चर्चा वेगळी काढणे, इ.
आता मराठीला फोरम्स हा प्रकार नवा नसला तरी ७-८ वर्षांपूर्वीपर्यंत होता. तेव्हा मी या संस्थळावर वावरत असे. साधारण एका विषयसमुच्चयात रस असलेल्या लोकांनी एकमेकांशी बोलायची केलेली ही सोय अभिनव होती. तिथे हा धागे वेगळे काढण्याचा प्रकार मी प्रथम पाहिल्याचं आठवतं. मला ती सोय फार आवडली होती. त्यामुळे एखाद्या विषयाचा संदर्भ पुन्हा जाऊन पाहणं वा शोधणं वा आपला रसविषय हुडकणं फारच सोईचं झाल्याचं स्मरतं. ती सोय करणारं ऐसी हे मराठीतलं पहिलंच संस्थळ असावं.
अशी सोय करताना संपादक त्यांच्या हक्कांचा गैरवापर करताहेत वा कसली जबाबदारी टाळताहेत असं मला वाटलं नाही, वाटतही नाही. किंबहुना आपण या मंडळींना 'संपादक' असं खवचटपणे (ह.घ्या.) संबोधत असलो, तरी ही मंडळी असतात आपल्याचपैकी, आपल्याचसारखी हौशी वाचक. त्यांना या कामाचे कसलंही मानधन मिळत नाही. तरी एकदोन जास्तीच्या क्लिकांचं काम करून धागे वेगळे करताना हे लोक आपलीच सोय पाहत असतात. त्यात आणि लेखकाची परवानगी घ्या, मागची पार्श्वभूमी सारांशरूपात खरडा, नाहीतर स्वतःच्या नावे धागे काढा... अशी लचांडं त्यांच्यामागे लावायची म्हणजे जरा अतीच वाटतं.
श्रेण्यांबाबतही तेच. आपल्याच धाग्यावर श्रेण्या देण्याची सोय नसणं ही त्रुटी आहे खरी. पण मुळात श्रेण्यांची सोय हीच जिथे चंगळीची बाब आहे, तिथे...
असो. सुधारणा करायला सांगणं ठीकच. सकारात्मक टीका इत्यादी. ;-)
पण तसं करताना आपल्या सुराकडे लक्ष दिलं नाही, तर आपण मालक - संपादक या जमातीकडून अती अपेक्षा करतो असं खालच्या काही प्रतिक्रिया वाचताना वाटलं. म्हणून टंकनश्रम घेतले. बाकी - मी संपादक (अजून तरी! ;-)) नाही, याची नोंद घ्यावी!
****
हा वेगळा काढलेला प्रतिसाद. हा सिफरला उद्देशून विचारलेला प्रश्न होता:-
धाग्यातून चर्चा तुझ्या नावावर वेगळी काढली, तर इतकी चिडचिड का होते आहे तुझी? मला खरोखरच कळत नाही.
तुझी भूमिका वर दिसते आहे त्याहून वेगळी, अधिक काही म्हणणारी असेल, काही उदाहरणांची भर घालायची असेल, काही पार्श्वभूमी द्यायची असेल; तर तू कधीही संपादन करू शकतोस. त्यानं चर्चा अधिक काटेकोर, मुद्देसूद व्हायला मदतच होईल. पण ते न करता - नुसतंच '- पण माझी परवानगी का नाही घेतली?' असं म्हणत राहून काय साध्य होणार? की धाग्यातून तुझं म्हणणं वेगळं काढण्याच्या कृतीतूनच संपादकांनी तुझ्याविरुद्ध काही दावा साधला आहे असं तुला म्हणायचं आहे? तसं म्हणायचं असेल असं मिनिटभर गृहित धरू. असा काय फायदा होणार होता त्यानं संपादकांचा? किंवा तुझ्या विरोधकांचा?
तुझी तरीही इतकीच चिडचिड होत असेल, तर धाग्याची लेखिका म्हणून माझं नाव घालायची परवानगी मी संपादकांना देते.
(या धाग्यातून चर्चा वेगळी काढली आहे. मेघना यांनी वाटल्यास चर्चाप्रस्ताव संपादित करावा.)
प्रश्न विचारधीन आहेत
साधारणतः कंटेटमध्ये बदल करायचा असताना परवानगी घेतली जातेच. इथे केवळ व्यवस्थापकीय बदल आहे, कंटेट बदललेला नाही किंवा अप्रकाशितही केलेला नाही. (मुळ प्रतिसाद जिथे होता तिथेही हा प्रतिसाद कुठे हलवला आहे त्याची नोंद असतेच].
