मुंबईकट्ट्याची आरोळी!
हम्म. पुणे कट्टा हुकलाच. आगामी मुंबै कट्टा चुकणार नाही याची दक्षता घेतलेली बरी!
ऋ: स्वगतः (जणु काही) नवा धागा संपादकांनीच वेगळा काढला पाहिजे!
जाहिरः खास लोकाअग्रहास्तव या चर्चेचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत.
सारखं सारखं काय मी ऑर्गनाइज,
सारखं सारखं काय मी ऑर्गनाइज, आँ?! एवढ्या श्रेयाची मला सवय नाहीये हो. :(
बादवे - मुंबईचा कट्टा करायचा असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि शेवटच्या आठवड्याअखेरीस करावा, अशी विनंती. पहिला आणि शेवटचा - असे दोन्ही वीकान्त मला वेळ नाहीये.
तरी - काही मदत हवी असल्यास, पुढाकार घ्यावयाचा असल्यास, सांगणेचे करावे हेवेसांनल. ;-)
उत्तम. अजून पुरेशी वाट नाही
उत्तम. अजून पुरेशी वाट नाही लागलीय त्या जागेची. जवळपास हाटेलं मिळतील कुठे ना कुठे... लागलीच तर. बेष्ट आहे. एकच प्रॉब्लेम - तिथे कट्टा आहे., पण फतकल घालून बसायला अशी जागा आहे का? ते एक मराठी मालिकेतून जगप्रसिद्ध झालेलं देऊळ आहे. त्यात तर काही ते लोक बसू देणार नाहीत. बाकी तळं आणि कट्टा आणि लहान लहान टपरीवजा हाटेलं. बसायला जागा आहे? नि मुळात लोक किती नि कोण असणार आहेत? वेगळा धागा काढा बॉ आता.
बादवे - १. संपादकांना मुंबई
बादवे -
१. संपादकांना मुंबई कट्ट्यासाठी कधी वेळ आहे?
२. सदस्यांपैकी मुंबई कट्ट्याला कोण कोण येऊ इच्छित / येणार आहे?
३. राधिका निदान खादाडीची स्थळं सुचवण्याची तरी जबाबदारी घेईल काय? ;-)
४. मुंबई - ठाण्यातली खादाडीशिवाय नुसतं बसून टीपी करता येतील अशी संभाव्य सोईस्कर स्थळं कुठली?
घाटकोपर मधे सॅम्स पिझ्झा
घाटकोपर मधे सॅम्स पिझ्झा नावाची एक जागा आहे. तिथे अनलिमिटेड सुप, गार्लिक ब्रेड, पिझ्झा, २१ प्रकारचे सलॅड आणि लिमिटेड डेझर्ट हे फक्त २०० रुपयात मिळते. आणि या जागे पासुन साधारण पाच मिनिटांच्या अंतरावर एक मोठे मैदान आहे तिथे नंतर बसुन टवाळक्या करता येउ शकतात. हि जागा चेंबुर, टिळक नगर हे हार्बर लाईन वरचे स्थानके आणि घाटकोपर, विद्याविहार या सेंट्रलच्या स्थानकांपासुन जवळ आहे. रोड ने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अमर महाल जंक्शन पासुन ५ मिनिट चालत आहे.
मंडळी एक फक्त सांगायचे राहुन
मंडळी एक फक्त सांगायचे राहुन गेलयं, हे ठीकाण फक्त शाकाहारी आहे.
१. संपादकांना मुंबई
१. संपादकांना मुंबई कट्ट्यासाठी कधी वेळ आहे?
माझा वेळ तसा फ्लेक्झिबल आहे. फक्त तारीख लवकर ठरवावी ही विनंती.
४. मुंबई - ठाण्यातली खादाडीशिवाय नुसतं बसून टीपी करता येतील अशी संभाव्य सोईस्कर स्थळं कुठली?
