राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
१५ डिसेंबर
जन्मदिवस : वास्तुरचनाकार ग्युस्ताव्ह आयफेल (१८३२), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ हेन्री बेक्वेरेल (१८५२), संशोधक व लेखिका इरावती कर्वे (१९०५), माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन (१९३२), फुटबॉलपटू बाइचुंग भुतिया (१९७६)
मृत्यूदिवस : चित्रकार योहान व्हरमीर (१६७५), गिटारवादक फ्रान्सिस्को टारेगा (१९०९), स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल (१९५०), अभिनेता चार्ल्स लॉटन (१९६२), अॅनिमेशनपट निर्माता वॉल्ट डिस्नी (१९६६)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन :
१७९१ : अमेरिकेच्या संविधानाची पहिली १० कलमे संमत झाली. त्या निमित्ताने हा दिवस 'बिल ऑफ राइट्स' दिवस म्हणून साजरा केला जातो.
१९११ : 'नवी दिल्ली'चा पायाभरणी समारंभ राजा पंचम जॉर्ज ह्याच्या हस्ते झाला.
१९६१ : नाझी क्रूरकर्मा अडॉल्फ आईकमनला पंधरा आरोपांखाली मृत्युदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे वगैरेची गणना.
१९९३ : ब्रिटन आणि आयर्लंडदरम्यान शांतता करार संमत झाला.
१९९४ : नेटस्केप नॅव्हिगेटर ह्या इंटरनेट ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित.
२००० : चेर्नोबिलची अणुभट्टी अखेर कायमस्वरूपी बंद.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- गवि