मुळ चर्चेला फाटे फुटु नयेत मात्र त्याच वेळी समांतर/अवांतर/दुसर्या उप तरीही महत्त्वाच्या विषयावर चर्चा व्हावी अश्याही उद्देशाने इथे अनेकदा प्रतिसादांचे नवे धागे बनवलेले आहेत आणि तसे त्या धाग्यांवर स्पष्टपणे म्हटलेले आहे. दुसरे असे की प्रत्येक बदलासाठी लेखकाची परवानगी घेणे फिजीबल असेलच असे नाही. त्यावेळी तो लेखक जालावर नसणे वगैरेमुळे एखाद्या महत्त्वाच्या/तत्कालीन विषयाला योग्य तो न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे व्यवस्थापकीय अधिकारात असे नवे धागे काढले जातात/ याही आधी गेले आहेत
अशा व्यवस्थापकीय बदलांसाठी इथे परवानगी घेतलेली नाही. मात्र इतर प्रत्येक बदलांसाठी/विकीवर माहिती नेताना अशी परवानगी घेतली जाते.
आता या प्रॅक्टिसवर पुनर्विचार करावा का? प्रॅक्टिस बदलावी का? वगैरे प्रश्न विचारधीन आहेत.
भूमिका आणि चर्चा
१. प्रतिसाद वेगळा काढून धागा बनवला जाताना, मूळ धाग्यासंबंधित फार प्रतिक्रिया नाही आणि अवांतर असलं तरी रोचक आहे, ज्या विषयावर वाचक/लेखकांना चर्चा हवी आहे असा प्रतिसाद निवडला जातो, किंवा असं व्हावं
२. दुसरं आणि जास्त महत्त्वाचं असं की अभिव्यक्तीस्वातंत्र्य हवं असेल तर त्यासोबत येणारी जबाबदारीही घेण्याची तयारी हवी. सहज काही लिहून टाकलं पण त्यामुळे होणाऱ्या चर्चेची जबाबदारी घेणार नाही असं असल्यास अभिव्यक्तीस्वातंत्र्यही संकुचित होणार. असं करण्याची 'ऐसी अक्षरे'ची तयारी नाही.
३. सदस्य झालं म्हणून श्रेणी देण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही. हा अधिकार वाहन-चालवण्याच्या परवान्यासारखा आहे. ठराविक परीक्षा पास झाल्यावर तो मिळतो, आणि ठराविक काळासाठी हा अधिकार स्थगितही होतो. सातत्यानं जबाबदार आणि सकारात्मक वर्तन ही त्या परवान्यासाठी आवश्यक अट आहे. अनिर्बंध वर्तनामुळे तो स्थगित होऊ शकतो.
मुळात श्रेणी देता येणं ही संस्थळ चालवणारे व्यवस्थापक आणि सदस्य असणारे-नसणारे वाचक यांची सोय आहे. ज्यांना फक्त मोजके, लोकांना खरोखर आवडलेले प्रतिसादच वाचायचे आहेत, त्यांची सोय श्रेणीदात्यांमुळे होते. त्याशिवाय धागा भरकटवणारे, उगाचच प्रतिसादसंख्या फुलवणारे, लोकांना भडकवण्यासाठीच लिहीलेले प्रतिसाद या गाळणीतून बाजूला होतील, त्यातून वाचकांना निवडक ते ठरवता येईल आणि झालंच तर धागा भरकटवणं, +१ च्या (किंवा तत्सम रिकाम्या प्रतिसादांच्या) माळा लावून प्रतिसादसंख्येतली सूज येते ती आवरली जाईल अशी अपेक्षा आहे. एखाद्या धाग्यापुरता श्रेणी देण्याचा हक्क नसला, तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचं कारण नाही.
हा धागा वेगळा काढण्याचा हेतू असा की अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली तर आपण सहजरित्या तक्रारी करतो. पण त्या स्वातंत्र्याबरोबर येेणारी जबाबदारी काय यावरही आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आणि एकंदरच संस्थळाचा दर्जा वाढवण्या-टिकवण्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत, ती भूमिका मांडता यावी, त्यावरही सदस्यांनी मतप्रदर्शन करून व्यवस्थापनाला सुधारण्यासाठी मदत करावी असा उद्देश आहे.
मेघनाने नेहेमीच सकारात्मक टीका करून 'ऐसी अक्षरे'ला मदत केली आहे, तिचा प्रतिसादही तशाच प्रकारचा वाटला म्हणून वेगळा काढला.
'ऐसीवरच्या कोणत्याही धाग्यावर
'ऐसीवरच्या कोणत्याही धाग्यावर मूळ धाग्यासंबंधित फार प्रतिक्रिया नाही आणि प्रतिसाद अवांतर असलं तरी रोचक आहे, ज्या विषयावर वाचक/लेखकांना चर्चा हवी आहे असा प्रतिसाद वेगळा काढून प्रतिसादकाच्या नावाने धागा बनवला जाऊ शकतो' असे कलम नियमावलीत जोडता येईल का? ह्यामुळे अवांतर चर्चा थांबतील, आणि कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही.
असहमत. प्लस शंका.
