मराठी शब्द सुचवा (विषय : प्रताधिकार)

जिथे सध्या काही शब्द वापरात आहेत ते कंसात दिले आहेत. आधीक चांगला चपखल शब्द सुचवणे अथवा सध्याच्या शब्दाबद्दलच सहमती/दुजोरा देणे यात सहकार्य हवे आहे. उदाहरणार्थ वापरातील वाक्ये दिली आहेत. पुर्ण वाक्याचा अनुवादही सुचवल्यास हवा आहेच.

* Attribution पर्याय रोपण, श्रेय
* Share Alike जसेहोते वापरातसेच
* endorse पाठींबा
* licensor
* licensee

: वाक्यात उपयोग उदाहरण
:This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.

:You must attribute the work in the manner specified by the author or licensor (but not in any way that suggests that they endorse you or your use of the work)

* relinquish त्याग
* affidavit प्रतिज्ञापत्र

*I do relinquish to the extent specified in enclosed affidavit my rights in the work described in the said affidavit

* to share सामायिक करा
* to copy नक्कल
* distribute वितरण
* transmit the work पारेषित करण्यास
* to share – to copy, distribute and transmit the work सामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास

to remix - पुर्नमिश्रीत करण्यास
* to adapt the work काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास

* (विथ) solemnly affirmaition (आय/वुई) state that
* Cinematograph सिनेमॅटोग्राफी
* Sound Recording ध्वनी मुद्रण
* public domain सार्वजनिक अधिक्षेत्र
* Public notice

* खालील वाक्यात सुधारना सुचवून हवी आहे

* "मी , या (छाया/चित्र) कृतीचा कॉपीराईट धारक (निर्माता आणि मालक) असून, या सुचने द्वारे निम्नलिखीत परवान्यात नमुद केल्या प्रमाणे प्रताधिकार-त्याग प्रकाशित करत आहे":

बरेच शब्द मी करण्यास अवघड आहेत असे नाही परंतु आपण सुयोग्य शब्द निवडतो आहोत का याच्या खात्री सोबतच, सामुहीक चर्चेमुळे अनुवादास समकालीनता आणि स्विकार्यता वाढेल हा एक हेतु आहे. पारिभाषिक अनुवाद करताना अवजडपणा टळण्यासही मदत होईल असे वाटते. येत्या काळात अजूनही शब्द/वाक्ये या धाग्याच्या माध्यमातून चर्चेस घेण्याचा मानस आहे.

या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. आपल्या सहभागासाठी धन्यवाद

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

* भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ कोर्ट केसेस मध्ये बर्‍याचदा नमुद केलेल दिसते, पण प्रत्यक्षात बचाव पक्षास व्यवस्थीत बचाव होऊ शकलेल्या केसेसची संख्या वस्तुतः कमीच असावी (माझा व्यक्तीगत अंदाजा चुभूदेघे).
एसएमएसने खेळांचे रिझल्ट कळवणे, फाँटचे टाईप फेस इत्यादी बद्दल कॉपीराईट लागू होतो अथवा नाही अशा बाबींबद्दल कलम १६ अन्वये कॉपीराईट बोर्डापुढे अथवा न्यायालयात युक्तीवाद केले जाताना दिसतात.

या कलमा खाली क्रिकेट कॉमेंट्री संदर्भाने स्टार इंडीया आणि BCCI असलेली दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल (30 August, 2013) दिलेली क्रिकेटच्या प्रत्येक बॉल सोबत कायद्याचा अंदाज देणारी एक रोचक केस वाचण्यात आली. मी ती http://indiankanoon.org/doc/66104323/ या दुव्यावर वाचली (बहुधा सुप्रीम कोर्टापुढे पुढील सुनावणीसाठी प्रलंबीत आहे तरीही तुर्तास दिल्ली हायकोर्टाचा निर्णय वाचण्या जोगा वाटतो). (दुवे स्वसंपादनाने बदलले) दिल्ली उच्चन्यायालयाच्या संस्थळावरही उपलब्ध असण्याची शक्यता आहे. (पुढे सर्वोच्च न्यायालयात गेली कि नाही या बद्दल कल्पना नाही, Copyright act section 16 असा शोध http://indiankanoon.org वर घेतल्यास अजूनही काही केसेस वाचण्यास मिळू शकतात)

अशा या कलम १६चा मराठी अनुवाद करण्यास खाली घेतला आहे. मला या अनुवादात आणि पंक्च्युएशन संदर्भाने उपयूक्त सुधारणा सुचवून हव्या आहेत.

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ चा इंग्रजी मसुदा

* No copyright except as provided in this Act No person shall be entitled to copyright or any similar right in any work, whether published or unpublished, otherwise than under and in accordance with the provisions of this Act or of any other law for the time being in force, but nothing in this section shall be construed as abrogating any right or jurisdiction to restrain a breach of trust or confidence.

* माझा अनुवाद प्रयत्न

(भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त प्रताधिकार नाही; (भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यातील अथवा, त्या त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यातील नमुद तरतुदींचे व्यतरीक्त, इतर कोणत्याही प्रकाशित अथवा अप्रकाशित (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कामात (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कुणीही व्यक्ती प्रताधिकार किंवा कोणतेही समकक्ष अधिकारास (हक्कास) पात्र असणार नाही; परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट, न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी कोणतेही अधिकार अथवा क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction), रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.

* अनुवादात सध्यावापरलेल्या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा,

** copyright प्रताधिकार
** except as provided in this Act कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त
** entitled हक्कास पात्र
** for the time being in force त्या त्या काळी अंमलात असलेल्या
** nothing in this section shall be construed as abrogating या कलमातील कोणतीही गोष्ट......रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
** to restrain a breach of trust or confidence न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी
** any right or jurisdiction क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction)
** similar right समकक्ष अधिकार

** काही पारिभाषिक शब्दार्थ संदर्भ :http://www.marathibhasha.org/ येथून

* उत्तर दायकत्वास नकार : उपरोक्त कलम अथवा अनुवाद किंवा केस संबंधी उल्लेखांच्या अचुकते बाबत मी अथवा या धाग्यावर प्रतिसाद देणारी कोणतीही व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेत नाही. मी किंवा इतर कुणीही कायदे विषयक सल्ला देत नाही. दुसरे तर कायदे नियम आणि न्यायिक निकाल सातत्याने उत्क्रांत होत असतात अशा कोणत्याही महत्वपुर्ण बदलांची आम्हास कल्पना नसण्याची शक्यता आहे, म्हणून कायदे विषयक सल्ल्याची जरूरी असणार्‍यांनी परवानाधारी ज्ञानवंत सल्लागारांचा सल्ला घेणे अधिक उचित असते.

* हा धागा विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
* अनुवाद सुधारणा आणि शब्द सुचवणीसाठी आणि चर्चा सहभागासाठी धन्यवाद
* अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद

** (स्वसंपादीत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

* खालील वाक्यात सुधारना सुचवून हवी आहे
* "मी , या (छाया/चित्र) कृतीचा कॉपीराईट धारक (निर्माता आणि मालक) असून, या सुचने द्वारे निम्नलिखीत परवान्यात नमुद केल्या प्रमाणे प्रताधिकार-त्याग प्रकाशित करत आहे":

मी , या प्रकाशित घटकां/काचा निर्माता व/किंवा प्रताधिकारी असून, या सुचनेद्वारे निम्नलिखीत परवान्यात नमुद केल्याप्रमाणे प्रताधिकाराचा त्याग करणारा मसुदा प्रकाशित करत आहे"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!