संपूर्ण जगासाठी फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा देण्याची योजना जाहीर केली आहे . या योजने अंतर्गत जगभरातील कोणत्याही देशात कोणत्याही निर्बंधा शिवाय/ सरकारी नियंत्रण किंवा हेरगिरी ला टाळून मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.

कंपनी पुढच्या काही वर्षात पृथ्वीभोवती अवकाशात फिरणाऱ्या शेकडो क्यूब -SAT उपग्रहांचे जाळे निर्माण करणार आहे ,ज्यायोगे आज ज्याप्रमाणे जीपीएस सेवा दिली जाते ,त्याच प्रमाणे भविष्यात फ्री वाय-फाय इंटरनेट सेवा दिली जाइल .

२०१४ चे वाचन आव्हान

Taxonomy upgrade extras

पुस्तक आणि वाचन: बदलत्या दिशा असं एखाद्या परिसंवादासारखं नाव असणार्‍या धाग्यावर रीडर्स ब्लॉक / एकसंध वाचन कंटाळा या समस्येच्या निराकरणासाठी खरोखरच एक रोचक परिसंवाद झाला. त्या मंथनातून निघालालेला हा 'प्रस्तावित' यादी जाहिर उपाय अनेकांना पटला. त्याची अंमलबजावणी सोपी जावी, एकमेकांवर वाचन-वचक रहावा म्हणून त्यातील काही प्रतिसादांना या नव्या धाग्यात हलवत आहोत. इथे या वर्षी तुम्ही कोणती पुस्तके वाचणार आहात याची यादी जाहिर करावी व त्याचे सिंहावलोकनही होत रहावे असे उद्देश आहेत.

===========

पुस्तकं आणि वाचनः बदलत्या दिशा

Taxonomy upgrade extras

माझं हार्डकॉपीतल्या (@अमुकः योग्य मराठी प्रतिशब्द सुचवा प्लीज) पुस्तकांचं वाचन जवळजवळ थांबलं आहे. असं दर काही वर्षांनी अधूनमधून होत असतं, एखादं खणखणीत पुस्तक मिळालं की येईल रुळावर... असं म्हणून मी इतके दिवस निवांत होते. पण सध्या तसं होताना दिसत नाहीय. हाताशी वाचायसाठी साधारण १० तरी रोचक पुस्तकं आहेत, तरीही पुस्तक वाचण्याऐवजी सहजच ऑनलाइन डोकावण्याला प्राधान्य दिलं जातं. ऐसी आहे, ब्लॉग्स आहेत, फेबु आहे... तिथे वादंग करण्यात, लाइकवण्यात, नुसतंच वरवर काही चाळण्यात जवळजवळ सगळा वेळ जातो. कुठेही आणि कितीही सहजी उपलब्ध असलेलं जाल हे याचं एक कारण असावं.

मुंबईकट्ट्याची आरोळी!

Taxonomy upgrade extras

हम्म. पुणे कट्टा हुकलाच. आगामी मुंबै कट्टा चुकणार नाही याची दक्षता घेतलेली बरी!

ऋ: स्वगतः (जणु काही) नवा धागा संपादकांनीच वेगळा काढला पाहिजे!
जाहिरः खास लोकाअग्रहास्तव या चर्चेचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत.

एक प्रकल्प - मराठी संस्थळांचं योगदान

Taxonomy upgrade extras

मन यांनी एका प्रतिसादात म्हटलं आहे...

बाकी,ज्योतिष वगैरे विषयावर हल्ली दोन्ही बाजूंनी सर्वसाधारणपणे तेच तेच मुद्दे येताना दिसताहेत.
रंगमंचावर नवीन अभिनेत्यांनी जुनीच गाजलेली पात्रे वठवत रहावीत आणि जुन्यांनी संन्यास घ्यावा तसे काहीसे.
अभिनेते गाजतात, जातात, पात्रे कायम तीच, तिथेच असतात, संवादही तेच ते बोलतात...

तुम्ही नियमितपणे काय वाचता?

Taxonomy upgrade extras

'ऐसी'च्या संस्कृतीप्रमाणे ऐसीकर आपल्या म्हणण्याच्या पुष्टीदाखल यथार्थ दुवे देत असतात ही गोष्ट खरी. पण ते वाचताना प्रश्न पडतो की, ही मंडळी इतकी माहिती चाळून पचवत असतील आणि हवी तेव्हा चपखलपणे काढून देऊ शकत असतील, तर हे लोक नियमितपणे वाचतात तरी काय नि किती? ते कुतूहल शमवण्याकरता हा धागा.

उत्पलच्या धाग्यात त्यानं म्हटल्याप्रमाणे जालावरचं महाभारत एकेकदा पहायला, आपल्या वाचनाचं कुरण निवडायला नि त्यावर काहीएक म्हणणं तयार व्हायला वेळ जातो, तोवर हे दुवे महापुरात हरवूनही गेलेले असतात. तसे ते जाऊन नयेत, एका ठिकाणी सापडावेत, म्हणूनही.

दिवाळी टू दिवाळी लिहिण्यामागची कारणं…

Taxonomy upgrade extras

'ऐसी अक्षरे'चा दिवाळी अंक छानच झाला आहे. संपादक मंडळाचे आणि सहभागी लेखकांचे अभिनंदन!

माझ्या लेखावरील प्रतिसादात मन यांनी विचारलेला प्रश्न आणि त्यासंदर्भात त्यांनीच काढलेला एक धागा याच्या अनुषंगाने काही लिहावं असं वाटलं. तसा प्रयत्न करतो आहे.

'फेमिनाझीं'नी नाडलेल्या सर्व बालकांना एक खुला ढोस

Taxonomy upgrade extras

सतत स्वतःला एमसीपी म्हणून रडारड, मेलोड्रामा आणि पॅसिव्ह-अग्रेसिव्हपणा करणाऱ्या सगळ्या बालकांना,

मातृत्वगुण अजिबात नसलेल्या अदितीकडून आशीर्वाद मिळणार नाहीत. फार तर 'मोठे व्हा' असा अनाहूत सल्ला द्यायचा आहे. आत्तापर्यंत अशा प्रतिसादांकडे, लेखनाकडे, स्वाक्षऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ह्यापुढेही करेन. पण फक्त एकदाच (हिलरीची मैत्रीण) मिशेल ओबामाचा सल्ला ह्या बाबतीत नाकारत्ये. एकदा हा गुन्हा करून घेतेच.