मुळात श्रेणी देता येणं ही संस्थळ चालवणारे व्यवस्थापक आणि सदस्य असणारे-नसणारे वाचक यांची सोय आहे. ज्यांना फक्त मोजके, लोकांना खरोखर आवडलेले प्रतिसादच वाचायचे आहेत, त्यांची सोय श्रेणीदात्यांमुळे होते. त्याशिवाय धागा भरकटवणारे, उगाचच प्रतिसादसंख्या फुलवणारे, लोकांना भडकवण्यासाठीच लिहीलेले प्रतिसाद या गाळणीतून बाजूला होतील, त्यातून वाचकांना निवडक ते ठरवता येईल आणि झालंच तर धागा भरकटवणं, +१ च्या (किंवा तत्सम रिकाम्या प्रतिसादांच्या) माळा लावून प्रतिसादसंख्येतली सूज येते ती आवरली जाईल अशी अपेक्षा आहे. एखाद्या धाग्यापुरता श्रेणी देण्याचा हक्क नसला, तर त्याबद्दल वाईट वाटून घेण्याचं कारण नाही.
१. या संस्थळावर मेंबरशिप असणार्यांचा एक सर्व्हे घ्या, असे सुचवितो. ९९.९९% लोकांचा, ज्यांना प्रतिसाद म्हणजे काय व थोडीफार नेटसॅव्ही आहे, असे वाचक असतील, तर त्यांचा चॉईस, "-1:14 प्रतिसाद" हाच आहे असे सिद्ध होईल असे वाटते.
२. फुलोरा फुलविणारे प्रतिसाद असलेत, तरीही मूळ धागा जेव्हा ट्र्याकरमधे पाहिला जातो, तेव्हा उणे अधिक सर्व श्रेणीधारक प्रतिसादांचीच संख्या दिसते असे मला वाटते.
३. धाग्यातल्या प्रतिसादावरून वेगळा धागा करणे हा आयटम मला ऐसीवरच दिसतो, किंबहुना इतरत्र फारच तुरळक / अपवादात्मक दिसतो असे म्हणतो.
अनेक तिरपे प्रतिसाद आल्यावर, म्हणण्यापेक्षा, किती सेन्सिबल तिरके प्रतिसाद आल्यावर धागा वेगळा करावा याबद्दल काही संपादकीय निकष आहेत काय? (हा प्रश्न खरेतर विचारायला नको. कारण पॉलिसी डिसिजन क्वश्चन करतो आहे. पण ऐसीच्या एकंदर पारदर्शकतेवरून विचारायचे धाड्स करीत आहे.)
तर,
हे असे वेगळे काढण्याचे प्रमाण जरा कमी करता येईल का?
ता.क.
हा प्रतिसाद, मूळ धागा, अथवा या धाग्याचा प्रस्ताव इत्यादी हिशोबात न घेता, किंवा न वाचता म्हणा हवे तर, लिहिला आहे.
अनेक तिरपे प्रतिसाद आल्यावर,
अनेक तिरपे प्रतिसाद आल्यावर, म्हणण्यापेक्षा, किती सेन्सिबल तिरके प्रतिसाद आल्यावर धागा वेगळा करावा याबद्दल काही संपादकीय निकष आहेत काय? (हा प्रश्न खरेतर विचारायला नको. कारण पॉलिसी डिसिजन क्वश्चन करतो आहे. पण ऐसीच्या एकंदर पारदर्शकतेवरून विचारायचे धाड्स करीत आहे.)
असे अगदी स्पष्ट लिहून दाखवण्यासारखे निकष नाहीत. अमुक इतके प्रतिसाद वेगळ्या विषयावर झाल्यावर नवीन धागा यापेक्षा 'ही चर्चा या धाग्यावर असण्यापेक्षा स्वतंत्र शीर्षकाखाली येण्याइतका तिचा पुरेसा जीव आहे का? मूळ धाग्यापेक्षा पुरेसा वेगळा आणि महत्त्वाचा विषय आहे का?' या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न असतो. पॉलिसी डिसिजन क्वश्चन करायला बिलकुल हरकत नाही. शक्य तितकी पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करू, किंवा शक्य तितक्या निर्णयांमागची भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करू (बांधील नसलो तरी) हे ध्येयधोरणांतच लिहिलेलं आहे.
हे असे वेगळे काढण्याचे प्रमाण जरा कमी करता येईल का?
याआधीचा वेगळा केलेल्या '...फायनान्शियल सिक्युरिटी' धाग्याच्या आधीपर्यंत नवीन धागा करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरल्याचं आठवत नाही. अनेक वेळा सर्वसाधारण मत 'हा धागा त्या चर्चेवरून वेगळा काढला हे बरं झालं' असंच जाणवलेलं आहे. बऱ्याच अशा धाग्यांवर चांगली चर्चा झाल्याचंही दिसलेलं आहे. तेव्हा हे मत एक फीडबॅक म्हणून जरूर ध्यानात ठेवू. मात्र 'इतके धागे वेगळे काढायचे' असं ठरलेलं प्रमाण नसल्याने ते अंमलात आणता येईलच असं नाही. मला अजूनही वाटतं की पुरेसा जीव, पुरेसा वेगळा आणि महत्त्वाचा विषय हे निकष लावत गेलो तर धागा वेगळा काढण्याचा फायदाच होतो. कदाचित तुम्ही असं म्हणत असाल की काही बाबतीत या निकषांसाठी बार पुरेसा उंच नाही. तसं होऊ शकतं. 'आधी काळजी घेतच होतो, यापुढे थोडी अधिक घेऊ' यापलिकडे आणखीन काही सांगणं कठीण आहे.
