भाषा मरणं कितपत गंभीर असतं?
एक भाषा मरते, तेव्हा ती आपल्यासोबत बरंच काही घेऊन मरत असते. भाषा म्हणजे काही फक्त एक साधन (tool) नव्हे. ते हळूहळू व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक अंगच होत जातं. भाषेसोबत तिचं सांस्कृतिक (साहित्य, समाज, खाद्यपरंपरा, धर्म आणि दैवतं, इतिहास) संचितही तिच्यात सामावलेलं असतं. एक वस्तू अस्तंगत झाली, म्हणून तिच्यासाठी असलेली संज्ञा हळूहळू नाहीशी होत जाते (उदा. घंगाळ) हे जितकं खरं आहे, तितकंच संज्ञाच लोप पावल्यामुळे संकल्पनेला अभिव्यक्ती मिळायचं बंद होतं आणि ती यथावकाश मरून जाते (उदाहरण आठवत नाहीय. आठवलं की टंकीन. तोवर जाणकारांना आमंत्रण) हेही खरं आहे. भाषेच्या खच्चीकरणासोबत व्यक्ती हे संचित गमावून बसतात, त्याची काहीच किंमत नाही काय? गुर्जींनी दिलेलं एक उदाहरणः मला मराठीसोबत तुकारामही आपोआप-सहजगत्या मिळतो (उदा. त्यानं भाषेला दिलेले अनेक वाक्प्रचार वा म्हणी). पण जर माझ्या पोराबाळांना मराठी शिकण्यासाठी उपलब्धच नसेल (कारणं काहीही असोत. तो स्वतंत्र विषय आहे.), त्यांना इंग्रजी शिकावी लागत असेल; तर त्यांना शेक्सपिअर नाही मिळत. या मधल्या दरीचं काय? ती माणसाचं किती नुकसान करत असेल? हे भीषण नाहीय का?
याच विषयावरचं एक रोचक पोस्टः भाषा
मनोबा म्हणे:
आफ्रिका खंडात काही ठीकाणी युरोपीय मूळ असलेल्या भाषा प्रथम भाषा झाल्यासारखी स्थिती आहे.
"अरे बापरे हे किती वाईट आहे." किम्वा "कसं होइल अशानं" किम्वा "काय वाटत असेल त्यांना स्वतःबद्दल" ह्या स्टाइलचे उद्गार मेघनाचे होते.
ह्यातल्या "काय वाटत असेल त्यांना स्वतःबद्दल" ह्या क्लॉजबद्दल मला काही सांगायचं होतं.
खरं तर स्वतःबद्दल काहीही विचित्र नॉर्मल माणसाला वाटणार नाही. अमुक एक स्थित्यंतर झालं नसतं; तर आपण वेगळे असलो असतो; असं वाटू शकतं.
पण आपण आहोत ते फार विचित्र आहोत; असं कुणाला वाटत नाही.
स्थित्यंतर, transition होतानाची पिढी तेवढी काय तो त्रास छळते; नंतर स्मृती क्षीण व बर्याच प्रमाणात निरर्थक ठरत जातात हा राजेश व बिका ह्यांचा सूर पटला.
उदाहरणासाठी पाच सात किम्वा अधिक पिढ्यांपूर्वी मुस्लिम झालेल्या लोकांना काय वाटत असेल ह्याचा अंदाज व उदाहरणे बोललो.
स्थित्यंतराच्या वेदनेबद्दल कराची- लाहोर विरुद्ध काश्मीर अशी उदाहरणं मी दिली.
किम्वा खुद्द आपण सध्या आहोत, ते आपल्याला काही विचित्र वाटतं का ?
कुठली तरी काही स्थित्य्म्तरं काही पिढ्यांपूर्वी झाली म्हणूनच आपण इथवर पोचलो ना ?
आप्ण किती सर्रास इंग्लिश वापरतो, तेही अगदि नकळतपणे; ह्याबद्दल काही विचित्र वाततय का ?
मूळ मराठी/प्राकृत म्हणवली जाणारी भाषा नंतर इस्लामी राजांच्या कारकिर्दीत फार म्हणजे फारच नवीन लहेजा घेउन आलेली दिसते.
आपण जी वापरतो, ती बव्हंशी अशी फारसी- अरबी मिश्रित आहे. ह्याबद्दल कुठे काय आपल्याला विचित्र वाटतं ?
(मला शालेय व महाविद्यालयीन ते फार विचित्र वाटे. आपल्या भाशेवर अत्याचार झालेत अशी जाणीव होइ. बहुतांशाना तसे कधीच वाट्त नाही, असा अंदाज आहे. )
चर्चा इतकी रंगात असतानाही मला निघावं लागलं. मी गंतव्य स्थानी पोचल्यावर तिथूनच कॉल लावून माझा उरलेला मुद्दा पूर्ण केला.