कुठल्यातरी सीसीडीमध्ये किंवा बरिस्तामध्ये नंतर पडीक रहायला हरकत नाही.
खादडंतीसाठी सुचवण्या
मेघना, तू माझं आवडतं काम माझ्याकडे सोपवलंस याबद्दल फार्फारच धन्यवाद. आत्ता या तीन सुचवण्या देते आहे, त्या माझ्या पसंतीच्या क्रमाने लावल्या आहेत, म्हणजे सर्वात वरच्या रेस्तराँला माझी सर्वाधिक पसंती आणि सर्वांत खालच्याला सर्वांत कमी. बघा कशा वाटतात ते.
१. Poush येथे काश्मिरी पदार्थ मिळतात. कॉस्ट फॉर टू हजाराच्या आसपास असली, तरी व्हेज काँबो मिल ९९ किंवा १०९ रु.ना तर नॉनव्हेज काँबो मिल १४९ ते १६९ रु.ना मिळते. मला या रेस्तराँचा अनुभव नाही, परंतु झोमॅटोवरील रेटिंग्ज उत्साहवर्धक आहेत.
२. मारकेश येथे लेबनिज, मोरोक्कन इ. पदार्थ मिळतात. मी येथे एकदा गेले आहे (नेमक्या कोणत्या शाखेत ते आता आठवत नाही), माझा इथला अनुभव चांगला आहे. कॉस्ट फॉर टू- ७५०.
३. नसरानी येथे दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. माझ्या दृष्टीने इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे येथे बदक मिळते. अर्थातच शाकाहारी जेवणही मिळते. कॉस्ट फॉर टू- साधारण पाचशे. या रेस्तराँचाही मला काही अनुभव नाही.
जेवल्यानंतर गोड खायला टेम्प्टेशन आहेच.
खादाडीसाठी छानच, पण ...
पौषबद्दल ठाऊक नाही कारण कधी जाणे झाले नाही. परंतु माराकेशचा अनुभव (किमान ५-६ वेळचा) उत्तमच आहे. नसराणीदेखिल (१-२ वेळाच) पण ठीक आहे. नसराणीत केरळी पद्धतीचे मांसाहारी/शाकाहारी पदार्थ मिळतात.
तरीही एक "कट्टा" म्हणून ही ठिकाणे कितपत योग्य आहेत याबाबत साशंक.
दादर
कट्ट्याचे ठिकाण म्हणून एकदा दादरचाही नीट विचार व्हावा. सेंट्रल लाईनवरून, वेस्टर्न लाईनवरून, पुण्याहून अशा विविध ठिकाणांहून येणार्या लोकांसाठी दादर हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. वाट्टेल तितका वेळ बसायला शिवाजी पार्क आहेच, वर त्याच्या काठाशी बरिस्ता इ. आणि अनेक भोजनालयेही आहेत.
शिवाय मराठी जालकर्यांकडून मराठी अस्मिता वगैरे वगैरे जपली जाईल ते वेगळंच. :ड
प्लस वन
दादरला माझा फुल सपोर्ट. पण शिवाजीपार्क भागात कमी महाग रेस्टॉरंट मिळेल का? नाहीतर पार्काच्या बाजूलाच सोयीनुसार फ्रॅंकी, सॅंडविचेस वगैरे उभ्याने खायचं आणि कट्टा कट्ट्यावरच करायचा असा प्लॅन करता येईल. थोड्या वेळाने तो बरिस्तात हलवायचा. तसंही खाणं हे दुय्यमच असतं. गप्पा हाणता आल्या म्हणजे झालं.
शिवाजी पार्क
शहराजादना अनुमोदन.
आता कमी महाग म्हणजे काय ते स्पष्ट करा कारण दोन वर्षांपूर्वी एका फ्रॅन्कीची किंमतही रु. ३५पासून पुढे अशी होती. सध्या काय दर आहेत कल्पना नाही. शिपाच्या गणेश मंदीरामागचा भजीपाववाला कदाचित त्यातल्या त्यात स्वस्त ठरावा.