आधी लिहिलेलं आहेच, पण पुन्हा लिहितो. 'धागा' आणि 'प्रतिसाद' यात फारसा फरक नाहीये. झाडाचं उदाहरण घ्या. झाडाला फांद्या असतात, आणि फांद्यांना डहाळ्या असतात. तसंच ट्रॅकरवर धागे दिसतात आणि धाग्यांवर प्रतिसाद दिसतात. प्रतिसादांना उपप्रतिसादही येतात - डहाळ्यांना आणखीन छोट्या डहाळ्या याव्या तशा. मात्र काही प्रतिसादांमध्ये मूळ धाग्याइतकंच मोठं होण्याचं पोटेन्शियल असतं. त्यामुळे ती डहाळी कापून नवीन फांदी म्हणून लावणं सोयीचं जातं. नाहीतर फांदीपेक्षा डहाळी मोठी व्हायला नको. तेच काम आम्ही संपादक करतो. किंबहुना या प्रक्रियेत वापरले गेलेले शब्दही 'प्रून' आणि 'ग्राफ्ट' असे आहेत. फांदी कोणाला म्हणावं, तिला शोभेशी डहाळी कुठची, आणि कुठची मोठी होऊन स्वतंत्र फांदी होईल हे जसं सुस्पष्टपणे सांगता येत नाही तसंच इथे आहे. तिथे आम्ही संपादकीय जजमेंट वापरतो.
ऐसीवर आम्ही ठरवून 'संपादक म्हणजे अवांतराचा कचरा कापून टाकणारे' किंवा 'सदस्य भांडण करून दंगा करतात, घाण करतात, ती निस्तरणारे' किंवा 'खोडसाळ धागे उडवणे' या भूमिका दूर ठेवलेल्या आहेत. अनेक सदस्यांना श्रेणीसुविधा दिल्याने हे काम करण्याची गरज उरू नये अशी परिस्थिती आली आहे. कारण जिथे चांगलं दिसतं तिथे श्रेणीद्वारे कौतुक होतं, आणि जिथे कोणी अर्वाच्य, खोडसाळ, निरर्थक काही लिहितं तिथे ताबडतोब फीडबॅक मिळून पुढची नकारात्मक चर्चा थांबते. म्हणून संपादकांतर्फे नवीन फांद्या तयार करणं, झाडाला आकार देणं या स्वरूपाची सकारात्मक कामं व्हावीत अशी आमची भूमिका असते. बऱ्याच वेळा हे चांगलं जमतं, काही वेळा ठीकठाकच जमतं, आणि काही वेळा नीट जमत नाही.
असो, तुमच्या प्रश्नाला यातून उत्तर मिळालं असेल अशी आशा आहे.
तत्कालिक कारण
ज्यामुळे ही चर्चा सुरू झाली, तोच प्रतिसाद वेगळा करण्याचं कारण, सदर सदस्याने "... सोमवारी प्रतिसाद देतो" असा प्रतिसाद देऊन अधिक चर्चा करण्याची इच्छा दर्शवली, हे होतं. सदस्यांना या विषयावर लिहायचं आहे, मूळ लेखनावर हे अवांतर होईल आणि अन्य सदस्याने अशी विनंतीही केली होती. (मूळ विनंती मान्य झाल्यावर त्यांनी प्रतिसाद संपादित केला आणि चर्चा विषयाबद्दल मत मांडलं) म्हणून ताज्या कुंडीत ती फांदी लावली गेली.
मूळ प्रतिसाद धाग्यातून वेगळा काढला तरीही, ज्या संस्थळाची ध्येयधोरणं मान्य केलेली नाहीत, जिथल्या प्रायव्हसी पॉलिसीज आपल्याला मान्य नसतील, तिथे ते लेखन गेलेलं नाही. खासगी संवादातलं लेखन जाहीर झालेलं नाही.
---
अन्य प्रश्नोत्तरे -
१. या संस्थळावर मेंबरशिप असणार्यांचा एक सर्व्हे घ्या, असे सुचवितो. ९९.९९% लोकांचा, ज्यांना प्रतिसाद म्हणजे काय व थोडीफार नेटसॅव्ही आहे, असे वाचक असतील, तर त्यांचा चॉईस, "-1:14 प्रतिसाद" हाच आहे असे सिद्ध होईल असे वाटते.
त्यांच्यासाठीही श्रेणीपद्धतीचा फायदा नाहीच असं म्हणता येत नाही.