त्यावर राजेश व मेघना ह्यांना बरच काही म्हणायचं असावं असं दिसलं. पण मी तोवर डेस्कपर्यंत पोचलो असल्या कारणानं फोन ठेवून कामाला लागणं भाग होतं.
त्यांचे मुद्दे ऐकून न घेताच कॉल संपवला.
विरोधी पार्टीचा मुद्दा थोडक्यात:
अमुक एका समाजाची भाषा जेत्यांनी पद्धतशीरपणे संपवली / मारली / खच्ची केली (किंवा सत्तासंपादनाच्या कालक्रमात संपली / मेली / खच्ची झाली), तर त्यात एवढे गळे काढण्यासारखं काय आहे? एक भाषा गेली, तरी दुसरी येतेच. मुदलात संवाद साधणं वगळता भाषेचं प्रयोजन काय आहे? तो तर साधला जातोच. मग मेली भाषा, तर मेली. त्याचा त्रास फक्त एका पिढीला होतो. संक्रमणाचा काळ दु:खदायक असतो. मान्य. पण नंतरच्या पिढ्यांना असल्या गतकालीन दु:खाचे कढ काढण्याचं काहीच प्रयोजन असत नाही...
तर - भाषा मरणं कितपत गंभीर असतं?
काही चाचपडती उत्तरं
भाषा मृतवत् होणं याची नेमकी व्याख्या काय इथपासूनच सगळे प्रश्न आहेतच.
पण एकंदरीत "आपली भाषा मेली तर काय !" याची चर्चा जर का आपण अशा भाषेच्या संदर्भात करत असू, की जी भाषा बोलणारे ११ कोटी लोक आहेत, तर मग ती भाषेच्या मृत्यूबद्दल (बहुदा) नसून भाषेच्या ओसरत गेलेल्या महत्त्वाबद्दल असली पाहिजे. एखादी व्यक्ती मरणासन्न असण्याबद्दलची भावना ही, ती व्यक्ती "आता महत्त्वाची राहिलेली नाही" या जातीच्या भावनेपेक्षा वेगळी असली पाहिजे.
भाषा मरणं कितपत वाईट ? हे बहुदा थोडंसं सांस्कृतिक वारसा असणार्या गोष्टी नाहीशा होण्याच्या दु:खासारखं असलं पाहिजे. जुन्या ऐतिहासिक वास्तू, कागदपत्रं , दस्तावेज या सार्यांचं महत्त्व इतिहासकारांपुरतं मर्यादित रहाताना आपण पहातो. त्याची क्वचित् चेष्टा केली जाते, बहुतांश शहाणी माणसं त्याचा आदर करतात. पण या वास्तू किंवा कागदपत्रांच्या - आणि त्याबद्दलच्या इतिहासाच्या - नाहीश्या होण्याचं सोयरसुतक असताना आपल्याला दिसत नाही. ही भाषा "आपण बोलत नव्हतो." त्यामुळे ती कालौघात वाहून जाण्याच्या घटनेकडे त्रयस्थपणे आपण पहातो.
थोडक्यात, "आपली भाषा मेली" या जातीचं दु:ख आफ्रिकेतल्या एखाद्या ट्राईबमधल्या माणसाला असू शकतं. कदाचित अशा स्वरूपाचा शोक तो माणूस व्यक्त करू शकण्याइतपतची उसंत मिळेल की नाही किंवा तेव्हढी चैन परवडू शकेल की नाही याची शंका वाटते.
ज्या न्यायाने एखादा आदिवासी माणूस आपल्या भाषेला मरताना साक्षीभूत होईल त्या न्यायाने तुम्हीआम्ही मराठी भाषक होऊ काय ? माझ्या मते नाही. त्यामुळे अशा गोष्टीच्या परिस्थितीबद्दल बहुदा आपण आडाखे बांधू शकू इतपतच.
सध्या इथे थांबतो, जसे जमेल तसे लिहीन म्हणतो.
अहो ही भाषा नावाची गोष्ट मरत
अहो ही भाषा नावाची गोष्ट मरत नाही, ती कायम ट्रान्सफॉर्म होत असते. उत्क्रांत म्हणा हवे तर...
जसे उत्क्रांतीत काही कालावधीनंतर पुर्वज आणि वंशज यात प्रचंड फरक पडतो, तसेच भाषेचेही आहे. (e.g.प्राकृत आणि आजची मराठी)
इथेही नॅचरल सिलेक्शनचा नियम अवलंबला जातो ,चांगल्या लवचिक गोष्टी ,शब्द टीकतात, आत्मसात केल्या /केले जातात..सांप्रत काळी इंग्रजी शब्द सामावून घेणे हे सर्व्हाव्हल मेकॅनिझम आहे ,त्यामुळे इंग्रजी एकार्थी मराठीला जिवंत ठेवत आहे ,परंतु त्याची किंमत चूकवावी लागत आहे...
