भाषा

पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः

Taxonomy upgrade extras: 

अवयावांना अंग असा उल्लेख येतो. बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भागास अंक म्हणतात. ( संदर्भ). पंखड़ी असा शब्द हिंदीत फुलाच्या पाकळी साठी वापरला जातो पंकज हा शब्द विशीष्ट फुलासाठी वापरला जातो. पंकज हे फुल चिखलात/दलदलीत उगवत म्हणून पंक म्हणजे चिखल अथवा दलदल अशास्वरूपाची व्युत्पत्ती वाचण्यात येते पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.

झक मारणे: झक, झक्कू आणि झकास

Taxonomy upgrade extras: 

व्यवस्थापकः या धाग्यावरील मुळ विषयाशी समांतर चर्चा विस्तारत चालल्याने, तिला अधिक वाव मिळावा व संदर्भ म्हणून शोधणे भविष्यात सुलभ जावे म्हणून येथील पुढिल प्रतिसादाचे रुपांतर नव्या चर्चा प्रस्तावात करत आहोत.

======

उद्गम कथा

Taxonomy upgrade extras: 

मूळ शब्दसमूहाचा खरा अर्थ मागे पडून त्याला वेगळाच अर्थ प्राप्त होणं काही नवीन नाही. त्यामुळे 'झक मारणे' हा निरागस वाक्यप्रकार आपण संतापल्यावर वापरतो वगैरे. अशा कोणकोणत्या वाक्यप्रचारांच्या अर्थ तोच राहिलेल्या/पूर्णपणे बदललेल्या वाक्यप्रचारांचा उगम कुठे झाला आहे याचा शोध घेण्यासाठी हा प्रपंच.

माझ्या लहानपणी एक पुस्तक घरी होतं-उद्गम कथा नावाचं. पुस्तकाची मुख्य-मलपृष्ठं गायब झाली होती आणि पानेही जीर्ण झाली होती. यथावकाश ते पुस्तक कुणीतरी मागून नेलं आणि हरवलं. त्या पुस्तकात वाचलेल्या काही व्युत्पती:-

मजेशीर नावे

खूप वेळा आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला फार विचित्र नाव असणारे लोक भेटतात.
उदाहरणार्थः मला परवाच एक मुलगी भेटली. तिचा नाव होत 'झेन्डा'. मला फारच मजा वाटली ते ऐकुन.
तुम्हाला भेटली आहेत का अशी काही माणसे? जर भेटली असतील तर पटापट आपले अनुभव सान्गा.
(माझे मराठी मधुन पहिलेच लिखाण आहे. चु भु द्या घ्या )

Taxonomy upgrade extras: 

मा-भ-भे... अर्थात - शिव्या!

Taxonomy upgrade extras: 

शिव्या हा भाषेचा एक भलताच आकर्षक भाग आहे याबद्दल(तरी) वाद नसावा.

माझा शिव्यांकडे बघण्याचा नजरिया कायम बदलता होता-आहे. भीती-आकर्षण-अप्रूप-स्त्रीवादामुळे तिरस्कार-विरोध-आकर्षण-भाषिक आकर्षण-सररास वापर-संयमित वापर... अशा अनेक निरनिराळ्या अवस्था पार करून झाल्या. आता त्या शब्दांबद्दल काहीही वाटत असलं, तरी जे वाटतं ते रोगट नसल्याची माझी खातरी झालीय.

ही शिव्यांबद्दलची काही निरीक्षणं:

भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते?

Taxonomy upgrade extras: 

भारतात किती टक्के लोकांना हिंदी येते? मला किती टक्के लोकांची प्रथमभाषा हिंदी आहे हे नको आहे (हे साधारण ४० टक्क्यांच्या आसपास असल्याचे वाचले आहे - सर्वसाधारणपणे ज्याला हिंदी पट्टा म्हटले जाते तो). असा भाग सोडूनही हिंदी येणारेही बरेच जण असावेत असे वाटते, उदा. महाराष्ट्रातले बहुतांश लोक, गुजरात, प. बंगालमधील काही लोक, दाक्षिणात्य राज्यांतीलही काही लोक वगैरे. हे सगळे पकडून हिंदी येणारे किती जण असतील? अनेकदा हिंदीविरोधी मतांमध्ये 'हिंदी फक्त ४०% लोकांना येते, बाकी ६०% लोकांना हिंदी येत नाही' छाप विधाने असतात, पण हिंदी येणारे बरेच जास्त असतील असे वाटते.