१. सकारात्मक श्रेणींची संख्या ७ आहे, नकारात्मक ४. संस्थळावर एकूण किती श्रेणी दिल्या गेल्या हे पाहता नकारात्मक श्रेणी १५% सुद्धा नाहीत. (बेरीज करून पाहिली नाही, जास्त श्रेणी देणाऱ्या पहिल्या १०-१५ लोकांचे आकडे पाहिले.) याचा अर्थ लोक उत्तेजन देण्यासाठी श्रेणी वापरत आहेत; अशीच अपेक्षा होती आणि आहे.
२. अधूनमधून उद्भवणाऱ्या ट्रोलांना उत्तरं देण्याच्या भानगडीत कोणी पडलंय असं दिसत नाही. ज्या श्रेणीदात्यांना असे ट्रोल दिसतात, ते आधीच श्रेणी देऊन वासलात लावतात. ट्रोलांचा उद्देश सफल होत नाही आणि वाचक-सदस्यांना भविष्यात कमी कचरा दिसतो.
३. त्याशिवाय, कमी प्रमाणात का होईना, पण असे लोक आहेत ज्यांना नकारात्मक श्रेणी मिळालेले प्रतिसाद वाचायचे नाहीत. त्यांना पर्याय देता येणं शक्य असेल तर तो का देऊ नये? (ज्या गोष्टी बहुतेकांना हव्या आहेत, त्या तांत्रिकदृष्ट्या शक्य नसतील तरच केल्या जात नाहीत.)
४. "१००+ प्रतिसाद होते म्हणून मी तो धागा उघडलाच नाही" असं खासगीत म्हणणाऱ्या व्यक्ती (सदस्य आणि वाचक) माझ्या परिचयाच्या आहेत. या लोकांनी धागे वाचावेत म्हणून मुद्दाम प्रतिसाद देऊ नये असं नाही, तर संख्या, जास्त प्रतिसाद म्हणजे प्रत नव्हे अशा प्रकारचे विचार करणारे लोक माझ्या आजूबाजूला आहेत. या लोकांची मतं मला लक्ष देण्यासारखी वाटतात.
इतर संस्थळांवर काय चालतं, हे आजूबाजूला काय चालतं म्हणून जरूर पाहता येईल आणि पहावं. पण इतर संस्थळांवर मुळातच श्रेणी देण्याचा अधिकार नाही, त्यामुळे प्रतिसादाचा धागा बनवला तरीही तो हिरावला जात नाही आणि अशा प्रकारची तक्रारही उद्भवत नाही.
पण त्या स्वातंत्र्याबरोबर
पण त्या स्वातंत्र्याबरोबर येेणारी जबाबदारी काय यावरही आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावं.
फ्रिडम कम्स विथ रिस्पोसिबिलिटी
यावाक्यासाठी माझ्यातर्फे एक मार्मिक.
हेच सांगायचा खरतर प्रयंत्न करीत होतो. उद्या सिफ़रने केजरीवाल स्टाइल आपले शक्य तेव्हडे प्रतिसाद व लिहिलेले लेख काढुन चर्चा असंबद्ध केल्यास याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गैरवापर, अन-एथिकल म्हणता येणार नाही का? कुठल्या तरी एका आयडी ने हे ऐसीवर केलेल आढळतं. त्यामुळेच अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा व्यर्थ झेंडा मिरवु नये, आंधळेपण टाळावे.
(हाच नियम स्त्रिवादासाठी, जातियवादांसाठी पण लागतो यावर सर्वांनीच थोडं चिंतन करावं. ज्योतीबा फुल्यांनीच स्त्रिशुद्रादीशुद्र असा शब्द वापरलेला आहे म्ह्णुन स्त्रि आणी अतिशुद्र अशी तुलना केली. स्त्रियांवर आणी अतिशुद्रांवर भारतात अत्याचार झालेत हे मान्य करुन. )
नितिन थत्तेशी सहमती धागा असंबद्ध होतोय. +१
नविन धागा काढायला अजुनही एकदा विचारना करावी.मला हे अन-एथिकल वाटतये.
अजुनही संपादकाने स्वत: च्या नावेने धागा काढुन सिफ़रचा प्रतिसाद तिकडे टंकवावा, परत मुळधाग्याची लिंक न देता प्रतिसादाची लिंक द्यावी असे मत नोंदवतो.
अवांतरः प्रतिसादात 'सिफ़र' हा शब्द 'मी' म्हणुन नव्हे तर एक आयडी म्हणुन वापरतोये.
बरोबर नाही
हा चर्चा प्रस्ताव वेगळा काढल्याचे पाहिल्यावर सिफरशी सहमत होण्यावाचून गत्यंतर नाही.
तो चर्चा प्रस्ताव आणि हा सुद्धा वेगळा काढल्यावर इतका विचित्र दिसतो आहे की सांगता सोय नाही.
