Skip to main content

आंतरजाल

जालावरचा रोचक कंटेंट : कुठे, कसा आणि कधी शोधायचा.

Taxonomy upgrade extras

संपादकांनी धाग्याला छोट्या मोठ्या प्रश्नांत हलवला तरी हरकत नाही!

आंतरजालाची सहज सवय झाली आहे. अर्थार्जन, मनोरंजन अशा सर्व बाबी आता मला इंटरनेटशिवाय कल्पणे अशक्य होऊन बसले आहे.
इथे वावरणार्‍यांपैकी बर्‍याच जणांची अशीच अवस्था झाली असावी असं सुरुवातीलाच गृहीत धरतो.
बहुतांश भारतीय लोकांसाठी इंटरनेट ही प्राथमिक गरज नसेलही. ज्यांचं जालधोरण तात्पुरतं आणि निकडीवर आधारित आहे त्यांनी ह्या चर्चेला पास द्यायला हरकत नाही. जाणतं वाचन, निवडक चित्रपट-टी. व्ही शोज आणि कोणतीही ज्ञानलालसा, ज्ञानसाधना ह्या गोष्टी ज्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत त्यांच्यासाठीच हा धागा आहे असं ढोबळपणे समजून बोलुत.