अर्थात भाषेकडे उत्क्रांत होइल इतके मटेरीयल असावे लागते ,शब्दभांडर,वापरकर्ते(users) ,भौगोलिक वितरण (geographical distribution)...मला वाटते मराठी उत्क्रांत होईल.
?
मला मराठीसोबत तुकारामही आपोआप-सहजगत्या मिळतो (उदा. त्यानं भाषेला दिलेले अनेक वाक्प्रचार वा म्हणी). पण जर माझ्या पोराबाळांना मराठी शिकण्यासाठी उपलब्धच नसेल (कारणं काहीही असोत. तो स्वतंत्र विषय आहे.), त्यांना इंग्रजी शिकावी लागत असेल; तर त्यांना शेक्सपिअर नाही मिळत.
कळलं नाही. इंग्रजीतले कितीतरी वाक्प्रचार शेक्सपिअरमधून आलेले आहेत ('brave new word', 'slings and arrows', '--by any other name would smell as sweet', 'et tu Brute?', 'much ado about nothing' इत्यादि इत्यादि).
एकूणच चर्चाविषय कळला/झेपला
एकूणच चर्चाविषय कळला/झेपला नाही. तरी थोडंसं प्रकट चिंतन:
हे सगळं किती गंभीर? माझ्या मते फारसे नाही. माझ्या मुलांना मराठी (किंवा मला समजणारी भाषा ) फारशी न आल्याने "अॅज सच भाषेचे" नुकसान काय? हे समजत नाही. मला वाईट वाटेल वगैरे मान्य, पण आपल्या परीने आपल्या आवडत्या भाषेचा पुरेपूर वापर करत, त्यात शक्य असल्यास योगदान देण्याचा प्रयत्न करून, कालाय तस्मै नमः म्हणून हे सोडूनच दिले पाहिजे असे वाटते. कित्येक भाषा येतात नी जातात, भाषा एक संवादाचं माध्यम आहे आणि त्याला तितकेच महत्त्व असावे असे वाटते. भाषा बदलल्याने विचार व्यक्त करायच्या पद्धती बदलतात, शिष्टाचार बदलतात, मात्र मोठ्या प्रमाणात विचार मरतात/बदलतात असे वाटत नाही.
====
भाषेचा दैनंदिन वापर कमी होत जाण्याला भाषा मरते म्हणावं की त्यात सकस साहित्यनिर्मिती न होण्याला? हा प्रश्न मला पडतो. पहिल्या अर्थाने भाषा मरायला बराच मोठा काळ जावा लागतो, तर दुसर्या अर्थाने भारतीय भाषासुद्धा अजून फारतर १०० वर्षे जगतील असे सध्या जितकी मुले स्थानिक भाषेच्या माध्यमांत शिकत आहेत त्यावरून वाटते. (म्हणजे लेखकांची संख्याच नाही तर वाचकांची संख्या रोडावणार आहे, त्याने वितरणाची गणिते बोंबलली की कितीही दर्जेदार लेखक असला तरी त्याचे स्थानिक भाषेतले पुस्तके/साहित्य बाहेर येणे अवघड होत जाईल).
साहित्य कमी प्रसवले तरी भाषा 'बोलीभाषा' म्हणून अधिक दीर्घकाळ टिकते. मराठीची स्थिती बरीच बरी आहे, इतर काही भाषिकांना त्या भाषांची लेखी रुपात प्राथमिक ओळख कशीबशी आहे, साहित्य वगैरे बरेच दूर राहिले.
शब्द-संस्कृती.
भाषा मरणे म्हणजे काय ते ठाऊक नाही. मुक्तसुनीत यांच्याप्रमाणेच वाटते.
आफ्रिकेतील किंवा भारतातील टोळ्यांच्या भाषा मेल्या असतील हे खरे आहे. मराठी मरणे हे त्या भाषांच्या मरणासारखे असणार नाही.
मराठी भाषा मरते आहे म्हणून घंगाळ मरत आहे का? की घंगाळ मेलं आहे म्हणून मराठीत आता तो शब्द वापरात नाही? रहाटगाडगं मेल्यावर तो शब्द वापरातून जाणारच. तो एक सांस्कृतिक वाक्प्रचार म्हणून सतत चालणार्या रूटीन गोष्टींना लागू राहील. मराठी ट्रान्स्फॉर्म झाल्यावर रहाटगाडगे हा शब्द राहील किंवा जाईल.
घंगाळ हा शब्द आजच्या भाषेत नाही तसा मोबाइल हा शब्द कालच्या भाषेत नव्हता..... व्हॉट से ?
चष्मा
भाषा मरणं कितपत गंभीर असतं?
आपापल्या चष्म्यावर अवलंबून आहे.
भाषावैविध्य वगैरेसाठी प्रयत्न करणार्या युनो अंतर्गत येणार्या संस्था , इतिहासाभ्यासक वगैरेंचं मत वेगळं राहणार.
आम आदमीचा वापर व वकूब तुलनेनं मर्यादित असल्यानं त्याचं मत वेगळं राहणार.