सिफर यांनी तो (आणि मेघनाने हा) प्रतिसाद दिला तो कोणत्या कंटेक्स्टमध्ये दिला हे चर्चा प्रस्तावातून मुळीच ध्वनित होत नाही. त्याच्या खालचे वरचे प्रतिसाद दिसत नाहीत...... पक्षी या धाग्यात जो दुवा दिला आहे तो मेघनाच्या त्या प्रतिसादाकडे न नेता धाग्यावर नेतो आहे. म्हणजे वाचकाला मेघनाचा तो प्रतिसाद शोधून काढून त्याच्या वर खाली पाहून प्रतिसादाचा संदर्भ जाणून घ्यावा लागेल.
काही सदस्य तरी तिथला प्रतिसाद शोधून न काढता वेगळ्या झालेल्या धाग्यावर प्रतिसाद देऊ लागतील. आणि तसे होऊ नये म्हणून संपादकांनी घातलेला घोळ सिफर किंवा मेघनाने निस्तरावा ही अपेक्षा अयोग्य आहे.
जर धागा वेगळा करायचाच असेल तर दिलेला दुवा निदान मूळ प्रतिसादाकडे जावा.
परवानगी पेक्षाही संदर्भाचं काय?
पूर्णपणे नवीन धागा काढताना प्रस्तावक स्वत:ची मते मांडतो आणि त्यांच्या समर्थनासाठी काही दाखले/विदा देतो. या दोन्ही गोष्टींच्या आधारे प्रतिसाददाता स्वतःचं मत बनवतो. परंतु जेव्हा एखाद्या प्रतिसादला वेगळा काढून त्याचा धागा बनवला जातो तेव्हा बहुतेक वेळा त्याच्या समर्थनार्थ ना दाखले असतात ना विदा. असते ती फक्त आधीच्या चर्चेचा/प्रतिसादांचा दुवा. नव्याने धागा वचणार्याला आधीची चर्चा पूर्णपणे माहित असेल तरच त्याची लिंक लागते. उदा. हा धागा पाहिल्यावर मला सुरुवातीला काहीच कळले नाही. आणि असेही, किती लोक आधीची संपूर्ण चर्चा वाचून मग प्रतिसाद देतात (हा वादाचा (आणि विदाचाही) मुद्दा होऊ शकतो)? चर्चेपेक्षा प्रतिसादांना उपप्रतिसाद देणंही बर्याचदा घडतं. त्यामुळे संदर्भ सोडून काढल्यासारखे हे नवीन धागे दिसतात.
याबद्दल असं करता येईल. जो प्रतिसाद आणि त्याच्या उपप्रतिसादांपासून नवीन धागा बनवायचा आहे त्याची लहानशी (४-५ वाक्ये) समरी जर संपादकांनी त्या धाग्याला जोडली तर थोडाफार संदर्भही लागेल आणि चर्चाही पुढे चालवता येईल.
प्रतिसाद
अद्ययावत सारांश मार्मिक आहे. आवडला.
त्यामुळे एखाद्या विषयाचा संदर्भ पुन्हा जाऊन पाहणं वा शोधणं वा आपला रसविषय हुडकणं फारच सोईचं झाल्याचं स्मरतं. ती सोय करणारं ऐसी हे मराठीतलं पहिलंच संस्थळ असावं.
बहुदा होय आणि ते पसंतहि आहेच.
तरी एकदोन जास्तीच्या क्लिकांचं काम करून धागे वेगळे करताना हे लोक आपलीच सोय पाहत असतात. त्यात आणि लेखकाची परवानगी घ्या, मागची पार्श्वभूमी सारांशरूपात खरडा, नाहीतर स्वतःच्या नावे धागे काढा... अशी लचांडं त्यांच्यामागे लावायची म्हणजे जरा अतीच वाटतं.
काम करतात हे मान्य पण हेच तर काम आहे न?
श्रेण्यांबाबतही तेच. आपल्याच धाग्यावर श्रेण्या देण्याची सोय नसणं ही त्रुटी आहे खरी. पण मुळात श्रेण्यांची सोय हीच जिथे चंगळीची बाब आहे, तिथे...
सोय अन्योन्य आहे सबब चंगळही अन्योन्य आहे.
असो. सुधारणा करायला सांगणं ठीकच. सकारात्मक टीका इत्यादी
सहमत.
अवांतर - संपादकपदी वर्णी न लागता काही काम असल्यास काम करायाला तयार आहे.
जो चल रहा है सो ठिक है
धागा वेगळा काढणे ही ऐसीवरची खूप चांगली रिती आहे.
इथले संपादक हे प्रत्येक धागा त्याच्या शीर्षकाच्या आसपास राहावा नि नंतरही वाचनीय राहावा यासाठी प्रयत्नशील राहतात. कोण्या एका विषयावर सुरु झालेली चर्चा भरकटत कुठेही चालली तर त्या संस्थळाचे स्वरुप, प्रवाह, वाचनीयता अवरुद्ध होऊन राहते.