तिथल्या जवळच्या हाटलांत दरापेक्षाही इतक्या लोकांना एकत्र जागा मिळणे हा कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल.
डिस्को - पब
डिस्को , पब वगैरे प्रकारात जावे काय?
तिथे ग्रुप एण्ट्री असते. उलट एकेकट्यानं गेलं तर लोक विचित्र पहात असावीत असा माझा अंदाज.
किम्वा एखादी गाडी कट्टा करावा काय ?
विंगर वगैरे सारखी १७ सीटर गाडी/मिनिबस बुक करायची.
मुंबै दर्शनला वगैरे निघायचं.
दिवसभर गाडितूनच भटकायचं.
क्या बोल्ताय?
छे छे
मुळीच अवघड नाही. मुंबईत, विशेषतः दादरमध्ये गप्पा मारत एकत्र बसण्यासाठी बर्याच जागा आहेत. फाईव्ह गार्डन, शिवाजी पार्क, रुईयासमोरचा कट्टा, माहेश्वरी उद्यान. चर्चगेट भागातही उद्यानं आणि समुद्रकिनार्यावरचा कट्टा अशी ठिकाणं आहेत. शिवाय बाकी ठिकाणचे समुद्रकिनारे आहेत ते वेगळेच.
आणखी एक
कट्टा फिरता ठेवायचा असेल तर दुपारचा वेळ पार्कात घालवून संध्याकाळचा वेळ माटुंग्याला माहेश्वरी उद्यानाच्या भोवतीची जुनी पुस्तके चाळत त्यावरून एकमेकांशी गप्पा मारत घालवता येईल. वाटल्यास थोडा वेळ तिथे उद्यानातही बसता येईल. भोवती चांगली कॉफी मिळण्याची काही ठिकाणे आहेत.
विदर्भ लॉबी, कामचुकार मेघना, ९ तारीख आणि दादर
कट्टा व्हावा, आणि तो लवकर व्हावा याबाबत सगळ्यांचंच एकमत दिसतं आहे. तारखांबाबत कोणीच फारसे आक्षेप घेतलेले नाहीत त्यामुळे
'कुठे जायचं?'
'मला कुठेच हरकत नाही. तू सांग.'
'मलाही काहीही चालेल. तू सांग.'
'मला काही सुचत नाही तूच सांग'
असा प्रकार चालू आहे. यावर काहीतरी निश्चित करण्याबाबत मेघनाने वायदेआझमगिरी करून काहीच न लिहिल्यामुळे माझ्यावरच हे लिहिण्याची पाळी आली आहे. (अदितीबाई गैर अर्थ काढून 'तुम्हाला ते अंगच नाही' असं म्हणणार याची खात्री आहे)
त्याचबरोबर खेदाने सांगावं लागतं की ८ तारखेला माझे इतर कार्यक्रम ठरल्यामुळे ८ तारीख मला जमणार नाही. पण मी त्यावेळी मुंबईतच आहे, तेव्हा ९ तारीख निश्चितच जमू शकेल. त्यात ९ तारखेला ऐसी अक्षरेच्या विदर्भ लॉबीच्या खंद्या कार्यकर्त्या माण्णीय उसंत सखू आक्का या खास नागपुराहून येऊन मुंबईला ठाण देऊन बसलेल्या असतील. त्यांनाही ही तारीख निश्चितच जमणार आहे. एरवी ऐसीकरांना त्यांची भेट होणं कठीण आहे.
तेव्हा आपण ९ तारीख दादर असं ठरवून टाकावं. सकाळी अकरा ते संध्याकाळी कितीही हा सगळ्यांसाठीच भरपूर वेळ होईल. ज्यांना संपूर्ण वेळ येता येणार नाही त्यांना किमान हजेरी लावून जायला तरी जमेल. ज्यांना ९ तारीख जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक कट्टा फेब्रुवार्यांताकडे घेण्याचे करता येईल. दादरमध्ये नक्की कुठे हे अजूनही तसं उघडंच आहे.
डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्स आणि अॅनिमेशनपटांचा महोत्सव
अवांतर माहिती: मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्स आणि अॅनिमेशनपटांचा महोत्सव ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत नरिमन पॉइंटला NCPA इथे भरत आहे.
अधिक माहिती इथे
मलाही ९ जमणं कठीण आहे. ९
मलाही ९ जमणं कठीण आहे. ९ र्हाऊ द्या, २२ पण र्हाऊ द्या. १५ चं जमवून टाका. ;-)
***
खरं तर सगळ्यांना जमेलशी एक तारीख जमणं अवघड आहे. त्यामुळे माझं मत १५ला आहे, पण ती नच जमल्यास मी केवळ खट्टू होईन. चलताय.
स्थळः शिवाजी पार्क / ठाणे उपवन
खादाडी: राधिकानं सुचवलेली सगळी ठिकाणं ठाण्यात आहेत. कट्टा ठाण्यात घडल्यास सोन्याहून पिवळे. एरवी दादरला उभ्या उभ्या फ्रँकी / पिझ्झा / वडापावही चालू शकेल.
मालक अम्रिकेतनं आल्यामुळे अंतिम निर्णय त्यांनी द्यावा (पण आजच द्यावा) असं सुचवून मी आपली रजा घेते. ;-)
मला पहिल्या आणि तिसर्या
मला पहिल्या आणि तिसर्या शनिवारी सुटी नसते. त्यामुळे १५ला दिवसा भेटायचं असेल तर मला जमणार नाही. घास्कींना २२ तारीख चालत असल्यास साधारण किती लोक येणार आहेत याची माहिती कळवा.
पर्यायः-
१.मराठमोळं जिप्सी (दादर)- (मराठी पदार्थ + मराठी गाणी) स्वस्त आहे- आम्हा तीन लोकांच्या रात्रीच्या जेवणाचं बिल ५००रू. झालं होतं. पण तिथे वेळप्रसंगी शेजारच्या जिप्सीतल्या वॉशरूम्स वापरता येतील का माहित नाही. पाच टेबल्स म्हणजे एकावेळी २० लोक आरामात बसू शकतील, जेवणानंतर हाकलून दिल्यास शिवाजी पार्क आपलाच आहे.
२. उपवन (ठाणे)- तळ्याकाठी बसण्यासाठी बरेच पर्याय आहेत, खायचे प्यायचे जास्त ऑप्शन्स नाहीत आणि मला ते तुलनेने महाग वाटले, जायला बरंच दूर आहे.(हे माझं वैयक्तिक मत) वॉशरूम्सची सोय आहे असे वाटते.
३. ठाणे/घाटकोपर्/उपनगरातले मॉल्स- खाणं थोडं महाग असेल. व्हिवियानाचं माहित नाही, पण आर सिटी घाटकोपर, फिनिक्स मार्केट सिटी इथे बसायला पुष्कऴ जागा उपलब्ध आहे.
४. सॅम्स पिझ्झा, घाटकोपर.- सर्वकरांसहित पिझ्झाथाळी दोनशे रू.च्या आत. बसायला शेजारी टिळकनगर ग्राऊंड आहे, १०-१२ लोक असतील आमचं घरही आहे. (टीप-घरात वॉशरूमची सोय आहे) संध्याकाळी पाचच्या सुमारास जवळच खमंग मूगभजी मिळतात, हिरव्या-चिंचेच्या चटणीसह.
५. इतर--
चला पटापट ठरवून टाकू.
माझ्याकडून मी आणि निखिल- २ लोक २२तारखेसाठी तयार आहोत, आम्हाला कुठलेही ठिकाण चालेल.
मला यायचय
त्या कट्ट्याच्या तारखाही जरा आधीच कळल्या तर बरं.
मला यायचय.