सरसकटीकरण

Taxonomy upgrade extras: 

या धाग्यावर ऋषिकेषचा हा प्रतिसाद आहे. ज्यांना ह्या धाग्याच्या विषयाचे स्वरुप पाहता आवश्यक वाटते त्यांनी जरुर तो धागा वाचावा नि मग हा वाचावा.

आता खालिल उतारा (पून्हा?) वाचा -

माझी बायको जपानमध्ये होती तेव्हा तिने केलेले निरिक्षण मांडतो आहे. ते प्रातिनिधिक आहे किंवा कसे याची कल्पना नाही, परंतु धक्कादायक जरूर आहे:

भाषा मरणं कितपत गंभीर असतं?

Taxonomy upgrade extras: 

एक भाषा मरते, तेव्हा ती आपल्यासोबत बरंच काही घेऊन मरत असते. भाषा म्हणजे काही फक्त एक साधन (tool) नव्हे. ते हळूहळू व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक अंगच होत जातं. भाषेसोबत तिचं सांस्कृतिक (साहित्य, समाज, खाद्यपरंपरा, धर्म आणि दैवतं, इतिहास) संचितही तिच्यात सामावलेलं असतं. एक वस्तू अस्तंगत झाली, म्हणून तिच्यासाठी असलेली संज्ञा हळूहळू नाहीशी होत जाते (उदा. घंगाळ) हे जितकं खरं आहे, तितकंच संज्ञाच लोप पावल्यामुळे संकल्पनेला अभिव्यक्ती मिळायचं बंद होतं आणि ती यथावकाश मरून जाते (उदाहरण आठवत नाहीय. आठवलं की टंकीन. तोवर जाणकारांना आमंत्रण) हेही खरं आहे.

मराठी साहित्य आणि चांगले लेखन कशाला म्हणाव?

Taxonomy upgrade extras: 

मराठी मध्ये लिहताना मला कायम एक प्रश्न पडतो बर्याच वेळेस जुन्या प्रस्थापित लेखकांनी जे लेखनाचे मापदंड तयार केलेले असतात त्यांना अनुसरून लिहील तर लोकांना ते लिखाण आवडत. नेमाडें, ढसाळ , भाऊ पाध्ये इत्यादी लेखकांनी त्या कोशातून बाहेर यायला मदत केली. अस असाल तरीदेखील काही प्रमाणात समीक्षेची मापदंड वेगळी असतात.नक्की कोणत्या आधारावर लेखन चांगल आहे किंवा नाही हे ठरवलं जात?चांगल्या लेखनाचे निकष काय? अतिशय बाळबोध पद्धतीने लिहिलेलं चांगले अनुभव हेच चांगल लेखन आहे का? मराठी मध्ये सुर्रेअल लेखन कुणी केल आहे का?(हारूकी मुराकामी सारख)मराठी साहित्य आहे त्या ठिकाणी बसकण मारून आखडून गेल आहे का?

रॅण्डम आणि आर्बिट्ररी ह्या संकल्पना

Taxonomy upgrade extras: 

विज्ञानविषयक लेखनात तसेच संख्याशास्त्रीय चाचण्यांसंदर्भात रॅण्डम ही संज्ञा वापरलेली आढळते. ह्या संज्ञेचा अर्थ काय आहे आणि तो विविध संदर्भांनुसार बदलतो का अशी शंका मनात आहे. ह्या संज्ञेचा मराठी पर्याय म्हणून यादृच्छिक, वाटेल तसे, कोणतेही, अनियत, आकस्मिक, स्वैर, इतस्ततः, संधानविरहित, क्रमरहित असे पर्याय महाराष्ट्र शासनाच्या भाषासंचालनालयाने प्रकाशित केलेल्या पारिभाषिक शब्दसंग्रहांत दिलेले आहेत.
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd_...
http://marathibhasha.com/kosh-words/search?term=random&field_pratishabd_...

पाने

Subscribe to RSS - भाषा