धागा वेगळा काढताना मूळ धाग्यावर कुठे कोणी काय काय लिहिले आहे आणि त्यातले काय काय नव्या जागी आणायचे, काय मूळ जागी ठेवायचे आणि काय दोन्ही जागी ठेवायचे हे सापेक्ष होऊ शकते. नव्या धाग्यात ते कोणत्या क्रमाने मांडायचे, ते तिथल्या तिथे सुसंगत वाटावे म्हणून त्यात काय भर घालायची , काय काढायचे हे ही सापेक्ष आहे. शिवाय संपादकांकडून इतका वेळ असण्याची अपेक्षा करणे योग्य नसावे (ते बिचारे नोकरी, घर आणि इथला त्यांचा एक आयडी म्हणून वावर हे सगळे सांभाळून हे संपादनाचे काम करत असतात). त्यामुळे सहज रित्या संपादकांना जो विषय भिन्न वा नवचर्चापोटेंट वाटतो त्याचा ते जे पटकन धागा काढतात ते योग्य आहे असे वाटते.
प्रतिसादाची जवाबदारी घेणे म्हणजे काय?
सहज काही लिहून टाकलं पण त्यामुळे होणाऱ्या चर्चेची जबाबदारी घेणार नाही असं असल्यास अभिव्यक्तीस्वातंत्र्यही संकुचित होणार.
ऋ, गुर्जि, अदिती,
जवाबदारी घेणे म्हणजे काय?
१. दिलेला प्रतिसाद बदलने / एडिट करणे ? : नविन धागा प्रतिसाद कर्त्याच्या नावाने सुरु केल्यास ती शक्यता नाकारता येत नाही.
२. चर्चेत दिलेला प्रतिसाद न बदलता त्याच्या खाली नवीन प्रतिसादात सष्टीकरण देउन, समर्थन करुन,कधीकाळी माफी मागुन चर्चेला योग्य व अपेक्षित वळण देणे?
माझ्या मते दुसरा पर्याय जास्त योग्य आहे.
सि़फ़रने मुळ प्रतिसाद अजुनही बदललेला नाहीये, बदलणार नाही.
फालतू चर्चा
काय मेली फालतू चर्चा लावलीए! एखादा धागा आपल्या नावाने निघाला किंवा एखादा धागा असंबंद्ध/ कळायला कठिण/ असंदर्भ वगैरे निघाला तर काय एव्हढं मोठं आभाळ कोसळतंय कोणास ठावूक.
च्यायला, इथून पुढे बिनधास्त वेगळ्या काढलेल्या चर्चा माझ्या नावाने काढा, आपल्याला काय फरक नाही पडत. उलट माझ्या नावे धागे वाढतील.
>>अशी सोय करताना संपादक
>>अशी सोय करताना संपादक त्यांच्या हक्कांचा गैरवापर करताहेत वा कसली जबाबदारी टाळताहेत असं मला वाटलं नाही, वाटतही नाही. किंबहुना आपण या मंडळींना 'संपादक' असं खवचटपणे (ह.घ्या.) संबोधत असलो, तरी ही मंडळी असतात आपल्याचपैकी, आपल्याचसारखी हौशी वाचक. त्यांना या कामाचे कसलंही मानधन मिळत नाही. तरी एकदोन जास्तीच्या क्लिकांचं काम करून धागे वेगळे करताना हे लोक आपलीच सोय पाहत असतात.
झालं पूर्ण वर्तुळ..... :(
या संदर्भात एक जुन्या
या संदर्भात एक जुन्या चर्चेतला एक अतिरोचक प्रतिसाद सापडला.
सहमत.प्रस्तावना देता आली तर
सहमत.
प्रस्तावना देता आली तर जरूर द्यावी, मात्र धागेच वेगळे करू नयेत हे मत तेव्हाही पटले नव्हते, आताही नाही.
शिवाय स्वतः मॉडरेटर झाल्यावर प्रत्येकवेळी अशी प्रस्तावना देण्याइतका वेळ मॉडरेटरला मिळेलच असे नाही हे स्वतः अनुभवले. त्या दृष्टीने थोडा मतात बदलही झाला आहेच.
समांतरः दुसरे असे की त्यावेळी उपक्रमावर लेखन प्रकाशित झाल्यावर त्यात बदल करणे शक्य होते का ते आठवत नाहीये, तसे नसल्यास लेखक प्रस्तावना मांडु शकत नाही त्यामुळे ते काम संपादकांवर येते. लेखन बदल करू शकत असेल तर अर्थातच अवांतर गैरलागु
काही उपाय
लांबलचक प्रतिसाद लिहिताना थोडी काळजी घेणं एरवीही आवश्यक असतं असं सुचवेन. एखादवेळी नेटवर्क हळू होतं, टाइमआउट येतात, वीज जाते, साइट आडवी होते असं काहीही होतं.
Lazarus किंवा फायरफॉक्ससह उपलब्ध असणारी इतर काही एक्स्टेंशन्स फॉर्म आणि टेक्स्ट एरिआमधला डेटा रिकव्हर करण्यासाठी उपयोगी पडतात. अधिक माहिती.
तरीही गोंधळ झाला तर एक उपाय चालू शकतो - ब्राउझरमध्ये फॉर्म सबमिट केल्यावर एरर आली, तर एक पान मागे जाऊन पाहा. त्यात डेटासह भरलेला फॉर्म अनेकदा दिसतो.
सोपा उपाय
प्रतिसाद लिहून झाला की फॉर्म सबमिट करायच्या आधी control + A आणि मग लगेच control + C या कीज दाबल्या की सर्व मजकूर क्लिपबोर्डवर जमा होतो. समजा फायरफॉक्स बंद करून परत चालू करावा लागला, तरी तो मजकूर उपलब्ध होतो. मुख्य म्हणजे ही पद्धत सर्व ब्राउझरमध्ये चालते.
ऐसीच्या द्रुपल आशय व्यवस्थापन प्रणालीत सुधारणेस वाव ?
हे करतोच आहे, क्वचीत सुटून जातं. चिंतातुर यांनी सांगितलेले उपाय सुद्धा करून पाहीन. ऋषिकेश यांनी धागा चांगल्याच उद्देशानी वेगळा काढला म्हणून त्या बद्दल तक्रार नाही. पण एखादे लेखन अनवधानाने सुटलेच तर पुन्हा जसेच्या तसे लिहिणे प्रत्येक वेळी जमतेच असे नाही; माझा रोख तांत्रीक बाबीकडे आहे. विकि आशय व्यवस्थापन प्रणालीत कोणताही संपादक लेखाचे स्थानांतरण करू शकतो, पण एडीट कॉन्फ्लीक्टचा अनुभव येत नाही; पण दोन संपादक एकाच वेळी संपादनासाठी खिडकी उघडत असतील आणि संपादनासाठी खिडकी नंतर उघडलेल्याने पहिल्याच्या आधी सेव्ह केले तर पहिल्या खिडकी उघडणार्याला एडीट कॉन्फ्लीक्टचा अनुभव येतो एकाजणाचे संपादन सेव्ह होत नाही हे खरे पण संपादन पूर्ण उडत नाही विकि आशय व्यवस्थापन तुमचे एडीट कॉन्फ्लिक्ट या शीर्षकानेच तुमचा जतन न झालेला मजकुर तुम्हाला पुन्हा दर्शवते. तो कॉपी पेस्ट करून पुन्हा वापरता येतो.
सरावलेले लोक control + A आणि मग लगेच control + C करणारच पण प्रश्न न सरावलेल्या नवागतांचा असतो. सेव्ह बटन दाबल्या नंतर आंतरजाल चालू असेल तर मजकुर संदेश सर्वरला जातच असणार तो जर सेव्ह करणे शक्य नसेल तर सर्वरने तो लेखकापाशी पुन्हा प्राप्त करून देणे तांत्रीक दृष्ट्या शक्य व्हावयास हवे, म्हणजे विकि आशय व्यवस्थापन तरी तसे करताना दिसते. म्हणून द्रुपल आशय व्यवस्थापन प्रणालीत सुधारणेस वाव असावा असा अंदाज आहे. चु.भू.दे.घे.
विकीमध्ये काय प्रकार आहे ते
विकीमध्ये काय प्रकार आहे ते मला माहीत नाही, पण ड्रूपलमध्ये प्रत्येक नोडचे एडिटींग झाले की नवीन व्हर्जन आपोआप करता येते. कंटेंट टाईपच्या कॉन्फिगरेशनमध्ये तशी सोय आहे. याचा फायदा म्हणजे २ किंवा अधिक लोक एकाच वेळी एकाच नोडवर काम करत असतील, तरीही त्यांना काही त्रास होणार नाही. पण प्रत्येक वेळी सेव्ह करताना आपोआप नवीन व्हर्जन(called revision) तयार व्हावे, अशी सोय डिफॉल्टमध्ये बंद असते, ती मुद्दाम चालू करावी लागते. याचे कारण म्हणजे ड्रूपलमध्ये प्रत्येक लहानसहान बदल ट्रॅक केला जावा अशी गरज कमी वेळा जाणवते आणि एकदा नोड तयार झाले की त्याचे एडिटिंग होण्याची शक्यता कमी असते (तेपण multiple users कडून एकाच वेळी, हे अजूनच कमी). पण तरीही एखाद्याला ही सोय अत्यावश्यक वाटत असेल, तर जावास्क्रिप्ट/Ajax वगैरे वापरून + ड्रूपलमध्ये डिफ मोड्यूलसुद्धा उपलब्ध आहे, त्याचा वापर करता येईल.
माझ्या मते control+A आणि control+C हा सुटसुटीत, सरळसाधा उपाय आहे. एकदा सवय झाली की आंतरजालावर कुठेही वापरता येतो.
परमिशन घ्यावी.
परमिशन घ्यावी.